फ्रेंच पर्लहार्बर

पुष्करिणी's picture
पुष्करिणी in जनातलं, मनातलं
4 Jul 2010 - 4:22 pm

फ़्रेंच लोकं थोडी ओळखीची झाली आणि इकडचं तिकडचं बोलायला लागली की कायम इंग्लीश किती वाइट, विश्वासघातकी, स्वार्थी आहेत यावर पोट्तिडकीन एकदा तरी भाष्य होतच...वॉटर्लू होउन जवळ जवळ २ शतकं लोटली, किती दिवस उगाळणार तेच... असं एकदा शेवटी म्हटल मी...झालं आजोबांनी त्यांच्या आजोबांची गोष्ट सांगितली, दुसया महायुद्धाच्या वेळची . मला ही घटना माहित होती पण इतिहासातली केवळ १ तारिख म्हणून. घटना एकच पण दोन कंगोरे आहेत ( नेहमीप्रमाणेच) आणि दोन्ही त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बरोबर वाटतात.
१० मे ला विन्स्टन चर्चिल ब्रिटन चे पंतप्रधान होउन ७० वर्ष झाली. २ रं महायुद्ध अगदी दाराशी येउन पोहोचलेलं, हिटलरची फ़त्ते दिवसेंदिवस होतीच आहे, आणि बिटनच्या पंतप्रधानांनी ( चेंबर्लीन ) राजीनामा दिलाय ....,अशा अत्यंत जोखमीच्या काळात हे पद हातात घेतल.
रॉयल नेव्हीच जरी नाव मोठं होत तरी लक्षण मात्र खोट होतं कारण आरमार जूनं आणि जगभर पसरलेल. फ़्रेंच आरमार हे जगातल संख्येन आणि तांत्रिक दृष्ट्या नंबर १, चर्चिलनं फ़्रेंच अ‍ॅड्मिरल डार्लान बरोबर एक करारही केला की यदाकदाचित हिटलरनं स्वारी केलीच तर एकमेकांच्यात बोलणी केल्याशिवाय तह करायचा नाही.
२४ मे ते ४ जून डंकर्क ची निर्णायक लढाइ फ़्रेंचांबरोबर खांद्याला खांदा लाऊन ब्रिटीश लढले, फ़्रेंच जनता चर्चिल आणि ब्रिटीशांचे गोडवे गात होती. फ़क्त अमेरिका काही ब्रिटनला नव्या तंत्रिक बाबतीत सरस अशी हत्यारं, बोटी देणं फार गांभिर्यानं घेत नव्हती, रूझवेल्ट्ला चर्चिल ची पत्र आणि तारा चालू होत्या.

१० मे ला सूत्र हातात घेतली आणि १४ जून ला हिट्लरन पॅरिस त्याब्यात घेतलं...इंग्लीश खाडीपासून नाझी सैन्य फ़क्त २० मैलांवर आलं. चर्चिलचं धाबं चांगलच दणाणलं, जर फ़्रेंच आरमार हिटलरच्या हातात पडलं आणि ते भविष्यात ब्रिटन विरूद्ध वापरलं गेलं तर ब्रिटन चा निभाव स्वप्नातही लागण शक्य नव्हतं हे त्याला पूरेपूर माहिती होतं ...रूझवेल्ट्ला परत तार करून मदत किती तातडीन गरजेची आहे हे पट्वण्याचा निष्फ़ळ प्रयत्न चालू होता, रूझ्वेल्ट्चा विचार काही वेगळाच होता, त्याच्यामते ब्रिटन हिटलर विरूद्ध एकटं लढायला काही मानसिक रित्या खंबीर नाही, त्यानं ताबडतोब कॅनडाच्या राजदूताला बोलावून रॉयल नेव्हीची अटलांटिक मधली जहाजं वेळ पडल्यास कॅनडात ठेवा असं सांगितल ( कॅनडा तेंव्हा राजाच्या आधिपत्याखाली होता ), कॅनडाला हा हेतू बराच स्वार्थी वाटला आणि त्यांनी ताबडतोब चर्चिलला ही बातमी दिली .

२२ जून ला फ़्रेंच सरकारनं हिटलर शी करार केला ३/५ फ़्रान्स हिटलर च्या अधिपत्याखाली आला, तहात हिटलरनं आम्हांला तुमच्या वसाहती आणि आरमारामध्ये काही इंटरेस्ट नाही ‘ असं नमूद केलं. पण वेळ येइपर्यंत वाट पहाणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा होता...
या दरम्यान फ़्रान्स च्या अ‍ॅडमिरलन ( डार्लान ) एक अत्यंत गुप्त पत्र सगळ्या जहाजांना पाठवलं की नाझी फ़ौजा जहाजं ताब्यात घ्यायला आल्या तर तुम्हीच जहाजं आणि जहाजावरची हत्यारं निकामी करा, चर्चिलला ह्या पत्राबद्द्ल माहित नव्हतं .

चर्चिल समोर फ़्रेंच अ‍ॅडमिरल डार्लाननं दिलेल्या वचनावर विश्वास ठेवणं किंवा नाझी फ़ौजांनी काही करण्या आगोदर ब्रिटनन फ़्रेंच आरमार ताब्यात घेणं नाहीतर बुडवणं हे दोनच अवघड मार्ग शिल्लक....डार्लानन वचन तर दिलय पण परिस्थितीत खूप बदल झालाय, फ़्रान्स जवळ जवळ नाझींच्या आधिपत्याखाली आलाय अशा परिस्थितीत चर्चिलन अटलांटिक मध्ये तैनात असलेल्या ब्रिटीश अ‍ॅडमिरल ला चर्चा करायला बोलावल आणि प्रस्ताव सांगितला...अ‍ॅडमिरल सोमर्व्हिल ऐकूनच चाट पडला कारण चर्चिल ज्यांच्यावर हल्ला करायला सांगत होता त्यांच्या बरोबरीनं सोमर्व्हिले आणि त्याचे खलाशी २ आठवड्यापूर्वीच नाझी फ़ौजांविरूद्ध लढले होते, त्यामुळे जहाजावरच्या सैनिकांना आणि त्याला स्वत:ला हे मानसिक रित्या अत्यंत अवघड आणि जिकिरीच काम होत..आणि साधीसुधी नाही तर वेळ पडल्यास आख्खं फ़्रेंच आरमार खलास करण्याची योजना होती, ऑपरेशन कॅटेपॉल्ट .

बरं हे सगळ आरमार अत्यंत विखुरलेलं, काही जहाजं आणि पाणबुडी सुरक्षित रहावीत म्हणून फ़्रांसन ब्रिटन मध्येच ठेवली होती, काही इजिप्तच्या अलेक्झांड्रिया पोर्ट मध्ये, काही अल्जेरिया च्या मर्स-अल-कबिर या पोर्ट मध्ये आणि काही दस्तुरखुद्द फ़्रान्स मध्ये होती. यातिल मर्स-अल-कबिर मध्ये ४ विशाल युद्धनौका, विमानवाहू नौका, ६ विनाशकारी नौका असं महत्वाच आरमार अ‍ॅडमिरल मार्शल ब्रुनो जेनसोल च्या नेतृत्वाखाली नांगर टाकून होत, अ‍ॅड्मिरल सोमरव्हिलवर हे सगळ आरमार वेळ पडल्यास सफ़ाचट करण्याची जबाब्दारी सोपवण्यात आली (युद्धनौका एच.एम.एस हूड). त्याचवेळी अ‍ॅडमिरल कनिंगहॅम वर अलेक्झांड्रियात असणाया आरमाराला खलास करायची कामगिरी दिली..ब्रिटन मध्येच असणारं फ़्रेंच आरमार हाती घेणं तौलनिक रित्या सोप होत...आणि हे सगळं एकाच दिवशी सूर्य मावळायच्या आत....

३ जुलै च्या पहाटे ब्रिटीश पाण्यात असणारी विनाशकारी युद्ध्नौका काही जीवितहानी न होता ताब्यात घेण्यात आली, पण पाणबुडी ताब्यात घेणं तितक सोप गेलं नाही ...त्यावरील लोकांना मारून ताबा घेतला गेला..

Location

*गुलाबी वर्तुळ : मर्स-अल्-कबिर ( अल्जेरिया ) बंदर
*पोपटी वर्तुळ : अलेक्झांड्रिया ( इजिप्त ) बंदर

त्याच वेळी एच.एम.एस. हूड मर्स-अल-कबिर कडे रवाना झाल...ब्रिटीश जहाजं क्षितीजावर पाहून फ़्रेंच खलाशी खूश झाले ...त्यांना वाट्ल की जहाजं त्यांना घेउन जाण्यासाठी आली आहेत....सोमर्व्हिलनं कॅप्ट्न हॉलंडला (याचं फ़्रेंच भाषेवर प्रभुत्व होतं) बोलणी करायला मोटरबोटीन पुढं पाठवलं, पण जेनसॊलन कमी हुद्द्याच्या माणसाशी बोलायला नकार दिला..कॅप्टनन तशीच बोट दामटत नेली आणि अटी पुढं टाकल्या...महत्वाच्या अटी अशा होत्या.
१.आमच्या बरोबर सगळं आरमार घेउन ताबडतोब आमच्या हद्दीत चला, आम्हांला इतकं आधुनिक आरमार आणि इतके शूर योध्दे जर्मनांच्या हाती लागू द्यायचे नाहीत.
२. आमच्या बरोबर, आमच्या नेतृत्वाखाली युद्ध संपेपर्यंत जर्मन फ़ौजांशी लढा, या दोन अटी मान्य केल्यास युद्ध संपल्यावर तुमच सगळं आरमार आम्ही रिस्टोअर करू आणि काही तोड्फ़ोड झाली असल्यास नुकसानभरपाइ देखिल देउ.
३. नाहीतर तुम्ही स्वत:च तुमची जहाज युद्धासाठी निकामी करा आणि तुमच्या युरोप सोडून इतरत्र असलेल्या वसाहतींमध्ये युद्ध संपेपर्यंत किंवा अमेरिकेन पोर्ट मध्ये रहा.
४. ह्यातल काहीही मान्य नसेल तर आम्ही राजाच्या हुकुमावरून येत्या ६ तासांत तुमच्या इथल्या सगळ्या बोटी बुडवून टाकू आणि हा आमच्यासाठी अत्यंत दु:खदायक निर्णय असेल.

चिंचोळ्या बंदरात नौका नांगर टाकून होत्या.
port

....ships

* फोर्स एच : एच एम एस हूड हल्ला
* डंकर्क, श्टासबर्ग, प्रोव्हेन्स इत्यादी नांगर टाकून असलेल्या फ्रेंच युद्धनौका

अ‍ॅडमिरल जेनसॉलनं कॅप्ट्न हॉलंड्ला कोणत्याही परिस्थितीत आमचं आरमार जर्मनांच्या हाती पडू देणार नाही अशी लेखी हमीही दिली पण अशा कोणत्याही अश्वासनासाठी चर्चिल ची तयारी नव्हती.. जेन्सॊलन हे सगळं त्याच्या बॉसला ( डार्लान ) ला तार करून पाठवलं, युध्दाच्या तयारीसाठी त्यालाही थोडा वेळ हवा होता... .....डार्लानला हे सगळ फ़ार अपमानास्पद आणि विश्वासघात झाल्यासारख वाटलं..त्यान हल्ल्याचं उत्तर हल्ल्यानं देण्याचा हुकूम दिला, हे अर्थातच चर्चिल्च्या गुप्तहेरांनी इंटरसेप्ट केलं आणि ताबड्तोब सोमर्व्हिलला हल्ला कर आणि सूर्यास्तापूर्वी सगळं संपव अस सांगण्यात आलं...झालं, कॅप्टन हॉलंडला परत बोलवण्यात आलं...तरीही फ़्रेंच अ‍ॅडमिरला हे लोकं खरच इतक्या तडकाफ़डकी हल्ला करतील असं अजिबात वाटलं नाही ...ब्रिटीश विमानांनी समुद्रात सुरूंग टाकायला सुरुवात केली ज्यामुळे जहाजांना पळून जाता येउ नये . साधारण पावणेसहाला सोमर्व्हिलन सर्वात मोठ्या युध्द्नौकेवर गोळीबार चालू केला आणि नंतरच्या फ़क्त १२-१५ मिनिटात ती बुडवली ..तिच्यावरच्या ९७७ लोकांसकट. बाकीच्या नौकांच सुरूंगामुळ आणि चिचोळ्या बंदरात नांगरल्यामुळं बरच नुकसान झाल...फ़क्त एक युद्धनौका आणि काही विनाशकारी नौका फ़्रेंच हद्दीत पळून जाण्यात यशस्वी झाल्या
सोमर्व्हिलनं ४ जुलै ला परत नुकसान झालेल्या बोटींवर विमानानं बॊम्बिंग केल आणि जबाबदारी पूर्ण केली..एकूण जीवितहानी जवळ जवळ १२५० ते १३०० आणि खूप जखमी.

ship

याच वेळी ( ३ जुलै १९४० ) ला अलेक्झांड्रिया बंदरात नांगर टाकलेल्या बोटींना अ‍ॅडमिरल कनिंगहॅमन ह्याच अटी पाठवल्या पण त्यानं चर्चिलच्या हुकूमाच पूर्णत: पालन न करता बोलणी ४ दिवस चालू ठेउन सगळ्या युद्ध्नौका निकामी करून घेतल्या...
८ जुलै पर्यंत हेच चालू होत...

फ़्रांसमध्ये प्रचंड प्रक्षोभ उसळला...दरम्यान जिब्राल्टर वर फ़्रेंच विमानांनी हला चढवला आणि काही व्यापारी जहाज पकडली पण फ़ार काही ते करू शकले नाहीत...हिटलरनं मात्र याचा पूरेपूर प्रॉपगंडा साठी फ़ायदा करून घेतला, आणि सगळे डिप्लोमॆटिक संबंध तोडण्यात आले.

हा सगळा निर्णय चर्चिलन स्वत: संसदेला, जनतेला आड्पड्द्यात ठेउन घेतला होता...पंतप्रधान झाल्याच्या ५४ व्या दिवशी त्यान संसदेत हे सगळ उघड केल आणि त्याला अनपेक्षित असा जनता, संसद आणि मिडिया कडून पाठिंबा मिळाला ....
अमेरिका या सगळ्या प्रकारावर एकंदरीत बरीच खुश झाली ,ब्रिटन नाझींविरूद्ध लढण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल ही एकप्रकारची खात्री पटली आणि या नंतरच रूझवेल्ट्न बरीच युद्धजन्य मदत पाठवली.

पुढं या हल्ल्यातून वाचलेल्या आणि दुरूस्त केलेल्या युद्ध्नौका घ्यायला जेव्हा नाझी फ़ौजा २७ नोव्हेंबर १९४२ ला आल्या तेव्हा डार्लान्च्या गुप्त पत्रानुसार खलाशांनी जर्मनांच्या हातात पडण्याआधी त्या स्वत:हून निकामी केल्या...ह्याची डार्लानन चर्चिल ला पत्र लिहून ‘जंट्लमन्स प्रॉमिस‘ पाळ्ल्याची आठवण करून दिली...

एकाच दिवशी इतक्या कमी वेळात झालेली ही सर्वात मोठी जीवितहानी आणि तीही मित्रराष्ट्रानं केलेली...ब्रिटीशांच्या दॄष्टीनं हे सगळं सावधगिरी बाळगण्यासाठी आणि नाझींचा नायनाट करण्यासाठी आपण किती बांधिल आहोत / त्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे हे अमेरिकेला दाखवून देण्यासाठी अत्यंत दु:खदरित्या केलेला एक शो तर फ़्रेंचांच्या दृष्टीन निव्वळ विश्वासघात...दोन्हीही बाजू त्यांच्या त्यांच्या बाजून ठीक वाट्तात.

* रेफरन्स : National Geographic channel Documentary: Churchill's Darkest Decision
* गुगल मॅप्स
* चित्र आंतर्जालावरून साभार

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

टारझन's picture

4 Jul 2010 - 5:04 pm | टारझन

अत्यंत प्रभावी भाषा , अत्यंत प्रभावी लेखन !! इंटरेस्टींग :)

- (आकर्षण दे फ्रेंच) टार्नार्दो ले कुपर

मेघवेडा's picture

4 Jul 2010 - 5:07 pm | मेघवेडा

छान! मस्तच लिहिलंयस. तू महायुद्धांच्या इतिहासावर विस्तृतपणे लिहीच. छान लिहितेस! :)

पाटील हो's picture

23 May 2015 - 8:51 am | पाटील हो

खरच लिहा तुम्ही .
तो हॉलीवूड पर्लहार्बर सिनेमा पहिल्यापासून ह्या विषयाचा कुतूहल होताच .
पण आज इतिहास वाचायला मिळाला .

मेघवेडा's picture

4 Jul 2010 - 5:21 pm | मेघवेडा

(दोनदा आल्यामुळे प्रकाटाआ)

इंटरनेटस्नेही's picture

4 Jul 2010 - 5:23 pm | इंटरनेटस्नेही

अत्यंत माहितीपुर्ण लेख. अनेक शुभेच्छा!

--
(कुतुहल दे फ्रेंच) 8> इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

इंग्रज वाईटच आहेत हे सत्यच आहे म्हणा. B)
वेताळ

Pain's picture

5 Jul 2010 - 12:07 am | Pain

देवदूतांना वाईट म्हणता? कुठे फेडाल ही पापं :>

युद्ध म्हटले कि अशा गोष्टी कराव्याच लागतात. मित्रराष्ट्राचीच नव्हे तर आपलीही हानी करुन शत्रू*ला नामोहरम करण्याचे प्रयत्न केले जातात.
पुर्वीच्या काळी जर लढाई हरली तर माघार घेताना विहिरींमधे विष वगैरे टाकुन निकामी केल्या जात, शेते, गवत पेटवून दिले जाई म्हणजे पाणी, वैरण मिळणार नाही.
आ़क्षेप आहे तो युद्ध किंवा कुठलीही आणीबाणी नसताना २००-३०० वर्षे संपूर्ण जगावर अत्याचार केले त्याला...

सुनील's picture

5 Jul 2010 - 7:17 pm | सुनील

तरीही वसाहतकार म्हणून स्पॅनिश्/पोर्तुगिझांपेक्षा इंग्रज पुष्कळच उजवे म्हणावे लागतील.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पुष्करिणी ह्या एक प्रतिभावान उदयोन्मुख (जाल)लेखीका असल्याची हा लेख एक झलक आहे.

तिमा's picture

5 Jul 2010 - 1:31 pm | तिमा

त्या स्त्रीच असतील असे १०० टक्के कसे म्हणता येईल ?
हल्ली कोणीही 'शरदिनी' निघू शकतो.
लेख मात्र उत्कृष्ट !

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सहज's picture

5 Jul 2010 - 1:33 pm | सहज

तसे झाले तर वरचे वाक्य बदलू हाय काय नाय काय! :-)

भोचक's picture

4 Jul 2010 - 5:38 pm | भोचक

पुष्करणी मस्तच माहिती. या विषयावर आणखी वाचायलाही आवडेल.

(भोचक)
जाणे अज मी अजर

स्वाती दिनेश's picture

4 Jul 2010 - 5:59 pm | स्वाती दिनेश

माहितीपूर्ण लेख आवडला.
( त्या आजोबांच्या बरोबरच्या गप्पागोष्टीही लिही ना जमेल तेव्हा.)
स्वाती

सुनील's picture

4 Jul 2010 - 6:06 pm | सुनील

छान, वेगळी माहिती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रामदास's picture

4 Jul 2010 - 8:20 pm | रामदास

असेच म्हणतो.
पुन्हा एकदा वाचून नविन प्रतिक्रिया लिहीतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jul 2010 - 9:51 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम लेख. दुसर्‍या महायुद्धातल्या एवढ्या महत्वाच्या घटनेबद्दल नीट माहिती आज कळली. धन्यवाद.

अजून एक... चर्चिलने फ्रेंच सरकारबरोबर करार केला की अ‍ॅडमिरल डार्लानबरोबर? सार्वभौम फ्रेंच सरकार अस्तित्वात असताना डार्लान कसा करार करेल? का हा करार नसून नुसतेच 'अंडरस्टँडिंग' होते? नंतरच्या 'जंटलमॅन्स प्रॉमिस' वरून तसेच वाटते आहे.

बिपिन कार्यकर्ते

पुष्करिणी's picture

5 Jul 2010 - 1:50 am | पुष्करिणी

हा करार ( अ‍ॅशुरन्स फ्रॉम बोथ साइड्स ) चर्चिल पंतप्रधान व्हायच्या आधीचा आहे.

पुष्करिणी

Pain's picture

5 Jul 2010 - 12:00 am | Pain

सुंदर लेखन. असे झाले एवढेच माहिती होते पण इतकी विस्तृत माहिती आणि नकाशांबद्दल धन्यवाद!
यात वापरले ते साधे जलसुरुंग होते का लिंपेट ?
यात उल्लेखलेली एच.एम.एस. हूड ही बिस्मार्कशी झालेल्या लढाईत बुडवली गेली.

पुष्करिणी's picture

5 Jul 2010 - 1:52 am | पुष्करिणी

साधे जलसुरूंग वापरले गेले, हो हीच ती एच. एम, एस. हूड..

पुष्करिणी

मिहिर's picture

5 Jul 2010 - 12:54 am | मिहिर

मस्त लेख आहे.

धनंजय's picture

5 Jul 2010 - 6:35 pm | धनंजय

मस्तच माहिती

या अप्रतिम लेखाच्या लिंकेसाठी मनोबाला अनेक धन्यवाद. वर काढत आहे.

वॉल्टर व्हाईट's picture

23 May 2015 - 12:56 am | वॉल्टर व्हाईट

धन्यवाद,उत्तम लेख.

एस's picture

23 May 2015 - 7:40 am | एस

उत्तम लेख. त्यातले फोटो दिसायला हवे होते.

मृत्युन्जय's picture

23 May 2015 - 10:33 am | मृत्युन्जय

अतिशय उत्तम लेख. पुष्करिणितैंचे असे लेख म्हणजे पर्वणीच होती एकेकाळी.

पुष्करिणी's picture

23 May 2015 - 1:54 pm | पुष्करिणी

एकेकाळी :)
आहे हो मी अजून :)