दक्षिणायन..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जे न देखे रवी...
30 Jun 2010 - 4:04 pm

तो अविष्कार आता माझा नव्हे
तो पुरस्कार आता माझा नव्हे..

मी मस्त मजेत गायलो, भिजलो
तो पाऊस आता माझा नव्हे..

घेतली होती रम्य, हळुवार चुंबने
तो किनारा आता माझा नव्हे..

मोप मिळविल्या टाळ्या अन् शिट्ट्या
तो रंगमंच आता माझा नव्हे..

मी स्त्रीलंपट काहीसा, सभ्य बुरख्यातला!
तो स्वभाव आता माझा नव्हे..

घुसविली मी काळजात कट्यार
तो तेजिनिधी आता माझा नव्हे..

उपाध्या, पद्व्या करतो अता अर्पण
तो सन्मान आता माझा नव्हे..

-- तात्या अभ्यंकर.

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

अवलिया's picture

30 Jun 2010 - 4:06 pm | अवलिया

या वेगाने तात्या कविता करत राहिला तर दिवाळीच्या आत त्याचा कविता संग्रह नक्की निघेल. लगे रहो.. :)

--अवलिया

विसोबा खेचर's picture

30 Jun 2010 - 4:07 pm | विसोबा खेचर

=))

आंबोळी's picture

30 Jun 2010 - 4:09 pm | आंबोळी

या वेगाने तात्या कविता करत राहिला तर दिवाळीच्या आत त्याचा कविता संग्रह नक्की निघेल.

गणपतीच्या आतच निघेल अस वाटतय...

आंबोळी

आंबोळी's picture

30 Jun 2010 - 4:07 pm | आंबोळी

काहीतरी कुठेतरी खुप खोल आत मधे पिळवटल गेलय खर....
फारच छान!

आंबोळी

श्रावण मोडक's picture

30 Jun 2010 - 4:11 pm | श्रावण मोडक

काय, झालंय काय?

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jun 2010 - 6:10 pm | llपुण्याचे पेशवेll

करुन भागले वगैरे ...
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

टारझन's picture

30 Jun 2010 - 4:12 pm | टारझन

दिले हिणकस प्रतिसाद झोंबलेल्या मिर्‍या...
उडवती संपादक , तो प्रतिसाद माझा नव्हे.

धमाल मुलगा's picture

30 Jun 2010 - 4:30 pm | धमाल मुलगा

चांगली वाटली. चांगली जमलीये कविता की गज़ल :)

अवांतरः तात्या, पावसाळा आहे, जरा पाणी उकळुन वगैरे घ्या. कालपरवापासुन तुम्हाला इतक्या कविता का होताहेत? :D

टारझन's picture

30 Jun 2010 - 4:34 pm | टारझन

अवांतरः तात्या, पावसाळा आहे, जरा पाणी उकळुन वगैरे घ्या. कालपरवापासुन तुम्हाला इतक्या कविता का होताहेत?

आरारारारा ... बाजार उठला =)) =)) =)) कसलं हालकट आहे हे बेनं !!

विसोबा खेचर's picture

30 Jun 2010 - 4:39 pm | विसोबा खेचर

चांगली जमलीये कविता की गज़ल

अरे म्हणून मी लेखनविषय निवडताना 'गझल' हा प्रकार निवडलाच नाही.. आपल्याला साला गझलचे नियमच माहीत नायत..

त्या पेक्षा कविता किंवा मुक्तक बरं.. कडक नियमांचं बंधन नाय..

अर्थात, केसूकडे गझल लिवायला पण मी शिकणारे आस्ते आस्ते..

गुरुशिवाय विद्या नाय!

कालपरवापासुन तुम्हाला इतक्या कविता का होताहेत?

सध्या गाठीशी पैशे नाहीत, धंदा बसला होता तो आस्ते आस्ते सुधारतो आहे त्यामुळे दाढी वगैरे वाढवून 'नव-कवी' झालो आहे. आणि त्यामुळेच मराठी सारस्वताच्या भिंतीवरी सध्या कवितेच्या रेघा मारतो आहे..! :)

(हिमालयाची उशी घेऊन झोपणारा) तात्या सरंजामे! :)

धमाल मुलगा's picture

30 Jun 2010 - 5:40 pm | धमाल मुलगा

हा हा हा!
लय भारी. :)

पाषाणभेद's picture

1 Jul 2010 - 2:56 am | पाषाणभेद

हे उदाहरणार्थ एकदम मस्तच.

बाकी लगे रहो तात्याभाय.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

II विकास II's picture

30 Jun 2010 - 4:33 pm | II विकास II

परीस्थितीने गांजल्याशिवाय खरे काव्य बाहेर पडत नाही ते खरच आहे म्हणा.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jun 2010 - 6:14 pm | llपुण्याचे पेशवेll

आरशात पाहीलेले ते चेहरे माझेच का?
का प्राक्तनास भुलणारे आरसे फितूर होते

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

परिकथेतील राजकुमार's picture

30 Jun 2010 - 4:37 pm | परिकथेतील राजकुमार

पितामह तात्यांचे दक्षिणायन भारी आहे ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रभो's picture

30 Jun 2010 - 6:16 pm | प्रभो

आवडली!!

वाहीदा's picture

30 Jun 2010 - 7:51 pm | वाहीदा

खालील ओळी कोणाच्या आहेत ते आठवत नाहीत
पण तुमची कविता वाचताना आठविल्या

वेदना कळीकाळाच्या,अतीव दुःख पचवण्यास,
पहिल्या धारेची पावशेर देशी पिऊन पाहिली !

शोधीले मग मीच माझे तेज आत्मकिरण,
सुर्याकडे मी जरा आज पाठ करुन पाहीली !

~ वाहीदा

jaypal's picture

1 Jul 2010 - 12:07 pm | jaypal

जबरदस्त ओळी आहेत या
"शोधीले मग मीच माझे तेज आत्मकिरण,
सुर्याकडे मी जरा आज पाठ करुन पाहीली !" =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

वेताळ's picture

30 Jun 2010 - 7:55 pm | वेताळ

वाचायला सोप्या आणि कळायला देखिल सोप्या आहेत.

वेताळ

यशोधरा's picture

30 Jun 2010 - 7:58 pm | यशोधरा

सुरेख.

अविनाशकुलकर्णी's picture

1 Jul 2010 - 7:42 am | अविनाशकुलकर्णी

मोप मिळविल्या टाळ्या अन् शिट्ट्या
तो रंगमंच आता माझा नव्हे
मस्त

ऋषिकेश's picture

1 Jul 2010 - 9:47 am | ऋषिकेश

तात्या सरंजामेंना कविता चांगली जमली आहे ;)
कविता होऊ द्यात अजून

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

विसोबा खेचर's picture

1 Jul 2010 - 11:23 am | विसोबा खेचर

प्रतिसादकर्त्या सार्‍या रसिकवरांचे आभार..

II विकास II's picture

1 Jul 2010 - 11:25 am | II विकास II

>>प्रतिसादकर्त्या सार्‍या रसिकवरांचे आभार..

धन्यवाद

सन्जोप राव's picture

1 Jul 2010 - 11:34 am | सन्जोप राव

कविता फार्फार आवडली. 'चाललो, गेलो, आता फिरुनि न येणे, इथे आता काहीच लिहिणार नाही' वगैरे पार्श्वभूमीवर खुलून दिसणारी कविता. पुलेशु.

सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह