साहित्य :
४-५ खेकडे
आल लसुण पेस्ट १ चमचा
मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
एक मोठा कांदा
२ चमचे मसाला
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा चिंचेचा कोळ
वाटण : १ कांदा व पाव वाटी सुके खोबरे किसुन भाजुन थंड झाल्यावर वाटावे
१ चमचा गरम मसाला.
तेल
कृती:
चिंबोरे साफ करुन घ्यावे. टोपात तेल टाकुन लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळावा. आता त्यात आल, लसुण पेस्ट टाकुन हिंग हळद, मसाला, चिंबोरे व चिंबोरे बुडतील एवढ पाणी टाकायच. आता १० मिनीटे उकळू द्याव मग त्यात गरम मसाला, चिंचेचा कोळ मिठ टाकुन थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करावा.
अधिक टिपा :
* ह्यात चिंबोर्याचे जे दोन मोठे नांगे सोडून छोटे पाय असतात ते मिक्सरमध्ये वाटून त्याचा गाळही रश्यात टाकतात.
* चिंचेचा कोळ त्याचा वईसपणा घालवण्यासाठी टाकतात. म्हणून थोडाच टाकावा. आंबट होऊ देउ नये.
* चिंबोरी छोटी असतील तर कापली नाहीत तरी चालतात.
मोठ्या चिंबोर्या मधुन कापुन त्यच्या पोटातील काळी पिशवी काढुन टाकतात.
* चिंबोर्याचे पिठ भरुन कालवण करतात त्याची रेसिपी नंतर टाकेन.
प्रतिक्रिया
29 Jun 2010 - 5:05 pm | प्रियाली
कालच घरात खेकडे (स्नो क्रॅब्ज) केले होते.

29 Jun 2010 - 5:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे खायचं आहे का खाऊन झाल्यावर उरलेलं आहे ?
(शक्यतोवर शाकाहारी) अदिती
29 Jun 2010 - 5:09 pm | प्रियाली
हे खायचं!
(खेकडे दिसेपर्यंत शाकाहारी) प्रियाली
29 Jun 2010 - 9:35 pm | विसोबा खेचर
व्वा! :)
29 Jun 2010 - 5:47 pm | आंबोळी
धन्यवाद जागुतै....
अता या विकांताला बोंबिल करावे की चिंबोरे असा प्रश्न पडलाय...
आंबोळी
29 Jun 2010 - 6:40 pm | सुनील
दोन्ही करा! चिंबोर्यांचे कालवण आणि तळलेले बोंबिल!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Jun 2010 - 6:53 pm | jaypal
ह्दड्यला म्ला प्न बोल्वा.
जागु तै तुम्ही आणि गणपा दोघांकडे चांगला महीनाभर मुक्काम ठोकायला पायजे.
कधी येऊ सांगा?
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
29 Jun 2010 - 7:05 pm | सुनील
उद्या येताय?
जरूर या. उद्या संकष्टी! साबुदाण्याच्या खिचडीचा बेत आहे!
मग येताय ना?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Jun 2010 - 9:25 pm | जागु
प्रियाली, तुमच्याकडे असे साफ करुन मिळतात का खेकडे?
आदिती, त्यात अजुन मांस आहे म्हणजे खायचे आहेत.
आंबोळी, कदाचित तुम्हाला मी तिसरा प्रश्न ही टाकेन विकांतासाठी.
जयपाल, सुनिल तुम्ही आंबोळीकडे रविवारी गेलात तर तुम्हाला मिळेल.
सुनिल आमच्याकडेही उद्या खिचडी.
29 Jun 2010 - 9:31 pm | प्रियाली
स्नो क्रॅब्जचे पाय मोठ्ठे आणि पोट लहान असते. मी आधीच शिजवलेले फ्रोझन खेकडे घेते. ते साफ करून, तोडून, उकळवलेले असतात. भारतातल्यासारखी चव नसली तरी वाईट नसतात. आम्हाला आवडतात!!
29 Jun 2010 - 9:38 pm | जागु
बर आहे पण वेळ आणि दगदग वाचते.
अजुन इथे तशी सोय नाही.
30 Jun 2010 - 11:41 am | वेताळ
खेकडा साफ करायला? फक्त त्याच्या नांग्या कुटुन पिळुन काढताना जरा वेळ लागतो. बाकी प्रियालींच्या फोटोत दाखवले तसे खेकडे आपल्याकडे नाही भेटत. ते बहुधा प्रथम उकडुन घेतले आहेत व नंतर त्याच्या नाग्या मोडल्या आहेत.
वेताळ
30 Jun 2010 - 1:28 pm | सिमन्तिनि
तुमच्या बायकोचि मज्जा आहे बाबा.
30 Jun 2010 - 2:06 pm | गणपा
=))
अहो जागु तै आहेत भौ नाही.
30 Jun 2010 - 2:18 pm | जागु
वेताळ त्या साफकरायला नाही वेळ लागत खाताना तोडत खायला वेळ लागतो.
सिमन्तिनी कोणाच्या बायकोची मज्जा आहे ?