
साहित्य :
४-५ खेकडे
आल लसुण पेस्ट १ चमचा
मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
एक मोठा कांदा
२ चमचे मसाला
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा चिंचेचा कोळ
वाटण : १ कांदा व पाव वाटी सुके खोबरे किसुन भाजुन थंड झाल्यावर वाटावे
१ चमचा गरम मसाला.
तेल
कृती:
चिंबोरे साफ करुन घ्यावे. टोपात तेल टाकुन लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळावा. आता त्यात आल, लसुण पेस्ट टाकुन हिंग हळद, मसाला, चिंबोरे व चिंबोरे बुडतील एवढ पाणी टाकायच. आता १० मिनीटे उकळू द्याव मग त्यात गरम मसाला, चिंचेचा कोळ मिठ टाकुन थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करावा.
अधिक टिपा :
* ह्यात चिंबोर्याचे जे दोन मोठे नांगे सोडून छोटे पाय असतात ते मिक्सरमध्ये वाटून त्याचा गाळही रश्यात टाकतात.
* चिंचेचा कोळ त्याचा वईसपणा घालवण्यासाठी टाकतात. म्हणून थोडाच टाकावा. आंबट होऊ देउ नये.
* चिंबोरी छोटी असतील तर कापली नाहीत तरी चालतात.
मोठ्या चिंबोर्या मधुन कापुन त्यच्या पोटातील काळी पिशवी काढुन टाकतात.
* चिंबोर्याचे पिठ भरुन कालवण करतात त्याची रेसिपी नंतर टाकेन.