पुस्तक - द पाथ ऑफ मिस्टीक लव्हर - बोल साँग्स ऑफ पॅशन अँड एक्स्टसी

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
28 Jun 2010 - 3:44 am

पुस्तक - द पाथ ऑफ मिस्टीक लव्हर - बोल साँग्स ऑफ पॅशन अँड एक्स्टसी
लेखक - भस्कर भट्टाचार्य, पेनी स्लिंगर्,निक डग्लस

मला आवडणार्‍या अध्यात्मिक, तांत्रिक संप्रदाय आदिशी संबंधीत विषयावरचं हे पुस्तक आणि मुख्य म्हणजे भरपूर कविता असलेलं म्हणजे माझ्याकरता पर्वणीच. लेखकाने अतिशय ओघवत्या भाषेमधे बोल संप्रदायाची सुरुवातीला ओळख करून दिली आहे.
बोल हे मुख्यतः एकतारी हे वाद्य आणि जोडीला बाया किंवा डुगी तसच गाबागुबी आणि गोपीयंत्र ही जोडवाद्य घेऊन दारोदारी फिरणारे बंगालमधील साधू. "याची देही , याची डोळा मोक्ष प्रप्ती होऊ शकते" असा संदेश देत आणि राधा-कृष्णाच्या प्रेमाची , गोपींच्या भक्तीची अतिशय एक्स्टॅटीक (आर्त) गाणी गात हिंडणारी ही जमात. हे साधू अशिक्षित, हिंदू-मुस्लीम पंथांच्या खालच्या वर्गातून मुख्यत्वेकरून येतात, त्यामुळे सर्व गावकर्‍यांना यांच्याबद्दल प्रेम, आपुलकीची भावना असते. बोल यांच्या गाण्यांमध्ये लहान-थोर, गरीब-श्रीमंत, आजारी-धडधाकट सार्‍यांकरता आनंददायक असा अध्यात्मिक ठेवा सापडतो. जो भारतासारख्या गरीब देशात बंगाली जनतेला चार विरंगुळ्याचे क्षण देऊन जातो. बहुसंख्य लोकांना बोल साधूंची गाणी आवडत असली तरी काही लोकांच्या टीकेचे हे साधू लक्ष्य होऊन बसले आहेत. याचं मुख्य कारण बोल साधूंचा परंपरागत रूढी, धार्मीक विधी, आचार पद्धतींना असलेला विरोध, मूर्तीपूजेस विरोध. ना वर्णाश्रमास पाठींबा ना इस्लाम धर्माचे अनुकरण. यांचा स्वतःचाच पंथ आहे जो की तांत्रीक मार्ग, हिंदू भक्तीमार्ग, सूफी संप्रदाय आदिंची सरमिसळ आहे.
लेखक बोल संप्रदायाची अशी खूप रोचक माहीती देतो आणि मग या पुस्तकात येतात त्या कविता. एकामागे एक अतिशय सुरेख मिस्टीकल (अनोखी) चित्रे आणि तितक्याच अनोख्या कविता. या कविता मूळ कवितांचे इंग्रजीमधील भाषांतर आहेत.
कविता फरच मननीय आहेत आणि बरोबर त्यांचा अर्थदेखील उलगडून दाखवला आहे परीच्छेदामधे. नक्कीच आपल्याला अध्यात्मिक, विलक्षण विश्वात घेऊन जातात.
पुढे काही मला कळलेली कडवी देते आहे.-

(१)
What wick is in this lamp
That burns in the city
Both night & day?
It burns in the center of the lamp
See it O beloved one
No wind or rain will make it flicker.
(ही ३ पेड्यांची वेणी घातलेली वात म्हणजे सूक्ष्म प्रतलावरच्या ३ नाड्या ज्या पाठीच्या कण्यातून जातात. दिवा म्हणजे भ्रूमध्याच्या, आज्ञाचक्राच्या जागचा प्रकाश, नगरी म्हणजे शरीर.)

(२)
O mind are you man or woman
I cannot understand
This marvelous secret

(3)
Don't speak of emotions to the insensitive
Don't tell anyone
For noone will understand
By soaking coal in milk
You cannot make it white

A certain king desired
That bitter should become sweet
He fed a neem tree
with sackful of sugar
The tree became three times as bitter
Never did it aquire any sweetness.

(4)
The man becoming three women
Rides the waves & three fluides
He assumes threefold nature
Worldly, celestial & divine

A poison, she is worldly
At the essence of beauty, she is celestial
As the taste of nectar, she is divine

Only one who is sensual
can prepare the nectar
One who has the GURU's grace
can go to the river
To play with the three women

From Lotus

<चित्र जालावरून साभार>

(5)
Nectar in the moon
honey in the lotus
Tell me how they can be united?
The moon in the sky
The lotus in the lake
Having made the hive
The bee stores honey in it

The union of moon & lotus
is by the act of divine love alone
where there is real passion
there is divine love
see it observing well
milk becomes butter by churning.

मला पुस्तक १० च्या पट्टीवर ७ इतकं आवडलं.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

28 Jun 2010 - 5:56 am | शुचि

ही अनोखी फीत बोल साध्वीची आहे असं त्या एकतारीवरून वाटतं -

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||