ब्लॉगवाले सावधान!

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
20 Jun 2010 - 1:15 am

'फुगल'ने फतवा काढला आहे की,ज्या ब्लॉगवरच्या पोस्टना दहा दीवसापेक्षा जास्त वेळापासुन एकही प्रतिसाद मिळाला नाहीये व कधीच ज्या वाचल्या जात नाहीत/गेल्या नाहीत,त्या सर्व पोस्ट delete केल्या जातील.तेव्हा..............
ज्या मिपाकरांनी व त्यांच्या संबंधीत लोकांनी उगाच मोफत खरडायला मिळत म्हणुन जे पोस्ट,लेख(अर्थात फालतु हा शब्द कमी पडतो आहे) लिहले आहेत्,ते त्वरीत दुसरा एखादा बळी बघुन तिथे टाकावेत.उशीरा जाग आलेल्या,स्व:ताला अनुभवी लेखक/कवी समजणा-यांनी(त्यांचे गैरसमज वाढवणारे ही लेखकच/कवीच असतात,त्यांचा उद्देश हाच की आपला लेख कोणी माणुसकी म्हणुन वाचेल).......आपले ते पोस्ट स्वःताच कुठेतरी हलवावेत.
काहींनी ते लेख कविता,अनुभव्,व्ययक्तिक्,रोमॅन्टीक,विनोदी,संगणकविषयी अशी नावं देउन तडफडत ठेवले आहेत्,त्या लेखांवर आता फुगल दया करणार आहे.
काहींनी कोणच वाचत नाही म्हणुन 'माझ्या मनातल माझ्यासाठीच येथे लिहतो/लिहते' अस स्वःताचे सात्वन करणार काहीतरी लिहलय.कोणी त्याला 'जगाकडे बघायचा द्रुष्टीकोन' म्हणुन उगाच दुस-याच्या माथी मारल आहे व जागा भरली आहे.
काहींनी अर्थहीन कवीता सरळसरळ यमक जुळवता येतात फक्त म्हणुन लिहल्या आहेत्,त्या कवितांच्या चार-पाच ओळी वाचुनच कवीची दया येते.खराब प्रतिक्रीया देण्यापेक्षा दुर्लक्षित केलेल्या ब-या अस म्हणुन सोडल तर इतर कुठेही लिंक देउन छळतात.त्यांच्याकडुन चाललेल्या शोषणामधे कंपनीला भागीदार व्हायचे नाही,ह्याची दखल घ्यावी.
काहींनी व्ययक्तिक आयुष्यात घडलेल्या घटनांना दहापट वाढवुन सांगुन ज्या २-४ प्रतिक्रीया मिळाल्या म्हणून लेखांचा(अर्थात साफ खोट्या) भाडीमार लावला आहे तो बंद करावा.स्वःताच्या नावाला मदर तेरेसा,मायकल जॅक्सनचा दर्जा देउन .blogspot जोडले आहे,त्यामुळे आपण आपले विचार वहीत लिहावे,आमच्याकडुन अशा सुमार लिखाणाला ह्यापुढे जागा मिळेल अशी अपेक्षा ठेउ नये.
व्ययक्तीक स्वःताचे फोटो चढवण्यास आमची बंदी नाही,पण त्याखाली जे थोतांड लिहल गेल आहे त्यासाठीही आम्ही जागा पुरवणार नाही आहोत हे ध्यानात घ्यावे.आपला खोटेपणा आपल्या लिखाणाबरोबर तो आपल्या छायाचित्रातुनही जगापुढे येत असतो.आमच्या कंपनीच्या लोगोची प्रतिमा आम्ही ढासळु देउ शकत नाही.
comments (0) हे वाचुन देखील आपण कोणत्या प्रेरणेने खोट्,दर्जा गामवलेल लिखाण करतच
राहता ते शोधण्यात कंपनीला स्वारस्य नाही.पण comments (0) हे आम्हाला आमच्याकडुन दील्या गेलेल्या संकेतस्थळावरच्या जागेवर फार काळ सहन करता येणार नाही.आपण त्या comments (0) मधील शुन्य घालवावा,ते आपल्या इतक्या दीवसांत न जमल्याने आता ते काम आम्ही तो संबंध लेखच उडवुन करणार आहोत.आपण 'त्या अज्ञान प्रेरणा' घेउन दुसरीकडे लिहावे,कंपनीला मोफत जागेचा चांगला वापर हवा आहे.
आपण आम्ही आपल्याला एवढ्या दीवस समजुन घेतले(अ़क्षरक्ष: अथक प्रयत्नाने सहन केले) त्याप्रमाणे कंपनीच्या भावनेला समजुन घ्याल अशी अपेक्षा आहे.

Disclaimer :
*कंपनीचे नवीन धोरण अंमलात आणल्यानंतर ब्लॉगवरचे काहीजणांचे बरेचसे लेख मिटतील्,काहीजणांचे २-४ लेखच राहतील,तर काहींचे पुर्णच लेख मिटतील(अश्यांना नव्याने जागा दीली जाणार नाही व त्यांनी पुढे लिखाण करायचे की नाही ह्यावर विचार करावा,आपल्या लिखाणाचा दर्जा आपण वेगळीकडे लिहुन तसाच कायम ठेवा.कंपनीला त्यात काही स्वारस्य नाही).

व्ययक्तिक टीपणी :
ज्या प्रेरणेने आपण इतके दीवस 'तसल' लिखाण चालुच ठेवलत,त्या प्रेरणेला आमचा सलाम.पण 'फुगल'चा प्रामाणिक भागिदार म्हणुन आम्हाला हे पाउल उचलण अपरीयार्य होत.
आपल्यास 'फुगल'ने आतापर्यंत आपले म्हणने लिखाणाच्या रुपात अंतरजालावर लिहायला(दुस-यांना छळायला नाही) जागा दील्याबद्दल आपण कंपनीचे आभार मानावेत अस वाटत.पण कंपनीला समाजसेवा करण्यात काडीची उस्तुकता नाही,आपण आपले विचार इतरत्र मांडावेत व no comments ची सवय कंपनीला नाही,तेव्हा आपले चालु द्या.)

सउशानत १०२४,
फुलटाइम सल्लागार
- Foogle Corporation Limited.

धोरणअभिनंदन

प्रतिक्रिया

Pain's picture

20 Jun 2010 - 4:47 am | Pain

कशाला स्वप्ने दाखवता उगाच :(
ज्यांना रटाळ लेखन जमते त्यांना यातून पळवाट काढणे अशक्य नाही.

आणि प्रतिसाद आले म्हणजे लेखन चांगले असे काही नसते~

आनंद घारे's picture

20 Jun 2010 - 8:10 am | आनंद घारे

'फुगल'ने फतवा काढला आहे की,ज्या ब्लॉगवरच्या पोस्टना दहा दीवसापेक्षा जास्त वेळापासुन एकही प्रतिसाद मिळाला नाहीये व कधीच ज्या वाचल्या जात नाहीत/गेल्या नाहीत,त्या सर्व पोस्ट delete केल्या जातील
ही फारच पोकळ धमकी आहे. अनेक ब्लॉगकरी आधीपासूनच 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या वाटेनेच जात असल्यामुळे त्यांना घाबरायचे कारण नाही. ( मी त्यातला नाही बरं!)
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

शानबा५१२'s picture

20 Jun 2010 - 10:12 am | शानबा५१२

( मी त्यातला नाही बरं!)

वा वा काका!..................असो!
निदान त्या कारणाने तरी मराठी माणुस जवळ येइल.

पण ह्यापुढे 'फुगल' त्यांचे no comments चे ओझे त्यांनाच वाहु देणार आहे.

आणि हो,जर ब्लॉग लेखकांनी लेख टीकावेत म्हणुन एकमेकांना प्रतिक्रीया देउन 'फुगल'ला स्वःताच्या शोषण करणा-या लेखांना तसच ठेवण्यास भाग पाडल्,तर आम्ही व मी तर जातीने लक्ष घालुन त्यांचे डाव मोडुन काढीन.
एखादा ब्लॉग लेखक जास्तच प्रतिसाद देत असेल्,तर त्याचा ब्लॉग विनाकारण उडवुन देइन.
आम्ही मिपा संपादकांपेक्षा कडक आहे म्हट्ल!!

टारझन's picture

20 Jun 2010 - 10:18 am | टारझन

स्वःताच कुठेतरी हलवावे

हे वाक्य काळजाला भिडले :)

अवांतर : शेणबा चे लेख कुठुन सुरु होतात , कुठे जातात आणि कुठे संपतात ह्यावर एक थेसिस होउ शकेल =))

असो ,

- शागीबा१२३

शानबा५१२'s picture

20 Jun 2010 - 10:37 am | शानबा५१२

उगाच काहीतरी इथे तिथे PJ मारले तर म्हणुन माझे लेख उडणार नाहीत ह्या भ्रमात राहु नये.

स्वःताच कुठेतरी हलवावे

आमची कात्री सुरु झाली की अस कुठेतरी,काहीतरी हलवत बसण्यापेक्षा खुपजणांना दुसर काही करायला उरणार नाही.

आपले एखाद दुसरे लेख राहतील अस वाटत...........पण तेही लवकरात लवकर कसे उडतील ह्याकडे मी जातीने लक्ष घालीन्,तेव्हा काळजी नसावी.

टारझन's picture

20 Jun 2010 - 10:42 am | टारझन

उगाच काहीतरी इथे तिथे PJ मारले तर म्हणुन माझे लेख उडणार नाहीत ह्या भ्रमात राहु नये.

भ्रमाचा भोपळा फोडल्याबद्दल धन्यवाद. =))

आमची कात्री सुरु झाली की अस कुठेतरी,काहीतरी हलवत बसण्यापेक्षा खुपजणांना दुसर काही करायला उरणार नाही.

कुठेही काहीही कापत नका बसु , नाहीतर आपणास हलवायलाही काही उरणार नाही =))

आपले एखाद दुसरे लेख राहतील अस वाटत...........पण तेही लवकरात लवकर कसे उडतील ह्याकडे मी जातीने लक्ष घालीन्,तेव्हा काळजी नसावी.

खुलाश्याबद्दल धन्यवात :)

- येडबा५१२

नितिन थत्ते's picture

20 Jun 2010 - 10:54 am | नितिन थत्ते

असे लेख सामान्यतः एक एप्रिलला लिहिले जातात.

नितिन थत्ते

शानबा५१२'s picture

20 Jun 2010 - 11:26 am | शानबा५१२

'फुगल'च्या धोरणांची चेष्टा करु नका.
आपण आता आमच्याकडून 'शेवटची तारीख' कुठली येते,ह्याकडे लक्ष द्या.मग खुशाल मोकळे व्हा १ एप्रिलसाठी!
आपल्या एखाद्या प्रतिक्रीयेमुळे इतरांच्या ब्लॉगवर परीणाम होइल ह्याची आपण दखल घ्यावी.

पाषाणभेद's picture

20 Jun 2010 - 12:22 pm | पाषाणभेद

फुगल ने जो फतवा काढलाय तो आपण येथे लागू केला तर?

डॉ.श्रीराम दिवटे's picture

20 Jun 2010 - 2:46 pm | डॉ.श्रीराम दिवटे

नाहीतरी हुश्शार नेटकरी आपल्या लिखाणाची 'स्थळप्रत' स्वतःकडे ठेवतच असतात.

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...

शानबा५१२'s picture

20 Jun 2010 - 3:06 pm | शानबा५१२

कंपनीला त्याच्याशी कर्तत्व नाही,पण comments (0) व followers खाली रीकाम्या जागा व खोटे सदस्य फुगलला खपणार नाहीत.

शानबा५१२'s picture

20 Jun 2010 - 11:27 pm | शानबा५१२

खुपजणांना झोंबल वाटत :>