ललिता फडके यांना श्रद्धांजली

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
25 May 2010 - 2:14 pm

आधीच्या पिढीतील गायिका ललिता फडके यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी गायन कारकीर्द थांबवली होती. संगीतकार श्रीधर फडके यांच्या त्या मातोश्री!
मला आठवणारं त्यांच एक गाणं: 'रंगू बाजारला जाते'

ललिता फडके यांना श्रद्धांजली.

समाजबातमी

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

25 May 2010 - 2:18 pm | बिपिन कार्यकर्ते

जाणे हा निसर्गनियमच आहे, तरीही अशी मंडळी गेली की वाईट वाटतेच. माझीही श्रद्धांजली.

बिपिन कार्यकर्ते

विकास's picture

25 May 2010 - 4:44 pm | विकास

जाणे हा निसर्गनियमच आहे, तरीही अशी मंडळी गेली की वाईट वाटतेच. माझीही श्रद्धांजली.

विनम्र श्रद्धांजली.

सुहासिनी मधील शास्त्रीय संगिताप्रमाणे म्हणलेले "मी तर प्रेम दिवाणी" हे गाणे पण त्यांनी म्हणले होते. (दुसर्‍याचालीत आहे ते आशा भोसलेंचे).

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रकाश घाटपांडे's picture

25 May 2010 - 4:48 pm | प्रकाश घाटपांडे

आम्ची ही विनम्र आदरांजली
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मस्त कलंदर's picture

25 May 2010 - 2:34 pm | मस्त कलंदर

माझीही श्रद्धांजली..
बाकी, रंगू बाजारला जाते हे गीत त्यांनी म्हटले आहे हे माहित नव्हते!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

विशाल कुलकर्णी's picture

25 May 2010 - 4:40 pm | विशाल कुलकर्णी

माझीही आदरांजली !

विशाल

क्रान्ति's picture

25 May 2010 - 10:03 pm | क्रान्ति

आजही विविधभारतीच्या "भूले बिसरे गीत" या कार्यक्रमात आवर्जून वाजणारं त्यांचं मोहम्मद रफींच्या समवेत गायिलेलं हे "नदिया के पार" मधलं सुरेल गीत इथे ऐका या चित्रपटातली बरीच गाणी त्यांनी गायिलेली आहेत.
ललिताबाईंना माझीही विनम्र आदरांजली.

क्रान्ति
अग्निसखा

मदनबाण's picture

25 May 2010 - 10:04 pm | मदनबाण

माझीही श्रद्धांजली...

मदनबाण.....