आधी सहन करता येत नसे, पण आता सवयच झालीय. भारतात एक अब्ज माणसे आहेत. त्यातले निदान पन्नास-साठ कोटी तरी पुरुष असणारच. त्यातले दहा-वीस कोटी वजा केले, तरी तीस-चाळीस कोटी माणसे तरी रोज येता-जाता रस्त्यावर थुंकत असतात. कोणाच्या थुंकीत कफ असतो, कोणाच्या थुंकीत तंबाखू, पान मसाला, तर कोणाच्या थुंकीत सगळ्याचं एकत्रित मिश्रण!
मी रोज कॉलेजला जाण्यासाठी बोरीवलीवरुन ट्रेन पकडतो. किती वाजता कुठे जाणारी ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म ऐवजी कोणत्या प्लॅटफॉर्मवर किती मिनीटांनी उशिरा येणार आहे हे सांगितल्यावर किंवा सांगायच्या आधी "" यात्रीयोंसें निवेदन है कि वे कृपया इधर उधर ना थुंके. थुंकनेसे बिमारी फैलती है. अगर कोई यात्री इधर उधर थुंकता हुआ पाया गया तो उसे एक हझार रुपयोंतक का जुर्माना या दो महिने की जेल या फिर दोनो हो सकती है................ मे आय हॅव युअर अटेन्शन प्लिझ..."" आणि मग तीच सुचना इंग्रजीतून, मराठीतून... सांगायला लागले, की लोकांना जणू काही आठवण होते, की अरे! आज थुंकायचं राहूनच गेलं. मग... कोणास ठाऊक ही ट्रेन कधी येतेय... अशा तोऱ्यात ते प्लॅटफॉर्मवरुन वाकतात, गाडी जिथून येणार असते त्या दिशेकडे फक्त एक नजर टाकतात, आणि मान खाली झुकवून, हनुवटी पुढे करून रूळांवर पिचकारी मारतात. काहीजण पचाक्कन थुंकतात, तर काहीजण बुळ्ळुकन थुंकतात. त्यांनी थुकायची कला आणि शास्त्रच विकसित केलं आहे. लिहावं तितकं थोडंच आहे, बोलावं तितकं थोडंच आहे, ही विधानं आत्ताच्या एसएमएस जनरेशन मध्ये कशी काय बरोबर ठरतात, हे विधान करणऱ्यालाच माहित. पण मी मात्र अशी विधानं मानत नाही. म्हणून आजच्या पुरतं एवढंच पुरे! बऱ्याच दिवसांनी टंकलेखन करतोय म्हणून एवढंसं लिहीलेलं सुद्धा मला भरपूर वाटतंय. तरीही मी थुंकी आणि अशाच किचकट विषयांवर अशीच पाचकळ विधानं करत राहीनच अधून-मधून.
प्रतिक्रिया
15 May 2010 - 6:46 pm | मदनबाण
रेल्वेतुन प्रवास करताना जर रुळाच्या दोन्ही बाजुला पाहिलत तर...दोन्ही बाजुची खडी गुटखा, पान इं रंगाने रंगलेली दिसेल.
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
15 May 2010 - 11:21 pm | शोधा म्हन्जे सापडेल
काही वर्शांपुर्वी (अंदाजे ८ वर्ष) मी राहूल थेटरात (पुणे) मॅट्णी षिणेमा बघायला गेलो होतो. मी सकाळ्पासून काही खाल्लं नव्हंतं. माझ्या समोर दोन फूटावर एक कामगार-वर्ग ष्टाईल मुलगा हूबा व्हता. मग त्याने पच्किनं मानिक्चंदची पिचकारी मारली. ते द्रूष्य बघून आनी त्यो वास घेऊन मला प्वाटात ढवळल्यासारखं, कोरडी ऊलटी आल्यासारकं झालं. येवड्या वर्सांनंतर दिखिल ते आटंवलं की मला प्वाटात ढवळ्ल्यागत हूतया.
आजकाल तर थूंकणं "इन" असल्यासारखं पिचकर्या मारणं चालू असतं.
पीस इज, नौट व्हेन देअर इज नो व्हायलन्स ,बट् व्हेन फ्लावर्स ब्लूम.............
15 May 2010 - 11:24 pm | कुंदन
काही लोकांना या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायचीही सवय असते.
15 May 2010 - 11:29 pm | टारझन
श्री विसोबा खेचर ह्यांनी तर शुंकण्याची तुलणा स्वर्गसुखाशी केलेली आहे ...
तेंव्हा
"पच्च्च्च्च्च्च्च्चाआआआआक्क्क्क्क्क्क्क्क्क्"
~ बोगदा
16 May 2010 - 7:26 am | तिमा
त्यातले निदान पन्नास-साठ कोटी तरी पुरुष असणारच. त्यातले दहा-वीस कोटी वजा केले, तरी तीस-चाळीस कोटी माणसे तरी रोज येता-जाता रस्त्यावर थुंकत असतात.
अनेक स्त्रियांनाही मी थुंकताना पाहिले आहे. घाणेरडेपणा हा व्यक्तिच्या लिंगावर अवलंबून नसतो.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|