गंधमय अस्तित्त्वाचा शोध.......

सांजसखी's picture
सांजसखी in जनातलं, मनातलं
26 Apr 2010 - 6:30 pm

होती एक जमीन.... खडकाळ, भेगाळलेली, ओसाड आणि नापीक.....
अतिशय निरपेक्ष ..... जणू स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव नसलेली.... काळाच्या ओघात गोठलेल्या भावनांची आणि त्यामुळे या भावनाविश्वाशी दूर दूर जाऊ पहाणारी.......
तिच्या मनात एकच सलं होता..... आपण नापीक... निरूपयोगी.... आणि म्हणूनच की काय सारं जगं आपल्याला वाळीत टाकल्यासारखं दुर्लक्ष करतं....
तिला सतत एकच भीती असायची... ती सतत बदलणार्‍या ॠतूंची.... कधी रखरखणार्‍या ऊन्हाची......तर कधी झोंबणार्‍या वार्‍याची .... कधी हुलकावणी देणार्‍या अन न बरसणार्‍या ढगांची......
असचं आयुष्य होतं तिचं .. एकाकी... निरस.. रू़क्ष...
पण काळाचा महिमा खरचं अजब असतो.... याचं प्रत्यंतर तिला तेव्हा आलं जेव्हा एके दिवशी अचानक भर दुपारी वैशाखात हळूच काही ढगांची चाहूल लागली..... ती पुन्हा घाबरली कारण अशा न बरसणार्‍या ढगांची थट्टा आता तिला सहन करणं तिला शक्य नव्ह्तं..... पण तिच्या हातात काहीच नव्ह्त हे ही तितकच सत्य........
वातावरण अचानकच बदललं ..... भर दुपारी संध्याकाळ झाली.... एका गच्च भरलेल्या ढगानं रखरखणार्‍या ऊन्हाला जणू निष्प्रभ केलं.... काही खासचं होतं त्या ढगात्......खरतरं खूप ह्ट्टी आणि स्वच्छंदी होता तो घनं........वार्‍यालाही न जुमानणारा....बरसणार नाही अशाच हेतूनं आलेला..... पण एका क्षणात काय झालं कोणास ठाऊक.....
बहूतेक त्या रूक्ष , ओसाड जमिनीकडे पाहून त्या मदमस्त ढगाला माया की कीव आली असावी अन काही समजण्याच्या आतच तो बरसू लागला.....रणरणत्या ऊन्हानं तापलेल्या जमिनीवर काही शिंतोडे पडताच वातावरण चदरवळ्लं.....रू़क्ष ,भेगाळ्लेल्या जमिनीतल्या खाचा काही क्षणातचं त्या ढगाच्या स्नेहानं भरल्या अन मृदगंधानं आसमंत दरवळू लागला...
यात सगळ्यात जास्त सुखावली ती धरा कारण आपल्यातल्या दडलेल्या मृदगंधाची जाणीव तिलाही पहिल्यांदाच होत होती....अन बरसणार्‍या ढगाला सगळ्चं अनाकलनीय वाटत होतं.... कारण त्याचा विचार काही निराळाचं होता......
हे सगळं चैतन्याचं नाटक काही क्षण असच चालू राहिलं पण इतक्यात सूर्यनारायण पुन्हा तापले....
ह्या सगळ्या नाटयात धरा फक्त सुखावतचं गेली कारण काही क्षणापुरतं का होईना पण स्वतःच्या गंधमय अस्तित्त्वाची जाणीव तिला झाली....
अजूनही हीच धरा रोज तापते.... रणरणते.... पुन्हा त्याच बरसणार्‍या मेघाची वाट पहात...... बरसण्याची आस धरून......

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

26 Apr 2010 - 6:36 pm | धमाल मुलगा

नि:शब्द!

काहीच बोलत नाही. फक्त पुन्हापुन्हा वाचुन अनुभवत राहतो.

मन's picture

27 Apr 2010 - 2:14 pm | मन

बस्स...
अधिक काय लिहिणार?

आपलाच,
मनोबा

शानबा५१२'s picture

27 Apr 2010 - 3:15 pm | शानबा५१२

:D जॉक

-----------------------------------------------------------------------
Dear....You come soon
or I will spoil everything again
....not c

मेघवेडा's picture

26 Apr 2010 - 7:18 pm | मेघवेडा

सांजसखे, खरंच नि:शब्द झालो गं.. तुझा लेख बघून उत्साहाने क्लिक केलं.. आणि खरंच अपेक्षाभंग झाला नाही!! :) सुंदर.. हृदयस्पर्शी!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते

प्राजु's picture

26 Apr 2010 - 7:35 pm | प्राजु

व्वा!!
एका साध्याच घटनेला किती सुंदर शब्दबद्ध केलं आहेस..
सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

डावखुरा's picture

26 Apr 2010 - 7:44 pm | डावखुरा

.............................!!!!

[खरंच नाही सुचत आहे काही....शब्दांकन उत्तम...
निर्जिव वस्तुंवर सजिवतेचा आरोप माझे आवडते आहे...खुप भावला लेख मनाला]

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

अरुंधती's picture

26 Apr 2010 - 7:55 pm | अरुंधती

<< रू़क्ष ,भेगाळ्लेल्या जमिनीतल्या खाचा काही क्षणातचं त्या ढगाच्या स्नेहानं भरल्या अन मृदगंधानं आसमंत दरवळू लागला...>>

सु रे ख! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अर्धवटराव's picture

27 Apr 2010 - 5:36 am | अर्धवटराव

मी एव्ह्ढेच म्हणेल कि वाचता वाचता त्या तृषार्त मातिचा गंध मी साक्षात अनुभवला !!
कुंद वाटतय !!

(तृषार्त) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क

रेवती's picture

27 Apr 2010 - 5:56 am | रेवती

खूप छान लेखन!
वाचताना माझ्यावरच जणू पाऊस पडत होता.

रेवती

शानबा५१२'s picture

27 Apr 2010 - 3:14 pm | शानबा५१२

:D जॉक

-----------------------------------------------------------------------

तिमा's picture

27 Apr 2010 - 10:59 am | तिमा

आपले लिखाण उत्तम व लक्षवेधी आहे. परत परत वाचताना आणखी नवीन अर्थ उलगडत जातात. धन्यवाद.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

स्वाती दिनेश's picture

27 Apr 2010 - 11:59 am | स्वाती दिनेश

सुरेख शब्दांकन!
स्वाती

प्रमोद्_पुणे's picture

27 Apr 2010 - 2:52 pm | प्रमोद्_पुणे

फारच छान...

टुकुल's picture

27 Apr 2010 - 3:02 pm | टुकुल

सुंदर लिहिल आहे, छोटेखाणी पण मनाला लागणारे.

--टुकुल

आनंदयात्री's picture

28 Apr 2010 - 12:06 am | आनंदयात्री

क्या बात् है !!
गंधमय अस्तित्वाचा शोध !! शिर्षक वाचुन वाटले काय बरे असावे ?
खडकाळ, भेगाळलेली, ओसाड आणि नापीक जमीनीच्या काल्पनीक भावविश्वाचे एवढे सुंदर चित्रण .. क्या बात् है !!

>>ह्या सगळ्या नाटयात धरा फक्त सुखावतचं गेली कारण काही क्षणापुरतं का होईना पण स्वतःच्या गंधमय अस्तित्त्वाची जाणीव तिला झाली....

अक्षरशः काटा आला अंगावर !!

स ला म !!

प्रभो's picture

28 Apr 2010 - 12:11 am | प्रभो

काय नाय टॅग बंद केला...

आनंदयात्री's picture

28 Apr 2010 - 4:24 pm | आनंदयात्री

=))