सावित्रिच्या लेकी ....

झुम्बर's picture
झुम्बर in जनातलं, मनातलं
21 Apr 2010 - 1:29 pm

आज पासून पोळ्या तु कर संध्याकाळच्या आईसाहेबांच फर्मान सुटल आणि अचानक का का का ????? काहूर उठल, अर्थात पोळ्या कारण ही फार मोठी बाब नवतीच मुळी ... पण ज्या कारण साठी मला हे काम गळ्यात घ्यायला सांगण्यात येत होत ते कारण जवळपास संतापजनक होत... हो कदाचित चाणाक्ष मिपा वाल्यांनी कारण ओळखल असेलच "जावई शोध " सुरु झाला होता...
अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नवती तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का? तर मला लग्न करायचं होत...
मला एक प्रश्न पडतो ज्या आया शिक्षणाच्या बाबतीत आमच्या नोकर्यांच्या बाबतीत पुरोगामी असतात त्या लग्न ही गोष्ट निघताच १८५७ काळात का जातात? तु कुठेही कमी नाहीस असा लहानपणापासून मनावर ठसवनार्या आया या बाबतीत तु एहते कमी आहेस आणि तु सुधारायच असा कस म्हणतात?
वयाच्या २३ व्या वर्षी तडजोडीची दीक्षा देण्यात येते ती कशी साध्य होणार? उपवर मुलीनी करण्या सारख्या बर्याच गोष्टी तिचे पालक तिला कानी कपाळी ओरडून सांगत असतात ..हा त्यांचा दोष आहे की आधुनिकता आणि पारंपारिक पणा या दोन्ही दरडींवर पाय ठेवणाऱ्या आपल्या समाजाचा आहे ? उपवर मुलांना तुला लग्नानंतर या गोष्टी करायच्या आहेत हे किती मुलांचे पालक सांगतात? उलट मुलांच्या आई अगदी नाक वर करून म्हणतात आता बायको आली की घे तिच्या कडूनच सगळी काम करून... तेव्हा किती पालक विचार करतात की येणारी मुलगी ही आपल्या मुलाच्याच वयाची आहे आणि त्याच्या इतकीच शिकलेली आणि त्याच्या सारखीच कामाणारी आहे ... तिच्या कडून काम करून घे ,सांगण्या पेक्षा आता तुला तिलाही सहकार्य कराव लागेल हे का नाही शिकवत?
कोणती आई मुळाल किमान चहा करायला शिकवते? बर्याच ठिकाणी चित्र काहीश्या प्रमाणात बदलाल असाल तरी अजूनही अगदी आधुनिक आणि सुशिक्षित कुटुंबातून मुलीना तु मुलगी आहेस म्हणून हे करायचाच आहे हे ऐकवलं जात ... कितीही समानतेच्या गप्पा मारल्या तरी आयुष्याच्या या वळणावर मुलगी हे मुलगीच असते ...आता म्हणल मुलगी आहे तर मुलगीच म्हणणार ठीक आहे हे ,... पण इथे म्हणा एवढ आहे की ज्या तडजोडी मुलीला करावयाच लागतील हे सांगितले जाते तेव्हा मुलानाही आम्ही ज्या तडजोडी करतो त्याची जाणीव असायला हवी ....
कधिनवत स्वयम्पाक करनार्या मुलान्च जे कौतुक होत आजहि ..तसच अम्च्य नोकरिचहि होउ दे हि माफक अपेक्शा नहिये का?
सावित्रीच्या लेकी म्हणून आज अभिमानानी मिरवतो पण या महत्वाच्या निर्णयाच्या वेळी मात्र तड्जोडिला सिद्ध होतोच न???

स्त्री पुरुश स्पर्धक नहि पुरक आहेत हा आपल्याच पुराणात सान्गितलेला विचार अमलात कधि येणार?

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

शुचि's picture

22 Apr 2010 - 1:14 am | शुचि

मानवी नातेसंबंध फार क्लिष्ट असतात. काही जणांना घरटं बनवायची हौस असते काहींना आभाळात भरारी घ्यायची.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears of those in anguish.

प्रियाली's picture

22 Apr 2010 - 1:22 am | प्रियाली

येथे सुरु आहे.

चतुरंग's picture

22 Apr 2010 - 1:28 am | चतुरंग

मुलींप्रमाणेच मुलांनाही स्वयंपाकाची जबाबदारी घेता यायला हवी. चहा/कॉफी करणे, कुकर लावता येणे, कणीक मळून ठेवणे, एखाद दोन सोप्या का होईना भाज्या करता येणे, आमटी करणे, गेला बाजार स्वयंपाकात मदत करणे ह्या गोष्टींचे रीतसर शिक्षण घरातच द्यायला हवे. मुलगा आहेस कसाही उंडारलास तरी रात्री घरी गिळायला मिळणारच हे उपयोगाचे नाही.
दोघांच्या भागीदारीत संसार व्यवस्थित फुलतो!

(भागीदार)चतुरंग

टारझन's picture

22 Apr 2010 - 2:21 am | टारझन

आम्ही कणिक तिंबवायला (धनंजयचे पाव आठवले) , भाज्या चिरायला आणि चिकन वगैरे शिजवण्यापासुन अंडी उकडणे-ऑम्लेट बनवने ,पोहे वगैरे बनवने शिकुन घेतलाय .. आमच्या म्याडम ला तशी आम्हाला खाऊ घालायची फार हौस असल्याने ती सद्ध्या बरेच पदार्थ शिकली आहे.

बाकी हे बळजबरी काम करुन घेणे नकोच ... ज्या बायको ला आपल्या नवर्‍याला खाऊ घालण्याचा कंटाळा आहे अशी बायको कोणाला हवीये ? किंवा फक्त राबवुन घेणारा नवराही कोणत्या पोरीला हवाय ? स्वजबाबदार्‍या ओळखुन समोरच्याला थोडासा कंफर्ट देऊन कामं केली की सगळं सुरळीत होतं :)

बाकी ज्याची त्याची वैयक्तिक मतं ;)
रंगोबांशी सहमत आहोत :)

-(भावी हमाल ) टारेश अंडीउकडी

प्रभो's picture

22 Apr 2010 - 5:39 am | प्रभो

बाकी हे बळजबरी काम करुन घेणे नकोच ... ज्या बायको ला आपल्या नवर्‍याला खाऊ घालण्याचा कंटाळा आहे अशी बायको कोणाला हवीये ? किंवा फक्त राबवुन घेणारा नवराही कोणत्या पोरीला हवाय ? स्वजबाबदार्‍या ओळखुन समोरच्याला थोडासा कंफर्ट देऊन कामं केली की सगळं सुरळीत होतं

टार्‍याशी १००% सहमत....

बरंय बाबा , मला थोडाफार काहीतरी करायला येतय ते...
(भावी हमाल)प्रभेष बायकोहुडकी

मेघवेडा's picture

4 Jun 2010 - 5:45 pm | मेघवेडा

>> दोघांच्या भागीदारीत संसार व्यवस्थित फुलतो!
>> स्वजबाबदार्‍या ओळखुन समोरच्याला थोडासा कंफर्ट देऊन कामं केली की सगळं सुरळीत होतं
>> बरंय बाबा , मला थोडाफार काहीतरी करायला येतय ते..

रंगाशेट आणि टार्‍या दोघांशी सहमत! अनुभव नसला तरी म्हणणं पटतंय! आणि प्रभ्याशी बाडिस.

(हमाल दे धमाल) मेवेश अननुभवी.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

बेसनलाडू's picture

22 Apr 2010 - 2:23 am | बेसनलाडू

वरील मताशी सहमत!
(सहमत)बेसनलाडू

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Apr 2010 - 4:58 pm | बिपिन कार्यकर्ते

+२

(लहानपणी तांदूळ वगैरे निवडलेला आणि आता बाजारात ओझ्याचा बैल म्हणून जाणारा) बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Apr 2010 - 5:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रंगाभाऊशी सहमत!
आमच्या घरात नवीत पिढीत बसून गिळायला पुरुषांनाच लाज वाटते.

अदिती

विशाल कुलकर्णी's picture

23 Apr 2010 - 10:31 am | विशाल कुलकर्णी

आमचं शैक्षणिक आयुष्य बरंचसं घराबाहेरच गेल्याने झक मारत सगळं शिकून घ्यावंच लागलं. पत्नी आजारी असताना किंवा एखादे दिवशी तिला कंटाळा आला असेल , अशा वेली तिला व्यवस्थीत गरम गरम स्वयंपाक करून खायला घातला की तिच्या चेहर्‍यावर जे समाधान उमटते त्याला कशाचीच सर येत नाही. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

चटोरी वैशू's picture

22 Apr 2010 - 10:21 am | चटोरी वैशू

अगदी बरोबर आहे... मुलं सुध्दा उपवर झाले कि त्यांना पण सगळे शिकवायला पाहिजे.... त्यांना पण सांगायला हवे..."आज पासून पोळ्या तु कर संध्याकाळच्या..."... वगैरे...वगैरे...

पण मुलांना जरि सगळे येत असले तरि ते कळु देत नाही कि त्यांना स्वंपाक येतो ते.... आणि त्यांच्या मातांना तर अजिबात आवडत नाही मुलाने काम केलेले...(कारण मुलाने आईला कधि मदत केलेली नसते ना!)

तस मलाही स्वयंपाकघरात पराक्रम गाजवायला आवडतं.....

- उपवर पिंगु

अर्धवटराव's picture

22 Apr 2010 - 11:37 pm | अर्धवटराव

पण तुम्हाला त्यात काहि चुकतय अस का वाटतं ?? ज्या प्रमाणे तुमचं शिक्षण, करिअर महत्वाचं त्याच प्रमाणे स्वयंपाक सुद्धा महत्वाचा !! चांगला स्वयंपाक करता येणं हे फार आवश्यक आणि महत्वाचं स्किल आहे हे कसं नाकारता येईल ?? अहो, माणसाचं आरोग्य, कुटुंबाचं अर्थशास्त्र आणि नाते संबंधातली दृढता या एका स्किलसेट वर लिलया जपता येते. हां, आता मुलांना स्वयंपाक शिकायला का आग्रह होत नाहि हा विषय वेगळा...

(तात्यांचं संगीत ज्ञान आणि गणपाच्या पाककृतींपुढे नतमस्तक) अर्धवटराव
-रेडि टु थिंक

स्वाती२'s picture

23 Apr 2010 - 12:28 am | स्वाती२

>>अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नवती तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का? तर मला लग्न करायचं होत...>>
इथेच सगळ गणित चुकतं. बर्‍याच घरात समानता म्हणजे मुलगा-मुलगी दोघांनाही काही काहीही काम न सांगणे असा सोपा अर्थ काढलेला असतो. मुलगा/मुलगी दोघांनाही आई-वडिलांनी लहानपणापासुन हळू हळू सगळ्या कामांची सवय लावुन स्वावलंबी बनवले तर बरेच प्रश्न सुटतात. पण सुरवातीला अपत्याच्या पुस्तकी अभ्यासाला अवाजवी महत्व दिले जाते. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर गोष्टी शिकवल्याच जात नाहित. जेवणाचे हाल होणार नाहित इतपत स्वयंपाक, कपडे धुणे/इस्त्री करणे, थोडे शिवणकाम, भांडी घासणे व इतर घराची स्वच्छता, थोडेफार आर्थिक नियोजन आई-वडिलांनी वेळीच आपल्या अपत्यास शिकवावे आणि याचा लग्नाशी संबंध लावू नये.

Pain's picture

23 Apr 2010 - 3:42 am | Pain

बर्याच ठिकाणी चित्र काहीश्या प्रमाणात बदलाल असाल तरी अजूनही अगदी आधुनिक आणि सुशिक्षित कुटुंबातून मुलीना तु मुलगी आहेस म्हणून हे करायचाच आहे हे ऐकवलं जात ...

ज्या प्रमाणात पुरूष एकहाती घर चालवतात त्याप्रमाणात बायका सर्व स्वयंपाक करतात.
ज्या प्रमाणात बायका नोकरी करतात त्याच प्रमाणात पुरूष घरकमात मदत करतात.
तुम्हाला योग्य लोक भेटले नाहीत एवढेच...

झुम्बर's picture

23 Apr 2010 - 9:58 am | झुम्बर

प्रिय मिपा करनो ,

सर्वप्रथम आभार .....

मला काही गोष्टी इथे स्पष्ट करायला नक्की आवडतील ,
वरच्या प्रतीक्रीयानमध्ये बरेच जण स्वयंपाक करतात हे वाचून आनंद वाटला ....
"@अर्धवट राव पहिल्यांदा मी सांगते इथे मी स्वयंपाक येतो की नाही यावर मत मांडले नाहीये .... तर मी इथे एक विचार पद्धती मांडली आहे ....मुलींच्या मनाची जी तयारी करून घेतली जाते ...आणि पुढे काय बंधन पाळावे लागतील हे सांगितले जाते त्यापद्धतीने मुलांना अजूनही नाही सांगितले जात .... पोळ्या करायला लावणे एक रूपक मी मांडले आहे .....

@pain माझ्या नशिबाने मला आई वडील खूपच आधुनिक मिळाले आहेत आणि होणारा नवराही तसाच आहे .... पण मी हे एक वैश्विक समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे .......

आणि इथे स्वयंपाक हे केवळ रूपक वापरलं आहे .... सगळ्याच बाबतीत मला समानता हवी आहे असा म्हणायचं आहे..

फक्त स्वयंपाक हीच केवळ गोष्ट नाहीये बर्याच आहेत.....

शेवटी

चू भू दे घे क लो अ

झुंबर

झुम्बर's picture

4 Jun 2010 - 4:03 pm | झुम्बर

माझ्या बोलन्यावर मिपा करन प्रतिक्रिया द्ययचि नहिये वाट्त