सा S S प!!!

मीनल's picture
मीनल in जनातलं, मनातलं
19 Apr 2010 - 8:12 am

होळी विशेषांक -हास्यगाऽऽरवा यात मी लिहिलेल्या अजगर या लेखात `जर-तर` ची गोष्ट होती. कल्पनाविलास करून हसवण्याचा प्रयत्न केला होता.
पण आताचे लेखन हे प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे. ---
इथे अमेरिकेत स्प्रिंग सिझन सुरू झाल्यावर निसर्गातील चैतन्य जणू आमच्यातही उफाळून आले. आमची बागही हरवीगार करण्याची इच्छा झाली.
मागच्याच आठवड्यात नर्सरीत जाऊन छान फुलांची २ मोठी झाडे आणली. टोमॅटो, बारीक मिरची आणि काकडीची इवली इवली रोपे आणली. त्यासाठी ज्यात रोगप्रतिकारक औषधे, फर्टीलाझर्स आहेत अशी महागाईची माती आणली. बागकामासाठी लागणारी आयुध आणि अवजारे आणली आणि गेल्या विक एंड्ला सकाळापासून मी आणि माझे यजमान बागकामाला लागलो.
दुपारपर्यंत खड्डे खणून मोठी झाडे, छोटी रोपटी लावून झाली. दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा कामाला लागलो.
आमच्या फ्रंट यार्ड मधले लॉन वाढतच नव्ह्ते कारण मधेच एक मोठे मेपलचे झाड आहे. थंडीच्या दिवसात काटकुळ्या काड्या झालेल्या या झाडाला आता बहर आला आहे, फुलं- पानांनी झाड डवरले आहे. पण त्याची सावली लॉनवर पडून ते गवत मात्र मृतवत दिसत होते. म्हणून मेपल ट्रीच्या फांद्या कापणे आवश्यक होते. इलेक्टीक सॉने माझे यजमान मोठाल्या फांद्या कापत होते आणि हेल्परचे म्हणजे माझे काम होते की त्या फांद्या घरामागच्या खड्ड्यात टाकून देणे हे होते. आमच्या घरामागे ओढ्यासारखा लांबच लांब खड्डा आहे. बरीच झाडे आहेत त्यात.

आमच्या घरातूनही छान दिसते तिथले खूप हिरवेगार दृश्य. हरत-हेचे सुंदर गाणारे पक्षी, काळी हरणे, झुपकेदार खारी, गबदूल बेवारस मांजरी, छोटुले ससे हे त्या सौंदर्यात नेहमी भर घालत असतात. त्यापलिकडे असलेले सॉकर फिल्ड आणि गोल्फ क्लबचा जरासाही त्रास या निसर्गाला होत नाही. कारण एकच.. तो ओढ्यासारखा लांबच लांब खड्डा!
त्यात आजूबाजूला असलेल्या झाडाच्या फांद्या, पाने, फुले सतत पडत असतात. ( फक्त निसर्ग करतो तोच कचरा. उरले सुरले अन्न,कागद, कचरा,प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे कुणीही तिथे टाकत नाही.)
माझं काम होत की त्या कापलेल्या मेपल झाडाच्या फांद्या त्या खड्ड्यात टाकणे.
आमच्या घराच्या उजवीकडून बॅकयार्डला जाण्यासाठी जिना आहे. त्या पलिकडे तो खड्डा. मी एकेक करून त्या मोठाल्या फांद्या जिन्यावरून खाली नेऊन त्या खड्ड्यात फेकत होते.
वर येताना घराच्या भिंतीलगत काळसर लांब साप मला दिसला.

मी घाबरून यजमानांना बोलावले.
"चल ग! साप?इथे कुठे?" असं म्हणत ते तिथे आले आणि "हो ग हो. सापच तो. मारूया त्याला. काठी आण जा जाडीशी गॅरेज मधून" म्हणून मला सांगितले.
मी "कुठची काठी, काय काठी" करत घरात पळाले आणि बाहेर येताना कॅमेरा घेऊन आले. सापाचा दूरूनच फोटो काढला.
साप निश्चल दिसला. म्हणून जराशी धिटावले होते. तेव्हा यजमानांच्या हातात माती उचलायचा फावडा होता. तो त्यांनी त्याच्या जवळ नेला आणि टोकाने ढोसल्यासारखे केले.
सापाने एकदम डोक वर उचललं . धीर एकवटून मी अजून फोटो काढला.

ते सापाला कळलं की काय कोण जाणे पण जरा पोझ देण्यासाठी त्याने पुढे होऊन मुंडी अजूनच वर उचलली. माझी भितीने गाळण उडाली .
यजमान म्हणाले "नाग आहे वाटतय. फणा काढतोय. जाऊ देऊ त्याला."
"बापरे. येईल की घरात कधी तरी." मी म्हणाले.
"मग जा. काठी आण मोठीशी, मारू त्याला." यजमान म्हणाले.
माझी भूतदया आडवी आली. "नको नको,मारूया नको.मी नाईन वन वन ला बोलावते. ते घेऊन जातील त्याला न मारता."
" नाईन वन वन कशाला? इमर्जन्सी आहे का ? काही नको." यजमानांनी माझा विचार मोडून काढला.
तेवढ्यत यू टर्न घेऊन सापाने वळण घेतलं आणि तो जीभ बाहेर काढून आमच्याच दिशेने पाहू लागला. ते पाहून मी भितीने गार पडले.

सापाच्या जिभेवरून यजमानांना खात्रीलायक वाटू लागले की तो नाग आहे.
"ह्याला मारला तर नागिण येईल." पूर्वी भारतात काम करत असताना फॅक्टरीत शॉप फ्लोअरवर एकदा नाग निघाला होता. तो यजमानांनी मारला होता. आठवड्याभरात दुसरा नाग निघाला होता म्हणे तिथे. तो कामगारांनी मारला आणि ती नागिण होती याची बातमी माझ्या यजमानांना दिली होती. या अनुभवावरून आमच्या घराजवळ दिसलेल्या सापाला ( नाग असो /नसो) न मारण्याचा त्यांचा निर्णय झाला.
तो मरावा अशी इच्छा नव्हती. त्याला रक्ताळलेलं मी पाहू शकले नसतेच. पण तो नजरेआड व्हावा अशी माझी तीव्र इच्छा होती. मी घाबरूनही त्याचे फोटो घ्यायची संधी दवडणार नव्हते.
आमचा विचार विनिमय आणि निरीक्षण सुरूच होतच तेवढ्यात सापाने जिन्याच्या बाजू बाजूने खाली बॅक यार्ड कडे जायला सुरवात केली. साप पुढे, कॅमेरा हातात घेउन मी आणि झाडाची फांदी हातात घेऊन यजमान त्याच्या मागे असे मार्गक्रमण सुरू झाले.

साप बिनधास्त होता असे नाही. पण घाबरून सरसर पळत ही सुटला नव्हता. आमच्या सारख्या दुष्ट मानव प्राण्यापासून बचाव त्यालाही हवा होता हे निश्चित.
तो बॅक यार्डच्या लॉनवरून त्यापुढील खड्ड्यातील झाडात, पालापाचोळ्यात जाईल असे वाटले.
पण त्याने दिशा बदलली आणि तो आमच्या घराच्या डाव्या बाजूच्या चढावाला लागला. हा चढाव पुन्हा घराच्या पुढे येउन संपतो.
तो आमच्या घराच्या उजवीकडून मागे जाऊन डाव्याबाजूने पुन्हा पुढे येणार अशी चिन्ह दिसू लागली. गॅरेज मधे शिरला तर बाहेर काढणं मुश्किल. म्हणून यजमानांनी ते पुढे जाउन बंद पटकन बंद केले.
साप घराच्या बाजूच्या झाडी खालून पालापाचोळ्यावरून जाताना स्पष्ट दिसत होता. मी कमरेत वाकून वाकून पहात होते त्याला. कुठे जातो आहे ते कळणे आवश्यक वाटले तेव्हा.

गेल्या वर्षी आम्ही घराची वास्तूशांत केली. तेव्हा वास्तू पुरूष आग्नेय दिशेला पुरला होता. त्या दिशेला तो साप वळला आणि बाजूच्या एका झुडपामागे दिसेनासा झाला. तिथे लपायला खरतर काही ही जागाच नाही आहे. ना सापटी, ना कपार. ना दाट झाडी.
यजमानांनी झाडात फांदी ढोसून ढोसून त्याला बाहेर हुसकवण्याचा प्रयत्न केला. पण छे!! तो काही बाहेर आला नाही. संध्याकाळ पर्य़ंत आम्ही फ्रंट यार्डमधे साफसफाई व इतर कामं करत होतो. त्या झुडपाकडे माझे बारीक लक्ष होते. पण तो साप काही दिसला नाही.
तो साप दॄष्टीआड व्हावा अशी माझी इच्छा होती पण तो कायमचा दॄष्टीआड व्हावा अशी होती.
ती इच्छा अजूनही आहे. तरीही आता माझी नजर का कुणास ठाऊक सारखी त्यालाच शोधत असते.

आता मनात काही प्रश्न पुन्हा पुन्हा येताहेत.
१] तो कुठल्या प्रकारचा साप? विषारी की बिन विषारी?
२] खऱच नाग तर नसेल?
३] पुन्हा दिसेल का कुठे? घरात/ बाहेर?
४] तो वास्तूपुरूष पुरून ठेवलेल्या जागीच का जावा?
५] तिथून शेवटी गेला तरी कुठे?

राहती जागाअनुभव

प्रतिक्रिया

अगोचर's picture

19 Apr 2010 - 10:52 am | अगोचर

बहुतेक ईस्टर्न किन्ग स्नेक वाटतो आहे.

http://www.centralpennreptiles.com/Collection/Colubrids/Eastern%20King%2...

किन्ग स्नेक बिन विषारी असतात आणि काही काही लोक पाळतात देखिल.

---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

शुचि's picture

19 Apr 2010 - 11:23 am | शुचि

छान रंगवलाय प्रसंग.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

अमोल केळकर's picture

19 Apr 2010 - 12:08 pm | अमोल केळकर

तुम्हाला बहुतेक राहू महादशा असावी ? :)
( कृ. ह. घ्या.)

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पाऊसवेडी's picture

19 Apr 2010 - 12:12 pm | पाऊसवेडी

हो हा इस्टर्न किंग्स स्नेक आहे तुम्ही खूपच मस्त लिहिले आहे एकदम रंगवून सांगितेले आहे
हा अगदीच बिनविषारी साप आहे बरेचे लोक हा पाळतात सुद्धा
तुमच्या घराच्या मागेच त्याला हवी तशी राहण्याची जागा आहे त्यामुळे असे साप उंदीर पाली वगेरे खाण्यासाठी येऊ शकतात पण ते बिनविषारी असल्याने काही धोका नाही
वास्तूपुरुष ठेवलेल्या जागी तो गेला त्याचे काही खास कारण नसावे कदाचित ती जागा त्याला लपण्यासाठी सोयीची वाटली असावी इतेकेच त्याचे कारण असावे :)
तो बहुधा परत त्या ओढ्याकडे पाल्यापाचोल्यात गेला असावा
काहीच काळजी करू नका कारण तो बिनविषारी साप आहे

मीनल's picture

19 Apr 2010 - 4:55 pm | मीनल

इस्टर्न किंग्स स्नेकची इतर माहिती, फोटो ईटरनेट वर ही पाहिली. तोच तो असावा.
विषारी नाही हे वाचून बरही वाटलं.
तरी आमच्या शेजा-यासारख सर्प जात पाळण्याचा विचार चुकून सुध्दा करणार नाही हो मी. :S

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

चित्रा's picture

19 Apr 2010 - 5:42 pm | चित्रा

सापाच्या मागे कॅमेरा घेऊन हिंडणे, मला तरी जमणार नाही!* सापाचे फोटो सुंदर आले आहेत. त्यामुळे खूपच कौतुक वाटले. लेख मस्त लिहीला आहे.

*(आमच्या घरी माझ्या लहानपणी खूपच साप येत. बहुतेक वेळा निरूपद्रवी धामण असे, तरीही सगळे लोक साप आला, साप आला करीत एका घराच्या अंगणातून दुसर्‍या असे त्याच्या मागे फिरत. काही साप मारणारे तज्ञ असत. आता त्या सापांबद्दल वाईट वाटते, तरी मुद्दाम एखादा साप दिसला तरी मागे फिरणार नाही.)

स्वाती२'s picture

19 Apr 2010 - 8:08 pm | स्वाती२

मस्त लिहिलय. आणि फोटोही छान आलेत. मला सापांची प्रचंड भीती वाटते. अगदी बिनविषारी असला तरी. हे असे फोटो वगैरे काढायला तर अजिबात सुचलं नसतं. मी आपला ९११ लावला असता.

मदनबाण's picture

19 Apr 2010 - 8:32 pm | मदनबाण

छान...अजगर भाऊंचा कल्पना विलास केल्यानेच नागोबांना तुम्हाला दर्शन द्यायची इच्छा झाली असेल... ;)
सापाचे फोटो सेशन उत्तम झाले आहे... ;)
वास्तु पुरुष...आग्नेय दिशा...छ्या काय तै !!! अवं तुमचा चायनीज फेंगशुई तोडगा गावला नाय का ? ;)

(टोपलीतल्या नागोबाला सुद्धा दुरुनच नमस्कार करणारा... ;) )
मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

प्राजु's picture

19 Apr 2010 - 8:47 pm | प्राजु

बाई ग!!
सह्ही लिहिलं आहेस? सापाला मोडेलिंगची सवय असावी. मस्त पोझेस दिल्या आहेत त्याने. ;)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

धमाल मुलगा's picture

19 Apr 2010 - 9:04 pm | धमाल मुलगा

आयला!
लै भारी किस्सा. :)

पण घरात/अंगणात साप निघाल्यावर कॅमेरा घेऊन त्याच्याभोवती फिरणं म्हणजे अवघडच आहात :) गेल्या जन्मी काय न्युजचॅनेलच्या कॅमेरामन होता की काय तुम्ही? :D

असो,
साप बिनविषारी होता हे फार बरं. उगाच मनात धाकधुक रहायची भानगड गेली. :)

विकास's picture

19 Apr 2010 - 10:44 pm | विकास

पण घरात/अंगणात साप निघाल्यावर कॅमेरा घेऊन त्याच्याभोवती फिरणं म्हणजे अवघडच आहात! गेल्या जन्मी काय न्युजचॅनेलच्या कॅमेरामन होता की काय तुम्ही?

असेच म्हणतो!

बाकी किस्सा एकदम सही!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Apr 2010 - 9:47 pm | llपुण्याचे पेशवेll

मला वाटलं कोणत्या यमन वगैरे रागावर लिहिलय कि काय.
फोटो छान आहेत. तुमचं धैर्य वाखणण्याजोगं आहे.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

अरुंधती's picture

19 Apr 2010 - 10:07 pm | अरुंधती

किस्सा व फोटो झक्कास! फक्त अशा घाबरलेल्या अवस्थेतही फोटो काढायचं तुझं डेअरिंग म्हणजे कम्माल वाटली!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रियाली's picture

19 Apr 2010 - 11:02 pm | प्रियाली

या वेळात छोटी रोपटी लावताय म्हणजे अमेरिकेत दक्षिणेला राहत असणार. तिथे नाग असण्याची शक्यता कितपत ते नेमके माहित नाही परंतु हा साप नाग नाही. वसंत ऋतू सुरु आहे, गर्मी वाढत जाईल. साप दिसतीलच या दिवसांत. पुन्हा कुठेही दिसेल पण गराज वगैरेमध्ये अडगळ असेल तर सावध रहा.

वास्तूपुरुषाशी काही संबंध नाही सापाचा. बाकी, तो पुन्हा दिसेल किंवा नाही देखील दिसणार. बिनविषारी आहे म्हटल्यावर फारशी भीती नाही.

लेख आवडला. फोटोंचे कौतुक वाटले. बर्‍याचदा अशा प्रसंगांत कॅमेरा हाताशी असला तरी फोटो घेण्याची बुद्धी होत नाही.

टारझन's picture

19 Apr 2010 - 11:07 pm | टारझन

लेख आवडला. फोटोंचे कौतुक वाटले. बर्‍याचदा अशा प्रसंगांत कॅमेरा हाताशी असला तरी फोटो घेण्याची बुद्धी होत नाही.

+१ .

कुत्री आणि साप/नाग पाहीली की आपली जाम टरकते बॉ :)

- नागेश कुत्रीपळवी

रेवती's picture

20 Apr 2010 - 6:46 am | रेवती

अगं, हे सगळं वाचूनच मी घाबरले.
तू मात्र फोटू बिटू काढलेस म्हणजे चांगलीच धीट आहेस बाई!

रेवती

मानस's picture

20 Apr 2010 - 7:50 am | मानस

कॉक्रोच लॉजिक अप्लाय करा ... एक आहे म्हणजे ... दुसरा नक्की असणार ....

या सापाच्या जाती जोडीने राहतात. तरी कृपया सावधान रहावे. तसे ही जात बिन्-विषारी आहे .. तरी सुद्धा काळजी घ्यावी ही विनंती.

इस्टर्न किंग स्नेक .... अधिक माहीती साठी इथे टिचकी मारा

http://www.snakesandfrogs.com/scra/snakes/chain.htm

सोम्यागोम्या's picture

20 Apr 2010 - 8:17 am | सोम्यागोम्या

सापाचं गाणं ! कोब्रा कोब्रा

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Apr 2010 - 8:36 am | llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ. एक लंबर.

मीनल's picture

20 Apr 2010 - 6:13 pm | मीनल

न्युजचॅनेलच्या कॅमेरामन ????
हं. आयडिया बुरा नही है इस जनमें भी.

या सापाच्या जाती जोडीने राहतात.
इथे एकानेच हादरवलय! त्यात दुस-याचा विचार? छे बाई. काS ही खरं नाही ,माझं.

डेअरिंग ,धैर्य, प्रसंगावधान
आताच शोध लागला माझ्यातल्या या गुंणांचा.

आमच्या दार खिडक्या बंद सतत बंद असतात. संपूर्ण काचेच्या या खिडक्यांना बाहेरून जाळ्या ही आहेत. तरीही घरात तो साप शिरेल की काय याने मी धास्तावलेली असते.
नवरा बाहेरून आल्यावर त्याला विचारते" आहे काय रे तो काळ्या बाहेर?"
तो मान हलवून म्हणतो," आता नाही आहे. येईल कधीतरी बाहेर."

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

21 Apr 2010 - 12:29 am | विसोबा खेचर

मस्त लेख, जबरा चित्रं!

देवगडातल्या आमच्या घरचा पिवळाजर्द राखणदार आठवला! :)

(देवगडात तीन सांजेच्या वेळेला अंधारल्या आंगण्यात अजगरावरून पाय घसरून पडलेला) तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

21 Apr 2010 - 9:12 am | डॉ.प्रसाद दाढे

मस्त लिहिला आहे लेख, अगदी डोळ्यापुढे उभा केला आहे प्रसंग.
माझ्या एका प्राणीप्रेमी मित्राने हौसेने एक साप पाळला होता; त्याला आधी वाटले की तो बिनविषारी आहे म्हणून हा वेडा त्या सापाशी कधीकधी खेळतही असे. पण नंतर एका सर्पतज्ञाने इशारा दिला की तो जहाल विषारी आहे! हे कळल्यावर घाबरून त्या मित्राने तो लगेच जंगलात सोडून दिला! भीतीने दोन दिवस लोटापरेड सुरू होती, बायकोच्या शिव्या खायला लागल्या त्या वेगळ्याच :)
अवांतरः टार्‍या कशाला तरी घाबरतो तर :)

जयवी's picture

21 Apr 2010 - 12:19 pm | जयवी

छान लिहिलं आहेस गं !!
एकीकडे घाबरलीस म्हणतेस आणि इतके सुरेख फोटो पण काढतेस.........कमाला आहे हं तुझी :)
मस्त दिल्या आहेत सापाने पोझेस ;)