कामणदुर्ग

बज्जु's picture
बज्जु in कलादालन
29 Mar 2010 - 2:31 pm

कामणदुर्ग

ठाणे जिल्ह्यातील उंचीत माहुलीनंतर दुसर्‍या क्रमांकावर असलेला हा किल्ला (उंची साधारण २२०० फुट). तीन साडेतीन तासांचा खडा चढ, जंगल, कड्यात खोदलेल्या पायर्‍या, सोप्या श्रेणीचे कातळटप्पे या ट्रेकर्सना आकर्षीत करणार्‍या सर्व गोष्टी असुनही, केवळ माथ्यावर पाणी आणि निवारा नसल्यामुळे दुर्लक्षीत राहिला आहे. प्राचीनकाळी उल्हासनदीतुन चालणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कल्याण-भिवंडी मार्गावर ताबा ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असावी.

तर अश्या या दुर्लक्षीत किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही चौघे जण या रविवारी (दि.२८ मार्च, २०१०) सकाळी ६.३० ला बाईकवरुन निघालो. भिवंडी - वसई रस्त्यावर असलेल्या कुहे गावात येऊन पोहोचलो तेव्हा ७.३० वाजत आले होते. अंतर ठाण्यापासुन फक्त ४५ कि.मी. कुहे गावात एका घरापाशी बाईक लावल्या, गडाचा रस्ता विचारुन घेतला आणि निघालो. कुहे गावातुन गडाकडे पाहिले तेव्हा साधारण २ तासात गडावर पोहोचु असं वाटल होत.

कुहे गावातुन सुरवात
Route starting from Kuhe villege

कुहे गावातुन कामणदुर्ग दर्शन
Kuhe Gavatun - Kaaman Durg

चालायला सुरवात करुन १५-२० मिनीट्चं झाली असतील पण वैशाख वणवा असल्यामुळे सकाळ्ची ८.०० ची वेळ असुन देखील अंगातनं घामाच्या धारा वहायला लागल्या होत्या @) . साधारण तास भराच्या चालीने एका टेपाडावर येउन पोहोचलो.

कामणदुर्ग
Kaaman Durg - Zoom

सुरवातीला २ तासात गडावर पोहोचु असं वाटल होत पण ओव्हर लॅपींग असलेल्या टेकड्यांमुळे अंदाज चुकला होता आणि अजुन किमान ३ तास तरी लागतीलच असें वाटत होते. ऊनाचा चटका आता जाणवायला लागला होता. चालत थोडे थांबत अजुन एक टेकाड पार केले. वॄक्षतोड होत असल्याने सावलीची जागा कमीच. वारा अजीबात नाही. बांबुमात्र भरपुर होता वाटेवर.

बांबुचे बन
Bamboochya Banat Aha Aha

तासाच्या चालीनंतर पुन्हा बांबुच्या जंगलात जरा आराम करत बसलो. इथे सावली जरा बर्‍यापैकी होती.
Resting time after 2 hours walk - (LtoR) - Sujit, Sameer, Girish, Dinesh

ईथुन आम्ही कुहे गावातुन चढुन आलो ती वाट आणि समोर तुंगारेश्वर रांग छान दिसत होती.
Route coming from Kuhe Villege

तुंगारेश्वर रांग
Tungareshwar Raang

थोड्सं खाऊन घेतलं, पाणी प्यायलं आणि निघालो, पुन्हा एक छोट टेपाड चढुन आलो. ऊनं आता मी म्हणायला लागलं होत. आमच्या चौघांकडे मिळुन ८-९ बाट्ल्या पाणी होत. पण वरती गडावर पाणी नसल्यामुळे पाणी जपुनच वापरायचं होत. आजुबाजुच्या रानांतुन, वाटेवरुन, कातळातुन आणि आमच्या अंगातुन गरम वाफा येत होत्या ~X( . समोर आता कामणदुर्ग स्पष्ट दिसत होता. एका पाच मिटरच्या दरीने कामणदुर्गाचे दोन भाग केले आहेत. त्यातील पुर्व भाग फारच लहान तर पश्चिम भाग चांगलाच पसरलेला आहे. आनंद पाळंदे यांच्या "डोंगरयात्रा " पुस्तकातील मॅप पाहुन घेतला आणि पश्चिम भागावर जाण्यासाठी निघालो.

मॅप रिडींग
Map Reading - Enroute Kaaman Durg

कामणदुर्गला पुर्व - पश्चिम विभागणारी पाच मिटरची दरि
Vally between Left and Right side of Kaman Durg

गडाला ऊजव्या बाजुला ठेवून पश्चिम भागाच्या अत्युच्च टोकावर पोहोचण्यासाठी आणखी तासभर लागणार होता.
Enroute Kaaman Durg Top

शेवट्चा चढ
Shevatacha Chadh

गडाचा माथा आता समोर अगदी स्पष्ट दिसत होता.
Kaaman Durg - Climb from Left Side

चढायला सुरवात केली, समोरच दोन टाकी दिसली. पाणी असेल म्हणुन जवळ गेलो तर कोरडंच, तसा अंदाज होताच. दुसर टाकही कोरड ठाक :S .

Panyachi Taki

Panyachi Taki 2

टाक्याच्या बाजुनेच असलेल्या वाटेने वरती चढायला सुरवात केली. वाटेत दगडात कोरलेल्या पायर्‍या आणि दोन ठिकाणी सोपे कातळटप्पे होते. ते चढून वरती आलो.

Sope Katal Tappe aani Khadkat Korlelya Pairya

आता आम्ही गडाच्या अत्युच्य टोकावर आलो होतो. माथ्यावरुन तुंगारेश्वर, गोतारा आणि वसईच्या खाडीपर्यंतचा ऊत्तम परिसर दिसतो. हवा धुरकट होती त्यामुळे आम्हाला यातल विशेष काही दिसलं नाही.

कामण दुर्ग टॉप
Kaaman Top

टॉपहुन आजुबाजुचा परिसर पहाताना.
Watching from Kaaman Top

गडावरती विशेष काही पहायला आणि सावलीची जागा नसल्यामुळे थोड्या वेळातच निघालो आणि थोडेस खाली ऊतरुन एका झाडाच्या सावलीत बसलो. तसे सकाळपासुन ब्रेड्-बटर-जाम खाल्ले होते पण आता भुकही चांगलीच लागली होती. सुजीतने सॅकमधुन मोठे कलींगड आणले होते. तिथेच सावलीत पेपर पसरला, कलींगड कापले आणि खाल्ले.

गडावर गड "कलींगड" ;)
Watermelon

Watermelon 1

आता दुपारचे १.३० वाजत आले होते. ऊनामुळे अंगाची लाही लाही होत होती. जरा सावलीला बसलो की १५-२० मिनीट ऊठतच न्हवतो (|: . डी-हायड्रेशन होऊ नये म्हणुन इलेक्ट्रॉल प्यायले.
Sun Stroke

पुन्हा दीड-दोन तास ऊतरुन पायथ्याच्या कुहे गावात आलो. गावातील लोकसुध्दा आता ऊन्हाळ्यात कशाला गेलात वरती वगैरे विचारत होते. एका घरात पाणी प्यायले. मी एकट्यानेच जवळ जवळ चार्-पाच तांबे पाणी प्यायले. आता जरा आत्मा थंड झाला. बाईक काढल्या आणि दोन कि.मि. वर असलेल्या चिंबी पाड्यावर आलो. एका टपरीवर चहा प्यायला आणि ठाण्याला यायला निघालो.

चिंबी पाडा
Chimbicha Pada - On Bhiwandi - Vasai Route

आधुनीक मावळे आणि त्यांचे आधुनिक घोडे
Aadhunik Mavle aani Aadhunik Ghode

प्रवासइतिहासभूगोलछायाचित्रण

प्रतिक्रिया

सुमीत's picture

29 Mar 2010 - 7:27 pm | सुमीत

अनोळखी दुर्गाची ओळख झाली तुमच्या मुळे आणी गडात गड कलिंगड एकदम भारी :)

प्रभो's picture

29 Mar 2010 - 11:47 pm | प्रभो

मस्त

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

पाषाणभेद's picture

30 Mar 2010 - 3:13 am | पाषाणभेद

लय भारी
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

बद्दु's picture

30 Mar 2010 - 5:49 pm | बद्दु

तुमच्या भटकन्तीत कधी साप, विन्चु..वगेरे तत्सम प्राणी भेटतात काय? त्यान्चे पण फोटू डीकवायला हरकत नाही.

बद्दु

मि.इंडिया's picture

1 Apr 2010 - 11:00 am | मि.इंडिया

नवीन दुर्गाची ओळख करून दिलीत........आभार

प्रदीप