रेडिओ

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
29 Mar 2010 - 12:32 pm

रेडिओ

लहाणपणी मला पडायचा एक प्रश्न
असतील का रेडिओमधील माणसं सुक्ष्म?

असतील ही माणसे आपल्यापेक्षा वेगळी
एकत्र बसून वाजवतात वाद्ये सगळी

एकतर रेडिओचा आकार छोटा
गायक, वादक, तबला, पेटी, वाद्ये इतर पसारा केवढा मोठा!

खासच असतील ही माणसे एकजात
तरीही प्रश्न पडे कशी वाजवतात गाणी एकसाथ?

एका गाण्यासाठी लता मंगेशकर येते
तिचे गाणे म्हणून ती निघून जाते

नंतरच्या गाण्यासाठी किशोर कुमार येतो
त्याचेही गाणे म्हणून तो निघून जातो

निश्चितच आहे सगळे वेगळे
त्याशिवाय का सुरळीत चाले सगळे?

हे सगळे प्रश्न मी विचारले माझ्या काकांना
ते म्हटले, "तू नाच कर, तू पण दिसशील सगळ्यांना"

त्यानंतर एकदा दादाला रेडिओत झुरळ दिसले
नुसते फिरे ते इकडून तिकडे, तबकडीमध्ये ते फसले!

दादा म्हणाला, "सच्या चल, रेडिओ उघडू,
झुरळांबरोबर तुझी ती माणसेही बाहेर काढू"

रेडिओ उघडून दादाने केला तो साफसुफ
मला तर तसे काहीच दिसले नाही सगळेच सारे ओम फुस

दादा म्हणाला,"रेडिओत का कधी माणसे असतात वेड्या!
तू उद्योगी लहान म्हणून मोठी माणसे सोडतात पुड्या

अरे रेडिओ म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट. तुला आता नाही कळणार;
कपॅसिटर्स, रेझिस्टर्स, इंडक्टर्स, आयसीज, स्पिकर्स अन वायर्स
आताच बघून ठेव, पुढे अभ्यासात उपयोगी पडणार"

कालच लहान भाच्याने रेडिओ लावला त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर
त्याच्या गॅदरिंगचे फोटो अन व्हिडिओ क्लिप्सही दाखवल्या स्क्रिनवर

मी मनात म्हटले आजची पिढी खुप पुढे गेली
पण आमच्यावेळच्या रेडिओची मजा तिला नाही कधी आली.

- पाभे (दफो)
२८/०३/२०१०

शांतरसकवितामौजमजा

प्रतिक्रिया

शुचि's picture

29 Mar 2010 - 7:34 pm | शुचि

युनिव्हेर्सल थीम दिसते.
मी देखील रेडीओच्या बटणाच्या फटीला डोळा लावून आत पहायचे लोक दिसतात का ते.

कविता मस्तच.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

नरेश_'s picture

29 Mar 2010 - 7:50 pm | नरेश_

या अप्रतिम कवितेला व निरागसतेला सॅल्यूट !
बालगीते तुम्ही उत्तम लिहू शकाल असे आमचे भाकीत आहे.

मीनल's picture

30 Mar 2010 - 5:42 am | मीनल

वाचून मजा वाटली .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

प्रमोद देव's picture

30 Mar 2010 - 9:02 am | प्रमोद देव

दगडफोडेशेठ,तुमच्या अंगात काव्य जंतू आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत चाललाय.
एक दिवस तुम्ही नक्कीच नामांकित कवी होणार.
आजच्या घटकेला तुम्ही मिपाचे ’जगदीश खेबूडकर ’ आहात.

पाषाणभेद's picture

30 Mar 2010 - 9:19 am | पाषाणभेद

नाय वो देवा, आमी त्या सुर्यापुढं काजवं वो. बाकी सगळी ताकद तुमच्यासारक्या जाणत्या मान्सांकडूनच मिळती पगा. ताकद हाय तवरं लिहायचं नाय तर निसतं वाचायचं.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

पक्या's picture

30 Mar 2010 - 1:12 pm | पक्या

छान कविता. मस्त मजा आली वाचून.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

sur_nair's picture

31 Mar 2010 - 1:42 am | sur_nair

"आमच्यावेळच्या रेडिओची मजा तिला नाही कधी आली." एकदम पटले. आता काय हवे तेव्हा हवे ते ऐकता येते पण radio च्या वेळी एखादे आवडीचे गाणे ऐकले कि काय आनंद व्हायचा. लहानपणच्या कुतुहलाचे मस्त वर्णन केलंय. थोडी अजून काटून छोटी ( concise ) केली असती तर अजून चांगली वाटली असती.