सळसळणार्‍या फांद्यांवरती शेंगा फिक्क्ट सोनेरी

ॐकार's picture
ॐकार in जे न देखे रवी...
20 Mar 2008 - 11:16 am

सळसळणार्‍या फांद्यांवरती शेंगा फिक्क्ट सोनेरी
नायलॉनच्या दोर्‍यांवरती वाळत पडली पोतेरी

कसा बुडाला पलीकडे तो निर्देशांकाचा गोळा?
पैसे गेले, अपचन झाले , लागतही नाही डोळा

पुण्यभूवरी रस्त्यांवरती फलक लागले कसे झणी!
कर्जमाफीच्या लोण्यामध्ये मिश्या बुडवल्या कुणीकुणी!

तरला तरला पाण्यावरती! पहा मुखवटा चंदेरी!
साबण मागत फिरणार्‍यांची पहा उडाली भंबेरी!

प्रदेश आले , जाती आल्या, रंग, पंथ अन भाषाही
भोग - तेवढा धर्म एकटा! धर्म दुजा कुठला नाही!

निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा
शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

20 Mar 2008 - 11:19 am | धमाल मुलगा

आईशप्पथ...
ॐकार मस्तच.

आपल्याला ते गण, आणि त्याचे मीटर, काना-मात्रा इ.इ. गोत वगैरे काही कळत नाही पण जे काही लिहिल॑य...पार भिडल॑ बॉ...

मारल॑स रे मित्रा....

बेसनलाडू's picture

20 Mar 2008 - 11:20 am | बेसनलाडू

नेहमीसारखीच दमदार, गेय कविता.

सळसळणार्‍या फांद्यांवरती शेंगा फिक्क्ट सोनेरी
नायलॉनच्या दोर्‍यांवरती वाळत पडली पोतेरी

कसा बुडाला पलीकडे तो निर्देशांकाचा गोळा?
पैसे गेले, अपचन झाले , लागतही नाही डोळा

कर्जमाफीच्या लोण्यामध्ये मिश्या बुडवल्या कुणीकुणी!

निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा
शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा

हे फारच आवडले.

(आस्वादक)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

20 Mar 2008 - 11:54 am | आजानुकर्ण

जबरा रचना ॐकारशेठ. फार आवडली.

बेसनलाडूसाहेबांशी सहमत.

(सहमत) आजानुकर्ण

केशवसुमार's picture

20 Mar 2008 - 11:21 am | केशवसुमार

ॐकारशेठ,
एकदम जबर्दस्त रचना..
मान गये उस्ताद..
एक से एक व्दिपदी..
केशवसुमार.

सहज's picture

20 Mar 2008 - 11:53 am | सहज

सहमत

आनंदयात्री's picture

20 Mar 2008 - 11:21 am | आनंदयात्री

साध्या सोप्या रोजच्या वापरातील शब्दांचा मस्त वापर. आवडली.

कसा बुडाला पलीकडे तो निर्देशांकाचा गोळा?
पैसे गेले, अपचन झाले , लागतही नाही डोळा

हेच हेच म्हणतो.

इनोबा म्हणे's picture

20 Mar 2008 - 11:43 am | इनोबा म्हणे

ॐकार शेठ
जबरा रचना....

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

धनंजय's picture

20 Mar 2008 - 11:50 am | धनंजय

सर्व संदर्भ लागले नाहीत :-( (माझा कमकुवतपणा)

पण जितके संदर्भ लागले, जोरकस हिसका देणारे शब्द जाणवले. :-)

चित्तरंजन भट's picture

20 Mar 2008 - 12:57 pm | चित्तरंजन भट
चित्रा's picture

20 Mar 2008 - 5:15 pm | चित्रा

असेच म्हणायचे आहे.

कोलबेर's picture

21 Mar 2008 - 3:29 am | कोलबेर

सर्व संदर्भ लागले नाहीत पण जितके संदर्भ लागले, जोरकस हिसका देणारे शब्द जाणवले. :-)

विसोबा खेचर's picture

20 Mar 2008 - 11:52 am | विसोबा खेचर

ॐकारशेठ,

लै म्हन्जे लैच भारी कविता राव!

पुण्यभूवरी रस्त्यांवरती फलक लागले कसे झणी!
कर्जमाफीच्या लोण्यामध्ये मिश्या बुडवल्या कुणीकुणी!

वरील ओळी केवळ खल्लास...!!

बा नीलहंसा, बर्‍याच दिवसांनी तुझी जबरा कविता वाचायला मिळाली!

आपला,
(आनंदीत!) तात्या.

चित्तरंजन भट's picture

20 Mar 2008 - 11:57 am | चित्तरंजन भट

सळसळणार्‍या फांद्यांवरती शेंगा फिक्क्ट सोनेरी
नायलॉनच्या दोर्‍यांवरती वाळत पडली पोतेरी

वा ओंकार! एकंदर कविता उत्तम झाली आहे!!!!

नंदन's picture

20 Mar 2008 - 12:06 pm | नंदन

कविता आवडली, मात्र पहिल्या कडव्यातले संदर्भ नीट समजले नाहीत.

निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा
-- हे वाचून तुझीच 'पांढरपेशी कविता' आठवली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विजुभाऊ's picture

20 Mar 2008 - 12:14 pm | विजुभाऊ

निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा
शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा

ही ओळ

शिव्या बोलतो भणंग त्याना रस्त्यांवरती फिरणारा......
बरी वाटेल

धम्मकलाडू's picture

20 Mar 2008 - 12:52 pm | धम्मकलाडू

विजूभाऊ, बदल सुचवताहात की चांगल्या कवितेचं भजं करताहात? 'मी' आणि 'त्याना' या दोघांचं कसं जमणार.

धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विजुभाऊ's picture

20 Mar 2008 - 1:23 pm | विजुभाऊ

माझा पगार मी अजुन माझ्या बायकोलासुद्धा सांगितला नाही.( बहुधा त्य्य्मुळेच मीघरात मला कमी बोलायला मिळते)
आपला घरात कमी बोलणारा...विजुभाऊ

सुवर्णमयी's picture

20 Mar 2008 - 4:15 pm | सुवर्णमयी

ॐकार,
पुण्यभूवरी रस्त्यांवरती फलक लागले कसे झणी!
कर्जमाफीच्या लोण्यामध्ये मिश्या बुडवल्या कुणीकुणी!

तरला तरला पाण्यावरती! पहा मुखवटा चंदेरी!
साबण मागत फिरणार्‍यांची पहा उडाली भंबेरी!

प्रदेश आले , जाती आल्या, रंग, पंथ अन भाषाही
भोग - तेवढा धर्म एकटा! धर्म दुजा कुठला नाही!

निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा
शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा

या ओळी एकदम दमदार! कविता खूप आवडली.
सोनाली

प्राजु's picture

21 Mar 2008 - 4:02 am | प्राजु

पूर्णपणे सहमत आहे सुवर्णमयीशी...

- (सर्वव्यापी)प्राजु

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Mar 2008 - 5:29 pm | ब्रिटिश टिंग्या

निलाजरा मी ए.सी.मध्ये बसून कविता करणारा
शिव्या घालतो भणंग कोणी रस्त्यांवरती फिरणारा

हे आवडलं ;)

लगे रहो.....

- छोटी टिंगी

चतुरंग's picture

20 Mar 2008 - 6:16 pm | चतुरंग

तरला तरला पाण्यावरती! पहा मुखवटा चंदेरी!
साबण मागत फिरणार्‍यांची पहा उडाली भंबेरी!

ह्याचा संदर्भ मात्र मला लागला नाही - सध्याच्या सर्व बातम्या माहीत नसल्यामुळे असेल..

चतुरंग

कोलबेर's picture

21 Mar 2008 - 3:32 am | कोलबेर

संदर्भ मलाही लागला नाही.. कवीने थोडे रसग्रहण दिल्यास समजायला सोपे जाईल.
मागे धनंजयने एकदा असेच समजावुन सांगीतले होते ते आवडले होते!

नंदन's picture

21 Mar 2008 - 3:38 am | नंदन

चोरीला गेलेला मुखवटा इंद्रायणीच्या पात्रात सोडून दिलेला आढळला, त्याचा हा संदर्भ असावा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ॐकार's picture

21 Mar 2008 - 12:19 pm | ॐकार

बरोबर आहे!

'साबण मागत फिरणार्‍यांची....
ह्या ओळीचा अर्थ कळला नाही?:(

चतुरंग