मेरा रंग दे बसंती चोला

बेभान's picture
बेभान in जनातलं, मनातलं
23 Mar 2010 - 6:13 pm

आज २३ मार्च भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा ७९ स्मृतीदिन.
भ्रष्ट राज्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचणा-या या महात्म्यांना विनम्र अभिवादन...इन्किलाब जिन्दाबाद..


सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है..

’लिजंड ऑफ भगतसिंग’ मधील हे ए. आर. रेहमाननी संगीतबद्ध केलेलं हे गाणं नेहमीच एकप्रकारची उर्जा निर्माण करतं ..
मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे
मेरा रंग दे मेरा रंग दे

निकले है वीर जिया ले यूं अपना सीना ताने
हस हस के जान लूटा ने आझाद सवेरा लाने
मरके कैसे जीते है इस दुनिया को बतलाना
तेरे लाल चले है माए अब तेरी लाज बचाने
मरके कैसे जीते है इस दुनिया को बतलाना
तेरे लाल चले है माए अब तेरी लाज बचाने
आझादी का शोला बनके खून रगोंमे डोला
मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे
मेरा रंग दे मेरा रंग दे
दिन आज का बडा सुहाना मौसम भी बडा सुनेहरा
हम सर पे बांध के आये बलिदानोंका ये सेहरा
बेताब हमारे दिल में एक मस्ती सी छायी है
ए देश अलविदा तुझको केहने की घडी आयी है
मेहके गये तेरी फिजा में हम बनके हवा का झोकां
किस्मतवालोंको मिलता ऐसे मरने का मौका
निकली है बारात सजा है इन गुलाब का डोला
मेरा रंग दे
मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे

इतिहासप्रकटनविचार

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

23 Mar 2010 - 6:26 pm | शानबा५१२

असे देशभक्तीने 'बेभान' होणारे माझ्या पाहण्यात नाहीत........................
हे असे पुन्हा कोणी होतील का?

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

शानबा५१२'s picture

23 Mar 2010 - 6:20 pm | शानबा५१२

भ्रष्ट राज्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचणा-या या महात्म्यांना विनम्र अभिवादन.....
----असल्या दीवशी बँक हॉली डे असला तरच हे लोकांच्या लक्षात राहील.

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

नीलकांत's picture

23 Mar 2010 - 7:13 pm | नीलकांत

भगतसिंहांनी अत्यंत विचारपुर्वक चालवलेल्या लढ्याला माझा सलाम.

त्यांनी केवळ देशासाठी वीरमरण पत्करले म्हणूनच ते मोठे होतात असे नाही तर त्या आधी त्यांनी त्यांच्या लढ्यहोत आणि त्यांच्या मार्गाचं जे उथळ चित्रीकरण होत होतं आणि त्यांच्या विषयी जे गैरसमज पसरत होते ते दूर करण्यासाठी इंग्रज सरकारच्याच यंत्रणेचा उत्तम वापर केला.

आपल्या देशावर निस्सीम प्रेम, आपल्या विचार पक्की धारणा आणि देशबांधवांना आदर्श घालून देण्यासाठी व युवकांना प्रेरीत करण्यासाठी प्राणोत्सर्ग करण्याची तयारी अश्या अनेक वैशिष्ट्यांसाठी भगतसिंह कायम प्रेरणास्रोत आहेत.

त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन.

- नीलकांत

अरुंधती's picture

23 Mar 2010 - 9:27 pm | अरुंधती

मेहके गये तेरी फिजा में हम बनके हवा का झोकां
किस्मतवालोंको मिलता ऐसे मरने का मौका
निकली है बारात सजा है इन गुलाब का डोला

ज्यांच्यामुळे आपल्याला आज हे दिवस दिसत आहेत, ज्यांच्या रक्ताने ही भूमी पवित्र झाली, ज्यांच्या त्यागाच्या कितीही गाथा गायल्या तरी अपुर्‍या आहेत अशा समस्त हुतात्म्यांमधील ह्या सिंहकेसरीस सादर अभिवादन!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

23 Mar 2010 - 9:49 pm | नितिन थत्ते

स्वातंत्र्य सैनिकांना माझा सलाम.

( सकाळपासून वाट पहात होतो या धाग्याची )

नितिन थत्ते

वाटाड्या...'s picture

23 Mar 2010 - 10:35 pm | वाटाड्या...

तीन खर्‍या वीरांना वंदन...

असे वीर परत परत येत राहोत...भारssत माता की जय !!!!

- वा

विसोबा खेचर's picture

23 Mar 2010 - 11:41 pm | विसोबा खेचर

दंडवत...

तात्या.

शहिदोँकी चिताओँपर लगेँगे हर बरस मेले, वतनपर मर-मिटने वालोँ का यही बाकी निशाँ होगा...!

आशिष सुर्वे's picture

24 Mar 2010 - 2:59 am | आशिष सुर्वे

मरके कैसे जीते है इस दनिया को बतलाना
>>
अंगावर शहारे आणणारे काव्य!

आज पुन्हा एकदा 'रंग दे बसंती' चित्रपट पाहिला.. योगायोग म्हणा किंवा दृष्टांत!

======================
जय हिंद!!

भारतियांनी २३ मार्च हाच खरा हुतात्मा दिन म्हणून पाळला पाहीजे
If deaf has to hear the noise should be real Loud म्हणणार्या भगतसिंगाना भारतिय प्रजासत्ताकात deserving मानाचे स्थान नाही मिळाले.
फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते.
अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे
खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात ईंग्रज सरकारने ठेवलेले आरोपपत्र:

ब्रिटिश अधिकारी सॅंडर्सला ठार मारल्याबद्दल आणि दिल्लीच्या विधिमंडळात बॉंब फेकल्याबद्दल दोषी ठरवून भगतसिंगांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

ईंग्रज सरकार च्या मते आपली उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न भगतसिंग , राजगूरू, अशफाकउल्ल्लाह , सुखदेव यांनी खालील मार्गांनी केला :-

१) बॆंका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.

२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॊंब व स्फोटके यांची निर्मिती करणे.

३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे सहाय्यक वा पक्षपाती असणाऱ्या पोलिस वा इतर आधिकाऱ्यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टात खंड पाडणाऱ्या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणाऱ्या लोकांचे वध करणे.

४) आगगाड्या उडविणे

५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वांङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे

६) वैध बंदिवासातून दंडितांची व इतरांची सुटका करणे

७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे व

८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणाऱ्या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे."

सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला
=D>
महात्मा गांधींना या संदर्भात लक्ष्य करण्यात आलं. भगतसिंग व त्यांच्या सहका-यांची फ़ाशीच्या शिक्षेतुन सुटका व्हावी म्हणुन १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हाइसरोय लोर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होइल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फ़ाशीचा दिवस ठरला असुनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फ़ाशी देण्याचा अघोरी कार्यक्रम उरकुन घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहुन भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांची फ़ाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही

भगतसिंग हे एक पत्रकार होते व लेखकही होते तसेच उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप',इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लालाजींच्या मृत्यू नंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप','दुर्दशा','सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली होती.
पण त्यातून ही बर्याच जणांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे भगतसिंग हे नास्तिक होते
' मी नास्तिक का झालो' -शहीद भगतसिंग हा त्यांचा भाषांतरीत लेख वाचण्याजोगा आहे
आता खरी गरज भगतसिंगाच्या विचारांना पुढे आणण्याची आहे.
Hatts off to Indian Martyr
~ वाहीदा

अश्विनीका's picture

24 Mar 2010 - 1:40 pm | अश्विनीका

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतीस नम्र अभिवादन.
- अश्विनी