सांगू काय, सांगू काय?

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
22 Mar 2010 - 2:24 pm

( "एका माणसाची दाढी केवढी लांब सांगू काय ...." या एका बालगीताच्या चालीवर खालील विडंबनात्मक कवीता वाचावी. वरील बालगीत फाउंटेन कंपनीच्या च्या एका बालगीतांच्या व्हि‌. सी. डी. मध्ये आहे. ते 'यु ट्युब' वर शोधले तरी मिळू शकेल. दैनंदिन जीवनातील, राजकारणातील विविध ठिकाणी विरोधाभास दिसतो, त्यावर उपहासात्मक कविता मी लिहीली आहे.)

एका मॉडेलची वस्त्रे केवढी छोटी, सांगू काय ?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

एवढी छोटी, एवढी छोटी की,

रॅंपवर चालतांना गळून जाय....

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
---

एका चॅनेलची बातमी इतकी खरी, सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

इतकी खरी, इतकी खरी की,

राजा हरीश्चंद्रही लाजून जाय ...

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

---
एका क्रिकेटपटूच्या खेळाची महती, इतकी मोठी सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

इतकी मोठी, इतकी मोठी की...

अनेक अभिनेत्रींशी त्याची काडी जोडून, मोडून जाय ...

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
---

एका चित्रपटाचे गाणे एवढे आक्षेपार्ह सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

एवढी आक्षेपार्ह एवढी आक्षेपार्ह की,

सगळीकडे जाळपोळच होवून जाय ...

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
---

एका अभिनेतत्रीचा फोटो एवढा अश्लील सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

एवढा अश्लील एवढा अश्लील की,

सगळीकडे वर्तमानपत्रात पुन्हा पुन्हा छापला जाय ...

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
---

एका शहरातील रस्त्यावरचे खड्डे इतके मोठे सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय?

इतके मोठे, इतके मोठे की,

एखादा माणूस त्यात सहजच मावून जाय....
---

शहरांतील खड्ड्यांबाबत सरकार एवढे उदासीन सांगू काय?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय?

एवढे उदासीन , एवढे उदासीन की,

'लीटमस पेपरच' रागा रागाने लाल होवून जाय....

---
एका मॉडेलच्या चपला केवढया उंच, सांगू काय ?

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

एवढ्या उंच, एवढ्या उंच की,

रॅंपवर चालतांना मॉडेलच पडून जाय....

सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?

----

हास्यविनोदमुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

शुचि's picture

25 Mar 2010 - 6:45 am | शुचि

आवडली

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।