वास्तुशांती व गणेशपूजन : सर्वांना आग्रहाचे आमंत्रण

// श्रीगणेशाय नम: //
सप्रेम नमस्कार वि. वि.
आमचे येथे श्रीकृपेकरुन, पनवेल येथील नुतन वास्तुचा गृहप्रवेश व गणेशपूजन विधी, बुधवार दि. २४/३/१० रोजी (रामनवमी )सकाळी ११ वाजल्यापासून पुढे आयोजित केला आहे, तरी आपण सहकुटूंब, सहपरिवार मित्रवर्यांसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, व स्नेहभोजनाला उपस्थित राहून आम्हांस उपकृत करावे ही आग्रहाची विनंती.

स्नेहभोजनाची वेळ : दु.१ ते ३

ठिकाण : ए-१६, साई-पार्क बिल्डिंग्,४था मजला ,छत्रपती संभाजी मैदानामागे,
पनवेल नगरपालिका कार्यालयाजवळ, पनवेल जि. रायगड.

आपले कृपाभिलाषी- डॉ. नरेश सोष्टे , व परिवार.
संपर्क : ९८८१३४३९९८

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

अनेकोत्तम शुभेच्छा...

तरी आपण सहकुटूंब, सहपरिवार मित्रवर्यांसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, व स्नेहभोजनाला उपस्थित राहून आम्हांस उपकृत करावे ही आग्रहाची विनंती.

मेन्यू काय?

श्रीखंडपुरी ठेवा साहेब! :)

तात्या.

मेन्यू काय?

श्रीखंडपुरी ठेवा साहेब!
नक्की !
पण आवर्जून या म्हणजे झाले :)

येणार.. :)

शुभेच्छा...

शुभेच्छा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

॥ शिवं वास्तु ॥

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेडा!

नवीन वास्तूत सुख, समाधान लाभो आणि भरभराट होवो ह्या शुभेच्छा.

नरेश,अभिनंदन आणि ही नवीन वास्तु आपणासाठी खूप लाभदायक ठरो अशी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो.

हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन... आमच्या वाटचं श्रीखंड तात्याला खायला घाला. ;)

बिपिन कार्यकर्ते

आपल्याला नवीन वास्तूच्या शुभेच्छा.

पुढील कविता (साभार जाल) -
घर

-------------------------------------------------


घर तो घर होता है आखिर घर तो घर होता है

चाहे जितना ऊँचा उड़ ले पंछी घर आता है

चाहे दर-दर खा लें ठोकर घर ही अपनाता है

तिनकों से नीड़ तक का, घर लम्बा सफर होता है

घर तो घर होता है आखिर घर तो घर होता है

घर भाई-बहनों की राखी बाबा की लाठी है

आंधी-तूफाँ सब सह ले ज्यों माँ सी कद काठी है

घाव कितना भी गहरा हो मरहम सा असर होता है

घर तो घर होता है आखिर घर तो घर होता है

आंगन से आकाश की बातें, बारिश की टप-टप है

छोटे-छोटे बच्चों की भी खूब बड़ी गप-शप है

धरती पे उतर आया परियों का नगर होता है

घर तो घर होता है आखिर घर तो घर होता है

चूड़ी, बिंदिया, पायल, कंगना आंखों की भाषा है

घर बंज़ारे मन की सबसे गहरी अभिलाषा है

बेघरों के लिए हर पल बेगाना शहर होता है

घर तो घर होता है आखिर घर तो घर होता है

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती ||
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी ||
त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी ||
या घरट्यातुन पिलू उडावे दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती ||

हार्दीक अभिनंदन...

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

झाली का आपली वास्तुशांत? : )
आशा करते कार्यक्रम यथासांग पार पडला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

वास्तुशांत झाली असेलच. शुभेच्छा !!

बाय द वे गुरुजी कोण होते ? मी सुध्दा गुरुजीगीरी करतो वेळ मिळाला की. ;)

बज्जु (गुरुजी)

वास्तुशांतीला येणे अशक्य होते..सांगली ते पनवेल अंतर अंमळ जास्त आहे..!! :P ..पण त्या निवासा मधला तुमचा निवास आनंदी रहावा....

श्रीखंड हुकलंच आमचं! :)

शुभेच्छा
House warming Party ला नक्कि येणार..केंव्हा ठेवता????

वास्तुशांत झाली असेलच. शुभेच्छा !!
वास्तुशांती निर्विघ्न पार पडली. शुभेच्छांबद्दल सर्वांना धन्यवाद.

बाय द वे गुरुजी कोण होते ?
पोयनाड येथील श्री. दिलीप जोशी.
मी सुध्दा गुरुजीगीरी करतो वेळ मिळाला की.
आधी नाही का सांगायचं, सव्वा रुपया दक्षिणेत काम झालं असतं माझं ;)

»

अभिनंदन
नवीन
प्रेषक कैलास२४३ ( शुक्र, 03/26/2010 - 16:13) .
वास्तुशांतीला येणे अशक्य होते..सांगली ते पनवेल अंतर अंमळ जास्त आहे..!! ..पण त्या निवासा मधला तुमचा निवास आनंदी रहावा..
.. धन्यवाद.

»

प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, 03/26/2010 - 16:51) .
श्रीखंड हुकलंच आमचं!
धत तेरी की. कधीही या.श्रीखंड-पुरीचा बेत काय केव्हाही जमवता येईल की!

»

शुभेच्छा .

प्रेषक अविनाशकुलकर्णी ( शुक्र, 03/26/2010 - 17:13) .
शुभेच्छा

धन्यवाद!
House warming Party ला नक्कि येणार..केंव्हा ठेवता????
कधीही! वर फोन नं. आहेच की.

_____________________________
मिपाकर ब्रिटिश व तात्या येतील अशी अपेक्षा होती, परंतू आले नाहीत.
अर्धे पातेले तिखट रस्साभाजी व एक किलो आम्रखंड (अनुक्रमे )वरील सद्गृहस्थांसाठी राखीव ठेवले होते ;)

अर्धे पातेले तिखट रस्साभाजी व एक किलो आम्रखंड (अनुक्रमे )वरील सद्गृहस्थांसाठी राखीव ठेवले होते

सो नाईस ऑफ यू! :)

तात्या.