सविताभाभी

पाचेक वर्सापुर्वी जगन मारवाड्यान गावान दुकान टाकलवत. ईन मीन तिनशे घरं. कीराणा आनाला पार हायवे पोतूर जाव लागाच.
सरपंचान जराशी जमिन दिल्लीवती. त्याच्यानच खोपटीसारक दूकान न पाटीमाग रायची खोली. मारवाड्याच लग्न झाल्त पन येकटाच आल्ता.
आस्ती आस्ती गावची नाडी त्यान पकरली. लोकांना ऊधार द्याची सुरवात केली. उधारी वाडली क त्यांचेकडशी भात घेवाचा न मार्केट मदी विकाचा.
आनि उधारी कती पैशे लावाचा ते त्याजं त्याला माईती.

पाच वर्सात पक्क दुकान केल. खाडीजवल येकराच जमीनीत घर बांदल.
न धा बारा दीवस आदी बायकोला झेउन आला. त्याला पॉर नवत. मना तो सगल काय सांगाचा. माजि न त्याची लय संगत व्हती. त्याला बी यक कारन व्हत. आर्रर्र यक नाय दोन.

दारु आनि आकडा.

गावान बाजार व्हईल म्हुन तो फक्त माजेबरुबरच बसाचा दारु पीयाला. सकाली आकडा लावाला पन मीच. ह्ये आकड्यान त्याजे बरुबर मी बी गुतलोवतो. सारक डोक्यान आकडं याचे.
साळंत आसताना कदी येवडा ईचार केला नवता बोल .

या आकडयाच बी यक गनीत आसतय. त्याजेवर नजर ठेवाय लागती रोजचेरोज. काल कोन्चा आला आज कोन्चा आला याजेवर ठरवाच क ऊद्या कोन्चा ईल.
दुसर जुगाड म्हंजी सपान.

सपनात मयत मानूस आला क आट्टी येनार
सर्प आला क मेंढी येनार आनी

जरास चावट सपान पडल क सिक्सटी नाईन पक्का बोल !

आसच येकदा मारवाड्याला आकडा लागला. सत्ताविस हजार मिल्ल. ते झेऊन त्याजेकड आलू. दूकानान गर्दी व्हती. त्याला कसबस सांगीतल.गडी लई खुश झाला. मला म्हनला
'मिथन्या येक काम कर ना माजं. जरा ते पैशे घरामदी देऊन येशील काय ? '
'हा जगनशेट देतो ना. त्यान क तरास हाय?'

पैशे झेउन मी त्याजे घरी गेलू. कडी वाजवली.
दरवाजा ऊगडला न मारवाड्याची बायकु भायेर आली .घूंगट घालून.

'भाभी ये जगनशेटने पयसा दियेला हाय. तुम्को देनेको बोला हाय.'

भाभीन हात फुर केला. तो नाजुक न गोरा गोरा हात बगुन डोस्क्यात लायटीचा शॉकच बसला. जसा केलीचा गाभाच जनू.
'क्या नाम है आपका ?' भाभी बोल्ली
परत शॉक. यकदम झंकारलू.

'मि..मिथुन भोईर. दुकान के सामने रयता मै.'
'अच्छा . आते रहना जी. '
पैशे घेतान भाभीचे बोटांना टच झाला. मी थनगार.
आजुन भाभी घुंगटातच वती.
'भाभी आपको देखाच नई मै. येक बार चेयरा दिकाव ना.' मी बोल्लो
'हमे देखना है आपको ? ये लीजीये.' भाभीन घुंगट काडला न गोड हसली माजेकड बगुन. तिचे डोले कायतरी सांगत व्हते.
'आपका नाम क्या हाय ?'
'सविता.'
'सविता. ... सविताभाभी. ' मी कसाबसा बोल्लो.
ज्याम जाल झाल्ता ते दीवशी डोक्यान. मन थार्‍यावर नवत
नंतर दोन तीन येलला गेलो आसन भाभीकड. ती आशीच बगाची माजे कड. मना कायच थांग लागना.

यक दीवशी जगन बरुबर पीयाला बसलोवतो. जगन न तीच जुनी कॅशेट सुरु केली.
'ईतक समद केला मी पन येक पोर नाय बग मला. सगले डोकटर झाले, नवस झाले, बाबा झाले पन आजुन यश नाय बग.'

'येक सांगु जगनशेट ? माज्या तोंडातुन शब्द फुटत व्हते ' मी क म्हन्तो माजे शेतानचे घरान येक सादूम्हाराज येनाय हाईत ऊंद्याच्याला. धा बारा दिवस रायचेत.
तु त्यांना क नाय भेटत. शिद्दी बाबा हाय त्यो.'

'आस म्हनतस . उद्याच भेटतं बग.'
'भाभी ला झेऊनच ये. दुपारच्याला.'
'ठिक हाय. संद्याकाली बसुया काय?'
'नको. मना पनवेल ला जायचय. खरेदी कराची हाय. '

दुसरे दीवशी दूपारच्याला जगनशेट सविताभाभीला झेऊन आला.
सादूम्हाराज शांत बसलवत. जगन पाया पडला. सविताभाभी पन पाया पडली. ऊटताना ती न डोल वर करुन म्हारांजाकडे बगीतल न वल्खीच हसली.
म्हाराजांनी प्रसाद दीला. वत्सा काळजी करु नको. सगळ व्यवस्थित होईल. तूज्या सगळ्या ईच्छा पुर्ण होतील.
आपली क्रुपा आसुद्या म्हाराज. जगन बोल्ला.
सुखि भव सु खि भव. म्हाराजांनी आशिरवाद दिल्ला.

'सुनिये जी, आप आगे चलीये. मुझे सादु म्हाराज की सेवा करनी है. चलेगा नं ?' भाभीन जगन ला ईचारल
'हां हां स्वामीजीकी सेवा करेंगे तो ईच्छापूर्ती जल्दी होगी. तूम आना आरामसे. मै चलता हु. मुझे दूकान पे बैठना है.' जगन न संमती दिल्ली

जगन गेला. आगदी लांब गेल्याचे बगुन भाभी नेच दरवाजा लावला.

दूसर्‍या दीवशी सिक्स्टी नाईन फुटला बोल.!

धा दिवस भाभी येत रायली सेवा करायला.

मह्यन्यानी जगन पेढे झेउन आला.
'समदा तुज्यामुलेच शक्या झाला रे. मी आता बाप व्हनार.'
मना काय बोलाव सुचना.
नंतर भाभी म्हायेरपनासाटी गावाला नींगुन गेली.
मुलगा झाला.
जगन तर मला डोक्याव झेऊन नाचाचाच बाकी व्हता.
येक दीड वरसानी भाभी आली पोराला झेऊन. मी बगाला गेलो.
पोर हासत व्हत. लई गोड दीसत व्हत. माज्यासारकेच कुरले कुरले केस, पानीदार डोले.
मी शंबराची नोट पोराचे हातात ठेवली. जगन त यकदम खुळा झाल्ता. त्यान मला मिठिच मारली न रडाया लागला.
'मिथन्या तुज्यामूलच सादु म्हाराजांची भेट झाली न माज्या घरात आनंद भरला. तूजे माज्यावर लई ऊपकार हाईत बग.'

मी बधीर झाल्तो.
खरच, मी जगनशेटचा ऊपकारकर्ता व्हतो क गुन्हेगार ?

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

हॅहॅहॅहॅ ..

-(प्लेबॉय) दिसोबा सुंदर
पार्टटाईम महर्षी. संततीप्राप्ती साठी कधीही कॉल करा. :) रंगकर्मा.कॉम
भेटा. पुला खाली , मागची आळी , पुढचा रोड , एकटी पेठ , पुणे- ६९

लई भारी..... खुप हसलो...कोसळलो..... :-)
पण मस्त रसरसीत्...कुरकुरीत्...मजेदार ..!!

(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

पुणे ६९... ही ही ही ही... हसुन हसुन पुरेवाट झाली..

कथा ठीक वाटली. पूर्वीचा "बाल्या टच" जाणवला नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

>>>"बाल्या टच" जाणवला नाही.
असेच बोल्तो रे बाल्या......!

-दिलीप बिरुटे

हीहीहीहॅहॅहॅहाहा!!

मस्त एक्दम!!

सविताभाभी!! नावही विचारपूर्वक ठेवलेलं दिसतंय!!! =))

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

दूसर्‍या दीवशी सिक्स्टी नाईन फुटला बोल.! 8}

लई भारी कि रं बाल्या.

बज्जु

मस्त रे मिथून! :)

तात्या.

साधुबाबाच्या किरपेने जालेल्या पोराला वाचा शिद्दी प्राप्त जाली असते.
एक दीवस पोरगा शालेला जात न्हाइ म्हनुन जगन्या पोराला बुकल बुकल बुकलतो. पोरग रडत रडत एकटच आतल्या खोलीत जात आनि बोलते. "देवा माह्या बाला मारुन टाक" आनी.........
दुसर्‍या दिवशी जगन्याला आट्टी लागली

पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

लेखाचे आणि लेखकाचे, दोन्ही नावे वाचून म्हटले इथे काहीतरी झणझणीत असणार म्हणून. निराशा झाली नाही!

'सुनिये जी, आप आगे चलीये. मुझे सादु म्हाराज की सेवा करनी है. चलेगा नं ?' भाभीन जगन ला ईचारल
जल्ला... आता भक्तानच सेवा करायची म्हंटल्यावर साधु महाराज "प्रसन्न" झाले नाहीत तर नवलच... ;)
बाकी महाराजांचा "आशिर्वाद" मात्र लयं पॉवरफुल दिसतो. ;)

बाकी हल्लीच दिल्लीत असेच एक बाबा सापडले आणि त्यांच्या भक्तांची संख्या
५००+ होती म्हणे !!! (काही भक्त म्हणे एमबीए करत होते,आता कशात ते विचारु नका !!! )
http://bit.ly/abjkyL
http://www.youtube.com/watch?v=ZScri9j68PQ&feature=youtube_gdata

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

मस्त टाइमपास कथा.
हल्लीच असेच एक ३२ वर्षाचे बाबा चेन्नईत तामिळ अभिनेत्रीकडून 'सेवा' करुन घेताना पकडले गेले.!!
http://news.oneindia.in/2010/03/11/telecast-of-nithyananda-video-violate...
भेंडी
P = NP

हा.हा.हा...काय पण स्वामींचे नाव आहे "नित्यानंद" हा असला आनंद नित्य घेणारे साधु ,बाबा आणि महाराज म्हणजे "हिंदु अतिरेकीच"
माझ्या मते "अतिरेकी" म्हणजे निष्पाप,निरपराध लोकांचे आयुष्य उधवस्त करणारे नराधमच होय.

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

दादूस... नेहमी सारखी मजा नाय आली रे...

-अनामिक

मिथून लय भारी डोकं लावलं रं बाला तू.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

शेवटाची कल्पना आधी आली होती - मात्र हा काही दोष नाही. मस्त.