मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विडंबन - जे खावे पचण्याचे वय निघून गेले

अविनाश ओगले · · जे न देखे रवी...
आमची प्रेरणा.. सुरेश भटांची गझल देखावे बघण्याचे वय निघून गेले आमची शिफारस.. विडंबन वाचण्यापूर्वी मूळ गझल अवश्य वाचावी. जे खावे पचण्याचे वय निघून गेले पैजेवर चरण्याचे वय निघून गेले तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले आम्लेटे, पाव नि बन, पीत चहा रातंदिन इराण्यास भजण्याचे वय निघून गेले उडप्याच्या इडल्या अ‍न्, खरपूस ते डोसे पण एकसाथ हाणण्याचे वय निघून गेले दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले खुणाविले `पिझ्झा'ने,`चायनीज' दे आव्हाने हाय, पुरे पडण्याचे वय निघून गेले

वाचन 11030 प्रतिक्रिया 0