गृहप्रवेश

स्मृती's picture
स्मृती in जनातलं, मनातलं
27 Feb 2010 - 7:20 pm

"पसंत आहे हं आमच्या जयला तुमची लेक" आईंचा फोन आला आणि आमच्या घरचं वातावरण एकदाचं मोकळं झालं. दहा-बारा मुलगे बघितल्यावर आपल्या नकटीला हा जयदीप चित्रे पसंत पडलाय तर आता त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळतोय की नाही या चिंतेत आई बाबा होते.

त्या रात्री काही मला झोप म्हणून लागली नाही. आपलं लग्न होणार आता, म्हणजे नवीन घरात रहायला जायचं, दिवसाचं रूटीन पुर्णपणे बदलणार. आई, बाबा, चिनूला भेटायला परवानग्या काढाव्या लागतील की काय?!... आणि मुख्य म्हणजे हा प्राणी जयदीप.. तसा त्या दिवशी बरा वाटला.. सुलझा हुआ, डिसेंट, लेव्हल हेडेड वगैरे वगैरे, पण खरंच तसा असेल ना??... काय हे, लग्न कंपलसरी का आहे?!...

नंतरच्या बैठका, साखरपुडा, खरेदी, जुन्याच जागा एकमेकांबरोबर नव्याने अनुभवणं यांत तीन महीने कसे गेले कळलंसुद्धा नाही. एकदाचं लग्न झालं आणि चित्र्यांच्या घरात माझा गृहप्रवेश झाला.

स्वागताला दारात माझी नणंद धनू उभी होती. तिला पाहिलं आणि खुप आश्वस्त वाटलं. शांत, स्निग्ध धनश्री. खरेदीच्या वेळी आणि इतर एक दोनदा आम्ही भेटलो होतो तेव्हाच आवडली होती मला... फारसं न बोलणारी, बुजरी, साधी पण व्यवस्थित रहाणारी.. का कोण जाणे थोडीशी विझलेली, धनू. पण मला खरी चिंता वाटत होती शेंडेफळाची... मुक्ता! नावाप्रमाणेच मुक्त, हुशार, अल्लड... आणि मुख्य म्हणजे बंधुराजांबद्दल प्रचंड पझेसिव्ह!.. बापरे, माझ्याबद्दल आकस असणारच हिला!.. नो वंडर टक लावून माझं निरिक्षण चालू असतं ते. या मॅडम मागे होत्याच मी माप ओलांडताना.

हनीमूनचे मोरपंखी दिवस भुर्रकन उडून गेले... परतीच्या प्रवासातच आमचं झकासपैकी भांडण झालं आणि संसाराची मुहूर्तमेढ रोवली गेली! माझं आणि जयदीपचंही नवं रूटीन, नवीन घरचं नवीन वातावरण, नवीन नातेवाईक, नवे शेजारी, सासुबाई आणि त्यांच्या रितीभाती... या सगळ्यांशी जुळवताना मजा येत होती. धनू आणि मुक्ताशी पण बऱ्यापैकी वेव्हलेंथ जुळत होती, अर्थात आम्ही तिघीही नोकरीवाल्या असल्याने एकमेकींपासून सुरक्षित अंतरावर आपापल्या शेड्युल्समध्ये व्यस्त होतो. सगळं छान चाललं होतं..

हे कमी की काय म्हणून आम्ही घरात ’गोड बातमी’ आणली. मुक्ताबाई डॉक्टर असल्याने यु पी टी चा रिझल्ट पाहिल्यावर तिच्या कपाळावरच्या किंचित आठ्यांची माझ्या मनाने नोंद घेतली... हं बाईसाहेबांना जड जात होतं तर दादाच्या प्रेमात नवनवीन वाटेकरी पचवायला! म्हटलं असो, चालायचंच...

आणि पुढच्या बाराच दिवसांनी सकाळी पोटात प्रचंड दुखायला लागलं. नेमकी मी सुट्टी घेतली असल्याने घरी एकटीच होते. ताबडतोब मुक्ताला फोन केला, ती मला घ्यायला धावत पळत आली आणि पंधराव्या मिनीटाला आम्ही नर्सिंग होममध्ये होतो. एव्हाना रक्तस्राव सुरू झाला होता.. डॉक्टरांनी दोन इंजेक्शन्स दिली होती... धीर देणं तर सुरू होतंच, पण तरी काय होतंय हे मी समजून चुकले होते.

मध्ये पंधरा वीस मिनीटं मुक्ता गायब होती.. डॉक्टरांनी मला पडून रहायला सांगितलं होतं... जयदीपला पोचायला अर्धा तास तरी लागणार होता... खूप एकटं, असहाय वाटत होतं मला आणि तेवढ्यात मुक्ता आली... तिचा चेहरा त्या क्षणी इतका पिळवटून निघाला होता वेदनेने.. दु:खाने!! इतक्या दिवसांत कधीही न दिसलेली एक वेगळीच मुक्ता माझ्यासमोर उभी होती. गंभीर, विचारी, तरीही जबरदस्त धक्क्याने ढवळून निघालेली मुक्ता!! म्हणाली, यु पी टी वीक पॉझिटीव्ह दिसली तेव्हाच माझ्या मनात शंका आली होती... हे बोलताना इतका करूण, हरलेला भाव होता तिच्या नजरेत.. कधीही कधीही विसरू शकत नाही मी ती नजर. त्या क्षणी... त्याच क्षणी तिची ओळख पटली मला.. दॅट वॉज द मोमेंट ऑफ कनेक्शन!!

वरवर मजेशीर, लहान असल्याची पुरेपूर वसुली करणाऱ्या, पी जे सांगणाऱ्या, सदैव खिदळणाऱ्या प्रकरणाच्या आत हे रसायन होतं तर! आणि मी मात्र मुर्खासारखी थिल्लर शंका घेण्यात डोकं खपवत होते... नंतर सगळे आले, सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.

खरं सांगू, या वाईटातून चांगलं हे झालं की मी चित्र्यांच्या घराशी जोडले गेले. धनुचं मूकपणे माझ्या कपाळावर हात फिरवत रहाणं, आईंचं नवस बोलणं.. आणि जयदीपचं अस्वस्थ असणं, विमनस्कपणे पण तरीही "सगळं होईल ग व्यवस्थित" असं सारखं म्हणत रहाणं... जाणवलं, खरंच ही सगळी माणसं किती छान आहेत... किती साधी, किती प्रेमळ आणि टिपीकल आपल्यासारखी आहेत... तरीही कित्ती वेगळी! खूप बरं वाटलं मला. सगळ्या शंका फिटल्या. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी जाताना माझ्याच नकळत माझी नवेपणाची झूल भिरकावून दिली गेली आणि खऱ्या अर्थाने माझ्या घरात माझा गृहप्रवेश झाला.

स्मृती चित्रे

वाङ्मयप्रकटनविचार

प्रतिक्रिया

टारझन's picture

27 Feb 2010 - 7:32 pm | टारझन

व्वा चित्रे ताई ... तुम्ही तर तुमच्या संसाराची फिरती चित्रे उभी केलीत :)
फारंच ओपनली लिहीलंय !!! भावनांची घालमेल छाण :)
शुभेच्छा

-(वास्तुशांती लिहीण्याच्या विचारात) टारझन

शुचि's picture

27 Feb 2010 - 7:35 pm | शुचि

फार सुरेख लिहीलय स्मृती. अतिशय गोड. लेखन फार छान आहे तुमचं.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

रेवती's picture

27 Feb 2010 - 8:02 pm | रेवती

छान लेखन!
रेवती

स्वाती दिनेश's picture

28 Feb 2010 - 4:03 pm | स्वाती दिनेश

छान लेखन!

रेवतीसारखेच म्हणते, छान लिहिलं आहे.
स्वाती

वात्रट's picture

27 Feb 2010 - 8:42 pm | वात्रट

मस्त लिहलय...

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 11:05 pm | विसोबा खेचर

प्रकटन आवडलं..

अजूनही लिहा.. अगदी मनापासून आणि भरपूर..

तात्या.

वेताळ's picture

28 Feb 2010 - 4:34 pm | वेताळ

आवडल.
वेताळ

विंजिनेर's picture

28 Feb 2010 - 5:47 pm | विंजिनेर

छान लिहिलंय हे तर आहेच पण स्त्री-सदस्यांना(सुद्धा) आपल्या नाजूकातल्या नाजूक भावना मिसळपावसारख्या फोरमवर मोकळेपणाने व्यक्त कराव्याशा वाटतात हीच माझ्या मते मिसळपावच्या परिपक्वतेची खूण आहे :)

अप्पा जोगळेकर's picture

28 Feb 2010 - 5:59 pm | अप्पा जोगळेकर

छान आहे. असं लिहिता आलं पाहिजे. कसं काय लिहिता हो मॅडम ? आमचं लिखाण तर कायम रुक्षच असत. असो. शुभेच्छा.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Feb 2010 - 7:01 pm | बिपिन कार्यकर्ते

साधं सरळ पण मनातली नेमकी भावना व्यक्त करणारं लेखन. लिहित रहा. वाचायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते

jaypal's picture

28 Feb 2010 - 7:06 pm | jaypal

आवडला. छान लिहीता असेच लिहीत राहा आणि आम्हास वाचनानंद मिळत राहो. पुढील लिखाणास शुभेच्छा !!!

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

स्मृती's picture

28 Feb 2010 - 7:35 pm | स्मृती

धन्यवाद मन्डळी!!

इतक्या आणि इतक्या छान प्रतिक्रिया पाहून खुप समाधान वाटलं आणि हुरूपही आला. आणखी लेखन लवकरच होईल अशी मीही अशा करते. :)

पुनश्च एकदा, मन:पूर्वक धन्यवाद!

स्मृती

प्राजु's picture

1 Mar 2010 - 7:40 am | प्राजु

खूप छान लिहिलं आहेस. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

महेश हतोळकर's picture

1 Mar 2010 - 1:41 pm | महेश हतोळकर

आगदी मनापासून लिहीलेले प्रकटन आवडले.

------------
महेश हतोळकर

शैलेन्द्र's picture

1 Mar 2010 - 3:44 pm | शैलेन्द्र

छान आणि नेमके...
लीहीत रहा,....

पुलेशु

सुमीत भातखंडे's picture

1 Mar 2010 - 8:35 pm | सुमीत भातखंडे

छान लिहिलय.
पु.ले.शु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2010 - 9:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

मेघवेडा's picture

1 Mar 2010 - 9:32 pm | मेघवेडा

उत्तम... जटिल भावना अगदी सहजसोप्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत! लेखन आवडले!

--मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

संदीप चित्रे's picture

2 Mar 2010 - 5:25 am | संदीप चित्रे

तुमचं दु:ख समजू शकतो आणि ज्या खऱ्या अर्थाने गृहप्रवेश केलात त्याबद्दल बरं वाटलं.
तुमच्या मनातलं जसंच्या तसं लेखात उमटलेलं दिसतंय..
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
(मिपावर अजून एक चित्रे पाहून आनंद झाला :))

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

शुचि's picture

2 Mar 2010 - 5:29 am | शुचि

अहो चित्रे, आडनाव समान नसेल पण आम्हालाही कायस्थ लोकं पाहून आनंद होतो बरं का : )

~ मोकाशी बाई
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

संदीप चित्रे's picture

2 Mar 2010 - 6:18 am | संदीप चित्रे

कधी भेटूया ?
इथे न्यूजर्सीत पापलेट चांगलं मिळतं आणि दैव बलवत्तर असेल तर बोंबीलही :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

शुचि's picture

2 Mar 2010 - 6:26 am | शुचि

मला चिंबोरीचा रस्सा आवडतो. : )
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

स्मृती's picture

2 Mar 2010 - 7:28 am | स्मृती

'जात नाही ती जात' असं कोणी बरं म्हटलंय?! :)
मला वाटतं आपण प्रतिक्रियांचा ख. फ. न केलेला बरा.. हाहाहा!

अगदी मनापासून लिहले आहे ...
आई, बाबा, चिनूला भेटायला परवानग्या काढाव्या लागतील की काय?!... आणि मुख्य म्हणजे हा प्राणी जयदीप.. तसा त्या दिवशी बरा वाटला.. सुलझा हुआ, डिसेंट, लेव्हल हेडेड वगैरे वगैरे, पण खरंच तसा असेल ना??... काय हे, लग्न कंपलसरी का आहे?!...

(दिससते मजला सुख चित्र नवे ... मी संसार माझा रेखिते !)
पासून ते ...
मी चित्र्यांच्या घराशी जोडले गेले. धनुचं मूकपणे माझ्या कपाळावर हात फिरवत रहाणं, आईंचं नवस बोलणं.. आणि जयदीपचं अस्वस्थ असणं, विमनस्कपणे पण तरीही "सगळं होईल ग व्यवस्थित" असं सारखं म्हणत रहाणं... जाणवलं, खरंच ही सगळी माणसं किती छान आहेत... किती साधी, किती प्रेमळ आणि टिपीकल आपल्यासारखी आहेत... तरीही कित्ती वेगळी! खूप बरं वाटलं मला. सगळ्या शंका फिटल्या. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी जाताना माझ्याच नकळत माझी नवेपणाची झूल भिरकावून दिली गेली आणि खऱ्या अर्थाने माझ्या घरात माझा गृहप्रवेश झाला.

:-)

तुमचा मानसिक प्रवास खुप च आवडला .. मनाच्या खोल गाभार्यात प्रत्येक भारतिय मुलीचा भावनिक प्रवास असाच होत असणार पण तुम्ही मात्र खुपच सुंदर व्यक्त केला . अतिशय मनस्वी लिखाण !
~ वाहीदा

मिसळभोक्ता's picture

3 Mar 2010 - 1:42 am | मिसळभोक्ता

जबरा.

लक्ष्मीबाई टिळक आठवल्या.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विजुभाऊ's picture

3 Mar 2010 - 10:19 am | विजुभाऊ

साध्या शब्दात सुंदर लिहिले आहे हो.
अशाच लिहीत रहा

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Mar 2010 - 4:51 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सहजसुन्दर लिहीले आहे.

चतुरंग's picture

3 Mar 2010 - 5:13 pm | चतुरंग

इतक्या जिव्हाळ्याच्या भावना मांडल्याबद्दल धन्यवाद!
अजून लिहा.

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2010 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... माझ्या घरात माझा गृहप्रवेश झाला.

सुंदर ...

अदिती

नंदू's picture

3 Mar 2010 - 10:05 pm | नंदू

व्वा ! साध्या सोप्या शब्दात छान लिहीलंय. वाचताना तुमच्याशी गप्पा मारल्याचा भास होतो.
आजकाल कितीजणींचा खर्या अर्थाने 'त्यांच्या घरात गृहप्रवेश' होतो देवजाणे.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

नंदू

फ्यामिलीवाले मिळत असतील आणि ते मिळाले आहेत हे समजत असेल त्या सगळ्यांचा गृहप्रवेश व्हायला हरकत नाही! ;)

चतुरंग

स्मृती's picture

4 Mar 2010 - 8:53 am | स्मृती

ज्यांना जयदीप चित्र्यांसारखे
प्रेषक चतुरंग ( गुरू, 03/04/2010 - 00:46) .
फ्यामिलीवाले मिळत असतील आणि ते मिळाले आहेत हे समजत असेल

हो ना....'हे समजत असेल' हे खूप महत्त्वाचं आहे! :)

रामची आई's picture

4 Mar 2010 - 12:25 am | रामची आई

खुपच छान लिहीलय!!

अरुंधती's picture

4 Mar 2010 - 11:33 am | अरुंधती

खूप सुरेख लिहिले आहेत, मनाच्या धाग्यांची गुंफण आणि नात्यांची खरी ओळख बिकट समयीच कशी होते त्याचे यथार्थ चित्रण! लेख आवडला! :-)

अरुंधती
http://iravatik.blogspot.com/

बेसनलाडू's picture

4 Mar 2010 - 12:50 pm | बेसनलाडू

आवडले.
(अननुभवी)बेसनलाडू