संस्कृत १

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
13 Mar 2008 - 8:20 am

परवा मिपावरील एका लेखकू महाशयांनी विधान केले की त्यांना संस्कृत अजिबात कळत नाही. हे म्हणजे थोडेसे प्रसिद्धीचा हव्यास असणारे लोक जसे अधून मधून भडक व सवंग विधाने करून जनतेचे लक्ष वेधून घेतात तसा प्रकार झाला.

मी जर म्हटले, "मम नाम सृष्टीलावण्या । अहं दादरनगरे निवसामि । अहं प्रत्येक-बुधवासरे रेलयानेन
वान्द्रानगरं गच्छामि । अहं युवति । अहं शिक्षिका । अहं अनुवादिका च। अहं भारतीया, महाराष्ट्रीया च। आशा नाम मम माता। अनंत नाम मम पिता।"

भले प्रत्येकालाच संस्कृत बोलता येत नसेल पण ही वाक्ये कळायला काही कठिणता असेल असे मला वाटत नाही. म्हणून मी म्हणेन संस्कृत अजिबात कळत नाही हे एक विसंगत विधान आहे.
पण भारतात बरेच जणांना संस्कृतभाषेबद्दल, भारतीय संस्कृतिबद्दल येता जाता काहीतरी पिंक टाकायची सवयच आहे. त्यातच त्यांना भूषण वाटते.

संस्कृतबद्दल सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही अध्यात्माची भाषा असून ती विशिष्ट जातीशी निगडित आहे. संस्कृतमधील आद्यकाव्य रामायण ज्यात १ लाखापेक्षा जास्त श्लोक आहेत ते एका वाल्मिकी नावाच्या कोळ्याने रचले आहे. संस्कृतमधील महाकवि कालिदास हा गुराखी (गवळी समाजाचा) होता. महाभारतात ज्याच्या तोंडी संस्कृत संवाद आहेत तो कर्ण सूतपुत्र (सूत=सारथी) होता. म्हणजे आजच्या काळातील ड्रायव्हर / टांगेवाला समाज.

इतकेच काय शंकराचार्याशी ज्याने वादविवाद केला तो चांडाळ (समाजाचा) म्हणजे स्मशानात काम
करणारा होता. पण लोकांची उगीचच धारणा आहे की संस्कृत ही पुरोहित वर्गाची भाषा आहे आणि हा गैरसमज ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दोघांनीही मनापासून जपलाय. ब्राह्मण संस्कृतवरील आपला हक्क सोडायला तयार नाहीत आणि ब्राह्मणेतरांना आज संस्कृत शिकायची संधी असूनही ती भाषा न शिकता त्याविषयी मनात येईल ते ठोकून द्यायला आवडते. मनुस्मृती न वाचताच जाळणे हा तर नेतेमंडळींचा आवडता उद्योग.

पण अगदी अलिकडच्या काळात संस्कृत उत्तम बोलणार्‍यांमध्ये / जाणणार्‍यांमध्ये शांता शेळके (देवांग कोष्टी, विणकर समाज), मारुति चितमपल्ली (भटके विमुक्त समाज), बाबासाहेब आंबेडकर (दलित समाज), गुलाम दस्तगीर बिराजदार (मुसलमान) ही मंडळी सुद्धा आहेत.

इतकेच काय माझी मैत्रिण स्वाती जाधव उत्तम संस्कृत पण्डिता आहे. आज तिला मुंबईतील लोक संस्कृतसाठी प्रचंड मान देतात.

मला खात्री आहे की एवढ्या विवेचनानंतर सुद्धा काही मंडळींना खुसपटे काढण्याची सवय असेल. त्यांच्या
समाधानासाठी पुढील भागात माझी लाडकी "सत्यकाम जाबालीची कथा" देणारच आहे.

माझी तमाम वाचकांना एव्हढीच विनम्र विनंती की केवळ वरील मुद्द्याला अनुसरून मते द्यावीत कारण पुढील भागांत मी इतर मुद्द्यांकडे वळेनच.

>
>
मना बोलणे नीच सोशित जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें ।।

हे ठिकाण

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 8:27 am | विसोबा खेचर

माझी तमाम वाचकांना एव्हढीच विनम्र विनंती की केवळ वरील मुद्द्याला अनुसरून मते द्यावीत कारण पुढील भागांत मी इतर मुद्द्यांकडे वळेनच.

छान उपक्रम दिसतो आहे, पुढील सर्व भागांचे स्वागत आहे! :)

तूर्तास इतकेच, सवडीने विस्तृत प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करीन..

तात्या.

महाभारतात ज्याच्या तोंडी संस्कृत संवाद आहेत तो कर्ण सूतपुत्र (सूत=सारथी) होता. म्हणजे आजच्या काळातील ड्रायव्हर / टांगेवाला समाज.

महाभारतातील पात्रे एकमेकांशी संस्कृतात संवाद साधत होती असे वाटत नाही. महाभारतकारांनी मात्र महाभारताची रचना करताना पात्रांच्या तोंडी संवाद टाकले. पीटर ब्रूक्सच्या महाभारतातील पात्रे एकमेकांशी इंग्रजीत बोलतात म्हणजे भीमाने द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी आपल्या थोरल्या भावाची निर्भर्त्सना फाडफाड इंग्रजीत केली असा अर्थ होत नाही. रामाबाबतही असेच घडणे शक्य आहे, या सर्वाचे श्रेय रचनाकारांना आहे. पात्रांना नाही. याचा अर्थ रामाला किंवा कर्णाला संस्कृत येत नसे असे नसून सदर व्यक्ती एकमेकांशी संस्कृतात संवाद साधत होत्या असे म्हटलेले मी आजपर्यंत कोठेही वाचलेले नाही. असल्यास संदर्भ आवडेल.

वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला ही तद्दन आख्यायिका आहे. रामायणकार वाल्मिकी माणसांना लुटणारे कोळी नव्हते यावर अनेक तज्ज्ञांची मते ऐकण्यास मिळतील. कालीदास नेमका कोण होता याबाबतच अनेक प्रवाद आहेत त्यामुळे तो गुराखी होता का कोण याबाबत ठाम भाष्य करणे अयोग्य वाटते.

जनसामान्यांची भाषा प्राचीन काळी संस्कृत होती यावरही विश्वास ठेवणे कठीण आहे.

असो, याचा अर्थ प्राचीन काळी ब्राह्मणातेरांना संस्कृत शिकण्याची मनाई होती असे नाही पण नंतरच्या काळात ती झाली आणि जर गेल्या काही काळात तो गैरसमज दूर होऊ लागला असेल तर तो दूर होण्यास अजून थोडा वेळ जाऊ द्यावा.

असो, ब्राह्मणेतरांना आज संस्कृत शिकायची संधी असल्याने संस्कृत ज्याला शिकाविशी वाटते त्यांनी अवश्य शिकावी. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.

त्यातून एखाद्याने संस्कृत अजीबात कळत नाही असे विधान केले तर मनाला लावून घेण्यासारखे काय आहे ते कळले नाही.

अवांतरः मनोगतावर हीच चर्चा वाचून असाच प्रतिसाद दिला होता. इथे धुमाळी उडालेली दिसते तेव्हा इथेही देते. प्रतिसादांची संख्या दुसर्‍या पानावर गेल्याने घुसखोरी केली. ;-)

प्राजु's picture

14 Mar 2008 - 8:35 am | प्राजु

वा प्रियाली... सह्ही प्रतिसाद.

- (सर्वव्यापी)प्राजु

धनंजय's picture

14 Mar 2008 - 10:00 am | धनंजय

(प्रियालींची युक्ती - मुख्य प्रतिसाद सृला यांना)

संस्कृत भाषा कठिणही नाही, पण सोपीही नाही. कुठल्याही नैसर्गिक भाषेसारखी आहे.

"कमल नमन कर" सारखी वाक्ये सोपी आहेत ती कुठल्याही भाषेत. "आमी रशगुल्ला खाबे. रशगुल्ला खूब भालो." हे सोपे आहे. पण मला कोणी "फाडफाड" बंगाली बोलू लागल्यास खरेच काही म्हणजे काही कळत नाही.

घरगुती भाषा, खरीच वापरायची झाली तर फार गुंतागुंतीची असते. तुमचा संस्कृतचा चांगला अभ्यास आहे म्हणून तुम्ही बहुधा पुढील कल्पना संस्कृतमध्ये बोलून दाखवू शकता.
"पोळपाट पिठीवर सटकला म्हणून लाटणे हातातून निसटले. तेलाच्या वाटीला ते लागले असते तर कट्ट्यावर सगळीकडे तेलच तेल माखले असते. मग कामात काम वाढल्यामुळे बाईची भलतीच चिडचिड झाली असती. ते वेळेतच पकडले हे बरे झाले."
पण ही वाक्ये तुम्ही संस्कृतमध्ये म्हटली तरी कोणाला समजणार आहेत का? अशी वाक्ये तर घरगुती बोलण्यात सहज येऊन जातात. तुम्ही दिलेली वाक्ये सोपी असली तरी रोजवापरात क्वचितच येतील.

संस्कृतचा बाऊ करू नये हे खरेच (कुठल्याच भाषेचा बाऊ करू नये, तसे.) पणे ती दुसर्‍या कुठल्याही भाषेपेक्षा सोपी आहे, असे म्हटल्यासही बरोबर नाही. बाकी कुठलीही भाषा शिकण्यास लागतो तितका अभ्यास, म्हणजे पुष्कळ अभ्यास, केल्याशिवाय ती अवगत होणार नाही.

तुमच्या प्रकल्पास शुभेच्छा.

विसोबा खेचर's picture

15 Mar 2008 - 12:28 am | विसोबा खेचर

अगं प्रियाली होतीस कुठे तू? इथे मी एकटाच मास्तरीण बाईंच्या हातचा मार खात होतो. माझ्या, 'प्रियाली मला वाचव...! धावून ये..." या आरोळ्या तुला ऐकू आल्या नाहीत का?! :)

इथे धुमाळी उडालेली दिसते तेव्हा इथेही देते. प्रतिसादांची संख्या दुसर्‍या पानावर गेल्याने घुसखोरी केली. ;-)

शाब्बास! बरं केलंस.. :)

त्यातून एखाद्याने संस्कृत अजीबात कळत नाही असे विधान केले तर मनाला लावून घेण्यासारखे काय आहे ते कळले नाही.

सहमत आहे, सहमत आहे, सहमत आहे!

आपला,
(आवडत्या स्त्रीसोबत मनपसंत दारू आणि मच्छीचं जेवण मिळाल्यावर फाड फाड संस्कृत बोलणरा!) तात्या.

:)

प्रियाली's picture

15 Mar 2008 - 12:41 am | प्रियाली

अगं प्रियाली होतीस कुठे तू? इथे मी एकटाच मास्तरीण बाईंच्या हातचा मार खात होतो.

मिपावर मराठी शुद्धलेखनाच्या चर्चा सुरू झाल्यातर जनरल डायरचे रणगाडे काढणारे तुम्ही, इथे संस्कृतात मार खाताय!!! :)))))))))))))))

व्यंकट's picture

13 Mar 2008 - 8:32 am | व्यंकट

वाचण्यास उत्सुक.

>>"मम नाम सृष्टीलावण्या । अहं दादरनगरे निवसामि । अहं प्रत्येक-बुधवासरे रेलयानेन
वान्द्रानगरं गच्छामि । अहं युवति । अहं शिक्षिका । अहं अनुवादिका च। अहं भारतीया, महाराष्ट्रीया च। आशा नाम मम माता। अनंत नाम मम पिता।"

हे सगळं कळलं. बरं वाटलं. गोड आहे भाषा, बोंगाली सोरोखी.

व्यंकट

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 8:54 am | विसोबा खेचर

परवा मिपावरील एका लेखकू महाशयांनी विधान केले की त्यांना संस्कृत अजिबात कळत नाही. हे म्हणजे थोडेसे प्रसिद्धीचा हव्यास असणारे लोक जसे अधून मधून भडक व सवंग विधाने करून जनतेचे लक्ष वेधून घेतात तसा प्रकार झाला.

कोण हो हे लेखक महाशय? :)

बाय द वे, आपला हा लेख मात्र किंचित भडकून लिहिल्यासारखा वाटतो आहे, कुणाची तरी खरडपट्टी काढण्याकरता लिहिला गेल्यासारखा वाटतोय. भाषाही अंमळ उर्मट वाटते आहे! अर्थात, हे माझं व्यक्तिगत मत!

इतकेच काय माझी मैत्रिण स्वाती जाधव उत्तम संस्कृत पण्डिता आहे. आज तिला मुंबईतील लोक संस्कृतसाठी प्रचंड मान देतात.

मी मुंबईकर असून हे नांव प्रथमच ऐकतो आहे. कदाचित संस्कृत भाषेशी माझा फारसा संबंध नसल्यामुळे असे असेल!

असो..!

पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे एकंदरीत उपक्रम मात्र छान वाटतो आहे. पुढील सर्व भागांना पुन्हा एकदा शुभेच्छा! भाषेमध्ये थोडी विनम्रता आणल्यास अधिक आवडीने वाचला जाईल असे वाटते. अर्थात, पुन्हा हेही माझे वैयक्तिक मत!

आपला,
(मिपावरील काही लेखकू महाशयांपैकी एक!) तात्या. :)

--
संस्कृत भाषा जगासि कळेना,
म्हणोनि नारायणा दया आली हो
देवाजीने परि घेतला अवतार
म्हणति ज्ञानेश्वर तया लागी हो!

सृष्टीलावण्या's picture

13 Mar 2008 - 9:22 am | सृष्टीलावण्या

@खरडपट्टी काढण्याकरता लिहिला गेल्यासारखा वाटतोय.

ह्या माझ्या खरवडण्याने कोणाच्या तरी बुद्धीवरील गंज खरवडला गेला तर चांगलेच आणि तुम्हाला माझी भाषा उद्धट वाटते पण मराठीची प्रवृत्तीच उद्धटपणाकडे झुकणारी आहे.

हिंदीचा गुळचटपणा तिला ह्या जन्मात जमणार नाही आणि पचणार पण नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे भारतात महाराष्ट्राने जास्त स्वातंत्र चाखले आहे आणि हिंदीने सतत मोगलांची गुलामगिरी झेलली आहे त्यामुळे ती भाषा हुजरेगिरीची आहे.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 9:43 am | विसोबा खेचर

ह्या माझ्या खरवडण्याने कोणाच्या तरी बुद्धीवरील गंज खरवडला गेला तर चांगलेच

बाय द वे, बुद्धीवरील गंज खरवडायचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेता हे माहीत नव्हतं! :)

आणि आधी मुळात तुमच्या बुद्धीवर गंज चढला नाही हे कशावरून?? तुमच्या लेखातील एकंदरीत भाषेवरून तुमच्याच बुद्धीवर संस्कृतच्या अहंकाराचा प्रचंड गंज चढला आहे असे वाटते!

असो..

मराठीची प्रवृत्तीच उद्धटपणाकडे झुकणारी आहे.

तुमच्या उद्धटपणाचे खापर विनाकारण मराठी भाषेवर का फोडताय?? उद्धटपणाची कुठेही झाक न दिसणारी मराठी भाषाही अनेकदा माझ्या वाचनात आली आहे!

हिंदीने सतत मोगलांची गुलामगिरी झेलली आहे त्यामुळे ती भाषा हुजरेगिरीची आहे.

असहमत आहे. हिंदी ही भाषादेखील अत्यंत गोड आहे, नम्र आहे, आदबशीर आहे, आर्जवपूर्ण आहे! तिला सरसकट हुजरेगिरीची भाषा असे म्हणून हिणवणे हे एकतर भाषेबद्दल घनघोर अज्ञानाचे लक्षण आहे किंवा मुजोरपणाचे लक्षण आहे!!

असो, या पुढे मला तुमच्याशी कोणताही वाद घालायचा नाही तसेच तुमची ही लेखमाला वाचायचीही इच्छा नाही.

पुढील लेखनाकरता माझ्या वैयक्तिक शुभेच्छा देऊन प्रतिसाद संपवतो..

तात्या.

सृष्टीलावण्या's picture

13 Mar 2008 - 10:00 am | सृष्टीलावण्या

@बुद्धीवरील गंज खरवडायचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेता हे माहीत नव्हतं! :)

अहो खरडपट्टी हा शब्द तुमचाच, मी फक्त त्यावर कोटी केली.

तुमच्या लेखातील एकंदरीत भाषेवरून तुमच्याच बुद्धीवर संस्कृतच्या अहंकाराचा प्रचंड गंज चढला आहे असे वाटते!

संस्कृतने अहंकार चढत नाही उलट आपल्याला ह्या जगात अनेक विषय अगम्य आहेत हे कळते. मी तर म्हणतेय, अहंकार सोडा आणि संस्कृतला आपली म्हणा.

तुमच्या उद्धटपणाचे खापर विनाकारण मराठी भाषेवर का फोडताय??

उद्धट हा शब्द पण तुमचाच. खरे बोलले आणि ते मार्मिक असले म्हणजे ते उद्धट बोलले असे तर नव्हे ना...

@हिंदी ही भाषादेखील अत्यंत गोड आहे, नम्र आहे, आदबशीर आहे, आर्जवपूर्ण आहे!

त्यालाच मी गुळचट म्हणाले. हे माझे मत आहे आणि तुम्ही त्याच्याशी असहमत असाल तर मला त्यात काही गैर वाटत नाही. हा मत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे आणि तुमच्या मतस्वातंत्र्याचा मी आदर करते आहे. प्रसिद्ध विचारवंत व्हाल्तेअर म्हणतो, I disagree with every word you said but I defend with my life your right to say it.

तुमची ही लेखमाला वाचायचीही इच्छा नाही.

जशी आपली इच्छा. मी तुमच्या जागी असते तर आपली मते वेळोवेळी व्यक्त केली असती. चिडून दाखवले नसते. वादाचा मुकाबला संवादाने करायचा असतो भांडण करून पळून जाण्याने नव्हे.

परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

सृष्टीलावण्या's picture

13 Mar 2008 - 9:44 am | सृष्टीलावण्या

@मी मुंबईकर असून हे नांव प्रथमच ऐकतो आहे. कदाचित संस्कृत भाषेशी माझा फारसा संबंध नसल्यामुळे असे असेल!

हे अजून एक विसंगत वाक्य.

हे म्हणजे, मला झांबियाची भाषा येत नाही. कारण कदाचित् मी कधी ती ऐकलीच नाही म्हणून असे म्हणण्यासारखे आहे.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

छोटा डॉन's picture

13 Mar 2008 - 11:56 pm | छोटा डॉन

"मला झांबियाची भाषा येत नाही. कारण कदाचित् मी कधी ती ऐकलीच नाही म्हणून असे म्हणण्यासारखे आहे."
म्हणजे काय हे मला समजले नाही. कारण जे आपण कानाने ऐकत नाही ते आपण शिकण्याची शक्यता कमी असते ....
कॄपया याचा अर्थ मला समजावून सांगता काय ? मराठीतच सांगितला तर उत्तम कारण संस्कॄत मला तेवढी चांगली येत नाही .
मला बिलकुल येत नाही असे मी म्हणत नाही ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्राजु's picture

13 Mar 2008 - 9:03 am | प्राजु

पण..........

संस्कृतबद्दल सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही अध्यात्माची भाषा असून ती विशिष्ट जातीशी निगडित आहे.

असे मला तरी वाटत नाही. कोण म्हणालं असं? कोणाचा हि तसा गैरसमज नाहिये. माझ्या बघण्यात तरी असे कोणी आलेले नाही की ज्यांचा संस्कृत भाषेबद्दल आपण म्हणता तसा (गैर)समज/ आहे.

आणि तात्या म्हणतात त्याप्रमाणे, नक्की कोणत्या लेखकू महाराजांना आपण संस्कृत शिकवणार आहात? आणि आपल्याला संस्कृत समजत नाही असा जर कोणी कबुली जबाब दिला तर त्यात "प्रसिद्धिचा हव्यास काय?"
नक्की आपल्याला काय म्हणायचे आहे ते नाही कळले सृ.ला. ताई...

- (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट's picture

13 Mar 2008 - 9:15 am | व्यंकट

ज्ञानेश्वरच असावेत.
चूकभूल द्यावी घ्यावी.

व्यंकट

सृष्टीलावण्या's picture

13 Mar 2008 - 9:34 am | सृष्टीलावण्या

@संस्कृत समजत नाही असा जर कोणी कबुली जबाब दिला तर त्यात "प्रसिद्धिचा हव्यास काय?"

अहो प्राजुताई, प्रत्येक भाषेमध्ये संवादभाषा आणि साहित्यिक भाषा असा प्रकार असतो. कोणी म्हणाले की मला कठिण संस्कृत कळत नाही तर समजू शकते पण कोणी म्हणाले मला संस्कृत अजिबात समजत नाही (महाराष्ट्रात राहून) तर थोडे विचित्रच वाटते कारण बोली मराठीमध्ये सुद्धा सुमारे ७५% शब्द संस्कृत आहेत.

त्याबद्दलचा शांताबाईंचा लेख इथे वाचू शकता.

तरीपण एखादी गोष्ट न कळणे हे आपण कोणीही समजू शकतो पण हे सांगताना ह्या लेखक महाशयांचा जो हेल Tone होता तो मला खुपला.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

सहज's picture

13 Mar 2008 - 9:27 am | सहज

संस्कृत, संस्कृती, जात, धर्म, राजकारण, टीका (खरडपट्टी) सगळे अगदी जमुन आले आहे.

"मम नाम सृष्टीलावण्या । अहं दादरनगरे निवसामि । अहं प्रत्येक-बुधवासरे रेलयानेन
वान्द्रानगरं गच्छामि । अहं युवति । अहं शिक्षिका । अहं अनुवादिका च। अहं भारतीया, महाराष्ट्रीया च। आशा नाम मम माता। अनंत नाम मम पिता।"

अंदाजे अनुवाद असा आहे का? तर मग समजले हे वरचे संस्कृत.

माझे नाव सृष्टीलावण्या. मी दादर नगराची(चा) रहीवासी आहे. मी प्रत्येक बुधवारी रेल्वेने वांद्रे नगर येथे जाते(तो). मी युवती आहे. मी शिक्षीका आहे. मी अनुवादीका (पण) आहे. मी भारतीय आणि महाराष्ट्रीय आहे. माझ्या आईचे नाव आशा आहे. माझ्या वडीलांचे नाव अनंत आहे (किंवा आशा नाव माझ्या आईचे. (व ती) अनंत नावे (ठेवते) माझ्या वडलांना . ;-)) ह. घ्या. केवळ गमंत. कृपया माफी असावी.

भाग २ च्या प्रतिक्षेत.

आनंदयात्री's picture

13 Mar 2008 - 10:53 am | आनंदयात्री

>>किंवा आशा नाव माझ्या आईचे. (व ती) अनंत नावे (ठेवते) माझ्या वडलांना . ;-) <<

सहजराव १० वी चा संस्कृतचा वर्ग आठवला. :)))))))

सृष्टीलावण्या, एकदम सुंदर उपक्रम सुरु केला आहेस, पुढच्या लेखापासुन कोणतेही वैयक्तिक संदर्भ (संकेतस्थळावरचे अन बाहेरचे पण) येउ देउ नकोस, तिरके प्रतिसाद संस्कृत बद्दलच्या कुतुहुलाबद्दल असु दे, लेखमाला यशस्वी होइल. आणी सगळे (हो सगळे) लोक कौतुकही करतील.

शुभं भवतु |

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2008 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही संस्कृताकडे ढुंकूनही पाहणार नाही, च्यायला इथे आम्हाला मराठी नीट लिहिता येत नाही, अजूनही आमच्या -स्व, दीर्घाच्या वेलांट्या नक्की होत नाही, इकडून द्यायची की तिकडून द्यायची, पहिली का दुसरी.........असे असतांना संस्कृत वर लेखन करुन मराठी माणसाला बळजबरी संस्कृताची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे येडगावला जाण्याऐवजी पेडगावला घेऊन जाण्यासारखे वाटते आहे.

अवांतर :- वरील विधाने, अत्यंत नम्रपणे लिहितो आहे. आमच्या भाषेत /लेखनात कोणताही अहंकार जाणवल्यास तो आमच्या या मराठी भाषेचा दोष समजावा. :)

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 9:57 am | विसोबा खेचर

अवांतर :- वरील विधाने, अत्यंत नम्रपणे लिहितो आहे. आमच्या भाषेत /लेखनात कोणताही अहंकार जाणवल्यास तो आमच्या या मराठी भाषेचा दोष समजावा. :)

हा हा हा बिरुटेशेठ, हे बाकी मस्त! :))

आम्हालाही नाचता आलं नाही की आम्ही 'अंगणच वाकडं होतं!' असं म्हणून मोकळे होतो! :)

तात्या.

सृष्टीलावण्या's picture

13 Mar 2008 - 10:14 am | सृष्टीलावण्या

@आम्ही संस्कृताकडे ढुंकूनही पाहणार नाही,
तुम्ही संस्कृतकडे ढुंकूनही पाहू नका. कारण संस्कृतकडे पाहायची फारशी गरज नाहीच आहे. उलट संस्कृतच तुमच्याकडे प्रेमळपणे बघतेय. ज्ञानोबा म्हणालेच आहेत, घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी.

असे असतांना संस्कृत वर लेखन करुन मराठी माणसाला बळजबरी संस्कृताची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे येडगावला जाण्याऐवजी पेडगावला घेऊन जाण्यासारखे वाटते आहे.

संस्कृत आपल्या सर्वांच्या रक्तातच आहे आणि स्वत: बद्दल कोणाला प्रेम वाटत नाही. इथे प्रेम निर्माण करण्याचा संबंधच येत नाही. तुम्हाला दिलीप नाव आवडते म्हणजे संस्कृत आवडतेच आणि माझा प्रयत्न संस्कृत गळी उतरवण्याचा नाही. फक्त तिच्याविषयीचे गैरसमज दूर करण्याचा आहे.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 4:12 pm | विसोबा खेचर

प्राध्यापक बिरुट्या, मेलास रे तू आता!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2008 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव असेलही पण सर्वात जास्त प्रभाव आहे तो प्राकृत भाषेचा. ’राजशेखर’ नावाचा प्राकृत कवीने संस्कृत प्राकृतीची तुलना करतांना संस्कृत भाषेला ’कठोर, व राकट पुरुषी, भाषा असे म्हटले आहे. तर प्राकृत भाषेला सुकुमार, व नाजूक कमनीय भाषा म्हटले आहे......असो,

प्राकृत आणि त्याबरोबरच्या मागधी,पाली, महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची, अप्रभ्रंशी, जैन महाराष्ट्री...या भाषांच्या कणाकणातून मराठी भाषा सिद्ध झाली आहे, हे आता पुन्हा सांगण्याची गरज नाही, असे वाटते.

त्यामुळे संस्कृतविषयी आम्हाला कधीच प्रेम निर्माण झाले नाही, आणि त्याच्याविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत त्यासाठी कोणाच्या लेखाची वाट पाहावी लागली नाही, पाहणार नाही.

" दिलीप " नावाविषयी......या नावात काही संस्कृतच्या काही खाणाखूणा असतील तर त्या आम्हाला माहित नाही, ’दिलीपकुमार’ च्या नावावरुन दिलीप हे नाव आम्हाला मिळाले आहे :)

दिलीप- रघू- अज- दशरथ- राम--------> ’दिलीप ने सुराज्यासाठी प्रयत्न केले म्हणुन पाचव्या पीढीत ’रामराज्य’ आले.

मिसळपाववर ’दिलीप’ मराठी-बोली भाषेसाठी तळमळून मरमर करीत लिहीत राहील, तेव्हा येणा-या पाचव्या पीढीत ’मराठी’ शिवाय अन्य कोणतीही भाषा महाराष्ट्रात राहणार नाही. म्हणुन हा आमचा प्रतिसाद (टाळ्य़ांचा कडकडाट :) )

जी बहुजनांची भाषा होऊ नये म्हणुन सतत प्रयत्न झालेत. त्या भाषेचा आजच्या काळात काही लोकांना राहून राहून पुळका का येतो कोणास ठाऊक ? त्या भाषेत काही दम असता तर कधीतरी नव्हे, आजतरी ती जीवनव्यवहाराची भाषा झाली असती, त्याबरोबर कविता, चारोळ्या, लेख, नाटक कितीतरी प्रकार आज त्या भाषेत दिसले असते......पण आता मृत भाषेत आता काही नवनिर्मीती होऊच शकत नाही, तेव्हा या मृत भाषेला जीवंत करण्याचा चुकूनही प्रयत्नही करु नये असे मनोमन वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

15 Mar 2008 - 12:21 am | विसोबा खेचर

त्यामुळे संस्कृतविषयी आम्हाला कधीच प्रेम निर्माण झाले नाही, आणि त्याच्याविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत त्यासाठी कोणाच्या लेखाची वाट पाहावी लागली नाही, पाहणार नाही.

क्या बात है, बिरुटेशेठ! आपण साला सहमत आहोत तुमच्याशी!

’दिलीपकुमार’ च्या नावावरुन दिलीप हे नाव आम्हाला मिळाले आहे :)

हा हा हा! :)

मिसळपाववर ’दिलीप’ मराठी-बोली भाषेसाठी तळमळून मरमर करीत लिहीत राहील, तेव्हा येणा-या पाचव्या पीढीत ’मराठी’ शिवाय अन्य कोणतीही भाषा महाराष्ट्रात राहणार नाही. म्हणुन हा आमचा प्रतिसाद (टाळ्य़ांचा कडकडाट :) )

टाळ्या!!!!! दिलिपशेठचा विजय असो... :)

जी बहुजनांची भाषा होऊ नये म्हणुन सतत प्रयत्न झालेत.

येस्स! आणि हे प्रयत्न संस्कृतच्याच काही हलकट डुढ्ढाचार्यांनी केले आहेत.. हरामखोर लेकाचे!

त्या भाषेत काही दम असता तर कधीतरी नव्हे, आजतरी ती जीवनव्यवहाराची भाषा झाली असती, त्याबरोबर कविता, चारोळ्या, लेख, नाटक कितीतरी प्रकार आज त्या भाषेत दिसले असते......पण आता मृत भाषेत आता काही नवनिर्मीती होऊच शकत नाही, तेव्हा या मृत भाषेला जीवंत करण्याचा चुकूनही प्रयत्नही करु नये असे मनोमन वाटते.

क्या बात है बिरुटेशेठ! पटले आपले म्हणणे! आज आमच्यासारखा सामान्य माणूस या भाषेपासून चार हात दूरच राहू इच्छितो ही वस्तुस्थिती आहे..

बिरुटेशेठ, सुंदर प्रतिसाद...!

आपलाच,
तात्या.

धोंडोपंत's picture

13 Mar 2008 - 10:23 am | धोंडोपंत

सृष्टीलावण्य....

नमस्कार,

आपण संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे जे कार्य करीत आहात, त्याचे आम्ही स्वागत करतो आणि तुम्हाला या कार्यात उदंड यश मिळो अशी श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना करतो.

आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.

आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत

तुम्हाला माझी भाषा उद्धट वाटते पण मराठीची प्रवृत्तीच उद्धटपणाकडे झुकणारी आहे.

तुमच्या वरील विधानाशी आम्ही पूर्णपणे असहमत आहोत. संस्कृतबद्दल प्रेम असणार्‍या एका सृजनशील व्यक्तीकडून वरील विधान केले जाते ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.

ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे-

माझा मराठाचि बोलु कवतुके| तरी ते अमृतातेही पैजा जिंके|
ऐसी अक्षरे रसिकें| मेळवीन ||

अशा अमृताला पैजेने जिंकणार्‍या मराठी भाषेला उद्धटपणाचे बिरूद चिकटवणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. आम्ही आपल्या वरील विधानाचा जाहीर निषेध करतो.

ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेवांपासून ते बहिणाबाईंपर्यंत अनेकांनी या भाषेचा अमृतासम असलेला गोडवा समाजात वाटला. आणि अशा परिस्थितीत, स्वतःच्या उद्दामपणाचे खापर मराठीभाषा उद्धट आहे, असे ठरवून तिच्यावर फोडायचे या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही.

संस्कृत ही देववाणी समजली जाते. जगातील सर्वात प्राचीन भाषांमध्ये तिची गणना होते. संस्कृत ही अतिशय सुंदर भाषा आहे. अनेक भारतीय भाषांची जननी आहे. संस्कृतभाषेला कमी लेखण्याचे कोणालाच काही कारण नाही. पण संस्कृतचे प्रेम इतर भाषांना शिव्या देऊन व्यक्त करणे याला काही अर्थ नाही असे वाटते.

तेव्हा कृपया वरील पद्धतीची विधाने सार्वजनिक व्यासपीठावर होणार नाहीत याची काळजी आपण घ्यावी अशी आपणास हात जोडून विनंती आहे.

आपला,
(मराठीभक्त) धोंडोपंत

संस्कृतप्रचारासाठी पुन्हा शुभेच्छा.

आपला,
(गीर्वाणप्रेमी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 10:43 am | विसोबा खेचर

संस्कृतबद्दल प्रेम असणार्‍या एका सृजनशील व्यक्तीकडून वरील विधान केले जाते ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.
अशा अमृताला पैजेने जिंकणार्‍या मराठी भाषेला उद्धटपणाचे बिरूद चिकटवणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.

सहमत आहे...

आणि अशा परिस्थितीत, स्वतःच्या उद्दामपणाचे खापर मराठीभाषा उद्धट आहे, असे ठरवून तिच्यावर फोडायचे या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही.

हा हा हा! हे बाकी खरं बोल्लास रे धोंड्या! :)

पण संस्कृतचे प्रेम इतर भाषांना शिव्या देऊन व्यक्त करणे याला काही अर्थ नाही असे वाटते.

कदाचित हाच सु'संस्कृत' पणा असावा रे धोंड्या! :)

आपला,
(उर्दूप्रेमी!) तात्या.

सृष्टीलावण्या's picture

13 Mar 2008 - 11:06 am | सृष्टीलावण्या

@तुम्हाला माझी भाषा उद्धट वाटते पण मराठीची प्रवृत्तीच उद्धटपणाकडे झुकणारी आहे.

तुमच्या वरील विधानाशी आम्ही पूर्णपणे असहमत आहोत. संस्कृतबद्दल प्रेम असणार्‍या एका सृजनशील व्यक्तीकडून वरील विधान केले जाते ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.

पण मुळात उद्धट हा शब्दच माझा नव्हे. मला वाटते की लोकांनी स्वतंत्र मत लिहिले की काही जणांना तो उद्धटपणा वाटतो.

असो. केवळ शब्दाला शब्द वाढत गेला...पण ह्यात भाषेच्या अपमानाचा संबंध येतो कुठे... भाषा कशी जाणवते हा तर भाषाशास्त्राचा विषय आहे... एकाच गोष्टीबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू नयेत का?

आणि मराठीबद्दल माझे मत हे शेवटी माझे मत आहे त्यावर आपले मत हे असायचेच. मी परत म्हणेन की हा मत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

अवलिया's picture

13 Mar 2008 - 10:38 am | अवलिया

अशा अमृताला पैजेने जिंकणार्‍या मराठी भाषेला उद्धटपणाचे बिरूद चिकटवणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.

सहमत आहे
मराठी थोडी कडक आहे
काञ करणार स्वतंत्र वृत्तीच्या राज्यकर्ते व योद्धयांची भाषा कडकच असणार
हिंदीत गोडवा आहे

लेखिकेला कदाचीत बिहारी युपी कडील गुळमट हिन्दी ऐकायला मिळाली असेल
नशीब तिचेः)

http://www.bhashaindia.com/Patrons/LanguageTech/Marathi.aspx
यांचे म्हणणे वाचा
"Marathi - The Language of Warriors

Marathi is the language of the warrior nation that fought the powerful Mughal Empire to a standstill and established itself as a symbol of the struggle for Indian independence during the 1857 Mutiny "

बाकी चालु द्या

नाना

ॐकार's picture

15 Mar 2008 - 4:34 pm | ॐकार

मराठी राकट आहे!

( शब्द शब्द जपून ठेव!)

धमाल मुलगा's picture

13 Mar 2008 - 11:41 am | धमाल मुलगा

तो लेखकू महाशय मी तर नव्हे ना?
एका प्रतिसादात तस॑ म्हणालो होतो मी, 'रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्यासुद्धा कळत नाहीत' अस॑.

च्यायला, 'मजाक मजाक मे इतना बडा लोचा होगा' अस॑ खर॑च वाटल॑ नव्हत॑ हो !

असो,
सृष्टीताई, तुझ॑ स॑स्कृत मला झेपल॑. आता थोडा थोडा आत्मविश्वास वाटतोय. 'ऐकून बघतो रेडिओवरच्या बातम्या' :-)
ह्या निमित्ताने का होईना, एव्हढ्या चा॑गल्या भाषेबद्दल थोडी का होईना आत्मियता निर्माण झाली माझ्यासारख्या दगडाला, तरी बक्कळ आहे.

पुढच्या भागा॑च्या प्रतिक्षेत.
- धमालम् !

राजमुद्रा's picture

13 Mar 2008 - 12:48 pm | राजमुद्रा

जर तू तोच असशील तर तुझे काही खरं नाही!
सृष्टीताईनी तुला स॑स्कृतमध्ये झापला तर तुला काही कळणार तरी आहे का? बाकी माफी मागितली हे योग्यच केलंस!

राजमुद्रा :)

सुधीर कांदळकर's picture

13 Mar 2008 - 9:11 pm | सुधीर कांदळकर

फक्त मुलांसाठी असलेल्या मराठी शाळेतील गुंड मुलांचे 'संस्कृत नसावे' ही प्रार्थना.

विजुभाऊ's picture

13 Mar 2008 - 12:22 pm | विजुभाऊ

तात्या ,सृष्टीलावण्य ताइ ,धमाल्या, नाना चेंगट ,(गीर्वाणप्रेमी) धोंडोपंत
या सगळ्या भांडणात बिचार्‍या सत्यकाम जाबली चे काम एक्दम तमाम झाले.....
तुमचा खेळ होतो पण जाबाली चा हकनाक बळी जातो..............
आमाला गोष्त (आय मीन गोष्ट) हवी.............
सा रमणीया कथा मम त्वां कथयसी सृष्टीलावण्य ताइ बालिके....
अहं तत प्रित्यर्थं मिसल पाव ग्रुहे वेटं करिष्यामी
तव मिसल पाव ग्रुहे तिष्ट मित्रः
नामःअस्मिन विजुभाऊ भवेत

धमाल मुलगा's picture

13 Mar 2008 - 12:43 pm | धमाल मुलगा

विजुभाऊ,
अहं तत प्रित्यर्थं मिसल पाव ग्रुहे वेटं करिष्यामी

म्हणजे त्यासाठी मी मिपा घरी wait करतो आहे अस॑ आहे का रे?

लय भारी, एकदम विलायती स॑स्कृत वाटल॑. :-)

-अचरटम् धमालम्

राजमुद्रा's picture

13 Mar 2008 - 12:51 pm | राजमुद्रा

मलाही तसंच वाटलं :)

राजमुद्रा :)

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 4:08 pm | विसोबा खेचर

अहं तत प्रित्यर्थं मिसल पाव ग्रुहे वेटं करिष्यामी

हा हा हा! मस्त.. :)

बाय द वे, संस्कृतमध्ये मिसळपावला काय म्हणतात हो? :))

विजुभाऊ, तुमचं संस्कृत लै भारी दिसतंय. मग मला एक सांगा,

'तात्या, हा एक नंबरचा हलकट आणि भिकारचोट माणूस आहे'

याचं संस्कृत भाषांतर तुम्ही कसं कराल हो? :)

आपला,
(संस्कृत भाषेचा एक प्रामाणिक विद्यार्थी!) तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Mar 2008 - 7:49 pm | llपुण्याचे पेशवेll

तात्या प्रथम क्रमांकस्य 'भिकारचोटं' अस्ति|
कसले चपखल भाषांतर केले आहे तात्या.. जमले का नाही? (जरा जास्तच ह्.घ्या. कारण मी पण जरा जास्तच चिटवळ्पणा केला आहे.)
पुण्याचे पेशवे

कोलबेर's picture

14 Mar 2008 - 12:24 am | कोलबेर

मूळ वाक्यात 'हलकट' देखिल आहे.. त्याचे भाषांतर झालेले नाही!

विजुभाऊ's picture

13 Mar 2008 - 12:35 pm | विजुभाऊ

सृष्टीलावण्य ताई मला "वदतोव्याघात " या मराठी/संस्क्रुत शब्दाच अर्थ सांगता का जरा........बरेच दिवस अडलोय त्यावाचून

नामःअस्मिन विजुभाऊ भवेत

मनस्वी's picture

13 Mar 2008 - 1:54 pm | मनस्वी

"समोर वाघ बघून बोबडी वळली आणि वाघाला चूकून 'व्याघ' म्हटले."

मनस्वी

प्रमोद देव's picture

13 Mar 2008 - 2:04 pm | प्रमोद देव

वदतोव्याघात =प्रतिपादनातील स्पष्ट विसंगती

माफ करा सृष्टीलावण्या !
तुम्हाला ज्यांचा प्रतिसाद आला असेल की संस्कृत अजिबात येत नाही तो कदाचित खराही असू शकतो. कारण मी स्वतः ८ वी ते १० वी संस्कृत विषय शिकले. पण मला स्वतःला संस्कृत येत नाही. म्हणजे संस्कृतचे मराठीत भाषांतर करता येते पण मराठीचे संस्कृतमध्ये भाषांतर करता येत नाही. पण मार्कस् मात्र ७५ ते ८० मिळायचे. कारण पेपरमध्ये संस्कृतचे मराठीत भाषांतर करण्यालाच जास्त मार्कस् असायचे, पण संस्कृत सोपी आहे असे मला मुळीच वाटत नाही (कदाचित मी फार हुशार नाही म्हणून असेन). वर दिलेली वाक्य सोपी आहेत म्हणून अंदाजाने समजत आहेत, पण अवघड वाक्ये समजतीलच असे नाही. त्यामुळे ही भाषा सर्वसामान्यांसाठी सोपी नाही कारण, मराठी जे टपोरी शब्द सामावून घेऊ शकते ते संस्कृत सामावून घेवू शकेल? संस्कृत तिच्या खोलात जाऊनच ती शिकावी लागते. मराठी किंवा हिंदीसारखी ती नुसती ऍकून शिकता येणार नाही. जरा इकड्चा शब्द तिकडे झालेला संस्कृतला खपत नाहे.
माझ्या माहितीवरून संस्कृतला देववाणीही म्हणतात, त्यामुळे ती कुठल्याही जातीपातीची होऊच शकत नाही.
एक मात्र खरे की या भाषेला काळाच्या ओघात टिकता आले नाही (जशी मराठी महाराष्ट्राची, गुजराती गुजरातची तशी संस्कृत कुठल्या समुदायाची आहे का? असल्यास क्षमस्व ). याचे कारण म्हणजे संस्कृत जन्माला आल्यापासून जराही बदलली नाही (माझ्या माहितीप्रमाणे ). निसर्गाच्या नियमानुसार जी गोष्ट बदलत नाही ती लोप पावते. मराठी किंवा अन्य भाषा बदलल्या म्हणून टिकल्या. जर तुम्ही एखादा संस्कृत उतारा किंवा श्लोक घेवून तो मराठीत शब्दशः समजवून सांगणार असाल किंवा संस्कृतमधील व्याकरण समजावून सांगणार असाल किंवा मराठी उतार्‍याचे संस्कृतमध्ये भाषांतर करायला शिकवणार असाल तर उपक्रम स्तुत्य आहे! , कि या लेखातून कुठल्याही भाषेचा अनादर करू नका असे सांगायचे आहे?या लेखनाचे तुमचे प्रयोजन काय आहे? हे नक्की लिहा

राजमुद्रा :)

इनोबा म्हणे's picture

13 Mar 2008 - 1:33 pm | इनोबा म्हणे

तुम्हाला ज्यांचा प्रतिसाद आला असेल की संस्कृत अजिबात येत नाही तो कदाचित खराही असू शकतो. कारण मी स्वतः ८ वी ते १० वी संस्कृत विषय शिकले. पण मला स्वतःला संस्कृत येत नाही. म्हणजे संस्कृतचे मराठीत भाषांतर करता येते पण मराठीचे संस्कृतमध्ये भाषांतर करता येत नाही. पण मार्कस् मात्र ७५ ते ८० मिळायचे. कारण पेपरमध्ये संस्कृतचे मराठीत भाषांतर करण्यालाच जास्त मार्कस् असायचे, पण संस्कृत सोपी आहे असे मला मुळीच वाटत नाही (कदाचित मी फार हुशार नाही म्हणून असेन). वर दिलेली वाक्य सोपी आहेत म्हणून अंदाजाने समजत आहेत, पण अवघड वाक्ये समजतीलच असे नाही. त्यामुळे ही भाषा सर्वसामान्यांसाठी सोपी नाही कारण, मराठी जे टपोरी शब्द सामावून घेऊ शकते ते संस्कृत सामावून घेवू शकेल? संस्कृत तिच्या खोलात जाऊनच ती शिकावी लागते. मराठी किंवा हिंदीसारखी ती नुसती ऍकून शिकता येणार नाही. जरा इकड्चा शब्द तिकडे झालेला संस्कृतला खपत नाहे.
१००% सहमत

सृष्टीलावण्या आपण जर इथी संस्कृतचे वर्ग भरवणार असाल तर आमचे नाव पहिले नोंदवा.अवघड असली तरीही शिकायला आवडेल.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 4:17 pm | विसोबा खेचर

राजमुद्रांशी मी सहमत आहे.

आपली पण तिच्यायला शाळेत असताना संस्कृतची साफ बोंब होती. मास्तरीण बाई काय शिकवत आहेत ते सालं समजायचंच नाही. सगळं डोक्यावरून जायचं आणि जाम झोप यायची! :)

असो...

आपला,
(कालिदासाच्या मेघदूताचा संगीतकार!) तात्या.

प्राजु's picture

14 Mar 2008 - 12:58 am | प्राजु

राजमुद्राताईंनी जे सागितले ते अगदी योग्य आहे. माझे शाळेत असतांना होते संस्कृत चांगले. मार्क्स सुद्धा चांगले मिळवले मी. काही सुभाषिते अजूनही पाठ आहेत. पण त्यानंतर संस्कृतचा म्हणावा तसा संबंध राहिला नाही. आपण इथे गोष्टी लिहिणार असाल अर्थासहीत, तर मी अगदी मनापासून वाचेन. पण मराठी भाषेला नावे नका हो ठेऊ.. कारण जे काही चार्-दोन शब्द लिहिता येतात मला त्या याच भाषेत. त्यामुळे माझे मराठीवर अंमळ जास्तीच प्रेम आहे. -

(सर्वव्यापी)प्राजु

विजुभाऊ's picture

13 Mar 2008 - 12:57 pm | विजुभाऊ

मत्प्रिय धमाल्या मला तसेच म्हणायचे आहे..
नव्या भाषेतले शब्द आले तर भाषा वाढते म्हणे..हिंदीत बघ तकनीक्(टेक्नीक) त्रासदी(ट्रॅजेडी) कसे चपखल बसतात.
मराठीत बेष्ट / लई ब्येस (बेस्ट) हे झकास शब्द असेच आहेत..
अरे हो काही शब्दांच्या गमती आहेत..
मला परवा शोध लागला की "कजाग" ह शब्द कझाकीस्तान मधला "कझाक"जमात या वरुन आला आहे .( बघ कझाक पुरुष कसे शूर आहेत ते. त्या सगळ्यांच्या बायका कजाग असतात. ....आपण भारतिय आहोत याचे मला आता बरे वाटत आहे)
तुझा भारतिय
विजुभाऊ
उप प्र. "मला खात्री आहे की एवढ्या विवेचनानंतर सुद्धा काही मंडळींना खुसपटे काढण्याची सवय असेल. त्यांच्या
समाधानासाठी पुढील भागात माझी लाडकी "सत्यकाम जाबालीची कथा" देणारच आहे. "
यातला "च" नसता तर चालले असते की..बर जाउदे...त्या जाबाली ला जिवंत करा की त्याची गोष्ट सांगायचे एक सत्य काम होउन जाउदे

यन्ना _रास्कला's picture

13 Mar 2008 - 1:16 pm | यन्ना _रास्कला

मी नवीन सदस्य झालो आहे. मिसळपाव नाव आणि वेबसाईट दोन्ही आवडले.

जाबालीच्या कथेची डोळ्यात प्राण आणून वाट पाहात आहे.

राजमुद्रा's picture

13 Mar 2008 - 1:26 pm | राजमुद्रा

सुस्वागतम्
कथा येईपर्यंत प्राण डोळ्यातच ठेवा हो. (ह. घ्या.)
यन्ना _रास्कला चा अर्थ काय?

राजमुद्रा :)

इनोबा म्हणे's picture

13 Mar 2008 - 1:36 pm | इनोबा म्हणे

मला वाटते त्यांना 'यंदा रास कला'(शिकायची आहे काय?) असे सांगायचे असावे;परंतू नविन सदस्य असल्याने टंकलेखनाच्या चूकिमूळे त्यांनी तसे लिहीले असावे.(ह. घ्या. )

(इनोबा मास्तर)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

राजमुद्रा's picture

13 Mar 2008 - 1:43 pm | राजमुद्रा

भन्नाट पी. जे.

राजमुद्रा :)

सुधीर कांदळकर's picture

13 Mar 2008 - 9:15 pm | सुधीर कांदळकर

कदाचित शिकायची असेल.

यन्ना _रास्कला's picture

13 Mar 2008 - 1:33 pm | यन्ना _रास्कला

असले प्रश्न विचारून मेंदुला ताण देऊ नका हो. हा शब्द मी ओम शांति ओम मध्ये ऐकला.

राजमुद्रा's picture

13 Mar 2008 - 1:41 pm | राजमुद्रा

मला वाटले तुम्हाला अर्थ माहित आहे म्हणून तुम्ही तो स्वतःसाठी वापरला, मला वाटले होते की तो कन्नड / तामिळ असावा :) म्हणून उस्तुकता होती.
असो, आपल्याला काय करायचय हो ना :) शब्द वेगळा आहे.
पुन्हा एकदा सुस्वागतम् :)

राजमुद्रा :)

मनस्वी's picture

13 Mar 2008 - 2:03 pm | मनस्वी

मला वाटते की तू सरळ लेखमालेची प्रस्तावना आणि तो संस्कृत विषयाशी निगडीत आहे येवढे देउन विषयाला म्हणजे "सत्यकाम जाबालीची कथा" याला हात घालायला हवा होतास.
मूळ विषय राहिला बाजूला.
कोणाला काय वाटते, काय वाटावे, काय आवडावे, कशावर प्रेम करावे हे सांगणारे आपण कोण?
आपल्याला विषय आवडला - प्रकाशित करा - ज्याला आवडेल तो वाचेल - प्रतिक्रिया देईल - काम संपले - विषय संपला.

(कथेच्या प्रतिक्षेत) मनस्वी

इनोबा म्हणे's picture

13 Mar 2008 - 2:11 pm | इनोबा म्हणे

परखड मत आवडले.

(बिनधास्त इनोबा)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

धमाल मुलगा's picture

13 Mar 2008 - 2:24 pm | धमाल मुलगा

ह्याला म्हणतात समजुतदारपणा.

आवडल॑ बुवा आपल्याला :-)

प्रभाकर पेठकर's picture

14 Mar 2008 - 12:44 pm | प्रभाकर पेठकर

१००% सहमत.

प्राणभूतञ्च यतत्वम सारभूतं तथैव च ।
संस्कृतौ भारतस्यास्य तन्मे यच्छ तु संस्कृतंम् ॥

अनेक भारतीय भाषांची जननी आहे, पुराण काला पासुन हिच भाषा प्रचलीत आसल्याने यात ज्ञानभांडार सामावल आहे.

संस्कृतं देवभाषास्ति वेदभाषास्ति संस्कृतम् ।
प्राचीनज्ञानभाषा च संस्कृतं भद्रमण्डनम् ॥

आणि

वेदान्तानां पुराणानां शास्त्रानां च तथैव च ।
मन्त्राणां तन्त्रसूत्राणामाद्यभाषास्ति संस्कृतम् ॥

मराठी भाषा ही मुळातच संस्कृतप्रचुर आहे, त्यामुळे मराठीभाषिकांनी मला संस्कृत येत नाही / कळत नाही हे म्हणणेच मुळी साफ चुकीच आहे. ऐका भाषेचे प्रेम इतर भाषांना शिव्या देऊनही व्यक्त कघीच करता येत नाही. प्रत्येक भाषेचे आपले ऐक सौंदर्य आहे, जशी ऊर्दू मधे आर्जव आहे, संस्कृतमधे प्रत्येक शब्दाला आणि अक्षराला अर्थ आहे.यात भाषेचे सौंदर्य आहे.

रामायणम् महाकाव्यम् महाभारतमेव च ।
उभे च विश्ववि़ख्याते संस्कृतस्य महानिधे ॥

पण "मराठी भाषिक उद्धट आहेत आहेत असे मी म्हणेन - ना कि भाषा" हे विधान मला मराठी भाषिक असुनही मान्य आहे.

अग्रतः संस्कृतं मेSस्तु पुरतो मेSस्तु संस्कृतम् ।
संस्कृतं ह्रदये मेSस्तु विश्वमध्येSस्तु संस्कृतम् ॥

आपला
(संस्कृत प्रेमी) आर्य

इनोबा म्हणे's picture

13 Mar 2008 - 2:17 pm | इनोबा म्हणे

पण "मराठी भाषिक उद्धट आहेत आहेत असे मी म्हणेन - ना कि भाषा" हे विधान मला मराठी भाषिक असुनही मान्य आहे.
आपला प्रतिसाद वाचून काही मराठी भाषिक उद्धट आहेत याची खात्री झाली.असो.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 3:48 pm | विसोबा खेचर

अग्रतः संस्कृतं मेSस्तु पुरतो मेSस्तु संस्कृतम् ।
संस्कृतं ह्रदये मेSस्तु विश्वमध्येSस्तु संस्कृतम् ॥

म्हण्जे काय? ओ काय कळंल असं तरी लिवा की तिच्यायला!

तात्या.

बाय द वे, संस्कृतात 'तिच्यायला'ला काय म्हणतात हो? :)

धमाल मुलगा's picture

13 Mar 2008 - 3:54 pm | धमाल मुलगा

'तद् माताय' कस॑ वाटत॑य? बसत॑य का फिट्ट ???

-हलकट ध मा ल.

केशवसुमार's picture

13 Mar 2008 - 6:41 pm | केशवसुमार

धमाल्या..
ह.ह.मु.व.
'तद् माताय' हाआआआ हाआआआआआ हाआआआआआअ
केशवसुमार

मुक्तसुनीत's picture

13 Mar 2008 - 8:21 pm | मुक्तसुनीत

>>>अग्रतः संस्कृतं मेSस्तु पुरतो मेSस्तु संस्कृतम् ।
>>>संस्कृतं ह्रदये मेSस्तु विश्वमध्येSस्तु संस्कृतम् ॥

>>>म्हण्जे काय? ओ काय कळंल असं तरी लिवा की तिच्यायला!

माझ्यापुढे नित्य माझी मराठी
पृष्ठावरी देई आशीसही
तेवेल ज्योती तिची अंतरी या
विश्वास देईल तेजोनिधी

विसोबा खेचर's picture

13 Mar 2008 - 4:52 pm | विसोबा खेचर

कालिदासशेठच्या,

कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त:
शापेनास्तड्ग्मितहिमा वर्षभोग्येण भर्तु: ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्त्रानपुण्योदकेषु
स्त्रिग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु

या मेघदूताच्या पहिल्याच श्लोकाला आपण यमनकल्याणात चाल लावली होती.

हा श्लोक इथे पाहा व ऐका!

आणि ऐकून कसं वाटलं ते अवश्य सांगा बरं का मंडळी! :)

आपला,
(कालिदासाच्या मेघदूताचा संगीतकार!) तात्या.

आनंदयात्री's picture

13 Mar 2008 - 6:06 pm | आनंदयात्री

:))))))))))))))))))
तद माताय |

किशोरी's picture

13 Mar 2008 - 7:04 pm | किशोरी

>>आपली पण तिच्यायला शाळेत असताना संस्कृतक्ची साफ बोंब होती. मास्तरीण बाई काय शिकवत आहेत ते सालं समजायचंच नाही. सगळं डोक्यावरून जायचं आणि जाम झोप यायची! :)

हा हा ..मला तर अजुन संस्कृतचा पहीला तास आठवतो आहे,बाई आल्या आणी 'अहं आवां वयं प्रथमा 'हे
शिकवायला लाग़ल्या ,मागे बसल्या मुळे मागच्या बरयाच जणांना नुसत पॉम पॉम ऐकायला येत होते,
हसायला खुप येत होत आणी बाई नक्की काय म्हणतायेत ते विचारायची हिम्मंत पण झाली नाही,
बाई एकदम भारदस्त होत्या,एक हाथ पडला असता तर सगळी हाड मोड्ली असती,त्या गेल्यावर इतके
हसलो,लोळायचेच बाकी रहीले होते...बाकी नंतर गोडी निर्माण झाली, संस्कृतबद्द्ल बाईंबद्द्ल नाही..:))
बाकी तुमचे चालु द्या...सत्यकाम जाबालीची कथा वाचण्यास उत्सुक,पुढच्या भागा॑च्या प्रतिक्षेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Mar 2008 - 9:35 pm | llपुण्याचे पेशवेll

बाकी संस्कृत कोणाला आवडावी आणि कोणाला नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला संस्कृत फार आवडते. आणि साधारण सोप्या संस्कृताचा अर्थ पण कळतो. उदा. संस्कृत बातम्या.
आणि राहीले भारतीय संस्कृतीबद्दल आणि संस्कृताबद्दल पिंक टाकणारे लोक. 'तद माताय' गेले तेल लावत.
आता हिंदी भाषा मला पण मनापासून गुलामांची भाषाच वाटते. :) परत लिहीतात तसे बोलतही नाहीत. उदा. लिहीतात 'जैन' आणि म्हणतात 'जॅन' . पण मग 'बँक' ला मात्र लिहीतात 'बैंक'. कुठलाच उच्चार पूर्ण करत नाहीत. उदा. 'अर्क' चा उच्चार 'अर्क्', 'कुटुंब' चा उच्चार 'कुटुंब्' असा करतात.
असो ही विधाने माझी वैयक्तिक मताची पिंक झाली. :)
आता राहीला मराठी भाषा उद्धट असण्याचा संबंध. माझे बरेच अमराठी मित्र आईला, आजीला, सख्ख्या काकाला/मामाला 'आप' म्हणतात. पण मराठीत मात्र हीच नाती एकेरी असतात. त्यामुळे त्यांचा कल देखील मराठी भाषेला उद्धट म्हणण्याकडे असतो. माझे मत या बद्दल असे आहे की आई, आजी, सख्खे काका/मामा(काही अपवाद वगळता) आत्यंतिक प्रेमाची मंडळी असतात त्यामुळे आपण त्याना एकेरी नावाने संबोधतो.
पण म्हणूनच मला हिंदी भाषा जरा कृत्रिमता अधिक असलेली वाटते.
असो 'जय भारत, जय भारती'| (ही दिव्या भारती नव्हे... ;))
पुण्याचे पेशवे

सुधीर कांदळकर's picture

13 Mar 2008 - 9:47 pm | सुधीर कांदळकर

अहंकार यामधील सीमारेषा फसवी आहे. आपण कधी फसू सांगता येणार नाही. तसेच तडफदार उत्तर आणि उद्धट उत्तर यामधील रेषासुद्धा फसवी आहे. ही जाणण्या साठी संस्कार आणि शिस्त अंगी बाणवावे लागतात. मी जे तडफदार उत्तर माझ्या धाकट्या बंधूना देईन तेच उत्तर मोठ्या बंधूना दिले तर ते उद्धटपणाचे होईल. हे डबल स्टँडर्ड नव्हे. रूढ संस्काराची रीत उल्लंघिली जाते म्हणून उद्धट. माझ्या मते एखाद्या व्यक्तीच्या आत्मसंन्मानाला धक्का लागेल असे विधान जर केले तर ते उद्धट विधान होईल. मग ती व्यक्ती लहान असो वा मोठी. (लहान असो वा मोठी : म्हणजे दुहेरी वर्तणूक किंवा डबल स्टँडर्ड होणार नाही) मग ते विधान तथाकथित गुळमुळीत हिंदीत असो वा तथाकथित उद्धटपणाकडे झुकणा-या मराठीत. मराठी उद्धट नसल्याचा उत्तम पुरावा म्हणजे वाहतो ही दुर्वांची जुडी मधील मुलगी तिच्या बाबांशी बोलते ती भाषा. किंवा श्यामची आई मधील श्यामची भाषा.

तेजस्वी हिंदी भाषा अडवाणीची आपण नेहमी ऐकतोच. नेताजींची ऐकली नाही तरी वाचलेली आहेच. कोणतीहि भाषा ही उद्धट वा गुळमुळीत नसते. तसे गुण तिला लाभतात ते ती बोलणा-या माणसांमुळे.

मला वाटते माझे वरील प्रतिपादन उद्धट नाही वा गुळमुळीतहि नाही.

प्रत्येक भाषेचा वेगळा गोडवा असतो, बाज असतो. 'ही' भाषा 'त्या' भाषेपेक्षा श्रेष्ठ असे काही नसते. संस्कृत ही आपल्या बहुतेक सर्व भाषांची जननी आहे हे भाषातज्ञांनी मान्य केले आहे. वैचारिक क्रांती(रेनेसाँ)पूर्वी संस्कृत नक्कीच शिखरावर होती. परंतु नंतर प्रचारात नसल्यामुळे तसेच तांत्रिक शब्द विकसित न झाल्यामुळे तिचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे.

सृलाताईंना त्याबद्दल माझ्या शुभेच्छा. परंतु त्यांनी संतुलित धोरण स्वीकारून सर्वांना बरोबर घेऊन जावे. विरोधकांना आपल्या समवेत नेण्यास एक कौशल्य लागते. ज्याला आपण इंग्रजीत 'इंटीग्रिटी' म्हणतो. परंतु ज्येष्ठच नव्हे कुणाहि सदस्यांचा उपमर्द होईल अशी विधाने टाळावीत. जेणेकरून मिपा ची प्रतिष्ठा वाढेल अन्यथा मिपा ला टपोरी कट्ट्याचे स्वरूप येईल.

सर्व ज्येष्ठ सभासदांना पण माझी नम्र विनंति आहे की जर कोणी चुकत असेल वकिली प्रतिपादने करून चुका दाखवून द्याव्यात.

असो. सृलाताई, पटले नाही तर सोडून द्या. शुभेच्छा.

आपला नम्र सदस्य
सुधीर कांदळकर.

सध्याच्या युगात कोणतीही भाषा स्वतःचा शुद्धपणा टिकवण्याचा प्रयत्न करेल तर ती टिकणे अवघड होईल.
मराठीप्रेमी माणसाने मराठी बोलण्याचा आग्रह धरावा.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत