गेले बरेच दिवस मी मिपा वाचतो आहे..मिपा मुळे आणि माझ्या अजून एकदोन मित्रांच्या ब्लोग मुळे मला पण काही तरी लिहायची स्पुर्ती मिळाली ..हि मी ऐथे नमूद करू इच्छितो. हा असा पहिलाच प्रसंग आहे..कि ज्यात मी काही आलेल्या अनुभवातून मी काही तरी मुक्त लेखन केले आहे, जाणकार मीपा वाचकांना नम्र विनिती आहे .लेखन सुधारण्या साठी योग्य त्या सूचना जरूर कार्याव्यात ..ज्याचा मला पुढे अजून काही व्यक्त करण्यास मदत करतील..धन्यवाद!
काही दिवस तरी एकटे राहावे..!
गेले काही दिवस या विषयावर लिहेन म्हणत होतो.. माझे मत आहे कि माणसाने काही दिवस तरी एकटे राहावे, आपण बरेच काही शिकतो, आपला जीवना कडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलतो ..
आमचे छोटे.मध्यम वर्गीय कुटुंब ,.म्हणजे मी, आई ,वडील, आणि माझी धाकटी बहिण. लहानाचा मोठा झालो..ते पुण्यातच..त्यामुळे कधीही शिक्षणा निमित व नंतर नोकरी निमित्त घराबाहेर राहायचा प्रसंग कधी आलाच नाही.. शिक्षण झाल्यावर लवकरच एका माहिती तंत्रद्यान कंपनी मध्ये नोकरी लागली ..( मराठी मधमवर्गीय भाषेत..चिकटलो..). तेंव्हा कंपनी प्रशिक्षणा करिता.काही दिवस एका दुसर्या शहरात पाठवले होते..त्यामुळे तसे पहिला गेले तर ..या आधी काही महिने मी घर बाहेर राहिलो होतो..पण त्या दिवसात ..नुकताच..महाविद्यालय बाहेर पडलो असल्या मुळे तसा थोडा अल्लड पना होता..आणि..कंपनी ने राहण्या खाण्याच्या सगळ्या सुविधा यथायोग्य पुरवल्याअसल्या मुळे फारशी काही चिंता न्हवती. कंपनी चे ऑफिस पुण्यात असल्यामुळे, प्रशिक्षणा संपवून लवकरच मी परत परत पुण्या भूमी मध्ये दाखल.झालो. त्यानंतर पुढे ३-४ एक वर्षे पुण्यात कपनी च्या ऑफिस मधेच होतो. कामात तोच तोच पण येऊ लागला होता. मन काही तरी बदला ची मागणी करत होते आणि त्याच सुमारास माझा परदेश गमनाच्या योग आला. कामा निमित्त कंपनी ने परदेशी पाठवायचे ठरवले ..आणि..आम्ही पुन्हा एकदा ..आपली पुण्या नागरी सोडली..
ऐथे आल्यावर काही दिवस ..नवीन वातावरणाशी जुळून घेण्यात गेले. लवकरच.प्रत्यक्ष परीशितीशी सामना झाला..आम्ही कायम घरी राहत असल्यामुळे ..घरच्यांनी खूप लाडात वाढवलं..त्यमुळे कधी स्वपान्घरात जायचा प्रसंग खाण्या पलीकडे आला न्हवता. अहो मी कधी साधा एक कप चहा करून घाय्चों नाही,..न्हावे यायचा नाही, आपलं भूक लागेली कि सांगायचा अवकाश ....सगळा कस अगदी जागेवर मिळायचं..पण खरच..आणि ऐथे आल्यावर .भूक लागली कि ..आई कशी प्रेमाने ..तव्यावरची गरम गरम पोळी ताटात वाढायची, आईच्या हातची आपली आवडीची भाजी, माऊ शिरा, लुसलुशीत पुरण पोळी, चमचमीत पाव भाजी, सात्विक वरण भात आणि तूप... ..असे प्रसंग झ्र्रकन डोळ्या पुढून जात. काही ना करता आयते मिळाले कि तेंव्हा त्याची किंमंत कळत नाही, म्हणतात ना तेच खरे, ह्याची मला पहिल्या काही दिवसातच प्रकर्षाने जाणीव झाली. निघताना मी काही तरी तुडूक मुदुक स्वयंपाक करयचे नुस्के पाहून निघालो होतो...कणिक मळणे, दाल तांदुळाचा कूकर लावणे असली प्रत्याशिके झाली होती,.पण निघण्याच्या बाकी सगळ्या गडबडीत डोक्यात ते किती घुसले..ते परमेश्वरालाच ठावूक. नुसते..उ-TUBE पाहून ..किव्हा ..स्वयापाकावरील..पुस्तके, किव्हा संजीव कपूर चे कार्यक्रम पाहून स्वयंपाक येत काही, होत नाही. पाण्यात पडल्या शिवाय जसे पोहता येत नाही तसेच मी पण मुद्पक खाण्यात शिरून .. हळू हळू ..एक एक पदार्थ बनावयाचा प्रयत्न करू लागलो, शिकलो..आणि बनवू लागलो..पहिले काही प्रयोग भाज्या वर केले..( पता कोबी, घेवडा इ. इ. ) .बरोबर अनुभवी मित्र, फोने वरून आई, आणि नेट वरील माहिती ..यांच्या मदतीने ..स्वयंपाक शिकण्यास मदत झाली. आणि मी थोडा फार स्वयंपाक बनवू लागलो, अगदी..आमटी भात पोळी भाजी, असा चौव्रस... आपण काही नवीन वस्तू बनवतो , त्याची मजा, तो आनंद काही औरच असतो. आणि विशेषतः
स्वयंपाक हि अशी गोष्ट आहे ..कि जिथे आपल्या कष्टा नचे लगेच चीज होते आणि हो लेगेच ते चाखायला हि मिळते !
मनुष्य एकटे राहू लागला कि .अजून मला जाणवलेला एक बदल म्हणजे..आपण स्वावलंबी बनू लागतो....आपण जेंव्हा घरी असतो..तेंव्हा अनेक गोष्टींची आपल्याला पोच पण नसते ...पण घराबाहेर पडले..कि आपल्याला आपली स्वतःची सगळी सोय पहावी लागते....पुण्यात असताना..मी घरी संधाकली पोचल्यावर ..काय खावे ..ऐथून विचार सुरु करायचो..पण बाहेर असताना..सर्व गोष्टींचे नियोजन आधी पासून कार्याची सवय लालावे लागते..जर कुठली भाजी करायची असेल..तर त्या करिता लागणारे सामानाची व्यवस्था आधी पासून लावले लागते.. मी पूर्वी बरेचदा आमच्या कोपर्यावरच्या रस्त्यावरून वरून संधाकली उगाच फिरत असे..घरी आम्ही "सांगकामे" म्हणून प्रसिद्ध, 'बेकरी मधून ब्रेंड घेवून ये'..अशी आज्ञा मातोश्री कडून झाली ..कि आम्ही दुचाकी वरून शीळ घालत ..फक्त ब्रेंड आणणार,.बस काम संपले . त्याच्या शेजारीच भाजी वाल्या मावशी बसत, पण मला कधी..भाजी व्याल्या मावशीकडची भाजी ताजी दिसली नाही..कि घरी दुध संपले आहे कि नाही ह्याचा आम्ही कधी होशोब ठेवला नाही, पण ऐथे..मोठ्या माल मध्ये गेल्या वर ..बाजूची मुलगी जरी सुंदर दिसली..तरी ..आता आधी आम्ही..ताजी भाजी कुठली आहे..दुधाचे कॅन १ घ्यावा कि २. ह्या कडे लक्ष अधिक लक्ष दुउ लागलो. रूम वर कुठेले समान संपले आहे,.काय आणणे गरजेचे आहे..धुण्याचा साबण संपला आहे ..का?..या आठवड्यात कुठले कपडे इस्त्री करे लागणार आहे.,.या वेळेस कोणाचे पराठे खायला आणायचे, वीजबिल भरायची तारीख कधी, रूम ची सफाई कधी करायची, .अश्या सर्व गोष्टींची खबर कायम ठेउ लागलो . अश्या प्रसंगामधून घर सांभाळणे, त्याचे नियोजन, आणि व्यवस्थापन आपल्या घरात आपली आई बाबा घरात किती यथायोग्य करत असतात.ह्याचा साक्षात्कार होतो . मग आपणहि हळू हळू घरातील लागणाऱ्या सर्व बाबींचा, गोष्टीचा विचार करू लागतो, त्या प्रमाणे थोडे जवब्दारीने वागू लागतो ......आणि .....आपल्याला स्वतःलाच..थोडी समाज आल्यासारखे..वाटू लागते..त्याचे थोडे समाधान पण वाटते..पण या सगळ्या मागच्या मुल मुद्दा आहे..कि ..परीशितीशी जुळवून घेवून आपण स्वावलंबी होऊ लागतो,.योग्य आणि .आणि स्वताचे निर्णय स्वतः घेवू लागतो.. ..जरी काही प्रसंगी ते चुकले तरी त्यातून शिकण्यास मदतच होते..
अजून एक प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ,मनाचा आवाज ..आपण जेंव्हा आपल्या कुटुंब,..मित्र , आपल्या समाजात वावरत असतो....आपण एका कोशात गुंतातेलो असतो..एका दैनंदिन जीवनाचा पट्टा आपण चालवत असतो. मला अशी वाटते ..कि ..आपल्या मनात..खूप आत ..एक दडलेला आवाज असतो..पण दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये ..तो पुरा दडपला जातो..माझ्या मते आपले एक बाह्य मन असते..आणि एका अंतर मन असते ..बाह्य मन..कि ..ज्याच्यशी आपाला सतत सवांद चालू असतो....आणि जे अंतर्मन असते..जे सुप्त अवस्थेत असते. ह्या अन्न्तारिक मनात खूप प्रचंड ताकद असते..जर हे मन आपण जागृत करू शकलो..त्याचाशी सवांद साधू शकलो तर..भल्या भली मोठी कामे आपल्या कडून होऊ शकतात..कित्क्येक थोर माणसे हे सांगून गेली आहेत..कि मनाची अंतरी शक्ती खूप महत्वाची असते..आणि त्या जोरावर..आपण जग पादाक्रांत करू शकतो.....परंतु हे जे आंतरिक मन असते..ह्याच्या आपल्या धाक धाकीच्या जीवनात..सवांद साधायला सवड होत नाही...परंतु मला असे जाणवले कि जेंव्हा आपण असे दूर देशात आपण अपोक एकटे होऊन जातो...तेंव्हा .आपोआप ..आपले अंतरी मनाशी आपण सवांद साधू लागतो..ती उर्जा आपल्याला बल देते, मार्गदर्शन करते. कदाचीत..योग, कुंडलिनी..जप, तप, या सर्व साधने मध्ये ..मन एकाग्र..करून शांत करून, करतात ते हाच एकांत मिळवण्या साठी..कि ज्यात .न्हेवून..आपल्या आंतरिक मनाशी/शक्तीची ..सवांद साधण्याचा प्रयत्न केला जातो......एकटा राहिल्यामुळे मी ..अपसुख हा एकांत मिळायचा अनुभव मी घेतालाल आहे..मग अपोआप..जीवनाची कोडी आपोआप सुतू लागतात..आणि निखळ आनंद कशात हा केवळ बाहेरील जगात/ भौतिक सुखात नसून..तो आंतरिक मनाच्या समाधानावर आहे..हे पटू लागते.!
मी कधी जन्मात विचार केला न्हवता...कि मी घराबाहरे राहायला लयाला पासून काही महिनायचा आत छोले, मटार उसळ, शिरा, मिसळ,बिर्याणी , पोळ्या/पुरी ..आणि हो चहा .(जवळ पास अमृता तुल्य मध्ये मिलतो तसा ) बनवू शकेन..मला ऐथे माझे कौतुक करयचे नसून,.मला जाणवलेली गोष्ट म्हणजे....कि आपण नवीन नवीन गोष्टी .शोधाल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजे ,.आणि त्या प्रय त न पूर्वक आत्मसात करायची धड पण अंगी बाण वाली पाहिजे..आपल्या प्रय्तेकाच्या अंगी अनेक सुप्त गुण असतात.परंतु आपण आपण एकाला चलो रे मार्ग पकडून बसतो. तसे ना करिता नवीन नवीन गोष्ठी..करयचा पर्यंत करून ..आपल्याला त्या जमत आहे का.,..आपल्या ला त्यात रस आहे का ..हे पडताळून पहिले पाहिजे आणि ती गोष्टा आत्मसात करायची धडपड सतत ठेवली पाहिजे .
रोज रोज तेच नको रोज रोज तेच..डाव नको ऐका सोपा हवा थोडा पेच.!...
माणसाच्या आयुष्याला ..जीवन हि पाण्याची उपमा दिली आहे..पाणी एकाच ठिकाणेजमून राहिले तर .त्याचे गढूळ डबके होते..तसे होऊ ना देता पाण्याने ( पर्यायाने जीवनाने..) निखल झर्या सारखे सदैव वाहत राहावे...त्यातूनच आपल्यातला अजून काही "नवीन गुणाचा" आपल्याला "नवीन" शोध लागेल, नाही का?
प्रतिक्रिया
18 Jan 2010 - 10:37 am | चिऊ
विषय छान जमला आहे....मला आवडले..पण शुद्धलेखनाकडे अजुन थोडे लक्ष दे...
18 Jan 2010 - 10:40 am | आनंदयात्री
छान लिहलं आहेस रे मित्रा.
असहमत फक्त अमॄततुल्यशी .. चहा कसा चहा सारखा पाहिजे .. ते अमृततुल्यमधे काय गुळपाणी देतात तेच कळत नाही.
18 Jan 2010 - 12:24 pm | ज्ञानेश...
छान लिखाण आहे.
आवडले, आणि पटले सुद्धा.
सुधारणा: अशुद्धलेखन/टिंबांचा अतिरेक टाळावे.
18 Jan 2010 - 12:38 pm | II विकास II
मिसळपाववर शुध्दलेखन चिकित्सक नाही.
त्यामुळे शुध्दलेखन चिकित्सा कशी करता येईल.
20 Jan 2010 - 12:04 pm | बिपिन कार्यकर्ते
श्री. || विकास ||
मला तुमचा प्रतिसाद व्यक्तिशः खटकला आहे. मूळ लेखावर काहीच टिप्पणी न करता केवळ शुद्धलेखनाकडे रोख ठेवणे या मुळे हा प्रतिसाद अवांतर ठरतोय हे पण आहेच. नवीन सदस्याने इतके चांगले लिहिले असताना त्यावर काहीच भाष्य न करणे हे बरोबर नाही. असो.
बिपिन कार्यकर्ते
18 Jan 2010 - 4:53 pm | स्वाती२
छान लिहिलय. सरावाने शुद्धलेखनही जमेल. लिहित रहा.
18 Jan 2010 - 7:43 pm | अनिल हटेला
बाजूची मुलगी जरी सुंदर दिसली..तरी ..आता आधी आम्ही..ताजी भाजी कुठली आहे..दुधाचे कॅन १ घ्यावा कि २. ह्या कडे लक्ष अधिक लक्ष दुउ लागलो. रूम वर कुठेले समान संपले आहे,.काय आणणे गरजेचे आहे..धुण्याचा साबण संपला आहे ..का?..या आठवड्यात कुठले कपडे इस्त्री करे लागणार आहे.,.या वेळेस कोणाचे पराठे खायला आणायचे, वीजबिल भरायची तारीख कधी, रूम ची सफाई कधी करायची, .अश्या सर्व गोष्टींची खबर कायम ठेउ लागलो .
--->अगदी शब्दशः खरये भाउ...
(सुधारीत आवॄत्ती);-)
बैलोबा चायनीजकर !!!
© 2006-2010. All rights reserved.
18 Jan 2010 - 9:37 pm | चतुरंग
अतिशय प्रांजळ लिखाण. (बाजूची मुलगी जरी सुंदर दिसली..तरी ..आता आधी आम्ही..ताजी भाजी कुठली आहे..दुधाचे कॅन १ घ्यावा कि २. ह्या कडे लक्ष अधिक लक्ष दुउ लागलो. हे तर एकदम तुझे अनुभवाचे बोल दिसताहेत! ;))
आपल्याकडे मुलांना बर्याच प्रमाणात ऐदी बनवून ठेवले जाते असे मला वाटते. म्हणजे कोणी जाणूनबुजून करते आहे असे म्हणण्यापेक्षा आपल्याकडची व्यवस्था तशी आहे. इतकी वर्षे चालून गेले पण आता मात्र बदलायला हवे मुलांनी. इथून पुढे बदलत्या गरजा, नोकरीनिमित्त दूरच्या गावी, परदेशात जावे लागणे नवे नाही, त्याची पूर्वतयारी ही व्हायलाच हवी. फक्त नोकरी कामधंदा म्हणजेच सर्व नाही. घरातल्या कामांना तुमचा यथायोग्य हातभार हा लागलाच पाहिजे.
मुलींना जसे स्वयंपाकघरात शिकवले जाते तसेच मुलांनाही स्वयंपाक शिकवायला हवा. वेगवेगळ्या भाज्या, डाळी ह्यांचे पदार्थ यायला हवेत.
स्वयंपाकाचा आनंद काही वेगळाच असतो कारण ती निर्मिती असते.
(छोटा बल्लव)चतुरंग
18 Jan 2010 - 11:08 pm | विकास
खर्या अर्थाने "जनातले-मनातले" असलेला हा लेखनप्रपंच आवडला.
यावरून मला उपनिषदांमधील एक गोष्ट आठवली. आत्ता संदर्भ आठवत नसल्याने नाव-गाव डिटेल्स सांगत नाही. गोष्ट कदाचीत थोडीफार वेगळी असलेही, पण त्यातील तात्पर्य लक्षात घेण्याजोगा आहे:
एक मुलगा एका गुरूतुल्य ऋषीकडे जातो आणि जीवनाचे ज्ञान मिळवण्याची आपली इच्छा बोलून दाखवत तसे ते द्यावे म्हणून विनंती करतो. ऋषीमहाराज आनंदाने तयार होतात फक्त एकच अट घालतात की त्या आधी त्यामुलाने १० गायींना घेऊन रानात जावे आणि त्याच्या १०० गायी झाल्यावर परत यावे... मुलगा पण आनंदाने तयार होतो आणि गायींना रानात घेऊन जातो. काही वर्षांनी १०० गायी घेऊन परत जेंव्हा गुरूकडे येतो, तेंव्हा गुरू म्हणतो की तुझ्या तोंडावरचे तेजच सांगत आहे की तुला जीवानाचे ज्ञान मिळाले म्हणून..
असो. तुमचे हे येथील पहीलेच लेखन दिसत आहे तेंव्हा, पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
20 Jan 2010 - 7:26 am | विजुभाऊ
काही वर्षांनी १०० गायी घेऊन परत जेंव्हा गुरूकडे येतो, तेंव्हा गुरू म्हणतो की तुझ्या तोंडावरचे तेजच सांगत आहे की तुला जीवानाचे ज्ञान मिळाले म्हणून..
ही कथा बहुधा कठोपनिषदात आहे.
त्या काळी गायी हे धन असायचे. पण ते उदाहरण अगदीच कालबाह्य आहे. गायी पाळूनच जर ज्ञान मिळाले असते तर गुरु कडे जायचेच कशाला?
ज्ञान म्हणजे नक्की काय? जॅक ऑफ ऑल ट्रेड्स.... की एखाद्याच विषयात पारंगत असणे आणि इतर विषयात भोपळा असणे?
20 Jan 2010 - 9:17 am | विकास
गोष्टीमधले तात्पर्य लक्षात घेयचे असते. तशीच्या तशी घेयला मी काही गायी चरायला नेत अथवा हाकत बसलेलो नाही की येथे कुणाला तसा उपदेश करत नाही.
हे म्हणजे, "गांधीजींना राष्ट्रपिता म्हणतो म्हणून आपण पंचा का गुंडाळत नाही" असे विचारण्यातला अथवा "शिवरायाचे आठवावे रुप, शिवरायाचा आठवावा प्रताप" असे म्हणता क्षणी, दाढी वाढवून घोडदौड करा असे सांगितल्यासारखेच झाले.
असो, कुणाला तितकाच अर्थ लागत असेल तर इतरत्र संदर्भवीना निष्कर्ष कसे काढू शकता येते, हे समजते. तेंव्हा चालूंदेत...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
20 Jan 2010 - 12:08 pm | बिपिन कार्यकर्ते
विकासशी शब्दशः सहमत.
हे म्हणजे असे झाले... माझ्या लहान मुलीला मी सिंहाची आणि उंदराची गोष्ट सांगताना, 'एकदा सिंह म्हणाला...' अशी सुरूवात केली की... तिने म्हणावं... 'हॅट्ट्ट... सिंह कधी बोलतो का?'
अहो, भावार्थ घ्या हो. बाकीचे जाऊ दे.
बिपिन कार्यकर्ते
20 Jan 2010 - 5:45 pm | चतुरंग
तो मायक्रोसॉफ्टचा जगप्रसिद्ध जोक आहे तसं झालं...
(जोक कोणता हे जाणून घ्यायचे असेल तर खरड करा ;) )
(विष्णूचे संपूर्ण नाव विचारणारा)चतुरंग
19 Jan 2010 - 6:52 am | सहज
आवडले.
पु. ले. शु.
19 Jan 2010 - 9:19 am | चित्रा
छान लिहीले आहे.
असेच अनुभव येत असतात, घरातून, गल्लीतून, देशातून बाहेर पडल्यावर.
मिपावर शुद्धलेखनाला ** वर मारलेले आहे त्यामुळे जास्त सुचवण्या करीत नाही, पण लेखन थोडे तपासावे हा सल्ला. म्हणजे मग काही टाळण्यासारख्या चुका तरी टाळता येतात, आणि महत्त्वाच्या विषयांमध्ये एखाद्या शब्दाने शोध देताना तो घ्यायला सोपे जाते. आणि सुरूवातीला चुका होतात, पण त्या सवयीने टाळता येऊ शकतात. तेव्हा इथे नेहमी लिहीत जावे!
पुढील लेखनास शुभेच्छा, आणि मिपावर स्वागत.
19 Jan 2010 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनातल्या विचारांचे चित्र मस्तच उतरले आहे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा....!
-दिलीप बिरुटे
19 Jan 2010 - 9:50 pm | प्राजु
खूप मनापासून लिहिलेले आहेस.
आवडले.
असेच लिहित रहा.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
20 Jan 2010 - 7:29 am | विजुभाऊ
आनन्दयात्रीशी सहमत.

गटणेशी अर्र सॉरी ||विकास|| यांच्याशी असहमत. इथे शुद्धीचिकित्सक कशाला हवाय. लिहिणार्याने लिहीत जावे.
20 Jan 2010 - 9:14 am | प्रकाश घाटपांडे
व्याकरणातल्या अथवा टंकनातील चुकांमुळे आशय/अर्थहानी होणार नाही इतपत दक्षता घेतली तरी बास आहे. बाकी मिपावर शुद्धलेखन फाट्यावर मारले जाते हे जालश्रुत आहेच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
20 Jan 2010 - 9:25 am | jaypal
गानुजी प्रकटन आवडल.

पु.ले.शु.
बाकी सुधलेखन म्हनाल तर ते आमच बी लै कच्च हाय. लै काळजी कराची न्हाय.
आपन आपल लिवत -हाच बघा.
लब्जों को छोड दो , मतलब समज लो
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
20 Jan 2010 - 9:39 am | चिऊ
कमाल केलीस्.....पहिलाच लेख इतका मस्त लिहिला आहेस. आता पुढच्या लेखाची वाट पहात आहोत
20 Jan 2010 - 11:54 am | बिपिन कार्यकर्ते
मिष्टर गानु... छानच लिहिलंय. पहिलाच प्रयत्न आहे म्हणताय, पण त्या मानाने एकदम ए-वन लिहिलंय की हो!!! तुम्हाला लिहिता येतंय हे जाणवतंय. भाषा छान आणि प्रवाही आहे. कुठेही अडखळलो नाही वाचताना. हां.. थोडेसे शुद्धलेखनाकडे लक्ष द्या, फार अवघड नाही हो.
हे वाचताना मला माझे खोबारचे सुरूवातीचे दिवस आठवले. आयुष्यात पहिल्यांदा एक महिन्यापेक्षा जास्त घराबाहेर राहिलो होतो. स्वतःचे घर केले, ते चालवले, कुटुंबप्रमुख म्हणजे काय ते कळले... थोडक्यात काय तर... खोबारला मी मोठा झालो. तसेच तुम्ही आत्ता होताय. आणि ते छान शेअर केले आमच्याबरोबर.
अजून बरेच लिहा, वाचायला उत्सुक आहोत.
बिपिन कार्यकर्ते
20 Jan 2010 - 12:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चतुरंग, विकास, चित्राताई, बिपिनचे प्रतिसाद आवडले. तुमचं मनमोकळं प्रकटन आवडलं, अगदी समोर बसून गप्पा मारल्यासारखंच.
थोड्याफार प्रमाणात माझ्या बाबतीत हेच झालं, फक्त घरातच राहून!
अलिकडेच एका माझ्यापेक्षा लहान विद्यार्थ्याला सांगत होते, "संधी मिळाली तर नक्की घराबाहेर जा. कागदी पदवी मिळतेच, पण फुकटात बरंच जास्त शिकण्याची संधी सोडू नकोस."
शुद्धलेखनाचा फार बाऊ नकोच, पण थोड्या सवयीने "शुद्ध" लिहिता येईल. लिहीते रहा.
अदिती
31 Jan 2010 - 7:42 am | शुचि
खूप छान अनुभव कथन आहे हे. आणि हे पहिलच आहे तरी इतकं छान आहे.
>> एकटा राहिल्यामुळे मी ..अपसुख हा एकांत मिळायचा अनुभव मी घेतालाल आहे>>
ज्याला पर्सनल स्पेस म्हणतात ती बाहेर (कुटुम्बापासून दूर) गेल्यावर मिळते हे खरं आहे.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
31 Jan 2010 - 1:02 pm | स्वाती दिनेश
प्रांजळ लेखन आवडले,
स्वाती