खांब-२

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
15 Dec 2009 - 9:56 am

"Are you going to psyche me"? If it is so, you will be fourth.

अशीच एक शाळा. असाच एक कार्यक्रम.
कार्यक्रम झाल्यावर मुख्याध्यापिका जरा भावुक झाल्या सारख्या वाटल्या.
अजुनही जाणिवा बोथट न झालेल्या. शिक्षक पिढी घडवतो या गैरसमजात वावरणार्‍या.
"सर , पालकांसाठी पण एक कार्यक्रम कराल. आजकाल पालक होणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे"
तसे शिक्षक होणे सुद्धा.
"हो तेही बरोबर आहे म्हणा. जमत नसेल तर पेशा सोडायचा चॉइस असतो. पालकत्व सोडता येत नाही"
हम्म.
"तुम्हाला थोडा वेळ आहे का"? जरा एक कॉम्प्लिकेटेड केस आहे. बघा तुम्हाला काय करता येते का"?
ऑफिस मधे पोचल्यावर थोड्या वेळात एक आजी, आजोबा आणि आई आले.
आई ४० शी ची.
त्यांच्या मुख्याधिपकेबरोबरच्या चर्चेत साधारण स्वरुप लक्षात आले.
थोड्या वेळाने मुलगी आली.
ती शाळेच्या युनिफॉर्म मधे नव्हती.
शाळेत येणे अगदी अनियमित.
दहावीत असलेल्या ह्या मुलीचा चेहेरा वयापेक्षा खुपच प्रगल्भ.
३ वर्षापुर्वी टी.आर्.पी मधे आघाडीवर असलेल्या एक सिरियलची नायिका.
डान्स कॉपिटीशन मधुन निवडली गेलेली.
चंदेरी दुनियेत मिळणार्‍या उदो उदो नंतर अचानक पोकळी.
सहा महिन्यापुर्वी बिझिनेस मॅनेजर कम सेक्रेटरी कम ड्रायवर कम वडील निर्वतलेले.
अ‍ॅपियरन्स मनी, उदघाटने, जाहीराती , सिनेमातला एक छोटाश्या रोलमधे खुप पैसा मिळाला होता.
त्यातला अर्धा वडीलांनी आपल्या चैनीकरता उडवलेला.
आईने वेळीच एक फ्लॅट व गुंतवणुक केली नसती तर काहीच शिल्लक राहीले नसते एवढी मुजोरी वडीलांनी दोन वर्षात केली होती.
रोज सकाळी १००० रुपयाची मागणी.
नाही दिला तर तारस्वरातील भांडणे, आईबरोबर मारामारी, वस्तु फोडण्याच्या तमाशा.
आजी आजोबाशी उभे वैर.
नातीच्या शिव्या आणि पदोपदी अपमान ह्या वयात त्या म्हातारा म्हातारीच्या नशिबात आलेला होता.
सकाळी आठ वाजता पैसे घेउन निघायची रात्री किती वाजता परत येईल ह्याचा नेम नाही.
बरोबर सिरियलमधे नाते निर्माण झालेला समदु:खी मित्र.
सर्व उपाय थकले होते.

डोळ्यात कुठलीही भिती न बाळगता तो प्रश्न तीने विचारला.
चँपियन बरोबर गाठ होती. निट विचार केला आणि प्रतिप्रश्न केला.
तु दहावी पुर्ण करणार आहेस का?
"हो"
शाळेत न येता?
"मला एक महीना पुरे आहे.
पण शाळेत न येता तुझा फॉर्म कसा भरला जाईल.
"भरला जाईल. मी शाळेला किती तर बक्षिसे मिळवुन दिली आहेत"
तुला १०वी नंतर काय करायचे आहे?
"आर्टस"
गुड. कुठे?
तीने मुंबईमधील एका प्रतिथयश कॉलेज चे नाव सांगितले.
तिथे मागच्या वर्षीचा कटऑफ ८०% होता. एवढे % मॅनेज होतील का? त्या कॉलेजम्धे तुझ्या सर्व कलागुणांना (?)संपुर्ण वाव मिळेल.
मुलगी गोधळली.
एक काम कर. आजपासुन रोज शाळेत ये. निट अभ्यास कर. कसा करायचा ते मी सांगतो. ८०% मिळव. तु मोकळी. हे तिघेही मोकळे.
" मी वर्गात काय एकटीच नाही. माझ्या सारख्या विचारसरणी च्या ४मुली आणि २ मुलगे आहेत"
पण ते शाळेत येत आहेत. तु मुक्त जगते आहेस.
"पण मी माझ्या पैशाने मला हवे तसे जगते आहे. त्यावर कुणाचा काहीही हक्क नाही."
कबुल आहे. तुला आजी आजोबा आवडत नाही. आईचे तोंड बघावेसे वाटत नाही.एक घरात राहून रोज एकमेकांना त्रास देण्यापेक्षा आपण एक करार करु. सर्वांचा त्रास वाचेल. तु रोज शाळेत ये. अभ्यास कर. मार्च पर्यंत तुला खर्चाला एक ठराविक रक्कम घे. हजार नाही हां
मित्राला म्हणावे, आता परिक्षा झाल्यावरच भेटु. मार्चनंतर परत काम शोधायला सुरु कर. एकदा का तु कॉलेज मधे जायला लागलीस की तुझे पैसे तुझ्या हवाली. तुला हवे असेल तर घरी राहा. स्वतंत्र राहयचे असेल तर तुझ्या फ्लॅट मधे जा. मार्च नंतर तुझी मुखत्यार तु. ह्या सर्व मंडळीचे तुझ्यावर आजही तितकेच प्रेम आहे. तुझ्या गरजेला केंव्हाही हाक मार. हजर राहतील. तुझ्याकडुन मात्र काहीही अपेक्षा नाही. एक विचार कर मात्र. वडीलांनी केलेल्या चुकीला ह्याना का जबाबदार धरतेस?
"त्याचे नाव काढु नका. नराधम होता तो. माझ्या पैशावर बाया नाचवल्या त्याने. आईला वेळीच सांगितले होते मी. प्रोड्युसर पुढे पण ढकलले होते मला त्या हलकटाने. मेला लवकर - सुटले मी"
ओके. तो भुतकाळ होता. आई काही करु शकली नाही. आता झालेली शिक्षा पुरे की. आता माफ कर तीला. ३ महीन्यापुर्वी तुझ्या गर्भपाताच्या वेळी ती नसती तर तु वाचली असतीस का? आता या सुडकधेला विराम देउ. नव्याने सुरु करु. तुझ्या स्वातंत्र्याच्या कल्पनेला कुणाचाही विरोध नाही. पण तो अनिर्बंध नसावा अशी अपेक्षा बाळगणे हे चूक आहे का? तु सज्ञान झालीच की तुला हवे ते कर. तुझ्यावर पालकत्व लादले जाणार नाही. आणि हे पालकत्व तुझ्याकडुन कसलीही अपेक्षा न बाळगता तुझ्या गरजेला उभे राहील. त्यानी आपण पालक असल्याचा खांब आजपासुन सोडला आहे.चालतय का?
प्रथमच मुलीच्या चेहेर्‍यावर प्रसन्न हास्य दिसले.
जाता जाता: हस्तांदोलन करता करता म्हातारा गहिवरला. I OWE you. I am going to write about this on... site. त्याने साइट च नाव सांगितले. मी थक्क.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

15 Dec 2009 - 10:12 am | दशानन

श्री विनायक प्रभू -जी,

एक चुक झाली आहे वरती शिर्षकामध्ये.
खांब असावे ते खाब नसावे.

बाकी,

तुमचा लेख नेहमी प्रमाणेच उच्च आहे.
विचार करण्यासाठी उद्युत करतो आहे हा लेख.
सध्या मी एक पुस्तक वाचत आहे ते संपले की ह्या विषयाकडे वळतो.

असो,

एवढा चांगला लेख लिहल्या बद्दल अभिनंदन.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

अवलिया's picture

15 Dec 2009 - 11:29 am | अवलिया

श्री रा रा विनायकजी प्रभुजीसाहेब,

समाजातील अनेक समस्यांच्या मुळाशी जावुन त्या समस्यांचे निराकरण करण्याची आपली तळमळ अतिशय वाखाणण्याजोगी आहे. आपल्या तळमळीतला एक शतांश हिस्सा जरी आमच्या जीवनात आला तरी आम्ही आमच्या कामात लक्ष पटीने सुधारणा करुन आणु असे आमचे मत आहे.

आपले लेखन हे नेहमीच समाजातील दुर्लक्षित अथवा त्याज्य दुखण्यांकडे निर्भीड बोट दाखवुन "हे असे आहे ! तुम्हाला मान्य करावेच लागेल " अशा धर्तीचे असते. त्यामुळे आमच्यासारख्या कित्येक केवळ घर आणि घराभोवतीचे अंगण यात बंद असलेल्या, समाजात काय चालु आहे हे माहित नसलेल्या लोकांना कडु औषधाचा घोट वाटते.

मानवी समाज आज पुढारलेला आहे असे आपण कितीही म्हटले तरी अजुनही माणसाला खुप दूरचा पल्ला गाठायचा आहे हे आपल्या लेखनावरुन समजुन येते. नागरी वस्ती, सुसंस्कृतपणा वगैरे केवळ बुरखे असुन वेळ येताच ते टराटरा फाडले जावुन मानवात लपलेल्या हिंस्त्र, क्रुर तसेच स्वार्थी प्रवृत्ती डोके वर काढतात हे आपल्यासारख्या समाजसेवकाला नव्याने सांगायला नको. परंतु असे असले तरी ज्याप्रमाणे आडदांड वारेमाप पसरलेल्या जंगलामधे हिंस्र श्वापदांच्या बरोबरच कोमल मनाचे प्राणी सुद्धा वास करुन असतात. ते जंगलाचा हिस्सा असतात. जंगलामधे त्यांचे सुद्धा वास्तव्य असते. जंगलाच्या सुखदुःखात त्यांचा हात भार असतोच असतो.

परंतु आपल्या लेखनातुन केवळ तिटकारा आणणा-या, उबग आणणा-याच गोष्टी सतत समोर येत असतात. कदाचित आयुष्यात चांगल्या गोष्टी आपल्याला दिसल्याच नसतील असे काही क्षण समजुन चाललो तरी त्याच त्याच गोष्टी ज्या पद्धतीने आपण समोर मांडत असता ती बाब मनात अनेक आवर्तने निर्माण करते.

तुम्हाला जर वयात आलेली तुमच्या रक्ताची मुलगी असती , आणि ती तुमचे लेख अथवा प्रतिसाद वाचत आहे असे माहित असते तर तुमची भाषा कशी असती याचा मी नेहमी विचार करतो. उत्तर अर्थात मिळत नाही हा भाग वेगळा.

बाकी लेखाला उत्तम म्हणणे गरजेचे आहे कारण मिपावर तसा रिवाज आहे.

धन्यवाद !

--अवलिया

विनायक प्रभू's picture

15 Dec 2009 - 1:09 pm | विनायक प्रभू

तिटकारा, उबग आणणार्‍या गोष्टी मी सतत लिहीतो असे मला नाही वाटत.
मला वयातली मुलगी असती तरी मी हा लेख काही वेगळा लिहीला नसता.
मी माझ्या लेखाला उत्तम म्हणण्यासाठी लिहीत नाही.

अवलिया's picture

15 Dec 2009 - 1:15 pm | अवलिया

श्री रा रा विनायकजी प्रभुजीसाहेब

आपल्या तत्पर उत्तराबद्दल धन्यवाद.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !

--अवलिया

टारझन's picture

15 Dec 2009 - 12:47 pm | टारझन

What is expected out of this ?

let it be , will change it

- Tarzan

परिकथेतील राजकुमार's picture

15 Dec 2009 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार

©º°¨¨°º© परापाल ©º°¨¨°º©
आमचे राज्य

jaypal's picture

15 Dec 2009 - 7:51 pm | jaypal


©º°¨¨°º© जयपरापाल ©º°¨¨°º©
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

स्वाती२'s picture

15 Dec 2009 - 6:18 pm | स्वाती२

चंदेरी दुनियेतील कलाकारांना 'आपल्या'च माणसांनी लुटायचे हे काही नवीन नाही. त्यातुन बालकलाकार असाल तर ....
नशीब पोरीच्या घरातले बाकी सगळे तिच्यावर प्रेम करतायत. पण अशा प्रसंगी नुसते प्रेम पुरत नाही. या सगळ्यातून खरोखर बाहेर पडायला पोरीला long term therapy लागणार. :(

रेवती's picture

15 Dec 2009 - 7:21 pm | रेवती

तिला चांगल्या प्रकारे समजावलत. या वयात फार रागावूनही उपयोग नसावा असं वाटत.
नेहमीप्रमाणे चांगले लेखन्.....विचार करायला लावणारे.

रेवती

सहज's picture

15 Dec 2009 - 8:09 pm | सहज

>नेहमीप्रमाणे चांगले लेखन्.....विचार करायला लावणारे.

हेच म्हणतो.

चतुरंग's picture

15 Dec 2009 - 8:26 pm | चतुरंग

पुढे गेलेली गाडी ही दामटून रिवर्स न घेता हळूहळू पुढे नेऊन कुठल्या तरी जंक्शनला मुख्य मार्गावर आणून मिळवायचे तुमचे कौशल्य वादातीत! अडनिड्या वयातल्या मुलामुलींबरोबरोबरचा संवाद कुठल्याक्षणी सवाल-जवाब आणि लगेच वादावादीचे रुप घेईल हे सांगता येत नाही. फार काळजीपूर्वक हँडल करावे लागते.

बापाकडून मुलीचे शोषण ही व्यथा वेगवेगळ्या स्तरांवर दिसते.

(माझी आई बीएड करत असताना तिच्याबरोबर एक मुस्लिम समाजातली मुलगी होती एमेस्सी फिजिक्स डिस्टिंक्शन, बीएड झाल्यावर चांगल्या शाळेत रुजू झाली. उत्तम पगार, शिवाय फिजिक्सच्या शिकवण्या घेई त्यामुळे पैसा भरपूर मिळे. वडील रिटायर, धाकटा भाऊ दिवसभर पानाच्या पिंका टाकत गावात हिंडे. सगळे घर हिच्याच पैशावर मजा मारीत होते. लग्न जमवायचे नाटक करुन वडील किंवा भाऊ स्वतःच हळूच जाऊन लग्न मोडून यायचे! हे तिला समजल्यावर आश्चर्याने थक्क झाली. माझ्या आई-बाबांकडे येऊन सल्ला विचारला. तुझे लग्न तू स्वतः जमव आम्ही पाहिजे ती मदत करु नाहीतर ह्या नरकात तुझे चिपाड करुन टाकतील हे सांगितल्यावर तिने चांगला नोकरदार मुलगा बघून झटपट लग्न जमवून करुन टाकले. आज चांगल्या संसारात सुखी आहे!)
चतुरंग