स्टार माझा तर्फे आयोजित केलेल्या "ब्लॉग माझा" स्पर्धेत पारितोषिके मिळवणारे मिपाकर

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
20 Nov 2009 - 6:33 am

स्टार माझा तर्फे आयोजित केलेल्या "ब्लॉग माझा" स्पर्धेत पारितोषिके मिळवणारे मिपाकरः

[सुरुवातीला मला फक्त डॉन बद्दल कळाले होते व त्याप्रमाणे मी येथे धागा दिला होता. म्हणून सुरुवातीचे काही प्रतिसाद डॉनचे अभिनंदन करतांना दिसत आहेत. नंतर देवकाकांनी कळवल्याप्रमाणे इतर्ही मिपाकरांना हे पारितोषिक मिळाल्याचे कळाले. त्यानुसार मी हा धागा संपादीत केला आहे]

नीरजा पटवर्धन(नीधप) ह्यांचा दुसरा क्रमांक आलाय.

छोटा डॉन, देवदत्त, राजे, आणि आनंदघन ह्यांना स्पर्धेत विषेश पारितोषिक मिळालंय.

ह्या सर्वांचे सहर्ष अभिनंदन!

संस्कृतीअभिनंदन

प्रतिक्रिया

सुहास's picture

20 Nov 2009 - 6:43 am | सुहास

अभिनंदन डॉनराव.. :)

--सुहास

विशाल कुलकर्णी's picture

20 Nov 2009 - 12:55 pm | विशाल कुलकर्णी

सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मितभाषी's picture

22 Apr 2010 - 12:36 pm | मितभाषी

सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

भावश्या.

सहज's picture

20 Nov 2009 - 7:00 am | सहज

छोटा डॉन हे आमचे आवडते युवा विचारवंत!!

शाब्बास!

Nile's picture

20 Nov 2009 - 7:04 am | Nile

वा वा! डॉन्रावांची 'टेरीटोरी' वाढलेली पाहुन लै भारी वाटलं! अभिनंदन!

हफ्ता पाठवुन देतो! ;)

स्वप्निल..'s picture

20 Nov 2009 - 7:06 am | स्वप्निल..

असेच म्हणतो!!

अभिनंदन!!

सुनील's picture

20 Nov 2009 - 7:26 am | सुनील

अभिनंदन डान्राव!! आता सवडीने ब्लॉग वाचून काढायला हवा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

20 Nov 2009 - 9:23 am | सुनील

नीधप, देवदत्त, राजे आणि आनंदघन यांचेही अभिनंदन!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन's picture

20 Nov 2009 - 7:31 am | नंदन

उत्तम बातमी! हार्दिक अभिनंदन, डॉनराव!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2009 - 9:31 am | बिपिन कार्यकर्ते

खूप आनंद झाला!!!!!!

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Nov 2009 - 12:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नीरजाचं दुसर्‍या क्रमांकाबद्दल मनापासून अभिनंदन! शिवाय आमचे रा.को. डान्राव, आनंदघन, देवदत्त आणि राजेचंही!

चला कार्यकर्ते, डान्रावांच्या अभिनंदनाचे बोर्ड गल्लोगल्ली लावले पाहिजेत! कृ.उ.बा.स.च्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत.

अदिती

मिसळभोक्ता's picture

20 Nov 2009 - 11:17 pm | मिसळभोक्ता

असेच म्हणतो.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

निमीत्त मात्र's picture

21 Nov 2009 - 4:01 am | निमीत्त मात्र

:O

आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.??

चित्रा's picture

21 Nov 2009 - 12:23 am | चित्रा

असेच म्हणते. खूपच छान झाले!

निमीत्त मात्र's picture

21 Nov 2009 - 4:03 am | निमीत्त मात्र

नीरजा ताईंचे हार्दिक अभिनंदन! ह्यावेळेस उत्तेजनार्थ न घेता दुसरा क्रमांक काढून टीकाकारांना चोख उत्तर दिलेले आहे. पुढच्या वेळेस पहिला नंबर!!

मेघना भुस्कुटे's picture

20 Nov 2009 - 5:15 pm | मेघना भुस्कुटे

सर्व पारितोषिक विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
विशेष डॉन्याचे! डॉन्या - पार्टी........ :)

धनंजय's picture

20 Nov 2009 - 11:52 pm | धनंजय

सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

घाटावरचे भट's picture

20 Nov 2009 - 7:36 am | घाटावरचे भट

वा वा वा!! हार्दिक अभिनंदन डॉन्राव!!

- भटोबा

प्रमोद देव's picture

20 Nov 2009 - 7:46 am | प्रमोद देव

डॉन्रावांचे सहर्ष अभिनंदन.
ह्याच स्पर्धेत नीरजा पटवर्धन(नीधप) ह्यांचा दुसरा क्रमांक आलाय. त्यांचेही सहर्ष अभिनंदन.
तसेच देवदत्त,राजे,आणि आनंदघन ह्या मिपासदस्यांनीही ह्या स्पर्धेत यश मिळवलंय. ह्या तिघांचेही सहर्ष अभिनंदन.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

सहज's picture

20 Nov 2009 - 7:47 am | सहज

सर्व यशस्वी मिपाकरांचे अभिनंदन!

Nile's picture

20 Nov 2009 - 7:50 am | Nile

हेच म्हणतो!

असे यशस्वी ब्लॉगर्स असल्यावर मराठीची चिंता कोण करतो?

सुबक ठेंगणी's picture

20 Nov 2009 - 8:17 am | सुबक ठेंगणी

ह्या सगळ्यांबरोबर देवकाकांचंही नाव आहे. तेव्हा ह्या सगळ्यांचे हार्दीक अभिनंदन. आणि अशाच बहारदार लेखनासाठी शुभेच्छा! :)

अवलिया's picture

20 Nov 2009 - 9:25 am | अवलिया

हेच म्हणतो.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

प्रभो's picture

20 Nov 2009 - 9:27 am | प्रभो

नीधप,डॉन्या, देवदत्त, राजे, आणि आनंदघन मस्तच रे...अभिनंदन.... :)

पार्टी कधी????
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

sujay's picture

20 Nov 2009 - 8:25 am | sujay

स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व मिपाकरांचे अभिनंदन!!!

Cheers !!!

सुजय

नीधप's picture

20 Nov 2009 - 8:39 am | नीधप

बाकी सगळ्यांचे अभिनंदन.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सर्व यशस्वी मिपाकरांचे अभिनंदन!

at and post : Xanadu.

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 Nov 2009 - 8:10 pm | अक्षय पुर्णपात्रे

सर्व यशस्वी मिपाकरांचे अभिनंदन!

_______________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

सर्व यशस्वी मिपाकरांचे अभिनंदन!

अमोल केळकर's picture

20 Nov 2009 - 9:04 am | अमोल केळकर

सर्वांचे मनापासून अभिनंदन

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दशानन's picture

20 Nov 2009 - 9:08 am | दशानन

नीरजा पटवर्धन(नीधप) ,छोटा डॉन, देवदत्त, आणि आनंदघन ह्यांचे अभिनंदन.

*
वरील मोठ्या नावांमध्ये माझे छोटे नाव बघून अमंळ करमणूक झाली, माझ्या ब्लॉगची दखल घ्यावी असे काहीच मी उच्चभ्रु लिहीत नाही पण स्टार माझा च्या ग्रूपला माझा ब्लॉग देखील आवडला ह्यामुळे मी गदगद आहे, स्टार माझा चे आभार. काही मित्रांच्यामुळे मी ब्लॉग लिहता झालो त्यांचे अनेकानेक आभार ;)

* ज्यांना पार्टी देणे आहे त्यांनी व ज्यांना घेणे आहे त्यांनी मला आज व उद्या संपर्क करावा मुंबई मध्ये असेन :D

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Nov 2009 - 9:17 am | llपुण्याचे पेशवेll

पुण्याला येऊन पार्टी देणे अन्यथा परत आपण पुण्यात राहणार आहात व ते डॉन आमचे मित्र आहेत ह्याची जाण ठेवणे. ;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

निखिल देशपांडे's picture

20 Nov 2009 - 9:36 am | निखिल देशपांडे

ब्लॉग स्पर्धत पारितोषीक मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन
राजे या मुंबईत तुमच्या कडुन पार्टी घ्यायचीच आहे
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

20 Nov 2009 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार

सर्व यशस्वी मिपाकरांचे अभिनंदन!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Nov 2009 - 9:23 am | llपुण्याचे पेशवेll

श्री. अजय भागवत, आपण सर्व विजेत्यांच्या ब्लॉगचे दुवे दिले असते तर फार बरे झाले असते. असो. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
आत्ता फक्त नीधप यांचा ब्लॉग पाहू शकलो कारण त्याचा दुवा त्यांच्या सहीत आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

अविनाशकुलकर्णी's picture

20 Nov 2009 - 9:26 am | अविनाशकुलकर्णी

अभिनंदन <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P

अजय भागवत's picture

20 Nov 2009 - 9:27 am | अजय भागवत

१. Aniket Samudra
http://manatale.wordpress.com

२. Neeraja Patwardhan http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

३. Dipak Shinde
http://bhunga.blogspot.com

विषेश पारितोषिके:

Hariprasad Bhalerao
www.chhota-don.blogspot.com

Devdatta Ganar
http://maajhianudini.blogspot.com/

Medha Sakpal
www.medhasakpal.wordpress.com

Salil Chaudhary
www.netbhet.com

Pramod Dev
http://purvaanubhava.blogspot.com/

Raj Kumar Jain
http://rajkiranjain.blogspot.com

Minanath Dhaske
http://minanath.blogspot.com

Vijaysinh Holam
http://policenama.blogspot.com

deepak kulkarni
http://aschkaahitri.blogspot.com/

Anand Ghare
http://anandghan.blogspot.com

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Nov 2009 - 9:36 am | llपुण्याचे पेशवेll

धन्यवाद श्री अजय भागवत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

प्रकाश घाटपांडे's picture

20 Nov 2009 - 9:29 am | प्रकाश घाटपांडे

सर्वांचच अभिनंदन! भाग घेतलेल्या वा न घेतलेल्या, पारितोषिक मिळालेल्या वा न मिळालेल्या.
सोशल ब्लॉगर्स हे आंतरजालावरील जागले आहेत. ब्लॉगर्स हे मुक्त पत्रकार, साहित्यिक आहेत. ब्लॉगिंग ही समांतर साहित्य, संस्कृती, संगीत, पत्रकारिता आहे. आपण त्याला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करु या! स्टार माझाचे अभिनंदन
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

21 Nov 2009 - 11:46 pm | विकास

सर्वांचच अभिनंदन! भाग घेतलेल्या वा न घेतलेल्या, पारितोषिक मिळालेल्या वा न मिळालेल्या.
सोशल ब्लॉगर्स हे आंतरजालावरील जागले आहेत. ब्लॉगर्स हे मुक्त पत्रकार, साहित्यिक आहेत. ब्लॉगिंग ही समांतर साहित्य, संस्कृती, संगीत, पत्रकारिता आहे. आपण त्याला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करु या! स्टार माझाचे अभिनंदन

असेच म्हणतो!

बाकरवडी's picture

20 Nov 2009 - 9:55 am | बाकरवडी

अरे वा वा वा !!
अभिनंदन !!!! =D> =D> =D> =D> =D> =D> =D>

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

टुकुल's picture

20 Nov 2009 - 9:55 am | टुकुल

सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन !!

--टुकुल

शितल's picture

20 Nov 2009 - 4:38 pm | शितल

हेच म्हणते.
सर्वाचे मनःपुर्वक अभिनंदन :)

आनंद घारे's picture

20 Nov 2009 - 10:03 am | आनंद घारे

बाकीच्या सर्व यशस्वी ब्लॉगकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि अभिनंदनकर्त्यांचे मनःपूर्वक आभार.
कधी कधी मी मिपावरही लिहीत असतो, पण ते स्वतःच्या नावाने.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Nov 2009 - 10:13 am | ब्रिटिश टिंग्या

विजेत्यांचे अभिनंदन!

समंजस's picture

20 Nov 2009 - 10:16 am | समंजस

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन!! =D>
विजेत्यांमध्ये बरेच मिपाकर बघुन जास्त आनंद झाला!! :D

तसेच मराठी ब्लॉग(अनुदीनी) ची दखल घेउन, पारितोषिक देउन, लेखकांना उत्तेजन देउन मराठीच्या प्रचार/प्रसारात हातभार लावल्याबद्दल स्टार माझा चे सुद्धा अभिनंदन!!

गणपा's picture

20 Nov 2009 - 10:34 am | गणपा

क्या बात है. सक्काळी सक्काळी एकदम झक्कास बातमी.
सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन. :)

छोटा डॉन's picture

20 Nov 2009 - 10:39 am | छोटा डॉन

आज सकाळी सकाळीच एक सन्माननीय मिपाकर श्री. टिंग्या यांचा फोन आला आणि आमचा चेहरा खाडकन वाकडा झाला, हो ना, विकांताच्या सकाळी शिव्या खाणे काय इडली खाण्याएवढे सोपे आहे काय ?
पण त्यावर ही पुरस्काराची बातमी आम्हाला कळाली.

स्टार माझाचे स्पर्धा आयोजीत केल्याबद्दल आभार ...!!!

आमच्या लिखाणाची सुरवात ही मिपावरच झाली ( १० वी, १२ वी मध्ये मराठीचे पेपर मोठ्ठ्या मोठ्ठ्या पुरवण्या जोडुन लिहायचो व मास्तर रजा टाकुन ते तपासत बसायचे तो भाग वेगळा), इथेच त्याला प्रोत्साहन मिळाले, कौतुक झाले, लिहायचा उत्साह वाढत गेला.
असो.

सर्व मिपाकरांचे आणि वाचकांचे ( आम्हाला सहन केल्याबद्दल ) आभार ...

इतर विजेत्यांचे अभिनंदन ...
पार्टी मात्र आठवणीने द्या हो !

बाय द वे, ही आमच्या ब्लॉगची लिंक ...
http://chhota-don.blogspot.com/
( अर्थातचे ही आमची लिंक व ह्यावर आमचा फार जीव हे आहेच. ;) )

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

धमाल मुलगा's picture

20 Nov 2009 - 7:53 pm | धमाल मुलगा

लै भारी! :)
सगळ्या विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन...

आणि विशेषतः डान्याबद्दल काय बोलु?
आधी खाजगी मराठीतः "च्यायला! ह्या भालेरावाला पारितोषिक? वर पुन्हा मिपावर कौतुकाची अनुदानं...करा चैन करा....खा लेको, रोज शिकरण मटार उसळ खा!"

आता सार्वजनिक मराठीतः "छोटा डॉनरावांना पारितोषिऽऽक म्हणजे साक्षात ब्लॉगसुर्याला पारितोषिक देणं आहे. डॉनराव हे माझे गुरु....म्हणजे मला शिष्य मानतात की नाही ते माहित नाही, पण मी त्यांना गुरुस्थानीच मानतो. मिपावर धबाधबा प्रतिसाद लिहायच्या दिवसांत मी मिपावर लहान होतो तेव्हा डॉनराव मला हे प्रतिसाद कसे लिहायचे ते शिकवायचे...
पंढरपूरातल्या शाळेतुन शिकुन आता बंगळुरातल्या आलीशान हापिसात काम(?) करताना डानरावाना किती धन्यता वाटत असेल! ......................"
;)

डान्या भैताडा....पुन्हा एकदा हाबिणंदण!
चल, आपल्याकडुन तुला एक ३०छाप बिडीबंडल गिफ्ट! (वस्तु काय पहाता, भावना जाणुन घ्या राव :) )
विसु.:आमचे आडनाव आगलावे नाही! बिडीबंडल दिल्यावर कृपया काडेपेटी मागु नये...

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन
स्टार माझा चे कौतुक आणि अजय भागवत यांनी सर्वांचे दुवे दिल्याबद्द्ल त्याना विषेश दुवा
येवढे बोलुन मे माझे ४ शब्द संपवतो
जय हिंद जय महाराष्ट्र
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

श्रीयुत संतोष जोशी's picture

20 Nov 2009 - 11:08 am | श्रीयुत संतोष जोशी

सर्व यशस्वी मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

माधुरी दिक्षित's picture

20 Nov 2009 - 12:03 pm | माधुरी दिक्षित

सर्व विजेत्यांचे मनापसुन अभिनंदन.

sneharani's picture

20 Nov 2009 - 12:03 pm | sneharani

सर्व विजेत्या मिपाकरांचे मनापासुन अभिनंदन....!
:)

यशोधरा's picture

20 Nov 2009 - 2:33 pm | यशोधरा

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

शरदिनी's picture

20 Nov 2009 - 2:45 pm | शरदिनी

सर्वांचे अभिनंदन..
परीक्षक कोण होते?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2009 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>परीक्षक कोण होते?
अच्युत गोडबोले असावेत.

देवदत्त's picture

20 Nov 2009 - 11:45 pm | देवदत्त

हो,
श्री. अच्युत गोडबोले परीक्षक होते.

आणि स्टार माझाने त्यांच्या संकेतस्थळावर आता निकाल जाहीर केला आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

20 Nov 2009 - 4:05 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन.

चतुरंग's picture

20 Nov 2009 - 4:15 pm | चतुरंग

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! =D> =D> =D>
सर्व मिपाकरांना तुमचा अभिमान वाटतो!
तुमचे उत्तम लेख मिपावरही येऊदेत अशा शुभेच्छा! :)

(आनंदी)चतुरंग

झकासराव's picture

20 Nov 2009 - 4:15 pm | झकासराव

सर्वांचे अभिनंदन :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2009 - 4:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!

तत्तड....तत्तड...तत्तड..तत्तड.....

-दिलीप बिरुटे

मस्त कलंदर's picture

20 Nov 2009 - 5:21 pm | मस्त कलंदर

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

संदीप चित्रे's picture

20 Nov 2009 - 8:07 pm | संदीप चित्रे

ह्या सर्वांना पुढील लेखनासाठीही शुभेच्छा

उपास's picture

20 Nov 2009 - 8:22 pm | उपास

मस्त बातमी!
सगळ्या भाग घेणार्‍या स्पर्धकांचे आणि पारितोषिक मिळवणार्‍यांचे अभिनंदन..
निरजा, डानराव, देवकाका, राजे, आनंदघन, देवदत्ता असेच उत्तमोत्तम यश तुम्हास लाभो :)

देवदत्त's picture

20 Nov 2009 - 11:20 pm | देवदत्त

सकाळी विपत्र वाचल्यावर मिपावरही हे वाचले. तेव्हा जास्त वेळ काढू शकलो नाही म्हणून जेवढे लोक हजर दिसले त्यांना अभिनंदनाची खरड पाठविली.

सर्वांना धन्यवाद.
सर्व विजेत्यांचे सहर्ष अभिनंदन.
माझी अनुदिनी उल्लेखनिय म्हटल्याबद्दल स्टार माझाचे आभार.

विस्तृत लिखाण लवकरच :)

भानस's picture

21 Nov 2009 - 12:58 am | भानस

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

स्वाती२'s picture

21 Nov 2009 - 2:26 am | स्वाती२

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

देवदत्त's picture

31 Jan 2010 - 10:36 am | देवदत्त

हरभर्‍याच्या झाडावर चढून एक घोषणा:

आत्ताच आलेल्या दूरध्वनी आणि विपत्रावरून असे समजले की आज (३१ जाने. २०१०) रात्री ९:३० वाजता स्टार माझावर ह्या पारितोषिक वितरणाचा एपिसोड दाखवण्यात येणार आहे.