Skip to main content

स्टार माझा तर्फे आयोजित केलेल्या "ब्लॉग माझा" स्पर्धेत पारितोषिके मिळवणारे मिपाकर

लेखक अजय भागवत यांनी शुक्रवार, 20/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
स्टार माझा तर्फे आयोजित केलेल्या "ब्लॉग माझा" स्पर्धेत पारितोषिके मिळवणारे मिपाकरः [सुरुवातीला मला फक्त डॉन बद्दल कळाले होते व त्याप्रमाणे मी येथे धागा दिला होता. म्हणून सुरुवातीचे काही प्रतिसाद डॉनचे अभिनंदन करतांना दिसत आहेत. नंतर देवकाकांनी कळवल्याप्रमाणे इतर्ही मिपाकरांना हे पारितोषिक मिळाल्याचे कळाले. त्यानुसार मी हा धागा संपादीत केला आहे] नीरजा पटवर्धन(नीधप) ह्यांचा दुसरा क्रमांक आलाय. छोटा डॉन, देवदत्त, राजे, आणि आनंदघन ह्यांना स्पर्धेत विषेश पारितोषिक मिळालंय. ह्या सर्वांचे सहर्ष अभिनंदन!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21379
प्रतिक्रिया 68

प्रतिक्रिया

अभिनंदन डॉनराव.. :) --सुहास

छोटा डॉन हे आमचे आवडते युवा विचारवंत!! शाब्बास!

वा वा! डॉन्रावांची 'टेरीटोरी' वाढलेली पाहुन लै भारी वाटलं! अभिनंदन! हफ्ता पाठवुन देतो! ;)

In reply to by Nile

असेच म्हणतो!! अभिनंदन!!

अभिनंदन डान्राव!! आता सवडीने ब्लॉग वाचून काढायला हवा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

नीधप, देवदत्त, राजे आणि आनंदघन यांचेही अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by नंदन

खूप आनंद झाला!!!!!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नीरजाचं दुसर्‍या क्रमांकाबद्दल मनापासून अभिनंदन! शिवाय आमचे रा.को. डान्राव, आनंदघन, देवदत्त आणि राजेचंही! चला कार्यकर्ते, डान्रावांच्या अभिनंदनाचे बोर्ड गल्लोगल्ली लावले पाहिजेत! कृ.उ.बा.स.च्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच म्हणतो. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

:O आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच म्हणते. खूपच छान झाले!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नीरजा ताईंचे हार्दिक अभिनंदन! ह्यावेळेस उत्तेजनार्थ न घेता दुसरा क्रमांक काढून टीकाकारांना चोख उत्तर दिलेले आहे. पुढच्या वेळेस पहिला नंबर!!

In reply to by नंदन

सर्व पारितोषिक विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! विशेष डॉन्याचे! डॉन्या - पार्टी........ :)

वा वा वा!! हार्दिक अभिनंदन डॉन्राव!! - भटोबा

डॉन्रावांचे सहर्ष अभिनंदन. ह्याच स्पर्धेत नीरजा पटवर्धन(नीधप) ह्यांचा दुसरा क्रमांक आलाय. त्यांचेही सहर्ष अभिनंदन. तसेच देवदत्त,राजे,आणि आनंदघन ह्या मिपासदस्यांनीही ह्या स्पर्धेत यश मिळवलंय. ह्या तिघांचेही सहर्ष अभिनंदन. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!

In reply to by सहज

हेच म्हणतो! असे यशस्वी ब्लॉगर्स असल्यावर मराठीची चिंता कोण करतो?

In reply to by प्रमोद देव

ह्या सगळ्यांबरोबर देवकाकांचंही नाव आहे. तेव्हा ह्या सगळ्यांचे हार्दीक अभिनंदन. आणि अशाच बहारदार लेखनासाठी शुभेच्छा! :)

In reply to by सुबक ठेंगणी

हेच म्हणतो. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

नीधप,डॉन्या, देवदत्त, राजे, आणि आनंदघन मस्तच रे...अभिनंदन.... :) पार्टी कधी???? --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व मिपाकरांचे अभिनंदन!!! Cheers !!! सुजय

सर्वांचे मनापासून अभिनंदन अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

नीरजा पटवर्धन(नीधप) ,छोटा डॉन, देवदत्त, आणि आनंदघन ह्यांचे अभिनंदन. * वरील मोठ्या नावांमध्ये माझे छोटे नाव बघून अमंळ करमणूक झाली, माझ्या ब्लॉगची दखल घ्यावी असे काहीच मी उच्चभ्रु लिहीत नाही पण स्टार माझा च्या ग्रूपला माझा ब्लॉग देखील आवडला ह्यामुळे मी गदगद आहे, स्टार माझा चे आभार. काही मित्रांच्यामुळे मी ब्लॉग लिहता झालो त्यांचे अनेकानेक आभार ;) * ज्यांना पार्टी देणे आहे त्यांनी व ज्यांना घेणे आहे त्यांनी मला आज व उद्या संपर्क करावा मुंबई मध्ये असेन :D ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

In reply to by दशानन

पुण्याला येऊन पार्टी देणे अन्यथा परत आपण पुण्यात राहणार आहात व ते डॉन आमचे मित्र आहेत ह्याची जाण ठेवणे. ;) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ब्लॉग स्पर्धत पारितोषीक मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन राजे या मुंबईत तुमच्या कडुन पार्टी घ्यायचीच आहे निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by निखिल देशपांडे

सर्व यशस्वी मिपाकरांचे अभिनंदन! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

श्री. अजय भागवत, आपण सर्व विजेत्यांच्या ब्लॉगचे दुवे दिले असते तर फार बरे झाले असते. असो. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आत्ता फक्त नीधप यांचा ब्लॉग पाहू शकलो कारण त्याचा दुवा त्यांच्या सहीत आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

अभिनंदन :P :P :P :P :P :P :P :P :P

१. Aniket Samudra http://manatale.wordpress.com २. Neeraja Patwardhan http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/ ३. Dipak Shinde http://bhunga.blogspot.com विषेश पारितोषिके: Hariprasad Bhalerao www.chhota-don.blogspot.com Devdatta Ganar http://maajhianudini.blogspot.com/ Medha Sakpal www.medhasakpal.wordpress.com Salil Chaudhary www.netbhet.com Pramod Dev http://purvaanubhava.blogspot.com/ Raj Kumar Jain http://rajkiranjain.blogspot.com Minanath Dhaske http://minanath.blogspot.com Vijaysinh Holam http://policenama.blogspot.com deepak kulkarni http://aschkaahitri.blogspot.com/ Anand Ghare http://anandghan.blogspot.com

In reply to by अजय भागवत

धन्यवाद श्री अजय भागवत. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

सर्वांचच अभिनंदन! भाग घेतलेल्या वा न घेतलेल्या, पारितोषिक मिळालेल्या वा न मिळालेल्या. सोशल ब्लॉगर्स हे आंतरजालावरील जागले आहेत. ब्लॉगर्स हे मुक्त पत्रकार, साहित्यिक आहेत. ब्लॉगिंग ही समांतर साहित्य, संस्कृती, संगीत, पत्रकारिता आहे. आपण त्याला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करु या! स्टार माझाचे अभिनंदन प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्वांचच अभिनंदन! भाग घेतलेल्या वा न घेतलेल्या, पारितोषिक मिळालेल्या वा न मिळालेल्या. सोशल ब्लॉगर्स हे आंतरजालावरील जागले आहेत. ब्लॉगर्स हे मुक्त पत्रकार, साहित्यिक आहेत. ब्लॉगिंग ही समांतर साहित्य, संस्कृती, संगीत, पत्रकारिता आहे. आपण त्याला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करु या! स्टार माझाचे अभिनंदन असेच म्हणतो!

अरे वा वा वा !! अभिनंदन !!!! =D> =D> =D> =D> =D> =D> =D> :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन !! --टुकुल

In reply to by टुकुल

हेच म्हणते. सर्वाचे मनःपुर्वक अभिनंदन :)

बाकीच्या सर्व यशस्वी ब्लॉगकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि अभिनंदनकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. कधी कधी मी मिपावरही लिहीत असतो, पण ते स्वतःच्या नावाने. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

विजेत्यांचे अभिनंदन!

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन!! =D> विजेत्यांमध्ये बरेच मिपाकर बघुन जास्त आनंद झाला!! :D तसेच मराठी ब्लॉग(अनुदीनी) ची दखल घेउन, पारितोषिक देउन, लेखकांना उत्तेजन देउन मराठीच्या प्रचार/प्रसारात हातभार लावल्याबद्दल स्टार माझा चे सुद्धा अभिनंदन!!

क्या बात है. सक्काळी सक्काळी एकदम झक्कास बातमी. सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन. :)

आज सकाळी सकाळीच एक सन्माननीय मिपाकर श्री. टिंग्या यांचा फोन आला आणि आमचा चेहरा खाडकन वाकडा झाला, हो ना, विकांताच्या सकाळी शिव्या खाणे काय इडली खाण्याएवढे सोपे आहे काय ? पण त्यावर ही पुरस्काराची बातमी आम्हाला कळाली. स्टार माझाचे स्पर्धा आयोजीत केल्याबद्दल आभार ...!!! आमच्या लिखाणाची सुरवात ही मिपावरच झाली ( १० वी, १२ वी मध्ये मराठीचे पेपर मोठ्ठ्या मोठ्ठ्या पुरवण्या जोडुन लिहायचो व मास्तर रजा टाकुन ते तपासत बसायचे तो भाग वेगळा), इथेच त्याला प्रोत्साहन मिळाले, कौतुक झाले, लिहायचा उत्साह वाढत गेला. असो. सर्व मिपाकरांचे आणि वाचकांचे ( आम्हाला सहन केल्याबद्दल ) आभार ... इतर विजेत्यांचे अभिनंदन ... पार्टी मात्र आठवणीने द्या हो ! बाय द वे, ही आमच्या ब्लॉगची लिंक ... http://chhota-don.blogspot.com/ ( अर्थातचे ही आमची लिंक व ह्यावर आमचा फार जीव हे आहेच. ;) ) ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by छोटा डॉन

लै भारी! :) सगळ्या विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन... आणि विशेषतः डान्याबद्दल काय बोलु? आधी खाजगी मराठीतः "च्यायला! ह्या भालेरावाला पारितोषिक? वर पुन्हा मिपावर कौतुकाची अनुदानं...करा चैन करा....खा लेको, रोज शिकरण मटार उसळ खा!" आता सार्वजनिक मराठीतः "छोटा डॉनरावांना पारितोषिऽऽक म्हणजे साक्षात ब्लॉगसुर्याला पारितोषिक देणं आहे. डॉनराव हे माझे गुरु....म्हणजे मला शिष्य मानतात की नाही ते माहित नाही, पण मी त्यांना गुरुस्थानीच मानतो. मिपावर धबाधबा प्रतिसाद लिहायच्या दिवसांत मी मिपावर लहान होतो तेव्हा डॉनराव मला हे प्रतिसाद कसे लिहायचे ते शिकवायचे... पंढरपूरातल्या शाळेतुन शिकुन आता बंगळुरातल्या आलीशान हापिसात काम(?) करताना डानरावाना किती धन्यता वाटत असेल! ......................" ;) डान्या भैताडा....पुन्हा एकदा हाबिणंदण! चल, आपल्याकडुन तुला एक ३०छाप बिडीबंडल गिफ्ट! (वस्तु काय पहाता, भावना जाणुन घ्या राव :) ) विसु.:आमचे आडनाव आगलावे नाही! बिडीबंडल दिल्यावर कृपया काडेपेटी मागु नये...

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन स्टार माझा चे कौतुक आणि अजय भागवत यांनी सर्वांचे दुवे दिल्याबद्द्ल त्याना विषेश दुवा येवढे बोलुन मे माझे ४ शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

सर्व यशस्वी मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सर्व विजेत्यांचे मनापसुन अभिनंदन.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

सर्वांचे अभिनंदन.. परीक्षक कोण होते?

In reply to by शरदिनी

>>परीक्षक कोण होते? अच्युत गोडबोले असावेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो, श्री. अच्युत गोडबोले परीक्षक होते. आणि स्टार माझाने त्यांच्या संकेतस्थळावर आता निकाल जाहीर केला आहे.

सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! =D> =D> =D> सर्व मिपाकरांना तुमचा अभिमान वाटतो! तुमचे उत्तम लेख मिपावरही येऊदेत अशा शुभेच्छा! :) (आनंदी)चतुरंग

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! तत्तड....तत्तड...तत्तड..तत्तड..... -दिलीप बिरुटे

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त बातमी! सगळ्या भाग घेणार्‍या स्पर्धकांचे आणि पारितोषिक मिळवणार्‍यांचे अभिनंदन.. निरजा, डानराव, देवकाका, राजे, आनंदघन, देवदत्ता असेच उत्तमोत्तम यश तुम्हास लाभो :)

सकाळी विपत्र वाचल्यावर मिपावरही हे वाचले. तेव्हा जास्त वेळ काढू शकलो नाही म्हणून जेवढे लोक हजर दिसले त्यांना अभिनंदनाची खरड पाठविली. सर्वांना धन्यवाद. सर्व विजेत्यांचे सहर्ष अभिनंदन. माझी अनुदिनी उल्लेखनिय म्हटल्याबद्दल स्टार माझाचे आभार. विस्तृत लिखाण लवकरच :)

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

हरभर्‍याच्या झाडावर चढून एक घोषणा: आत्ताच आलेल्या दूरध्वनी आणि विपत्रावरून असे समजले की आज (३१ जाने. २०१०) रात्री ९:३० वाजता स्टार माझावर ह्या पारितोषिक वितरणाचा एपिसोड दाखवण्यात येणार आहे.