पहिल्या महायुद्धातील कोल्हे

अमित खोजे's picture
अमित खोजे in जनातलं, मनातलं
10 Jan 2018 - 2:11 am

कोल्हा हा कुत्र्याच्या जातीतील एक अत्यंत हुशार, कळपात राहणारा, आणि अत्यंत निष्ठुर प्राणी आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१६-१९१७ मध्ये कडाक्याच्या हिवाळ्यात विल्नीयस आणि मिन्स्कच्या भागात जर्मन आणि रशियन सेना एकमेकांशी लढत होत्या. बर्फात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढताना दोन्हीकडच्या सैन्याची अगदी दैन्यावस्था झाली होती. तेथील बर्फाळ भागात राहणाऱ्या कोल्ह्यांनाही युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची चांगली मेजवानी मिळत होती. जिवंत माणसाच्या गरम रक्ताची चटक त्यांना लागत चालली होती. थोडा धीर दाखवून ते एकट्या दुकट्या सैनिकांवर देखील हल्ला करू लागले. परंतु पुढे पुढे कोल्ह्यांची हाव एवढी वाढली कि त्यांनी सरळ सरळ कळपाने एखाद्या सैन्याच्या तुकडीवरही हल्ला करण्यास मागेपुढे ना बघता सुरुवात केली. दोन्ही बाजूंचे सैनिक अगदी वैतागून गेले. त्यांना त्यांचे युद्धही करणे अवघड होऊन बसले. विषप्रयोग, रायफल, मशीन गन यांचाही फारसा उपयोग होत नव्हता. बॉम्ब वापरून पहिले. त्याचा थोडा फायदा झाला परंतु हे कोल्हे एवढे चवताळलेले आणि हुशार होते कि त्यांनीसुद्धा एखाद्या सैन्याच्या तुकडीसारखे वागत मेलेल्या कोल्ह्यांच्या तुकडीच्या जागी नवीन ताज्या दमाची तुकडी पाठवात सैनिकांना मारणे चालूच ठेवले.

अगोदरच रशियाच्या कडक हिवाळ्यात लढणे मोठ्या मुश्किलीचे काम होते आणि त्यात हि कोल्ह्यांची ब्याद. दोन्ही बाजूंच्या त्रस्त सैनिकांनी मग आपापल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून जर्मन आणि रशियन सैन्यात तात्पुरता तह घडवून आणला आणि दोन्ही सैन्य एक होऊन कोल्ह्यांच्या विरुद्ध उभे ठाकले. गंमत म्हणजे त्यांनी तहाचा करारनामाही अगदी परिस्थितीला साजेसा बनवला. दोन्ही सैन्याने एकत्र मिळून मग त्या कोल्ह्यांवर सर्व बाजूंनी हल्ला चढवला आणि त्यांचा नायनाट केला. बरेचसे कोल्हे मेले. जे वाचले ते तो प्रदेश कायमचा सोडून निघून गेले.

कोल्ह्यांचा प्रश्न निकालात निघाल्यानंतर तहाची सांगता झाली आणि कोल्ह्यांच्या त्रासाशिवाय युद्ध करण्यास मोकळे होत जर्मन आणि रशियन सैन्याने पुन्हा एकमेकांना जीवे मारण्यास सुरुवात केली.

युद्धातील फोलपणा अशा उदाहरणातून जाणवल्याशिवाय राहत नाही.

“An eye for an eye will make the whole world blind.” – Mahatma Ghandi

संदर्भ : http://breakingitdown.co.uk/nature/animals/wolves-world-war-1/ /strong>

इतिहासलेख

प्रतिक्रिया

गांधींचं स्पेलिंग तरी नीट लिहायचंत! बाकी किस्सा आवडला.

मूळ लेखात चूक असली तरी तुम्ही ती दुरुस्त करू शकता [किंवा मग मूळ लेखाची लिंक तुमच्या लेखाच्या सुरुवातीला द्या आणि तिथेच लिहा की 'खालील लेख हा ह्या लेख भाषांतर आहे']

अमित खोजे's picture

10 Jan 2018 - 8:20 pm | अमित खोजे

किंवा मग मूळ लेखाची लिंक तुमच्या लेखाच्या सुरुवातीला द्या आणि तिथेच लिहा की 'खालील लेख हा ह्या लेख भाषांतर आहे'

हे मात्र घाई घाईत राहिले बघा. संपादक, चूक दुरुस्त कराल का? मूळ लेखाचा संदर्भच द्यायचा राहिलाय.
रश्मीन यांनी दिलेली लिंक बरोबर आहे.

कोल्हे शक्यतो एकेकटे किंवा जोडीने शिकार करतात, लांडगे कळपाने शिकार करतात.

पगला गजोधर's picture

10 Jan 2018 - 11:51 am | पगला गजोधर

लेख वेगळा आहे ... १+

लिआम निसन चा चित्रपट आठवला ... नाव आठवत नाहीये ... तो प्लेन क्रॅश मधून वाचतो .. पण बर्फ़ाळ प्रदेशात कोल्ह्याच्या टोळीला सापडतो ..

अमु१२३'s picture

10 Jan 2018 - 12:13 pm | अमु१२३

,,

अमित खोजे's picture

10 Jan 2018 - 8:26 pm | अमित खोजे

अत्यंत थरारक पिक्चर आहे तो. त्यातून लिआमचा अभिनय तर तुफान. Taken चित्रपटापासूनच त्याच्या प्रेमात पडलो.

मराठी कथालेखक's picture

10 Jan 2018 - 6:37 pm | मराठी कथालेखक

पहिल्या महायुद्धासंदर्भात कुणी चांगलंस पुस्तक (मराठी फक्त !!) सुचवू शकेल काय ?

पगला गजोधर's picture

10 Jan 2018 - 7:01 pm | पगला गजोधर

आंतरजालावर हे सापडलं

"पहिले महायुद्ध का झाले ? कसे झाले ?"
लेखक: पंढरीनाथ सावंत
नचिकेत प्रकाशन

मराठी कथालेखक's picture

12 Jan 2018 - 3:29 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

SHASHANKPARAB's picture

12 Jan 2018 - 9:04 am | SHASHANKPARAB

अशी हिम्मत फक्त लांडगेच करू शकतात, त्यांच्या मोठ्या आकार व ताकदी मुळे.. मूळ लेखातही wolf असेच लिहिलेलं दिसतं.

टर्मीनेटर's picture

14 Jan 2018 - 10:53 pm | टर्मीनेटर

मजेदार किस्सा.

पैसा's picture

15 Jan 2018 - 11:07 am | पैसा

भारी किस्सा. ते लांडगेच असणार. कुत्रे लांडग्यानाच जास्त जवळचे आहेत.