||दत्त स्तुती ||

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
4 Dec 2017 - 3:01 pm

काल झालेल्या दत्त जयंती साठी मी लिहिलेला अभंग

||दत्त स्तुती ||
अनसूयानंदन ब्रह्मा विष्णू महेश्वर
अवतरले भूवरी दत्त दिगंबर ||धृ ||

तीन शिरे सहा हात रूप तुझे
हाती कमंडलू भगवी वस्त्रे साजे ||१||

अनसूया माता पतीचरणी लीन
चरणजल स्पर्शिता बालके तीन ||२||

त्रिशूल डमरू शंख चक्र गदा हाती
मागे उभी कामधेनू श्वान पुढे वसती ||३||

भूत पिशाच्चे तुजला पाहुनिया पळती
जो ध्यातो भक्तीने हृदयी त्या वसती ||४||

श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती
पीठापूर कुवरपूर गाणगापूरी राहती ||५||

वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्थ अक्कलकोटी
अवतार दत्तांचे रूपे कोटी कोटी ||६||

औदुंबर वृक्षातळी वास असे निरंतर
दर्शन देई भक्ता अवधूत दिगंबर ||७||

त्रिगुणात्मक शक्तींचे स्थान असे तूंचि
वंदन तुजला करिता सात्विक वृत्ती साची ||८||

बहुजन्मी पुण्य केले आजि फळा आले
दत्तकृपा होऊनिया 'मी' पण हे गळले ||९||

दत्तचरणांवरती मी मस्तक ठेवतो
कृपा असू दे अवधूता वैभव मी नमितो ||१०||

कविता

प्रतिक्रिया

अभंग, भारुड, ओवी ह्यात नेमका फरक काय?

दुर्गविहारी's picture

4 Dec 2017 - 6:31 pm | दुर्गविहारी

आउट ऑफ सिलॅबस प्रश्न विचारु नका हो. त्यापेक्षा कॅलेंडर पहा, म्हणजे पुढच्या कवितेचा मुहूर्त कळेल. ;-)

तुम्हास येत्या बुधवारी येणारी संकष्टी चतुर्थी अपेक्षित आहे काय ? :)

अनन्त्_यात्री's picture

4 Dec 2017 - 4:19 pm | अनन्त्_यात्री

...... ||

एस's picture

4 Dec 2017 - 5:43 pm | एस

हा अभंग आहे?

babu b's picture

4 Dec 2017 - 5:47 pm | babu b

छान

गामा पैलवान's picture

4 Dec 2017 - 10:41 pm | गामा पैलवान

वैभवदातार,

कविता आवडली. फक्त भुते, पिशाच्चे दूर पळतात हे दुरुस्त करायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे दत्त लिंगदेहांस गती देतो. त्यामुळे भुते, पिशाच्चे आवर्जून दत्ताकडे जात असावीत असा अंदाज आहे.

आ.न.,
-गा.पै.

विशुमित's picture

5 Dec 2017 - 12:51 pm | विशुमित

<<<फक्त भुते, पिशाच्चे दूर पळतात हे दुरुस्त करायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे दत्त लिंगदेहांस गती देतो.>>>
==>> हे जरा विस्कटून सांगता का ?