*बालदिन *

Primary tabs

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
14 Nov 2017 - 10:42 am

*बालदिन *

हासूया खेळूया नाचूया गाऊया
आनंद घेऊया मुलांसवे
कोवळ्या निरागस मुलांपासून
मिळते आम्हा सुख नवे

पंडित नेहरूंचा जन्मदिवस आज
म्हणती त्यास बालदिन
मुले असती फुले देवाची
होऊ त्यांच्यात तल्लीन

मातीच्या गोळ्यासम बालमनावर
संस्कारांची नक्षी काढू
सद्विचारांचे शिंपण करूनी
उद्याचे आदर्श नागरिक घडवू

--शब्दांकित (वैभव दातार )
१४ नोव्हेंबर २०१७

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

14 Nov 2017 - 11:00 am | प्रचेतस

खूप दिवसांनी तुमची कविता वाचून छान वाटले.

सतिश गावडे's picture

14 Nov 2017 - 11:25 am | सतिश गावडे

काढू आणि घडवू हे तितकेसे जुळत नाहीत.

मातीच्या गोळ्यासम बालमनावर
संस्कारांची नक्षी काढू
सद्विचारांचे शिंपण करूनी
उद्याचे आदर्श नागरिक घडवू

हे असं होऊ शकेल का?

मातीच्या गोळ्यासम बालमनावर
संस्कारांची नक्षी काढू
त्या नक्षीवर ताट ठेवूनी
देशभक्तीचे भोजन वाढू

हरवलेला's picture

15 Nov 2017 - 8:10 am | हरवलेला

तुम्ही सुचवलेल्या ओळी छान आहेत, पण शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल.

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2017 - 8:19 am | प्राची अश्विनी

हहपुवा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Nov 2017 - 11:32 am | ज्ञानोबाचे पैजार


"कोवळ्या निरागस मुलांपासून
मिळते आम्हा सुख नवे"

हे काही कळले नाही....

पैजारबुवा,

बर्‍याच दिवसांनी कविता वाचून बरं वाटलं. आठवडाभरात मार्गशीर्ष सुरु होईल, त्याची महती सांगणारं काव्य पाडा.