'किनारा'यण!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
20 Sep 2017 - 10:37 pm

एकदा एक बिनशिडाचं तारू भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी! होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा! होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि'नारा' गाठणार यावर मात्र तिघांचही एकमत होतं. अशातच समुद्र खवळला. वादळ उठलं. होडी हेलकावे खाऊ लागली. आता आपण काही तरत नाही, या भयानं तिघंही हादरले. लांबवर एक भव्य जहाज खवळलेल्या समुद्रातही संथपणे पुढे सरकत होते. तिघांनी त्याकडे पाहून हातवारे सुरू केले. शिट्ट्या वाजवल्या. 'आम्हाला वाचवा' असा आक्रोशही सुरू केला. पण वादळ आणि लाटांच्या तांडवात तो केविलवाणा आवाज तिकडे पोचलाच नाही. मग आसपास आणखी कुणी आपल्यास वाचविण्यासाठी भेटते का याचाही शोध सुरू झाला.
कुणीच दिसत नव्हते.
अखेर नाईलाज झाला. होडीचं काय होईल ते आता नशीबावर सोपवावे असा स्वाभिमानी विचार करून तिघेही खवळलेल्या समुद्राकडे हतबलपणे पाहात राहिले.
होडी भरकटतच होती.
लांबवर एक कि'नारा' दिसत होता. होडी हळुहळू तिकडेच जात होती.
सुदैवाने सारे कि'नाऱ्या'वर उतरले.
जीव वाचल्याचा आनंद तिघांनाही लपवतां येत नव्हता. काही वेळ विश्रांती घेऊन ते आत शिरले.
आणि त्यांना धक्का बसला!
त्या बेटावर एकही प्राणी दिसत नव्हता. माणसाचा तर मागमूसही नव्हता...
तिघेही काही क्षण घाबरले. मधल्याने दाढीवरून उगीचच हात फिरवला.
'आता दाढी वाढवावीच लागणार!' तो पुटपुटला आणि मोठ्याने त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर दिला.
आता आपणच काहीतरी केलं पाहिजे हे ओळखून आवाजात उसना उत्साह आणून तो म्हणाला,
'चला... आजपासून आपणच या बेटावर राज्य करू! आपण इथले राजे!'
उरलेल्या दोघांचे डोळे चमकले!
आणि तिघंही हातात हात घेऊन उंच आवाजात नारा दिला, 'हा कि'नारा' आमचा आहे!'....
बेटावर चहुबाजूंनी त्या नाऱ्याचा एकमुखी आवाज घुमला!!!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

संग्राम's picture

20 Sep 2017 - 11:50 pm | संग्राम

काही नाही समजले

किसन शिंदे's picture

21 Sep 2017 - 12:16 am | किसन शिंदे

उद्या कळेलच कोणता किनारा गाठलाय ते..

पैसा's picture

21 Sep 2017 - 7:35 am | पैसा

:)

कंजूस's picture

21 Sep 2017 - 8:04 am | कंजूस

बेटावर लोक आहेत खूप पण किनाय्रावर कुणी स्वागताला उभे नाहीत ही फार वाइट गोष्ट आहे.

गामा पैलवान's picture

21 Sep 2017 - 11:42 am | गामा पैलवान

दिनेशदा,

मस्त कथा आहे. बहुतेक रूपक म्हणतात हिला. लवकरंच कळेल काय होतंय ते. घोडामैदान जवळंच आहे. नारोबादादा कुठे दाखल होणार ते बघायचं. राष्ट्रवादी हाही एक पर्याय होऊ शकतो.

आ.न.,
-गा.पै.

वकील साहेब's picture

21 Sep 2017 - 12:03 pm | वकील साहेब

उत्तम लिखाण, आवडले

दिनेश५७'s picture

21 Sep 2017 - 12:18 pm | दिनेश५७

धन्यवाद

आनन्दा's picture

21 Sep 2017 - 12:20 pm | आनन्दा

ह्म्म..

वकील साहेब's picture

21 Sep 2017 - 12:32 pm | वकील साहेब

कथेचा अप्रकाशित उत्तरार्ध
त्या बेटावरचे जे मूल निवासी होते ते एकत्र 'संघ' करून राहायचे त्यांना या तिघांनी विचारले की, "आम्हाला येथे आश्रय मिळेल का ?" त्यावर त्यांच्यातल्या मोठ्या दाढीवाल्या म्होरक्याने त्यांच्या हेतूची आणि निष्ठेची "शहा"निशा करण्या साठी पक्के ठाकून ठोकून विचारले, "या अगोदर कोणत्या बेटावर होतात?"
त्यावर मोठा म्हणाला, "त्या पलीकडे "हाताच्या" अंतरावर असलेल्या बेटावर होतो तिथे काही मन रमत नव्हते म्हणून ते बेट सोडले."
"ह्म्म, अस आहे तर" दाढीवाल्याने दाढी खाजवत पुन्हा विचारले, "आणि त्या अगोदर कोणत्या बेटावर होतात ?"
"कोणत्याच नाही, कोणत्याच नाही" घाबरत घाबरत तिघेही कोरस मध्ये म्हणाले,
" खर सांगता की नाही " दाढी वाल्याने दरडावले.
तसा धाकटा धीर करून म्हणाला, " बेटावर नाही जी, गुहेत होतो गुहेत. वाघाच्या गुहेत"
" मग पहिले तीच गुहा का सोडली ?" पुन्हा प्रश्न
" अहो, काय सांगू आता तुम्हाला, गुहेतल्या ढाण्या वाघाची ऊंची अफाट होती अन आमची दिड फुटाच्या वर मजल जाईना, म्हणून वाघाची गुहा सोडली."
" बर ठीक आहे, पण इथे राहायचे असेल तर गप गुमान राहावं लागेल. आदळआपट, धूसफूस चालणार नाही, वेळ आली तर हाफ चड्डी पण घालावी लागेल, आहे मंजूर ?"
" हो हो सर्व मंजूर " - इति त्रिकुट
" चुकलात तर तुमच्यावरच "प्रहार" करील लक्षात ठेवा"
" हो, कबूल कबूल कबूल "
" ठीक आहे, राच्याला पडा इथे कोपर्‍यात, सकाळी बघू काय करायच ते " अस म्हणून दाढीवाला निघून गेला.
आणि तिघांनी हुश्श केल.
नंतर नवस पूर्ती साठी त्यांनी त्यांनी त्या बेटावर सत्य "नारायणाची" पुजा घातल्याची ही चर्चा आहे.

पगला गजोधर's picture

21 Sep 2017 - 3:24 pm | पगला गजोधर

गुहेतल्या ढाण्या वाघाची ऊंची अफाट होती अन आमची दिड फुटाच्या वर मजल जाईना, म्हणून वाघाची गुहा सोडली.

सध्या म्हणे गलिब-बिच्चाल्ली मनीमाऊ गुहेचं नेतृत्व करतेय, सोबतीला माकड आहेच सल्ले द्यायला मांजराच्या कानात...
मनिमौ गुहेतल्या दगडावर उभं राहून डरकाळी फोडण्याचा प्रयत्न तर करतेय पण तोंडातून म्याऊच बाहेर पडतंय.

संघकरून राहिलेल्या बेटावरच्या रहिवाश्यांनी उष्टावलेली, शेंगाची टरफलं , फोलपाट, पानं..... वाहत वाहत गुहेत येतात,
त्या फोलपट-टरफलावरच माकडाला आणि मनिमौला गुजराण करावी लागतीये आणि पानांचा उपयोग रोज तोंडाला पुसण्यासाठी करावा लागतोय ....

अनन्त्_यात्री's picture

21 Sep 2017 - 1:25 pm | अनन्त्_यात्री

आवडलं !

वकील साहेब's picture

21 Sep 2017 - 6:10 pm | वकील साहेब

ते अफाट उंचीच थोरल्या साहेबांबद्दल लिहिलं आहे. धाकले अन चिमुकल्याबद्दल काय लिहायच ? आनंदी आनंद च आहे

योगी९००'s picture

22 Sep 2017 - 7:42 am | योगी९००

दिनेशदा आणि वकीलसाहेब.

एकदम छान रूपक लिहीलेत....

वकील साहेब's picture

22 Sep 2017 - 11:11 am | वकील साहेब

धन्यवाद

माहितगार's picture

22 Sep 2017 - 11:18 am | माहितगार

रोचक !

चौथा कोनाडा's picture

23 Sep 2017 - 1:22 pm | चौथा कोनाडा

दिनेशदा, एकदम भारी !

वकिलसाहेब, तुमचंपण मस्त !

नारायण यांचा एकेरी उल्लेख नाही आवडला, आपल्या पिताश्रींचा असा उल्लेख तुम्हाला आवडला असता काय?

संग्राम's picture

28 Sep 2017 - 8:05 pm | संग्राम

या विषयावरील भाऊ तोरसेकर यांची टिप्प्णी
आडवळणातले डाव-पेच