ताज्या घडामोडी - १०

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in राजकारण
18 Aug 2017 - 6:20 pm

ता.घ. - ९ चे १५० प्रतिसाद झाले म्हणून नवीन धागा.

-गा.पै.

प्रतिक्रिया

तस्लिमा नसरीन यांना मुस्लिमांच्या तीव्र विरोधामुळे संभाजीनगर विमानतळावरून परत पाठवले. अधिक माहितीसाठी : http://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/right-to-freedo...

आता इथे दोन गंभीर निरीक्षणे नोंदवावीशी वाटतात.

१. वृत्तपत्रांनी गिळलेले मूग : एरव्ही व्यक्तिस्वातंत्र्याचे ढोल बडवणारी वृत्तपत्रे या ज्वलंत विषयावर मौन बाळगून आहेत. असल्यांना लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ का म्हणून मानायचं?

२. मुस्लिम नेते स्वत:ला कोण समजतात? आज असदुद्दिन ओवैश्यासारखा कोणीही सोम्यागोम्या उठतो, स्वत:ला मुस्लिमांचा नेता म्हणून घोषित करतो आणि जमावाला चिथावून शासनावर दबाव टाकतो. हा प्रकार थांबायला हवाय.

असो.

सर्वसाधारण अल्पशिक्षित वा अशिक्षित हिंदू या घटनेकडे वेगळ्या प्रकारे बघतो. दंगली करून मुस्लिमांना वठणीवर आणायची गरज आहे, असा काहीसा त्याचा निष्कर्ष असतो. हे वातावरण सौहार्दास पोषक नाही.

-गा.पै.

राघव's picture

21 Aug 2017 - 5:14 pm | राघव

स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय पातळीवर एकही मुस्लीम पक्ष आजतोवर उभा राहिला नाही, यात जे समजायचे ते आले.

जर यदा-कदा एखादा मुस्लीम पक्ष आला तर गठ्ठा मतदान त्या पक्षाला जाईल का? मला वाटतं हो. हळूहळू का होईना असे होईल.
धार्मिक ध्रुवीकरणावर आधारित पक्षांची मानसिकता ही त्यांच्या राजकीय अस्त्तित्वासाठी आवश्यक आहे. याच गोष्टीचा फायदा हिंदू मतांसाठी भाजपनं व मुस्लीम मतांसाठी काँग्रेस/सप यांनी केलेला आहे.

आता ओवैसी येतांना त्याला हेच दिसतंय की, ह्या मतां मधली अर्धी जरी मतं त्याच्या मागे उभी राहिलीत तर राजकीय दृष्टीनं आत्यंतिक फायद्याचं आहे. जोवर मुस्लीम समाजातून दुसरा पक्ष तयार होणार नाही तोवर ओवैसीला रान मोकळं आहे. काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्नं बघणार्‍या भाजप साठी हे फायद्याचं असल्यामुळं ते याकडे सध्या दुर्लक्ष करतील. उ.प्र. निवडणुकांमधे ओवैसी च्या पार्टीचा वोट शेअर ०.२% असला तरी त्याने लढविलेल्या ३८ पैकी ४ जागांवर त्याची पार्टी दुसर्‍या स्थानी होती. पहिल्यांदा उ.प्र. मधे शिरकाव करतांना ही मजल चांगली आहे.

जर ओवैसीला जमावाला चिथावता येतंय तर ते तो स्वतःच्या फायद्यासाठी करतोय, जे साहजिक आहे. त्यावर राजकीय तोडगा निघायला मात्र बराच वेळ जाणार आहे.

थॉर माणूस's picture

18 Aug 2017 - 11:44 pm | थॉर माणूस

गुजरात आणि महाराष्ट्रामधे स्वाईन फ्लू चा प्रसार वाढला. एकट्या गुजरात मधे गेल्या ५ दिवसात ३०-४० च्या आसपास मृत्यू, आणि यावर्षी एकूण २०० हून अधिक मृत्यू. महाराष्ट्रात यावर्षी ४०० हून अधिक मृत्यू.

http://www.hindustantimes.com/india-news/gujarat-records-31-swine-flu-de...

http://www.news18.com/news/india/maharashtra-and-gujarat-see-highest-num...

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे या मागणीसाठी विद्यार्थ्यांची रॅली आयोजित करण्यात आली.

ही नक्कीच चांगली बातमी आहे. अर्थातच कितीही काहीही झाले तरी जे.एन.यु मधील दिडशहाणे, त्यांना पाठिशी घालणारे पुरोगामी विचारवंत, बुरहान वाणी कसा शाळामास्तरचा मुलगा होता म्हणून त्याचे गोडवे गाणारी बरखा दत्त यासारख्या लोकांना पाकिस्तानचेच प्रेम असणार. पण प्रत्यक्ष पाकिस्तानच्या अंमलाखाली असलेल्या प्रदेशातील लोकांना कशी वागणूक मिळते आहे हे काही त्यांना दिसायचे नाही.

मोदक's picture

19 Aug 2017 - 10:44 am | मोदक

हे सगळे प्रकार रॉच्या पाठिंब्याने सुरू झाले असावेत का..?

गॅरी ट्रुमन's picture

19 Aug 2017 - 1:48 pm | गॅरी ट्रुमन

हे सगळे प्रकार रॉच्या पाठिंब्याने सुरू झाले असावेत का..?

या प्रकारांना रॉचा पाठिंबा असेलच असे वाटते. किंबहुना तो नसला तर आपल्यासारखे मूर्ख आपणच. मुशर्रफ अध्यक्ष असताना रॉला पाकिस्तानात घडणार्‍या अनेक गोष्टींविषयी दोष द्यायचा. तेव्हा रॉचे हात तिथपर्यंत पोहोचले असतील असे म्हणायला हरकत नसावी.

जेम्स वांड's picture

19 Aug 2017 - 2:46 pm | जेम्स वांड

पेशावर मध्ये झालेला आर्मी स्कुल हल्ला ते होणाऱ्या बॉम्बस्फोट मालिका, सगळीकडे जलीस्थळीकाष्ठीपाषाणी त्यांना 'रॉ का नापाक हाथ' दिसतो...

अमितदादा's picture

19 Aug 2017 - 11:35 am | अमितदादा

पाक व्याप्त काश्मीर चे पंतप्रधान हे नवाज शरीफ यांच्या पार्टीचे आहेत, नवाज शरीफ याना हटवल्यामुळे ते कमालीचे उद्विग्न झाले आहेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जर इम्रान खान याना असला "नया पाकिस्तान " हवा असेल तर मला POK च्या पाकिस्तान मधील accession वरती फेरविचार करावा लागेल असे विधान करून मोठा गदारोळ उडवून दिला आहे. यावर पाकिस्तान आणि आझाद काश्मीर मधील विरोधी पक्षांनी प्रचंड विरोध सुरु केला आहे. कारण आझाद काश्मीर मधील लोकप्रतिनिधी किंवा मंत्री याना काश्मीर च पाकिस्तान शी सल्गनता (कि accession) मान्य आहे अशी शपथ घ्यावी लागते, आणि आझाद काश्मीर च्या पंतप्रधानांनी त्या शपथेचा भंग केला आहे असे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे.

थोडक्यात काय POK मध्ये हि पाकिस्तान विरोधी undercurrent आहेत, रॉ नक्कीच त्याचा फायदा उठावत असणार याचा मला विश्वास वाटतो.

अभिजीत अवलिया's picture

19 Aug 2017 - 12:41 pm | अभिजीत अवलिया

बरेच दिवस भाजपच्या दारावर धडाका मारणाऱ्या नारायण राणेंनी काँग्रेस मधले आपले चंबू गबाळे आवारण्यास सुरवात केली असून भाजप प्रवेश निश्चित झालाय अशी बातमी आहे. त्यांना मंत्री केले जाईल अशी मटावर बातमी आहे.

http://www.esakal.com/kokan/kankavali-konkan-news-narayan-rane-exit-cong...६६९२३

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/state-cab...

श्रीगुरुजी's picture

19 Aug 2017 - 2:20 pm | श्रीगुरुजी

राणेला भाजपत घेणे ही भाजपची घोडचूक ठरेल. राणे एकटा न येता संपूर्ण राणे पॅकेज घ्यावे लागेल (राणे व राणेचे दोन सुपुत्र). विशेषतः राणे फडणविसांसाठी भस्मासुर ठरेल कारण राणे मुख्यमंत्रीपदासाठी अत्यंत कासावीस झाला आहे. आत आल्या आल्या तो फडणविसांना घालवून त्याजागी स्वतःला बसविण्यासाठी कारस्थाने सुरू करेल. राणे व राणे सुपुत्रांच्या गुन्हेगारी, गुंडगिरी, ब्राह्मणविरोधी जातीयवादी कारवायांमुळे भाजपचा कट्टर समर्थक मध्यमवर्ग व ब्राह्मणवर्ग भाजपवर नाराज होईल. राणे भाजपत आला तर मी व्यक्तिशः विशेषतः विधानसभेसाठी भाजपला मत देणार नाही.

जेम्स वांड's picture

19 Aug 2017 - 2:52 pm | जेम्स वांड

भाजपचा कट्टर समर्थक मध्यमवर्ग व ब्राह्मणवर्ग भाजपवर नाराज होईल.

महाराष्ट्रात 'मध्यमवर्ग' किती कोटी (मतदार) असेल? अन ब्राह्मण नाराज झाले तरी कोणाला फरक पडतोय? ब्राह्मणांचे संख्याबळ आधीच कमी, त्यातही एकगठ्ठा मतं नाहीत, सगळे आपापल्या घरात बृहस्पती, 'वोट बँक' म्हणून कवडीची किंमत नसलेल्या जातीने किंवा जातीतल्या मूठभर लोकांनी भाजप राखला काय अन टाकला काय, भाजपाला शून्य फरक पडेल. कटू असलं तरी हेच सत्य आहे.

श्रीगुरुजी's picture

19 Aug 2017 - 3:02 pm | श्रीगुरुजी

मध्यमवर्ग, ब्राह्मण हेच मतदार बहुसंख्येने भाजपला वर्षानुवर्षे मतदान करीत आले आहेत. हेच भाजपचे एकनिष्ठ मतदार आहेत. राणेपुत्राच्या ब्राह्मणविरोधी कारवायांमुळे ब्राह्मण त्याच्यावर संतापलेले आहेत. अशा व्यक्तीला भाजपत आणणे भाजपला महागात जाईल. राणेमुळे भाजपला कोकणात विधानसभेसाठी जास्तीत जास्त २-३ जागांचा व लोकसभेसाठी जास्तीत जास्त १ जागेचा फायदा होईल. इतरत्र राणेचा उपयोग नाही. राणे कुटुंबाला कोकणाबाहेर, विशेषतः सिंधुदुर्गच्या बाहेर व त्यातसुद्धा कुडाळ, कणकवली व मालवण हे २-३ तालुके सोडले तर कोठेही अस्तित्व नाही. एका अर्थाने राणे हा राज्यपातळीवर तर सोडाच, एका जिल्हा पातळीवरचा सुद्धा नेता नाही. राणे कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुंडगिरी, माज, ब्राह्मणविरोधी कारवाया, सत्तेसाठीची वखवख व आक्रमक स्वभाव भाजपला नक्कीच गोत्यात आणेल. कॉस्ट-बेनेफिट विश्लेषण केले तर राणेमुळे होणार्‍या फायद्याच्या तुलनेत होणारे तोटे प्रचंड आहेत.

जेम्स वांड's picture

19 Aug 2017 - 4:40 pm | जेम्स वांड

मध्यमवर्ग, ब्राह्मण हेच मतदार बहुसंख्येने भाजपला वर्षानुवर्षे मतदान करीत आले आहेत. हेच भाजपचे एकनिष्ठ मतदार आहेत.

हो, ह्याला कोण नाकारू शकणार, ह्यातूनच तर भाजपला शेटजी भटजींचा पक्ष असं नाव पण मिळालं, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहेच. पण बहुसंख्य 'ब्राह्मण' अन 'मध्यमवर्गीय' मते भाजपला जात असली तरी ती एकंदरीत 'बहुमताच्या बेरजेत' फार काही भव्य दिव्य आहेत असे नाही, ह्या दोन्ही कॅटेगरी जरी भाजपला एकनिष्ठ असल्या तरी ते एकतर्फी आहे, आयती एकनिष्ठ मते कोण सोडणार, ह्याचा अर्थ भाजप विना ब्राह्मणांच्या मतांमुळे पार पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून जाईल असे नाही, गरज असलीच तर ब्राह्मणांना भाजपची आहे, भाजपला ब्राह्मणांची गरज नाहीये, पण आयती मते (मग ती चिमूटभर का असेना) कश्याला सोडा म्हणून ते ब्राह्मण विरोधीही नाहीयेत.

विशुमित's picture

19 Aug 2017 - 5:06 pm | विशुमित

गरज असलीच तर ब्राह्मणांना भाजपची आहे, भाजपला ब्राह्मणांची गरज नाहीये,
---------
+१

तेजस आठवले's picture

19 Aug 2017 - 5:32 pm | तेजस आठवले

+१, पटतंय.

श्रीगुरुजी's picture

19 Aug 2017 - 8:19 pm | श्रीगुरुजी

गरज असलीच तर ब्राह्मणांना भाजपची आहे, भाजपला ब्राह्मणांची गरज नाहीये,

-१

जेम्स वांड's picture

19 Aug 2017 - 8:26 pm | जेम्स वांड

तुम्ही दुखावणार नसाल तर.. :)

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2017 - 12:42 am | श्रीगुरुजी

गरज असलीच तर ब्राह्मणांना भाजपची आहे, भाजपला ब्राह्मणांची गरज नाहीये,

हे साबित करता येईल का?

जेम्स वांड's picture

20 Aug 2017 - 5:09 pm | जेम्स वांड

आता बघा गुरुजी, हे जर तुम्ही म्हणाल का 'वांड्या तू म्हणतोय त्याची कागदोपत्री पुरावे जंत्री आणून दे' तर हे सिद्ध करणं अशक्य आहे.

काही जुनी/नवी उदाहरणे पाहून 'ट्रेंड' असाच आहे असे कळून येणे कठीण नाही, तरी तुम्हाला ते पटलेच पाहिजे असेही नाही.

प्रसाद_१९८२'s picture

20 Aug 2017 - 5:25 pm | प्रसाद_१९८२

काही जुनी/नवी उदाहरणे पाहून 'ट्रेंड' असाच आहे असे कळून येणे कठीण नाही, तरी तुम्हाला ते पटलेच पाहिजे असेही नाही.

===

तुम्हाला माहिती असलेल्या जुन्या/नव्या उदाहरणातून, एकाद दुसरे उदाहरण इथे दिलेत तर आमच्या देखिल माहितीत भर पडेल.

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2017 - 8:45 pm | श्रीगुरुजी

काही जुनी/नवी उदाहरणे पाहून 'ट्रेंड' असाच आहे असे कळून येणे कठीण नाही, तरी तुम्हाला ते पटलेच पाहिजे असेही नाही.

या ट्रेंडची तुम्हाला माहित असलेली काही जुनी/नवी उदाहरणे सांगता का?

प्रसाद_१९८२'s picture

21 Aug 2017 - 10:49 am | प्रसाद_१९८२

उदाहरणे द्यायला, उदाहरणे असायला तर हवीत.
उगाच काहीही ठोकून द्यायला, काय जाते.

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2017 - 3:23 pm | श्रीगुरुजी

स्वतःच्या मनाने कोणीही काहीही ठोकलं तरी त्याला आंधळेपणाने टाळ्या पिटणारे सुद्धा इथे आहेत.

जेम्स वांड's picture

22 Aug 2017 - 5:40 pm | जेम्स वांड

पहिले काही वरच्या वैयक्तिक अंगाने जाणाऱ्या प्रतिसादावर.

@प्रसादजी, तुम्ही वयाने काय ते मला माहिती नाही, पण शक्यतो मी अनोळखी लोकांसोबत बोलताना आदरानेच बोलतो, असतात एकेकाचे संस्कार तसे माझे आहेत, शांतपणे बोलायचे. तुम्हाला माझा राग आलाय का ? आला असल्यास का बरं? बरं कारण काहीही असो मी आधीच तुमची माफी मागून टाकतो कसा, फक्त माझ्याकडे उदाहरणे नाहीतच असे दर्शवणारे काही बोलू नका बुआ, २४ तसाच्या आत राजकीय काथ्याकुट सदरात उत्तरे द्यावीच लागतात असा काही नियम मिपावर असला तर माझ्या पाहण्यात नाही, असला तर मला दाखवा मी परत दुसऱ्यांदा उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून टाकेन. तुमचा प्रतिसाद औधत्यपूर्ण वाटला असं दुख:द निरीक्षण ह्या निमित्ताने नोंदवतो, मी फक्त तोंड वर बोलत नाही हो मिपावर, मला रोजची भाकरी कमवायला मान खाली घालून कामही करावं लागतं हेच कारण आहे बघा उशिराच, असो, जास्त बोलून गेलो असलो तर माफ करा. वातावरण सौजन्यपूर्ण ठेवून मिपावर वातावरण उत्तम राहावे ह्याकरता माझा हा छोटा प्रयत्न, फुल न फुलाची पाकळी :)

@श्रीगुरुजी,
जेव्हा तुम्ही म्हणता की काहीही बोलले तरी टाळ्या वाजवणारी जनता इथे आहे, तेव्हा तुमचा रोख कोणाकडे आहे हे तुम्ही स्पष्ट बोललात तर अगणित गैरसमज टाळायला मदतच होईल, इतके मागणे एक सुजाण अन संवेदनशील मिपाकर म्हणून तुम्ही मला घालालच पदरात, अशी अपेक्षा करतो. अन माझ्या बाजूने मला टाळ्या कोणी वाजवल्या किंवा न वाजवल्या तरी फरक पडत नाही हे आधीच स्पष्ट करतो. तुमचा आयडी मला माझं एक वैयक्तिक श्रद्धास्थान असलेल्या वंदनीय गोळवलकर गुरुजींची आठवण करून देतो. गुरुजी बोलत तेव्हा आग असत, आडून आडून बोलणे त्यांना कधीच जमले नाही.

दोघांना स्पष्टीकरण समाप्त. लोभ असावा ही विनंती :)

###########################################################

आता प्रतीसादासंबंधी ,

मी माझ्यापुरते काढलेले निष्कर्ष मी मांडतो आहे, तुम्हाला न पटल्यास हरकत नाही, तुम्ही प्रतिवादात बाधक उदाहरणे दिलीत तर मी माझे म्हणणे मागे घेऊन माझ्याच ज्ञानात भर नक्कीच घालून घेईन. हे मी प्रसादजींना सुद्धा म्हणतो.

भाजपाला ब्राह्मणांची गरज नाही, हे मी केलेलं विधान होय. ते का हे आता सांगतो.

१. रेखा खेडेकर, भांडारकर प्राच्यविद्या मध्ये हल्ला झाल्यानंतरही थेट २ मुदती भाजपच्या आमदार असलेल्या रेखा खेडेकर ह्यांच्या बद्दल मी इतकेच सांगतो की त्या पुरुषोत्तम खेदेकारांच्या पत्नी होत्या. २०१३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ते तिकीट मिळाले नाही म्हणून, ह्या तिकीट न मिळण्यामागे कारण होते संघ, तत्वाला पक्का असलेल्या संघाने राजकीय सोय म्हणून ह्या पार्टीत नकोत अशी खंबीर भूमिका घेतली अन तेव्हाकुठे त्यांना तिकीट नाकारले गेले (असा माझा अंदाज), गंमत म्हणजे ह्या आमदार असताना त्या विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या सहकारी होत्याच न ? भांडारकर हल्ला हा 'ब्राह्मण विरोधी' नव्हता असे तुमचे मत असले तर निरुपाय, पण तो स्पष्ट ब्राह्मणविरोधी असल्याचं एकंदरीत वाटतं. मग आपले एक अतिशय प्रामणिक मतदार असलेल्या ब्राह्मण समाजात चुकीचा संदेश जाईल ही रिस्क घेऊन सुद्धा भांडारकर हल्ल्यानंतर चक्क २ टर्म्स सौ खेडेकर भाजपने आमदार कश्या केल्या ? त्यांना तिकीट कसे मिळाले ? ह्यावरून पार्टीला ब्राह्मण समाजाचा रोष ह्यापेक्षा जागा जिंकणे महत्वाचे होते असे दिसणार नाही का ?

२. देवेन्द्रजी मुख्यमंत्री झाले, कारण ते पहिल्या फळीचे 'संघ कार्यकर्ते होते' म्हणून, मला नाही वाटत त्यांच्या ब्राह्मण असण्याचा त्याच्याशी काही संबंध असेल. चला ब्राह्मण मुख्यमंत्री तर झाला, प्रथमदर्शने हे भाजपचे प्रो ब्राह्मण पाउल वाटते, पण खरंच फडणवीस ब्राह्मण म्हणून मुम झाले आहेत ? असले तर त्यांनी ब्राह्मण समाजाच्या भल्याचे काय केले आहे ? हल्लीच मराठा आरक्षण मंजूर करणे, २०१६ मध्ये ओबीसी समाजाकरता वेगळे खाते काढणे, हे त्या त्या समाजाला खुश करण्याचे प्रयत्न नव्हेत का ? फडणवीस ब्राह्मण म्हणून त्यांनी ब्राह्मण समाजासाठी काही करावे असे मी मुळीच म्हणणार नाही, पण जर ब्राह्मण समाज त्यांच्यासाठी (भाजपासाठी) इतका महत्वाचा अन मोठा वोट शेयर आहे तर किमान 'वोट ब्यांक' साठीतरी त्यांनी काही करायला हवे होते न ? का नाही केले ? मग मराठा आरक्षण अन ओबीसी मंत्रालय का ? कारण स्पष्ट आहे दोन्ही समाज मिळून सत्तर टक्के मते आहेत. साहजिक आहे त्यांना खुश ठेवणे क्रमप्राप्त आहे. ब्राह्मण एकतर वोट ब्यांक नाही अन आकडासुद्धा खूप कमी आहे, ह्यात मला नाही वाटत नाकारण्यासारख काही असावं.

तूर्तास आठवलेली उदाहरणे ही दोन तीन आहेत, अजून आठवतील तशी ह्या किंवा इतर ता.घ. धाग्यांवर देईनच :)

विशुमित's picture

22 Aug 2017 - 9:07 pm | विशुमित

+१
छान विश्लेषण..!!
------------
आजकाल भाजप समर्थक लेखकांच्या प्रतिसादांना पसंत करणारे गिनेचुनेच टाळ्या पिटणारे मिपावर राहिले आहेत, त्यामुळे त्यांचा तिळपापड होत आहे. असो..!!

आजकाल भाजप समर्थक लेखकांच्या प्रतिसादांना पसंत करणारे गिनेचुनेच टाळ्या पिटणारे मिपावर राहिले आहेत, त्यामुळे त्यांचा तिळपापड होत आहे. असो..!!

नाणे तुमचेच, तुम्हीच टॉस उडवणार, तुम्हीच कॉल देणार आणि विरूद्ध पार्टीने टॉस हरला असे तुम्हीच डिक्लेअर करणर... भारी आहे... :))

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2017 - 2:58 pm | श्रीगुरुजी

तिळपापड वगैरे काही नाही हो. भाजपविरूद्ध कोणी लिहिले की ते खरेखोटे, योग्यायोग्य याचा विचार न करता तातडीने टाळ्या पिटणार्‍यांमुळे करमणूक होते. बाकी काही नाही.

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2017 - 2:56 pm | श्रीगुरुजी

१. रेखा खेडेकर, भांडारकर प्राच्यविद्या मध्ये हल्ला झाल्यानंतरही थेट २ मुदती भाजपच्या आमदार असलेल्या रेखा खेडेकर ह्यांच्या बद्दल मी इतकेच सांगतो की त्या पुरुषोत्तम खेदेकारांच्या पत्नी होत्या. २०१३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ते तिकीट मिळाले नाही म्हणून, ह्या तिकीट न मिळण्यामागे कारण होते संघ, तत्वाला पक्का असलेल्या संघाने राजकीय सोय म्हणून ह्या पार्टीत नकोत अशी खंबीर भूमिका घेतली अन तेव्हाकुठे त्यांना तिकीट नाकारले गेले (असा माझा अंदाज), गंमत म्हणजे ह्या आमदार असताना त्या विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या सहकारी होत्याच न ? भांडारकर हल्ला हा 'ब्राह्मण विरोधी' नव्हता असे तुमचे मत असले तर निरुपाय, पण तो स्पष्ट ब्राह्मणविरोधी असल्याचं एकंदरीत वाटतं. मग आपले एक अतिशय प्रामणिक मतदार असलेल्या ब्राह्मण समाजात चुकीचा संदेश जाईल ही रिस्क घेऊन सुद्धा भांडारकर हल्ल्यानंतर चक्क २ टर्म्स सौ खेडेकर भाजपने आमदार कश्या केल्या ? त्यांना तिकीट कसे मिळाले ? ह्यावरून पार्टीला ब्राह्मण समाजाचा रोष ह्यापेक्षा जागा जिंकणे महत्वाचे होते असे दिसणार नाही का ?

पुरूषोत्तम खेडेकार ब्राह्मणद्वेष्टा आहे. रेखा खेडेकर त्याची पत्नी. खेडेकर, कोकाटे, पार्थ पोळके, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड इ. चा ब्राह्मणद्वेष भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरील हल्ल्यानंतर आणि विशेषतः २००४ मधील विधानसभा निवडणुकीत ब्राह्मणद्वेषाचा फायदा मिळून राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर खूपच वाढला. रेखा खेडेकर पूर्वाश्रमीच्या ब्राह्मण. त्यांचे माहेरचे आडनाव दाणी असे होते. २००४ मध्ये जरी त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या तरी नंतरच्या काळात पुरूषोत्तम खेडेकर व इतरांचा ब्राह्मणद्वेष मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे भाजपने २००९ मध्ये त्यांना तिकीट नाकारले होते. जर भाजपला ब्राह्मणांची गरज नसती तर २००९ व नंतर २०१४ मध्ये सुद्धा त्यांना तिकीट मिळाले असते.

२. देवेन्द्रजी मुख्यमंत्री झाले, कारण ते पहिल्या फळीचे 'संघ कार्यकर्ते होते' म्हणून, मला नाही वाटत त्यांच्या ब्राह्मण असण्याचा त्याच्याशी काही संबंध असेल. चला ब्राह्मण मुख्यमंत्री तर झाला, प्रथमदर्शने हे भाजपचे प्रो ब्राह्मण पाउल वाटते, पण खरंच फडणवीस ब्राह्मण म्हणून मुम झाले आहेत ? असले तर त्यांनी ब्राह्मण समाजाच्या भल्याचे काय केले आहे ? हल्लीच मराठा आरक्षण मंजूर करणे, २०१६ मध्ये ओबीसी समाजाकरता वेगळे खाते काढणे, हे त्या त्या समाजाला खुश करण्याचे प्रयत्न नव्हेत का ? फडणवीस ब्राह्मण म्हणून त्यांनी ब्राह्मण समाजासाठी काही करावे असे मी मुळीच म्हणणार नाही, पण जर ब्राह्मण समाज त्यांच्यासाठी (भाजपासाठी) इतका महत्वाचा अन मोठा वोट शेयर आहे तर किमान 'वोट ब्यांक' साठीतरी त्यांनी काही करायला हवे होते न ? का नाही केले ? मग मराठा आरक्षण अन ओबीसी मंत्रालय का ? कारण स्पष्ट आहे दोन्ही समाज मिळून सत्तर टक्के मते आहेत. साहजिक आहे त्यांना खुश ठेवणे क्रमप्राप्त आहे. ब्राह्मण एकतर वोट ब्यांक नाही अन आकडासुद्धा खूप कमी आहे, ह्यात मला नाही वाटत नाकारण्यासारख काही असावं.

ब्राह्मण समाजाचे कोणीच भले करीत नाहीत. अगदी ब्राह्मणसुद्धा ब्राह्मणांचे भले करीत नाहीत. त्याचे कारण म्हणजे ब्राह्मण परावलंबी नाहीत. आपल्या जातीची संघटना असावी, संघटनेच्या ध्जजाखाली एकत्र येऊन सरकारवर दबाव आणून मागण्या मांडाव्यात, रस्त्यावर उतरून आंदोलन करून तोडफोड करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घ्यावे असल्या प्रकारात ब्राह्मण कधी पडत नाहीत व पडणार नाहीत. शिक्षणाच्या मार्गाने, वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्ये स्वबळावर शिकून घेऊन आपली प्रगती आपणच साधावी यावरच ब्राह्मण भर देतात. त्यामुळे फडणवीस ब्राह्मण असल्याने ते ब्राह्मणांचे काही भले करतील अशी ब्राह्मणांची कधीच अपेक्षा नव्हती.

मराठा जातीसाठी राखीव जागांचा अध्यादेश जुलै २०१४ मध्ये म्हणजेच भाजप सत्तेवर येण्यापूर्वीच तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने काढला होता. त्यामुळे त्याबाबतीत फडणवीस किंवा भाजपला दोष देणे चुकीचे आहे. घटनेतील तरतुदीनुसार मराठ्यांना व मुस्लिमांना राखीव जागा देणे अशक्य आहे हे ब्राह्मणांना माहिती आहे. त्यामुळे मराठ्यांना राखीव जागा देण्याचा अध्यादेश काढल्यानंतर ब्राह्मणांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही कारण हा निर्णय न्यायालयात टिकणार नाही हे त्यांना माहिती होते. मराठा नेत्यांना सुद्धा हे माहिती आहे. परंतु त्यांच्याकडे फडणवीस किंवा भाजपविरूद्ध बोलण्यासाठी दुसरा मुद्दा नसल्याने मराठा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी मराठ्यांना पेटविण्याचा प्रयत्न केला. भाजपने राखीव जागांना विरोध केला असता तर उपद्रवी मराठा नेत्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले असते व वातावरण पेटले असते. तसाही राखीव जागांचा निर्णय न्यायालयात टिकणार नाही. हे माहित असल्याने भाजपने अतिशय शांतपणे राखीव जागांना विरोध न करता पाठिंबा द्यायची चतुर भूमिका घेतली. जो निर्णय न्यायालयात टिकणारा नाही त्याला विरोध करून विरोधकांच्या हातात कोलीत देण्यापेक्षा न्यायाधीशांच्या काठीने साप मारावा ही योग्य भूमिका भाजपने घेतलेली आहे. ही भूमिका घेणे अजिबात ब्राह्मणविरोधी नाही.

ओबीसींसाठी वेगळे खाते काढल्याने ब्राह्मणांना कणभरही फरक पडलेला नाही व पडणार नाही. ब्राह्मणांच्या अपेक्षा वेगळ्याच आहेत. ब्राह्मणांना सरकारी नोकरीत राखीव जागा, शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा, राखीव मतदारसंघ मिळाले किंवा नाही मिळाले तरी काहीच फरक पडत नाही. सध्या शैक्षणिक संस्थात जितक्या जागा राखीव नाहीत त्या जागांवर ब्राह्मणांचे भागू शकते. समजा राखीव जागांमुळे एखाद्या चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश न मिळता तुलनेने दुय्यम संस्थेत प्रवेश मिळाला तरी ब्राह्मणांना फरक पडत नाही कारण शेवटी तुम्ही कोणत्याही संस्थेत असला तरी स्वतः अभ्यास करून गुण मिळवून गुणवत्ता सिद्ध करणे यावर बंदी नाही. आपल्यासाठी कोठे संधी उपलब्ध आहेत, तिथे प्रवेश मिळविण्यासाठी काय करायचे हे ब्राह्मणांना माहिती आहे. सरकारी नोकरी हे ब्राह्मणांचे ध्येय नाही. ब्राह्मण सरकारी नोकरीत गेले तर ते युपीएससी/एमपीएससी इ. माध्यमातून वरीष्ठ सरकारी पदांसाठी प्रयत्न करतील. महापालिकेत किंवा मंत्रालयात कारकुनाची नोकरी करणे हे बहुसंख्य ब्राह्मणांचे ध्येय नाही. शिक्षण क्षेत्रात गेले तर शाळेतील शिक्षकाची नोकरी करण्याऐवजी महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी ब्राह्मण प्रिफर करतील. खाजगी संगणक व आर्थिक संस्थामध्ये संधी शोधणे, परदेशी शिकायला जाऊन तिथेच स्थायिक होणे, स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून खाजगी शिकवणी वर्ग चालविणे, बँका/विमा कंपन्या इ. ठिकाणी श्वेतकॉलर स्वरूपाचे काम करणे, वैद्यकीय व्यवसात ही ब्राह्मणांनी ठरविलेली क्षेत्रे आहेत व या ठिकाणी राखीव जागा नसताना सुद्धा प्रगती करता येते. त्यामुळे ओबीसी किंवा मागासवर्गीय इ. स्वतंत्र खाते काढल्याने ब्राह्मणांना शष्प फरक पडला आहे. असे वेगळे खाते काढणे अजिबात ब्राह्मणविरोधी नाही कारण अशा खात्यांमुळे ब्राह्मणांच्या प्रगतीत अडथळा येत नाही.

ब्राह्मण स्वावलंबी असल्याने त्यांना सरकारकडून फारच थोड्या अपेक्षा आहेत. त्यांना सरकारकडून कोणत्याही स्वरूपाच्या विशेष वागणुकीची, आर्थिक मदतीची, राखीव जागांची अपेक्षा नाही. १९४८ मध्ये खेडोपाडी ब्राह्मणांची घरे जाळली गेली, कूळकायदा आणून ब्राह्मणांची शेतजमीन हिसकावून घेतली गेली (आता कोणी ब्राह्मणांना फुकट शेतजमीन देऊ केली तरी ब्राह्मण ती घेणार नाहीत), राखीव जागा आणून व वेळोवेळी त्यात वाढ करून ब्राह्मणांची संधी कमी केली गेली, राजकारणातून ब्राह्मण हद्दपार झाले, ब्राह्मण संत/नेते/राज्यकर्ते यांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामी केली गेली; परंतु यामुळे अजिबात डगमगून न जाता कोणाचीही मदत न घेता ब्राह्मण प्रगती करीत आहेत. ही आत्मप्रौढी वाटली तरी ही वस्तुस्थिती आहे.

ब्राह्मणांच्या ज्या काही थोड्या अपेक्षा आहेत त्यात ब्राह्मण संत, ब्राह्मण राज्यकर्ते, ब्राह्मण नेते यांची बदनामी करू नये, सातत्याने ब्राह्मणांविरूद्ध विखारी प्रचार करू नये, ब्राह्मणांची ढाल पुढे करून मुस्लिमांचे लांगूलचालन करू नये, भ्रष्टाचार टाळावा, भारत एक दुर्बल देश म्हणून न राहता एक समर्थ देश म्हणून पुढे यावा, पाकिस्तान/चीन इ. पुढे भारताने दुबळेपणा दाखवू नये, भ्रष्टाचार लपविण्यासाठी ब्राह्मणद्वेषाचा आधार घेतला जाऊ नये, हिंदू देवदेवतांची बदनामी होऊ नये इ. चा समावेश आहे. काँग्रेस/राष्ट्रवादीच्या काळात या गोष्टी सातत्याने सुरू होत्या. म्हणूनच ब्राह्मण मोठ्या प्रमाणात भाजपच्या मागे उभे आहेत व भाजपला याची जाणीव आहे म्हणूनच भाजप या गोष्टींपासून दूर आहे. काँग्रेस/राष्ट्रवादीच्या काळात ब्राह्मणद्वेष इतक्या पराकोटीला पोहोचला होता की १९९९-२०१४ या १५ वर्षात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महाराष्ट्रीय ब्राह्मण मंत्री नव्हता. मंत्रीमंडळात अगदी उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती, मुस्लिम, ख्रिश्चन इ. सर्वजण होते परंतु त्यात एकही ब्राह्मण नव्हता. पुण्यातील अनंत गाडगीळांना काँगेसमध्ये किती किंमत आहे ते दिसतेच आहे. भाजपच्या काळात केंद्रात व राज्यात ब्राह्मण मंत्र्यांची संख्या बर्‍यापैकी आहे. भाजपला ब्राह्मणांची गरज नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात ब्राह्मण मंत्री घ्यायची गरज नव्हती.

तूर्तास आठवलेली उदाहरणे ही दोन तीन आहेत, अजून आठवतील तशी ह्या किंवा इतर ता.घ. धाग्यांवर देईनच :)

ही दोनही उदाहरणे गंडलेली आहेत हे नमूद करून इथेच थांबतो.

जेम्स वांड's picture

23 Aug 2017 - 3:20 pm | जेम्स वांड

तुम्ही दिलेला तर्क नक्कीच विचार करायला लावणार आहे, हे मला मान्य करायलाच हवं. त्यात मला अजिबात कमीपणा नाही, तसेच मला तुमच्याकडून अजूनही भरपूर काही शिकता येईल असेही मी मानतो. तूर्तास मी तुमचा मुद्दा मान्य करतोय अशी कबुली देतो, कालपरत्वे अजूनही सुदृढ वादविवाद होतील त्यातून तुम्ही सांगितलेल्या माहितीने माझेच उद्बोधन होईल(च) ह्या सकारात्मक भावनेने मी हार पत्करतो आहे :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Aug 2017 - 5:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी, उत्तम विश्लेषण. बऱ्याच गोष्टी ब्राह्मणेतरांना खटकणाऱ्या असल्या तरी बऱ्याच अंशी वास्तविकता मांडलीत!

जेम्स वांड - विशेष अभिनंदन! इतक्या मोकळेपणाने मुद्दे मान्य करणे खचितच दिसते. मिपाच्या मैत्रीपूर्ण वातावरणाला नेमके हेच हातभार लावू शकते.

जेम्स वांड - विशेष अभिनंदन! इतक्या मोकळेपणाने मुद्दे मान्य करणे खचितच दिसते. मिपाच्या मैत्रीपूर्ण वातावरणाला नेमके हेच हातभार लावू शकते.

+1
गुरुजींनी काहीतरी शिकण्यासारखे आहे यात..

अभिजीत अवलिया's picture

24 Aug 2017 - 8:38 am | अभिजीत अवलिया

सहमत

मोदक's picture

24 Aug 2017 - 12:01 am | मोदक

सहमत...

वांडोबा आणि गुरूजी... संयत भाषेबद्दल आणि मुद्द्यांबद्दल अभिनंदन.

गामा पैलवान's picture

24 Aug 2017 - 1:38 pm | गामा पैलवान

मोदक, तुमच्याशी सहमत आहे. मला आता गुरुजींचंही बरोबर वाटू लागलंय. जुगलबंदी चालू राहायला हवी होती.
आ.न.,
-गा.पै.

सही रे सई's picture

14 Sep 2017 - 1:02 am | सही रे सई

फारच संतुलित आणि मुद्देसूद पणे केलेला मिपावरील एक चांगला वादविवाद आहे हा.
श्रीगुरुजी, तुम्ही नेहमीच मुद्देसूद आणि काहीसे धाडसाने लिहिता आणि वरचा प्रतिसाद पण त्यातलाच एक आहे .. खूप आवडला. विशेष करून ब्राह्मण समाजाच्या अपेक्षा खूप नेटक्या मांडल्यात.

जेम्स वांड,
वादविवादामधे लोक समोरच्याचा मुद्दा पटला असूनही आपली हार मानायला तयार नसतात असेच दिसते पण तुम्ही त्या समजुतीला एक चांगला धक्का दिलात. मुद्दा पटल्यावर हार मानण्यातली इथे दाखवलेली परिपक्वता वाखाणण्याजोगी आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Sep 2017 - 11:31 am | श्रीगुरुजी

धन्यवाद सईताई!

जेम्स वांड यांचेदेखील आभार!

ब्राह्मणांच्या ज्या काही थोड्या अपेक्षा आहेत त्यात ब्राह्मण संत, ब्राह्मण राज्यकर्ते, ब्राह्मण नेते यांची बदनामी करू नये, सातत्याने ब्राह्मणांविरूद्ध विखारी प्रचार करू नये, ब्राह्मणांची ढाल पुढे करून मुस्लिमांचे लांगूलचालन करू नये, भ्रष्टाचार टाळावा, भारत एक दुर्बल देश म्हणून न राहता एक समर्थ देश म्हणून पुढे यावा, पाकिस्तान/चीन इ. पुढे भारताने दुबळेपणा दाखवू नये, भ्रष्टाचार लपविण्यासाठी ब्राह्मणद्वेषाचा आधार घेतला जाऊ नये, हिंदू देवदेवतांची बदनामी होऊ नये इ. चा समावेश आहे.

हे योग्य आहे, पटणेबल आहे.

पिलीयन रायडर's picture

24 Aug 2017 - 12:46 am | पिलीयन रायडर

प्रतिसाद आवडला. :)

अत्रे's picture

24 Aug 2017 - 8:54 am | अत्रे

उत्तम प्रतिसाद.

भाजपला ब्राह्मणांची गरज नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात ब्राह्मण मंत्री घ्यायची गरज नव्हती.

याचे कारण ऑर्गॅनिकली देता येईल का? म्हणजे भाजपला अव्हेलेबल असलेल्या पूलमध्ये ब्राह्मण लोक जास्त आहेत. इतर पक्षात हे लोक जास्त नाहीत. म्हणून तौलनिक दृष्ट्या जास्त प्रमाणात ब्राह्मण मंत्री भाजप मध्ये दिसतात - असे म्हटले तर.

म्हणजे "ब्राह्मणांची गरज असणे" हा अजेंडा न गृहीत धरून सुद्धा या प्रश्नाचे उत्तर देता येईल का?

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2017 - 2:37 pm | श्रीगुरुजी

याचे कारण ऑर्गॅनिकली देता येईल का? म्हणजे भाजपला अव्हेलेबल असलेल्या पूलमध्ये ब्राह्मण लोक जास्त आहेत. इतर पक्षात हे लोक जास्त नाहीत. म्हणून तौलनिक दृष्ट्या जास्त प्रमाणात ब्राह्मण मंत्री भाजप मध्ये दिसतात - असे म्हटले तर.

भाजपच्या पूलमध्ये ब्राह्मण जास्त असल्याने तौलनिक दृष्ट्या भाजप सरकारमध्ये जास्त ब्राह्मण मंत्री आहेत असे मला वाटत नाहीत. भाजपकडे बराच मोठा पूल आहे. त्यात अहिंदूंची संख्या अत्यल्प आहे. तरीसुद्धा जे थोडे अहिंदू आहेत त्यांना प्रातिनिधिक स्वरूपातून मंत्रीमंडळात घेतले आहे. ब्राह्मणांच्या बाबतीत अशा प्रातिनिधिक स्वरूपाची गरज नव्हती. परंतु तरीसुद्धा त्यातील काही जण मंत्रीमंडळात आहेत त्याचे कारण जसा ब्राह्मणांकडे मतदानासाठी भाजप वगळता फारसा पर्याय उपलब्ध नाही, तसेच भाजपलाही ब्राह्मण मतांची गरज आहे. याबाबतीत पुणे शहराचे उदाहरण प्रातिनिधिक आहे. पुण्यात १९६७-६८ च्या सुमारास समाजवादी पक्षाचे भाई वैद्य हे ब्राह्मण असलेले महापौर होते (त्यांच्यानंतर अजून कोणी ब्राह्मण महापौर झाले असल्यास त्याची मला कल्पना नाही). नंतरच्या काळात २०१६ पर्यंत महापौरपद बहुतांशी मराठा व माळी या दोन जातींकडेच जात राहिले. जेव्हा जेव्हा महापौरपद मागासवर्गियांसाठी राखीव असायचे तेव्हा एखादा/एखादी मागासवर्गीय महापौरपदावर बसायचे. एकदा मुस्लिम व एकदा शीख व्यक्ती सुद्धा महापौर झाले. परंतु मागील ४८-४९ वर्षात एखादा ब्राह्मण नगरसेवक महापौर पदासाठी निवडावा असे काँग्रेस-राष्ट्रवादीला वाटले नव्हते. जाणूनबुजून एखाद्या जातीला लांब ठेवण्याचा हा प्रकार होता. २०१७ मध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर वेगवेगळ्या जातींचे तब्बल ९८ नगरसेवक हातात असताना भाजपने जाणूनबुजून मुक्ता टिळकांना महापौर केले. याचा अर्थ त्या ९८ नगरसेवकांमध्ये इतर जातींचे नगरसेवक फारसे नव्हते अशातला भाग नव्हता. परंतु ४८-४९ वर्षे जाणूनबुजून ब्राह्मणांना महापौरपदापासून ठेवणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलेले ते उत्तर होते. १९९९-२०१४ या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे ब्राह्मण आमदार अजिबात नव्हते असे नाही. परंतु कायम ब्राह्मणांचा दुस्वास करून व सातत्याने ब्राह्मणांविरूद्ध विखारी प्रचार करून त्याद्वारे इतर जातींना संदेश देणार्‍या या दोन पक्षांना उत्तर देण्यासाठी भाजपने काही ब्राह्मण आमदारांना मंत्रीपदे दिली.

arunjoshi123's picture

24 Aug 2017 - 1:49 pm | arunjoshi123

रेखा खेडेकर पूर्वाश्रमीच्या ब्राह्मण.

पूर्बाश्रमीच्या मंजे? लग्नानंतर हिंदू स्त्री पुरुषांच्या मूळ जातीचं काय होतं? लेकराच्या जातीचं?

ब्राह्मण स्वावलंबी असल्याने

किंबहुना तुम्हाला असं अजिबात म्हणायचं नसेल, पण अन्य जाती स्वावलंबी नसतात असं कुठं असतं?
========================
दीड कोटी सरकारी नोकर्‍या. त्यात ५० लाखला आरक्षण लागू नसेल. उरलेल्या कोटीत ५०% सर्वण. म्हणजे ५० लाख नोकरदार वा त्यांचे १.५ ते २ कोटी कुटुंबीय मागासवर्गिय लोकच लाभार्थी आहेत. तेही "परावलंबी" कसे? पाट्या टाकल्यावरच त्यांना पगार मिळते. फक्त सरकारी नोकरीची "संधी" फुकट. मला नोकरीचा एक चान्स लाइफमधे माझा पुरुषार्थ न लावता मिळाला तर माझी सायकॉलॉजी परावलंबी टाईप होते का?
==================================
दलितांना मिळणारा आरक्षणाचा फायदा आणि "ब्राह्मणांना" मिळणारा प्रायवेट सेक्टर मधल्या ओळखींचा फायदा यातला दुसरा फॅक्टर कमी प्रभावी नाही. इथे मी पिढ्यानुअपिढ्या मिळालेल्या मोमेंटमबद्दल, क्षमतेबद्दल, कॅपिटलबद्दल बोलत नाहिय. लग्गेबाजी बद्दल बोलतोय.
========================
मुद्दा असा आहे कि देशातले (३०%+७%+१३%)*१२५ - २ = ६० कोटी म्हणजे ९५म्हणजे, ओबिसी सुद्धा स्वावलंबी असल्याने तुम्ही "ब्राह्मण स्वावलंबी असल्याने" लिहून पुढे जे जे लिहिले आहे तसले काही त्यांना पण लागू होते का?

arunjoshi123's picture

24 Aug 2017 - 1:51 pm | arunjoshi123

म्हणजे ९५% दलित/ओबिसी सुद्धा स्वावलंबी असल्याने तुम्ही "ब्राह्मण स्वावलंबी असल्याने" लिहून पुढे जे जे लिहिले आहे तसले काही त्यांना पण लागू होते का?

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2017 - 2:45 pm | श्रीगुरुजी

दलितांना मिळणारा आरक्षणाचा फायदा आणि "ब्राह्मणांना" मिळणारा प्रायवेट सेक्टर मधल्या ओळखींचा फायदा यातला दुसरा फॅक्टर कमी प्रभावी नाही.

हा फायदा नक्की कोणत्या प्रायव्हेट सेक्टर मध्ये होतो? मी ज्या कॉर्पोरेट्स मध्ये काम केले आहे त्यात अशा ओळखीतून कोणालाही थेट जॉब मिळालेला नाही. एक किंवा अधिक मुलाखती, आवश्यकता भासल्यास तांत्रिक चाचणी या चाळणीतून पार पडल्यानंतरच त्यांना जॉब मिळालेला आहे. काही छोट्या कंपन्यातून निव्वळ ओळखीतून जॉब देत असल्यास मला त्याची कल्पना नाही.

मुद्दा असा आहे कि देशातले (३०%+७%+१३%)*१२५ - २ = ६० कोटी म्हणजे ९५म्हणजे, ओबिसी सुद्धा स्वावलंबी असल्याने तुम्ही "ब्राह्मण स्वावलंबी असल्याने" लिहून पुढे जे जे लिहिले आहे तसले काही त्यांना पण लागू होते का?

मी फक्त ब्राह्मणांच्या बाबतीत लिहिले आहे. इतरांच्या बाबतीत मी अजिबात भाष्य केलेले नाही.

विशुमित's picture

19 Aug 2017 - 5:35 pm | विशुमित

पक्षात कचरा घेऊन त्याचे रिसायकलिंग करण्यात भाजप खूप तरबेज झाला आहे. मी अमित शाह यांना या बाबत मानतो बाबा.
-------
पवारांना उमेदीच्या काळात असले का सुचले नाही काय माहित?
-------
भाजप विरोधी पक्ष त्यांच्या विचारांबाबत अजिबात लवचिक दिसत नाहीत. त्याचा फटका त्यांना पुन्हा २०१९ ला बसणार दिसतंय.
------

प्रसाद_१९८२'s picture

19 Aug 2017 - 6:16 pm | प्रसाद_१९८२

पवारांना उमेदीच्या काळात असले का सुचले नाही काय माहित?

==

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष, इतर पक्षातील आयाराम गयाराम आमदार/खासदारानी एकत्र येऊन बनलेला आहे ना? राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष 'निवडून येणार्‍या आमदार/खासदारांची एक "टोळी" आहे' असे राज ठाकरे अगदी खुलेआम म्हणतात.शिवाय दगाबाजी व फोडाफोडीचे राजकारण करण्यात, शरद पवारांचा हात धरणारा दूसरा नेता नाही आज उभ्या हिंदूस्थानात.

श्रीगुरुजी's picture

19 Aug 2017 - 8:16 pm | श्रीगुरुजी

पक्षात कचरा घेऊन त्याचे रिसायकलिंग करण्यात भाजप खूप तरबेज झाला आहे. मी अमित शाह यांना या बाबत मानतो बाबा


पवारांना उमेदीच्या काळात असले का सुचले नाही काय माहित?

पवारांना हे कसे सुचणार? ते स्वतःच रिसायकल होत होते.

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2021 - 1:27 pm | श्रीगुरुजी

पक्षात कचरा घेऊन त्याचे रिसायकलिंग करण्यात भाजप खूप तरबेज झाला आहे. मी अमित शाह यांना या बाबत मानतो बाबा.

जवळपास ४ वर्षांपूर्वी काढलेला हा निष्कर्ष आता पूर्ण पटलाय. विशेषतः महाराष्ट्रात राणे कुटुंबीय, विखे कुटुंबीय, पद्मसिंह पाटील कुटुंबीय इ. आणि आता कृपाशंकर. प्रश्न एवढाच आहे की हा कचरा भाजपत आणण्याचा निर्णय थेट मोदी-शहांचा का फडणवीसांचा का फडणवीसांच्या शिफारशीनुसार घेतलेला निर्णय.

भंकस बाबा's picture

28 Aug 2017 - 6:17 am | भंकस बाबा

राणे बरा पडेल हो! हे तर असं होईल की घरात ढेकूण झाले म्हणून घरच पेटवून दिलं

गॅरी ट्रुमन's picture

19 Aug 2017 - 9:30 pm | गॅरी ट्रुमन

एकूणच कोणालाही पक्षात घेणे आणि पवित्र करून टाकणे हा प्रकार अजिबात आवडलेला नाही. विजयकुमार गावित, भास्करराव पाटील, बबनराव पाचपुते हे आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात बदनाम झालेले मंत्री (ज्यांच्यावर स्वतः देवेन्द्र फडणवीसांनी आमदार असताना विधानसभेत टिका केली होती) पक्षात घेणे हे अजिबात समर्थनीय नाही. आता नारायण राणेही यायला निघाले आहेत. याविषयी व्हॉट्सअ‍ॅपवर बरेच विनोदही फॉरवर्ड होत आहेत. उदाहरणार्थ-- महाराष्ट्रात भाजप म्हणजे काशीचा गंगाघाट आहे. कितीही पापे केलीत तरी काशीच्या गंगाघाटावर जाऊन स्नान केले की ती धुतली जातात त्याप्रमाणे कितीही पापे केलेली असली तरी भाजपत सामील झाल्यावर ती धुतली जातात. असाच दुसरा विनोद म्हणजे इनकम टॅक्स आणि ई.डी वाले आघाडी सरकारशी संबंधित कोणावर धाड टाकायला गाडीतून निघाले आहेत. तो अधिकारी गाडीच्या ड्रायव्हरला सांगतो-- अरे जरा अजून वेगाने चालव. आपण पोहोचेपर्यंत तो माणूस भाजपमध्ये सामील झालेला असला तर आपल्याला काही करता यायचे नाही.

राणे कमळाच्या शिक्क्याखाली आले तर परत भाजपाला मत देणार नाही आणि राम माधव पासून सर्वांना मेल पाठवून निषेध नोंदवणार.

..पण राणेंना भाजपा आत घेईल असे वाटत नाही.