सर्व मिपाकरांना माझा नमस्कार,
मंडळी ,मी ह्या संकेतस्थळाची नवीन सदस्य...
तसे तर मे इथले लेख,चर्चा, कविता इ. नेहमीच वाचत आले आहे पण कधी लेखन नाही केले.पण एकुण इथले प्रेम़ळ आणी खेळीमेळीचे वातावरण बघून वाटलं आपणही ह्याचा आस्वाद घ्यावा.:))
म्हणूनच एका पाककृती पासुन सुरुवात केली आहे..
तर मी आपण सर्वांना माझी ओळख करून देते..मी गौरी , सध्या कॅनडा ला असते.
आशा आहे, तुम्ही मलाही मिसळपावात मिसळून घ्याल..:))
कॉर्न पुडिंग
पाककृतीचे जिन्नस :-
लोणी-३ टे. स्पून
मैदा-३ टे. स्पून
क्रीम कॉर्न (टिन्ड)-पाऊण टिन
मक्याचे दाणे (फ़्रोज़न)-२ वाट्या
साखर-३ टे. स्पून
दूध-३ कप
मीठ-चवीनुसार
टोबेस्को-४-५ थेंब
ब्रेड-३ स्लाइस
चीज (किसलेला)-५ टेपून
मार्गदर्शन:
१. सर्वप्रथम ब्रेड आणि २ टे. स्पून चीज मिक्सर मधून काढून घ्यावे.
२. गॅस वर कढई मध्ये लोणी घालावे.
३. ते थोडे गरम झाले की मैदा घालावा. २ मिनटं मैदा परतावा.
४. क्रीम कॉर्न घालावे आणि दूध घालावे. दूध घालताना मिश्रण हालवत राहावे.
५. मिश्रण थोडे दाट झाले की साखर, मीठ आणि टोबेस्को घालावे.
६. उरलेला चीज घालावा. एक उकळी येऊ द्यावी.
७. फ्रोझन मक्याचे दाणे घालावे आणि २ मिनिटंनी गॅस बंद करावा.
८. आता हे मिश्रण एका बेकिंग ट्रे मध्ये काढून घ्यावे आणि वरून आधी वाटून ठेवलेले ब्रेड आणि चीज घालावे.
९. १८० तापमान वर २० मिनिटं अवन मध्ये बेक करावे.
१०. गरमच खाण्यास द्यावे.
माहितीचा स्रोत:
मैत्रीण
टीपा:
-हा एक मेक्सिकन डेझर्ट चा प्रकार आहे.
- टोबेस्को कुठल्याही ग्रोसरी स्टोर मध्ये मिळतं.(सॉस च्या सेक्शन मधे)
- साहित्य जरी नेहमीचं नसलं तरी पदार्थ चवीला मस्त होतो, एकदा तरी करुनच बघा. :)
गौरी.
प्रतिक्रिया
5 Feb 2008 - 6:10 am | प्राजु
मी आता लवकरच करेन हि पाककृती..
धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल... जाऊबाई(जोरात!)
- प्राजु
5 Feb 2008 - 7:13 am | सहज
"पकवायला" बरेच जण करतात कविता
पण अशी कविता मात्र खरोखर पकवावी
सुरू करुन "स्वतंत्र विभाग" मात्र आता
तात्या, गावकर्यांची हौस पुरवावी
गौरी आपले स्वागत!
अवांतर - "केनी रॉजर्स" मधील कॉर्न मफीन लई आवडतो.
5 Feb 2008 - 2:47 pm | स्वाती राजेश
मिसळ पाव वर स्वागत.
पुडिंग चा प्रकार मस्त आहे.
करून पाहीन...
5 Feb 2008 - 3:53 pm | विकास्_मी मराठी
िव्कास०१५४
पुडिंग चा प्रकार मस्त आहे.
सौ. ला नक्िक कराय्ला सागेन......
5 Feb 2008 - 5:23 pm | विसोबा खेचर
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार,
नमस्कार...
मंडळी ,मी ह्या संकेतस्थळाची नवीन सदस्य...
सहर्ष स्वागत आहे...
तसे तर मे इथले लेख,चर्चा, कविता इ. नेहमीच वाचत आले आहे पण कधी लेखन नाही केले.पण एकुण इथले प्रेम़ळ आणी खेळीमेळीचे वातावरण बघून वाटलं आपणही ह्याचा आस्वाद घ्यावा.:))
धन्यवाद..:)
म्हणूनच एका पाककृती पासुन सुरुवात केली आहे..
पाककृती उत्तम आहे, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाककृत्या, लेख येऊ द्यात..
तर मी आपण सर्वांना माझी ओळख करून देते..मी गौरी , सध्या कॅनडा ला असते.
नमस्कार. मी तात्या. भारतात असतो! :)
आशा आहे, तुम्ही मलाही मिसळपावात मिसळून घ्याल..:))
अवश्य! मिसळपाव तुमचंच आहे...!
आपला,
(मिपाकर) तात्या.
5 Feb 2008 - 7:31 pm | गौरी
प्राजू, सहज, स्वाति, इव्कास आणी तात्या. सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! :-)
6 Feb 2008 - 10:06 pm | llपुण्याचे पेशवेll
गौरीताई इतरही काही अमेरीकन आणि शक्य झाल्यास मेक्सिकन पदार्थाच्या पाककृती द्याव्यात. शाकाहारी पाककृती दिल्यास उत्तम.
मांसाहारी पाककृतीही दिल्यास अत्युत्तम.
शाकाहारी...
डॅनी.
पुण्याचे पेशवे