मान खाली घालून चाललो
चांदणं कधी दिसलंच नाही
पाण्यात प्रतिबिंब पाहीलं
कधी खरं वाटलंच नाही
मान वर करून चाललो
वाटेत मृगजळ दिसलं
त्यापाठी धावत राहीलो
कधी खोटं वाटलंच नाही
आता मान डोलवू लागलो
काही कठीण राहीलं नाही
लोकांना खुष करू लागलो
खरं खोटं पाहीलंच नाही
प्रतिक्रिया
10 Mar 2017 - 7:31 pm | जव्हेरगंज
चांगली कल्पना!
10 Mar 2017 - 9:09 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह..! गुड वन.
10 Mar 2017 - 9:16 pm | संदीप-लेले
धन्यवाद जव्हेरगंज, आत्मबंध