दिल दोस्ती डिकन्स्ट्रक्शन

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
2 Mar 2017 - 4:56 pm

दिल दोस्ती Deconstruction
सध्या भारतात D-construction किंवा बुद्धिभ्रम करणार्‍यांची चलती आहे. जे जे प्रचलित आहे त्याच्या नेमके उलट काहीतरी बोलायचे. समाजात जे शिष्ट संमत आहे त्यावर प्रश्न उपस्थित करायचे आणि फक्त प्रश्नच उपस्थित करायचे. उत्तरे शोधण्याची जबाबदारी मात्र नाही घ्यायची असे सुरु आहे.

समाज दुर्गेला मानतो का, मग आम्ही महीषासूराची पूजा करणार. समाज लग्न संस्थेला मानतो का मग आम्ही लिव्ह इन रिलेशनचा पुरस्कार करणार. समाजात स्त्री-पुरुष यांचा विवाह होतो का मग आम्ही गे-मॅरेजेससाठी मोर्चे काढणार. समाजात ज्या हेयर स्टाईल प्रचलित असतील त्यापेक्षा वेगळे पायंडे आम्ही पाडणार. जोरदार मिशा, दाढी आणि डोक्यावर मात्र स्त्रियांसारखा अंबाडा घालणार. असे केल्याने आपोआप चार लोक आम्हाला प्रश्न विचारणार, मग आम्ही आभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची बोंब ठोकायला मोकळे.

समाजात काही सर्वमान्य असे महापुरुष असतात. समाज काहींना राष्ट्रपिता, काहींना महात्मा असे मानतो. मग हे लोक त्यांच्याही मूर्तीभंजनाची मोहीम हाती घेतात. त्यांच्या चरीत्रातली काही खुसपटे शोधून वादंग माजवतात असे सध्या सुरु आहे.

बाय द वे
हे करत असताना या सगळ्याला मानवता वगैरे नाव दिले जाते. सगळ्या विद्यापीठांमधे humanities किंवा मानवता वगैरे विद्याशाखांचा उदय झालाय. त्यापूर्वी असलेल्या विद्याशाखा मानवताविरोधी होत्या का !

देशातल्या सर्वोत्तम अशा ज्या टेक्निकल ईन्स्टिट्यूट आहेत तिथेही अशा विद्याशाखांच्या माध्यमातून जेएनयू सारख्या प्रकरणांना समर्थन देण्यासाठी निदर्शने केली जातात. समाजातला प्रत्येक घटक संघर्षरत राहीला पाहीजे. अगदी विद्यार्थ्यानेही रस्त्यावर उतरले पाहीजे. अशी या विचारधारांची अपेक्षा आहे.

आपल्या संस्कृतीला फाट्यावर मारणार्‍या टिव्ही सिरीयल्स यामधे भर घालत आहेत. स्वातंत्र्याच्या नावाखाली ते स्वैराचार मांडत आहेत. कोणी त्याला विरोध केला तर भुंकायला सुरुवात होते कारण स्वैराचार हवा असणार्‍यांना माणसासारखे समाजाचे नितीनियम नको असतात.

मराठीमधे एक दिग्दर्शक आहेत.
त्यांना मराठी भाषेची भयानक चीड आहे. त्यामुळे बोलताना ते शक्यतो इंग्रजीमधेच बोलायला सुरुवात करतात. पण एकही वाक्य पूर्ण करण्याएवढे इंग्रजीचे ज्ञान नसल्याने ते ३ इंग्रजी शब्दांनंतर पुन्हा निरुपायाने मराठीत बोलायला सुरुवात करतात. त्याच्या चित्रपटांमधेही मराठी किंवा भारतीय संस्कृतीवर सूड उगवलेला दिसतो.

प्रेम आणि तरुणाईच्या नावाखाली वाट्टेल ते दाखवणारा त्यांचा दुनियादारी नावाचा सिनेमा आला होता. नंतर त्यांची सिरीयल आली. दिल, दोस्ती, दुनियादारी. वर वर ही मालिका निरागस आणि केवळ मनोरंजनात्मक वाटते. या मालिकेला अनपेक्षितपणे लहान मुलांचा चांगला प्रतिसाद लाभला. पण मनोरंजनाच्या नावाखाली मुलांवर ही मालिका किती स्फोटक संस्कार करते आहे याची पालकांना कल्पना नसते. मानवता विद्याशाखा हे जसे एक गोंडस नाव आहे तसाच हा प्रकार आहे.

एखाद्या देशावर बाहेरून शस्त्रांच्या आधाराने हल्ला न करता विजय मिळवायचा असेल तर त्यांच्यावर आतून हल्ला घडवून आणा. त्यांच्या बलस्थानांवर हल्ला करा. त्यासाठी त्या देशातल्या, त्या समाजातल्याच काही लोकांना एजंट म्हणून हाताशी धरा. कुटूंब व्यवस्था हे जर या समाजाचे बलस्थान असेल तर त्यावर आघात करा म्हणजे समाज आतून कमकुवत होइल. असे सोपे सरळ सूत्र आहे.

दिल दोस्ती दुनियादारी मधे समाजाच्या मान्यतांना असेच धक्के दिले आहेत. एकाच फ्लॅटमधे कॉलेजच्या वयाची ३ मुले आणि ३ मुली एकत्रपणे राहत आहेत. एका मुलीच्या आईबापाचे एकमेकांशी पटत नाही. तिच्या वाढदिवसालाही ते येत नाहीत. मग रूम मेट्सच तिचा वाढदिवस साजर करतात. म्हणजेच जन्मदाते आईबाप शत्रू पण बरोबर राहणारे रूम मेट्स हेच खरे आधार. एकीने नवर्‍याला किंवा नवर्‍याने तिला सोडले आहे. आता ती या मुलामुलींच्या खोलीवर रहायला आली आहे. तिसर्‍या मुलीच्याही आईबापांच्याबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. मुलग्यांचेही घरच्यांशी फारसे पटत नाही. इ. इ.
आपल्या समाजात संस्कारांचे महत्त्वाचे केंद्र म्हणजे आपले कुटूंब. या कुटूंब व्यवस्थेवर घाला घातला की समाज दुभंगायला सुरुवात होतेच.

आता माझ्या टिकेमुळे काही जण व्यथित झाले असतील, त्यांना हा स्वातंत्र्यावर घाला वाटला असेल तर त्यांना माझे इतकेच सांगणे आहे की तुम्हाला जर ही सिरीयल पटत असेल तर केवळ तोंडी पाठींबा देऊन थांबू नका. आपल्या पोरींना आणि पोरांनाही अशाच जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन द्या जेणे करून ही दिग्दर्शक मंडळी धन्य होतील !

ashutoshjog@yahoo.com

मांडणीविचार

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

2 Mar 2017 - 5:18 pm | मराठी कथालेखक

एक प्रश्न
मिपावर जो टंक सर्वसंमत आहे त्यापेक्षा तुम्ही वेगळया रंगाचा टंक (फॉन्ट ) का वापरला आहे ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य का ?

बाकी 'दिल दोस्ती दूनियादारी' मालिकेवरील आक्षेप न पटण्यासारखे. या मालिकेच्या पहिल्या सत्रात तीन मुलगे आणि तीन मुली एकत्र राहतात असे दाखवले, ते निव्वळ परिस्थितीतून उद्भवलेल्या गरजेतून. आणि ते चांगल्या मित्र मैत्रिणीप्रमाणेच राहतात ..लिव्ह इन रिलेशनशिपप्रमाणे यातील कोणत्याही मुलाचा , कोणत्याही मुलीशी शारिरिक जवळीक नसते. फार काय माझ्या आठवणीप्रमाणे या मालिकेत कुठलीही अ‍ॅडल्ट कॉमेडी सुद्दा नव्हती.
मालिकेचे सध्याचे सत्र मी बघत नाहीये, त्यामुळे त्यावर आक्षेप असतील तर त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, पण वरील लेखात नोंदवलेले आक्षेप हे पहिल्या सत्रावरच वाटत आहेत.
बाकी दुनियादारी हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी १९७२ च्या आसपासची असावी

वाचूका's picture

2 Mar 2017 - 7:41 pm | वाचूका

हि मालिका इंग्रजी मालिका फ्रेंड्सवर आधारीत आहे.

कविता१९७८'s picture

2 Mar 2017 - 5:49 pm | कविता१९७८

शक्यतो मी कुठल्याच मालिका पाहत नाही आणि पाहिल्या तर त्या कॉमेडी मालिका समजुनच पाहते. याच काय कुठल्याही मालिका स्फोटकच आहेत. सासु, सुन, शेजारणी , आज्जे सासु यांची कट कारस्थानं हे सगळं ही स्फोटकच पण कॉमेडी मालिका समजुन पाहिली की इतके प्रश्न पडत नाहीत.

पुंबा's picture

2 Mar 2017 - 5:57 pm | पुंबा

एक नंबर.

सासु, सुन, शेजारणी , आज्जे सासु यांची कट कारस्थानं

हे जास्त स्फोटक आहे. हे असले कुटुंब दाखवतात ते तुम्हाला चालतं आणि निखळ मैत्री असणारे ६ तरूण मुले मुली एकत्र राहतात आपली सुख दु:खे वाटून घेतात, एकमेकाला आधार देत नव्या उमेदीने संकटांना सामोरे जातात हे तुम्हाला खुपतं. असो. तुमच्या स्वातंत्र्याचा आदर आहे.

वरील प्रतिसाद लेखाला आहे.

बापू नारू's picture

2 Mar 2017 - 6:02 pm | बापू नारू

मालिकाच त्या, येवड काय शिरियस घ्याच त्यला? टीवी बगुन कूट समाज घडतो का? आणि जीत टीवी चा जास्त प्रभाव आहे तीत ह्या भानगडी होणारच .

एकीने नवर्‍याला किंवा नवर्‍याने तिला सोडले आहे.

तुम्ही नक्की ही सिरीयल बघितलीये ना? कारण नवर्‍याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळून मानसीकदृष्ट्या मोडकळीस आलेल्या मुलीला आधार देणारे ५ दोस्त हीच या मालिकेची थीम आहे. हे सोडलं बिडलं कुठून काढलंत? जाऊ द्या, हा लेख इतक्या पुर्वग्रहांनी भरलेला आहे की मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याचीदेखील इच्छा उरली नाही.

आशु जोग's picture

2 Mar 2017 - 8:20 pm | आशु जोग

:)

माझीही शॅम्पेन's picture

6 Mar 2017 - 12:05 pm | माझीही शॅम्पेन

हा लेख इतक्या पुर्वग्रहांनी भरलेला आहे की मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याचीदेखील इच्छा उरली नाही.

+ ११११

5 वर्षाच्या मुला पासून 85 वर्षाच्या आजोबांपर्यंत सर्वांनी एकत्र बसून पाहावी अशी मालिका लेखकाला अजिबात कळलीच नाही , आता काय डोंबल प्रतिवाद करणार :)

आदूबाळ's picture

2 Mar 2017 - 7:23 pm | आदूबाळ

अच्छा. संस्कारपटू.

चालूद्या...

आशु जोग,

तुमचं म्हणणं पटलं. इथे इंग्लंडमध्ये कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे १९६० च्या दशकात सुरू झालेली लैंगिक क्रांती. या क्रांतीमुळे किती कुटुंबं उद्ध्वस्त झाली याची गणती अशक्य आहे. हिचा पाया तथाकथित स्त्रीमुक्तीमध्य आहे. आज कुटुंबव्यवस्था नष्ट वा सीमित झाल्यामुळे नवयुवकांचा कल एकट्याने राहण्याकडे वाढतो आहे. असे युवक उचित मातापिता बनू शकंत नाहीत. कारण त्यांच्यासमोर आई व बापाचं उदाहरण नसतं. अशी मुलं गुन्हेगारीकडे सहजपणे ओढली जातात. सामाजिक स्थैर्यासाठी कुटुंब सबळ रहाणं अत्यावश्यक आहे.

तर, कुटुंब नाकारण्याचा प्रकार भारतातही चालू द्यावा का? थेट लैंगिक स्वैराचार (म्हणजे लिव्ह इन) उदात्त रंगात रंगवला जात आहे. जेव्हा आपण कुटुंबव्यवस्थेस नाकारतो तेव्हा भावी पिढी गुन्हेगारीकडे ढकलंत असतो. तुम्ही म्हणता तशा या मालिका अनाठायी उदात्तीकरणास उत्तेजन देतात. यावर एक उपाय म्हणजे लोकजागृती करणे. दुसरा उपाय म्हणजे कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व यथोचितपणे अधिरेखीत होईल अशा मालिका बनवणे.

आ.न.,
-गा.पै.

आशु जोग's picture

2 Mar 2017 - 11:09 pm | आशु जोग

उत्तम प्रतिसाद. संपूर्ण लेखाचा विषय लक्षात घेतल्याबद्दल आणि केवळ मालिकेच्या उदाहरणात अडकून न पडल्याबद्दल धन्यवाद !

खट्याळ पाटिल's picture

30 Mar 2017 - 5:36 pm | खट्याळ पाटिल

भारतिय कुटुंबव्यवस्था उद्वस्त करन्या साठिच अशा ह्या मालिका चे उद्योग सुरु आहेत.

सतिश गावडे's picture

2 Mar 2017 - 9:21 pm | सतिश गावडे

ते मराठी दिग्दर्शक कोण?

खग्या's picture

2 Mar 2017 - 10:48 pm | खग्या

त्याच मालिकेमधून मुलांना कठीण परिस्थितीत सुद्धा पाय रोवून संकटांवर मत करून उभं राहण्याचा संस्कार मिळू शकतो. अर्थात तो अर्थ त्याला/तिला तिच्या पालकांनी समजावून दिला पाहिजे. फक्त टी व्ही पाहून मुलांवर संस्कार होत नाही. टी व्ही मधल्या गोष्टींवर घरात/मित्रांमध्ये काय चर्चा होते त्याचा आपल्या जीवनाशी संपर्क कसा येतो या वरून संस्कार होत असतो. पालकांनी योग्य मार्गदर्शन केल्यास त्या मालिकेतून तरी चांगल्या आणि घेण्यासारख्या खूप गोष्टी सापडतील. तुम्ही सकारात्मक विचार करता कि नकारात्मक या वर सगळं अवलंबून आहे.

बाकी दुनियादारी सिनेमाबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. सिनेमा बघायचा कि नाही आणि कोणता बघायचा हे मार्गदर्शन पालक करूच शकतात आणि वेळप्रसंगी विशिष्ट गोष्टींवर बंदी सुद्धा घालू शकतात. म्हणून एखाद्या सिनेमाच्या (किंवा बऱ्याचशा सिनेमांच्या) आशयावर आक्षेप असेल तर त्या सिनेमावर बंदी आणावी, पण म्हणून इतरांना नावं ठेवणं योग्य नाही. त्यांना आवडतं ते त्यांनी बनवलं, तुम्हाला बघायचं तर बघा नाही तर सोडून द्या.

आणि सोडून देणं जमत नसेल तर तुम्हाला आवडतं तसं बनवण्याची जबाबदारी घ्या (अर्थात आर्थिक, साहित्यिक, आणि तांत्रिक सर्व जबाबदारी घ्यावी लागेल. ). वांझोटी टीका करून काहीही फायदा नाही.

धडपड्या's picture

2 Mar 2017 - 11:39 pm | धडपड्या

प्रसन्न देशपांडेंचं मार्क्सवादावरचं व्याख्यान ऐकल्यासारखं वाटलं...

छान आहे...

अत्रे's picture

3 Mar 2017 - 9:12 am | अत्रे

सगळ्या विद्यापीठांमधे humanities किंवा मानवता वगैरे विद्याशाखांचा उदय झालाय.

कधी पासून? १९८०? १९६०? १९४०?

धडपड्या's picture

3 Mar 2017 - 10:43 am | धडपड्या

1960 च्या सुमारास हर्बर्ट मार्कस ने"ग्रेट रिफ्युजल" थिअरी मांडली.. साधारणतः यात इतिहासाची पुनर्मांडणी, संविधानीक लोकशाहीवर हल्ला, नॅचरल लाॅ, बहुमताला विरोध, लिमीटेड सरकार वगैरे मुद्दे होते..

यासाठी ग्रामची, अल्थसेर, होगार्ट, हाॅल, थाॅमसन वगैरे लेखकांचा आधार होता.. यांनी मार्क्सची पुनर्मांडणी केली. यांनी कल्चर मध्यभागी आणले, आणि बाकीचे सुपरस्ट्रक्चर आहे, असे मानले.. यामुळे, जर सोशल रिफाॅर्म हवा असेल, तर कल्चरल रिफाॅर्म आवष्यकच आहे..

याला त्यांनी "न्यू लेफ्ट" म्हटले..
आता जे सांस्कृतिक बदल दिसत आहेत, ते या न्यू लेफ्टचाच परिणाम आहे...

अत्रे's picture

3 Mar 2017 - 9:15 am | अत्रे

सिरीयल पटत असेल

म्हणजे नेमकं काय?

दिल दोस्ती दुनियादारी मधे समाजाच्या मान्यतांना असेच धक्के दिले आहेत. एकाच फ्लॅटमधे कॉलेजच्या वयाची ३ मुले आणि ३ मुली एकत्रपणे राहत आहेत. एका मुलीच्या आईबापाचे एकमेकांशी पटत नाही. तिच्या वाढदिवसालाही ते येत नाहीत. मग रूम मेट्सच तिचा वाढदिवस साजर करतात. म्हणजेच जन्मदाते आईबाप शत्रू पण बरोबर राहणारे रूम मेट्स हेच खरे आधार. एकीने नवर्‍याला किंवा नवर्‍याने तिला सोडले आहे. आता ती या मुलामुलींच्या खोलीवर रहायला आली आहे. तिसर्‍या मुलीच्याही आईबापांच्याबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. मुलग्यांचेही घरच्यांशी फारसे पटत नाही. इ. इ.

तुम्हाला असे म्हणायचे आहे का, कि ही सिचुएशन शक्यच नाही आहे?

मनिमौ's picture

3 Mar 2017 - 10:27 am | मनिमौ

एकंदरीत लेख वाचून माझ्या मते तुम्हाला आयुष्यात जिवाला जीव देणारे मित्र मैत्रिणी मिळाले नसावेत अशी दाट शंका येते

गामा पैलवान's picture

3 Mar 2017 - 12:33 pm | गामा पैलवान

मनिमौ,

जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी असू शकतात. पण ते प्रत्येकाला मिळतीलंच असं नाही. याउलट जिवाला जीव देणारं आपलं कुटुंब मात्र प्रत्येकाजवळ असतं. कौटुंबिक मूल्यांकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना?

आ.न.,
-गा.पै.

आशु जोग's picture

3 Mar 2017 - 4:07 pm | आशु जोग

जेएनयू नंतर आता बीएचयू चा वाद निर्माण केला जातोय . . .

इथे पहा

अत्रे's picture

3 Mar 2017 - 1:09 pm | अत्रे

एक प्रश्न,

तुमचा प्रॉब्लेम काय आहे? ही (किंवा अशा) मालिका मराठीत आहे/आहेत म्हणून का?

म्हणेज सेम आशयाची सीरिअल इंग्रजी/हिंदी मध्ये असती तरी पण आक्षेप असला असता का? मग आपल्याकडची तरुण मुले कोणत्या इंग्रजी मालिका बघतात याची तुम्हाला कल्पना आहे का?

मनिमौ's picture

3 Mar 2017 - 6:37 pm | मनिमौ

कौटुंबिक मुल्य म्हणजे काय तर अडचणीत सापडलेल्या लोकाना मदत करा. एकमेकांना समजून घ्या. परस्पर नात्यांचा आदर करा. आताच्या जमान्यात पण तुम्ही केवळ आई वडिल भाऊ बहीण याच नात्यांना कुटुंब मानत असाल तर बोलणे खुंटले

गामा पैलवान's picture

3 Mar 2017 - 7:08 pm | गामा पैलवान

मनिमौ,

अगदी अचूक बोललात पहा! पाश्चात्यांच्या जीवनशैलीत नेमक्या याच मूल्यांचा ऱ्हास घडून आलेला आहे.

इथे इंग्लंडमध्ये वय वर्षे पंधराची मुलगी जेव्हा आपल्या दुप्पटतिप्पट वयाच्या पुरुषावर टवके टाकू लागते, तेव्हा तिच्या घरात कुठेतरी कुठल्यातरी कौटुंबिक मूल्यांना कसर लागलेली असते. पित्याचं प्रेम मिळालं नाही की मुलगी घराबाहेर प्रेम शोधायला जाणारंच. तिचा काही दोष नाही यांत.

आ.न.,
-गा.पै.

आशु जोग's picture

5 Mar 2017 - 1:24 am | आशु जोग

लोकसत्ताच्या चतुरंग मधे प्रसिद्ध झालेला हा लेख पहा . .

‘फिराक’ हा तिच्या फिल्म प्रॉडक्शन कंपनीचा पहिलावहिला चित्रपट गुजरात येथे झालेल्या दंगलीवर भाष्य करत मानवी भाव-भावनेचं चित्रण करतो. या चित्रपटास अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. प्रॉडक्शन कंपनीबाबत बोलताना नंदिता सांगते की, ‘आपण चित्रपटांना काही साच्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो. नाच, गाणी पाहणारे अनेक लोक आहेत. ती त्यांची आवड आणि पर्यायही आहे. हे वास्तव असलं तरीही १० टक्के लोक असेही आहेत ज्यांना खरोखरीच संवेदनशील विषयावरील अर्थपूर्ण चित्रपट आवडतात. त्या लोकांना पर्याय देण्यासाठी म्हणून ही कंपनी सुरू केली आहे.

नंदिता चर्चेत आली ती तिच्या दीपा मेहता दिग्दर्शित ‘फायर’ या चित्रपटाच्या वेळी. यात लग्नसंस्थेत फसलेल्या दोघी जणी एकमेकींच्याच प्रेमात कशा पडतात याची कहाणी तीही समलैंगिक संबंधांवर भाष्य करत पुढे सरकते. यातील एका समलैंगिक स्त्रीची भूमिका नंदिताने स्वीकारली आणि ती उत्तमरीत्या साकारही केली.

हटके विचार

फारच गंभीर प्रश्न म्हणायचा की हा!! खरंतर झी वाल्यांनी "सांस भी कभी बहु थी" मराठीत डब करुन दाखवायला हवं, म्हणजे मराठी मनावर कुटुंब व्यवस्थेचे संस्कार घडतील आणि त्यामागोमाग एक प्रवचनांचा अर्ध्या तासाचा कार्यक्रम ठेवायला हवा, म्हणजे आध्यात्म ही शिकायला मिळेल. नै त्याचं काये, मालिका बघून समाज घडत असेल तर त्यांनी हे करायला पाहिजे.

संदीप डांगे's picture

3 Mar 2017 - 7:01 pm | संदीप डांगे

छान, उत्तम सुविचारी लेख!

सूडराव आणि डांगे भौंशी सहमत!

टवाळ कार्टा's picture

5 Mar 2017 - 11:25 am | टवाळ कार्टा

अज्यातैनषि ण्येमी परमाने बाडीस

गामा पैलवान's picture

6 Mar 2017 - 12:47 pm | गामा पैलवान

सौरा,

तुम्ही नक्की ही सिरीयल बघितलीये ना? कारण नवर्‍याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळून मानसीकदृष्ट्या मोडकळीस आलेल्या मुलीला आधार देणारे ५ दोस्त हीच या मालिकेची थीम आहे. हे सोडलं बिडलं कुठून काढलंत? जाऊ द्या, हा लेख इतक्या पुर्वग्रहांनी भरलेला आहे की मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याचीदेखील इच्छा उरली नाही.

कौटुंबिक मूल्यांची घसरण व हानी दाखवणाऱ्या कार्यक्रमास इतका टीआरपी मिळावा का असा प्रश्न आहे. त्यातनंच लेखकाचा पूर्वग्रह उत्पन्न झाला आहे. हा पूर्वग्रह एक प्रकारची बचाव यंत्रणाच (= डिफेन्स मेक्यानिझम) आहे म्हणा ना.

आ.न.,
-गा.पै.

आशु जोग's picture

6 Mar 2017 - 1:09 pm | आशु जोग

डिफेन्स मॅकेनिझम हे पटले

पण

त्याला पूर्वग्रह म्हणू नका

मला तसं वाटत नाही. जगण्याची एखादी विचारधारा आहे ( उदा. सौख्यपूर्ण वैवाहिक जीवन) आणि तीला शह म्हणून दुसरी विचारधारा निर्माण केली जाते आहे (उदा. लीव-इन). या दोन्हींचा समग्रतेनं विचार केला आहे त्यानं स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडणं म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करणं नाही. जर विरोधी विचारसरणीच्या लोकांनी त्याला निरुत्तर केलं तर त्यांच्या विचाराच्या प्रभावीपणाला अनुयायी मिळतील.

आशु जोग's picture

6 Mar 2017 - 3:22 pm | आशु जोग

आज भले ती सिरीयल तितकीशी उपद्रवी वाटत नसेल पण त्यामधे काही बीजे अशी असतील की उद्या त्याची मिळणारी फळे घातक असू शकतील

संजय क्षीरसागर's picture

6 Mar 2017 - 4:16 pm | संजय क्षीरसागर

पण आपल्या स्वास्थ्याचा मूळ आधार असलेलं वैवाहिक जीवन ही पाश्चात्यांना खुपणारी गोष्ट आहे हे नक्की. आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या नांवाखाली लीव-इन आणि आता हे नवं `ग्रुप लीव-इन' या कल्पना विवाह या बेसिक विचारधारेला सुरुंग लावण्याचं काम करतायंत यात शंका नाही. एखाद्याला उगीच संस्कृती रक्षणाची फालतू लेबलं लावण्यापेक्षा विरोधी विचारधारेच्या लोकांनी दिस-वर्सेस-दॅट अशी सरळ चर्चा केली तर खरा निष्कर्श निघेल.

सूड's picture

6 Mar 2017 - 5:14 pm | सूड

`ग्रुप लीव-इन'

कसलं सुपीक डोकं आहे राव तुमचं!! पुढल्या कट्ट्याला शाल श्रीफळ देऊन तुमचा सत्कार करायचा आहे सर, प्लीज नाही म्हणू नका.

दिल दोस्ती हे "ग्रुप लिव इन" असेल तर हळदीकुंकू ही ऑर्जी म्हणायला हवी ;)

दिल दोस्ती हे "ग्रुप लिव इन" असेल तर हळदीकुंकू ही ऑर्जी म्हणायला हवी ;)

खरंच!! =))
आणि हे ग्रूप लिव्ह ईन वैगरे लिहिणार्‍यांना मुळात लिव्ह ईन कशाशी खातात हे माहित असलं तरी तळ्यातला गणपती पावला म्हणायचा. =))

संजय क्षीरसागर's picture

7 Mar 2017 - 8:32 pm | संजय क्षीरसागर

लीव इनवर चर्चा होणार असेल तर तुम्ही प्रतिवादाची आशाच सोडा. आणि सत्कार वगैरेची भाषा बाजूला ठेवून खरी तयारी असेल तर तुमचा याविषयीचा जो काय अनुभव असेल त्यावर एक स्वतंत्र धागा काढा.

यू ट्यूबवर मी पाच-सात मिनीटं त्या सिरियलमधला एपिसोड पाहिला. वरकरणी त्याला ग्रुप लीव-इन चा रंग नाही हे मान्य करतो. त्यामुळे माझा हा मूळ मुद्दा ....
जगण्याची एखादी विचारधारा आहे ( उदा. सौख्यपूर्ण वैवाहिक जीवन) आणि तीला शह म्हणून दुसरी विचारधारा निर्माण केली जाते आहे (उदा. लीव-इन).

जरी वॅलीड असला तरी या पोस्टला तो सरळ अ‍ॅप्लीकेबल नाही हे मान्य करतो. अर्थात, तुम्ही लीव-इनच्या सार्थकतेवर धागा काढा म्हणजे रंगतदार चर्चा होईल आणि नव्या पिढीचे काय उदात्त विचार आहेत ते जाहीर होईल .

आशु जोग's picture

13 Mar 2017 - 2:16 pm | आशु जोग

तुम्ही खाता वाटतं

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 2:56 pm | संजय क्षीरसागर

.

आशु जोग's picture

13 Mar 2017 - 3:11 pm | आशु जोग

तुमच्या वरच्या प्रतिसादाला

आशु जोग's picture

6 Mar 2017 - 1:06 pm | आशु जोग

एखादी गोष्ट पाहण्यापूर्वी असतो तो पूर्वग्रह

मालिका पाहिल्यानंतर पूर्वग्रह कसा

संजय क्षीरसागर's picture

6 Mar 2017 - 2:39 pm | संजय क्षीरसागर

कुटुंब व्यवस्था हे जर या समाजाचे बलस्थान असेल तर त्यावर आघात करा म्हणजे समाज आतून कमकुवत होइल. असे सोपे सरळ सूत्र आहे.

हे निरीक्षण १००% बरोबर आहे !

आशु जोग's picture

7 Mar 2017 - 9:46 am | आशु जोग

अगदी सुरुवातीलाच म्हटलं होतं. काही जणांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. पण दिल दोस्तीबद्दल बोलल्याने एवढ्या प्रमाणात भावना दुखावत असतील असं वाटलं नव्हतं !

संदीप डांगे's picture

7 Mar 2017 - 10:39 am | संदीप डांगे

कोणी कोणाची किव करत असेल तर त्याला भावना दुखावणे म्हणतात हा एक नवीन अर्थ आज कळला! ;-)

वेल्लाभट's picture

7 Mar 2017 - 10:49 am | वेल्लाभट

ओह आय सी.

ट्रेड मार्क's picture

8 Mar 2017 - 3:25 am | ट्रेड मार्क

दिल दोस्ती मालिका लिव्ह इन वर आहे हे म्हणणारे धन्य आहेत. यात त्या प्रकारचे काहीही दाखवलेले नाही. परिस्थितीने सगळ्यांना एकत्र आणले व रोजच्या जीवनातील अडचणींवर ते एकमेकांच्या आधाराने कशी मात करतात हे दाखवलंय. त्यामधले कोणीही टीनएजर वगैरे नाहीत ना कोणाची आपसात प्रेमप्रकरणे चालू आहेत. कुठल्याही प्रकारची, अगदी आडून आडून वा सूचक सुद्धा, शारीरिक जवळीक नाहीये. त्यामुळे एकतर मालिका नीट बघितली नाहीये किंवा ऐकीव माहितीवर मत बनवलेलं आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात नुसती मैत्री असूच शकत नाही या जुनाट विचाराच्या प्रभावातून बाहेर या.

आक्षेपच घ्यायचा तर, माझ्या नवऱ्याची बायको, खुलता खुळी खुलेना या मालिकांना घ्यावा. कारण त्यात विवाहबाह्य संबंध, पार्टीमध्ये दारू जास्त प्यायल्यावर आलेल्या संबंधामुळे लग्नाआधी गरोदर राहिलेली मुलगी यासारखे प्रसंग आहेत.

संजय क्षीरसागर's picture

8 Mar 2017 - 1:08 pm | संजय क्षीरसागर

दिल दोस्ती मालिका लिव्ह इन वर आहे हे म्हणणारे धन्य आहेत.

माझा वरचा प्रतिसाद न वाचताच लिहीलेलं दिसतंय !

यू ट्यूबवर मी पाच-सात मिनीटं त्या सिरियलमधला एपिसोड पाहिला. वरकरणी त्याला ग्रुप लीव-इन चा रंग नाही हे मान्य करतो.

तुम्हीही फक्त पाहिलंच वाक्य वाचलेलं दिसतंय.

बादवे - पाच सात मिनिटं बघून एका वर्षापेक्षा जास्त चाललेल्या मालिकेवर अधिकारवाणीने मत व्यक्त करताय म्हणजे भारीये. "वरकरणी त्याला ग्रुप लीव-इन चा रंग नाही हे मान्य करतो" या वाक्याचा अर्थ ही मालिका वरकरणी तशी वाटत नसली तरी छुपा उद्देश तोच आहे असा वाटतोय.

संजय क्षीरसागर's picture

14 Mar 2017 - 6:00 pm | संजय क्षीरसागर

मला कोणत्याही मालिकेत काहीही रस नाही. जीवनाकडे बघण्याचा लोकांकडे काही वेगळा अंदाज़ आहे का या अँगलनं मी ते एपिसोड बघितले.

आशु जोग's picture

15 Mar 2017 - 8:09 pm | आशु जोग

तुम्ही प्रत्येक गोष्टीत चांगलं तेच बघता हे चांगलं आहे !