मराठी भाषा दिन २०१७: आमुशा (हुबळी, शिकारपूर, मैसूर बोलीभाषा)

सचिन७३८'s picture
सचिन७३८ in लेखमाला
25 Feb 2017 - 1:32 pm

1
.
‘ना नीन्न बिडलारे’ फिलम बगासाटी तना सुरेश टाकीजमंदी जारलता. सैतानचे फिलम बगुवा मसून लई रोजने तचे मनात होते. जारले टायमात गरचे “भिशील बे” मसून मसून धांदला करून सोडले व्हते. बगिटले तर तना सा वाजताचेनाच टाकीजला जाऊन सोडनार ओता. गरचे तला मस्कीरीमदी “रात्रीचे १२ वाजताचे बरूबर ओते शो” मसून मटलेसनीच तंना हायकी मनाला लागून घून सोडून १२ ला निगाला ओता.

रात्री ते रस्त्याला गाड्या-घोडे कायबी नवते तसटी तंना चालून घेत जाताय. बगिटले तरं रस्त्यावर कोनीबी नईसारके होते. तंना घाबरून घेतंच जारलाय. कसीतरी टाकीजला घाबरत पोंचून तना बगताय तर लोकांचे कायबी गलाटा नई तित्ते, खाली एक पंदरा ईस लोके. गरंला जावं तरं तनी अनिंदा बी मस्कीरी करतात मसून तना तिकीट काडूनं फिलम बगायला बसून सोडला.

फिलम मटले तर खाली न्हवीन लगीन झारलेलेंचे जिंदगीतं सैतान येते दाखूले व्हते. ते बाईचे अंगात सैतान येते तवा नवरा तीला वाचूं घालतेलेसटी लई संगर्ष करता असी कहाणी होते. पष्ट हाप परंतर सुरेश कसीतरीकी करून फिलम बगताय. दुसरे हापमदी तीचे अंगात सैतान येते ते अवतार बगूनच तना अर्धातने उटून गरी जायसाटी टाकीजचे भाएर पडताय.

उगीच फिलम बगासाटी आलो, लई भ्याले असी विचार करूंन घेतच तना पटापटा चालरलाय. ते रस्ता लई खराब हाय असी लोके म्हटले रहते नई. दोपारी ऑटो मारणारेंना तंचे पाटीमागूटने आईनात बाईचे मुंडी दिसते असी लोके म्हणरलात. तसे इचार सुरेशला मनामंदी येतोते. लोके कायबी लटके सांगूटलात असी तना स्वतालाच म्हणून घेत अजून जलदी चालत येरलाय.

कसीतरकी करून तना एकदाचेलाबी गराजवळ पोंचला. तला कायबी सुचेनासारके होले. सगळे घरं तला सारकेच दिसून ऱ्हायले. तंना घाबरूनं तिगडेस्काळाचं चक्कर येऊन पडून सोडला.

नस्कतला तंला जागे होले. तंचा अण्णा तंला उठून घालरलाय. “रात्रीपासून हुडकूरलोय बा तुला, तरी सांगिटलो हुतो आमुशाला जांऊ नको मसून”, अण्णा मटला. काल रात्री अंदार लई कसटी होता ते सुरेशला आठुले. तंला आमुशाचे चंगलेवनी हाथ पडले होते.
.
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Feb 2017 - 2:23 pm | पैसा

भारी किस्सा! छान वाटतेय ही बोली वाचायला. ऑडिओ तयार करणार का?

बरेच शब्द अवघड वाटले, पण वाचायला मजा आली. ऑडिओक्लिप करून इथे टाका.

बरेच शब्द अवघड वाटले, पण वाचायला मजा आली. ऑडिओक्लिप करून इथे टाका.

सस्नेह's picture

25 Feb 2017 - 3:04 pm | सस्नेह

मजेशीर वाटते बगा हे भाष !

बबन ताम्बे's picture

25 Feb 2017 - 3:43 pm | बबन ताम्बे

बरेच शब्द समजले नाहीत. ,

छान लिहीले आहे, कठीण शब्दांचे अर्थ टा लिहीले तर बरे होईल,

नि३सोलपुरकर's picture

25 Feb 2017 - 4:48 pm | नि३सोलपुरकर

लय बारी लिवलंय बघा .

अजून एक हुन जाऊद्या .

'ना निन्न बिडलारे' भारी होता एकदम.

सतिश गावडे's picture

25 Feb 2017 - 8:14 pm | सतिश गावडे

मस्त. ही भाषा बोलताना कानडी भाषेसारखा हेल काढून बोलत असतील ना?
अशोक सराफ यांच्या काही जुन्या चित्रपटातील पात्रे बोलतात या भाषेत.

साती's picture

27 Feb 2017 - 9:49 pm | साती

वेगळीच आहे ही भाषा!

चतुरंग's picture

27 Feb 2017 - 11:35 pm | चतुरंग

शंकर पाटलाचं 'मीटिंग' गोस्ट मधलं देसाई अन्ना ऐकल्यासारकं वाटलं की हो!
अरे ल्ही की रे अजून!

पैसा's picture

28 Feb 2017 - 7:24 pm | पैसा

इचारं हा अजून एक नमुना.

प्रीत-मोहर's picture

28 Feb 2017 - 8:08 am | प्रीत-मोहर

मस्त. Audio च मनावर घ्याच

आमच्या इथे गुरुकुलम मध्ये या भागतून आलेली काही विमुक्त मुले आहेत. ती मुले आपसात बोलताना अशी भाषा बोलतात. आपल्याशी बोलताना मात्र प्रमाण भाषा !!!!!

किस्सा आवडला. याचा ऑडिओ पाहिजे खरं..

नूतन सावंत's picture

28 Feb 2017 - 6:45 pm | नूतन सावंत

वेगळाच बाज आहे हा .