मराठी भाषा दिन २०१७: इचारं (हुबळी, शिकारपूर, मैसूर बोलीभाषा)

Primary tabs

सचिन७३८'s picture
सचिन७३८ in लेखमाला
27 Feb 2017 - 9:27 am

1
.
‘अप्पण्णम्मा, टप्पण्णम्मा’ धाकटा इशालं तंचे आतीसोबत खेळरलते. आतीबी इशालबरूबर खेळतानी धाकटी व्हलरती. बाजूकडे थोरला दर्शनं भोरा-दोरी घिउनं फिरूवाचेले कोसिस करलेयताय. जरागडी कोसिसं करूनं तंला हायकी भोरा फिरवालाचं ईनसारके हून बसले. मागूटने तंना की मोट्याने हाका माराला सुरू करूनगून सोडला. ‘ए आती, भोरा फिरचना गा’ मसून. आती तला मटली, ‘खेळाला आले नई तर ठून येजा, जरागडी उगीच बसा आता’.

दर्शनं बोलला, ‘नम्मे, तू फिरवाचे सांग मन्ना, अनि कसी फिरतेते भोरा’. आती बोलली, ‘नई बा, तुमी लोके सकाळे सात घंटेचेने खेळरालात. आता न्हऊ वाजले. न्यारीला उप्पीट केले हायं. ते खाऊनं आंगूळं कराव आता’. दर्शनं रागूनं भोरा कोणचेतरीकी कोपऱ्यात भिरकून सोडताय. तंचे आती तंला म्हणती, ‘अय्ययं देवा, ए खेकडीके भोरा गमते रे’. तजे बगून इशालबी तजेमागे ‘अण्णा, अण्णा’ मसून जारलाय.

आतमदी जाऊनं दर्शनं तंचे काकासीला इचारालाय, ‘काका हामी कवा जातातं कोलापूरला?’ ‘अजून किती रोजाने जातात आमी?’ काका तंला वैतागूनं बोलताय, ‘पैया येईना ते बेंकमदूनं, नोटंच निगेना तिते, ते आलेसनीच आपण जाऊन सोडूवा कोलापूरला’. दर्शनचे काका लई रोजपासूनं बेंकमदी जारलाय. ते बेंकमदे लई लोके लैनीमदी हुबे राहून गलाटा होले पूरा बेंकमदी. तसटी तला हायकी पैसाच मिळनासारके हून बसले. ‘दोन रोजातं रिजूरशन करूवाचे अनि गावाला जातेले हायं. पोरे कायकी लई हुरूप करून सोडलातं. आता कसी होते की कायकी.’ मसूनं तला मनामंदी इचार पडले होते.
.
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Feb 2017 - 9:53 am | पैसा

काही कानडी शब्द ओळखीचे दिसले. थोडी हैदराबादी हिंदीचीही छाप वाटते आहे. या बोलीच्या नमुन्यांसाठी खूप धन्यवाद! शक्य असेल तर वाचनाचे रेकॉर्डिंग करून अपलोड करा. आणि लिहीत रहा.

साती's picture

27 Feb 2017 - 9:53 pm | साती

हा पण इटुकला लेख आवडला.

कविता१९७८'s picture

2 Mar 2017 - 5:22 pm | कविता१९७८

छान लेख