ताज्या घडामोडी - ३

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
31 Oct 2016 - 8:16 pm
गाभा: 

ताज्या घडामोडी - १
ताज्या घडामोडी - २

मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

10 Dec 2016 - 11:18 pm | अमितदादा
आनंदयात्री's picture

12 Dec 2016 - 12:48 am | आनंदयात्री

या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आणि दुव्यांसाठी धन्यवाद.

शलभ's picture

12 Dec 2016 - 2:45 pm | शलभ

+१

अमितदादा's picture

23 Dec 2016 - 8:57 pm | अमितदादा

भारतीय वैद्यकीय क्षेत्रात होणारा भ्रष्टाचार, नफेखोरी आणि अनियमितता दिवसो दिवस प्रचंड वाढत चाली आहे. हृदयावरील होणार्या angioplasty शस्त्रक्रिये मध्ये वापरण्यात येणाऱ्या stent मध्ये होणार्या भरमसाठ नफेखोरी वरती, तसेच यामध्ये असणाऱ्या दलाल, डॉक्टर, हॉस्पिटल आणि stent कंपन्यातील साखळीवर outlook ह्या मासिकाने वाचनीय अशी कवर स्टोरी लिहिलेली आहे.
Heart For Mart Sake
The Pass-Pass Scam

ह्या बातमीनुसार २०-२५ हजार किमत असणारी stent १.५-२ लाख किमतीने कशी विकली जाते याची इंत्यांभूत माहिती दिलेली आहे. अशी प्रचंड नफेखोरी होत असताना ह्या कंपन्यांचा, दलालंचा आणि डॉक्टरांचा सरकारवर stent चा NLEM मध्ये समावेश करू नये म्हणून असणारा दबाव हि अधोरेखित केला आहे.

अवांतर> ह्या बातमीनुसार AIIMS ह्या भारतातील अत्यंत प्रगत आणि अग्रगण्य रुग्णालयाने मागील वर्षी १९५८ angioplasties केल्या तिथे पुण्यातील एका प्रतिष्टीत खासगी रुग्णालयाने २५००० angioplasties केल्या.

गामा पैलवान's picture

23 Dec 2016 - 10:13 pm | गामा पैलवान

लोकहो,

नुकतीच २० डिसेंबर रोजी रशियाचे तुर्कास्थानातले राजदूत आंद्रेई कारलोव्ह यांची एका तुर्की पोलिसाने गोळी मारून हत्या केली. याच सुमारास मॉस्को येथे रशियन मुत्सद्दी पेत्र पोलशिकोव्ह याची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दोन्ही हत्या संबंधित आहेत का हे पहाणं रोचक ठरावं.

कारलोव्ह यांची हत्या एका पोलिसाकडून झाली आहे. हे तुर्कस्थानाचे पंतप्रधान अर्दोवान यांची प्रशासनावरील पकड ढिली पडल्याचं लक्षण आहे. जुलै महिन्यात अर्दोवान यांनी पोलीस, सैनिकी, नागरी प्रशासकीय सेवक, शिक्षक, इत्यादिंची घाऊक प्रमाणावर बडतर्फी केली होती. अशा प्रकारे बडतर्फी केल्याने समाजात असुरक्षितता वाढते. यातून असंतोष बळावतो आणि सुरक्षाव्यवस्थेला खिंडारं पडतात. ही यादवीसाठी अनुकूल परिस्थिती मानली जाते. अर्दोवान कसे नियंत्रण प्रस्थापित करतात हे पाहणे रोचक असेल.

आ.न.,
-गा.पै.

मणिपूर हे ईशान्य भारतातील छोट राज्य गेले दोन महिने आर्थिक नाकेबंदी संकटामुळे होरपळून निघत आहे. केंद्र सरकार, राष्ट्रीय माध्यमे ह्या गोष्टीकडे कानाडोळा करत असताना दिसून येत आहेत. मुळात मणिपूर हे राज्यच वांशिक हिंसाचाराने पिडीत आहे, ह्या राज्याचे दोन मुख्य भाग पडतात मध्य मैदानी भाग जिथे मैती लोक राहतात आणि डोंगराळ भाग जिथ नागा आणि कुकी ह्या जमाती राहतात, ह्या प्रमुख जमाती मध्ये होणार्या सततच्या कुरबुरी मुळे हिंसाचार आणि अडवणूक मणिपूर च्या पाचवीला पुजली आहे. मणिपूर ला मुख्य देशाशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग हे नागा च्या आधिपत्याखालील भागातून जातात जिथे नागा लोकांनी हे महामार्ग पूर्ण बंद करून ठेवले आहेत ते हि जवळजवळ गेले दोन महिने . अर्थात हे काही तेथील लोकांना नवीन नाही मणिपूर ची मागे हि १०० दिवस आर्थिक नाकेबंदी केली गेली होती परंतु केंद्र सरकार ने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही आतासुद्धा केंद्र सरकारच्या पातळीवरून गंभीर पणे कोणतीही हालचाल दिसत नाही. भारतातील कोणत्याही मुख्य राज्यात काही झाल्यास जागरूक असणाऱ्या केंद्र सरकार आणि राष्ट्रीय माध्यमांची तत्परता ईशान्येकडील राज्ये २ महिने जळत असताना कुठ जाते हे काही कळत नाही.
सध्यातरी किरेन रीज्जू यांची मणिपूर भेट, दलबीर सिंघ आणि राजनाथ सिंघ याचं ब्रीफिंग याच्यापुढ केंद्र सरकार ने काही हि केलेलं दिसत नाही.
सध्याच्या नाकाबंदिला मणिपूर मध्ये नागांना विश्वासात न घेता केलेल्या नवीन सात जिल्ह्यांची निर्मिती हे कारण आहे. परंतु ह्यामागे बरीच राजकीय करणे दडलेली आहेत हे नक्की.
Manipur’s old patterns of violence reignited

Blockades are nothing new to Manipur, but this time it’s different

अवांतर>>>> मागे चीन पाकिस्तान आणि रशिया यांच्या जवळकी बद्दल व्यक्त केलेली शंका खरी ठरतीय कि काय अश्या घडामोडी घडत आहेत. एक NDTV वरील सुंदर लेख
Pak-Russia-China Get Closer. What That Means For India

श्रीगुरुजी's picture

25 Dec 2016 - 3:32 pm | श्रीगुरुजी

तब्बल ४ वर्षानंतर सिरियन लष्कराने इसिसच्या ताब्यातून अलेप्पो शहर जिंकून घेतले आहे. इसिसचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. अलकायदाप्रमाणे इसिसदेखील काही काळाने जवळपास नामशेष होईल. अर्थात रक्तपाताची चटक असलेले धर्मांध मुस्लिम एखादी नवीन संघटना काढून रक्तपात सुरूच ठेवतील.

जरी इसिस संपूर्ण नष्ट झाली तरी अनेक युरोपिअन देशात कायदेशीर/बेकायदेशीर मार्गाने घुसलेले इराकी व सिरियन निर्वासित आपल्या देशात परत जाणार नाहीत. आहेत तिथेच ते आता कायम राहून त्या देशांना उपद्र्व देत राहणार. गेल्या २ वर्षात फ्रान्स, जर्मनी व तुर्कस्तानमध्ये निर्वासितांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. भविष्यात हेच होणार आहे. मानवतेचा कळवळा आणून हा उपद्र्व स्वतःहून गळ्यात बांधून घेतलेल्या या देशांना अतिरेकी हल्ल्यांची शिक्षा मिळणारच आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Dec 2016 - 3:32 pm | श्रीगुरुजी

तब्बल ४ वर्षानंतर सिरियन लष्कराने इसिसच्या ताब्यातून अलेप्पो शहर जिंकून घेतले आहे. इसिसचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. अलकायदाप्रमाणे इसिसदेखील काही काळाने जवळपास नामशेष होईल. अर्थात रक्तपाताची चटक असलेले धर्मांध मुस्लिम एखादी नवीन संघटना काढून रक्तपात सुरूच ठेवतील.

जरी इसिस संपूर्ण नष्ट झाली तरी अनेक युरोपिअन देशात कायदेशीर/बेकायदेशीर मार्गाने घुसलेले इराकी व सिरियन निर्वासित आपल्या देशात परत जाणार नाहीत. आहेत तिथेच ते आता कायम राहून त्या देशांना उपद्र्व देत राहणार. गेल्या २ वर्षात फ्रान्स, जर्मनी व तुर्कस्तानमध्ये निर्वासितांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. भविष्यात हेच होणार आहे. मानवतेचा कळवळा आणून हा उपद्र्व स्वतःहून गळ्यात बांधून घेतलेल्या या देशांना अतिरेकी हल्ल्यांची शिक्षा मिळणारच आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Dec 2016 - 3:57 pm | श्रीगुरुजी

काँग्रेसची उ.प्र. मध्ये जोरदार फजिती होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून काँग्रेसने भक्कम पैसे मोजून प्रशांत किशोर यांना उ. प्र. मधील विधानसभा निवडणुकीसाठी धोरण सल्लागार म्हणून नेमले. काँग्रेसने उ. प्र. मध्ये कोणाशीही युती न करता स्वबळावर निवडणुक लढविण्याचे ठरविले होते. राहुल किंवा प्रियांका यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे हा प्रशांत किशोरांचा सल्ला काँग्रेसने धुडकावून लावला.

नंतर प्रशांत किशोरांच्या सल्ल्यावरूनच ब्राह्मण असलेल्या ७८ वर्षीय शीला दिक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यानंतर शीला दिक्षितांना घेऊन ३ दिवसांची बस यात्रा दिल्लीपासून सुरू केल्यावर तासाभरातच शीला दिक्षितांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बसमधून उतरून थेट रूग्णालय गाठावे लागले. नंतर सोनिया गांधींनी वाराणशीत जाहीर सभा घेऊन रोडशो सुरू केल्यावर काही वेळाने त्यांना बरे वाटेनासे झाल्यावर त्यांनाही रूग्णालयात हलविण्यात आले. तेव्हापासून त्या सार्वजनिक समारंभापासून दूरच आहेत.

नंतर प्रशांत किशोरांच्या सुपीक मेंदूतून आलेल्या कल्पनेनुसार राहुल गांधींनी 'खाट पे चर्चा' नावाची प्रचारमोहीम सुरु केली. ही मोहीम खाटा पळवापळवीनेच गाजल्यानंतर थांबविण्यात आली. 'कर्जा माफ, बिजली बिल हाफ' अशा घोषणा रंगविलेल्या बसमधून राहुल गांधींनी उ.प्र. मध्ये फिरून बर्‍याच सभा घेतल्या होत्या.

गेल्या १-२ दिवसांपासून आता बातम्या बाहेर येत आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नाद सोडून शेवटी समाजवादी पक्षाशी युती करण्याचे ठरविले आहे. या युतीत सपा ३०३ जागा, काँग्रेस ७८ व अजितसिंह यांचा लोकदल पक्ष २२ जागा लढवेल. स्वबळाचा फुशारक्या मारताना शेवटी काँग्रेस ४०३ पैकी जेमतेम ७८ जागा लढविण्यावर समाधान मानणार आहे. फजिती अजून वेगळी काय असते?

संदीप डांगे's picture

29 Dec 2016 - 7:58 pm | संदीप डांगे

भाजपात आला पवित्र झाला?

संदीप डांगे's picture

29 Dec 2016 - 8:04 pm | संदीप डांगे

वरच्या प्रतिसादातला विडिओ गायपलाय..

तोच विडियो खाली..

काय मॅटर आहे गोवेकर्स?

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2016 - 3:10 pm | श्रीगुरुजी

२००८ मधील मालेगावमध्ये झालेल्या बाँबस्फोटामध्ये २००९ मधील निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी व मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी तत्कालीन युपीए सरकारने साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांच्या सहीत अजून ८-९ जणांना मकोकाखाली अडकविले. ऑक्टोबर २००८ पासून गेली ८ वर्षे २ महिने ते विनाजामीन तुरूंगात आहेत. त्यांच्यावर अनेक खोटे आरोप लावण्यात आले आहेत व खोटे पुरावे जमा केले आहेत. आता यातील अजून एक खळबळजनक घटना बाहेर येत आहे.

http://indiatoday.intoday.in/story/malegaon-blast-ats-sadhvi-pragya-col-...

संदीप डांगे's picture

30 Dec 2016 - 4:01 pm | संदीप डांगे

काय खळबळजनक आहे? मुजावरने काही पुरावे दिलेत का?

त्यांच्यावर अनेक खोटे आरोप लावण्यात आले आहेत व खोटे पुरावे जमा केले आहेत
^^^ ह्याला काही आधार? आरोप व पुरावे खोटे असतील तर ते अजून आत का आहेत?

गामा पैलवान's picture

30 Dec 2016 - 7:20 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

आरोप व पुरावे खोटे असतील तर ते अजून आत का आहेत?

यालाच न्यायाचा गर्भपात म्हणजे miscariage of justice म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2016 - 8:51 pm | श्रीगुरुजी

त्या सर्वांना फक्त मालेगाव प्रकरणात अडकविले नसून वेगवेगळ्या १५-१६ बाँम्बस्फोटात संशयित आरोपी म्हणून त्यांची नावे टाकली आहेत. त्यांना वेगवेगळ्या कठोर कलमांखाली अडकविले आहे ज्यात जामीनाची तरतूदच नाही.

The state ATS, which was initially probing the case, had charged the accused under various sections of the stringent Maharashtra Control of Organised Crime Act and under the Unlawful Activities Prevention Act, Indian Penal Code, Indian Explosives Act and the Arms Act.

समजा एका प्रकरणात जामीन दिला गेला तरी इतर सर्व प्रकरणात जामीन मिळाल्याशिवाय ते बाहेर येऊ शकत नाहीत. न्यायालय अत्यंत संथ गतीने या प्रकरणाची सुनावणी करीत आहे. हे प्रकरण २००८ मधील असले तरी त्यापूर्वी अडीच वर्षाहून अधिक काळ घडलेल्या समझोता एक्स्प्रेस बाँबस्फोटाचा निकाल जवळपास ११ वर्षे उलटत आली तरी अजून लागलेला नाही. त्या तुलनेत या प्रकरणाला जेमतेम ८ वर्षे २ महिनेच उलटले आहेत.

या लोकांना कसे जाणूनबुजून अडकविण्यात आले आहे याबद्दल एका धाग्यात अनेकांचे अनेक प्रतिसाद आहेत. त्यातील काही मोजक्या प्रतिसादांच्या लिंक्स -

http://www.misalpav.com/comment/453587#comment-453587

http://www.misalpav.com/comment/460070#comment-460070

http://www.misalpav.com/comment/456306#comment-456306

हा संपूर्ण धागा वाचावा.

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2017 - 2:57 pm | श्रीगुरुजी

साध्वी प्रज्ञासिंग व इतरांना अनेक खोट्या प्रकरणात अडकविले आहे. त्यातल्या एका प्रकरणातून काल तिची व इतरांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

http://www.rediff.com/news/report/sadhvi-pragya-7-others-acquitted-in-su...

संपुआ सरकारच्या काळात अनेक हिंदुत्ववाद्यांना दहशतवादाच्या खोट्या प्रकरणात अडकवून संपुआवाल्यांनी हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद असा प्रचार करून भाजप व संघ परिवाराला बॅकफूटवर नेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला होता. मुस्लिमांची सहानुभूती मिळविणे, भाजपवर कुरघोडी करणे व त्यातून राजकीय फायदा मिळविणे यासाठी ही घृणास्पद कृत्ये संपुआने केली. या सर्व आरोपींवर आरोपपत्र दाखल न करता व त्यांना जामीन मिळून न देता वर्षानुवर्षे त्यांना तुरूंगात डांबून ठेवणे व जोपर्यंत ते तुरूंगात आहेत तोपर्यंत भगवा दहशतवाद असा प्रचार करणे असली घाणेरडी कामे करण्यामध्ये तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम्, गृहसचिव नारायणन इ. चा समावेश होता. आता यातील काही खटल्यांची सुनावणी सुरू झाली आहे. वरील खटल्याचा निकाल तब्बल ८-९ वर्षांनंतर लागला. २=३ वर्षांपूर्वी मडगाव बाँफस्फोटात जाणूनबुजून अडकविलेल्या सनातनच्या ६ कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. तब्बल ११ वर्षे उलटली तरी समझोता एक्सप्रेस बॉम्फस्फोट प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. मालेगाव प्रकरणात तर तब्बल ८ वर्षांनंतर सुद्धा निकाला लागलेला नाही.

संदीप डांगे's picture

2 Feb 2017 - 5:26 pm | संदीप डांगे

बहुतेक सलमान खानची सुद्धा दोन प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे माननीय न्यायालयाने, करीम तुंडा पण...

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2017 - 11:41 pm | श्रीगुरुजी

ही वेगवेगळी प्रकरणे आहेत.

सतिश गावडे's picture

30 Dec 2016 - 7:09 pm | सतिश गावडे

नेताजींनी अखिलेशला सहा वर्षांसाठी पक्षाबाहेर काढले.

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2016 - 8:53 pm | श्रीगुरुजी

आपल्या अपयशावरून जनतेचे लक्ष वळवून जनतेला मूर्ख बनविण्यासाठी व पक्षातील असंतुष्टांना ताब्यात ठेवण्यासाठी हे पितापुत्र नूरा कुस्ती खेळत आहेत.

श्रीगुरुजी's picture

1 Jan 2017 - 8:38 pm | श्रीगुरुजी

अमरसिंह या दलालामुळे काही वर्षांपूर्वी आझमखान नावाचा जातिवंत धर्मांध मुसलमान सपा सोडून बाहेर पडला होता. त्यामुळे सपाला मुस्लिम मते मोठ्या प्रमाणावर गमवावी लागली. ते ओळखून आझमखानचे पाय धरून मुलायमने अमरसिंहला पक्षातून हाकलून आझमखानला पक्षात परत आणले. परंतु आझमखान आपल्या आगलावू भाषणांमुळे व जातीयवादी वक्तव्यांमुळे डोईजड झाला होता. अखिलेशला आपल्या मंत्रीमंडळात आझमखानला घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. परंतु मुस्लिम मतांचे महत्त्व ओळखून मुलायमने आझमखानला मंत्रीमंडळात घ्यायला लावले.

कालांतराने अमरसिंहच्या दलालीचे महत्त्व ओळखून मुलायमने अमरसिंहला परत सपामध्ये घेतले. परंतु अमरसिंह व आझमखान या दोघांशी अखिलेशचे जमत नव्हते. दरम्यानच्या काळात आपण पक्षात वरिष्ठ असल्याने आपणच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य होतो अशी मुलायमच्या भावाची शिवपालची समजूत होती. त्यामुळे तोसुद्धा अखिलेशच्या विरोधात होता. अखिलेश हा समान शत्रू असल्याने अमरसिंह व शिवपाल यादव एकत्र येऊन त्यांनी अखिलेशला त्रास द्यायला सुरूवात केली होती.

दरम्यानच्या काळात मागील पावणेपाच वर्षात उ. प्र. मध्ये अखिलेशविरूद्ध जनतेत नाराजी वाढत होती. अखिलेशच्या अपयशावरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी, अखिलेश चांगले काम करीत असून शिवपाल, अमरसिंह इ. मंडळी त्याच्या मार्गात अडथळे आणत आहेत हे दाखवून अखिलेशची प्रतिमा उजळण्यासाठी व शिवपाल, अमरसिंह यांचे पंख कापून त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी मुलायमने अखिलेशविरूद्ध शिवपालची साथ देऊन आपण शिवपालच्या बाजूने आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपोआपच शिवपाल हा खलनायक व अखिलेश हा नायक असे चित्र तयार झाले. परवा दोन्ही गटांनी आमदारांची बैठक बोलविल्यावर अखिलेशच्या बैठकीला २०० आमदार उपस्थित राहिले तर शिवपाल व मुलायमच्या बैठकीला जेमतेम १७-१८ आमदार उपस्थित राहिले. त्यामुळे पक्षात कोणाला पाठिंबा आहे ते सिद्ध झाले. आपण तुझ्या बाजूने असलो तरी बहुतेक सर्व आमदार अखिलेशच्या बाजूने आहेत हे शिवपालला दाखवून देण्यात मुलायम यशस्वी झाला. त्यामुळे आता तिकीटवाटपात शिवपाल समर्थकांना फारशी तिकिटे मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे.

आता अमरसिंहला पक्षातून निलंबित केले असून शिवपालचे पंख कापले गेले आहेत. एकंदरीत अखिलेशचा मार्ग निर्धोक झाला आहे. शिवपालला खलनायक ठरवून अखिलेशची प्रतिमा उजळविण्याचा व अखिलेशच्या अपयशावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. हे होत अस्तानाचा आपण तुझ्या बाजूने आहोत हे शिवपालला दाखवून मुलायमने पक्षातील संभाव्य फूट टाळलेली आहे.

एकंदरीत हे सर्व ठरवून केलेले नाटक होते.

वरुण मोहिते's picture

30 Dec 2016 - 9:02 pm | वरुण मोहिते

गुरुजी यांचा प्रतिसाद बरोबर आहे .
बाकी सपा चे चित्र सध्या तरी रोचक आहे .

लोकहो,

ओबामं येडंय. त्याने काल २९ डिसेंबरास पस्तीस रशियन मुत्सद्द्यांची अवांछित व्यक्ती (= पर्सोना नॉन ग्राटा) म्हणून हाकलपट्टी केली. कारण काय तर म्हणे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियन तत्ज्ञांनी संगणकी हल्ले करून निकाल बदलला ! हे शक्य तरी आहे का? आणि असल्यास अमेरिकेच्या दुर्बल सुरक्षानीतीचा असा डंका पिटणे कितपत उचित आहे? हे सगळं ओबाम्याला सांगणार कोण! आता बीसबावीस दिवसंच उरलेत बाहेर पडायला. जरा धडपणे नीघ की!

परवा २८ डिसेंबरास ट्रंपना इस्रायलास आवाहन करावं लागलं की मी २० जानेवारीस सूत्रं हाती घेईस्तोवर जरा संयम राखा. कारण की २५ डिसेंबरास रशियाचे एक लष्करी विमान काळ्या समुद्रात कोसळलं. यात मोसादचा हात असावा अशी शंका येणं स्वाभाविक आहे. कारण याच प्रकारच्या तुपालोव्ह-१५४ जातीच्या विमानांवर पूर्वी असे हल्ले झाले आहेत. मात्र कृष्णपेटिकेतल्या माहितीवरून घातपाताची शक्यता दिसंत नाही असं २९ डिसेंबर रोजी जाहीर झालं. बहुधा ट्रंप यांनी खबरदारी म्हणून मोसादचा हात गृहीत धरून लगोलग इस्रायलला शांतता राखायचं आवाहन केलं. आता ट्रंप यांच्यासमोर नव्या डोकेदुख्या उभ्या करण्यासाठीच म्हणून ओबाम्याने रशियाच्या पस्तीस अधिकाऱ्यांची हाकलपट्टी केली आहे. ओबाम्या, क्लिंटन इत्यादि कंपूस रशियाविरुद्ध युद्ध करायचंय.

परंतु रशियाने एकतर तुर्कस्थानास आपल्या बाजूला वळवलंय आणि शिवाय सीरियात निर्णायक हल्ले करून अलेप्पोत विजय मिळवलाय. त्यामुळे ओबाम्याच्या कंपूचा तिळपापड होतोय. ओबाम्याची ही नीती अमेरिकेच्या परराष्ट्रधोरणास रसातळास घेऊन जाणारी आहे.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

1 Jan 2017 - 8:45 pm | श्रीगुरुजी

काहीतरी गडबड आहे. नुकताच एक नवीन प्रतिसाद लिहिला. परंतु त्यानंतर सुद्धा हा धागा "नवीन लेखन" या पानावर दिसत नाही.

अमितदादा's picture

9 Jan 2017 - 12:24 am | अमितदादा

म्यानमार मध्ये भारतीय लष्कराच्या para regiment ने केलेल्या surgical strike विषयी जरा डेटेल मध्ये माहिती.
2015 Myanmar Special Operations : How Indian Army Commandos Destroyed Terror Camps

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2017 - 8:24 am | श्रीगुरुजी

कृष्णा नदीच्या पाणीवाटपावरून तेलंगणची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या ६६६ टीएमसी पाण्यावर शिक्कामोर्तब केले.

कृष्णा नदीच्या पाण्याचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांमध्ये प्रकल्पनिहाय पुनर्वाटप करण्याची मागणी करणारी तेलंगणची याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्या. पी. सी. पंत यांच्या खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. यापूर्वी कृष्णा पाणी लवादानेही आंध्र-तेलंगणची ही मागणी फेटाळून लावली होती. लवादाच्या निर्णयाला तेलंगणने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आंध्र प्रदेश राज्यनिर्मिती कायद्यानुसार तेलंगण आणि आंध्र प्रदेशने त्यांच्या वाट्याचे १००५ टीएमसी पाणी आपसात वाटून घ्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

http://m.maharashtratimes.com/nation/krishna-river-issue-maharashtra-wil...

श्रीगुरुजी's picture

17 Jan 2017 - 3:19 pm | श्रीगुरुजी

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आता रंग भरायला सुरूवात झाली आहे.

उ.प्र. मध्ये पितापुत्रांचा नूरा कुस्तीत पुत्राने बाजी मारली आहे. सर्व अधिकार व सत्ता पुत्राच्या हातात विनासायास जावी यासाठी पित्यानेच नाटक केलेले दिसते. आता अखिलेशची पक्षावर पूर्ण पकड बसलेली आहे. अखिलेश, अजितसिंगचा लोकदल व काँग्रेस यांच्यात युती होणे जवळपास नक्की झाले आहे. काँग्रेसने १ वर्षापूर्वीच मोठा आव आणून आपल्या बेटकुळ्या फुगवून स्वबळावर ४०३ जागा लढविण्याचे जाहीर केले. त्यासाठी स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांना मोठी रक्कम मोजून धोरण सल्लागार म्हणून नेमले. राज्य काँग्रेसच्या अध्यक्षपदी राज बब्बरला आणले. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला ब्राह्मण व वरीष्ठ जातींवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार ७९ वर्षीय शीला दिक्षित यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले. सोनिया गांधींनी शीला दिक्षितांबरोबर दिल्ली ते लखनौ बस यात्रा सुरू केल्यावर तासाभरातच शीला दिक्षितांची प्रकृती बिघडल्याने मध्येच उतरून त्या रूग्णालयात रवाना झाल्या. नंतर रोड शो करताना सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्याने त्याही रूग्णालयात रवाना झाल्या. नंतर राहुलने सुरू केलेल्या 'खाट पे चर्चा' अभियानाचा बोजवारा उडाला. नंतर राहुलने काढलेल्या बस यात्रेत 'कर्जा माफ, बिजली बिल हाफ' अशी आश्वासने देण्यात आली. आणि आता सर्व योजना गुंडाळून सपबरोबर युती करून ४०३ पैकी जेमतेम १०० किंवा त्यापेक्षाही कमी जागी लढण्यात काँग्रेस खूष आहे. काँग्रेस + सप + रालोद ही युती उ. प्र. मध्ये बर्‍यापैकी प्रभावी ठरेल असा अंदाज आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. जर निवडणुकीत कोणत्याही पक्षाला/आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर भाजप व बसप पुन्हा एकदा एकत्र येतील. भाजप अजितसिंहांना केंद्रात मंत्रीपद देऊन राज्यात रालोदचा पाठिंबा मिळवेल असे वाटते.

गोव्यामध्ये भाजपची साथ मगोपने सोडली. संघातून बंडखोरी करून बाहेर पडलेले वेलिंगकर यांचा पक्ष, शिवसेना व मगोप युती करून सर्व ४० जागा लढवित आहे. दुसरीकडे काँग्रेस व आआप देखील निवडणुक लढवित आहे. त्यामुळे गोव्यात चौरंगी लढत आहे. मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परतू शकतात असे पिल्लू भाजपने सोडून दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

पंजाबमध्ये अजून गंमत आहे. आपल्या पक्षाला किमान ९०-१०० जागा मिळतील असे केजरीवाल व आआपचे नेते मागील वर्षभर सांगत होते. त्यामुळे आआप जोमाने पंजाबमध्ये निवडणुक लढवित आहे. दुसरीकडे भाजपची साथ सोडून गेल्यावर सिद्धूने प्रथम आआपची चाचपणी केली. आआपने कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने शेवटी सिद्धूने स्वतःचा एक वेगळा पक्ष काढला व काल शेवटी तो राहुलच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये सामील झाला. २००४ पासून १२ वर्षे भाजपमध्ये काढताना सिद्धूने राहुल व काँग्रेसवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली होती. आता मात्र त्याला राहुलचेच पाय धरावे लागले. कालाय तस्मै नम:. सिद्धूच्या आगमनामुळे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजणारे कॅ. अमरिंदर सिंग मात्र धास्तावले आहे. जर कॉग्रेसला बहुमत मिळाले तर राहुल आपल्याऐवजी सिद्धूची निवड करू शकेल या शंकेने अमरिंदर सिंग अस्वस्थ आहेत कारण त्यांनी पूर्वीच राहुलला काँग्रेसचे अध्यक्ष करण्यास विरोध केला होता. त्यामुळे अमरिंदर सिंग सिद्धूला पाडण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. करमणूक मूल्य यापलिकड सिद्धूला फारसे महत्त्व नाही. भारतीय राजकारणात राहुल, केजरीवाल, सिद्धू, उद्धव असे विदूषक वेगवेगळ्या पक्षात स्थान राखून होते. आता एकाऐवजी दोन विदूषक आल्याने करमणूक क्षेत्रात काँग्रेसचे पारडे जड झाले आहे.

या ३ राज्यांच्या तुलनेत उत्तराखंड व मणिपूरमध्ये फारश्या हालचाली नाहीत. उत्तराखंड मध्ये भाजप साधे बहुमत मिळवून काँग्रेसकडून सत्ता हस्तगत करेल असे वाटते. मणिपूरमध्ये देखील भाजपने बर्‍यापैकी प्रगती केलेली आहे.

गामा पैलवान's picture

21 Jan 2017 - 3:20 pm | गामा पैलवान

प्लस वन श्रीगुरुजी! अशी बातमी यापूर्वी कधी ऐकण्यात आलेली नव्हती.
आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2017 - 8:48 pm | श्रीगुरुजी

उत्तम बातमी

जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे पुनवर्सन करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल १०० एकर जमीन देऊ केली आहे. १९९० मध्ये दहशतवादामुळे काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना विस्थापित व्हावे लागले होते. त्यानंतर अनेकदा काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सध्या सत्तेत असलेल्या पीडीपी-भाजप सरकारने काश्मीर खोऱ्यातील आठ ठिकाणी काश्मिरी पंडितांच्या पुनवर्सनासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये ही जागा पसरलेली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातील वरिष्ठांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या पुनर्वसनासाठी आतापर्यंत ६२ हजार विस्थापित कुटुंबांनी सरकारकडे नोंदणी केली असून यापैकी ४० हजार लोक जम्मू, २० हजार लोक दिल्ली आणि २ हजार लोक भारताच्या अन्य भागात वास्तव्याला आहेत. २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी ५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. केंद्रात सत्तेत आल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पत्र लिहून विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी जमीन देण्याची मागणी केली होती. ही जागा विस्थापित लोक पूर्वी राहत असलेल्या ठिकाणांच्याजवळ आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिली जावी, असे या पत्रात म्हटले होते. मात्र, त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा मुद्दा बाजूला पडला होता. याशिवाय, काश्मिरी पंडितांच्या या वस्त्या पुन्हा दहशतवाद्यांचे सोपे लक्ष ठरू शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, नंतरच्या काळात केंद्राने राज्य सरकारला सरकारी नोकरीत असलेली काश्मिरी पंडितांसाठीची सर्व पदे भरण्याचे आदेश दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या सहा हजार जागांपैकी १७०० पदे पूर्वीच भरण्यात आली होती. केंद्राच्या आदेशानंतर उर्वरित ४३०० जागांवरही भरती करण्यात आली.

पाकिस्तानने अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची लागोपाठ दुसरी चाचणी या महिन्यात घेतली आहे असे वृत्त बिझनेस इन्सायडरने दिले आहे. अजूनतरी भारतीय मीडियामध्ये हि बातमी दिसलेली नाही.

श्रीगुरुजी's picture

25 Jan 2017 - 12:36 pm | श्रीगुरुजी

डॉ. शरद पवारांना 'पद्मविभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. आता फक्त 'भारतरत्न', 'नोबेल पुरस्कार', पंतप्रधानपद' व 'राष्ट्रपतीपद' शिल्लक आहे. --))

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 12:52 pm | संदीप डांगे

पुरस्कारवापसीच्या वेळेस असं ऐकलं होतं की हे पुरस्कार सरकारची चापलूसी करणार्‍यांना, कथित पुरोगाम्यांना सरकार देतं म्हणून... किंवा पुरस्कार समितीत असे एकमेकांची पुरस्काराची सोय लावणारे असतात म्हणून... मोदी सरकार आल्यापासून अशा चापलूसांची गठडी वळलीये इत्यादी, असं बरंच काही वाचल्याचं आठवतंय... तेव्हा असे पुरस्कार काही महत्त्वाचे नसतात अशा निष्कर्षावर आलो होतो. आता श्रीगुरुजींनी बातमी टाकल्यावर परत गोंधळ झालाय...

गामा पैलवान's picture

25 Jan 2017 - 6:49 pm | गामा पैलवान

लोकहो,

अजि म्यां ब्रह्म पाहिले!अमेरिका राष्ट्रसंघातनं बाहेर पडायचं म्हणतेय? अधिक माहिती : https://www.rt.com/usa/374754-us-leave-united-nations-bill/

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 7:18 pm | संदीप डांगे

आत्माच जणू शरीर त्यागायचं म्हणतोय ....

श्रीगुरुजी's picture

25 Jan 2017 - 8:30 pm | श्रीगुरुजी

कायआप्पा वर फिरत असलेली पोस्ट
_______________________

('हे राम... नथुराम...' नाटकाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक-अभिनेते व शिवसेना उपनेते श्री. शरद पोंक्षे यांनी आपल्या फेसबुक पेजवर स्वतः शब्दबद्ध केलेला लेख...!!! )

११ जानेवारी ते १५ जानेवारी कोकण दौरा खुपच संघर्षमय झाला. कणकवलीत सकाळी पोचलो. साधारण १० वा.हॉटेलवरच कळल की नाटकाचं बुकिंग थांबवलय. कणकवली, कुडाळ, मालवण, या तिन्ही ठीकाणची पोस्टर्स ऊतरवली व बुकिंग थांबवल. का...? विचारल तर तिथले स्थानिक व्यवस्थापक म्हणाले, आम्हाला आमदार नितेश राणेंचा फोन आला व त्यांनी प्रयोग होऊ देणार नाही, तेव्हा सगळ थांबवा, अशी धमकी दिली. ते म्हणाले, साहेब आम्हाला ईथेच रहायचय. तुम्ही प्रयोग करुन जाल मग आम्हाला राणे साहेब त्रास देतील. त्यांचं बरोबरच होतं. मग मी तशाच बँगा रुमवर टाकल्या. मी व माझे सहनिर्माते प्रमोद धुरत असे दोघेही, दातही न घासता, शिवसेना आमदार मा.वैभवजी नाईक साहेबांना भेटलो. तर ते नेमके आपल्या मतदारसंघात कुडाळला गेले होते. त्यांचे बंधु भेटले, त्यांनी दिलासा दिला.व वैभवजींना फोन लावला. परीस्थीती सांगीतली व फोन माझ्या हातात दिला. वैभवजींना मी सगळ सांगीतल. ते तात्काळ म्हणाले हे तिनही प्रयोग मी करणार पण प्रयोग हे होणारच...! मग सुरु झाली वणवण. तसेच आम्ही एसपी साहेबांना भेटायला गेलो. त्यांना पोलीस बंदोबस्त हवा म्हणुन पत्र दिलं. तिथुन मग जिल्हाधिकारींना भेटलो. त्यांनाही पत्र दिलं. विचीत्र मनःस्थितीत सकाळच काहीही न आवरता हे सगळ करत होतो. त्यातही पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचारी त्याही अवस्थेत फोटो काढायला धावले. आंघोळ नाही काही नाही. तशाच अवस्थेत १०० एक फोटो तरी काढले असतील. नाही म्हणताच येत नाही. मायबाप रसिक आहेत ते. तिथुन निघालो पण मनात एकच विश्वास प्रयोग वाट्टेल ते झाल तरी करायचाच. मग पुन्हा वैभवजींना भेटायला गेलो. त्यांना म्हटलं.तिकीट विक्री सुरु झाली पाहिजे साहेब. 2 दिवस बंद आहे. पहिल्याच दिवशी ३६ हजार झाली होती. म्हणजे नाटक नक्की हाऊसफुल्ल होणार. पण नंतर दोन दिवस ती थांबली. पोस्टर्स ही काढली गेली. लोकांना वाटल नाटकाचा प्रयोग बहुतेक रद्द झाला असावा. हे सगळ करुन दु.२ वाजले. तेव्हा एक रिक्षा फिरायला सुरवात झाली. सगळे शिवसैनिक कामाला लागले. तिकीट विक्री दु २ ला पु्नहा सुरु झाली. म्हटल हुश्य पण कसल काय....! तेवढ्यात बातमी आली की मराठा नाट्यगृहने अचानक परवानगी नाकारली. मग वाटल प्रयोग करणार कुठे? तेवढ्यात दुसरही नाट्यगृह आहे अस कळलं.तिथे गेलो. तो पर्यंत तेही खोटा कार्यक्रम सांगुन बुक केलं गेल. तेही गेलं. मग त्याच्याच बाजुला एक लग्नाचा हॉल आहे. तो बघितला. ते म्हणाले हा नक्की मिळेल. मग दु 3.30 वा.आम्ही हॉटेलवर आलो. तर कळल की तोही बुक केलाय. हे सगळ राणे समर्थक करत होते. आता ठिकाणच राहीलं नाही. तिकीटविक्री पोलीस बंदोबस्तात सुरु झाली. पण नाटकाच्या ठिकाणाचा पत्ताच नाही. मी व प्रमोद हॉटेलवर गेलोच नाही. पुन्हा वैभवजींकडे. मग ते म्हणाले कुठेही स्टेज ऊभं राहील का? मी म्हटल रस्त्यावर सुध्दा प्रयोग करेन पण प्रयोग हा व्हायलाच हवा...! ते म्हणाले हरकत नाही. तुम्ही निश्चिंत व्हा मी सभागृह बघतो.मग मी व प्रमोदजी हॉटेलवर आलो ५ वाजता. न आवरता जेवलो. तेव्हा कळल की काहीच न खाता भटकत होतो. मग रुमवर आलो व तासभर झोपलो. संध्याकाळी ७.३० वा.एक ४०० खुर्च्या राहतील एवढ लग्नाच सभागृह मिळालं. तिकडे तिकीट काढायला आलेले लोक विचारत ठिकाण कुठे आहे? त्यांना द्यायला ऊत्तरच नाही. ते परत जायचे. अस करता करता बस ८.३० ला त्या सभागृहाजवळ पोचली. सेट म्हणजे काय मधला एक चौथरा तेवढा लागला. पुढचा पडदा नाही. लाईट लावायला जागा नाही. तरीही जस जमेल तस सगळ लावलं व एकदाचा प्रयोग होणार हे निश्चीत झालं. बुकिंग मात्र ३६ हजारावरच थांबल. एखाद्या आमदाराची केवढी दहशत तिथल्या लोकांमधे जाणवली. दादागीरी जबरदस्त. सिनेमात दाखवतात तशी. इतिहासही तसाच होता. पण शासन सरकार मात्र सगळ माहित असुनही हतबल. काहीच करु शकत नाही. सेंसॉर झालेलं, कोर्टाने मान्यता दिलेलं, सर्वसामान्यांनी डोक्यावर घेतलेलं, नाटकही करु द्यायचं नाही. आमदारकीची ताकद वापरायची. लोकशाही ह्याला म्हणतात का? पण ही वस्तुस्थीती आहे. सगळीकडेच. पण शिवसेना आमदार वैभव नाईक साहेब व शिवसैनिक, सर्व पोलीस दल ह्यांनी मात्र पुर्ण पाठिंबा दिला व प्रयोग सुरु झाला १०.३० वा.आणि खर रामायण पुढेच सुरु झालं कारण त्यांच्या हद्दीत जाऊन एवढी दहशत असुनही प्रयोग मात्र सुरु होणार होता.लोकही आधी दुसर्या सभागृहात गेले. त्या प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक ऊभे होते. ते प्रयोगाच ठिकाण दाखवत होते. त्यामुळे लोकांना पोचायला ऊशिर होत होता. शेवटी प्रयोग ११ वा प्रयोग पोलीस बंदोबस्तात सुरु झाला. पहिल्या रांगेत स्वतः आ.नाईक बसले. आजुबाजुला शिवसैनिक होतेच प्रयोग सुरु झाला. एखाद्या युध्द भुमिवर प्रयोग आहे की काय असा भास झाला. पहिला प्रसंग पार पडला. दुसरा सुरु झाला आणि दोन अडीचशे लोकांचा मोर्चा आला. एवढासा हॉल. त्या घोषणा स्पष्ट कानावर यायला लागल्या. लोकही व कलाकारही डिस्टर्ब झाले. दरवाजा बाहेर एवढी लोक घोषणा देत होती. शरद पोंक्षे मुर्दाबाद. नथुराम गोडसे मुर्दाबाद. त्यात चुकुन एकजण महात्मा गांधी मुर्दाबाद असही म्हणाला. मला वाटत जुनी सवय. पुर्वी दुसर्या पक्षात दिल्या असतील कदाचीत. तर थोडक्यात काय तर नाटक थांबल. बराच वेळ हा घोळ चालला. पोलीसांनी चोप चोप चोपलं. परत पाठवलं.नाटक २० मिनीटांनी पुन्हा सुरु झालं. अर्धा तासाने.पुन्हा मोर्चा. मुंबईचे भाडेकरु आणुन मोर्चा काढला होता. स्थानीकांनीच सांगीतल आम्हाला की हे कोणीच कणकवलीतले नाहीत. परत तोच राडा. ह्यावेळी सभागृहाच्या आत यायचा प्रयत्न केला पण शिवसैनिकांनी व पोलीसांनी पुन्हा त्यांना हाकलुन दिल. काहींना अटक केली. २० मी नाटक थांबलं. मग तर चवताळले व त्यांनी अपेक्षेप्रमाणे विजेची वायरच कापली व लाईटस् गेले. आता काय करायचं. मी निश्चल ऊभा होतो. लोकांना सांगीतल. जागेवरुन हालु नका. लोकांनीही साथ दिली. बायका मुली लहान मुल. कोणीही घाबरल नाही की जागेवरुन हालल नाही हे विशेष. मग आ.नाईक धावले. त्यांनी जनरेटर आणला तो लावला व सुरु केला. लाईट्स आले. ३५ मिनीटं नाटक थांबल होतं. ११ ला सुरु झालेल नाटक दोन तास पंधरा मि.चाललं होतं. मग मी रसिकांना म्हटल की आता मध्यंतर घेत नाही.सलग करतो.लोकांनीही होकार दिला. मग प्रयोग सुरु झाला.१० मि झाली असतील.तेवढ्यात त्या अंधारात काही कॉंग्रेसच्या स्त्रीया येऊन बसल्या होत्या. त्या अचानक ऊठल्या व हातातली दौतीची भरलेली बाटली एकीनी स्टेजवर माझ्या अंगावर फेकली.ते मला कळायच्या आत .दुसरी बाई ऊठली तीने दुसरी बाटली फेकली. नशिब बाटल्या दोन्ही बाजुन मागे सेटवर पडल्या.माझ्या अंगावर तोंडावर काळी शाई पडली.माझ्या चेहर्यावरची एकही रेषा हलली नाही. मग त्या बायकांना पकडल.व बाहेरच्या पोलीसांच्या वँनमध्ये बंद करुन ठेवल. त्या सतत माझ्या नावाचा ब्रह्मणांचा ऊध्दार करत होत्या . मग पुन्हा मी शांतपणे संवाद सुरु केले व नाटक शेवटपर्यंत पुर्ण केलं. त्यांच्या एरीयात जाऊन.त्यांच्या विरोधाला न जुमानता.नाटकाचा प्रयोग पुर्ण केला. सर्व वर्तमान पत्रांमधे बातमी आली. शरद पोंक्षेंनी विरोध मोडुन प्रयोग केला.तर राणेंच्या प्रहार मधे बातमी आली.की कॉंग्रेयच्या कार्यकर्त्यांना वंदे मातरम घोषणा देताना पोलीसांनी लाठीचार्ज करुन ताब्यात घेतलं व शरद पोंक्षाची पळता भुई थोडी झाली. आता ऊद्याचा मालवण व परवाचा कुडाळचा प्रयोग सुध्दा ऊधळुन लावु पण प्रयोग कोणताच ऊधळु शकले नाहीत.पोलीस व शिवसैनिक ह्यांच्या मदतीने.मी प्रयोग करतच राहीलो. हाऊस फुल्ल गर्दित. रसिकांनी कायमच नाटकावर प्रेम केलय. करत राहतील. कायदा सुव्यवस्था लोकांनी कधीच बिघडवली नाही. अगदी गांधीवादी रसिक, मुसलमान रसिकही नाटक बघुन गेले. कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त राजकारणी लोकांनाच नाटकाचा त्रास होतो. तोही सोयीनं. विशेषतः निवडणुका जवळ आल्या की. हा विरोध.गांधी प्रेम सगळ ऊफाळुन येतं. मग पुन्हा शांत होतात. अहिंसेच्या नावाखाली सगळे हिंसाच घडवतात. सत्याच्या नावाखाली सगळे असत्यच बोलतात. प्रत्येक नेता हा समाजाचा मालक समजायला लागतो. मग त्याच्या विरोधात कोणी बोलल की त्याला सहन होत नाही. त्याचा अहंकार दुखावला जातो. पण तुम्ही जर विचारांवर ठाम असाल तर तुमच आत्मबल वाढत.व कार्य सिध्दीस नेण्यास मदत होते. आता २१ पासुन नागपुरात प्रयोग आहे.आजच्याच पेपरात बातमी आहे. कॉंग्रेस गांधींच्या मारेकर्याचं ऊदात्तीकरण कदापी सहन करणार नाही. नाटक न बघताच. बाकी ओवेसी सहन करणार. कन्हैया सहन करणार. पुरंदर्यांना जिवंत कसा? किंवा गडकरी पुतळा तोडणार्यांना ५ लाखाच ईनाम देणार नितेश राणे सहन करणार .गांधी आमचे सावरकर तुमचे म्हणणारे राहुल सहन करणार. सावरकरांची काव्य अंदमानातुन पुसणारे नेते सहन करणार. भ्रष्टाचार सहन करणार. माणुस मारुनसुध्दा निर्दोष सुटणारे सुपरस्टार सहन करणार. बलात्कार करुन अल्पवयाचा फायदा घेउन सुटणारे नराधम सहन करणार. राष्ट्रद्रोह्याच्या मयताला गर्दि करणारे सहन करणार. घर घर में.अफजल निकलेगा म्हणणारे सहन करणार. बलात्कार करने वाले बच्चे है म्हणणारे यादव सहन करणार. सगळ सहन करणार. तेव्हा ह्यांची ताकद कुठे जाते? फक्त नथुराम गोडसे तेवढा सहन करणार नाही. ह्या गलीच्छ दलदलीतुन भारतमातेला आता आपल्यालाच सोडवाव लागणारे. तेव्हा.आतातरी जागे व्हा. एक व्हा. भारतीय फक्त भारतीय म्हणुन एक व्हा.
भारत माता की जय

आपला,
-शरद पोंक्षे.

फेदरवेट साहेब's picture

25 Jan 2017 - 11:17 pm | फेदरवेट साहेब

सर्व वर्तमान पत्रांमधे बातमी आली. शरद पोंक्षेंनी विरोध मोडुन प्रयोग केला.

द्या बरं एखादं कात्रण किंवा लिंक वगैरे, पोंक्षेचा विजयोत्सव वाचायला आवडेल :). एरवी मला पोंक्षे -गोडसे वगैरे खास ममत्व नाही पण त्या राणेंच्या तोंडावर टिच्चून प्रयोग केला ह्याचा आनंद आहेच. बाकी पोंक्षेचे लेखन (म्हणजे त्यांनीच केले असेल असा पुरावा नसताना अन कायप्पावरून आले असतानाच) नावाला जगल्यासारखे विस्कळीत आहेच. पोंक्षेना भरभरून बोलायचे असते, अन आज बोललो नाही तर उद्या जळप्रलय होऊन पूर्ण धरती बुडून जाईल व परत आपल्याला बोलायचा चान्सच मिळणार नाही असा त्यांचा समज असावा. एकाच लिखाणात किती विषय अन किती माणसांवर टीका केल्ये? जरा निगुतीने एक एक विषय घेतला असता तर काय घोडं अडलं असतं म्हणे? मला तर भीती पडली होती आता शेवरच्या वाक्यात 'पंतप्रधान पदाला निवडून द्या पुढल्यावेळी मलाच' वगैरे काही टाकतात का काय ते =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Jan 2017 - 10:43 am | हतोळकरांचा प्रसाद

पुरावा त्यांचं चेपुवरलं पेज पाहून मिळू शकेल. मी पाहिलं, त्यांनीच लिहिलं आहे.

फेदरवेट साहेब's picture

26 Jan 2017 - 1:07 pm | फेदरवेट साहेब

असं आहे दादा, त्यांनी लिहिल्याचा पुरावा मी मागितलेलाच नाहीये, किंवा गुरुजींनी पेस्ट केलेला लेख (?) पोंक्षेचा नाहीच असेही माझे म्हणणे नाहीये. मी पेपरात जे त्यांनी म्हणल्याप्रमाणे छापून आलंय (पोंक्षेंनी केला प्रयोग वगैरे) त्याचा पुरावा उर्फ एखादे कात्रण वगैरे किंवा एखाद्या पेपरची लिंक असल्यास मागितली आहे.

बघा फरक लक्षात येतोय का!. तसंही नितेश राणेंच्या गोटात खरेच खेळ केला असेल त्यांनी तर आदरच आहे म्हणा. बाकी पोंक्षे काही फार सोज्वळ सालस किंवा लैच भारी असंही काही नाही वाटत मला. असो.

फेदरवेट साहेब's picture

26 Jan 2017 - 1:13 pm | फेदरवेट साहेब

शरद पोंक्षेचे वाक्य

सर्व वर्तमान पत्रांमधे बातमी आली. शरद पोंक्षेंनी विरोध मोडुन प्रयोग केला.

मला ह्याच संदर्भात काही बातम्या (कात्रण/लिंक स्वरूपात) हवे आहेत. जमा करून ठेवायला. आता पोंक्षे खुद्दच म्हणतात की बुआ सगळ्या वर्तमानपत्रांत बातमी आली, शरद पोंक्षेंनी विरोध मोडून प्रयोग केला. तर एखादे वर्तमानपत्र किंवा वर्तमानपत्राचे संस्थळ इथला एखादा दुवा सहज उपलब्ध होईल न?

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Jan 2017 - 1:58 pm | हतोळकरांचा प्रसाद

बाकी पोंक्षेचे लेखन (म्हणजे त्यांनीच केले असेल असा पुरावा नसताना अन कायप्पावरून आले असतानाच) नावाला जगल्यासारखे विस्कळीत आहेच.

तुमच्या ह्या वाक्यासाठी ते लेखन कायप्पावरून जरी आलं असलं तरी चेपुवर त्यांनीच लिहिले आहे एवढी(च) "माहिती" सांगण्यासाठी माझा वरचा प्रतिसाद होता.

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 9:01 pm | संदीप डांगे

असे दुसर्‍यांनी शब्दबद्ध केलेले फेसबुकवरचे, कायप्पावर आलेले इथे मिपावर टाकले तर चालते काय? मागे टारझनने लिहिलेले साहनाने इथे टाकले तेव्हा फटाककन उडवला लेख... म्हणून आपलं एक कुतूहल...

हिंदी नाटककार असगर वजाहत यांचे गोडसे @ गांधी.कॉम हे हिंदी नाटक सध्या चर्चेत आहे. या नाटकाचा मराठी अनुवाद झाला असून हे नाटक मंचावर सादर झाले आहे. असगर वजाहत यांनी गांधी विचारांबाबत अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून सर्वांनाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे.

नाटकाची कल्पना अशी आहे. गांधींना गोळी लागते पण त्यांचा मृत्यू होत नाही. या गोळीबारातून गांधी वाचतात. गोडसेला तुरूंगात टाकले जाते. खटला उभा राहतो तेंव्हा गांधी गोडसेच्या विरोधात कुठलीही साक्ष न देता त्याला माफ करून टाकतात. आणि इथूनच मोठी पंचाईत सुरू होते. गांधी आपले समाजसेवेचे व्रत बिहार मधील एका छोट्या गावात चालु करतात. गांधींच्या कामाने नेहरूंचे सरकार अडचणीत येते. ज्या परिसरात गांधींचा हा आश्रम आहे त्या परिसरातील लोक एकत्र येवून श्रमदान करतात, आपली कामे आपणच करतात, सरकार नावाची दिल्लीत बसलेली यंत्रणा नाकारतात. त्यांचा हस्तक्षेप नको म्हणतात. इतकेच काय निवडणुका न घेता आपले प्रतिनिधी आपणच बीनविरोध निवडून देतात. सरकार शाही बळकट करण्यात गुंंतलेल्या नेहरू- -पटेल-आझाद आदींना धक्का असतो. निवडणुकात गांधींनी कॉंग्रेसला पाठिंबा द्यावा असा त्यांचा आग्रह असतो. गांधी तर कॉंग्रेसच बरखास्त करा असा आग्रह धरतात. गांधी कॉंग्रेसचा त्याग करतात. शेवटी सरकार विरोधी करवाया केल्या म्हणून गांधींना अटक करण्यात येते.

सरकार किमान असावे असा गांधींचा आग्रह होता. ही बाब नेमकी नेहरूनीतीच्या विरोधात जाणारी आहे. आज गांधी आणि नेहरू यांच्यात मतभेद होते असं म्हटलं तर कोणी कबुल करत नाही. गांधींना गोडसेने मारले तेंव्हा गोडसेला सावरकरांना भाजप मोदीला संघाला शिव्या देणे सोपे असते.  आपण मात्र गांधी विचारांचे पालन करत नाहीत. उलट त्यांच्या काहीसे विरोधीच आहोत हे इतर सर्व विचारसरणीचे लोक लपवून ठेवतात.

असगर वजाहत यांनी पुढे आणलेला हा किमान सरकारचा मुद्दा आज तपासून पाहिला तर असे लक्षात येईल की गांधींचा उदो उदो करणार्‍या नेहरू आणि पुढे इंदिरा गांधी, राजीव गांधी ते अगदी अलिकडे सोनिया गांधी प्रणीत मनमोहन सिंग या सर्वांनी गांधी विचारांना हरताळ फासलेला आहे. गोडसेने तर गांधींची शारीरिक हत्या केली. या सर्वांनी गांधी विचारांची राजरोस हत्या केली आहे. सरकार नावाची प्रचंड यंत्रणा उभी केली जी की एकुण उत्पन्नाच्या 70 टक्के इतका वाटा अधिकृत रित्या पगाराच्या रूपाने खावून टाकते. 

याचा परिणाम आज काय झाला? आज जेंव्हा शासन पुर्णपणे कर्जबाजारी बनले आहे तेंव्हा शासनाने हात झटकायला सुरवात केली आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान सुरू केले. याचा अर्थ काय होतो? आम्ही निर्माण केलेली न्यायदानाची यंत्रणा अपुरी , कुचकामी वेळखावू ठरली आहे. तेंव्हा आता लोकांनी पुढे येवून आपआपसातले भांडण-तंटे मिटवून घ्यावेत. शासनाकडे येवू नये. मग गांधी तरी काय सांगत होते. आमच्या गावात आमचे सरकार हेच तर गांधींचे म्हणणे होते. 

गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. याचा अर्थ असा की आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या आहेत.  त्या तूमच्या गावाची/शहराची स्वच्छता करण्यास असमर्थ आहे. तेंव्हा आता तूम्ही तूमची स्वच्छता तूमच्याच पैशाने करून घ्या. मग गांधी काय म्हणत होते. आमचे गाव आम्हीच स्वच्छ करणार. 65 वर्षानंतर आपण परत गांधींपाशीच येवून पोचलो आहोत.

गांधीं हे अ-सरकारवादी होते. पण आजचे सगळे डावे समाजवादी सरकारी हस्तक्षेपाची वारंवार मागणी करतात. महात्मा गांधींच्या नावाने मनरेगा योजना सरकारने काढली. या योजनेत एका मजुराला एका दिवसाला मिळाणारा रोजगार हा 180 रूपयांच्या आसपास आहे. आणि खुल्या बाजारात कुठल्याही जिल्ह्याच्या गावी सकाळी मजुरांचा बाजार भरतो तिथे कुठल्याही मजुराला किमान 250 रूपये रोजाने रोजगार उपलब्ध आहे. मग आता सामान्य लोकांवर विश्वास ठेवणारा  गांधीविचार  यशस्वी ठरला की डाव्या समाजवाद्यांचा सरकारी हस्तक्षेप यशस्वी ठरला? 

या नाटकात महात्मा गांधींना सरकार विरोधी हालचालींसाठी तुरूंगात टाकल्यावर ते गोडसेच्याच बराकीत राहण्याचा आग्रह धरतात. पुढे गांधी आणि गोडसे यांचा संवाद चालत राहतो. गांधी गोडसेला मुलभूत प्रश्न विचारतात. तूम्ही हिंदू आहात का? अर्थातच गोडसे उत्तर देतात हो. मग गांधी विचारतात तूम्हाला आत्मा अमर आहे हे मंजूर आहे का? यालाही गोडसे होकार देतात. मग गांधी विचारतात माझ्या आत्म्याची हत्या न करता तूम्ही माझ्या शरीराची हत्या करून काय साधणार होता? या प्रश्नावर गोडसे निरूत्तर होतात.

अखंड भारत प्रश्नावर गांधींनी गोडसेची घेतलेली फिरकी तर अफलातून आहे. गांधी गोडसेला विचारतात, तूमचे अखंड भरतावर प्रेम आहे मग तूम्ही हा अखंड भारत फिरून बघितला आहे का? माझ्या गुरूंनी मला भारत फिरण्यास सांगितले होते तेंव्हा मी तो फिरून बघितला आहे. गोडसेला यावर उत्तर देता येत नाही. मग अखंड भारताचा गोडसेचा नकाशा पाहून गांधी विचारतात, तूमचा हा भारत तर अशोकाच्या भारतापेक्षाही लहान आहे. तूम्ही हिंदूत्वाला इतके संकुचित का करता? गांधींच्या या प्रश्नावरही गोडसेला काही उत्तर सापडत नाही. 

नाटकाचा शेवट अप्रतिमरितीने असगर वजाहत यांनी केला आहे. गांधी आणि गोडसे या दोघांचीही तुरूंगातून एकाच दिवशी सुटका होते. दोघे जेलच्या दारातून बाहेर पडून दोन दिशांनी चालायला सुरवात करतात. दोघांचीही एकमेकांकडे पाठ आहे. अचानक गांधी थांबतात. गोडसेही थांबातात. मागे वळून न पाहता गांधी हात मागे करतात. गोडसे वळून गांधीकडे येण्यास निघालेला असतो. 

सगळ्यांना परत गांधी विचारांकडेच परतावे लागते असा एक संदेश असगर वजाहत यांनी दिला आहे. 

या नाटकाचा शेवट बदलून एक संहिता नुकतीच औरंगाबाद येथे सादर झाली. या बदललेल्या नाटकात शेवटी गोडसे गांधीवर गोळ्या घालतो व त्यांना मारतो असे दाखवले आहे. आता जर हेच दाखवायचे तर नाटक संभवतच नाही कारण मूळात गांधींना गोळ्या घातल्या गेल्या व त्यात त्यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे. यावर चर्चा करताना दिग्दर्शकाने मुद्दा उपस्थित केला होता की आज दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी यांची हत्या केल्या गेली तो संदर्भ मला जोडावा वाटला. 

त्याला प्रश्न विचारला गेला की दाभोळकर, कलबुर्गी हे ठीक आहेत पण ज्यांनी हिंसेचे समर्थन केले, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्या कम्युनिस्ट चळवळीतल्या गोविंद पानसरे यांना गांधीविचारांच्या रांगेत कसे उभे करायचे ? आणि असे असेल तर हाही एक प्रकारे गांधी विचारांचा डाव्यांवर मिळवलेला विजय म्हणावा लागेल.

असगर वजाहत यांच्या या नाटकाने तथाकथित डाव्या आणि उजव्या दोघांचीही गोची करून ठेवली आहे. गरिबांसाठी काय करायला पाहिजे असे विचारले असता गांधीजी म्हणाले होते, ‘गरीबांचे भले करण्याच्या नावाखाली त्यांच्या छातीवर तूम्ही बसला आहात. ते आधी उठा.’ आज विविध योजनांच्या नावाने गरीबांच्या छातीवर बसून आपला फायदा करण्यात नोकरशाही, डावे समाजवादी एनजीओ वाले आणि आता भाजपवालेही पुढे आहेत. 

अमेरिकेत फेसबुकच्या कार्यालयास भेट दिल्यावर त्यांच्या भिंतीवर भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गांधींचा अहिंसेचा विचार लिहावा लागला हाही एक काळाने उगवलेला सुडच म्हणावा लागेल. 

दुष्यंतकुमार या हिंदी कविच्या ओळी फार सुंदर आहेत. 

कल नुमाईश मे मिला वो चिथडे पहने हुए

मैने पुछा के नाम तो बोला के हिंदुस्थान है

सामान कुछ नही है फटेहाल है मगर

झोले मे उसके पास कोई संविधान है

एक बुढा आदमी है मुल्क मे या यु कहो

इस अंधेरी कोठरी मे एक रोशनदान है

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 12:26 am | संदीप डांगे

_/\_ _/\_ (जर हे व्हॉट्सप फॉरवर्ड नसेल तर) =))

फेदरवेट साहेब's picture

26 Jan 2017 - 12:35 am | फेदरवेट साहेब

नाही हो व्हाट्सऍप फॉरवर्डच आहे साहेबा. आमची कुठली अक्कल इतकी तरल चालायला अन आम्ही upper intellectual circles मध्ये बसायला (ब्रिटिश अक्कल म्हणजे कवडीची लायकी नसताना नाके अपरी करून हिंडत येण्याची कला होय, शु: सीक्रेट हाय) फॉरवर्ड एका प्राध्यापकांनी केलाय आमच्या (आम्हाला शिक्षित करायचा एक प्रयत्न म्हणुन) आम्हीही असेच हात जोडले होते :)

राजेश घासकडवी's picture

26 Jan 2017 - 5:40 am | राजेश घासकडवी

नाटकाचा सारांश आणि संदेश आवडला. इथे सादर केल्याबद्दल धन्यवाद.

सेंट्रलायझेशन आणि डीसेंट्रलायझेशन हे वेगवेगळ्या पातळ्यांवर मागेपुढे होत राहातं. दोनचारशे वर्षांपूर्वी सगळंच डीसेंट्रलाइझ्ड होतं. लहान लहान राज्यं, तीही त्याहून लहान लहान सुभेदाऱ्यांनी बनलेली असं काहीसं चित्र होतं. कुठेतरी आख्ख्या भारतावर हक्क सांगणारा बादशाह असे, पण त्याला पुरेशी खंडणी दिली की तुमच्या राज्यात काहीही करण्याची तुम्हाला मुभा असे. 'गल्लीत घाला गोंधळ आणि दिल्लीत मुजरा करा' हे वेगवेगळ्या पातळीवर होतं. अजूनही थोडं आहेच. मात्र पूर्णपणे डीसेंट्रलायझेशनचा गांधीवाद उपयुक्त ठरलेला नाही हेही तितकंच खरं.

गामा पैलवान's picture

26 Jan 2017 - 1:48 pm | गामा पैलवान

लोकहो,

गांधीवाद म्हणजे नक्की काय? मोहनदास गांधींनी गांधीवादाच्या नावाखाली टेररिस्ट फायनान्सिंग सुरू केलं. अत्याचारी आणि आक्रमक पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्या म्हणून गांधी उपासाला बसले. मग या गांधीवादाचं लोढणं भारताच्या गळ्यात का म्हणून?

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 2:17 pm | संदीप डांगे

अजून किती काळ खोट्याला खुट्यासारखं धरुन बसणार...
५५ कोटीसाठी उपोषण नव्हतं हे आता जाहिर झालंय...
तरी कूजबूज मोहिम माघार घेण्याचं नाव घेत नै बॉ!

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2017 - 4:15 pm | श्रीगुरुजी

>>> ५५ कोटीसाठी उपोषण नव्हतं हे आता जाहिर झालंय...

हे कोणी जाहीर केलंय?

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 5:09 pm | संदीप डांगे

http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm

बाकी तुमचा हा --(हे कोणी जाहीर केलंय? ) --- प्रश्न समजला नाही.

अरेरेरे!

शिळ्या कढीला ऊत तरी किती वेळा आणायचा तो?

असो, गांधींचे उपोषण जर पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठीच होते, तर उपोषणपूर्व भाषणात (१२ जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी) त्याचा उल्लेख का नसावा? (त्यांची सर्व भाषणे जालावर उपलब्ध आहेत)

तसेच, ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतरही २ दिवस उपोषण का सुरू होते?

वरील दोन प्रश्नांची समाधानकरक उत्तरे जोवर मिळत नाहीत तोवर गांधींचे उपोषण ५५ कोटींसाठीच होते यावर विश्वास ठेवता येत नाही.

टीपा
१) पाकिस्तानला ५५ कोटी द्यावेत असे गांधीचे मत होते हे मान्यच. (फक्त उपोषण त्यासाठीच होते याचा पुरावा नाही)
२) वरील भाषणातील काही वाक्ये उद्बोधक वाटावीत -

The fast begins from the first meal tomorrow. The period is indefinite and I may drink water with or without salts and sour limes. It will end when and if I am satisfied that there is a reunion of hearts of all the communities brought about without any outside pressure, but from an awakened sense of duty.

तसेच, हे वाक्य तर खासच -

That destruction is certain if Pakistan ensures no equality of status and security of life and property for all professing the various faiths of the world, and if India copies her.

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 5:26 pm | संदीप डांगे

1

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2017 - 6:39 pm | श्रीगुरुजी

गांधीवादी असे म्हणणारच हो. त्यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 6:44 pm | संदीप डांगे

म्हणजे तुम्हाला जे हवं त्या सोयिस्कर बकवासवरच तुम्ही विश्वास ठेवता, सत्य आणि पुराव्यांवर नाही.

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2017 - 6:48 pm | श्रीगुरुजी

म्हणजे तुम्हाला जे हवं त्या सोयिस्कर बकवासवरच तुम्ही विश्वास ठेवता, सत्य आणि पुराव्यांवर नाही.

तुम्ही काय वेगळं करताय?

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 6:59 pm | संदीप डांगे

हो का? खोडून काढा मग, सत्य पुराव्यांसकट, हातच्या कंकणाला आरसा कशाला?

बाकी तुम्ही खोट्या प्रचारकांवर विश्वास ठेवा असं सूचित करत आहात हे नमूद करतो. ते कशासाठी ह्याचे कारण द्याल काय?

५५ कोटींसाठी उपोषण करुन दबाव आणला हे तथ्यांची मोडतोड आहे हे पुरतं उघड झाले आहे, पण गांधीद्वेषी लोकांना जाणूनबुजून खोटंच कवटाळून बसायचं आहे हे पुन्हा-पुन्हा स्पष्ट होत आहे.

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2017 - 8:27 pm | श्रीगुरुजी

तेच तेच करायचा कंटाळा आलाय. गांधींजींंशी संबंधित काही विशिष्ट गोष्टींविषयी गांधीवादी नेहमीच बोलण्याचे टाळतात किंवा त्याविषयी असत्य प्रतिपादन करतात (उदा. त्यांचे सत्याचे प्रयोग, ५५ कोटी, हरीदास, वडिलांंचा म्रुत्यु इ.). हा तसाच कांगावा आहे.

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 9:11 pm | संदीप डांगे

ओ येस.... तुम्ही करता ते सत्यप्रतिपादन, गांधीवादी करतात तो कांगावा... बरं बरं!

तरी बरं, हे ५५ कोटी देण्याचा आणि उपोषणाचा संबंध नाही हे गांधीवादी नसलेल्यांनीही सांगितलंय. तरी आपलं उघडं पडलेलं थोतांड निभवून न्यायचंच असेल तर हास्यास्पद परिस्थिती कोणाची होते ते जग बघतंय.

आता जे जे ह्याला असत्य म्हणतील ते सर्व कांगावेखोर आणि गांधीवादीच सम्जायला लागतील. जे ह्याला सत्य समजतील ते हरिश्चंद्राचे अवतार आहेत असे मानायचे बौद्धिक मिळाल्यावर काय बोलायचं... ?

बाकी, ५५ कोटी आणी उपोषणाचा मुद्द्यावर स्पष्ट प्रश्न विचारला होता, बाकीचे असंबंद्ध मुद्दे काढून दिशाभूल करणे म्हणजे ह्यॅ ह्यॅ ह्यॅ....

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2017 - 10:09 pm | श्रीगुरुजी

>>> ओ येस.... तुम्ही करता ते सत्यप्रतिपादन, गांधीवादी करतात तो कांगावा... बरं बरं!

मग काय गांधींवादी करतात ते सत्यप्रतिपादन आणि मी करतो तो कांगावा असं आहे की काय?

>>> तरी बरं, हे ५५ कोटी देण्याचा आणि उपोषणाचा संबंध नाही हे गांधीवादी नसलेल्यांनीही सांगितलंय. तरी आपलं उघडं पडलेलं थोतांड निभवून न्यायचंच असेल तर हास्यास्पद परिस्थिती कोणाची होते ते जग बघतंय.

मणिभवनवाले आणि ठाकूरदास बंग हे गांधींवादी नव्हते या संशोधनाबद्दल अभिनंदन!!!

>>> आता जे जे ह्याला असत्य म्हणतील ते सर्व कांगावेखोर आणि गांधीवादीच सम्जायला लागतील. जे ह्याला सत्य समजतील ते हरिश्चंद्राचे अवतार आहेत असे मानायचे बौद्धिक मिळाल्यावर काय बोलायचं... ?

गांधीवादी जे जे दडपून सांगतात ते ते सत्य असे बौद्धिक मिळाल्यावर काय बोलायचं?

>>> बाकी, ५५ कोटी आणी उपोषणाचा मुद्द्यावरच स्पष्ट प्रश्न विचारला होता, बाकीचे असंबंद्ध मुद्दे काढून दिशाभूल करणे म्हणजे ह्यॅ ह्यॅ ह्यॅ....

जो प्रश्न होता त्याचेच उत्तर दिले आहे.

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 6:47 pm | संदीप डांगे

तसेच, जर गांधीवाद्यांवर विश्वास नाही ठेवायचा तर धादांत खोटा प्रचार करणार्‍यांवर ठेवावा असं सुचवायचं आहे बहुतेक तुम्हाला... खोट्या प्रचारकांवर विश्वास ठेवायला हवा असं सुचवण्यामागची मजबूरी काय आहे?

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2017 - 6:49 pm | श्रीगुरुजी

गांधीवाद्यांवर विश्वास ठेवायचा? ते काय राजा हरिश्चंद्राप्रमाणे किंवा सत्यवचनी रामाप्रमाणे होते का?

वरुण मोहिते's picture

26 Jan 2017 - 9:00 pm | वरुण मोहिते

पण ज्या ५५ कोटींची बोलत आहेत ते उपोषणाचे कारण नव्हते . ज्या वेळी फाळणीचा निर्णय झाला त्या वेळी हिंदुस्थान प्रांताची गंगाजळी ३७५ कोटी होती (आकडा वर खाली असू शकतो ) त्या आधारावर ५५ कोटी पाकिस्तान सिंध प्रांताला मिळाले . अनेक पुस्तकात ह्याचा उल्लेख आहे . रामचंद्र गुहा ह्यांच्या इंडिया आफ्टर गांधी ह्यात देखील आहे हे एक उदाहरण पण नंतर खोटा प्रचार जास्त झाला . त्यांची तत्व वेगळी असतील त्या नुसार ते जगले म्हणून एक व्यक्ती म्हणून ते इतकेही छोटे नव्हते कि कोणीही त्यांना काहीही बोलावं . जगातल्या प्रत्येक देशात भारत म्हटलं कि गांधी आठवतात . अनेक नेते इथे आले कि त्यांच्या समाधीचा दर्शन पहिले घेतात .आजही त्यांच्या नावाची गरज पडतेच ना अगदी मोदी सरकार ला हि . असो नोबेल कमिटी ने त्यांचा निधन झाल्यावर दिलगिरी व्यक्त केली कि त्यांना नोबेल पारितोषिक दिला नाही हि आमची चूक झाली . त्यावेळी नोबेल सामाजिक क्षेत्रात कोणालाही मिळत नसे सहजा सहजी. त्यावरून त्यांचा मोठेपण सांगत नाही पण त्यांची मूल्य वेगळी होती . आणि त्यांच्याबाबत बोलताना लोक जी पातळी सोडून बोलतात ते पण योग्य नव्हे . राहता राहिला मुद्दा हरिलाल चा तर प्रकाशाची सावली हे दिनकर जोशी ह्यांचं पुस्तक आहे ते पण वाचावं. वडील आणि मुलाचा वाद असणं आणि त्याला नंतर गांधीच चूक आहेत असा अपप्रचार करणं , भांडवल करणं हे हि चूक आहे . असो लिंक नाहीत हा माझ्याकडे सगळं द्यायला .

गामा पैलवान's picture

26 Jan 2017 - 9:06 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

म्हणजे तुम्हाला जे हवं त्या सोयिस्कर बकवासवरच तुम्ही विश्वास ठेवता, सत्य आणि पुराव्यांवर नाही.

मणिभवन आणि अरविंद पोतनीस कोण लागून गेलेत मोठे? मणिभवन ज्याची पोळी खातात त्याचीच टाळी वाजवणार, हे आम्हाला कळतं.

रिझर्व्ह बँकेने फाळणीच्या वेळेस दोन्ही देशांचे अर्थव्यवहार हाताळले होते. बँकेच्या मते मोहनदास गांधींनी ५५ कोटी पाकिस्तानास देण्यासाठी उपास सुरू केला. त्यासंबंधी उल्लेख पान क्रमांक २६ च्या तळाशी इथे आहे : https://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/PDFs/89651.pdf

नेहरूंनी ५५ कोटी देतांना ही भाषा वापरली : ‘Government’s contribution, to the best of their ability, to the non-violent and noble effort made by Gandhiji, in accordance with the glorious traditions of this great country, for peace and goodwill’

गांधीवाद म्हणजे टेररिस्ट फायनान्सिंगच आहे.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

26 Jan 2017 - 9:19 pm | संदीप डांगे

काय गंमत आहे बघा, एकिकडे गांधीवादी खोटारडे आणि कांगावेखोर, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांचेच दाखले देऊन ते म्हणतात ते खरेच आहेत असेही बोलायचे.
एक पे रहना, या तो घोडा बोलो या तो चतुर बोलो!

बाकी दुवा वाचतो आणि कळवतो.. =))

फेदरवेट साहेब's picture

27 Jan 2017 - 11:11 am | फेदरवेट साहेब

उदा. त्यांचे सत्याचे प्रयोग, ५५ कोटी, हरीदास, वडिलांंचा म्रुत्यु इ.

इतके सगळे असूनही स्वच्छ भारत विकायला गांधींचेच फोटो लागतात, लोगो मध्ये त्यांचा सिग्नेचर चष्मा लागतो, बहुत काय बोलणे आता ;)

माझा गांधीवादावरही विश्वास नाही अन त्यांच्या विरोधकांच्या अक्कलशून्य बौद्धिकावर सुद्धा. त्यामुळे एकमेकांचे दाखले नाचवत कोणी येऊ नये अशी आगाऊ विनंती.

फेदरवेट साहेब's picture

27 Jan 2017 - 11:27 am | फेदरवेट साहेब

बाकी, गांधींवर आलेल्या वर्तमानातील नाटकावर बोलायचं सोडून इतिहासाचा आधार का घ्यायला लागत असेल? :D

फेदरवेट साहेब's picture

28 Jan 2017 - 2:36 pm | फेदरवेट साहेब

लव्ह हिम ऑर हेट हिम. त्यांची पूजा करा किंवा त्यांचे मूर्तिभंजन करा एक गोष्ट पक्की आहे.

हा मनुष्य जश्या राजकीय गुगली फेकतो त्याला तोड नाही. सत्ताकारण नामे बुद्धिबळात हे नाव एक मजबूत संस्था बनून राहिले आहे हेच खरे.

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2017 - 3:36 pm | श्रीगुरुजी

जबरदस्त निर्णय

भारतानेही असा निर्णय घेण्याचे धाडस दाखवावे.

फेदरवेट साहेब's picture

28 Jan 2017 - 6:24 pm | फेदरवेट साहेब

त्यांनी ७ देशांच्या मुस्लिम निर्वासितांना बंदी केली आहे. भारत असा निर्णय कसा अन कधी घेणार ?

भारतात आत्ता निर्वासित कुठं आलेत ? अधिकारीक दृष्ट्या? की ज्यांना कायदा करून बंदी करावी लागेल? ऐतिहासिक चुका झाल्यात अन अजूनही बांगलादेशी घाण येत असते. ते मान्यच आहे. पण ते सगळे अनधिकृत रित्या. घुसखोर अन निर्वासित ह्या संकल्पना आपण परत एकदा वाचायची गरज आहे असे वाटते. दोन्हीना वेगळे शब्द आहेत इंग्लिश मध्ये 'Refugee' (निर्वासित) आणि 'infiltrator' (घुसखोर) असे.

गामा पैलवान's picture

5 Feb 2017 - 1:57 pm | गामा पैलवान

कम्युनिस्टांचा अड्डा असलेल्या जवाहरखान नेहरू विद्यापीठात ‘एक भारत अभियान – कश्मीर की ओर’ हा काश्मिरी हिंदूंच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम हिंदुत्वनिष्ठांनी भारतद्रोह्यांच्या नाकावर टिच्चून दणदणीतरीत्या यशस्वी केला. अधिक माहिती : http://sanatanprabhat.org/marathi/2017/02/05/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae...

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2017 - 2:21 pm | श्रीगुरुजी

बरोबर.

http://www.dnaindia.com/delhi/report-jnu-students-protest-to-call-off-ek...

विद्यापीठातील देशद्रोही निधर्मांधांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. परंतु त्यांना कार्यक्रम थांबविता आला नाही.

ही घडामोड ताजी नाही मात्र ऐसी वर अनु राव यांनी ह्या लेखाची लिंक दिली ती वाचली. बरे वाटले. याअगोदरही या माणसाबद्दल वाचलं होतं पण ते एवढं डिटेल नव्हतं.

फार फार धन्यवाद या लिंकसाठी. यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करीन नेहमी.

त्याच त्या नालायक पक्ष अन राजकारण्यांसाच्या समर्थनार्थ भुंकत बसण्यापेक्षा अश्या सोन्यासारख्या माणसांचे हात बळकटकेले आपण तर ती खरी लोकशाहीची सेवा ठरेल. दुव्याकरता दुवा.

मोदींनी मनमोहन सिंगांवर केलेली टीका काँग्रेस नेत्यांच्या खुप जिव्हारी लागली आहे. त्यांच्या मते, 'रेनकोट घालून आंघोळ करणे' ही अत्यंत असभ्य, गर्हणीय, निरर्गल, गरीमाहीन वगैरे टिका आहे. माझ्या मर्यादीत कल्पनाशक्तीला ताणून, खेचूनसुद्धा यात असभ्य काय आहे हे कळले नाही. मोदी हे २४ बाय ७ राजकारणी आहेत. त्यांची टीका ही मनमोहन सिंग या दुसर्‍या राजकारण्याच्या धोरणांवर, त्यांनी घेतलेल्या भुमीकेवर आहे. एवढे घोटाळे होत असताना, मनमोहन सिंगांची इमेज मात्र स्वच्छ राहीली यावरील ती टीपण्णी होती. ह्याला वैयक्तीक टीका म्हणणारे लोक हे जाणत नाहीत का की मोदींना खरोखर मनमोहन सिंगांच्या आंघोळीबद्दल बोलायचं नव्हतं, तर ते एक रूपक होते? याला प्रत्त्युत्तर देणे हा मनमोहन सिंगांचा विशेषाधिकार आहे. आता तो ते वापरत नाहीत हा त्यांचा पर्सनल चॉईस झाला. मात्र अश्या टीकेला उत्तर न देणे हीसुद्धा त्यांची राजकिय भुमीकाच आहे स्वतःचे प्रतिमासंवर्धन करण्याची. अश्यावेळी, बारक्या पोरांसारखं 'ह्यानं मला चिडवलं' असं रडून भेकून काय मिळणार? आणि यासाठी संसद बंद ठेवणे हा तर अक्षम्य गुन्हा आहे. फेबूवर वगैरे पण मोदी कसे असंस्कृत असा ओरडा सुरू आहे. पण या टिकेत असंस्कृत काय आहे याचं उत्तर मात्र देत नाहीत.

संदीप डांगे's picture

10 Feb 2017 - 10:04 am | संदीप डांगे

नोटाबंदीवरच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू नये म्हणून केलेल्या ह्या खेळीत मोदी जिंकणार (आणी नोटाबंदीचे प्रश्न व सामान्य नागरिक हरणार) असेच दिसते.

चिनार's picture

10 Feb 2017 - 11:54 am | चिनार

सहमत...
मोदींना घेरण्याची संधी विरोधक प्रत्येक वेळी गमवतात. इतके मुरलेले काँग्रेजी दरवेळी मोदींच्या जाळ्यात कसे फसतात हे कळत नाही. कालही खर्गे " तुम्ही असं काऊन बोलले" हे विचारायला मोदींना भेटले.
हे असं " आम्ही कट्टी..थांब तुय नाव आईले सांगतो" टाईप राजकारण काँग्रेस किती दिवस करणार?

संदीप डांगे's picture

10 Feb 2017 - 1:08 pm | संदीप डांगे

सब मिले हुये है जी... नोटाबंदीच्या काळात राहुल गांधी मोदींना भेटला आणि त्यानंतर लगेचच राजकिय पक्षांना जुन्या नोटा आपल्या खात्यात भरायला मुभा आहे असं जाहिर झालं... विरोधकांना घेरायचेच नसेल किंवा घेरायला गेले की ब्लॅकमेल होत असेल. सोनिया-राहूल-जावाइ-सिंग ह्या सर्वांवर भ्रष्टाचारी, भ्रष्टाचारी म्हणून २४बाय७ (सत्ता आली तरी अजूनही ) तोंडसुख घेणारेभाजपे तीन वर्ष होत आली तरी कोणतेही खटले दाखल करत नाहीयेत.. यावरुन काय ते समजून घ्या. तेरीभी-चूप-मेरी-भी-चूप असा प्रकार आहे.

शेवटचा कोणता मोठा घोटाळा कोणत्याही राजकिय पक्षाने उघडकीस आणला, त्याचा पाठपुरावा केला आणि दोषींना तुरुंगात पाठवले, आठवून बघा.

तसंही असेल.."जावई" काँग्रेसला खरंच महागात पडलाय हे नक्की..

शेवटचा कोणता मोठा घोटाळा कोणत्याही राजकिय पक्षाने उघडकीस आणला, त्याचा पाठपुरावा केला आणि दोषींना तुरुंगात पाठवले, आठवून बघा.

खरं सांगू का, त्या भ्रष्टाचाऱ्याला जेलमध्ये टाका, फाशी द्या, जंगलात सोडा किंवा मोकाट सोडा त्याने काहीही फरक पडत नाही. पण त्याने दाबलेले पैसे परत आले पाहिजे. दुर्दैवाने त्यासाठी कायदा नाही.

संदीप डांगे's picture

10 Feb 2017 - 9:12 pm | संदीप डांगे

बर्‍याच केसमधे घोटाळा हा सरकारला झालेले नुकसान असते, त्यासाठी संबंधित मंत्री-अधिकार्‍याला जी रक्कम मिळते ती त्यामानाने खूप कमी असते. समजा दहा हजार कोटीचा प्रकल्प सहा हजार कोटीमधे होतो, हे वरचे चार हजार कोटी अनेक प्रकारे सरकारकडून काढले जातात, त्यात संबंधित मंत्र्याला-अधिकार्‍याला किती रक्कम मिळाली हे कधीच सिद्ध होऊ शकत नाही. फार तर भुजबळ टाईप मालमत्ता आणी इन्कम यांचं गुणोत्तर गंडलं तरच पकडू शकतेत... दुसरं उदाहरण. एखाद्या प्रकल्पात समजा सरकारला दहा हजार कोटी फायदा होणार असेल पण तो तेवढा नाही हे दाखवायचे असेल तर संबंधित अधिकारी-मंत्री फारतर दहा टक्के रक्कम कंपनीला होणार्‍या फायद्यातून मिळवत असतील... कंपनीने सरकारकडून मिळवलेला निधी हा शंभर टक्के व्हाईट असतो, रितसर बिलं देऊन घेतला असतो... कायद्यात पकडणे मुश्किल असते. फारच झाले तर एखादं शालेय गणवेषाचे कंत्राट, बाहेर बाजारात ५०० रुपयाचा उत्तम गणवेष मिळतो पण सरकारला ७५० लावला जातो आणि प्रत्यक्ष डीलिवर झालेल्या गणवेषाचा दर्जा १०० रुपयांचा असतो, त्यात भ्रष्टाचार स्पष्ट दिसून येतो व सिद्धही करता येतो मात्र हेही खूप किचकट आणि फिर्यादीचा कस-दमखम पाहणारे काम असते.... चिक्कीचे उदाहरण ताजेच आहे....

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2017 - 2:58 pm | श्रीगुरुजी

न्यायप्रक्रिया अत्यंत संथ असल्याने हे खटले कूर्मगतीने चालतात. लालूला शिक्षा जाहीर होऊन ३ वर्षे होऊन गेली. दोनअडीच महिने तुरूंगात काढल्यावर तो जो सुटला तो अजून जामिनावर बाहेरच आहे. जयललिताचा खटला इतका रेंगाळली की ती वर गेली तरी अजून निकाल आलेला नाही. शिबू सोरेनवर गुन्हा सिद्ध होऊन ७-८ महिने तुरूंगात काढल्यानंतर तो अपीलात सुटला. एका दुसर्‍या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा सिद्ध होऊनसुद्धा त्याचे वय लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला शिक्षा दिली नाही. नरसिंहरावांनी १९९३ मध्ये लोकसभेत विश्वास ठरावावर आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी झामुमोच्या ५ खासदारांना प्रत्येकी १ कोटी रूपये लाच दिल्याचे सिद्ध होऊनसुद्धा गुन्हा संसदेच्या सभागृहात घडल्याने न्यायालय शिक्षा देऊ शकले नाही.

मागच्याच आठवड्यात झारखंडच्या एका माजी मंत्र्याला ७ वर्षांची शिक्षा झाली आहे. छगनबाप्पा व त्यांचे पुतणे जवळपास वर्षभर तुरंगात आहेत. राष्ट्रवादीचा रमेश कदमसुद्धा जवळपास वर्षभर आत आहे. थोड्या प्रमाणात व अत्यंत संथ गतीने का होऊना पण काही जणांना तरी शिक्षा होत आहे.

संदीप डांगे's picture

11 Feb 2017 - 1:12 pm | संदीप डांगे

कृती करायची वेळ आली की न्यायालयाला व संथ गतीला पुढे करायची चाल नेहमीची झाली आहे आता. धमक असेल तर खटले दाखल तर करावेत भाजपने, कोर्टात काय तो निकाल लागेल तो लागेल तेव्हा लागू देत. पुरावे आहेत ना मग सडवा सगळ्यांना आत, पुरावे नसतील तर मग उठसूठ आरोप करणे हा खोटारडेपणा आहे असे समजावे.

कालच मोदी हरिद्वारच्या सभेत म्हणाले: मैं कांग्रेस के नेताओं से कहना चाहता हूं कि जबान संभाल कर रखो, वरना मेरे पास आपकी पूरी जन्मपत्री पडी हुई है।

म्हणजे काय कुंडली आहे ह्यांच्याकडे पण माझ्यावर टिका कराल तर याद राखा, उघड करेन... का रे बाबा, देशाच्या गद्दारांच्या कुंडल्या स्वतःवर टिका होऊ नये म्हणून ब्लॅकमेलिंगसाठी वापरायच्या आहेत का? हीच का तुमची देशसेवा, देशभक्ती? करा ना उघड, होऊ दे दूध का दूध पानी का पानी. तुमची आणि त्यांची सगळ्यांचीच असलियत बाहेर येईल... जनतेला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल... तोवर ह्या नुसत्या गफ्फा हाणत बसा.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2017 - 10:21 pm | श्रीगुरुजी

काही जणांवर खटले सुरू आहेत (छगनबाप्पा, समीर, रमेश कदम, सोनिया, राहुल व इतर इ.) तर काही जणांची चौकशी सुरू आहे (वडेरा, वीरभ्रद सिंह पतिपत्नी, कृपाशंकर, अजितदादा, तटकरे, अशोक चव्हाण इ.). उशीरा का होईना निकाल लागेलच.

सुबोध खरे's picture

14 Feb 2017 - 7:18 pm | सुबोध खरे

डांगे अण्णा
सर्वोच्च न्यायालयाने स्वतः सहारा श्री सुब्रोतो रॉय एक वर्षांपासून तिहारमध्ये बसवले आहे. तरीही त्यांच्या कडून सर्व पैसे अजून वसूल झालेले नाहीत कि खटला पूर्ण झालेला नाही. काळ्यापैशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेली विशेष तपासणी समितीचे खोदकाम अजून चालू आहे. हे सर्व सकृतदर्शनी न्यायालयाला मान्य असलेले पुरावे असलेल्या केस मधील कहाणी आहे.
नॅशनल हेराल्ड केसमध्ये सकृतदर्शनी पुरावे असल्याने न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असून त्याचे गुऱ्हाळ चालू आहेच. या केसेस मध्ये खटले दाखल करणारी व्यक्ती किंवा न्यायालय स्वतः रस घेत असून आणि सकृतदर्शनी पुरावे असूनही हि स्थिती आहे.
राजकारणी लोकांना माहित असले तरी न्यायालयात सिद्ध होतील असे पुरावे गोळा करणे हि सोपी गोष्ट नाही. सलमान खानने काय केले हे जगाला माहित असूनही १९९८ सालची केस (चिंकारा मारल्याची) २०१६ साली शेवटी निकाल लागून तो सज्जड पुराव्याअभावी( संशयाचा फायदा) सुटला. तसेच २००२ सालची दारू पिऊन गाडी चालवल्याच्या केसचा निकाल १३ वर्षांनी लागून २०१५ मध्ये सातासच सुटला.
असे असूनही आणि हीच वस्तुस्थिती मागे एकदा निदर्शनास आणूनही आपण "परत परत" अशीच विधाने करता यात आपला पूर्वग्रह किंवा मोदी/ भाजप द्वेषच दिसून येतो.

संदीप डांगे's picture

14 Feb 2017 - 7:52 pm | संदीप डांगे

साहेब, सुब्रतो राय २८ फेब्रुवारी २०१४ पासून जेलमधे आहे. तुम्ही एक वर्षापासून म्हणत आहात. मोदीसरकारच्या नावाखाली खपवायचे आहे काय सहारा प्रकरण?

राजकारणी लोकांना माहित असले तरी न्यायालयात सिद्ध होतील असे पुरावे गोळा करणे हि सोपी गोष्ट नाही. सलमान खानने काय केले हे जगाला माहित असूनही १९९८ सालची केस (चिंकारा मारल्याची) २०१६ साली शेवटी निकाल लागून तो सज्जड पुराव्याअभावी( संशयाचा फायदा) सुटला.

बरोबर. जो न्याय सलमान खानला तोच नरेंद्र मोदींना २००२ च्या दंगलीतल्या सहभागाबद्दल लावता येतो, तो आपल्याला पटेल काय? 'जगाला माहित आहे' एवढ्या भांडवलावर कोणाला दोषी किंवा निर्दोष ठरवायचे-मानायचे हे पब्लिक-मीडिया ट्रायल सोयिस्कररित्या बदलते असे निरिक्षण आहे.

असे असूनही आणि हीच वस्तुस्थिती मागे एकदा निदर्शनास आणूनही आपण "परत परत" अशीच विधाने करता यात आपला पूर्वग्रह किंवा मोदी/ भाजप द्वेषच दिसून येतो.

हा हा हा, तुम्हाला काय पूर्वग्रह द्वेष दिसून येतो तो येत राहो. वरचा प्रतिसाद ज्याला आपण उत्तर दिले आहे त्यात नरेंद्र मोदींचे स्वतः केलेले 'ताजे' वक्तव्य आहे. आणि ते वक्तव्य देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसून केले आहे. मैं कांग्रेस के नेताओं से कहना चाहता हूं कि जबान संभाल कर रखो, वरना मेरे पास आपकी पूरी जन्मपत्री पडी हुई है। हे ते वक्तव्य. हे जर खरे असेल तर जन्मपत्री उघड का करत नाहीत, कसली वाट बघत आहेत? जर खोटे असेल तर एवढ्या जबाबदार पदावर बसून असल्या पोकळ गफ्फा मारणार्‍या माणसाबद्दल काय विचार करावा ते तुम्हीच सांगा. निवडणुकीतली भाषणांकडे जास्त लक्ष देऊ नये असे म्हणत असाल तर मोदीजी गेले तीन वर्ष एकच रेकॉर्ड घासत आहेत. ते रेकॉर्ड ऐकून भूलून जाऊन लोकांनी त्यांना निवडून दिले.. सत्तेवर बहुमताने बसले तरी आपले 'परत परत' अशीच विधाने करत आहेत. माझ्यासारख्या क्षुल्लक व्यक्तीचा द्वेष वगैरे बघण्याच्या फंदात पडण्यापेक्षा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचे वर्तन बघा.

एकीकडे देशभक्तीच्या नावाखाली अश्रू ढाळण्याची नाटके करणे आणि दुसरी कडे अशा धमक्या देणे विसंगत आहे. असल्या माणसांवर अंधप्रेम करणार्‍यांवर, आणि लगेच बचावाला सरसावणार्‍यांवर आता दयादेखील येत नाही.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2017 - 2:05 pm | श्रीगुरुजी

कधी कधी असं वाटतं की मोदी प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा टाळावी यासाठी मुद्दाम काहीतरी वादग्रस्त विधान करतात व लगेच विरोधक तेच विधान धरून बसतात व त्यामुळे संसद बंद पाडणे, त्याच विधानावर सातत्याने बाईट देणे इ. प्रकार करीत राहतात. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूलाच राहतो व मोदी त्यातून अलगद निसटतात.

गामा पैलवान's picture

10 Feb 2017 - 12:57 pm | गामा पैलवान

सौरा,

त्यांच्या मते, 'रेनकोट घालून आंघोळ करणे' ही अत्यंत असभ्य, गर्हणीय, निरर्गल, गरीमाहीन वगैरे टिका आहे. माझ्या मर्यादीत कल्पनाशक्तीला ताणून, खेचूनसुद्धा यात असभ्य काय आहे हे कळले नाही.

कुठला रेनकोट आणि कुठली आंघोळ ते तुम्हाला आजूनही कळलेलं नाहीये. ;-)

शेवटी काँग्रेस चोर आहे आणि चोराच्या मनात चांदणे!

आ.न.,
-गा.पै.

काय की... पण नाही कळलं खरंच.

गामा पैलवान's picture

10 Feb 2017 - 7:23 pm | गामा पैलवान

अहो, रेनकोट म्हणजे निरोध हो!
आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2017 - 3:01 pm | श्रीगुरुजी

मोदींनी केलेली "रेनकोट घालून अंघोळ करणे" ही टिप्पणी नक्कीच इतिहासात अजरामर होणार आहे. भविष्यात अनेकवेळा या टिप्पणीचा संदर्भ दिला जाईल. अडवाणींनी "स्युडो सेक्युलर" हा एक नवीन शब्द जन्माला घातला. व्ही के सिंह यांनी "प्रेस्टिस्ट्यूट" हा अत्यंत चपखल शब्द तयार केला. त्याचप्रमाणे ही नवीन टिप्पणी आहे.

अमितदादा's picture

10 Feb 2017 - 11:03 pm | अमितदादा

भारत अणुशक्ती शहर उभारत आहे हा पाकिस्तान ने आरोप करायच्या बर्याच अगोदर, २०१५ साली एका विश्वसनीय स्थळावर (foreignpolicy) लिहिलेला हा एक लांबलचक रिपोर्ट. कर्नाटक मध्ये उभ्या राहिलेल्या दोन अति गुप्त संस्था त्याच्याभोवती होणार्या सैनिकी तळ या विषयी हि माहिती विस्तृत रित्या दिलेय. काही गुप्त कागदपत्रे, अमेरिकन satelite images यांचा हि हवाला दिला आहे. हे स्थळ thermonuclear शस्त्र विकसित करण्यासाठी आहे असा बर्याच जणांचा होरा आहे.

Indian Nuclear City

ह्या रिपोर्ट मधली माहिती sensitive असली तरी बर्याच देशांना आणि लोकांना माहित असल्याने देशाच्या सुरक्षेस धोकादायक नाहीये.

गामा पैलवान's picture

10 Feb 2017 - 11:26 pm | गामा पैलवान

अमितदादा,

तुम्ही दाखवलेल्या अहवालात औष्माण्विक (=थर्मोन्यूक्लियर) अस्त्र असा मोघम उल्लेख आहे. मात्र त्यासाठी शुद्ध युरेनियमची गरज पडंत नाही. त्यामुळे हे अस्त्र उत्तेजाण्विक (=बूस्टेड न्यूक्लियर) असावे असा अंदाज आहे. उत्तेजाण्विक अस्त्रासंबंधी इथे एक लेख आहे : https://qz.com/588519/why-its-so-difficult-to-build-a-hydrogen-bomb/

आ.न.,
-गा.पै.

अमितदादा's picture

10 Feb 2017 - 11:50 pm | अमितदादा

शुद्ध युरेनिम म्हणजे उरेनिम-२३५ जे thermo nuclear bomb साठी वापरल जात. (वाचा विकीपेडिया). बाकी मी दिलेली लिंक वरवरची नसून खोलवर माहिती आहे . तसेच तयार होणार केंद्र हे अणुशक्ती (nuclear) चे संशोधन केंद्र हि असणार आहे, लष्करी तळ हि असणार आहे. बाकी वरील बातमी विश्वसनीय न वाटल्यास हरकत नाही.

२०१५ सालची आणखी एक बातमी
News report

अमितदादा,

माझ्या मते संमीलन (=फ्युजन) बॉम्बसाठी अधिमात्र (=एनरिच्ड) युरेनियमची तितकीशी गरज पडंत नाही. मात्र उत्तेजाण्विक (बूस्टेड न्यूक्लियर) बॉम्बमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

संमीलनध्वम (= फ्युजन बॉम्ब = हायड्रोजन बॉम्ब)थेट फोडता येत नाही. त्याला चालना म्हणून अगोदन एक छोटा भंजनध्वम (= फिशन बॉम्ब = युरेनियम बॉम्ब ) फोडावा लागतो. तर पहिल्या भंजनध्वममध्ये हानी घडवून आणायचं उद्दिष्ट नसल्याने उच्च प्रतीचं युरेनियम वापरायची काहीच गरज नाही.

याउलट उत्तेजाण्विकध्वम (= बूस्टेड न्यूक्लियर बॉम्ब) मध्ये पहिली पायरी छोटा भंजनध्वम, दुसरी पायरी छोटा संमीलनध्वम आणि तिसरी पायरी पुनश्च पण मोठा भंजनध्वम अशी असते. तर तिसऱ्या पायरीच्या भंजनात अधिमात्र (=एनरिच्ड) युरेनियम वापरलं जातं.

दोन्ही तंत्रज्ञानं उच्च प्रतीची आहेत. एकावर प्रभुत्व मिळवलं की लगेचच दुसऱ्यावर मिळवता येतं. त्यामुळे भारताचे दोन्ही आघाड्यांवर घोडदौड चालू आहेसं म्हणायला हरकत नाही.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

11 Feb 2017 - 12:06 am | संदीप डांगे

पाकिस्तानी आयएसआयचा भारतीय हस्तक एक भाजप कार्यकर्ता?

मध्यप्रदेश (भाजपशासित) एटीएस ने अवैध टेलिफोन एक्स्चेंज चालवणार्‍या एका टोळीला अटक केली असून त्यातल्या ११ संशयितांमधे हा एक आहे. विशेष बाब म्हणजे आयएसआय चे हे कथित हस्तक मुस्लिम नव्हेत...

http://aajtak.intoday.in/crime/story/one-of-the-isi-operatives-arrested-...

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2017 - 8:51 pm | श्रीगुरुजी

बरोबर १ वर्षापूर्वी दिल्लीत ज. ने. विद्यापीठात राडा झाला होता. आधी महिषासुर जयंती समारंभ व नंतर ११ फेब्रुवारीला अतिरेकी अफझल गुरू पुण्यतिथी साजरी करणे व त्यावेळी देशद्रोही घोषणा देणे यामुळे सर्वत्र रणकंदन माजले होते. या कार्यक्रमांना आधी अभाविपने विरोध करूनसुद्धा विद्यापीठातील डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांच्या टोळक्याने अट्टाहासाने हे कार्यक्रम घडवून आणले होते. त्यानंतर २-३ महिने जे रामायण झाले ते सर्वश्रुत आहे.

यावर्षी सुदैवाने असले देशद्रोही कार्यक्रम झाल्याचे वाचलेले नाही. बहुतेक मागील वर्षीच्या अभाविपच्या दणक्याने यावर्षी असले कार्यक्रम पुन्हा करण्याची 'सर्वांदेखत रस्त्यावर लघुशंका' फेम कन्हैया कुमार व त्याच्या टोळीतील कोणाचीही हिंमत झालेली दिसत नाही. असले कार्यक्रम पार पडले असल्यास कोणत्याही वाहिनीवर किंवा वृत्तपत्रातून त्याविषयी सांगण्यात आलेले नाही. त्यावेळी या देशद्रोह्यांच्या मदतीला धावून जाणार्‍या पप्पू, केजरीवाल इ. नी सुद्धा त्याबद्दल मौन बाळगलेले दिसते.

संदीप डांगे's picture

12 Feb 2017 - 8:56 pm | संदीप डांगे

हा धागा ताज्या घडामोडींबद्दल आहे की सोयिस्करपणे चिखलफेक करण्यासाठी व गाडलेले मुडदे उखडण्यासाठी ?
चालू घडामोडींबद्दल असेल तर तुमच्या प्रतिसादाच्या अगदीवरच एक बातमी आहे बघा, अगदी ताजी ताजी.... भाषा समजेल ना?

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2017 - 9:03 pm | श्रीगुरुजी

ती बातमी होय? काय करू मी त्या बातमीचं?

संदीप डांगे's picture

12 Feb 2017 - 9:08 pm | संदीप डांगे

वाचली का नीट? भाषा समजली काय?

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2017 - 9:12 pm | श्रीगुरुजी

नाही समजलं. कृपया नीट, निष्पक्षपणे, त्रयस्थपणे समजावून सांगता का?

संदीप डांगे's picture

12 Feb 2017 - 9:14 pm | संदीप डांगे

काय नाही समजलं ते जरा सांगता काय?

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2017 - 9:16 pm | श्रीगुरुजी

"आजतक" नावाच्या सनसनाटी बातम्या देणार्‍या वाहिनीने काहीतरी बातमी दिली आहे एवढंच समजलं. तसंही आमचं हिंदी अंमळ कच्चंच.

संदीप डांगे's picture

12 Feb 2017 - 9:35 pm | संदीप डांगे

अस्सं अस्सं...! ते भारत तेरे तुकडे होंगे, कन्हयाकुमारची भाषणं वगैरे हिंदी समजलं होतं की जे एन यु वाल्यांनी खास तुमच्यासाठी मराठी ट्रान्सलेट केलं होतं..?

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2017 - 10:17 pm | श्रीगुरुजी

मराठीत भाषांंतर करायला जनेविवाले कशाला हवेत? त्यासाठी मराठी वाहिन्या व वर्तमानपत्रे आहेत की.

गामा पैलवान's picture

13 Feb 2017 - 1:39 am | गामा पैलवान

बायकोस ढकलपत्रातनं एक प्रस्तावपुडके ( = प्याकेज डील) आले. तिनं दाखवल्यावर वाचू जाता म्हंटलं की खास अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी निर्माण केलेलं दिसतंय. तर प्रस्ताव येथे आहे : http://www.wowcher.co.uk/email-deals/brighton/deal-2716191-detail/19-ins...

-गा.पै.

वरुण मोहिते's picture

14 Feb 2017 - 11:17 am | वरुण मोहिते

४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.ओपीएस ह्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2017 - 3:08 pm | श्रीगुरुजी

अजून नाही. तुरंगात जाऊन पडायची वेळ अगदी जवळ आली, तरी शशिकला या उपटसुंभ बाईची कारस्थाने थांबलेली नाहीत. तुरूंगात जाता जाता तिने पनीरसेल्वमला पक्षातून हाकलले असून पलानीसामी नावाच्या आपल्या पित्त्याला विधीमंडळ पक्षाच्या प्रमुखपदी नेमले आहे.

निधन झाल्याने जयललिता सुदैवाने सुटली. आज जयललिता असती तर शशिकलाच्या बरोबरीने तीसुद्दा तुरूंगात गेली असती. तामिळनाडूतील जयललिता, शशिकला, करूणानिधी, करूणानिधीची मुले (स्टॅलिन, अळगिरी, काणीमोडी), करूणानिधीचे नातू मारन बंधू, पी चिदंबरम्, मण्या अय्यर इ. सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. सर्वजण अत्यंत अहंमन्य व कमालीचे भ्रष्टाचारी आहेत. एकाला झाकावा आणि दुसरा काढावा अशी परिस्थिती आहे.

अनुप ढेरे's picture

14 Feb 2017 - 3:31 pm | अनुप ढेरे

शरद पवार/अजित पवार यांचा भ्रष्टाचाराशी याची तूलना होऊ शकेल.

आनंदयात्री's picture

14 Feb 2017 - 9:15 pm | आनंदयात्री

>>निधन झाल्याने जयललिता सुदैवाने सुटली.

निधन नसते झाले तर निकाल लागला असता का असा प्रश्न पडला.

मराठी_माणूस's picture

15 Feb 2017 - 11:43 am | मराठी_माणूस

निधन नसते झाले तर निकाल लागला असता का असा प्रश्न पडला.

तथ्य आहे.

आजचा अग्रलेख http://www.loksatta.com/agralekh-news/sasikala-convicted-in-da-case-1405...

धर्मराजमुटके's picture

15 Feb 2017 - 12:32 pm | धर्मराजमुटके

देशभरातून सरकारी आस्थापनांबाबत सातत्याने नकारात्मक बातम्या येत असताना इस्त्रो ने मात्र स्वतःला कायमच सकारात्मक बातम्यांमधे ठेवले आहे. आज तब्बल १०४ उपग्रहांचे यशस्वी उड्डाण करुन इस्त्रोने एक नवा अध्याय लिहिला आहे. हा मला वाटते की एक जागतिक विक्रमच असावा.
इस्त्रो टीमचे अभिनंदन !

श्रीगुरुजी's picture

15 Feb 2017 - 2:47 pm | श्रीगुरुजी

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा जबरदस्त यश मिळविले. भारताला सातत्याने अभिमान वाटावा अशी कामगिरी इस्रो करीत आहे. हार्दिक अभिनंदन!

संदीप डांगे's picture

15 Feb 2017 - 12:36 pm | संदीप डांगे

ह्या देशात म्हणे स्वातंत्र्य आहे! गुंडागर्दीचे स्वातंत्र्य असावे बहुतेक!

तिकडे इस्रो १०४ उपग्रह एकाच वेळेस अवकाशात सोडून जागतिक विक्रम घडवते,
इकडे ही माकडं स्वतःला काय करता आलं नाही म्हणून रामाचे नाव घेऊन दुसर्‍यांना बडवण्यात धन्यता मानतात. अच्छे दिन!

गामा पैलवान's picture

15 Feb 2017 - 2:04 pm | गामा पैलवान

व्ह्यालेंटाईन डे हा तद्दन गल्लाभरू उत्सव आहे. तो बंद पाडून संस्कृतीचे रक्षण करणे मला तरी आवडते.
-गा.पै.

संदीप डांगे's picture

15 Feb 2017 - 2:19 pm | संदीप डांगे

गल्लाभरु नसलेल्या उत्सवांची यादी मिळेल काय?
प्रेमिकांना मारहाण करणे हे कोणत्या संस्कृतीचे लक्षण आहे?

असेल. पण मारहाण करुन बंद पाडण्याऐवजी प्रबोधन करुन किंवा जन्तेच्या खिशाला भोके पडून बंद झाला तर उत्तम. ! मारहाण करण्याचे समर्थन होऊच शकत नाही.
नाही बंद झाला तरी काही फरक पडत नाही.
अक्कल न वापरता कोणताही सण इव्हेंट म्हणून साजरे करणारे आणि दहशतीच्या जोरावर ते बंद करु पाहणारे दोघांनाही एकाच तराजुत तोलले तरी चालून जावे.

श्रीगुरुजी's picture

15 Feb 2017 - 2:46 pm | श्रीगुरुजी

संपूर्ण असहमत. व्हॅलेंटाईन डे साजरा केला म्हणून इतरांना मारहाण करणारे गुंड आहेत. व्हॅलेंटाईन डे व संस्कृती यांचा काहीही संबंध नाही. गणेशोत्सव, होळी इ. सार्वजनिक उत्सवात मद्यपान करणारे, धागडधिंगा करणारे, स्त्रियांची छेड काढणारे हेच संस्कृतीला मारक आहेत. बंद पाडायचेच असतील तर हे सार्वजनिक उत्सव सर्वात पहिल्यांदा बंद व्हायला हवेत.

पुंबा's picture

15 Feb 2017 - 3:26 pm | पुंबा

अगदी...

गामा पैलवान's picture

16 Feb 2017 - 1:42 pm | गामा पैलवान

हिंदू सण योग्य प्रकारे साजरे करता येतात. व्हॅलेंटाईन डे ची गरजच काय मुळातून?
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

16 Feb 2017 - 3:31 pm | श्रीगुरुजी

धोतर, उपरणे, करगोटा, लंगोटी, टोपी इ. हिंदू वस्त्रप्रावरणे वापरून योग्य पोषाख करता येतो. विजार, सदरा, कंठलंगोटी, पदवेश, मोजे इ. ची गरजच काय मुळातून?

गामा पैलवान's picture

16 Feb 2017 - 8:45 pm | गामा पैलवान

प्रेमाच्या नावाखाली नवतरुणांना वासनाभिमुख करण्यापलीकडे काही घडतं का व्हया.डेत? आधीच फेमिनाझींनी हैदोस घालून कुटुंबव्यवस्था मोडकळीस आणायचा विडा उचलला आहे. भरीस भर म्हणून लव्ह जिहाद फोफावतोय. नवरात्रीसारख्या हिंदू सणांत गैरफायदा घेणारे वासनांध बोकाळलेत. अशा वेळेस संयमाचे धडे द्यायचे की खरे पैसे खर्च करून खोट्या प्रेमाचे फुगे उडवंत बसायचं?
-गा.पै.

संदीप डांगे's picture

16 Feb 2017 - 11:37 pm | संदीप डांगे

संयम?? कसला संयम सांगत आहात गा. पै. लग्नाची वयं आणि अटी दिवसेंदिवस वाढत चालल्यात, शहरातल्या बहुतांश मुलींची २४ व मुलांची वयं २८ च्या पुढे निघून जातात पहिला अनुभव घेईस्तो.. अर्ध आयुष्य (खरेतर संभोगसुख उपभोगायचे सर्वोत्तम वय) संपेपर्यंत संयम बाळगायला सांगताय त्या जीवांना त्यापेक्षा जन्मालाच कशाला घालायचे...? तेव्हाही संयमच बाळगायचा ना!

बिचार्‍यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. तेही खरोखर!

गॅरी ट्रुमन's picture

16 Feb 2017 - 1:53 pm | गॅरी ट्रुमन

२००० साली शिवसेनेनेही व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला होता. त्यावेळी अनेक प्रेमी युगुलांनी 'हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे' ही ग्रिटिंग कार्डे मातोश्रीवर रवाना केली होती हे पण आठवले :)

एकूणच काय बजरंग दल आणि शिवसेना. दोघेही तद्दन गुडघ्यातले.

श्रीगुरुजी's picture

16 Feb 2017 - 3:34 pm | श्रीगुरुजी

२००० नंतरही अनेक वर्षे शिवसेनावाले व्हॅलेंटाईन डे च्या विरोधात होता. पुण्यात अगदी ५-६ वर्षांपूर्वी 'आर्चीज्' च्या दुकानांची मोडतोड केल्याच्या बातम्या आल्या होत्या. सध्या निवडणुक असल्याने सेनावाले गप्प आहेत. निवडणुक नसती तर विरोध परत सुरू झाला असता.

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Feb 2017 - 5:07 pm | हतोळकरांचा प्रसाद

सध्या निवडणुक असल्याने सेनावाले गप्प आहेत. निवडणुक नसती तर विरोध परत सुरू झाला असता.

माझ्या माहितीने आदित्य ठाकरेंनी याबाबतीत शिवसेनेचा स्टॅन्ड दोन-तीन वर्षांपूर्वी स्पष्ट केला आहे. शिवसेना वॅलेंटिने डेला विरोध करणार नसल्याचं त्यांनी म्हटल्याचे आठवतंय.

तरीही जर कोणी इतर कोणालाही वैयक्तिकरित्या त्रास न देता विरोध-निदर्शने करणार असेल तर काय हरकत असावी? हा मार्ग सगळ्या विरोधकांना मोकळा ठेवायला आणि त्यांनी तो पाळायला हरकत नसावी.

गामा पैलवान's picture

16 Feb 2017 - 1:45 pm | गामा पैलवान

लोकहो,

सौदी अरेबियाचा हरामाचा पैसा गिळून असदुद्दिन औवेश्या बघा कसा हुतात्मा बनायला निघाला आहे.

अधिक माहिती : http://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/asaduddin-owaisi-ral...

सविस्तर वृत्त : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/asduddin-ow...

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

16 Feb 2017 - 3:28 pm | गॅरी ट्रुमन

शशीकला नटराजन यांनी तुरूंगात जाण्यापूर्वी निवडलेले एडापड्डी के. पलानीस्वामी यांना तामिळनाडूचे राज्यपाल के.विद्यासागर राव यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून आज शपथविधी होईल. त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत सिध्द करायला १५ दिवसांचा कालावधी आहे.

गामा पैलवान's picture

17 Feb 2017 - 12:40 am | गामा पैलवान

संदीप डांगे,

बिचार्‍यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. तेही खरोखर!

हे व्हया.डे साजरं करायचं कारण होऊ शकंत नाही. ज्यांना अनैतिक संबंध ठेवायचे आहेत त्यांनी खुशाल ठेवावेत. त्यास जाहीर उत्तेजन मिळू नये इतकाच माझा आग्रह आहे.

आ.न.,
-गा.पै.

पण जाहीर उत्तेजन कोण देतं व्हॅ डेला? व्यक्तीला असा उत्सव साजरा करण्याचे स्वातंत्र्य असावे इतकेच म्हणताहोत आम्ही. जर स्वखुशीने प्रेमी जोडपे सेलीब्रेट करत असेल तर त्याला झुंडशाहीच्या बळावर मारहाण करायला लोक येऊ नयेत एवढी साधी अपेक्षा आहे. व्हॅ डे साजरा करण्यासाठी कोणी स्टायपेंड, सबसीडी, फेलोशीप असं कोणी जाहीर केलेलं नाहीये. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप होऊ नये हे पाहणं सरकारचं काम आहे, तसंच नागरी समाजाचंही..

गामा पैलवान's picture

17 Feb 2017 - 1:18 pm | गामा पैलवान

सौरा,

दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही. तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना? मग हाच न्याय व्हया.डे या सणास लावूया. याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी? जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?

त्यातूनही कुण्या जोडप्याला अनैतिक कृत्ये करायची असतील तर चार भिंतींच्या आड खुशाल करावीत.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

17 Feb 2017 - 1:30 pm | संदीप डांगे

प्रेम करणे अनैतिक कृत्य केव्हापासून झालं...?

आपलं यथासांग उपभोगून झालं की किंवा आपलं काहीच ठिकठाक नाही झालं तर असले नैतिक-अनैतिक, संस्क्रुती बचाव वगैरे चाळे सुचतात रिकामटेकड्या जळावू लाकडांना.

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2017 - 2:52 pm | श्रीगुरुजी

ज्यांना अनेकवेळा प्रयत्न करूनसुद्धा मुलगी पटत नाही, पटविता येत नाही त्यांनाच मत्सरातून असली नैतिकता-अनैतिकता सुचते.

गॅरी ट्रुमन's picture

17 Feb 2017 - 1:49 pm | गॅरी ट्रुमन

याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी?

प्रेम व्यक्त करायचा आग्रह कोण करत आहे? किंबहुना प्रेम केलेच पाहिजे किंवा प्रेम व्यक्त केलेच पाहिजे असा कोणावरही आग्रह कसा करता येईल हेच समजत नाही.

जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणार्‍या ९०% नाही ९९% प्रेमी युगुलांना ही गोष्ट माहित नसेल. मुळातील गोष्ट काहीही असली तरी १४ फेब्रुवारीला "प्रेमाचा दिवस" म्हणून ते सगळे मानत असतील तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

स्वयंघोषित संस्कृतीरक्षक जाम डोक्यात जातात राव.

याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी?

अहो गा. पै, मी म्हणतो, कोण आग्रह करतंय साजरा करण्याचा? जोपर्यंत कुठला कायदा मोडला जात नाही तोवर लोकांनी लाठ्या काठ्या घेऊन येऊ नये एवढंच. आणि कायदा मोडला तरीही शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयांनाच फक्त. व्हॅ डे साजरा करू नये याचा तुमच्यासारखा अहिंसक प्रचार करणार्‍यांबद्दल काही आक्षेप नाही.

दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही. तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना?

दारू पिऊन नाचले म्हणून कुठल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालीये हो?

संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?

बरं मग? तरीही ज्या लोकांना करायचा अहे हा दिवस साजरा, त्यांनी का नाही म्हणे करायचा?
एक प्रश्नः तुमच्यामते प्रेम करणे नैतीक आहे की नाही?

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2017 - 2:50 pm | श्रीगुरुजी

दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही.

दारू पिऊन अचकट विचकट नाचावे, गर्दीत मुलींची छेड काढावी, त्यांच्या अंगचटीला जावे हे तरी संविधानात लिहिले आहे का? व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये असेसुद्धा संविधानात कोठेही लिहिलेले नाही.

तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना? मग हाच न्याय व्हया.डे या सणास लावूया. याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी? जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?

कोण प्रयत्नशील असतो? कोणत्या मंडळाने रस्त्यावर खड्डे करून मांडव न टाकता स्वतःच्या दिवाणखान्यात सार्वजनिक गपपतीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा केला आहे का? कोणते मंडळ वाहतुकीला अडथळा होऊ नये, ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. गणपती रस्त्यावरच बसविण्याचा आग्रह कशासाठी?

त्

यातूनही कुण्या जोडप्याला अनैतिक कृत्ये करायची असतील तर चार भिंतींच्या आड खुशाल करावीत.

ज्यांना हिंदू उत्सव साजरे करायचेत त्यांनी ते चार भिंतीच्या आड खुशाल साजरे करावेत. रस्त्यावर येऊन समाजाला उपद्रव देऊ नये.

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2017 - 2:44 pm | श्रीगुरुजी

नैतिक-अनैतिक कोण ठरविणार आहे? जाहीर उत्तेजन द्यायचं म्हणजे नक्की काय? गणपती उत्सवात दमदाटी करून प्रसंगी मारहाण करून वर्गणी (खंडणी) वसूल करणे, वर्गणीतील पैशांचा अपहार करणे, त्याच पैशातून दारू ढोसणे, प्रचंड ध्वनीप्रदूषण करणे, आकडे टाकून वीज चोरणे, रस्त्यावर खड्डे करून मांडव टाकून रस्ते अडविणे असे अनेक उपद्रवी प्रकार चालतात. तर मग गणपती बसायच्या दोनदोन महिने आधी "मी येतोय" असे फलक लावून अशा उत्सवाला जाहीर उत्तेजन कशासाठी? किंबहुना सार्वजनिक गणपती उत्सव बंद व्हायलाच हवा, पण त्याबरोबरीने रस्त्यावर साजरा होणारा कोणताही उत्सव बंदच व्हायला हवा.व्हॅलेंटाईन डे असल्या सार्वजनिक उत्सवांपेक्षा शतपटीने चांगला. निदान या उत्सवात समाजाला उपद्रव तर होत नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

17 Feb 2017 - 7:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी, तुम्ही गणेशोत्सव आणि व्हॅलेंटाईन डे या दोन्ही सणांच्याबाबतीत सरसकटीकरण करत आहात असे नाही वाटत? गणेशोत्सवात फक्त दारू पिऊन धिंगाणाच चालतो असे आपले म्हणणे आहे का? पुण्या-मुंबईतील ठराविक(खरेतर राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांसाठी चालवलेली) गणेशमंडळे आणि त्यांचे १० दिवसाचे सादरीकरण म्हणजेच गणेशोत्सव का? कितीतरी गणेश मंडळे अत्यंत सुंदरपणे सामाजिक जाणिवेचे भान ठेवून कितीतरी सामाजिक कार्यक्रम चालवतात तेही बंदच करायला हवेत का? अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये, गावांमध्ये, खेड्यांमध्ये या १० दिवसांमध्ये लोक एकत्र येऊन एकोप्याच्या भावनेने सण साजरा करत नाहीत का?

तसेच, व्हॅलेंटाईन डे ला जसे काही मनाचे मिलन होऊन प्रेमाचा बहर फुलतो तसंच ज्यांचा नाही फुलाला त्यांच्यात वितुष्ट येऊ शकतं, प्रकरणं हाताबाहेरही जातात. ज्या वयात प्रेम करायला हवं त्या वयात प्रेम करायला मिळायला हवं हे खरं आहेच. पण प्रेमाच्या यशाचं टोक म्हणजे त्या वयात त्यांना शरीरसुख मिळायला हवं हे परिमाण बरोबर वाटत नाही. आपल्या समाजाची लैंगिक शिक्षणाबाबतीतील परिस्थिती आपण जाणतोच. अशा शिक्षणाच्या अभावामुळे होणारी गुंतागुंत निस्तरण्याची तयारी बरेच वेळेस त्या वयात नसते. बऱ्याच वेळेस अशा गोष्टी निस्तरण्याची वेळ पालकांवर येते. तेव्हा प्रेम ही गोष्ट जरी निखळ असली तरी ती शोभून दिसते जबाबदारी आणि धीराने असे माझे वैयक्तिक मत आहे.

तस्मात, व्हॅलेंटाईन डे जरूर साजरा करावा पण आपल्या सामाजिक परिस्थितीचं, समाजाच्या लैंगिक जडणघडणीचं आणि पालकांच्या मनस्थितीचं भान राखून! सार्वजनिक ठिकाणी "उत्स्फूर्त" प्रेम करताना बाजूला असलेली आधीची पिढी हि आपली कोणीच नसली तरी आपल्या आई-वडीलांसारखीच आहे हे समजलं तरी पुरे!

गामा पैलवान's picture

17 Feb 2017 - 8:14 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

१.

नैतिक-अनैतिक कोण ठरविणार आहे?

बहुसंख्य हिंदू जनता.

२.

जाहीर उत्तेजन द्यायचं म्हणजे नक्की काय?

व्हयाडे या सणावर बंदी घालणे. या सणाची गरज नाही. हिंदूंना सण कमी पडताहेत का, म्हणून परदेशी सण तोही मोडकातोडका साजरा करायचा?

३.

तर मग गणपती बसायच्या दोनदोन महिने आधी "मी येतोय" असे फलक लावून अशा उत्सवाला जाहीर उत्तेजन कशासाठी?

कारण की हा हिंदूंचा देश आहे.

४.

पण त्याबरोबरीने रस्त्यावर साजरा होणारा कोणताही उत्सव बंदच व्हायला हवा.

असेल हिंमत तर रस्त्यावरच्या बुडोत्तानप्रार्थना करून दाखवा बंद. गेलाबाजार प्रभातबांग जरी बंद करवून दाखवलीत तरी काम भागेल. न्यायालयाचा निर्देश आहेच. त्यामुळे संविधान वगैरे कायदेशीर बाबींची चिंता नको.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2017 - 2:51 pm | श्रीगुरुजी

बहुसंख्य हिंदू जनता.

हिंदू जनतेचा व्हॅलेंटाईन डे ला अजिबात विरोध नसून पाठिंबा आहे.

व्हयाडे या सणावर बंदी घालणे. या सणाची गरज नाही. हिंदूंना सण कमी पडताहेत का, म्हणून परदेशी सण तोही मोडकातोडका साजरा करायचा?

या सणाची गरज आहे का नाही ते लोकांना ठरवू द्या. ज्यांना गरज नाही ते त्यापासून दूर राहतील. ज्यांना गरज वाटते ते साजरा करतील. तुम्ही कशाला जळताय आणि त्रास करून घेताय? तो मोडकातोडका साजरा करायचा का पूर्ण साजरा करायचा का अजिबात साजरा करायचा नाही हे लोक ठरवतील. मुळात हा सण वगैरे नसून एक इव्हेंट आहे. तुम्हाला पटत नसेल तर नका साजरा करू किंवा तुमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे "बाजीराव-मस्तानी दिन" साजरा करा. तसे करायला कोणीही अडविले नाही.

कारण की हा हिंदूंचा देश आहे.

हिंदूंचा देश आहे म्हणून इतरांना उपद्रव द्यायचा मुक्त परवाना मिळालेला नाही.

असेल हिंमत तर रस्त्यावरच्या बुडोत्तानप्रार्थना करून दाखवा बंद. गेलाबाजार प्रभातबांग जरी बंद करवून दाखवलीत तरी काम भागेल. न्यायालयाचा निर्देश आहेच. त्यामुळे संविधान वगैरे कायदेशीर बाबींची चिंता नको.

रस्त्यावर आणले जाणारे सर्वच प्रकार बंद व्हायला हवेत. त्यात जसे ताबूत, नमाज वगैरेंचा समावेश हवा तसाच पुढार्‍यांच्या जयंत्या-मयंत्या, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, लग्नाच्या मिरवणुका इ. चाही समावेश हवा.

बादवे, नवरात्र, गणेशोत्सव, पुढार्‍यांच्या जयंत्या-मयंत्या, रिक्षावाल्यांचे श्रावणातले सत्यनारायण, दहीहंडी, दिवाळीतले फटाके, लग्न्याच्या मिरवणुका व कार्यालयात लावलेल्या काळ्या भिंती इ. मुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या तुलनेत प्रभातबांगेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण जवळपास निग्लिजिबल आहे. मी एकदा बांग सुरू झाल्यावर घड्याळ लावून वेळ मोजला होता. साधारणपणे ३-४ मिनिटे बांग सुरू होती. अशी बांग दिवसातून ४-५ वेळा दिली जाते. म्हणजे एका दिवसात बांगेचा एकूण कालावधी १५-२० मिनिटांपेक्षा जास्त नाही. याउलट वर नमूद केलेल्या कोणत्याही एका उत्सवात बांगेच्या कमीतकमी हजारपट ध्वनीप्रदूषण होते.

एखादा अपघातात जखमी झाला असेल तर जिथे किरकोळ खरचटले आहे तिथे उपचार करण्यापेक्षा आधी भळभळ वाहणार्‍या जखमेवर उपचार करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे १५-२० मिनिटांचे किरकोळ ध्वनीप्रदूषण करणार्‍या बांगेकडे लक्ष देण्याआधी काळ्या भिंती उभारून कानठळ्या बसविणारे प्रकार आधी बंद करणे आवश्यक आहे.

सतिश गावडे's picture

19 Feb 2017 - 3:21 pm | सतिश गावडे

गुरुजी, तुमचे असे प्रतिसाद वाचले की प्रश्न पडतो की तुमचा हा विवेकी विचार राजकीय चर्चांच्या वेळी तुम्ही खुंटीला टांगून का ठेवता? :)

एक राजकीय अंधभक्ती सोडली तर तुमचे इतर बाबतीतील विवेकी विचार हे आज स्वतःला विज्ञानवादी, विवेकवादी म्हणणार्‍यांच्या विचारांपेक्षाही अधिक परखड आणि अनुकरण करण्यासारखे आहेत.

संदीप डांगे's picture

19 Feb 2017 - 3:30 pm | संदीप डांगे

=))

विशुमित's picture

6 Mar 2017 - 2:29 pm | विशुमित

राजकीय चर्चांमध्ये ही मी गुरुजींचा पंखा आहे.

कपिलमुनी's picture

6 Mar 2017 - 3:07 pm | कपिलमुनी

प्रेमदिनाबद्दल आपले मौलिक विचार वाचायला आवडतील :)

वरुण मोहिते's picture

17 Feb 2017 - 9:37 pm | वरुण मोहिते

व्हॅलेंटाईन डे सोडून कोणी प्रेमच करत नाही का बाकी वर्षभरात . का कुठल्या अनैतिक(?) गोष्टी करत नाही. मुळात एक छोटी कन्सेप्ट आहे हि तरुणपिढीला भावत असेल तर काय हरकत आहे त्यांनी साजरा करायला . हिंदूंचेच सण साजरे करा हे सांगणारे आपण कोण आणि कशाला जबरदस्ती. उद्या व्हॅलेंटाईन डे साजरा नाही झाला तर नंतर असणाऱ्या त्या भावना संपणारेत का दुसऱ्या दिवशी असं तर नाही ना ? बाकी साजरा करायचा कि नाही हे ज्याचे त्याचे सुज्ञ पणे ठरवू डे त्यांनाच .व्हॅलेंटाईन डे म्हणजे गैरप्रकारच असतो असा काही ग्रह आहे का?.

गामा पैलवान's picture

17 Feb 2017 - 10:26 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

स्वयंघोषित संस्कृतीरक्षक जाम डोक्यात जातात राव.

हाहाहा, मला तुमच्या डोक्यात स्थान दिल्याबद्दल आभार! :-) इथली अनेक लोकं मला कुणाकुणाच्या कसल्याकसल्या अवयवांत जागा द्यायला उत्सुक असतील. त्यामानाने तुमचं डोकं हे खूपंच सुरक्षित स्थान आहे.

विनोदाचा भाग सोडतो. संस्कृतीरक्षण का करावं ते सांगेन म्हणतो.

त्याचं काय आहे की पाश्चात्य देशांत कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्यातून पुढे गुन्हेगारी वाढते. केवळ एकदोन पिढ्यांत विवाहबाह्य रीतीने जन्मास येणाऱ्या बालाकांचं प्रमाण भयावह प्रकारे वाढलंय. अमेरिकेत ७०+% मुलं एकपालकी कुटुंबातली आहेत. अशा वेळेस संगोपनाचा सगळा भार एकाच पालकावर पडतो. मुलांकडे योग्य तऱ्हेने लक्ष देता येत नाही. अशी दुर्लक्षित मुलं गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका असतो. हीच मुलं पुढे त्यांच्या मुलांना जन्म देतात तेव्हा त्यांनाही आईवडिलांच्या भूमिका (जेंडर रोल्स) ठाऊक नसतात. हे दुष्टचक्र चालूच राहतं.

ते भेदण्याचा मार्ग म्हणजे ते सुरूच होऊ न देणे. त्याची सुरुवात अनैतिक कृत्यांच्या उदात्तीकरणाने होते. व्हया.डेच्या मागे लपून स्वैराचार बोकाळतो आहे. तेव्हा संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे. तेव्हा होऊ द्या खर्च, धर्मरक्षण आहे घरचं.

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

19 Feb 2017 - 8:11 pm | गॅरी ट्रुमन

ते भेदण्याचा मार्ग म्हणजे ते सुरूच होऊ न देणे. त्याची सुरुवात अनैतिक कृत्यांच्या उदात्तीकरणाने होते. व्हया.डेच्या मागे लपून स्वैराचार बोकाळतो आहे. तेव्हा संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे. तेव्हा होऊ द्या खर्च, धर्मरक्षण आहे घरचं.

आता जे व्हॅलेन्टाईन डे विषयी तुम्ही लिहिले आहेत अगदी तसेच १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रीशिक्षण, दलितांचे शिक्षण इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींविषयी बोलले जात असेल.

असो. आता संस्कृतीरक्षण या नावाखाली विरोध व्हॅलेन्टाईन डे पर्यंत खाली आला असेल तरी ती बरीच प्रगती म्हणायची. उत्तम. किप इट अप.

संदीप डांगे's picture

19 Feb 2017 - 8:35 pm | संदीप डांगे

+1000

कपिलमुनी's picture

6 Mar 2017 - 3:09 pm | कपिलमुनी

संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे म्हणणार्‍यांनी नवरात्रीच दांडीया बंद करा :)
त्या ९ रात्रीमधे उद्योगाचे प्रमाण फार वाढते .

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2017 - 2:35 pm | श्रीगुरुजी

ओरिसात भाजपने अनेकवेळा आटोकाट प्रयत्न करूनसुद्धा आजपर्यंत तिथे भाजपला स्वबळावर अत्यंत किरकोळ यश मिळाले होते. अगदी मोदी लाटेत सुद्धा ओरिसात भाजपला २१ पैकी फक्त १ जागा मिळाली होती तर बिजदला २० जागा होत्या. त्याला मुख्य कारण होते ते मुख्यमंत्री नवीन पटनाईकांची स्वच्छ छबी व जनतेत त्यांना असलेले अनुकूल मत. २००० पासून जवळपास गेली सलग १६-१७ वर्षे नवीन पटनाईक मुख्यमंत्री आहेत व त्यांनी लागोपाठ ४ निवडणुकात बहुमत प्रचंड बहुमत मिळविले आहे.

परंतु गेल्या काही दिवसात झालेल्या पंचायत निवडणुकीमध्ये वेगळाच बदल दिसून येत आहे. ओरिसात ५ टप्प्यात होत असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पहिल्या २ टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले असून निकाल जाहीर झाले आहेत. पहिल्या दोन्ही टप्प्यात बिजद प्रथम क्रमांकावर असला तरी अनपेक्षितपणे भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील १८८ जागांपैकी भाजपने अनपेक्षितपणे ७१ जागा जिंकल्या तर दुसर्‍या टप्प्यातील १६६ पैकी ५५ जागा जिंकल्या.

यापूर्वी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत बिजदने ६५२, काँग्रेसने १२८ तर भाजपने जेमतेम ३६ जागा जिंकल्या होत्या. मात्र २०१७ मध्ये पहिल्या २ टप्प्यातच भाजपने १२६ जागा जिंकलेल्या आहेत. बिजदने पहिल्या २ टप्प्यात १९७ जागा जिंकून प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. परंतु आजतगायत दुसर्‍या क्रमांकावर असलेली काँग्रेस जेमतेम ३० जागा मिळवून तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे. भाजपचे जुएल ओराम यांनी अथक परीश्रम करून भाजपला यश मिळवून दिले आहे. नवीन पटनाईकांना आपल्या कारकीर्दीत प्रथमच आव्हान मिळाले आहे.

http://indiatoday.intoday.in/story/odisha-panchayat-polls-bjps-naveen-pa...

गामा पैलवान's picture

19 Feb 2017 - 2:55 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

तुमचा वरचा संदेश वाचला.

१.

हिंदू जनतेचा व्हॅलेंटाईन डे ला अजिबात विरोध नसून पाठिंबा आहे.

जरी असला तरी त्याविरुद्ध जनमत जागं करायचा हक्क प्रत्येकाला आहे. हे जनमत जागृत करतांना किरकोळ हिंसा घडली तर त्या हिंसेमागील कार्यकारणभाव शोधून मूळ कारण नष्ट करण्यास माझं प्राधान्य राहील.

२.

या सणाची गरज आहे का नाही ते लोकांना ठरवू द्या. ज्यांना गरज नाही ते त्यापासून दूर राहतील. ज्यांना गरज वाटते ते साजरा करतील. तुम्ही कशाला जळताय आणि त्रास करून घेताय?

हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे. हिंदूहितविरोधी कार्यक्रमांचा निषेध करायचा अधिकार मला आहे. आणि मी तो बजावणारच.

३.

हिंदूंचा देश आहे म्हणून इतरांना उपद्रव द्यायचा मुक्त परवाना मिळालेला नाही.

हिंदूंचा देश आहे म्हणून कुणालाही स्वैर वर्तनाचा मुक्त परवाना मिळालेला नाही.

४.

रस्त्यावर आणले जाणारे सर्वच प्रकार बंद व्हायला हवेत. त्यात जसे ताबूत, नमाज वगैरेंचा समावेश हवा तसाच पुढार्‍यांच्या जयंत्या-मयंत्या, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, लग्नाच्या मिरवणुका इ. चाही समावेश हवा.

सहमत आहे. याची सकारात्मक सुरुवात म्हणून स्वैराचरणास प्रोत्साहन देणाऱ्या तद्दन गल्लाभरू व्हयाडे बंद पाडण्यास माझं समर्थन आहे.

५.

प्रभातबांगेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण जवळपास निग्लिजिबल आहे. मी एकदा बांग सुरू झाल्यावर घड्याळ लावून वेळ मोजला होता.

मुंबईत डोंगरीत निकिता कदम ही हिंदू महिला मतांपायी लाचार होऊन हिजाब घालून प्रचार करते. ठीके ती काँग्रेसची आहे. आढ्याचं पाणी गेलं वळचणीला म्हणूया. पण तुम्हीसुद्धा? तुमच्यारखा हिंदुत्वनिष्ठ घड्याळ लावून बांगेची वेळ मोजण्यात धन्यता मानतोय? विरोध कुठवर करावा याची काही मर्यादा?

तुमच्याइतकं सर्वधर्मसमभावी मला बनता येत नाही. एव्हढं बोलून ही चर्चा माझ्याकडून आवरती घेतो.

आ.न.,
-गा.पै.