ताज्या घडामोडी - ३

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
31 Oct 2016 - 8:16 pm
गाभा: 

ताज्या घडामोडी - १
ताज्या घडामोडी - २

मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

31 Oct 2016 - 8:26 pm | श्रीगुरुजी

काल मध्यरात्री भोपाळ येथीत तुरूंगात असलेल्या सिमीच्या ८ संशयित दहशतवाद्यांनी मध्यरात्री एका रक्षकाची हत्या करून तुरूंग फोडून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोधावर जाऊन ते जिथे लपले होते ती जागा शोधून काढली व त्यांच्याशी झालेल्या चकमकीत सर्व ८ संशयित दहशतवादी ठार झाले.

अपेक्षेप्रमाणे हे एनकाऊंटर बनावट असावे असा संशय काँग्रेस, आआप व माकपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. सर्व संशयित दहशतवादी मुस्लिम असल्याने त्यांची प्रतिक्रिया अपेक्षितच होती. यापूर्वीही बाटला हाउसमधील चकमकीत मारल्या गेलेल्या २ दहशतवाद्यांच्या मृत्युबद्दल काँग्रेसने गळा काढला होताच.

मला व्यक्तिशः हे संशयित दहशतवादी मारले गेल्याचे अजिबात दु:ख नाही. परंतु यावेळी घडलेल्या घटनाक्रमात पूर्ण सुसंगती दिसत नाही. काहीतरी मिसिंग आहे. नक्की काय घडले ते काही दिवसात बाहेर येईलच.

SIMI activists’ jailbreak: Encounter, contradictions, politics and all that happened today

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2016 - 8:37 pm | श्रीगुरुजी

नोटा रद्द करण्याच्या धुमश्चक्रीत एक वेगळी बातमी -

भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याविरूद्ध केलेल्या प्रतिकारात ७ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यु झाला आहे. पाकिस्तानने ७ सैनिक मारले गेल्याची कबुली देऊन खालील बातमीत त्यांचे फोटो व नाव छापले आहे (केजरीवाल, निरूपम इ. नी पुरावे मागू नयेत म्हणून हे जाहीर केले असावे)

In the line of fire: Pakistani soldiers who were killed last night

त्याच संबंधी अजून एक बातमी -

Seven Pakistan Army soldiers killed in 'unprovoked' Indian firing across LoC: ISPR

या बातमीखाली अनेक पाकिस्तानी वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील खालील प्रतिक्रिया रोचक आहे.

Candyman about 7 hours ago
Pakistan is dealing with a completely different neighbour this time now. Wisdom says, as a CBMs, both the states should take steps that demonstrate they are serious about peace in the region.

झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षांची बंदी !

चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय.
नोटबंदीचा निर्णय अंमलात आणतानाच आधिच देशाची आणि व्यवस्थेची तारांबळ उडत आहे.
हा निर्णय थोडा लांबविला असता तर आभाळ कोसळण्यासारखी परिस्थिती नव्हती.
विरोधकांच्या आणि माथेफिरुंच्या हातात आयतं कोलीत मिळणार की राडा करायला पैसे असणार नाही म्हणून ही वेळ साधली कोणास ठाऊक !

श्रीगुरुजी's picture

16 Nov 2016 - 3:20 pm | श्रीगुरुजी

या निर्णयाकडे माध्यमांनी दुर्लक्ष केलेले दिसते. इतर राजकीय पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसले नाही. नोटा बदलण्याच्या गोंधळात हा निर्णय दुर्लक्षिला जाईल हे ओळखून बंदी घातलेली दिसते.

नाखु's picture

16 Nov 2016 - 3:26 pm | नाखु

बरोबर आहे नोटांचा धुरळा बसेपर्यंत कदाचीत बातमी शिळी होईलही !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2016 - 9:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१११

आपले काळे पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आणि / किंवा आपले राजकिय भांडवल वाचविण्याची धडपड करण्याच्या गडबडीत कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला झाकीर नाईकबद्दल उमाळा आलेला दिसत नाही ! :)

धर्मराजमुटके's picture

16 Nov 2016 - 3:30 pm | धर्मराजमुटके

या निर्णयाकडे माध्यमांनी दुर्लक्ष केलेले दिसते. इतर राजकीय पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसले नाही. नोटा बदलण्याच्या गोंधळात हा निर्णय दुर्लक्षिला जाईल हे ओळखून बंदी घातलेली दिसते.

तसं झालं तर ठीक आहे मात्र सध्याच्या गोंधळाचा फायदा किंवा नोटबंदीचे कारण वरवर दाखवून विघातक तत्त्वांनी अराजक माजवू नये हीच इच्छा आहे.

सचु कुळकर्णी's picture

21 Nov 2016 - 11:50 pm | सचु कुळकर्णी

The Reserve Bank of India (RBI) has proposed opening of "Islamic window" in conventional banks for "gradual" introduction of Sharia-compliant or interest-free banking in the country.

गामा पैलवान's picture

22 Nov 2016 - 3:04 am | गामा पैलवान

लोकहो,

ट्रंप निवडून आलेत आणि त्यांना रशियाशी सहकार्य करायचंय. म्हणून बाल्टिक देशांना म्हणे रशियाचा धोका वाटतोय. इथे बातमी आहे : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-38051155

च्यायला, ट्रंप नाटोचं महत्व कमी करणार म्हणून कुणाच्या तरी पोटात दुखू लागलंय. आता ओबामा जरी नाटोची भलामण करीत युरोपभर फिरंत असला तरी त्याचा भरवसा कोणालाच वाटंत नाहीये. नाटोवाल्यांची जाम गोची झालीये.

उपरोक्त लेखात बाल्टिक देशांना भीती घातलीये, की रशिया विस्तारवादी आहे. क्रीमिया जसा ताब्यांत घेतला तसेच बाल्टिक प्रदेश रशियन लोकसंख्येच्या जोरावर ताब्यांत घेतले जातील, असा युक्तिवाद आहे. पण युक्रेनमध्ये दंगल माजवण्यासाठी रीतसर निवडून आलेल्या यानुकोव्हीचला बंडखोरांनी हुसकून लावलं याविरुद्ध बीबीसी चकार शब्द काढायला तयार नाही.

शिवाय, बाल्टिकांना रशियाच्या विस्तारवादाची भीती घालतांना बीबीसीला पोलंडच्या विस्तारवादाचा सोयीस्कर विसर पडला आहे. १९३८ च्या आसपास पोलंडच्या सर्वेसर्वा जनरल स्मिगली-रिड्झ ने लिथुआनिया काबीज केला होता हे आजून लोकांच्या स्मरणात आहे. त्यावेळेस कुठे गेला होता राधासुता (= ब्रिटन) तुझा धर्म? ब्रिटनसारख्या बेभरवश्याच्या देशावर विश्वास ठेवण्यापेक्षा बाल्टिक देशांनी रशियाशी सलोख्याचे संबंध राखलेले काय वाईट? निदान काहीतरी तोडगा तरी मिळेल. याउलट ट्रंपमुळे नाटोचा म्हणावा तेव्हढा उपयोग नाही. नाटोमुळे फक्त तणावच वाढेल. अशी एकंदरीत बाल्टिकांची धारणा आहे.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

22 Nov 2016 - 3:14 pm | श्रीगुरुजी

३ दिवसांपूर्वी भारतातील काही राज्यात ४ लोकसभा व १४ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली. त्याची मतमोजणी आज आहे.

६ महिन्यांपूर्वी आसाम, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी व बंगाल मध्ये विधानसभेची निवडणुक झाली होती. त्यावेळी जो ट्रेंड होता तोच या पोटनिवडणुकीत कायम राहिला आहे. ज्या पक्षाने ६ महिन्यांपूर्वी विधानसभेत बहुमत मिळविले होते, त्यांच्याच बाजूने पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत.

या व्यतिरिक्त त्रिपुरा मध्ये २ जागांवर विधानसभेची पोटनिवडणुक होती व मध्य प्रदेश मध्ये १ लोकसभा व २ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुक होती. त्रिपुरामधील दोन्ही जागांवर सत्ताधारी माकपने विजय मिळविला आहे. यापैकी एका मतदारसंघात भाजपच्या मतात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील सर्व जागा भाजपनेच जिंकल्या आहेत.

मध्य प्रदेश मध्ये डिसेंबर २०१३ मध्ये विधानसभा निवडणुक व मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुक झाली होती. सुमारे अडीच ते तीन वर्षानंतर सुद्धा तिथे भाजपचा प्रभाव टिकून आहे. मध्यंतरी गाजलेल्या व्यापम घोटाळ्यामुळे व ८ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा भाजपच्या मतदारांवर प्रतिकुल परीणाम झालेला दिसत नाही.

महाराष्ट्रात विधानपरीषदेच्या ६ जागांसाठी निवडणुक होती. या ६ पैकी ५ जागा राष्ट्रवादीकडे होत्या व १ जागा भाजपकडे होती. परंतु आजच्या निकालानुसार काँग्रेसने २, भाजपने २, शिवसेनेने १ व राष्ट्रवादीने फक्त १ जागा जिंकली आहे. विधानपरीषद निवडणुकीत जनमानसाचे प्रतिबिंब उमटत नाही. परंतु या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला झटका मिळाला आहे हे नक्की.

गामा पैलवान's picture

26 Nov 2016 - 4:59 pm | गामा पैलवान

दिलीप पाडगावकर वारले. देशद्रोही टोळक्यासोबत पाकिस्तानात जाणारे हेच ते (मध्यभागी उभे आहेत).

http://1.bp.blogspot.com/-IM_PHp1isGs/U_NsBnjVX4I/AAAAAAAAGCY/1Nd-UUVTzo8/s1600/2.%2BBarkha%2BTrack2.jpg

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2016 - 3:03 pm | श्रीगुरुजी

काल पुन्हा एकदा भारताच्या लष्करी तळावर हल्ला होऊन भारताचे दोन अधिकारी व पाच जवान मारले गेले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भारतीय भूभागात असलेल्या लष्करी तळावर अतिरेकी इतक्या सहज पद्धतीने येऊन हल्ला करून अनेकांना मारू शकतात याचे खेदपूर्वक आश्चर्य वाटते. कोठेतरी, काहीतरी नक्की चुकत आहे. पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Nov 2016 - 8:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते.

गुर्जी, तसे पाहता तुमच्याशी संवाद साधायचा नाही असे ठरवले होते, पण माझ्या कामसंबंधीत तुम्ही बोलल्यामुळे आता बोलतोय. आपण एक काम करू, आम्ही ठेवतो वर्दी उतरवून, बाकी उच्चपदस्थ लष्करी अधिकारी, सामरिक निर्णयकार, सुप्रीम कमांडर, न्यूक्लियर ट्रायड, प्रधानमंत्री सगळे जाऊ दे झिलप्या झाडायला, तुम्हाला वाटतंय न क्षेपणास्त्र डागायची वेळ आली आहे, या मग आता तुम्हीच इथे बटन दाबायला क्षेपणास्त्र प्रणालीचे! कसे? =))

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2016 - 11:09 pm | श्रीगुरुजी

तुमच्याकडून अशाच प्रतिसादाची अपेक्षा होती. टकाच्या एका धाग्यात वर्णन केलेल्या प्रकारचाच हा प्रतिसाद आहे. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!

बाकी इतर जे काही तुम्ही ठरविले आहे, त्यास फाट्यावर मारण्यात येत आहे याची आपणास जाणीव आहेच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Nov 2016 - 11:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

वर्मावर लागलेलं दिसतंय! असो!

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2016 - 11:28 pm | श्रीगुरुजी

नाही हो. अजिबात नाही. तुमच्या असल्या (टकाने वर्णन केलेल्या प्रकारच्या) प्रतिसादांची सवय आहे मला.

सगळे जाऊदे झिलप्या झाडायला? असे गुरुजींचे म्हणणे आहे असे का वाटले साहेब आपल्याला? पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते. या वाक्यातून तसा अर्थ निघतो ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Dec 2016 - 7:45 am | कैलासवासी सोन्याबापु

अरेच्या, सुज्ञ न हो तुम्ही साहेब? घ्या समजून, त्यातूनही आमचीच चूक दिसली तर आम्ही मूर्ख समजून आमच्या तोंडीच लागू नका कसे! सुज्ञपणा असेल तो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Dec 2016 - 8:00 am | कैलासवासी सोन्याबापु

बाकी चाय से ज्यादा किटली कायकू गरम है ये कोडं सुटेलां नई है!

श्रीगुरुजी's picture

1 Dec 2016 - 9:04 am | श्रीगुरुजी
सुज्ञ's picture

3 Dec 2016 - 1:30 am | सुज्ञ

नाही पण बापूसाहेब एक सांगाच . कोठेतरी, काहीतरी नक्की चुकत आहे. पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते या गुरुजींच्या या वाक्यांमधून आपल्याला गुरुजींनी बाकीच्या लोकांना ( सैनिक , पंतप्रधान वगैरे ना) काही काम नाही आणि क्षेपणास्त्रे डागणे वगैरे सगळे सोप्पे असते असे म्हटलेले का आढळले ? मुद्दाम विचारतोय . एक अभ्यास म्हणून .

बाकी कौन किससे गरम हे तुम्ही तो पूर्वीचा एका सदस्यांवरचा श्लेष ओळखलात तेव्हाच आमी ओळखले :)

सचु कुळकर्णी's picture

30 Nov 2016 - 11:38 pm | सचु कुळकर्णी

पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते.

झिलप्या झाडणे लय दिवसान वाचला न बाप्पा हा वाक्यात उपयोग.

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2016 - 11:45 pm | श्रीगुरुजी

सोपं नाहीच हो ते. कुठून तरी फ्रस्ट्रेशन आणि संताप बाहेर काढायचा असतो. म्हणून असं लिहिलं जातं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Dec 2016 - 7:47 am | कैलासवासी सोन्याबापु

त्या झिलप्या घाला चुलीतनी, थुमीच लै दिवसानं दिसले न राज्येहो, तुमची सय येत राह्यते येत जाव माणसानं दिवसातून एकडाव अटीसा

सचु कुळकर्णी's picture

1 Dec 2016 - 10:23 am | सचु कुळकर्णी

आपल मत पटत नाय ना बाप्पा अथिसा कोनाले म्हनुन आपुन गप पडेल असतु वाचन मोड मंदि. तुमि राज्या पुन्याले येनार होता, सारी सोय करेल हाय अभ्याले सांगुन.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Dec 2016 - 10:39 am | कैलासवासी सोन्याबापु

सारे प्लॅन कॅन्सल झाले ना हो, पुन्याले आलो तर तुम्हाले अन नाखु काकाले भेटल्या बगर थोडीच जाईन.

मोदक's picture

1 Dec 2016 - 9:29 pm | मोदक

आमी..??

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Dec 2016 - 8:11 am | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही पण हो दादा! असे कसे म्हणता देवा, ओम सायकलेश्वराय :)

संदीप डांगे's picture

30 Nov 2016 - 8:36 pm | संदीप डांगे

सर्वोच्च न्यायालयाने चित्रगॄहात खेळ सुरु होण्याआधी राष्ट्रगीत वाजवावे असा आदेश दिला आहे. हे तर आधीपासून होते आहेच ना? मग नव्याने काय बदल किंवा सुरुवात करायला सांगितली आहे न्यायालयाने?

पुंबा's picture

30 Nov 2016 - 8:48 pm | पुंबा

अतिशय भंपक निर्णय. केवळ लोकानुनय करणारा. चित्रपट बघायला जाणाऱ्यांनी राष्ट्रगीत ऐकावे हे किती arbitrary आहे. म्हणजे याच न्यायाने सर्कस, नाटक, तमाशा, खेळाचे सामने इ. बघायला जाणाऱ्यांना अशी सक्ती नसावी आणि केवळ चित्रपटगृहांनाच हा नियम हे गैर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रगीत वाजवूनच फक्त राष्ट्रीय भावना दिसते का? राष्ट्रभक्ती हे महान मूल्य आहे, त्याला असं symbols नि मर्यादित करायला नको.

तसंही शाळा समाप्तीनंतर राष्ट्रगीताचा फारसा संबंध येत नाहि.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Dec 2016 - 7:58 am | हतोळकरांचा प्रसाद

बहुतेक सक्तीने आधी फक्त महाराष्ट्रात लागू होता, आता संपूर्ण भारतात लागू केला आहे.

संदीप डांगे's picture

1 Dec 2016 - 8:18 am | संदीप डांगे

हो का? मला नव्हते माहित.
तरीच म्हटलं एवढा गदारोळ का चाललाय अचानक!

वरुण मोहिते's picture

1 Dec 2016 - 11:03 am | वरुण मोहिते

पण आता राष्ट्रगीत चालू असताना फक्त तिरंग्याचं चित्र दाखवा असा निर्णय आहे . बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे देशभक्ती व्हिडीओ दाखवायचे ते नको फक्त तिरंगा दाखवा असा निर्णय आहे

संदीप डांगे's picture

1 Dec 2016 - 11:09 am | संदीप डांगे

तेच म्हटलं, आधी तर सगळीकडेच दाखवायचे. आताच काय नवीन घडले.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Dec 2016 - 11:27 am | हतोळकरांचा प्रसाद

नक्की माहित नाही पण ती याचिकाच यासाठी होती कि - "भारतातील सर्व सिनेमाग्रहांमध्ये राष्ट्रगीत सिनेमाआधी लावणे अनिवार्य करावे आणि त्याचा एक प्रोटोकॉल असावा". तिरंगा दाखवणे, राष्ट्रगीत चालू असताना सिनेमागृहाचे दरवाजे बंद करणे शिवाय राष्ट्रगीताचे नाटकीय रूपांतर न करणे वगैरे प्रोटोकॉल अंतर्गत ठरवले गेले असावे.

तामिळनाडू मधल्या कमुठी इथला ६४८ मेगावॅटचा सोलार ऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला त्यासंदर्भातील हि बातमी.

http://thenextweb.com/insider/2016/11/30/india-solar-power-plant-huge/

या बातमीत नॅशनल जिऑग्राफिकच्या मेगास्ट्रक्चर्स या मालिकेतला या प्रकल्पासंदर्भातला डॉक्युमेंट्री व्हिडीओहि जोडलेला आहे. तो अवश्य पाहावा. अदानी उद्योगसमूहाकडे उत्तम अभियंत्यांबरोबर चांगल्या प्रोजेक्त मॅनेजर्सचीही उत्तम टीम असावी असे म्हणायला हरकत नाही.

अमितदादा's picture

2 Dec 2016 - 1:19 am | अमितदादा

छान बातमी आहे. भारतात वीज क्षेत्रात मोठे बदल गेल्या ४ वर्षात झाले आहेत आणि मोठे बदल येवू घातले आहेत. UPA च्या शेवटच्या काळात कोळश्याच तुटवडा झाल्यामुळे मोठे वीज संकट (किंवा वीज टंचाई) निर्माण झालेली. UPA ने शेवटच्या काळात पाऊले उचलाय चालू केलेली परंतु खरा बदल पियुष गोयल यांनी घडवून आणला. मोदी सरकार मधील अत्यंत कार्यक्षम मंत्री पण प्रसिद्धी पासून सतत दूर. हवामानविषय झालेल्या अंतराष्ट्रीय करारामुळे भारतास कोल्श्यावर अवलंबित्व हळू हळू कमी करून अपारंपरिक आणि अणु उर्जेवर भर द्यावाच लागणार आहे. वीज क्षेत्रातील अजून काही उत्तम बदलाच्या बातम्या सापडल्यास लिंक देईन.

आनंदयात्री's picture

2 Dec 2016 - 8:31 pm | आनंदयात्री

या माहितीसाठी धन्यवाद. खालची फर्स्टपोस्टची लिंक भारत सरकारच्या रुफटॉप सोलर प्रोजेक्टबद्दल माहिती देते. अदानी आणि इतर एनर्जी कंपन्यांचे मार्केट शेअरबद्दलचे स्टॅट्स अतिशय इंटरेस्टिंग आहेत.

http://www.firstpost.com/business/adanis-largest-solar-power-project-in-....हटमळ

ह्या सोलार आणि रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पाचा (100GW) मूळ आराखडा UPA सरकारच्या काळात झाला असावा असे मानून चालतो आहे. त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. (कोणते मंत्री किंवा कोणते ब्युरोक्रॅट्स). याबद्दल काही माहिती मिळाल्यास नक्की सांगा.

आनंदयात्री's picture

2 Dec 2016 - 8:37 pm | आनंदयात्री

हटमळ (html) लिंक चुकली आहे :-). कृपया खालची लिंक वापरावी.

http://www.firstpost.com/business/adanis-largest-solar-power-project-in-...

सुबोध खरे's picture

2 Dec 2016 - 12:22 pm | सुबोध खरे

अदानी उद्योगसमूहाकडे उत्तम अभियंत्यांबरोबर चांगल्या प्रोजेक्त मॅनेजर्सचीही उत्तम टीम असावी असे म्हणायला हरकत नाही.
आजकाल असे म्हणणे म्हणजे बुर्ज्वा प्रतिगामी आणि भांडवदारांशी साठगाठ असल्याचे मानले जाते.
अडानी, अंबानी इ उद्योजक आणि त्यांनी घेतलेली कर्जे याबद्दल गळा काढणे हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Dec 2016 - 4:25 pm | हतोळकरांचा प्रसाद

सहमत! आणि अशा गळे काढणाऱ्यांची तथाकथित कर्जघोटाळेबहाद्दर किंवा सरकारमित्र उद्योजकांची यादी अंबानी-अदानी यापलीकडे जात नाही. कारण सोपे दिसते - मोदी गुजरातचे, अंबानी गुजरातचे, अदानी गुजरातचे!

संदीप डांगे's picture

1 Dec 2016 - 10:20 pm | संदीप डांगे

हे गणित सोडवा बॉ कोणीतरी...

http://indianexpress.com/article/india/what-black-money-government-may-b...

गामा पैलवान's picture

1 Dec 2016 - 11:56 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

स्पष्टीकरण ढिसाळ आहे आणि युक्तिवाद अनाकलनीय. त्यामुळे निष्कर्ष कशाच्या जोरावर काढला ते कळंत नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 12:54 am | संदीप डांगे

माझंही तेच मत आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2016 - 2:51 pm | श्रीगुरुजी

हे गणित सोडवा बॉ कोणीतरी...

८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीतला निम्मा कालावधी सुद्धा संपलेला नाही. हा कालावधी संपू देत आणि नंतरच निष्कर्ष काढणे योग्य होईल.

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 2:58 pm | संदीप डांगे

म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी?

तसेही तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...

म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी?

मग याच लॉजिकने "निर्णय चुकले" म्हणून कशाला आकांडतांडव करत आहात..?

थांबा की ३१ पर्यंत.

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 3:04 pm | संदीप डांगे

तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2016 - 3:06 pm | श्रीगुरुजी

असं तुम्हाला वाटतंय. इतरांना नाही. चष्मा काढा.

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 3:28 pm | संदीप डांगे

हा हा हा! इतर म्हणजे कोण? भाजप चे कार्यकर्ते?

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2016 - 3:33 pm | श्रीगुरुजी

म्हणजे तुम्ही काढलेल्या चुकीच्या निष्कर्षांशी जे सहमत नाहीत ते भाजपचे कार्यकर्ते!

तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...

किती सोयीस्कर निष्कर्ष हो. तुमच्या बुद्धीमत्तेचे कौतुक वाटत आहे. किमान राहुल गांधीला तरी टक्कर द्याल तुम्ही. :=))

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 3:32 pm | संदीप डांगे

आता व्यक्तिगत प्रतीसाद वैगेरे सर्व चालतं वाटतं संपादक मंडळाला? Some are more equal ??

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2016 - 3:34 pm | श्रीगुरुजी

मलाही एका धाग्यावर "मिपावरचे केजरीवाल" असे म्हणण्यात आले होते याचं सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय. तो प्रतिसाद व्यक्तिगत नसावा तुमच्या मते.

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 3:36 pm | संदीप डांगे

केजरीवाल हि शिवी आहे ना?

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2016 - 3:38 pm | श्रीगुरुजी

विषय बदलू नका. आधी एखाद्याला केजरीवाल म्हणणे हा व्यक्तिगत प्रतिसाद आहे की नाही ते स्पष्ट करा. तसं नसेल तर एखाद्याला राहुल गांधी म्हणणे हे कसं व्यक्तिगत होईल?

>>>मोदक यांनी स्पष्ट माझ्यावर नाव घेऊन आरोप केले आहेत आणि आता निर्लज्जपणाचा खेळ चाललाय...

हे वैयक्तीक नाही का..?

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 3:40 pm | संदीप डांगे

कठीण आहे! तुम्हीच आधी नाव घेऊन आरोप करायचे आणि असले प्रश्नही विचारायचे? विसंगती....

तुम्ही विसंगती म्हणाल म्हणून विसंगती होत नाही हो.

तुमच्या लिखाणातून विसंगती दिसत आहे. ती कळाली का तुम्हाला..??

मोदक's picture

2 Dec 2016 - 6:31 pm | मोदक

आता तरी कळाली का..?

lakhu risbud's picture

2 Dec 2016 - 4:16 pm | lakhu risbud

माई मोड ऑन " हा संदीप नोटबंदीनंतर जास्तच त्रागा करून घेतोय, कुठेतरी जळत असल्याशिवाय धूर येणार नाही, आमच्या यांचे मत." माई मोड ऑफ

lakhu risbud's picture

2 Dec 2016 - 4:16 pm | lakhu risbud

माई मोड ऑन " हा संदीप नोटबंदीनंतर जास्तच त्रागा करून घेतोय, कुठेतरी जळत असल्याशिवाय धूर येणार नाही, आमच्या यांचे मत." माई मोड ऑफ

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 4:24 pm | संदीप डांगे

डूआयडीमागून व्यक्तिगत हल्ले करणाऱ्या भ्याड भक्तभाटांमुळे जास्त त्रागा होतोय, काही उपाय आहे का तुमच्याकडे लखु रिसबुड साहेब?

प्रश्न रिसबुड साहेबांना आहे तरीपण मी उत्तर देतो.

डुआयडीमुळे जास्त त्रागा होत असेल तर दुर्लक्ष करा आणि ज्या खर्‍या आयडींमुळे (कमी प्रमाणात) त्रागा होत आहे त्यांना योग्य उत्तरे देवून गप्प करा.

उत्तरे नसतील तर... तर काही नाही. उत्तरे नसताना काय करायचे ते तुम्हाला व्यवस्थीत माहिती आहेच. ;)

(हलके घ्या वो..)

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 5:16 pm | संदीप डांगे

तुम्हाल काय त्रास होतोय? भक्तभाटांना बोललेलं तुम्हाला का बोचतंय बॉ...? तुम्ही आहात काय भक्तभाट?

तुम्हाला त्रास झाला म्हणून उपाय सुचवला.

मला त्रास झाला असे कुठल्या चष्म्याने वाचले..?

एकदा एक माणूस डॉक्टर कडे जातो,उजव्या हाताचं अंगठ्याशेजारचं बोट सगळया अंगावर .... हातांवर पायावर पोटावर ठेऊन म्हणतो माझे सगळे अंग दुखतंय.डॉक्टर बारकाईने निरीक्षण करून म्हणतात प्रॉब्लेम अंगात/शरीरात नाही त्या बोटात आहे.
ते बोट म्हणजे आपण स्वतः आणि अंग म्हणजे भोवताल (सिस्टिम) असे समजतात ती सुज्ञ माणसे. डॉक्टर म्हणजे सद्सतविवेक बुद्धी.
आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता ते तुम्ही ठरवा.

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी

निर्णय चांगलाच आहे. या निष्कर्षासाठी ३१ डिसेंबर पर्यंत थांबण्याची गरज नाही. निर्णय चुकला आहे का याचा निष्कर्ष काही काळानंतरच कळू शकेल. तोपर्यंत जरा धीर धरा. उतावळेपणा सोडा. या निर्णयाविरूद्ध ज्या तर्‍हेने काही विशिष्ट व्यक्तींचा थयथयाट सुरू आहे, त्यावरून यामागचा मुख्य उद्देश सफल होत आहे हे स्पष्ट आहे. चष्मा काढल्यास तुम्हालाही ते दिसून येईल.

सुज्ञ's picture

2 Dec 2016 - 3:07 pm | सुज्ञ

<<तसेही तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...

असं झ्हाल का ? वा वा वा ! असे झटक्यात अचूक नीष्कर्ष काढणे हे सोपे काम नाही ! आपण अभिनंदनास पात्र आहात !!चला एक सत्कार करून टाकू

वरुण मोहिते's picture

2 Dec 2016 - 3:12 pm | वरुण मोहिते

पण योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे .हे जर कोणी मान्य करणार असेल तर चर्चा करू ग्राउंड रिऍलिटी वर .. आकड्यांवर नाही . मी सांगतो उदाहरणं

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2016 - 3:22 pm | श्रीगुरुजी

निर्णयाच्या अंमलबजावणीत त्रुटी आहेत हे कोणीच नाकारत नाही. परंतु त्यांनी तर निष्कर्ष काढलाय की निर्णयाचे मूळ उद्धेशच म्हणजे पर्यायाने निर्णयच फसलाय.

सुज्ञ's picture

2 Dec 2016 - 3:22 pm | सुज्ञ

साहेब इतके धागे झ्हाले आणि अनेकांनी तटस्थ पणे विचारले देखील आहे कि कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ? यावर अनेक ज्ञानी लोक वेगळा धागा देखील काढणार होते परंतु 'नियोजनात चूक झ्हाली' एवढे म्हणण्याखेरीज कोणीही काहीही केले नाही . ग्राउंड रियालिटी वर येऊन आपण आता आपले विचार मांडा

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2016 - 3:25 pm | श्रीगुरुजी

त्यांनी काढला होता की रोख २० लाख रूपये घेऊन जाणार्‍या ट्रकवाल्याचा धागा. अजून काय पाहिजे?

मोहिते साहेब.. कळकळीची विनंती.. असा एक धागा प्लीज काढा. मला अंमलबजावणी मधले काहीही माहिती नाही किमान पैसे फॅक्टरीतून निघून बँकेत आणि ATM मध्ये कसे पोचतात ते तरी कळेल.

वरुण मोहिते's picture

2 Dec 2016 - 3:44 pm | वरुण मोहिते

इतका मी हुशार नाही :) बाकी ३००-५०० प्रतिसादावर काय मत देणार .
असो ग्राउंड रिऍलिटी माझ्या कंपनीत ३५ लोक कामाला आहेत .ज्या व्यवसायात घरच्या मी नाही हे पहिलेच नमूद करतो . त्यातले १०-१२ भैय्ये आहेत त्यांना ना सुट्टे मिळत होते ना बँकेतून पाठवता येत होते कारण बँकेत गेले की २ तास गेले .हे म्हणतोय ते रबाळे नवी मुंबई चं उदाहरण आहे. भिवंडी मध्ये हॅन्डलूम बिसिनेस बंद आहे जवळ जवळ १७ दिवस माझ्या मित्राची कंपनी आहे ..ट्रान्सपोर्ट वाल्यांचे हाल आहेत . अशी अनेक उदाहरणं आहेत . करायचं होता ना मग पहिले तरतूद करायची . ज्यांना त्रास झाला ती प्रामाणिक लोक आहेत . त्यांना देशभक्तीचे गोडवे सांगायचे . अजूनपर्यंत अप्रामाणिक लोकांना काही त्रास झाला नाहीये .आजही ५०० च्या नोटा द्या बदलून मिळत आहेत कमिशन घेऊन . जगात कुठली बँक नसेल जिने २० दिवसात इतके नियम बदल केले. आजही आपल्याला त्रास होणार नाही आहे कारण हे आपण कार्ड पेमेंट वैग्रे कित्येक वर्षांपासून करत आहोत . पण ज्यांना त्रास होतोय त्यांचं काय ???

सुज्ञ's picture

2 Dec 2016 - 3:54 pm | सुज्ञ

मालक "कशी करायला हवी तरतूद" या टायटल खाली आपण कुणाला काहि होत असलेले काही त्रास सांगितले परत. वरील प्रतिसादात आपण म्हणत आहात " पण योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे" तर आम्ही विचारतो कि नक्की कशी तरतूद / नियोजन करायला हवे होते सरकार ने किंवा अजूनही करू शकतो ? यावर आपले विचार सांगा. निव्वळ नियोजन चुकले इतके बोलून थांबू नका

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 3:58 pm | संदीप डांगे

त्यांनी विचारलाय कि प्रश्न, आता द्या कि उत्तर...

विशुमित's picture

2 Dec 2016 - 4:00 pm | विशुमित

<<<<पण ज्यांना त्रास होतोय त्यांचं काय ???>>>>
-- त्यांनी गपगुमान लायनीत उभा राहवं.

वरुण मोहिते's picture

2 Dec 2016 - 4:01 pm | वरुण मोहिते

इतका मी हुशार नाहीये रिझर्व बँकेला सल्ले द्यायला .

सुज्ञ's picture

2 Dec 2016 - 4:04 pm | सुज्ञ

असो .. ओके :)))

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 9:42 pm | संदीप डांगे

तृणमूल कॉन्ग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मु़ख्यमंत्री यांनी लष्कराच्या नियमित सरावावरुन राजकारण करुन आपल्या बालीशपणाचा पुन्हा एकदा परिचय दिला. टोल नाक्यांवर येणारी-जाणारी वाहने मोजण्याचे नेहमीच्या कामासाठी कायदेशीर प्रक्रियेतून पोलिसांना सूचना करुन लष्कराने आपले काम सुरु केले. पण हा केंद्राकडून लोकशाहीवर घाला घालण्यात येत आहे असा आक्रोश करुन ममतादिदींनी नौटंकीबाजी करत रात्रभर मुख्यमंत्री कार्यालयात थांबण्याचा निर्णय घेतला.

लष्कराने आपली कागदपत्रे प्रसिद्ध करुन ममता बॅनर्जी यांची नौटंकी उघडकीस आणली. पश्चिम बंगालची जनता यातून लवकर काय तो बोध घेवो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Dec 2016 - 12:02 pm | हतोळकरांचा प्रसाद

खरंच काहींच्या काही तमाशा या बाईंचा! कमीतकमी सैन्याने कागदपत्रे पाठवली आहेत याचं भान ठेवलं असतं तरी असा सेल्फगोल करावा लागला नसता! बाकी खालील विडिओ हसूच आले.

https://www.youtube.com/watch?v=6CiXDmlc65A

श्रीगुरुजी's picture

3 Dec 2016 - 1:15 pm | श्रीगुरुजी

ही बाई अत्यंत छपरी बाई आहे. ती केजरीवालांप्रमाणेच कायम कांगावा आणि नाटके करत असते. तिला म्हणे पंतप्रधान व्हायचंय म्हणून आता हिंदी शिकते आहे म्हणे. कदाचित मोदी अत्यंत वाईट असतील, ते लोकांना आवडत नसतील . . . परंतु त्यांना पर्याय म्हणून जे स्वतःला पुढे करताहेत (ममता, केजरीवाल, राहुल, मुलायम, मायावती इ. गणंग) त्यांच्याकडे पाहिलं की मोदी या सर्वांपेक्षा शतपटीने चांगले आहेत हे लक्षात येतं.

वरुण मोहिते's picture

3 Dec 2016 - 2:00 pm | वरुण मोहिते

या बाईंकडे लक्ष देऊच नये . वाजपेयींच्या काळापासून ते आतापर्यंत हे असच वागणं आहे . मोठ्या महत्वाकांक्षा जागृत झाल्या आहेत त्यांच्या . पण बंगाल पुढे कोण विचारणार नाही . बंगाल ला कळेल तो सुदिन .

गॅरी ट्रुमन's picture

3 Dec 2016 - 2:25 pm | गॅरी ट्रुमन

पूर्वी असले कोणीतरी काहीतरी बरळले की राग यायचा. पण आता तसे काही होत नाही तर हे लोक असे काहीतरी बरळू लागले की बरेच वाटते. आपल्या एकाहून एक मर्कटलीलांमुळे विरोधकांनी आपला खरा चेहरा आपण होऊन जनतेपुढे आणला आहे.अशा लोकांमुळे २०१९ मध्ये मोदींना निवडणुक अन्यथा गेली असती त्यापेक्षा अधिक सोपी जाणार ही शक्यता जास्त. त्यामुळे केजरीवाल, ममता, राहुल गांधी इत्यादींनो किप इट अप. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Dec 2016 - 3:01 pm | हतोळकरांचा प्रसाद

:)

विधान : योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे. लोकांना प्रचंड त्रास होत आहे . लोक मरत आहेत वगैरे .

साधा प्रश्न : कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ?

उत्तर : आमाला ठावं नाय

तर लोकहो असा आणि एवढाच नोटबंदी विरोधाचा प्रवास आहे . फक्त विरोध करत राहणे

अवांतर : बोटं दाखवणं खूप सोपं असतं इतकं समजल्यास हा हि नोटबंदी चा एक फायदा म्हणावा काय ?

संदीप डांगे's picture

3 Dec 2016 - 1:26 am | संदीप डांगे

मीनाक्षी लेखीना विचारायला पाहिजे होतं तुम्ही हे, त्यांचाही नोटबंदीला विरोध होता, हेच मुद्दे होते,

त्यांच्या पार्टीने 'बोट दाखवणं सोपं असतं, आपण करायला गेलो की काय करायला पाहिजे' हा विचार नोटबंदीआधी केला असावा.

अवांतर: तक्रारकर्त्याने उपाय सांगता आले नाहीत तर तक्रारच करू नये हे नोटबंदीनिमित्त समजले हा फायदा(?)

श्रीगुरुजी's picture

3 Dec 2016 - 2:57 pm | श्रीगुरुजी

मीनाक्षी लेखीना विचारायला पाहिजे होतं तुम्ही हे, त्यांचाही नोटबंदीला विरोध होता, हेच मुद्दे होते,

२०१४ चा निर्णय काय होता व त्याला लेखींनी का विरोध केला होता याविषयी जरा सविस्तर सांगता का? तसेच २०१४ चा निर्णय २ २०१६ चा निर्णय यातील साम्य देखील सांगता का?

सुज्ञ's picture

3 Dec 2016 - 1:56 am | सुज्ञ

मीनाक्षी लेखी? असो .
अवांतरातील : तक्रारकर्त्याने तक्रार जरूर मांडावी आणि त्या तक्रारी दूर करण्यासाठीच उपाय योजले जात आहेत . तक्रारदाऱ्याना वाऱ्यावर सोडलेलं नाही.

आपण आता भाजपविरोधी आहेत हा चष्मा मान्य केल्यामुळे सगळेच आपल्याला आपल्या चष्म्यातून दिसेल तसेच आहे या गोड समजुतीवर खुश रहा :)

संदीप डांगे's picture

3 Dec 2016 - 3:07 am | संदीप डांगे

मी भाजपविरोधी असल्याचं मान्य केलंय ह्या आपल्या गॉड समजुतीत खुश राहा!!! कित्ती घाई... :)

लेखी म्याडम म्हैत नै? गुगल करा आणि प्रेस कॉन्फरन्स बघा नोटबंदीवरची, 2014. अजून कोणीही नोटबंदी/भाजप समर्थकांनी त्या मुद्द्याचा प्रतिवाद केलेला नाही, चार वेळा टाकूनही. अवघड जागेचं दुखणं असावं... टाळाटाळ केलीय फक्त. तुम्हाला जमतंय का पहा.

तक्रादारांना वाऱ्यावर सोडलं नाही???? असो. वरातीमागून घोडे येत असतील.

श्रीगुरुजी's picture

3 Dec 2016 - 1:20 pm | श्रीगुरुजी

त्यावेळच्या नोटाबंदीची आणि आताच्या नोटाबंदीची तुलना करणे म्हणजे सफरचंदे आणि संत्र्यांची तुलना करण्यासारखे आहे. ज्या मोदींनी जीएसटीला विरोध केला होता तेच मोदी आता जीएसटीला पाठिंबा देत आहेत या फुसक्या आरोपात जितका दम आहे तितकाच दम या दोन वेगवेगळ्या नोटाबंदी निर्णयांच्या तुलनेमध्ये आहे.

संदीप डांगे's picture

3 Dec 2016 - 2:12 pm | संदीप डांगे

नोटाबंदीची आणि आताच्या नोटाबंदीची तुलना करणे म्हणजे सफरचंदे आणि संत्र्यांची तुलना करण्यासारखे आहे

कृपया स्पष्टीकरण द्या अडीच वर्षात सफरचंदाचं संत्र कसं झालं? :)

श्रीगुरुजी's picture

3 Dec 2016 - 2:38 pm | श्रीगुरुजी

जर २०१४ चा निर्णय सफरचंद असेल तर २०१६ चा निर्णय संत्रे आहे. जर २०१४ चा निर्णय संत्रे असेल तर २०१६ चा निर्णय सफरचंद आहे. तुम्हाला २०१४ मध्ये लेखी यांनी काय म्हटले आहे याची पुरेपूर माहिती दिसते. २०१६ चा निर्णयही ताजा आहे. दोन्ही निर्णयांची तुलना केल्यास ती तुलना चुकीची आहे हे लक्षात येईल.

सुज्ञ's picture

3 Dec 2016 - 2:08 am | सुज्ञ

कधी येतोय धागा ? असे झ्हाले असते उत्तम व अत्त्युत्कृष्ट नोटबंदी चे नियोजन . या टायटल खाली ? हो जर धागा लिहीत असाल तर एकच फक्त काळजी घ्या. हा निर्णय या आधी कुणालाही समजू नये अशा दृष्टीने नियोजन हवे हो . नाहीतर लिहाल " सर्व मशीन मध्ये २००० च्या नोटा आधीच भरायला हव्या होत्या आणि ब्रांच मॅनेजर ना तसे कळवायला हवे होते वगैरे "

संदीप डांगे's picture

3 Dec 2016 - 2:59 am | संदीप डांगे

जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत.

ह्यामुळे मी 8 नोव्हेंबर ला 1000, 500 अचानक बंद करणार हे कसे कळेल?

गामा पैलवान's picture

3 Dec 2016 - 3:09 am | गामा पैलवान

संदीप डांगे,

माझ्या मते जुन्या आणि नव्या नोटांचं मिश्रण न केलेलं बरं पडेल. जुन्या व नव्या एकाच वेळेस भरल्या गेल्या तर बँकेची डोकेदुखी आणि म्हणूनंच चुकांचं प्रमाण बरंच वाढेल. गोंधळ नियंत्रणात ठेवण्यासाठी जुन्या नोटा रद्द केल्यानंतर मगंच नव्या चलनात आणाव्यात.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

3 Dec 2016 - 3:19 am | संदीप डांगे

कोणत्या प्रकारच्या चुका? बँकांना नव्या जुन्याचं काय करायचं, त्यांना तर 8 तारखेला कळेल कि जुन्या जाणारेत ते.

500 नको तर फक्त 2 हजाराची नोट कालिब्रेट करू. पुढे लागणारा महिनाभराचा वेळ व लोकांची डोकेदुखी थांबेल.

सुज्ञ's picture

3 Dec 2016 - 3:33 am | सुज्ञ

कि २००० ची नोट व्हाट्सप वर इतकी गुप्तता बाळगून पण फिरत आहे .. नोटबंदी आधी १० दिवस त्यात चिप आहे वगैरे बातम्या .. त्यावेळेस सर्वाना खरंच खोटी वाटलेली हो डांगे .. चिप ची बातमी खोटीच वाटत होती पण असली नोट येणार हे ही वाटत न्हवते .. पण तशीच नोट आली . चीप वगैरे व्हाट्सअप कलाकारांची कमाल .. पण पण . ..
आता ही बातमी त्या नोट छपाई कंत्राटदाराने व्हाट्सअँप वर पसरवली का आरबीआय गव्हर्नर नी ( जुना केजरीवाली रोग :कोण गुजराती आहेत शोधा आणि त्यांचे मोदींशी कनेक्शन बांधा . त्याआधी गुजराती मारवाडी वगैरे भामटेच असतात आणि त्यांचा धंदा लोकांना फ़सवूनच होतो हा ठाकरीय न्यूनगंड मनाशी बाळगा .. तर ते एक असो . ::) याचा शोध घ्या पण

मग आता इतकी गुप्तता बाळगून जर व्हाट्सपप वर त्या नोटेचे स्पेसिमेन आले तर तुम्हीच जस्ट विचार करा .. ३० सप्टेंबर ला २००० आणि ५०० च्या नवीन नोटा ( २ महिने आधी ??? ) भरल्या असत्या तर काय झ्हाले असते ?

सुज्ञ's picture

3 Dec 2016 - 3:36 am | सुज्ञ

<<<<<<जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत.
यावरील हि प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

3 Dec 2016 - 4:11 am | संदीप डांगे

पण 2000 च्या नोटेचे गुपित हवेच कशाला? मी तर 2000 आणि 5000 ची नोट आणली असती.

"2000 ची नोट येणे = 1000 500 बंद होणार याची बातमी फुटणे" असे कसे व का होईल? नवीन नोट येण्याचा जुन्या नोटा बंद होण्याशी काय संबंध? (कारण तसाही आता तो लागत नाहीये, तो वेगळा विषय, डेमो मध्ये एक चलन रद्द केल्यावर नवीन अधिक मूल्य असलेले चलन आणत नसतात, )

अर्धवटराव's picture

3 Dec 2016 - 5:01 am | अर्धवटराव

जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत.

जुन्या नोटांच्या बदली (खास करुन १००० च्या नोटा) नवीन नोटा आणायच्या असतील तर जुन्या नोटा रद्द् करण्यापुर्वी नवीन नोटा आणता येत नाहि. त्या म्युच्युअली एक्स्क्लुसीव्ह असाव्या अशी अपेक्षा आहे बहुतेक. जुन्या चलनात असताना एक जरी नवीन नोट आलि तरी ति चलनवढीत मोडते. आणि चलनवाढ तर अपेक्षीत नाहि या केस मधे.

संदीप डांगे's picture

3 Dec 2016 - 8:55 am | संदीप डांगे

ओके, महत्त्वाचा मुद्दा.

सुज्ञ's picture

3 Dec 2016 - 3:38 am | सुज्ञ

---------जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत.

गामा पैलवान's picture

3 Dec 2016 - 1:45 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

कोणत्या प्रकारच्या चुका?

हाताळणीतले परिश्रम आणि म्हणूनंच चुका वाढतील. नव्या नोटेच्या जागी जुनी नोट जाणे. जुन्या नोटा रद्द केल्या की त्या वेगळ्या काढणे. इत्यादि कामाचा जास्तीचा ताण पडेल.

सध्या जुन्या नोटा नागरिक बँकेस आणून देत आहेत. मिश्रण झालं असतं तर बँकेला वर्गीकरणाचा ताप निस्तरत बसावं लागलं असतं.

आ.न.,
-ग.पै.

संदीप डांगे's picture

3 Dec 2016 - 2:20 pm | संदीप डांगे

२००० हजारच्या नव्या नोटा आणि १००० ५०० च्या जुन्या नोटा यांच्यात नेमकं कसं मिश्रण होईल?
वर अर्धवटरावांनी चलनफुगवट्याचा मुद्दा मांडलाय. त्याबद्दल आपले मत?

वरुण मोहिते's picture

3 Dec 2016 - 2:27 pm | वरुण मोहिते

डायरेक्ट लेख लिहायला सांगतात लोकं. बरं लिहले काही अनुभव ते नाही पटले तर परत देशद्रोही होण्याची भीती . डायरेक्ट भाजप तुम्हाला आवडत नाही असे पण आरोप .परत पाकिस्तान ला रातोरात पाठवतील काय हि पण भीती . असो :)

संदीप डांगे's picture

3 Dec 2016 - 2:29 pm | संदीप डांगे

=)) =)) =)) वेल्कम टू द वन्डरलॅन्ड!!!

योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे हे आपले विधान आहे . यावर परत एकदा विचारतो कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ? लेख नको . आपले मत मांडा . खुश ?

वरुण मोहिते's picture

3 Dec 2016 - 2:49 pm | वरुण मोहिते

प्रामाणिक लोक आहोत . हे डिजिटल पेमेंट वैग्रे कधीपासून करतोय . देशात परदेशात . पण ज्यांना त्रास झाला त्यांचा काय ह्या प्रश्नाचं उत्तर दिलात तर जरूर लेख लिहू . कित्येकदा बँकेला निर्णय बदलावे लागले ते का ह्याच उत्तर दिलात तर जरूर लिहू . सगळ्यांनी समर्थन केला ते वर्ल्ड इकॉनॉमिस्ट बेस्ट जे काही बोले किंवा शंका विचारल्या ते पागल अमर्त्य सेन ह्यांच्यापासून . असे का? याचे उत्तर दिलेत तरी जरूर लेख लिहू . मला काडीमात्र त्रास झाला नाही पण काही विचारलं की विरोधी ठरवलं हे का याचं उत्तर द्या मी लिहतो लेख . ज्यांना त्रास झाला त्यांचा काय हे पण लिहा एक वेगळी बाजू पहिले तुम्ही लिहा मी लिहतो कि मग

सुज्ञ's picture

3 Dec 2016 - 3:03 pm | सुज्ञ

त्रास समाजातील प्रत्येक वर्गालाच होत आहे हे कुणीही अमान्य करत नाही आहे . मी हि रांगेत उभारूनच पैसे भरले / काढले. प्रत्येक वर्गाचा त्रास कमी करण्यासाठीच त वेगवेगळ्या उपाययोजना सरकार अथवा आरबीआय कडून चालू आहेत. उदा . लग्नासाठी पैसे काढता येतील वगैरे. तसेच रोज याचा आढावा घेऊन त्यानुसार उपाय योजले जात आहेत. तसेच आपण प्रश्न विचारले म्हणून आपण विरोधी/ पाकप्रेमी वगैरे ठरत नाही. असे कोणीही म्हणत नसून गैरसमज करून घेऊ नयेत . ज्यांना त्रास झ्हाला त्यांच्या भावनेशी आम्ही प्रामाणिक आहोत. जय हिंद :)

चला आता कशी तरतूद पाहिजे होती ( एकदम फुलप्रूफ कोणालाही त्रास वगैरे न होता हं .. ) यावर फर्मास मत मांडा पाहू .

मार्मिक गोडसे's picture

3 Dec 2016 - 3:11 pm | मार्मिक गोडसे

चला आता कशी तरतूद पाहिजे होती ( एकदम फुलप्रूफ कोणालाही त्रास वगैरे न होता हं .. ) यावर फर्मास मत मांडा पाहू .

आत्ताची नोटबंदी १०० % फुलप्रूफ आहे का? दिर्घकालीन परिणामकारक आहे का?

औकात नाही हो. असो लग्नासाठी पैसे मला करायचेत १० लाख खर्च .कारण तितका आहेर मिळाला असं कोणी बोललं तरी देशासाठी गप्प बसायचं का? ग्रामीण भारतात हाल झाले हे पाहून गप्प बसायचं का?? सगळ्यात देशभक्ती का दाखवता आहेत हो . देश चालवायचा आहे भक्ती नाही आमच्या नातेवाईकांमध्ये कित्येक जण सैन्यात आहेत .पण परत एकदा काही विचारणं गुन्हा आहे का ??१०० च्या नोटा तरी अधिक प्रिंट करू शकले असते .किंवा अगदीच गुप्त ठेवायचं होतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर आधीच कॅशलेस व्यवहार बेस्ट ह्याच्या जाहिराती करायच्या होत्या .कोणाला असतं? हे कॅशलेस बेस्ट हा प्रकार ११ नोव्हेम्बर नंतर चालू झाला जेव्हा समजलं ८ तारखेनंतर कि प्रॉब्लेम होणारे . इतक्या जाहिराती देता पेप्रात सगळे पक्ष. द्या कि जाहिरात कॅशलेस करा आता का सुचलं?प्रॉब्लेम झाला म्हणून सुचलं . जाहिरात बाजी च्या बाबतीत काँग्रेस काय भाजप काय कोणीच त्यांचा हात धरू शकत नाही .

मी आज गावी आहे. कुठे कुणाला काही त्रास झालेला कोण बोलत नाही. आणि हो ३०० लोकवस्तीच छोटस गाव आहे आणि जवळची बँक २२ कि मी लांब आहे.

वरुण मोहिते's picture

3 Dec 2016 - 3:34 pm | वरुण मोहिते

अश्या मुळेच २००४ ला सत्ता गेली . अटल बिहारींसारखी मोठी लोकं असताना . जाहिरातबाजी . आम्ही करू ते बेस्ट .

सुज्ञ's picture

3 Dec 2016 - 3:40 pm | सुज्ञ

प्रतिसाद नीट वाचुन समजून मग प्रतिवाद करावा नाहीतर परत परत परत तेच मुद्दे उगाळले जातात.बाकी किमान केशलेस च्या जाहिराती आधी देता आल्या असत्या हि सुचना बरोबर आहे. असे काहीतरी नवीन मुद्दे येउद्यात

श्रीगुरुजी's picture

4 Dec 2016 - 10:43 pm | श्रीगुरुजी

७३ दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या जयललिताला cardiac arrest and respiratory system failure मुळे पुन्हा एकदा ICU मध्ये हलविले आहे.

सचु कुळकर्णी's picture

5 Dec 2016 - 12:01 am | सचु कुळकर्णी

जयललिता लवकरच बर्या होवोत.

गॅरी ट्रुमन's picture

5 Dec 2016 - 5:59 pm | गॅरी ट्रुमन

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ६८ व्या वर्षी निधन चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. त्यांना श्रध्दांजली.

श्रीगुरुजी's picture

5 Dec 2016 - 6:13 pm | श्रीगुरुजी

Hospital has denied this news. Doctors say her treatment is on.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Dec 2016 - 6:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

अर्धा उतरावलेला झेंडा परत चढवला अशी बातमी येते आहे.

श्रीगुरुजी's picture

5 Dec 2016 - 8:23 pm | श्रीगुरुजी

काय चाललंय काही समजत नाही. ३ वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी (इंडियन एक्स्पेस, हिंदुस्तान टाईम्स आणि इंडिया टुडे) जयललिता गेल्याची बातमी पावणेसहाच्या सुमाराला संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. अद्रमुक पक्षाच्या कार्यालयावरील झेंडे अर्धे उतरविण्यात आले होते. काही मिनिटानंतर रूग्णालयाने जाहीर केले तिच्यावर अजून उपचार सुरू आहेत. रूग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ सुरू आहे. जयललिताऐवजी तात्पुरता मुख्यमंत्री म्हणून पनीरसेल्वम जबाबदारी घेणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये जयललिता ४ महिने तुरूंगात असताना व नंतर ३-४ वर्षांपूर्वी ती ८ महिने तुरूंगात असताना हाच माणूस तिच्या जागी होता.

मात्र तिच्या पश्चात अद्रमुक एकसंध राहील का याची खात्री नाही. सध्या तामिळनाडू विधानसभेत २३४ पैकी १२० च्या आसपास अद्रमुकचे आमदार आहेत तर द्रमुक व काँग्रेसची एकत्रित संख्या १०० च्या आसपास आहे. जयललिताच्या पश्चात अद्रमुक मध्ये फूट पडून काही आमदार द्रमुकमध्ये जाऊन पुन्हा एकदा करूणानिधी वयाच्या ९२ व्या वर्षी मुख्यमंत्री होऊ शकतात. १९८७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन जवळपास वर्षभर अमेरिकेत उपचार घेत होते व तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात जानकी रामचंद्रन (एम जी आर ची पत्नी), जयललिता व शिवाजी गणेशन (अभिनेत्री रेखाचे वडील) अशा ३ तुकड्यात पक्ष विभागला गेल्याने तत्कालीने केंद्र सरकारने विधानसभा बरखास्त करून १ वर्षानंतर निवडणुक घेतल्यावर द्रमुकला पूर्ण बहुमत मिळून करूणानिधी मुख्यमंत्री झाले होते. सद्यपरिस्थितीत विधानसभा भंग करणे खूप अवघड आहे. त्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता आहे.

गॅरी ट्रुमन's picture

6 Dec 2016 - 1:37 pm | गॅरी ट्रुमन

१९८७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन जवळपास वर्षभर अमेरिकेत उपचार घेत होते व तिथेच त्यांचे निधन झाले.

किंचित दुरूस्ती. एम.जी.रामचंद्रन यांचे निधन अमेरिकेत नाही तर मद्रासमध्ये त्यांच्या निवासस्थानीच झाले होते. ते १९८४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते.पक्षाने ही निवडणुक त्यांच्या अनुपस्थितीत लढवली होती.ते परत आल्यावर फेब्रुवारी १९८५ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

अमेरिकेत निधन झाले होते ते हेमवतीनंदन बहुगुणांचे. पण त्यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नव्हते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Dec 2016 - 10:51 pm | हतोळकरांचा प्रसाद

संपादकीय मतांनी शेवटी ट्रम्प "पर्सन ऑफ दि इअर"!

वरुण मोहिते's picture

5 Dec 2016 - 8:48 pm | वरुण मोहिते

१८ टक्के जास्त मत आहेत .परवा निकाल जाहीर होईल . बाकी टाइम मॅगझीन वर बरेच भारतीय नेते पण आलेले आहेत सहज एक आठवण म्हणून . बाकी
जयललिता असो पनीरसेल्वम बोथ करप्ट. पनीरसेल्वम ला कैच अधिकार नव्हते आता काय होणार ते पाहणं रोचक आहे .

रुस्तम's picture

6 Dec 2016 - 11:11 am | रुस्तम

पण आता पर्यंत पर्सन ऑफ द इयर फक्त महात्मा गांधी...

http://time.com/3614128/person-of-the-year-covers/

अभिदेश's picture

6 Dec 2016 - 12:22 am | अभिदेश

जयललिता ह्यांचे निधन. निदान आत्तातरी बातमी अशीच आलीये.

वेल्लाभट's picture

6 Dec 2016 - 10:28 am | वेल्लाभट

अम्मा नो मोअर. तामिळनाडूवर शोककळा. मोदींनी व्यक्त केला खेद.

गामा पैलवान's picture

6 Dec 2016 - 1:04 pm | गामा पैलवान

मोदींनी खेद व्यक्त केला....? उनके तो मनमें लड्डू फुटते होंगे!
-गा.पै.

वेल्लाभट's picture

6 Dec 2016 - 2:00 pm | वेल्लाभट

असतील; पण आता ते काय हसत जाणार का तिथे? काहीही हं गापै.

श्रीगुरुजी's picture

6 Dec 2016 - 2:40 pm | श्रीगुरुजी

उलटं आहे. अद्रमुक मधील निर्नायकी अवस्थेमुळे द्रमुक व काँग्रेस पुन्हा एकदा उचल घेण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत द्रमुक व काँग्रेसला नवसंजीवनी मिळू नये यासाठी भाजप प्रयत्न करणार. भाजप रजनीकांतला पुढे आणण्याच्या प्रयत्नात असल्याच्या अफवा आहेत.

बाकी आता हे या धाग्यात टाकावं का ठाऊक नाही पण
२०१७ निसान जीटीआर भारतात लाँच झालेली आहे. रस्त्यावर चालण्यासाठी मान्यता असलेल्या अतिशय वेगवान वाहनांपैकी एक असलेली जीटीआर तुम्हाला १.९९ कोटी किमतीला मिळू शकते. याची इंजिन बनवणारे फक्त ६ लोक जगात आहेत, अर्थात निसान कडे, आणि प्रत्येक गाडीच्या इंजिनावर ते बनवणार्‍या व्यक्तीचं, जिला निसान ताकुमी (म्हणजेच कारागीर/कलाकार) म्हणते, नाव कोरलेलं असतं.
०-१०० २.९ सेकंद
३.८ लिटर व्ही सिक्स विघ ५६२ बीएचपी आणि ६३५ एनएम टॉर्क ऑल व्हील ड्राईव्ह सिक्स स्पीड ट्रान्स्मिशन
इट्स लव्हिंगली कॉल्ड अ‍ॅज 'गॉडज़िला'

मस्त गाडी. बाकी निसान च्या गाड्यांच्या अनुभव नाही .
जाता जाता भारतीय लष्कराच्या जिप्सी बदलून आता टाटा सफारी मिळणार असं आजच एक डील फायनल झालं आहे .

वेल्लाभट's picture

6 Dec 2016 - 2:45 pm | वेल्लाभट

जिप्सी आवडीची आहे. पण तिच्यातल्या त्रूटी दूर करण्याचं मारुतीने कधीच मनावर घेतलं नाही. व्यावसायिक निर्णय असावा परंतु कॉमन रेल डीझेल इंजिन, सुधारित ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, सस्पेन्शन, इत्यादी अनेक गोष्टी अनिवार्य होत्या. जिप्सी वॉज वे बिहाइंड टाइम.

गामा पैलवान's picture

6 Dec 2016 - 7:37 pm | गामा पैलवान

आयला! जयललिता यांच्या पार्थिवाचं दहन न करता दफन केलं. ख्रिस्ती होत्या काय?
-गा.पै.

वरुण मोहिते's picture

6 Dec 2016 - 7:39 pm | वरुण मोहिते

दहन नाही करत

गामा पैलवान's picture

6 Dec 2016 - 8:40 pm | गामा पैलवान

वमो,

बाईसाहेब जन्माने तमिळ अय्यंगार ब्राह्मण होत्या. इति विकी.

मग पुरण्याचं कारण लक्षात येत नाहीये. शिवाय त्यांच्या (दिवंगत) भावाच्या कुटुंबियांना जवळपास फिरकू दिलं गेलं नाहीये (ऐकीव माहिती).

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

7 Dec 2016 - 10:56 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

जर मृतदेह जाळणे हे कुण्या धर्माशी संबंधित असेल तर दफन करणे हेही कुण्या धार्मिक पंथाशी निगडीतच आहे. माझ्या मते जयललिता लपूनछपून ख्रिस्ती बनल्या असाव्यात. पेरियार, रामचंद्रन वगैरे स्वत:ला द्रविडवादी नास्तिक म्हणवून घेणारे सर्वच छुपे बाटगे असावेत. जयललितांनी कांची कामकोटीच्या पीठाधीशांना जी वागणूक दिली त्यावरून या संशयास पुष्टी मिळते.

आ.न.,
-गा.पै.

आनंदयात्री's picture

7 Dec 2016 - 10:44 pm | आनंदयात्री

धन्यवाद. आता या हायपरलूप ट्रान्स्पोर्टशन सिस्टीम आणि मस्कच्या हायपरलूप वन मध्ये नेमका काय फरक आहे ते शोधायला हवे.

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2016 - 2:11 pm | श्रीगुरुजी

तोंडी तलाक घटनाबाह्यः उच्च्य न्यायालयाचा निर्वाळा

हे न्यायाधीश बहुधा भगवे असावेत. मुस्लिमांवर हिंदू संस्कृती लादण्याच्या या निर्णयाचा निषेध! मोदी राजवटीत अल्पसंख्याकांच्या हक्कांमध्ये ढवळाढवळ होत आहे याचा अजून एक पुरावा. आता दाभोळकर बंधु-भगिनी, तिस्टा सेटलवाड, सूझन अरूंधती रॉय, भाई वैद्य, कुमार सप्तर्षी, बाबा आढाव इ. मानवतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, उदारमतवादी, विवेकवादी, निधर्मी आणि पुरोगामी विचारवंतांनी या जातीय व भगव्या निर्णयाविरूद्ध आंदोलन करून हा निर्णय हाणून पाडला पाहिजे. पुरस्कारपरतीची मोहीम नव्याने सुरू व्हायला हवी. काश आज राजीव गांधी असते तर हा निर्णय फाट्यावर मारून त्यांनी तलाक कायम रहावा यासाठी नव्याने कायदा करून अल्पसंख्याकांना दिलासा दिला असता.

गॅरी ट्रुमन's picture

8 Dec 2016 - 5:20 pm | गॅरी ट्रुमन

आता हमीद दाभोळकर यांनी "ट्रिपल तलाक" मागचा भावार्थ आपण समजून घेतला पाहिजे असे म्हटले आणि सर्व बुबुडाविपुमाधविंनी त्याला आपल्या सहमतीचे शेपूट जोडले तरी आश्चर्य वाटायला नको.

वरुण मोहिते's picture

8 Dec 2016 - 2:29 pm | वरुण मोहिते

शाहबानो प्रकरणाचा . होतात चुका कोणीही सत्ताधीश असो . बाकी कुमार सप्तर्षी आणि बाबा आढाव याना अरुंधती रॉय सारख्या उथळ बोलणाऱ्या बाईंच्या पंगतीमध्ये नका बसवू हो गुरुजी .

गामा पैलवान's picture

9 Dec 2016 - 1:21 pm | गामा पैलवान

अग्गोबाई .... ! घाबरलो ना मी हे पाहून !! आता कसं होणार मोदींचं !!!
https://www.youtube.com/watch?v=j6bOndmJJ3U

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

9 Dec 2016 - 2:34 pm | श्रीगुरुजी

ही चित्रफीत ऐकून आणि बघून इतका हसलो की पोट दुखायला लागलं. अर्थात अशा मूर्ख महिलेला केजरी, पप्पूसारखे महाभाग गांभिर्याने घेतीलच.

गॅरी ट्रुमन's picture

9 Dec 2016 - 5:36 pm | गॅरी ट्रुमन

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणी सी.बी.आयने माजी हवाईदलप्रमुख एस.पी.त्यागी यांना अटक केली आहे.

http://timesofindia.indiatimes.com/india/Former-Air-Force-chief-SP-Tyagi...

अमितदादा's picture

10 Dec 2016 - 11:02 pm | अमितदादा

वरील माझ्या एका प्रतिसादाला अनुसरून हा प्रतिसाद..प्रतिसाद पूर्वी वाचलेल्या माहितीवर आधारित आहे, काही दुवे सापडत नाहीत त्यामुळे काही माहिती चुकीची असू शकते.
UPA च्या शेवटच्या काळात कोळश्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला, तसेच बहुतांश नवीन विद्युत निर्मिती केंद्र वर्षानुवर्ष रखडलेली होती, कोल इंडिया कडून कोळश्याच अपेक्षेप्रमाणे उत्पादन होत नवते त्यामुळे महाग कोळसा आयात करावा लागत होता तसेच powar transmission ची व्यवस्था जुनाट झालेली आणि नवीन प्रोजेक्ट अडकून पडलेले. ह्या तसेच इतर कारणामुळे वीज तुटवडा निर्माण झालेला. काळाची पावुले समजून UPA ने महत्वकांक्षी योजण्या आखल्या खऱ्या पण अमलबजावणी काही झाली नाही. वीज शेत्रातील बदलास खरी सुरुवात पियुष गोयल यांच्या काळात झाली. त्यांनी राबवलेले अनेक निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरलेत.
१. सर्वप्रथम कोळसा खाणींचा फेर लिलाव करून सुसूत्रता आणण्यात आली, कोल इंडिया उत्पादन ८% ने वाढले एका वर्षात जे नेहमी १-३ % होत होते, यामुळे वीज निर्मिर्ती केंद्रांना स्वस्तात देशी कोळसा मिळू लागला तसेच कोळश्याची आयात ८% घटली.
Coal India steams ahead under Modi
२. दुसरी महत्वाची योजना म्हणजे UDAY ज्या मध्ये कर्जाच्या खायीत गेलेल्या राज्य वीज महामंडळांना १० कि 5 वर्षामध्ये systematically reform करून त्यांच्यावरील कर्जाचा भार कमी करायचा. हि जर योजना यशस्वी झाली तर जवळजवळ १ लाख कोटीच सेविंग अपेक्षित आहे वीज क्षेत्रात. अधिक माहिती जालावर आहे.
३. power generation तसेच transmission च्या रखडलेल्या प्रोजेक्ट ना मंजुरी देण्यात आली, गेल्या २ वर्षात power transmision मध्ये ७१% वाढ झाली स्पेसिफिक दक्षिणेच्या राज्यामध्ये.
५. आतापर्यंत वीज न पोहचलेल्या खेड्यात वीज नेण्याचे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणात infrastructure development चालू आहे.
६. led बल्ब ची योजना सुधा छान होती.
Performance Check On Power Sector On Two Year’s Of Modi Govt

Energised Focus On Power Sector Augurs Well For India
७. सौर उर्जेला मोठ्या प्रमाणात प्रोसाहन देण्यात आल आहे, येत्या ५ वर्षात ३०००० MW चे प्रकल्प होऊ घातले आहेत. वर एका प्रतिसादात अदानी च्या कंपनीने सर्वात मोठा solar प्लांट सुरु केल्याची माहिती आहे.
report
८. अणु उर्जेत हि भरारी चालू आहे, भरपूर देशाशी मोदिनी करार केले आहेत, तमिळनाडूतील अणु उर्जा प्रकल्प योग्य दिशेने चालू आहे, andra प्रदेशात नवीन मेगा अणु उर्जा प्रकल्प होऊ घातला आहे, जैतापूर च नक्की काय झाल हे माहित नाही बहुदा तिथेही फ्रेच कंपनी प्लांट सुरु करेल असे दिसतंय.
९. मोठे जल विद्युत प्रकल्प हि नॉर्थ इस्ट आणि हिमाचल प्रदेश चालू आहेत ते हि काही वर्षात कार्यान्वित होतील

वीज क्षेत्रात भरपूर आव्हाने आहेत अजून हि आपण खूप मागे आहोत, ह्या negative गोष्टींचा किंवा आव्हानांचा आढावा घेतला नाहीये प्रतिसादात. जेव्हडी माहिती वाचली होती आणि समजली होती तेवडी दिली आहे जालावर याबाबतची खूप माहिती उपलब्द आहे.
प्रसिद्धी पासून दूर राहणाऱ्या परंतु उत्तम काम केलेल्या पियुष गोयल याच्याबद्दल नक्कीच आदर आहे.

जाता जाता खालील लेखात भारतीय वीज क्षेत्राचा इतिहास आणि भविष्याचा थोडक्यात आढावा
Three reasons for the Indian power sector to change for good