व्हिक्टोरिया म्युझियम , सायन्स सिटी, ईडन गार्डन , बेल्लूर मठ आदी गोष्टी बघण्यासारख्या आहेत, पार्क स्ट्रीट ,मैदान आदी परिसर भटकण्यास चांगला आहे, रसगुल्ला आणि फिश खाणे आवश्यक आहे. गडीया हात येथे साड्या चांगल्या मिळतात असे ऐकतो . बाकी नंतर लिहितो, मोबाईल वरून लिहीत आहे.
दादा: कलकत्ता, लंडन, मुंबई यासारखी शहरं टिक द बॉक्स पद्धतीने बघण्यात मजा नसते. तुमची आवडनिवड काय आहे यावर सगळं अवलंबून आहे.
मी आजपर्यंत दहाएक वेळा तरी कलकत्त्याला गेलो असेन. अजून ते 'बघून झालं' असं वाटत नाही. "मराठा डिच"चे अवशेष, रोनाल्ड रॉसने मलेरियावर संशोधन केलं ती जागा, डायमंड हार्बर असं बरंच अजून राहिलं आहे.
पध्दतीने बघायचे नाहिच आहे. पण वेळ कमी असल्याने जे पुर्ण बघता येइल तेच बघायचे असे ठरवले आहे मग भलेही एकच ठिकाण बघुन झाले तरि चालेल.. ट्राम आणि मेट्रो मधुन पण प्रवास करायचा आहे.. बघु कसे जमतय..
बाकी कोलकाता एक बकाल शहर आहे असे वैयक्तीक मत.
अगदी. हेच मत १५ वर्शापुर्वी होते व २०१५ च्या भेटीनंतर देखील हेच मत आहे. फारफार तर गुलमोहरच्या पलिकडील भाग आता जरा बदलला आहे एवढेच नवे आहे.
किलोवर पण पुस्तक मिळतात . बाकी २ दिवसात पाहायचं शहर नक्कीच नाही ते . प्रमुख गोष्टी पहा आणि परत कधीतरी निवांत जा . आणि हो चांगले फिश खाण्यास विसरू नका .
कलकत्त्याची बातच न्यारी, इथल्या हवेत ज्ञान आहे, कला आहे, विज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, फुटबॉल आहे, राजकारण आहे, मिष्टीचा गोड़ सुवास आहे, इलिश भापांचा सुगंध आहे, चायना टाउन आहे, गडिया हाट आहे, हावडा ब्रिज आहे , विद्यासागर सेतू आहे, आमच्या लाडक्या ब्योमकेशचे घर आहे कलकत्ता! साहित्य आकाशात उडणारे मोठे मोठे तारे ग्राहगोल आहेत, कलकत्ता पूर्ण पॅकेज आहे! बस इथल्या हवेचा गंध घेण्याइतके नाक तल्लख हवे
सगळ्यांनी सांगितलंच आहे...व्हिक्टोरिया म्युझियम कांही प्रमाणात पहाता येईल. पण या फेरीत पुढे काय पहायचे आढावा तर घ्या.
केसी दास आणि अन्य स्थानिक खाऊगल्ल्या पालथ्या घाला. मिष्टी दोही चुकवू नये. मासे कुठे मिळतील याची नीट चौकशी करावी. हल्ली मोठ्ठ्या संख्येने आलेली बिहारी मंडळी आहेत- चुकीची माहिती बिंधास्त पुरवतात!
साड्या वगैरे घ्यायला आदी ढाकेश्वरी नामक दूरच्या दुकानात गेलेलो. २५० वर्षे जुने आहे म्हणे दुकान. पण चांगले होते.
१. सुरुची - अस्सल बंगाली जेवण. भद्रलोक स्पेशल. अगदी आलू पोश्तो, डीमेर डालमा, भेटकी माछेर झोल आणि अर्थातच हिल्सा.
२. निझाम - काठी रोल, मुर्शिदाबाद बिर्याणी. काठी रोल हा अंमली पदार्थ आहे असं माझं मत आहे.
३. चायनाटाऊन - चायनाटाऊनमधल्या कुठल्याही चायनीज रेस्टॉरंटमध्ये भारतातील सर्वोत्तम चायनीज मिळतं असं माझं तरी जवळपास प्रत्येक राज्यात चायनीज खाऊन झालेलं मत आहे. आणि हो, हे भारतीय जिभेला आवडेल. इथले बहुसंख्य चिनी कँटनीज आहेत. त्यामुळे ते मजबूत मसालेदार जेवतात.
४. काॅफी हाऊस @ काॅलेज रोड - काॅलेज रोडवरची काॅफी हाऊसेस म्हणजे अड्डा जमवण्याची ठिकाणं. जरी नाव काॅफी हाऊस असलं तरी मला इथला चहा जास्त आ डला आणि अर्थातच सिंगाडा - म्हणजे सामोसा.
५. पुचका आणि झालमुरी - पाणीपुरी आणि सुकी भेळ. साॅल्ट लेक सिटी भागात जे ठेले लागतात तिथे झालमुरी छान मिळते. पुचका मात्र एखाद्या व्यवस्थित ठिकाणी खा असं सुचवेन कारण कलकत्त्यात पाणी कसं असेल त्याबद्दल काही सांगू शकत नाही.
६. कालू का ढाबा - आता असेल की नाही माहित नाही, पण लोअर सर्क्युलर रोडवर अाॅटोमोबाईल असोसिएशन आॅफ इंडिया च्या क्लबशेजारी होता - एकदम दुल्हेराजा स्टाईल. क्लबमधले सूट-बूटवाले तिथेच जेवायचे. मटन तडका आणि डीमेर चाॅप हे इथले फ्लॅगशिप आयटेम्स. इथेच लिट्टी - चोखा प्रकारही भारी मिळतो.
पहिल्यांदा कलकत्त्याला जाणाऱ्यासाठी ही आवश्यक खाद्ययात्रा आहे. एक काॅफी हाऊस सोडलं तर बाकी सगळी संध्याकाळी जायची ठिकाणं आहेत.
कोलकाता साडी बघताना पुठ्ठ्यावर /मागे भिवंडी किंवा सुरतच्या गिरणीचा पत्ता असू शकतो. रोशगुल्ले आणि तमाम नासक्या दुधाच्या "मिठाया" एक मोठे फ्रॅाड आहे. रस्त्याच्या कडेला टपरीवरचा कडक भडक चा पीत रिकामटेकड्या गप्पा हाणणे म्हणजे कोलकाता.
प्रतिक्रिया
22 Nov 2016 - 3:16 pm | साधा मुलगा
व्हिक्टोरिया म्युझियम , सायन्स सिटी, ईडन गार्डन , बेल्लूर मठ आदी गोष्टी बघण्यासारख्या आहेत, पार्क स्ट्रीट ,मैदान आदी परिसर भटकण्यास चांगला आहे, रसगुल्ला आणि फिश खाणे आवश्यक आहे. गडीया हात येथे साड्या चांगल्या मिळतात असे ऐकतो . बाकी नंतर लिहितो, मोबाईल वरून लिहीत आहे.
22 Nov 2016 - 4:31 pm | अल्पिनिस्ते
सायन्स सिटी एका दिवसात बघुन होत नाहि असे ऐकले आहे... इतके बघण्यासारखे आहे का ते ?
22 Nov 2016 - 5:08 pm | आदूबाळ
दादा: कलकत्ता, लंडन, मुंबई यासारखी शहरं टिक द बॉक्स पद्धतीने बघण्यात मजा नसते. तुमची आवडनिवड काय आहे यावर सगळं अवलंबून आहे.
मी आजपर्यंत दहाएक वेळा तरी कलकत्त्याला गेलो असेन. अजून ते 'बघून झालं' असं वाटत नाही. "मराठा डिच"चे अवशेष, रोनाल्ड रॉसने मलेरियावर संशोधन केलं ती जागा, डायमंड हार्बर असं बरंच अजून राहिलं आहे.
22 Nov 2016 - 5:34 pm | कैलासवासी सोन्याबापु
एल्गिन रोड (तत्कालीन) वर सुभाषबाबूंच्या घरात आता एक संग्रहालय स्थापन केले आहे म्हणे?? आबा एनी इनपुट?
22 Nov 2016 - 5:40 pm | आदूबाळ
और एक चौका! विशलिस्ट अपडेटेड.
23 Nov 2016 - 11:20 am | अल्पिनिस्ते
पध्दतीने बघायचे नाहिच आहे. पण वेळ कमी असल्याने जे पुर्ण बघता येइल तेच बघायचे असे ठरवले आहे मग भलेही एकच ठिकाण बघुन झाले तरि चालेल.. ट्राम आणि मेट्रो मधुन पण प्रवास करायचा आहे.. बघु कसे जमतय..
22 Nov 2016 - 5:23 pm | मोदक
आर्सेनल नामक एका ठिकाणी चिकन चॉप आणि चिकन बिर्याणी खाल्लेली आठवत आहे.
बाकी कोलकाता एक बकाल शहर आहे असे वैयक्तीक मत. त्यामुळे उकाडा आणि दमट हवा सहन करण्याच्या तयारीने जा आणि भरपूर मिष्टी दही, रसगुल्ले, रसमलाई हादडा..!!!
(कलकत्त्याला गेल्यावर आपल्या देशाने "एकच वेळ" स्वीकारण्याचे धोरण बदलले पाहिजे असे आवर्जून वाटले होते.)
22 Nov 2016 - 5:47 pm | आदूबाळ
अरे तू अमिताव घोषची पुस्तकं वाचली आहेस का? नसल्यास त्वरित वाचणे.
23 Nov 2016 - 1:00 am | निओ१
बाकी कोलकाता एक बकाल शहर आहे असे वैयक्तीक मत.
अगदी. हेच मत १५ वर्शापुर्वी होते व २०१५ च्या भेटीनंतर देखील हेच मत आहे. फारफार तर गुलमोहरच्या पलिकडील भाग आता जरा बदलला आहे एवढेच नवे आहे.
22 Nov 2016 - 5:39 pm | कैलासवासी सोन्याबापु
जुन्या पुस्तकांची, इंग्रजी साहित्याची आवड असल्यास कॉलेज स्ट्रीटला चक्कर मस्ट(च) आहे.
22 Nov 2016 - 5:50 pm | पाटीलभाऊ
दीदीला भेटा...आणि जरा चार शब्द समजावून या.
22 Nov 2016 - 5:51 pm | वरुण मोहिते
किलोवर पण पुस्तक मिळतात . बाकी २ दिवसात पाहायचं शहर नक्कीच नाही ते . प्रमुख गोष्टी पहा आणि परत कधीतरी निवांत जा . आणि हो चांगले फिश खाण्यास विसरू नका .
22 Nov 2016 - 6:32 pm | मोदक
दुकानाचा पत्ता द्या प्लीज.. आणि क्रिकेटची जुनी पुस्तके मिळतात का..?
22 Nov 2016 - 7:10 pm | वरुण मोहिते
क्रिकेट वर च माहित नाही किती पुस्तक आहेत ते .
22 Nov 2016 - 8:50 pm | पुंबा
वाखुसा.. जानेवारीत जात आहे.. इथल्या सल्ल्यांवरच भिस्त आहे.
22 Nov 2016 - 9:20 pm | कैलासवासी सोन्याबापु
कलकत्त्याची बातच न्यारी, इथल्या हवेत ज्ञान आहे, कला आहे, विज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, फुटबॉल आहे, राजकारण आहे, मिष्टीचा गोड़ सुवास आहे, इलिश भापांचा सुगंध आहे, चायना टाउन आहे, गडिया हाट आहे, हावडा ब्रिज आहे , विद्यासागर सेतू आहे, आमच्या लाडक्या ब्योमकेशचे घर आहे कलकत्ता! साहित्य आकाशात उडणारे मोठे मोठे तारे ग्राहगोल आहेत, कलकत्ता पूर्ण पॅकेज आहे! बस इथल्या हवेचा गंध घेण्याइतके नाक तल्लख हवे
22 Nov 2016 - 10:06 pm | मोदक
लिहा की राव यावर मग... आमच्यासारखे पामर जीव मैदान आणि जवळचे बकाल खाद्य पदार्थाचे स्टॉल बघून मॅकडी मध्ये जेवण करतात. :(
तुम्ही लिहा.. मग त्या लेखाच्या रेफरन्सने परत कोलकाता ट्रीप आखता येईल.
22 Nov 2016 - 10:07 pm | कैलासवासी सोन्याबापु
सर मथ्थे दे बिरादर, सर मथ्थे दे _/\_
22 Nov 2016 - 10:25 pm | खेडूत
सगळ्यांनी सांगितलंच आहे...व्हिक्टोरिया म्युझियम कांही प्रमाणात पहाता येईल. पण या फेरीत पुढे काय पहायचे आढावा तर घ्या.
केसी दास आणि अन्य स्थानिक खाऊगल्ल्या पालथ्या घाला. मिष्टी दोही चुकवू नये. मासे कुठे मिळतील याची नीट चौकशी करावी. हल्ली मोठ्ठ्या संख्येने आलेली बिहारी मंडळी आहेत- चुकीची माहिती बिंधास्त पुरवतात!
साड्या वगैरे घ्यायला आदी ढाकेश्वरी नामक दूरच्या दुकानात गेलेलो. २५० वर्षे जुने आहे म्हणे दुकान. पण चांगले होते.
22 Nov 2016 - 11:57 pm | बोका-ए-आझम
१. सुरुची - अस्सल बंगाली जेवण. भद्रलोक स्पेशल. अगदी आलू पोश्तो, डीमेर डालमा, भेटकी माछेर झोल आणि अर्थातच हिल्सा.
२. निझाम - काठी रोल, मुर्शिदाबाद बिर्याणी. काठी रोल हा अंमली पदार्थ आहे असं माझं मत आहे.
३. चायनाटाऊन - चायनाटाऊनमधल्या कुठल्याही चायनीज रेस्टॉरंटमध्ये भारतातील सर्वोत्तम चायनीज मिळतं असं माझं तरी जवळपास प्रत्येक राज्यात चायनीज खाऊन झालेलं मत आहे. आणि हो, हे भारतीय जिभेला आवडेल. इथले बहुसंख्य चिनी कँटनीज आहेत. त्यामुळे ते मजबूत मसालेदार जेवतात.
४. काॅफी हाऊस @ काॅलेज रोड - काॅलेज रोडवरची काॅफी हाऊसेस म्हणजे अड्डा जमवण्याची ठिकाणं. जरी नाव काॅफी हाऊस असलं तरी मला इथला चहा जास्त आ डला आणि अर्थातच सिंगाडा - म्हणजे सामोसा.
५. पुचका आणि झालमुरी - पाणीपुरी आणि सुकी भेळ. साॅल्ट लेक सिटी भागात जे ठेले लागतात तिथे झालमुरी छान मिळते. पुचका मात्र एखाद्या व्यवस्थित ठिकाणी खा असं सुचवेन कारण कलकत्त्यात पाणी कसं असेल त्याबद्दल काही सांगू शकत नाही.
६. कालू का ढाबा - आता असेल की नाही माहित नाही, पण लोअर सर्क्युलर रोडवर अाॅटोमोबाईल असोसिएशन आॅफ इंडिया च्या क्लबशेजारी होता - एकदम दुल्हेराजा स्टाईल. क्लबमधले सूट-बूटवाले तिथेच जेवायचे. मटन तडका आणि डीमेर चाॅप हे इथले फ्लॅगशिप आयटेम्स. इथेच लिट्टी - चोखा प्रकारही भारी मिळतो.
पहिल्यांदा कलकत्त्याला जाणाऱ्यासाठी ही आवश्यक खाद्ययात्रा आहे. एक काॅफी हाऊस सोडलं तर बाकी सगळी संध्याकाळी जायची ठिकाणं आहेत.
23 Nov 2016 - 12:45 am | कंजूस