गोष्ट तशी छोटी - म्हणजे काय रे भाऊ?

स्रुजा's picture
स्रुजा in जनातलं, मनातलं
11 Nov 2016 - 3:59 am

आवाहन

नमस्कार मंडळी,

दिवाळीच्या मुहुर्तावर आपण नवीन उपक्रमाची आणि आपल्या युट्युब चॅनल ची घोषणा आवाहनाच्या धाग्यात वाचलीच आहे. मिपा दशकपूर्ती निमित्त होणार्‍या उपक्रमांच्या मांदियाळीत हा शुभारंभाचा उपक्रम असणार आहे.

इथे या उपक्र्माच्या स्वरुपाची आणि लेखांच्या विषयाची चर्चा करुयात.

सर्वप्रथम, उपक्रमाची थीमः कुठल्याही पडद्यावर किंवा रंगमंचावर दृकश्राव्य माध्यमातुन (ऑडिओ व्हिजुअलस) नाट्यरुपात साकार होणारी कथा !

दृकश्राव्य माध्यमः

नाटक, सिनेमा, टिव्ही सिरियल्स, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरिज, लोककला, नृत्यनाटिका, पथनाटिका, संगीतनाटिका, पपटेस / कठपुतली इ.

जिथे जिथे कथा सादर होताना कुठल्याही स्वरुपाचा पडदा ( आभासी किंवा प्रत्यक्ष) वापरला जातो त्या माध्यमाबद्दल किंवा त्या माध्यमाच्या एखाद्या कळीच्या मुद्द्याबद्दल (जसं नाटकांमध्ये नेपथ्य किंवा सिनेमांत छायाचित्रण, ऑपेरा मध्ये अजुन काही ) आपल्याला लेखमाला करायची आहे.

मग तुम्ही म्हणाल लेखमालाच करायची तर युट्युब चॅनल कशाला लाँच केलं?

तर याचं उत्तर सरळ आहे. उपक्रम ऑडिओ व्हिजुअल्स माध्यमाला समर्पित आहे. म्हणुन लेखमालेचं पुढचं पाऊल म्हणजे ते माध्यम आपल्या उपक्रमात सुद्धा वापरणं.

म्हणुनच हा उपक्रम "मिसळपाव संस्थळ" (लेखमाला) आणि "मिसळपाव युट्युब चॅनल" (व्हिडिओ) ह्या दोन्ही ठिकाणी होईल.

आता, एकुणच या थीम मध्ये येणारे विषय काय असु शकतात ते बघु . विषयांची यादी ही उदाहरणार्थ आहे, या व्यतिरिक्त ही विषय तुम्ही घेऊ शकता, फक्त मला आणि पिराला सांगा म्हणजे आम्ही रिपीटेशन कडे लक्ष ठेवु.

विषय निवडताना निकष एकचः लेख हा कथेला पडद्यावर साकार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पडद्यामागच्या पैलुंवर असावा. कथा ही देखील एक रॉ घटकच आहे.. तिच्यावर संस्कार होऊनच मग तिचं नाट्यरुपांतर आपल्या समोर येतं, त्यामुळे एखाद्या अप्रतिम सिनेमाच्या कथेवर कुणाला भाष्य करायचं असेल तर त्याचंही वावडं नाही.

विभागवार विषयः

१. नाट्य / सिनेक्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती
२. पडद्यामागचे सुत्रधार - नेपथ्य, रंगभुषा, वेषभुषा इ. क्षेत्रांबद्दल माहिती
३. विविध कलाकृतींमध्ये (नाटक/सिनेमा/टिव्ही..) ह्या शिलेदारांचे योगदान
४. विविध भाषांमधील "ऑल टाईम क्लासिक्स"
५. विविध संस्कृतीमधील कथा सांगण्याच्या पारंपारिक कला - कठपुतली, दशावतार इ.
६. नृत्यनाटिका - कथकली, बॅले
७. संगीत नाटक /म्युझिकल्स / ऑपरा
८. जाहिरात
९. संस्था - प्रभात, पृथ्वी थिएटर्स इ.
१०. भाषा
११. विविध देशांमधील नाट्यसंस्कृती
१२. अ‍ॅनिमेशन फिल्म्स
१३. अर्थकारण
१४. कार्टुन्स
१५. दर्जेदार आणि सशक्त कथांच्या सिनेमा - नाटकं - नाट्यछटा - मालिका - वेब सिरिज - ऑपेरा - ब्रॉडवे ई. ची ओळख / भाष्य / परिक्षण वगैरे.
१६. पुस्तकांवर आधारीत कलाकृती
१७. विविध देशांमधील पारंपारिक कलाप्रकार (जसे थायलंड मधील, किंवा जपानमधील , किंवा ऑपेरा, किंवा समृद्ध ईंग्लिश आणि फ्रेन्च थिएटर)
१८. मेकप कलाकार (आठवा पा किंवा बालगंधर्व किंवा द क्युरिअस केस ऑफ बेन्जामिन बटन)

चला तर मग, आजच आपले विषय नोंदवुयात.

आणि हो , आम्हाला धमाला सरप्राईज आहे लक्षात. येऊच ब्रेक के बाद.. यावेळेस छोटासाच ब्रेक ! :)

मौजमजा

प्रतिक्रिया

विषय उत्तम आहे. बराच व्यापक आहे.

पिलीयन रायडर's picture

11 Nov 2016 - 5:25 am | पिलीयन रायडर

हो, विषय थोडा वेगळा आहे खरा!

"रुपेरी पडदा" हा विषय आम्हाला घ्यायचा होता. पण रंगमंचावर जादुच्या प्रयोगांपासुन ते तमाशाच्या फडापर्यंत सगळं काही चालु असतं. आम्हाला "आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग" मध्ये काम करायचे होते. म्हणुन कथेला मध्यवर्ती ठेवुन हा उपक्रम बांधला आहे.

पण सोप्प्या शब्दात सांगायचं तर नाटक, सिनेमा, टिव्ही सारख्या आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटकांविषयीची ही लेखमाला आहे!

विषयांची यादी बघुन मिपाकरांना आता अजुन जास्त क्लॅरिटी मिळाली असेल.

तुमच्याही डोक्यातल्या विषयांची ह्या यादीत भर घालावी ही विनंती!

वाचतिये. मोठी उडी मारलियेत तुम्ही! अभिनंदन.

पिलीयन रायडर's picture

11 Nov 2016 - 5:26 am | पिलीयन रायडर

तुमच्याच जीवावर मारली आहे.. लेख द्या!

महासंग्राम's picture

11 Nov 2016 - 9:34 am | महासंग्राम

सुंदर उपक्रम, नक्कीच प्रयत्न करण्यात येईल...

सामान्य वाचक's picture

11 Nov 2016 - 10:41 am | सामान्य वाचक

उपक्रमा साठी शुभेछ्या
जमेल तशी मदत करीन

जव्हेरगंज's picture

14 Nov 2016 - 10:28 pm | जव्हेरगंज

धमाल उपक्रम!!

आऊट बॉक्स थिंकींगला भरपूर वाव आहे असे दिसतेय!

नक्कीच ट्राय करणार..!

टवाळ कार्टा's picture

15 Nov 2016 - 1:51 pm | टवाळ कार्टा

जमल्यास मी पण एखादा धमाका करेन म्हणतो ;)

पिलीयन रायडर's picture

15 Nov 2016 - 6:53 pm | पिलीयन रायडर

किती पैसा पैसा कराल!!! जरा लेख लिहायचं पहा लोकहो!!

नाटक, टिव्ही, सिनेमा सारखा सोप्पा विषय आहे.

बरं, एक मुलाखत घ्यायची असेल तर पुण्यात कुणी मिपाकर मदत करु शकेल का? नाटकांची आवड असणारा व्यक्ति असल्यास उत्तम!

महासंग्राम's picture

16 Nov 2016 - 3:48 pm | महासंग्राम

बरं, एक मुलाखत घ्यायची असेल तर पुण्यात कुणी मिपाकर मदत करु शकेल का? नाटकांची आवड असणारा व्यक्ति असल्यास उत्तम!

नक्कीच आवाज द्या मदत करायला तयार आहे.

ज्जे बात ! व्यनितुन बोलूयात. दोन लीड्स आहेत. फॉलो थ्रु करायला तुमचं नाव धरतोय :)

पिलीयन रायडर's picture

18 Nov 2016 - 11:41 pm | पिलीयन रायडर

धन्यवाद! व्यनि केलाय!

अरे काय.... आक्ख्या पुण्यातुन एकच माणुस????

ते पुणं तिकडं रंगकर्मींनी भरुन वहातय.. इकडे आम्ही अमेरिकेत अडकलोय.. आणि मिपावर पुण्यातली माणसं सापडेनात.. असं कसं चालावं??

पद्मावति's picture

15 Nov 2016 - 7:01 pm | पद्मावति

खूप छान उपक्रम. विषय नोंदवला आहे.

दोन वर्षांपुर्वी पक्षांचे आवाज हा ओडियो असलेला लेख दिला होता.त्यामध्ये फक्त शेअरिंग साइटच्या लिंक्स होत्या पण प्लेअर नव्हते. त्यानंतर कुणी ओडिओचा प्रयोग केला नाही. गुल्या महिन्याभराततही दोन ओडिओ प्लेअर खरडफळ्यावर दिलेले होते. पण तिकडे कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं.तीन वर्षांपुर्वी मायबोलीचा दिवाळी अंकही ओडिओत होता. आता दोन वर्षं अंकच नाही.
ज्यांना हे माध्यम जमलं आहे त्यांनी असले ओडिओ/व्हिडिओ लेख दुण्याचा सपाटा लावायला हवा. त्यासाठी दूर अजिंठा वेरूळ लेणीच गाठली पाहिजे असे नाही. पाककृतींचे सादरी करण अथवा ओडिओ द्या. वाद्या वाजवणार्यांनी ओडिओ देण्यास सुरुवात करावी.

jp_pankaj's picture

19 Nov 2016 - 8:48 pm | jp_pankaj

आमच्याकडे दत्तजयंतीला नाटक बसविले जाते.70 वर्षापेक्षा अधिकची परंपरा आहे.मोठा event असतो.
जर मला याविषयी काहि सांगायचय तर पडद्यावरच नाटक दाखवायच का पडद्यामागच्या घडमोडी.??

स्रुजा's picture

19 Nov 2016 - 9:00 pm | स्रुजा

दोन्ही चालतील जेपी भाऊ . नक्की द्या लेख, तुमचा सत्कार आम्ही करु ;)

jp_pankaj's picture

19 Nov 2016 - 9:10 pm | jp_pankaj

आता जे काय सांगायचय ते व्हिडीयो डाक्युमेंट्री स्वरुपात की फोटो स्लाईड शो स्वरुपात.?
वेळेची मर्यादा??
नाटक 3 ते 4 तासाचे असते.
तालमी तर आता 8 दिवसात सुरु होतील.

पिलीयन रायडर's picture

19 Nov 2016 - 10:12 pm | पिलीयन रायडर

व्यनि करतोय!

१)संपर्काचा धागा कोणता? हा अथवा व...व व्हिडिओचा?
२)सदस्य लेख प्रकाशित करताना स्वत:च करू शकतात तसे व्हिडिओ मिपा युट्युबवर करू शकणार का?
३)मी दोन व्हिडिओ ( बदलापूर धबधबा,धरण प्रत्येकी ३ एमबीचे ) खरडफळ्यावर टाकलेत चार दिवसांपूर्वी. त्याला कोणी आवडती कॅामेंटरी टाकून मिपा युट्युबवर टाका.

पिलीयन रायडर's picture

22 Nov 2016 - 8:20 am | पिलीयन रायडर

१. कोणताही. किंवा आम्हाला व्यनि सुद्धा करु शकता.
२. नाही. आधी आम्हाला द्यावे लागतील. आम्ही ते युट्युबवर टाकु.
३. नक्कीच प्रयत्न करु. तुम्हाला जी माहिती द्यायची असेल ती लिहुन कळवा. तुम्हीच ऑडिओ रेकॉर्ड करुन पाठवलात तरी चालेल. शक्य असल्यास व्हिडिओ misalpav.channel@gmail.com ला पाठवा.

सध्या उपक्रमाच्या कामात व्यस्त असल्याने तातडीने हे करणे शक्य नाही. त्यासाठी अ‍ॅडव्हान्समध्येच सॉरी म्हणते.

कंजूस's picture

22 Nov 2016 - 8:50 am | कंजूस

ओके.
युट्युबचे एक वाइट म्हणजे उदा. गोष्ट तशी छोटी व्हिडिओ पाहिला तेव्हा अर्ध्या स्क्रीनवर खाली सर्व लैंगिक व्हिडिओ दिसू लागले. त्यापेक्षा मी माझ्या लेखामध्येच व्हिडिओ प्लेअर टाकेन. फक्त तोच व्हिडिओ दिसेल. संपादन वापरून बदलेन/काढून टाकेन अथवा संस्थळाला तो धागा डिलिटही करता येईल.
३) ते दोन्ही व्हिडिओ योग्य ओडिओसह माझ्या बदलापूर धाग्यात टाकणे फार सोपे आहे.

पिलीयन रायडर's picture

22 Nov 2016 - 8:54 am | पिलीयन रायडर

अर्ध्या स्क्रीनवर खाली सर्व लैंगिक व्हिडिओ दिसू लागले.

असा प्रॉब्लेम अजुन कुणाला येत आहे का? कारण मला कधीच आला नाही. माझा चार वर्षाचा मुलगा मोबाईल अथवा लॅपटॉपवरुन स्वतः युट्युब वापरतो. म्हणुन मी कायम लक्ष ठेवुन असते. पण कधीही असं काही दिसलं नाही. मी कोणतीही वेगळी सेटींग ठेवलेली नाही. शक्यतो एक व्हिडिओ पहात असताना, त्याच चॅनलचे पुढचे व्हिडिओ दिसतात.

व्हिडिओ प्लेअर कसा टाकतात धाग्यात? सांगाल का प्लिझ.

काका, माझ्या युट्युब वर हे दिसतं:
a

निनाद's picture

24 Nov 2016 - 6:45 am | निनाद

युट्युबला तळाशी जाऊन सेफ्टी ऑन करा.
म्हणजे अ‍ॅडल्ट कंटेंट येणार नाही. तसेच लहान मुलांसाठीचे युट्युब वापरा.

हो खाली येणारे इतर व्हिडिओ सतत बदलत राहातात. ते कोणतेही असतात.
आपण जेव्हा फोटो दुसय्रा साइट्सवर टाकून इथे इमेज लिंक देतो तेव्हा फक्त तोच फोटो येतो तसं युट्युब व्हिडिओचं होत नाही. आता मी मिक्स केलेला धबधब्याचा प्लेअर देतोय तो पाहा- शेवटी चार जाहिराती येतातच.

नवीन ओडिओ मिक्स केलेला कोंडेश्वर धबधबा व्हिडिओ ट्राइअल. ( फाइल साइज 2 . 3 MB , 24 SEC )

आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो , तेव्हा त्यामधल्या शब्दांचा आढावा गुगल सर्च, युट्युब डेटाबेस घेतो आणि त्याच्याशी संबंधित इतर व्हिडिओ /जाहिराती गुगलकडून दाखवल्या जातात ( त्याचे त्यांना पैसे मिळतात ). हे नवीन नाही.

" सेक्स चॅट विद पप्पु ? " यामधले "सेक्स" आणि "पप्पु" हे दोन शब्द आग्यामोहोळ उठवायला आणि वेचक व्हिडिओजना आमंत्रण देण्यास पुरेसे आहेत इकडे लक्ष द्यावे ही विनंती.

निनाद's picture

24 Nov 2016 - 6:46 am | निनाद

बरोबर आहे हे ही... अल्गोरिदम ने काम केले आपोआप.

निनाद's picture

24 Nov 2016 - 6:46 am | निनाद

कंटेंट वॉर्निंग आली मला... लॉग इन करा म्हणाले युट्युब.

पिलीयन रायडर's picture

24 Nov 2016 - 7:11 am | पिलीयन रायडर

अजुनही येतेय?? नवा व्हिडिओ टाकलाय खरं तर नाव बदलुन. मिपा चॅनल शोधुन त्यावर आता नवा व्हिडिओ पहता का?

निनाद's picture

24 Nov 2016 - 7:31 am | निनाद

Restricted Mode ऑन असेल तर वॉर्निंग येईलच!

कंजूस's picture

24 Nov 2016 - 11:50 am | कंजूस

यावर हा माझा उपाय पाहा-
कोंडेश्वर धबधब्याचा व्हिडिओ माझ्या फेसबुक वर अपलोड करून

त्याची लिंक ही.. फाइल साइज 1.5 MB.

ब्राउजरमध्ये याचा डाउनलोड पर्याय असतो . UC BROWSER मध्ये आहेच. व्हिडिओ फाइल मेमरी कार्ड/ स्टोरिजमध्ये साठवली जाते. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहता येतील. युट्युबच्या जाहिरातींपासून सुटका होईल.

या फेसबुक लिंकचाच प्लेअर बनवता आला नाही अजून.
( युट्युबवरचे व्हिडिओ डाउनलोड करण्याचे बरेच अॅप्स असले तरी ती डाउनलोड केलेली फाइल फोनच्या मेमरीमध्येच अथवा अॅपमध्ये राहाते. मेमरी कार्डावर घेता येत नाही ही मोठी अडचण आहे. फोन मेमरी कमी पडेल इतर कामासाठी )

पापिलर डिमांडवरुन डेडलाईन १५ पर्यंत पुढे नेत आहोत. लेखकांनी नोंद घ्यावी

( पिराच्या) हुकुमावरुन (गरीब बिचारी) स्रुजा ;)