मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोष्ट तशी छोटी - म्हणजे काय रे भाऊ?

स्रुजा · · जनातलं, मनातलं
आवाहन नमस्कार मंडळी, दिवाळीच्या मुहुर्तावर आपण नवीन उपक्रमाची आणि आपल्या युट्युब चॅनल ची घोषणा आवाहनाच्या धाग्यात वाचलीच आहे. मिपा दशकपूर्ती निमित्त होणार्‍या उपक्रमांच्या मांदियाळीत हा शुभारंभाचा उपक्रम असणार आहे. इथे या उपक्र्माच्या स्वरुपाची आणि लेखांच्या विषयाची चर्चा करुयात. सर्वप्रथम, उपक्रमाची थीमः कुठल्याही पडद्यावर किंवा रंगमंचावर दृकश्राव्य माध्यमातुन (ऑडिओ व्हिजुअलस) नाट्यरुपात साकार होणारी कथा ! दृकश्राव्य माध्यमः नाटक, सिनेमा, टिव्ही सिरियल्स, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरिज, लोककला, नृत्यनाटिका, पथनाटिका, संगीतनाटिका, पपटेस / कठपुतली इ. जिथे जिथे कथा सादर होताना कुठल्याही स्वरुपाचा पडदा ( आभासी किंवा प्रत्यक्ष) वापरला जातो त्या माध्यमाबद्दल किंवा त्या माध्यमाच्या एखाद्या कळीच्या मुद्द्याबद्दल (जसं नाटकांमध्ये नेपथ्य किंवा सिनेमांत छायाचित्रण, ऑपेरा मध्ये अजुन काही ) आपल्याला लेखमाला करायची आहे. मग तुम्ही म्हणाल लेखमालाच करायची तर युट्युब चॅनल कशाला लाँच केलं? तर याचं उत्तर सरळ आहे. उपक्रम ऑडिओ व्हिजुअल्स माध्यमाला समर्पित आहे. म्हणुन लेखमालेचं पुढचं पाऊल म्हणजे ते माध्यम आपल्या उपक्रमात सुद्धा वापरणं. म्हणुनच हा उपक्रम "मिसळपाव संस्थळ" (लेखमाला) आणि "मिसळपाव युट्युब चॅनल" (व्हिडिओ) ह्या दोन्ही ठिकाणी होईल. आता, एकुणच या थीम मध्ये येणारे विषय काय असु शकतात ते बघु . विषयांची यादी ही उदाहरणार्थ आहे, या व्यतिरिक्त ही विषय तुम्ही घेऊ शकता, फक्त मला आणि पिराला सांगा म्हणजे आम्ही रिपीटेशन कडे लक्ष ठेवु. विषय निवडताना निकष एकचः लेख हा कथेला पडद्यावर साकार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पडद्यामागच्या पैलुंवर असावा. कथा ही देखील एक रॉ घटकच आहे.. तिच्यावर संस्कार होऊनच मग तिचं नाट्यरुपांतर आपल्या समोर येतं, त्यामुळे एखाद्या अप्रतिम सिनेमाच्या कथेवर कुणाला भाष्य करायचं असेल तर त्याचंही वावडं नाही. विभागवार विषयः १. नाट्य / सिनेक्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती २. पडद्यामागचे सुत्रधार - नेपथ्य, रंगभुषा, वेषभुषा इ. क्षेत्रांबद्दल माहिती ३. विविध कलाकृतींमध्ये (नाटक/सिनेमा/टिव्ही..) ह्या शिलेदारांचे योगदान ४. विविध भाषांमधील "ऑल टाईम क्लासिक्स" ५. विविध संस्कृतीमधील कथा सांगण्याच्या पारंपारिक कला - कठपुतली, दशावतार इ. ६. नृत्यनाटिका - कथकली, बॅले ७. संगीत नाटक /म्युझिकल्स / ऑपरा ८. जाहिरात ९. संस्था - प्रभात, पृथ्वी थिएटर्स इ. १०. भाषा ११. विविध देशांमधील नाट्यसंस्कृती १२. अ‍ॅनिमेशन फिल्म्स १३. अर्थकारण १४. कार्टुन्स १५. दर्जेदार आणि सशक्त कथांच्या सिनेमा - नाटकं - नाट्यछटा - मालिका - वेब सिरिज - ऑपेरा - ब्रॉडवे ई. ची ओळख / भाष्य / परिक्षण वगैरे. १६. पुस्तकांवर आधारीत कलाकृती १७. विविध देशांमधील पारंपारिक कलाप्रकार (जसे थायलंड मधील, किंवा जपानमधील , किंवा ऑपेरा, किंवा समृद्ध ईंग्लिश आणि फ्रेन्च थिएटर) १८. मेकप कलाकार (आठवा पा किंवा बालगंधर्व किंवा द क्युरिअस केस ऑफ बेन्जामिन बटन) चला तर मग, आजच आपले विषय नोंदवुयात. आणि हो , आम्हाला धमाला सरप्राईज आहे लक्षात. येऊच ब्रेक के बाद.. यावेळेस छोटासाच ब्रेक ! :)

वाचन 7128 प्रतिक्रिया 0