ताज्या घडामोडी - १

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
14 Jul 2016 - 8:26 pm
गाभा: 

मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

5 Aug 2016 - 2:52 pm | श्रीगुरुजी

एखादी घटना घडल्यानंतर दोन गोष्टी घडतात. घडलेली घटना वेगवेगळ्या माध्यमात छापून येते. छापलेल्या बातमीत बातमी लिहिणार्‍याने आपल्या विचारसरणीनुसार मालमसाला टाकलेला असतो.

उदा. ९/११ घडल्यानंतर ती घटना बातमी म्हणून छापून आली व त्याचबरोबर त्या घटनेमागे कोण असावे याचे आकलन विविध माध्यमांनी आपापल्या विचारसरणीनुसार केले होते. काही जणांना त्यात लादेनचा हात दिसला, काही जणांना या घटनेसाठी अमेरिकाच जबाबदार वाटली, काही जणांना स्थानिक लोकांचा हात दिसला, काही जणांना त्यात इस्राएल चा हात दिसला. परंतु घटना घडली हे कोणीच नाकारले नाही वा लपविले नाही.

नित्यानंद जर खरोखरच बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटला असेल तर ही घटना बातमी या स्वरूपात कोठे ना कोठे तरी यायला हवी होती. ही बातमी फक्त सनातन प्रभातच्याच ब्लॉगवर आहे. इतरत्र कोठेही ही बातमी आढळत नाही. इतकी मोठी बातमी यच्चयावत सर्व माध्यमांनी लपवून ठेवली व फक्त सनातन प्रभातकडेच ही बातमी आहे या दाव्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे.

काही महिन्यांपूर्वी कोणीतरी आपल्या प्रतिसादात असे लिहिले होते की दिल्लीतल्या गोयल नावाच्या एका शिवसेनेच्या माणसाने एम एफ हुसेनचे हातपाय तोडण्याची जाहीर धमकी दिली होती. प्रतिसादात बातमीची कोणतीही लिंक दिली नव्हती. अनेकवेळा लिंक मागूनसुद्धा त्यांनी लिंक द्यायची टाळाटाळ केली. गुगलवर वेगवेगळ्या पद्धतीने शोधून सुद्धा या बातमीचा संदर्भ मिळाला नाही. शेवटी त्या सदस्याने गोयलचा उल्लेख असलेली एक लिंक दिली. ते संकेतस्थळ वर्ल्ड सोशालिस्ट फोरम अशा कोणत्यातरी समाजवाद्यांच्या ग्रुपचे होते. समाजवाद्यांचे व सेनेचे हाडवैर सर्वश्रुत आहे. दिल्लीत घडलेल्या या तथाकथित घटनेची ही बातमी फक्त त्यांच्याच संकेतस्थळावर असावी व इतर कोणत्याही माध्यमातून ही बातमी दिसू नये हे आश्चर्यच होते. ती बातमी खोटीच होती.

तसेच नित्यानंदच्या बाबतीतली ही बातमी सुद्धा खोटीच आहे. बातमी खरी असेल तर सनातनच्या ब्लॉगव्यतिरिक्त इतरत्र छापून आलेल्या पेजेसच्या लिंक्स द्या.

सचु कुळकर्णी's picture

5 Aug 2016 - 4:05 am | सचु कुळकर्णी

काहि गोष्टी खरच आकलना पलिकडे (माझ्या) घडतायत खर.
१) गोहत्ये ला कायद्याने बंदि आहे.
ह्याचाच अर्थ ह्यासाठी कायदा अस्तित्वात आहे आणि आपल्याकडे कायदा सुव्यवस्थे साठी जबाबदार असणारी यंत्रणा असताना ह्या सो कॉल्ड गौरक्षानी कायदा हातात का घ्यावा ? त्यांच्याकडे जर ह्या कायद्याच कुठे उलंघन होतय अशी माहिति असेल तर ति त्यांनि पोलिसांना कळवावी. गा.पै. (आ.न.) हे म्हणतायत कि
""राहुल यादवचं वासरू हरवलं होतं. ते अखलकने चोरून कापलं या संशयावरून दोघांची वादावादी झाली. त्यात अखलकने राहुलवर प्राणघातक आक्रमण केलं. म्हणून जमावाने अखलकला जन्नतवासी केलं""
माझ्या मते तरी ह्या मागे काहि तरी वेगळच धुमसत होत जे अजुनही समोर आल नाहिय, तरी पण एका वेळेस गा.पै. ह्यानी दिलेल कारण खर मानल तरी हा मामला राहुल आणि अखलाख ह्या दोघांमधला होता आणि तो कायदेशिर रित्या सुटु शकत होता. पण ह्या जमावाला एका व्यक्ति चे प्राण हिरावुन घेण्याचा अधिकार कोणि दिला?

२)उना गुजरात येथे झालेलि अमानुष मारहाण.
इथे तर गोहत्ये चा प्रश्नच नव्हता. नैसर्गिक रित्या मृत्यु पावलेल्या जनावरांपासुन कातड कमावुन हे लोक गुजराण करतात.

३) उत्तर प्रदेश गँगरेप आणि सुविद्य पुढार्‍यांच्या राजकिय प्रतिक्रिया
''बलात्कार'' हा एकच शब्द किळ्सवाण्या अत्याचाराचि मोठि आणि बोलकी परिभाषा कॅरी करतो. बोलकि ह्यासाठि म्हणालो कि हा शब्द उच्चारताच जे दृष्य डोळ्यासमोर येत त्याने कुठल्याहि संवेदनाक्षम व्यक्तिच्या अंगावर काटा उभा राहिल. इथे एक परिवार जगावे का पुर्ण कुटुंबाने आत्महत्या करावी ह्या विवंचनेत असताना तिन पैसल्ड्याचिहि अक्कल नसलेल्या आझम खान ह्या कॅबिनेट दर्जा च्या मंत्र्याला ह्या मागे राजकिय कारस्थान असल्याचा दृष्टांत झाला. उत्तर प्रदेशात निवडणुका असल्या मुळे सगळ्याच राजकिय पक्षाच्या भांडानी पिडित कुटंबाला भेटायची चढाओढ लावलिय. हरकत नाही त्यांनि जरुर भेटाव पिडित व्यक्ति ला धिर द्यावा पण त्याबरोबरच त्यांना न्याय सुद्धा मिळवुन द्यावा आणि तो हि लवकर. पण नाही हे फक्त भेट द्यायला, न्युज चॅनेल च्या कॅमेरासमोर येवुन आम्हिच कसे धुतल्या तांदळासारखे आहोत हे सांगायलाच येतात नंतर विसरतात. आज किति राजकिय पक्षाच्या नेत्यांना रोहित वेमुला किंवा जंतर-मंतर येथे फाशी घेतलेला (कि गेलेला) शेतकरी आठवत असेल. इथे तर राज्याचे मुख्यमंत्रिच आज बोलले " परिवार को अगर सि.बि.आय. से ईनक्वायरी चाहिये तो मै तय्यार हु" " उन्हे अगर किसि भि प्रकार कि मदत चाहिये तो मै तय्यार हु''
चाहिये तो म्हणजे काय बॉस त्यांचा अधिकार आणि मुख्यमंत्री म्हणुन तुमचे ते कर्तव्य आहे असे नाहि वाटत.

३) महाड पुल दुर्घटना आणि असंवेदनशिल पालकमंत्रि
ईश्वर मृतात्म्यांना शांति देवो......... आणि सत्त्ताधार्‍याना एकमेकावंर कुरघोडी करण्यापेक्षा अशी दुर्दैवि घटना ह्यापुढे कशी टाळता येईल ह्याचि सुबुद्धि देवो... खरेतर हि दुर्दैवि नाहि तर मानविय चुकि मुळे घडलेला अपघात आहे. ह्या पुलाला १०० वर्षे कसे झाले होते, त्यात झाडे उगवुन फटी कशा पडल्या होत्या, त्याला फीट असल्याचे सर्टीफिकेट कसे मिळाले ब्ला ब्ला ब्ला ह्या चर्चा न्युज चॅनेल वर काहि दिवस होतिल आणि नंतर सरकार आणि जनता हे विसरुन जाईल कि महाड सारखे कितितरी पुल आजहि महाराष्ट्रात वापरात आहेत आणि त्यामुळे कितितरी जिव अजुनहि धोक्यात आहेत. त्यातल्या त्यात रायगड चे पालकमंत्रि असलेल्या प्रकाश मेहता हे आज सकाळपर्यंत अनरिचेबल होते, नंतर मुख्यमंत्रि घटनास्थळी पत्रकारांशि बोलत असतांना हे सेल्फि काढ्ण्यात मग्न होते त्यानंर ह्यांचि माजोरडी प्रतिक्रिया बरेच काहि सांगुन गेलि.

४)बुर्‍हान वाणि सारख्या आतंकवाद्याचा खात्मा आणि काश्मिर च्या मुख्यमंत्र्यांचि राजकिय लाचारी
बुर्‍हान वाणि सारख्या खतरनाक आतंकवाद्याचा खात्मा आप्ल्या सुरक्षा बलांनी केला, त्यानंतर पाक समर्थित नंगा नाच तिथल्या काहि तरुणांनि करत पुर्ण राज्याला अजुनहि वेठिस धरले आहे. पण राजकिय नेत्यांनि सैन्याचे मनोधैर्य खच्चि करत पहिले तर म्हटले कि सैन्याने बुर्‍हान वाणि ला जिवंत पकडायचे होते आणि आज तर कहरच केलाय बुर्‍हान वाणि ला मारल्या बद्दल खुद्द मेहबुबा मुफ्ति ह्यानि पोलिसांना म्हटल्य कि त्यानि माफि मागावि.

सचु कुळकर्णी's picture

5 Aug 2016 - 4:24 am | सचु कुळकर्णी

एखाद्या पक्षाचा, नेत्याचा किंवा विचारधारेचा फॉलोअर असणे समजु शकतो पण हे फॉलो करताना इतके थराला जाण कि आपण कशाचे समर्थन करतोय ह्याचे सुद्धा भान न ठेवणे म्हणजे तर मग अंधभक्ति झालि. मग ते झाकिर नाईक असो कि सनातन ह्याचे बोलके उदाहरण म्हणजे वर आलेलि एक अशिच प्रतिक्रिया
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, स्वामी नित्यानंद यांच्यावर टाकलेला बलात्काराचा गुन्हा खोटा असल्याचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे.
गा.पै. ह्या भामट्या स्वामिच्या किति क्लिप दाखवु तुम्हाला ते हि एका फेमस दाक्षिणात्य नटिबरोबर न बघणेबल अवस्थेतल्या ?

मलातरी असे वाटतेय कि पुर्वि राजकिय ध्रुविकरण व्हायचे पण आता त्याचे रुप / जागा सामजिक, जातिय ध्रुविकरणाने घेतलिय आणि ते प्रचंड स्पिड ने एका महाचुंबकिय शक्ति प्रमाणे घडतय.

संदीप डांगे's picture

5 Aug 2016 - 8:07 am | संदीप डांगे

सच्चु भाई, दिल जित्ता तुस्सी, दोन्ही प्रतिसाद आवडेश.

दिगोचि's picture

5 Aug 2016 - 9:27 am | दिगोचि

एके४७ हे विपश्शना करायला गेल्यामुळे सनसनाटी बातम्या ऐकायला मिळत नाहीत. ते असते तर त्यानी आणखी कोण त्यान्ना मारायला टपले आहे ते समजले असते. विपश्शनेमुळे त्याना जास्त ताकद मिळो ही प्रार्थना.

चंपाबाई's picture

5 Aug 2016 - 12:22 pm | चंपाबाई

राष्ट्रभाभी नीता अंबानी ऑलिपिंक समितीच्या सदस्यपदी.

( पिंक पिंक वाचून वाचून ऑलिपिंक असे टाइप झाले)

गामा पैलवान's picture

5 Aug 2016 - 12:55 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

हे खरोखरंच हास्यास्पद आणि म्हणूनच दयनीय आहे. दुसरं कोणी सापडलं नाही का! तुम्हाला (चक्क) अनुमोदन!

आ.न.,
-गा.पै.

सचु कुळकर्णी,

>> गा.पै. ह्या भामट्या स्वामिच्या किति क्लिप दाखवु तुम्हाला ते हि एका फेमस दाक्षिणात्य नटिबरोबर न
>> बघणेबल अवस्थेतल्या ?

त्याची आजिबात गरज नाही. कारणे सांगतो :

१. तुम्ही जी दाखवू पहाताहत ती चलचित्रे खरी कशावरून?

२. जरी खरी म्हणून गृहीत धरली तरी त्यास गुन्हा म्हणंत नाहीत. त्यास सहमतीचा संभोग अशी संज्ञा आहे.

आ.न.,
-गा.पै.

चंपाबाई's picture

6 Aug 2016 - 5:22 pm | चंपाबाई

सहमतीचा संभोग !

वाचून आनंदाने चरमसीमा गाठली !

सचु कुळकर्णी,

>> पण ह्या जमावाला एका व्यक्ति चे प्राण हिरावुन घेण्याचा अधिकार कोणि दिला?

अखलकने राहुलवर प्राणघातक आक्रमण केलं हे विसरलांत तुम्ही. तो राहुल तिथे रुग्णालयात मरायला टेकलाय आणि अखलक कायदा धाब्यावर बसवून राजरोसपणे मोकळा फिरतोय. पोलीस तर दखल घ्यायलाही तयार नाहीत. मग काय करायचं हिंदूंनी? आरत्या ओवाळायच्या अखलकभोवती?

आ.न.,
-गा.पै.

सचु कुळकर्णी's picture

6 Aug 2016 - 3:49 am | सचु कुळकर्णी

गा.पै.
मग काय करायचं हिंदूंनी?
अहो इथे धर्माचा प्रश्न येतोच आहे कुठे ?

असो आय रेस्ट माय केस.

गामा पैलवान's picture

6 Aug 2016 - 10:58 am | गामा पैलवान

सचु कुळकर्णी, बरोबरे तुमचं. ज्याप्रमाणे इथे बीफ्चा संबंध नाही, त्याप्रमाणे इथे धर्माचाही संबंध नाही. वृत्तपत्रे उगीच बोंबलताहेत.
आ.न.,
-गा.पै.

चंपाबाई's picture

6 Aug 2016 - 5:18 pm | चंपाबाई

अखलाक राहूल केसबद्दल कुठेच काही संदर्भ नाहीत. तुम्हाला कसे कळले ? राहुलच्या इंजुरीज , डॉक्टरची साक्ष , एफ आय आर .... कायदेशीर मार्गाने जाणे इतके अवघड होते का ? की जमाव घेउन ते आर्मीचे लोक त्वरीत न्यायनिवाडा करतात , त्याच मार्गाने जायचे होते ?

कपिलमुनी's picture

5 Aug 2016 - 11:09 pm | कपिलमुनी

केजरीवाल सरकारने दिल्ली मधे आमदारांचे पगार वाढवल्यावर रडणारे लोक महाराष्ट्रामधे आमदार , मंत्र्यांचा पगार पेंशंन वाढून सुद्धा मूग गिळून आहेत.
दुटप्पीपणाचा कहर आहे

अमितदादा's picture

5 Aug 2016 - 11:42 pm | अमितदादा

आमदार खासदार यांचे पगार तसेच निवृत्ती वेतन वाढवायची गरजच आहे. त्याना त्यांच्या वर्तमानातील आणि भविष्यातील खर्चाची तरतूद नाही केली तर प्रामाणिक लोक राजकारणात येणार नाहीत आणि आले तर ते प्रामाणिक राहणार नाहीत. त्यात आक्षेप घेण्यासाठी काही नाही.

चंपाबाई's picture

6 Aug 2016 - 7:12 am | चंपाबाई

डॉक्टर सिस्टर यांचे पगार तसेच निवृत्ती वेतन वाढवायची गरजच आहे. त्याना त्यांच्या वर्तमानातील आणि भविष्यातील खर्चाची तरतूद नाही केली तर प्रामाणिक लोक सरकारी वैद्यकीय सेवेत येणार नाहीत आणि आले तर ते प्रामाणिक राहणार नाहीत. त्यात आक्षेप घेण्यासाठी काही नाही

अमितदादा's picture

6 Aug 2016 - 12:19 am | अमितदादा

इंडस (सिंधू ) खोरे पाणी करार संदर्भात चांगले विश्लेषण आजच्या बातमी मध्ये
http://www.thehindu.com/opinion/op-ed/brahma-chellaney-on-indus-treaty-s...
1960 साली झालेल्या करारानुसार भारतातून पाकिस्तान मध्ये वाहणाऱ्या नद्यांपैकी बियास, रवी आणि सतलज ह्या नद्या वरती भारतास कंट्रोल भेटले तर इंडस, चिनाब, झेलम ह्या नद्या वरती पाकिस्तान ला कंट्रोल भेटले. पाकिस्तान ला कंट्रोल भेटलेल्या सगळ्या नद्या ह्या जम्मू आणि काश्मीर मधून वाहतात, त्यामुळे काश्मीर हा जमिनीबरोबर पाण्याचा हि प्रश्न आहे. भारत ह्या नद्यावरती run-of-the-river projects बांधू शकतो आणि ते आपण करत आहोत. पण पाकिस्तान ला सतत भीती आहे की ह्या प्रोजेक्ट च्या साह्याने आपले पाणी अडवू शकतो त्यामुळं सतत भारताच्या प्रोजेक्ट ना पाकिस्तान चा आक्षेप राहिला आहे. आणखी माहिती खालील लिंक वर
http://thediplomat.com/2016/06/kashmir-a-water-war-in-the-making/

गामा पैलवान's picture

6 Aug 2016 - 2:30 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

>> तसेच नित्यानंदच्या बाबतीतली ही बातमी सुद्धा खोटीच आहे.

इथे एक प्रतिज्ञापत्र आहे : http://www.dhyanapeetam.org/news/fbi-academy-infectious-disease-expert-s...

या प्रतिज्ञापत्राच्या आधारे अमेरिकी एफबीआय ने नित्यानंदांवरील आरोप साफ फेटाळून लावले आहेत. उपरोक्त दुवा नित्यानंदांच्या आश्रमाचा आहे.

तुमची सनातन प्रभातशी कसली दुष्मनी आहे ते माहीत नाही. पण ते लोकं मुद्दाम खोट्या बातम्या छापणार नाहीत हे नक्की. वरील बातम्यांना दुजोरा देणारी एक बातमी इथे आहे : http://hinduismnow.org/blog/2016/07/22/false-case-against-nithyanandas-o...

हे सुद्धा हिंदुत्ववादी संकेतस्थळच आहे. हिंदूंच्या निरपराधित्वाच्या बातम्या हिंदुद्वेष्ट्या ठिकाणी शोधणे व्यर्थ आहे हे आपणांस पटेल अशी आशा आहे.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2016 - 8:08 am | श्रीगुरुजी

>>> दुवा नित्यानंदांच्या आश्रमाचा आहे.

>>> हे सुद्धा हिंदुत्ववादी संकेतस्थळच आहे.

या बाबतीत अजून काही बोलण्याची गरज आहे का?

>>> हिंदूंच्या निरपराधित्वाच्या बातम्या हिंदुद्वेष्ट्या ठिकाणी शोधणे व्यर्थ आहे.

असं काही नाही. पणजी स्फोटात मुद्दाम अडकविलेल्या सनातनच्या साधकांची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्याची बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती.

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2016 - 3:08 pm | श्रीगुरुजी

तुमची सनातन प्रभातशी कसली दुष्मनी आहे ते माहीत नाही.

सनातनच्या मूर्खपणाची ४-५ उदाहरणे मी पूर्वीच दिलेली आहेत. सनातन, मंगलोरमधील मुतालिकची संघटना 'श्रीराम सेने' इ. संस्थांचा संघ, भाजप इ. शी अजिबात संबंध नसताना त्यांच्या मूर्खपणाच्या कृत्यामुळे संघ, भाजप इ. बदनाम होत आहेत. सनातन, श्रीराम सेने इ. संस्थांचा उल्लेख सर्रास संघपरिवारातील हिंदुत्ववादी संघटना असा उल्लेख करून हिंदुत्ववादी संघटनांना विनाकारण बदनामी सहन करावी लागत आहे. सनातनमधील वर्तक, पुनाळेकर यांच्या मूर्खपणाच्या कृत्यांमुळे सनाततच्या साधकांवर संशयाचे जाळे निर्माण झाले असून त्यांच्या मागे तपाससंस्थांचा ससेमिरा लागलेला आहे. यांच्या मूर्खपणाचे बळी त्यांचेच साधक होत आहेत हे यांच्या का लक्षात येत नाही हे एक गूढच आहे.

गामा पैलवान's picture

6 Aug 2016 - 10:05 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

>> .... त्यांच्या मूर्खपणाच्या कृत्यामुळे संघ, भाजप इ. बदनाम होत आहेत.

तुम्ही बदनामीला खरोखर एव्हढे घाबरता?

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Sep 2016 - 3:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुमच्यासारखा निर्लज्ज प्रत्येक मनुष्य नसतो, अन तसंही ते फक्त बीजेपी अन संघाचेच पेड कार्यकर्ते आहेत! बाकी लोकांची वकिली करणे त्यांचा कार्यभाग नव्हे =)) =)) =))

गामा पैलवान's picture

4 Sep 2016 - 12:40 am | गामा पैलवान

सोन्याबापु, मी निर्लज्ज असल्याचं तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे! म्हणूनच मी सदा सुखी आहे. धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2016 - 8:10 am | श्रीगुरुजी

>>> तसंही ते फक्त बीजेपी अन संघाचेच पेड कार्यकर्ते आहेत!

अवघड आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 8:30 am | कैलासवासी सोन्याबापु

चेष्टा हो गुर्जी थोडीशी ! सॉरी जर भावना दुखावल्या असतील तर :)

जयन्त बा शिम्पि's picture

6 Aug 2016 - 3:31 am | जयन्त बा शिम्पि

सध्या अमेरिकेत प्रेसिडेंट निवड प्रक्रिया जोरात सुरु आहे, त्या संदर्भात जाणकारांनी ह्या साईट्वर भेट देण्यास हरकत नाही.

http://www.upvibes.com/22-trump-scandals-you-wont-believe/24

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

6 Aug 2016 - 3:03 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

गुखामंत्र्यांवर कारवाई झालीज पाहिजे.

आज मोदींनी समाजकंटक गोरक्शकांवर सडकून टिका केली. म्हटले ८०% गोरक्शक रात्री समाज विघातक क्रूत्य करतात व दिवसा गोरक्शकाचा मुखवटा घालतात.

राजेश घासकडवी's picture

7 Aug 2016 - 4:43 am | राजेश घासकडवी

हेच लिहायला आलो होतो. निवडणुकांच्या निमित्ताने का होईना, पण या तथाकथित गोरक्षकांच्या मोकाट सुटलेल्या टोळ्यांना आवरण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मोदींचं अभिनंदन. त्यांनी योग्य पाऊल उचललेलं आहे.

चंपाबाई's picture

7 Aug 2016 - 6:19 am | चंपाबाई

हा मोदींचाही मुखवटाच वाटतो.

मी मारल्याचं नाटक करतो. तू रडल्याचं नाटक कर.

चंपाबाई's picture

7 Aug 2016 - 10:18 am | चंपाबाई

मिड डे मील प्रोग्रॅममध्ये इस्कॉनकडुन प्रचंड भ्रष्टाचार .

सहा कोटीच्या अन्नासाठी २३ कोटी घेतले. शिवाय याच कामासाठी त्यानी अतिरिक्त देणग्याही घेतल्या.

http://www.loksatta.com/mumbai-news/mid-day-meal-food-samples-fail-1280429/

अरेरे ! कृष्णाचं नाव घेउन लहान मुलाम्चं अन्न पळवलं

श्रीगुरुजी's picture

7 Aug 2016 - 1:01 pm | श्रीगुरुजी

राष्ट्रगीत म्हणणे धर्मविरोधी आहे.

http://m.indiatoday.in/story/principal-teachers-quite-after-denied-permi...

या विरोधामुळे पुरस्कार-वापसी गँगच्या हातात आयतंच कोलीत मिळालंय. आता या विरोधाच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणा-यांची रीघ लागेल.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

7 Aug 2016 - 1:54 pm | ईश्वरसर्वसाक्षी

गुरुजी राष्ट्र्गिताच कुठे गेउन बसलायत, आता मदरस्यां मधुन मिड डे मील वापस पाठवल जातय कारण कि ते हिंदु आचार्‍याने बनवलय.
ह्यांच्या धर्मांधतेपायी लहान मुल बिचारी उपाशीच राहतात.

चंपाबाई's picture

7 Aug 2016 - 2:20 pm | चंपाबाई

मदरशांचे सोडा.

दलितानी मिड डे मिलचे अन्न शिजवले म्हणुन उच्चवर्णीय मुलानी / पालकानी ते नाकारले , असेही होत आहे.

http://www.ucanews.com/news/caste-discrimination-mars-midday-meal-scheme...

चंपाबाई's picture

7 Aug 2016 - 7:29 pm | चंपाबाई

v

मितभाषी's picture

7 Aug 2016 - 9:16 pm | मितभाषी

मोबाईल फोन की रेडिएशन के नकारत्मक प्रभाव से बचने के लिए संघ विचारक ने अनौखा तर्क दिया है । मोबाईल रेसिएशन से बचने के लिए संघ विचारक शंकर लाल अपने मोबाईल फोन पर गाय का ताज़ा गोबर लगाते हैं । उन्होंने कहा कि गाय हमारी माता है। इसका गोबर और मूत्र अमृत के समान है और इससे सभी बीमारियों से बचा जा सकता है।

अंग्रेजी अख़बार इंडियन एक्सप्रेस की खबर के मुताबिक, शंकर लाल ने कहा कि यह ताजा गोबर है। फोन से निकलने वाली नुकसानदायक रेडिएशन से खुद को बचाने के लिए वह इसका प्रयोग करते हैं। उन्होंने कहा कि गाय हमारी माता है। इसका गोबर और मूत्र अमृत के समान है और इससे सभी बीमारियों से बचा जा सकता है।
उन्होंने कहा कि पेंडुलम आरएसएस कार्यकर्ता के हाथ पर रखने से वह हिलने लगता है। वह दिखाता है कि आदमी के शरीर में कितनी उर्जा है, जिससे पेंडुलम हिल रहा है। जब ये आदमी अपने हाथ में फोन ले लेगा तो पेंडुलम हिलना बंद हो जाएगा क्योंकि फोन की हानिकारक तरंगों शरीर की ऊर्जा सोख लेती हैं। अब इसके हाथ में गोबर लगा फोन दीजिए और फिर से उसके हाथ के ऊपर पेंडुलम ले जाइए। देखा, ये फिर से हिलने लगा। इसकी ऊर्जा बच गई।

उन्होंने कहा कि गाय के गोबर से कैंसर ठीक हो सकता है तो यह माइक्रोवेव से क्यों नहीं बचा सकता। गुजरात के जूनागढ़ के वैज्ञानिकों को गोमूत्र में सोने के अवशेष मिले हैं। इसी को देखते हुए वह हर हफ्ते ताजा गोबर लगाते हैं। उन्होंने कहा कि उनकी टीम के सभी मेंबर उसमें पुरुष, महिला या बच्चे सभी फोन पर गोबर लगाते हैं।

चंपाबाई's picture

8 Aug 2016 - 8:15 am | चंपाबाई

दलिताना ' शूट ' करु नका, मला करा ...

मोदी पत्रकाराना बोलले !

......

देशाचे तुकडे झाले तर माझ्या शरीराचे आधी तुकडे होतील.

गांधीजीच्या त्या वाक्याला हिंदुत्वे आजही फिदीफिदी हसतात.

आता मोदीही तसेच बोलले.... दलिताना मारण्याआधी मला मारा.

अस्सल ते अस्सल. कॉपी ते कॉपी

गामा पैलवान's picture

8 Aug 2016 - 11:28 pm | गामा पैलवान

काहीही हं चंपाबाई. गांधींनी दिलेलं ते वचन होतं, तर मोदींनी केलेलं ते आवाहन आहे. वडाची साल पिंपळाला लावण्यात तुम्ही एकदम तरबेज!
आ.न.,
-गा.पै.

बोलबोलेरो's picture

8 Aug 2016 - 10:02 am | बोलबोलेरो

Prime Minister Narendra Modi spoke at length about anti-social elements donning the role of "gau rakshaks" during the day and committing crimes at night

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी असामाजिक तत्वांबद्दल सखोल भाष्य करताना असे समाजकंटक रात्री गुन्हे करून, दिवसा 'गौरक्षक' म्हणून वावरत असल्याचे प्रतिपादन केले.

सचु कुळकर्णी's picture

8 Aug 2016 - 6:28 pm | सचु कुळकर्णी

बलोचिस्तान - क्वेट्टा येथे इस्पितळात शक्तिशालि आत्मघाति बॉम्बस्फोट ६५ ठार १५० जखमि.

सचु कुळकर्णी's picture

8 Aug 2016 - 6:35 pm | सचु कुळकर्णी

काश्मिर च्या मुख्यमंत्रिण बाई दिल्लित गृहमंत्र्यांच्या भेटिस आल्या होत्या. प्रसारमाध्यमांशि बोलतांना त्यांचा एकुण सुर असा जाणवला कि गेला एक महिना काश्मिर मध्ये जो तणाव आहे तो सुरक्षा बलांमुळे निर्माण झाला आहे. "यंहा के प्रधानमंत्रि वंहा के प्रधान मंत्रि से बात करे तो " असच काहि तरि बोललि बाई "यंहा के प्रधानमंत्रि " बोललि हे कनफर्म. म्हणजे हे आजहि भारताच्या पंतप्र्धानाना आपला पंतप्रधान मानत नाहित. बाई आणखि असे बोललि कि भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या मध्ये काश्मिर चिरडला जातोय, जबकि काश्मिर खुद एक मुल्क बन सकत है.

चंपाबाई's picture

8 Aug 2016 - 7:22 pm | चंपाबाई

काश्मिरच्या राजालाही स्वतंत्रच रहायचं होतं

सुबोध खरे's picture

9 Aug 2016 - 10:45 am | सुबोध खरे

हो ना
"पाकी" घुसल्यावर हवा टाईट झाली आणि भारताकडे शरण आला. उद्या काश्मीर स्वतंत्र केले तर याचीच पुनरावृत्ती होईल यात शंका नाही.
राहिली गोष्ट काश्मीर तीन भागात आहे जम्मू काश्मीर आणि लडाख. यात काश्मीर खोरे फक्त अशांत आहे.

बोलबोलेरो's picture

10 Aug 2016 - 10:12 am | बोलबोलेरो

+1

विप्लव's picture

9 Aug 2016 - 9:25 am | विप्लव

कोल्हपूर तावडे हॉटेल

श्रीगुरुजी's picture

9 Aug 2016 - 2:10 pm | श्रीगुरुजी

पुन्हा एकदा सुषमा स्वराज

http://m.rediff.com/news/report/your-wife-will-be-there-sushmas-vow-to-m...

चंपाबाई's picture

12 Aug 2016 - 7:45 am | चंपाबाई

Union sports minister Vijay Goel, who is currently in Rio de Janeiro to cheer for the Indian contingent, found himself in the midst of a controversy on Thursday after Rio Olympic organisers threatened to cancel his accreditation if unaccredited people accompanying him do not end their "aggressive and rude" behaviour.

We have had multiple reports of your Minister for Sports trying to enter accredited areas at venues with unaccredited individuals. When the staff try to explain that this is not allowed, they report that the people with the Minister have become aggressive and rude and sometimes push past our staff," Sarah Peterson, who is Continental Manager for Rio 2016 Organising Committee, said in a letter to Indian Chef-de-Mission Rakesh Gupta.

"As you can understand, this type of behaviour is not acceptable. Despite previous warnings, it would seem that even today the same incident occurred at the Rio Olympic Arena (Gymnastics venue) and Carioca Arena 3," she added. Peterson said the Minister's accreditation could be cancelled because of this.

बोलबोलेरो's picture

12 Aug 2016 - 9:17 am | बोलबोलेरो

http://timesofindia.indiatimes.com/india/Shah-Rukh-Khan-detained-at-Los-...

Shah Rukh Khan was detained at Los Angeles airport
To be detained at US immigration every damn time 'really really sucks', he tweeted
The actor was detained in 2009 and 2012 by US immigration officials

गामा पैलवान's picture

12 Aug 2016 - 8:08 pm | गामा पैलवान

धन्यवाद चंपाबाई. विजय गोयल घुसू पहात होते तसाच आजून एक प्रकार उघडकीस आला आहे. जॉन आंझरा हा प्रशिक्षक असूनही खेळाडूच्या नवी घुसू पहात होता. एव्हढंच नव्हे तर आंझराने मूत्राचा नमुनाही दिला.
बातमी इथे आहे : http://www.bbc.co.uk/sport/olympics/37053928

विजय गोयल काय किंवा जॉन आंझरा काय अनधिकृत घुसखोर क्रीडानगरीत कशाला घुसू पाहताहेत? काहीतरी झोल करायचा बेत दिसतो आहे.

आ.न.,
-गा.पै.

देव मासा's picture

14 Aug 2016 - 1:08 am | देव मासा

३०० प्रतिसाद झाले हो ... पार्ट टु युउ द्या आता

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 9:14 am | संदीप डांगे

विकासरराव, खरेसाहेब आणि गुरुजी,

नाशिक मध्ये रविवार कारंजा चौकात एक धान्य व किराण्याचे, पांडुरंग पवार यांचे, फेमस आणि जुने मोठे दुकान आहे, तर दोन आजूबाजूला लागून त्यांची रिटेल व होलसेल अशी दुकाने आहेत, दोन्हि मध्ये एकच कॉमन भिंत आहे.

होलसेल च्या दुकानात तूरडाळ 130 रुपये किलो, आणि रिटेल मध्ये 180 रुपये किलो विकली जात होती, ह्या फारकाबद्दल त्याला विचारले असता रिटेल आणि होलसेल मद्धे एवढा फरक आहेच असे तो म्हणाला, गेले एक वर्ष सुमारे असेच दर होते,

आता मला सान्गा हा पन्नास रुपयांचा फरक तुम्ही कसा justify करणार?

कोणाला ह्याबद्दल काहीही शंका असेल तर दुकानाचा नंबर जालावर सापडेल, कॉल करून खात्री केली तरी चालेल,

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Sep 2016 - 1:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

चतुर व्यापारी हो चतुर व्यापारी डांगे!! तुम्हाला सांगतो ह्या व्यापाऱ्यांच्या चतुरपणाची दाद देण्यातच खरी देशभक्ती असते, किंबहुना तूर शेतात वगैरे लावतच नसतात, ती डायरेक गोदामात पैदा होते अन ज्याचे गोदाम तोच ठरवतो मार्केट मध्ये किती आणायची ते =)) =)) असो! तुम्ही देशद्रोही आहात त्यामुळे तुम्ही तितकेच बघणार जितके तुम्हाला बघायचे आहे!

अनुप ढेरे's picture

1 Sep 2016 - 1:39 pm | अनुप ढेरे

होलसेल दुकान आणि रिटेल दुकान यामध्ये काय फरक असतो?

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2016 - 2:24 pm | श्रीगुरुजी

घाऊक आणि ठोक भावात एवढा मोठा फरक आश्चर्यजनक आहे. इतका मोठा फरक जस्टिफाय करणे शक्य नाही. हा फरक नाशकातल्या सर्व दुकानात होता का फक्त याच दुकानात किंवा काही ठराविक दुकानात होता? निदान पुण्यात तरी एवढा फरक माझ्या पाहण्यात नाही.

चंपाबाई's picture

1 Sep 2016 - 10:53 pm | चंपाबाई

पंतप्रधान बोलले ... डाळ आयात करणार ... नुसती बातमी आली अन डाळ घसरली !

पंतप्र बोलले की लगेच तासाभरात डाळ परदेशातून आली का ? मग किंमत का ढासळली ?

हेच काँग्रेसने केले असते तर डाळीसाठी चलन वाया घालवले म्हणुन बोंब उठली असती

अनुप ढेरे's picture

1 Sep 2016 - 2:58 pm | अनुप ढेरे

किती फरक असायला हवा तुमच्या मते?

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 3:38 pm | संदीप डांगे

मला नाही माहीत.

मुद्दा एवढाच आहे की हा पन्नास रुपयांचा फरक खूप जास्त आहे. माझ्यामते साधारण पंधरा टक्के ही जास्तीत जास्त मार्जिन असते. जसं जसे मॅन्युफॅक्चरच्या दिशेला जाऊ तसे तसे मार्जिन कमी होत जाते कारण वॉल्युम मोठा होत जात असतो.

शेतकर्‍याकडून तूरडाळ कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त ६० पर्यंत विकत घेतल्या गेली. प्रोसेसींग करुन ही डाळ अंतिम उपभोक्त्याला ८० ते १०० पर्यंत मिळायला हवी होती. पण डाळींचे भाव एका रात्रीत ८० वरुन १२० वर उडाले (माझ्यासमोर एका लोकल किराणा स्टोअरमधलं लेबर झपाट्याने डाळीच्या पॅकेट्सवरचे किंमतीचे ८० रुपयाचे जुने लेबल उखडून नवीन १२० रुपयाचे लेबल चिकटवत होते.) आणि नंतर १९०-२२० पर्यंत हेलकावत राहिले. सरळ हिशोबाने ह्यात १०० टक्के नफा पूर्ण एक ते दिड वर्षासाठी ओरबाडून खाल्ल्या गेला आहे.

काही माहिती ह्या दुव्यावरही मिळेलः http://www.thehindu.com/news/cities/mumbai/news/why-pulses-rates-skyrock...

बाकी डाळीच्या शेतीबद्दल आणि नफ्यातोट्याबद्दल बापूसाहेबांनी आधीच विवेचन केलं आहे. मला वाटतं ह्या डाळ-घोटाळ्याबद्दल एक वेगळा लेख असला पाहिजे.

सोबतचः गुरुजी एके ठिकाणी वर म्हणत आहेत की सरकारने काही केलं तरी लोक ओरडतातच. तर गुरुजी, लोक ओरडणारच. साप गेल्यावर काठी आपटणार्‍याचे कौतुक तुम्हाला असू शकतं, मला नाही. लुटीला लूटच म्हणणार, सरकार कोणाचेही असले तरी.

लुटीला लूटच म्हणणार, सरकार कोणाचेही असले तरी.

कौतुकास्पद आहे हे.

गुरूजी... शिका काहीतरी. ;)

अनुप ढेरे's picture

1 Sep 2016 - 3:56 pm | अनुप ढेरे

केवळ तुमच्या मते याला काही किंमत नाही. उद्या कोनी म्हणेल १५% मार्जिन ही लूट आहे. ५ % रग्गड आहे. किती मार्जिन हवं हे कसं ठरवणार?

शेतकर्‍याकडून तूरडाळ कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त ६० पर्यंत विकत घेतल्या गेली. ८०-१०० प्रोसेसींग करुन ही डाळ अंतिम उपभोक्त्याला ८० ते १०० पर्यंत मिळायला हवी होती.

८०-१०० यातल्या आकड्यांपर्यंत कसे पोचलात हे जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे नक्की काय काय अ‍ॅड केलं की १०० हा आकडा येतो.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 4:00 pm | संदीप डांगे

किती मार्जिन हवं हे कसं ठरवणार?

मार्जिन कसं ठरवतात ते तुम्ही सांगा. मलाही कळेल.

८०-१०० यातल्या आकड्यांपर्यंत कसे पोचलात हे जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे नक्की काय काय अ‍ॅड केलं की १०० हा आकडा येतो.

सांगतो सावकाश.

अनुप ढेरे's picture

1 Sep 2016 - 4:12 pm | अनुप ढेरे

मार्जिन कसं ठरवतात ते तुम्ही सांगा. मलाही कळेल.

मलाही नाही माहिती. तुम्हीच ठाम म्हणालात १५% हवं म्हणून विचारलं की कसं ठरवलं १५.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 4:20 pm | संदीप डांगे

मी म्हणालो >> माझ्यामते साधारण पंधरा टक्के ही जास्तीत जास्त मार्जिन असते. 'हवं' असे म्हणालो नाही.

"There is a huge margin of 30-40 per cent between retail and wholesale prices, which is quite unreasonable, so consumers go to wholesale markets," said KC Bhartiya, director at India Pulses & Grain Association. "The trend is there across the country from Delhi to Mumbai, but I don't see an exponential growth."

http://economictimes.indiatimes.com/news/economy/agriculture/surge-in-pu...

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Sep 2016 - 4:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

मार्जिन कसे ठरवायचे,

तर प्रथम हे म्हणावे वाटते की मार्जिन हे व्यापारी ठरवू शकतात का? मला वाटते नाही, फ्री मार्केट मॉडेल आपण अंगिकारले की ग्राहक हाच राजा होतो, त्याला सेवा/माल जर किमान किमतीत हवाय अन तसे पर्याय उपलब्ध आहेत तर तो तेच निवडणार आहे हे स्पष्ट आहे. ग्राहक फायदा बघणार असेल तर मार्जिन शून्य टक्के असावे इतके किमान म्हणायचा हक्क राखून ठेवतो, अर्थात त्याला अर्थ नसतो पण फॅक्ट इज ग्राहक किमान दर कमाल क्वालिटी शोधणारच, व्यापाऱ्याने जर त्याची खाली जायची लिमिट ठरवली तर ती ग्राहक हिताची कशी आहे हेच तो सांगू शकतो, इथेच मार्केटिंगची कला येते. ही लिमिट म्हणजे त्याची कमाई अधिक थोडे खेळते भाग भांडवल जनरेट करणे अन विक्री विपणन वाहतूक वीज वगैरे धरून त्याने calculate करायची असते, थोडक्यात cusotmer is the king, and in such senario trader has to be a reasonable illusionist.

असे काहीसे मला म्हणायचे आहे, अर्थात अर्थशास्त्रात गती नसल्याने मला माझे म्हणणे नीट शब्दात मांडता येत नाहीये अन त्याचा अनर्थच निघायची शक्यता आहे तरी थोडे समजून अन सांभाळून घ्या ही विनंती

मृत्युन्जय's picture

2 Sep 2016 - 1:31 pm | मृत्युन्जय

बाप्पु प्रतिसाद्द थोडा विस्कळीत झाला आहे. आपल्याला काय म्हणायचे आहे ते नीट समजत नाही आहे. आणि तुम्ही जे म्हणत आहात असे मला वाटते तसेच जर असेल तर प्रतिसाद खुपच अतार्किक होतो आहे. जरा परत नीट सम्जावुन सांगाल काय?

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 4:02 pm | संदीप डांगे

केवळ तुमच्या मते याला काही किंमत नाही.

नसेना का. काय फरक पडतो?

विकास's picture

2 Sep 2016 - 2:44 am | विकास

अम्रिकेत कधीकाळी भारतीयांबद्दल भलत्याच कल्पना असायच्या... आत्ता देखील तसे असणारे असतील महाभाग, पण आता कमी झालं आहे... म्हणजे एखाद्या सर्वसाधारण अनिभाला कळायचेच नाही की, हे कुठल्या भारतीयांवरून भारताची परीक्षा करत आहेत? मग लक्षात येयचे एखादा कुठेतरी महाभाग भेटलेला असतो जो भारतीय म्हणून नाही तर निव्वळ आचरट म्हणून तो तसा वागत असतो... तसे इतर देशीय, वंशीय पण असतात पण भारतीय पक्षी: (सामान्य) परदेशस्थांना सगळेच हिंदू वाटतात त्यांच्याबद्दल कल्पना करताना एखादा नमुना पुरेसा होयचा....

त्याला मग आम्ही नाव दिलं - One point extrapolation. अर्थात एकच बिंदू आलेखाच्या कागदावर आहे. मग त्यातून हवी तशी लाईन, कर्व, अगदी त्यातून वाटोळे पण (पक्षी: सर्कल!) करता येते...

तसेच इथे काहीसे होत आहे का?

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 9:19 am | संदीप डांगे

हा दुवा कदाचित आपण वाचलेला नाही. वर इंग्रजीतला परिच्छेदही.

http://economictimes.indiatimes.com/news/economy/agriculture/surge-in-pu...

http://www.thehindu.com/news/cities/mumbai/news/why-pulses-rates-skyrock...

बाकी बघा कसं ते?

(काही लोक हजारो किमी तिकडे अमेरिकेत बसून निव्वळ माध्यमांतल्या स्वतःला हव्या त्या बातम्यांवर विसंबून, जमीनी सत्याच्या चिखलात रुतलेल्याच्या प्रत्यक्ष अनुभवाला 'चल रे, काहीही काय बोलतो, असं कुठं असतं का?' असं म्हणून उडवून लावतात. तसेच इथे काहीसे होत आहे का?)

सुबोध खरे's picture

2 Sep 2016 - 12:07 pm | सुबोध खरे

विकासरराव, खरेसाहेब आणि गुरुजी,
हा एक विपणनाचा डावपेच (marketing strategy) आहे. घाऊक प्रमाणावर घेतली तर १३० किरकोळ घेतली तर १८० रुपये.
घाऊक भाव हा कमीत कमी दहा किलोला म्हणजे माणूस विचार काय करतो? ५०० रुपये वाचतात नाही तरी डाळ आपल्याला लागणार आहेच त्यातून नंतर भाव वाढला तर?
म्हणजे १० किलो डाळ एका फटक्यात खपली.
शिवाय किरकोळीत घेणारा माणूस म्हणतो जाऊ दे महाग आहे तर अर्धाच किलो घ्या.
पण हिशेब डोक्यात पक्का कि आपले २५ रुपये बुडाले. मग जेंव्हा हातात पैसे येतात तेंव्हा दहा किलो घेऊन टाका. पंचवीस रुपयाचा तोटा ५०० रुपये फायद्यात वळता झाला.
अशा वीस किरकोळ घेणाऱ्या लोकांना पिशव्या बांधून देण्यापेक्षा सौ सुनार कि एक लुहार कि. हा हिशेब आहे.
५० % सूट म्हणून जाहिरात करणाऱ्या कंपन्या आपले कपडे ५० % सूट म्हणून देत नाहीत तर एकावर एक फुकट म्हणून आपला मागच्या वर्षीचा न खपलेला माल तुम्हाला खपवतात तसेच आहे. एकच हवा असले तर ३० % सूट मिळते. पॅन्टलून , सॅन फ्रिस्को, पीटर इंग्लंड इ कंपन्यांचे पावसाळ्यात सेल असेच असतात.

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 12:21 pm | संदीप डांगे

खरेसाहेब, विषय भलतीकडेच का फिरवताय? लग्जरी कपड्यांचे सेल आणि जीवनावश्यक वस्तूंची अनावश्यक भाववाढ एकाच तराजूत ठेवताय हे फारच चमत्कारिक बुवा...

बाकी खालच्या परिच्छेदावर काय मत आपले? बहुतेक आपण सोयिस्कर टाळलेले दिसते.
"There is a huge margin of 30-40 per cent between retail and wholesale prices, which is quite unreasonable, so consumers go to wholesale markets," said KC Bhartiya, director at India Pulses & Grain Association. "The trend is there across the country from Delhi to Mumbai.....

तुमचेच वाक्य आहे ते 'पीपल सी हौ दे वॉन्ट टू सी' असलंच काहीतरी. तुम्ही वरचा प्रतिसाद लिहून अगदी सिद्ध केलेत. धन्यवाद!

बाकी ते मार्केटींग स्ट्रॅटेजीचं विवेचन माझ्यासारख्या रातदिन मार्केटींग स्ट्रॅटेजीमधे खितपत पडलेल्या माणसासाठी अगदी अगदी नवीन आहे हो! त्याबद्दलही अनेक धन्यवाद! ;)

प्रदीप's picture

2 Sep 2016 - 12:44 pm | प्रदीप

ह्या किरकोळ व घाऊक भावांच्या फरकांच्या बाबतीत सरकारने काय केले पाहिजे अशी अपेक्षा आहे?

आपले ह्या उपधाग्याच्या बाबतीतले म्हणणे नक्की काय आहे, हे मला समजले नसण्याची शक्यता आहेच, तर ते तसे सांगावे. मग माझा प्रश्न अगदी गैर आहे, असे म्हणता येईल. धन्यवाद.

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 1:24 pm | संदीप डांगे

मी मागच्या दोन वर्षापासून डाळीसंबंधींच्या घडामोडींवर जवळून लक्ष ठेवून आहे. खरंतर हा विषय एका स्वतंत्र व मोठ्या धाग्याचा आहे. पण त्यासाठी अनेक दुवे, विश्लेषणं, घटनाक्रम सांगावे लागतील. थोड्क्यात सांगतो. सरकारने कराव्यात अशा अनेक गोष्टी होत्या, असतात ज्या सरकार नेहमीच करतं. केंद्रसरकार आणि महाराष्ट्र सरकारने त्यातल्या एकदोन करण्याचा प्रयत्न केला एकतर त्या करायची वेळ चुकीची होती, म्हणजे जेव्हा करायचे त्याच्या 'नंतर' केल्या अन्यथा उफराट्या होत्या जसे की जप्त केलेल्या डाळीचा साठा काळाबाजारवाल्यांनाच परत विकायला दिला गेला.

इथे दोनच गोष्टी प्रामुख्याने करण्यासारख्या होत्या. एक म्हणजे साठेबाजीवर कठोर नियंत्रण व दुसरे सरकारी धान्यसाठ्यांचे मॅनेजमेंट. २०१२ साली उत्पादनात फक्त १२ टक्के घट झाली म्हणून किंमती जर १०० ते १५० टक्के वाढणार असतील तर ह्यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे हे समजायला फार 'चतुर' असायचीही गरज नाही. बरं डाळीच्या अर्थकारणानुसार ही भाववाढीची शक्यता २०१२-१३ मध्येच व्यक्त झाली होती. अनेक देशांमध्येही डाळीचे उत्पादन खालावले होते. तरी पुरेसा वेळ मिळूनही सरकारने ह्यावर काहीच हालचाल केली नाही, जी काही केली ती २०१५च्या ऑक्टोबरमधे. पुढे परदेशातून अतिरिक्त आयात वगैरेच्या घोषणा झाल्या. ज्याच्या 'आज आत्ता ताबडतोब' काहीही उपयोग नाही. सरकारच्या सर्व हालचाली ह्या व्यापार्‍यांनी मलिदा घशात घालून घेऊन व्यवस्थित पचवल्यावर झालेल्या आहेत. ब्लॅकमार्केटर्सवर सरकार कार्यवाहीही करतं वरुन अर्थमंत्री त्यांना क्लिनचीटही देतात.

सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना आत डाळ १०३ रुपये किलो दराने विकायचे आदेश दिले गेले आहेत. ही डाळ निकृष्ट दर्जाची आहे तसेच ही डाळ घेण्यास नकार देणार्‍या स्वस्तधान्यदुकानदारांना इतर माल घेण्यास मनाई करण्यात यावी असेही आदेश दिले गेले आहेत. म्हणजे ही निकृष्ट दर्जाची डाळ गोरगरिबांनी सक्तीने विकत घ्यावी अशी जबरदस्ती दुकानदारांनाही करावी लागणार आहे. अशा अनेक गमती-जमती होत आहेत.

(इथे मिसळपाववर लिहिणे कधी कधी सांप्रत सरकारच्या विरुद्ध असेल तर त्याचे स्वागत होत नाही असा अनुभव आहे. ते सत्य असेल तरी ते सत्यच नाही असाही सूर अनेकदा दिसला आहे. त्यामुळे मेहनत घेउन सत्य मांडले आणि त्याची हेटाळणी झाली तर योग्य वाटत नाही. त्यामुळे असा स्वतंत्र लेख लिहिण्याची मनःस्थिती आत्तातरी नाही. जमले तर लिहिनच.)

सुबोध खरे's picture

2 Sep 2016 - 1:05 pm | सुबोध खरे

There is a huge margin of 30-40 per cent between retail and wholesale prices, which is quite unreasonable, so consumers go to wholesale markets,
हे काय सिद्ध करतं ?
बाकी तुम्ही मार्केटिंग मध्येच असून तुम्हाला हे अगदी नवीन आहे हे आश्चर्यच आहे.

सुबोध खरे's picture

2 Sep 2016 - 1:11 pm | सुबोध खरे

खरेसाहेब, विषय भलतीकडेच का फिरवताय? लग्जरी कपड्यांचे सेल आणि जीवनावश्यक वस्तूंची अनावश्यक भाववाढ एकाच तराजूत ठेवताय हे फारच चमत्कारिक बुवा...
काळा चष्मा घातला कि असं होतं. मी कपड्याचं उदाहरण मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून दिलं. तुम्ही त्याचा जीवनावश्यक वस्तूंशी संबंध कसा चिकटवला. हे म्हणजे फाटे फोडण्यासाठी केलेली मुद्दाम दिशाभूल केल्यासारखे वाटते आहे

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 2:54 pm | संदीप डांगे

There is a huge margin of 30-40 per cent between retail and wholesale prices, which is quite unreasonable, so consumers go to wholesale markets,
हे काय सिद्ध करतं ?

>> तुम्ही सांगा, मला तर काही कळतंच नै.

बाकी तुम्ही मार्केटिंग मध्येच असून तुम्हाला हे अगदी नवीन आहे हे आश्चर्यच आहे.

>> ते उपरोधिक आहे हे तुम्हाला समजू नये हे जास्त आश्चर्यजनक आहे.

मी कपड्याचं उदाहरण मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून दिलं. तुम्ही त्याचा जीवनावश्यक वस्तूंशी संबंध कसा चिकटवला. हे म्हणजे फाटे फोडण्यासाठी केलेली मुद्दाम दिशाभूल केल्यासारखे वाटते आहे

तुमचं उदाहरण अस्थानी आहे हे तुम्हाला समजत नाही यात माझा दोष नाही. इथे डाळ ह्या जीवनाश्यक वस्तूबद्दल चर्चा सूरु असतांना त्याचे तुम्हीच दिलेल्या उदाहरणाशी संबंध जोडला तर फाटे फोडणे कसे होते ही एक शंका. खरेतर तुम्ही लग्जरी वस्तुंचे उदाहरण देणे हे फाटे फोडण्यासारखे आहे.

जीवनावश्यक वस्तूंमधे लग्जरी वस्तूंसारखी मार्केटींग स्ट्रॅटेजी नसते. तोच दोघांमधला बेसिक फरक असतो. आता जरा सविस्तर लिहितो, तुमचे बरेच गैरसमज दूर होतील अशी आशा आहे.

जीवनावश्यक वस्तू ह्या विकत घेणार्‍याची गरज असते तर लग्जरी-तत्सम वस्तू ही विकणार्‍याची गरज असते हा अगदी बेसिक फरक. दूध ही जीवनावश्यक वस्तू, कॉम्प्लॅन किंवा बॉर्नविटा ही लग्जरी. कॉम्प्लॅन-बॉर्नविटावर तुम्हाला सूट, ऑफर, २०% ज्यादा, इ. दिसतील. पण दूधवाला भैया किंवा कोणतीही दूध कंपनी कधीही सूट वा अतिरिक्त दूध देतांना दिसत नाही. सणांच्या वेळेला तर खाजगी विक्रेत्यांच्या दूधाच्या भावात वाढच होते. (आता ही भाववाढ कशी मान्य होते असं तुम्ही विचाराल? तर सणांच्या वेळेस दूध जीवनावश्यक मधून लग्जरीमधे बदललं जातं, उपभोक्त्यांकडून. त्यांना खीर, खवा, पेढे असे लग्जरी जिन्नस हवे असतात म्हणून)

कपडे बनवणार्‍या अनेक कंपन्या असतात, अनेक प्रकारचे, दर्जाचे आणि किंमतीचे कपडे मिळतात. कपड्यांच्या ब्रॅण्डनुसार ग्राहकांची पैसे देण्याची मानसिकता बनते. ज्याला जे परवडतं त्यानुसार ग्राहक खरेदी करतात. कपड्यांना सिजननुसार विक्रीवर परिणाम भोगावा लागतो. म्हणजे सिजन नसेल तर लोक कपडे घेत नसतात. ती त्यांची गरज नसते. त्यामुळे लोकांना खरेदीस उत्सुक करण्यासाठी किंमती कमी वा एकावर एक फ्री चे आमिष दाखवणे विक्रेत्याची गरज असते. दुसरे असे की कपड्यांचे अर्थकारण हे डाळीच्या अर्थकारणापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. उत्पादन खर्चाच्या ४०० ते १००० टक्के इतके व असे काहीही अंतिम मुल्य लग्जरी गुड्समधे असते-असू शकते. शिवाय त्याचेही योग्य असे कारण आहेच. कारण बनवलेल्या शंभर शर्टांपैकी पन्नास विकल्या जातात, कारण उपभोक्त्याला गरज नसते, तेव्हा विकल्या गेल्या पन्नास शर्टांतून त्याला शंभरचा उत्पादन खर्च + मार्केटींग + आपला नफा काढायचा असतो. त्यामुळे अशा अव्वाच्या सव्वा किंमती असतात, व त्यामुळेच त्यांना एकावर एक शर्ट देणे परवडते. त्याचे कारण त्यांनी आधीच तो खर्च वसूल केलेला असतो. स्टॉक क्लिअरन्स हा अशा न विकलेल्या कपड्यांनी अडवलेली जागा मोकळी करण्यासाठी असतो. त्याचसाठी असे सेल हे स्लॅक-सिजनमध्येच जास्त दिसतात.

तुम्ही सांगितलेले मार्केटींग स्ट्रॅटेजीचे उदाहरण कपड्यांसाठी फिट बसते, डाळींसाठी नाही फिट बसत.

ठोक व चिल्लर मधे फरक हा वॉल्युमचाच असतो. सगळ्या जीवनावश्यक वस्तु ह्या संपतातच, त्यांना कायम मागणी असते. उपभोक्त्यांची ती गरज असते. विक्रेत्यांच्या हातात बाजाराची नस असते. सामान्य जनतेचे म्हणजेच ग्राहकाचे जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारावर नियंत्रण नसते. त्यामुळेच सरकार तिथे काम करत असते. विक्रेत्यांच्या अनिर्बंधतेला आळा घालणारी अजून एक व्यवस्था काम करत असते ती म्हणजे निसर्ग. हा कधी जास्त दान टाकतो कधी कमी. जास्त दान टाकले की विक्रेत्यावर किंमती कमी करायचे बंधन येते कारण माल सडण्याआधी संपवावा अशी त्याची गरज निर्माण होते. त्याचा फायदा धोक्यात येऊ नये म्हणून तो उत्पादकांवर किंमती कमी करण्यासाठी दबाव आणतो, इथे सरकार आधारभूत किंमतीची काठी उगारुन उत्पादकास दिलासा देतं. त्याच वेळी निसर्गाचे दान कमी झाले तर विक्रेता साठेबाजी करतो, भाव कृत्रिमरित्या वाढवतो, बाजारात वस्तू दुर्मिळ करतो, लोक जास्त किंमत द्यायला तयार होतात, कारण त्यांना गरज असतेच. इथे जनतेचा रोष वाढू नये म्हणून सरकार वेगवेगळ्या हालचाली करुन विक्रेत्यांच्या मनमानीला आळा घालते.

ठोक व्यापार्‍याला दोन ट्रक माल विकायला जेवढे कष्ट पडतात तेवढेच कष्ट दोन पोती धान्य विकणार्‍या कोपर्‍यावरच्या दुकानदाराला पडतात. त्यामुळे दोघांची मार्जिन त्या प्रमाणात असते. त्यात मार्केंटींग चा खर्च नसतो. कोणत्याही धान्यव्यापार्‍याला जाहिराती-मार्केटींग करायची गरज नसते. त्याला आपलाच माल कसा उत्तम अशी सांगायची आवश्यकता नसते. फक्त आपला अपेक्षित नफा सांभाळून भाव नीट द्यायचा असतो. मार्केटफोर्सेस नुसार भाव मागेपुढे होतात. आता इथे तुम्ही 'मार्केट फोर्स' हा शब्द पकडाल. तर भारतात मोठ्या व्यापार्‍यांचे कार्टेल आहे. सगळे मिळून भाव ठरवतात. मार्केटफोर्सला प्रभावित करण्याची क्षमता ह्यांच्याकडे आहे. एका विशिष्ट जातीच्या लोकांच्या हातात हे सर्व व्यवहार बहुतांश प्रमाणात आहेत. काहीही झाले तरी ते मार्केट तोडत नाहीत. सर्व काही सुरळीत असते तेव्हा ह्या सगळ्याच गोष्टींचा सामान्य ग्राहकाच्या खिशावर परिणाम होत नसतो. पण काही घटना व वृत्ती एकत्र आल्या आणी सरकारने सोयिस्कर लकव्याचे नाटक केले की लूटीचा काळ येतो. ग्राहकांना अव्वाच्यासव्वा किंमत देण्यावाचून गत्यंतर नसतं. हे केंद्रात कोणत्या पक्षाचं सरकार आहे ह्यावर अवलंबून नसतं, सर्वच पक्षांच्या सर्वच सरकारांमधे वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात हे घडत आलेलं आहे.

तुम्ही याला काळा चष्मा घालणे म्हणत असाल तरी चालेल. असा काळा चष्मा मी सरकार कोणाचं आहे हे बघून घालत नाही किंवा काढत नाही.

प्रस्तुत प्रतिसादात काहीही चुकीचे व असत्य असेल तर कृपया कोणीही सांगावे, मी आपली चूक कबूल करायला तयार आहे.

दिगोचि's picture

1 Sep 2016 - 12:54 pm | दिगोचि

अनेक प्रतिसादामधे या व इतर विषयावर सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे असे लिहिलेले वाचले. प्रत्येक वेळी आपण जे सरकार सत्तेत आहे त्यान्च्यावर टीका करतो. सरकार फक्त कायद करते व त्याची अम्मल्बजावणि सरकारी नोकर म्हणजे आपल्यापै़कीच कोणी करते माझ्या मताप्रमणे हे लोक ते काम का करत नाहीत हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल. मिपावर यापैकी लोक असतील्च त्यानी उत्तर द्यावे.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 1:33 pm | संदीप डांगे

सरकार म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधानापासून ग्रामसेवकापर्यंत सर्व लोक. ह्यातल्या कोणा एकावरच बोट ठेवू शकत नाहीत हेच ह्या व्यवस्थेचं सर्वात मोठं बलस्थान आहे.

कामगार नेते शरद राव यांचे दु:खद निधन.

धर्मराजमुटके's picture

1 Sep 2016 - 11:00 pm | धर्मराजमुटके

रावांच्या बातमीबद्द्ल काय लिहावे ते कळेचना. ठाकर्‍यांनंतर मुंबई बंद करु शकत असलेला माणूस म्हणून आश्चर्य व्यक्त करु की मुंबई बंद करत असल्यामुळे जी चिडचीड होत होती ती आता होणार नाही म्हणून आनंद व्यक्त करु ?

असो, हिंदू धर्मात मृत्युनंतर वैर संपते असे म्हणतात त्यामुळे श्रद्धांजली व्यक्त करुन थांबतो.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 11:03 pm | संदीप डांगे

बंद करण्याची क्षमता असल्याबद्दल कौतुक आपल्याकडे फार!

असो!

त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो!

विकास's picture

2 Sep 2016 - 2:55 am | विकास

बंद करण्याची क्षमता असल्याबद्दल कौतुक आपल्याकडे फार! असो!

अगदी सहमत...

तरी देखील आणि विचारभेद असले तरी जेंव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या, स्वतःच्या कुटूंबियांच्या बाहेर जाऊन समाजासाठी काम करते तेंव्हा ते स्पृहणीयच असते... (राव मला वाटते सरतेशेवटी राष्ट्रवादीत होते, पण ) मोदीसरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी डाव्यांकडून जाहीर झालेल्या संपाच्या दिवशीच ट्रेड युनियन मधे अनेक वर्षे नेतृत्व करणार्‍या शरद रावांचे निधन व्हावे हा एक विचित्र योगायोग आहे असेच म्हणावे लागेल...

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभोत.

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 9:29 am | संदीप डांगे

तरी देखील आणि विचारभेद असले तरी जेंव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या, स्वतःच्या कुटूंबियांच्या बाहेर जाऊन समाजासाठी काम करते तेंव्हा ते स्पृहणीयच असते

प्रातःस्मरणीय आणि नित-आचरणीय असेच विधान केले आहे विकासराव आपण. दुर्दैवाने असे होत नाही ह्याचे फार वाईट वाटते, इथेच मिपावर काही राजकिय व्यक्तिंवर अविचारी चिखलफेक होते तेव्हा हे तर प्रकर्षाने जाणवते. सर्वांना समान न्याय असावा असे फार वाटते. :(

इथेच मिपावर काही राजकिय व्यक्तिंवर अविचारी चिखलफेक होते तेव्हा हे तर प्रकर्षाने जाणवते. सर्वांना समान न्याय असावा असे फार वाटते

तुमच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे असे नम्रपणे नमुद करतो.

सर्वांना समान न्याय असावा असे फार वाटते

वाक्य साधे आहे पण आपल्याकडे हे वाक्य कोण बोलतो त्यावरून त्याचा अर्थ बदलतो हो.

संदीप डांगे's picture

3 Sep 2016 - 2:06 pm | संदीप डांगे

सम आर मोअर इक्वल!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2016 - 10:07 am | कैलासवासी सोन्याबापु

सहमत विकासजी, अतिशय चांगला विचार मांडलाय तुम्ही

हेमन्त वाघे's picture

4 Sep 2016 - 1:43 am | हेमन्त वाघे

दु:खद???? कसले दुःख ??

तुम्हाला नेहमीच चांगले रिक्षा / टॅक्सी वाले मिळतात का हो ?
कोठे राहता ??

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2016 - 2:30 pm | श्रीगुरुजी

ताज्या घडामोडींसाठी दुसरा धागा केव्हाच सुरू झालाय. हा धागा वाढविण्यापेक्षा नवीन बातम्या दुसर्‍या धाग्यावर लिहाव्यात.

अनिरुद्ध प्रभू's picture

9 Sep 2016 - 10:04 am | अनिरुद्ध प्रभू

देशात स्वच्छतेच्या बाबतीत सिंधुदुर्ग अव्वल....

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/sindhudurg-cleanest-city/a...