https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8
झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो.
बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत.
खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India)
माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात.
सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे.
https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY
अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल?
एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे.
असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो?
https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU
प्रतिक्रिया
10 Jul 2016 - 11:28 pm | श्रीगुरुजी
फक्त तुम्ही आणि २-४ निधर्मांध म्हणजे सारे जग?
11 Jul 2016 - 12:41 pm | बोका-ए-आझम
आणि ते ट्वीट त्यांना घाबरवण्यासाठी होतं हा निष्कर्ष कशावरून काढलाय तुम्ही? हे म्हणजे दादा कोंडके आणि सेन्सॉर यांच्यातील वादाप्रमाणे आहे. सेन्सॉरवाले म्हणायचे - दादांच्या चित्रपटांमधले संवाद द्वयर्थी असतात. दादा म्हणायचे की तुम्ही नेमका वाईटच अर्थ का घेता? अशातलाच हा प्रकार आहे.
11 Jul 2016 - 3:34 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
सनातनचे वकील पुनाळेकर यांनी सबनीसांबद्दल केलेलं ट्वीट हे धमकीवजा खोडसाळपणाचचं होतं
11 Jul 2016 - 3:52 pm | श्रीगुरुजी
कशावरून?
11 Jul 2016 - 6:55 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
सबनीस सतत मोदीविरोधी बोलत होते ना!!आणि ते डाव्या विचारांचे विद्रोही होते म्हणून,
दाभोलकर जे बोलत होते त्याचे उत्तर टनाटनवाल्यांकडे नव्हते म्हणून त्यांना संपवले,same here
.
.
आता तुम्ही काहीतरी फालतू प्रतिवाद करणार आणि माझं म्हणणं अमान्य करणार,तुम्ही अमान्य केलं तरी सत्य परिस्थिती लपत नाही,लवकरच टनाटनी जेलच्या आत असतील.
11 Jul 2016 - 8:54 pm | श्रीगुरुजी
चूक क्रमांक १) आचरटशिरोमणी सबनीस मोदींविरोधी बोलत नसून असंबद्ध बरळत होते.
चूक क्रमांक २) पात्रता नसताना ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर अनेकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. ते त्यापूर्वी बहुसंख्य महाराष्ट्रीयांना माहितीच नव्हते. कोण सबनीस, काय सबनीस, त्यांची साहित्यसंपदा काय हे कोणालाच माहिती नव्हते. आपल्याला कोणी ओळखतच नाही हे लक्षात आल्यावर सबनीसांनी झटपट प्रसिद्धीसाठी इतर सर्वजण जो शॉर्टकट निवडतात तोच निवडला. तो म्हणजे मोदींना शिव्या देणे. मोदींना शिव्या दिल्या की एका रात्रीत प्रसिद्धी मिळते हे यापूर्वी अनेकांनी अनुभवले आहे (उदा. नेहा धुपिया नावाची विस्मरणात गेलेली नटी).
तुमच्या आकलनातील चूक अशी की आचरटशिरोमणी हे मोदींविरोधी सतत बोलत नसून प्रसिद्ध होण्यासाठी फक्त काही दिवस ते मोदींविरूद्ध असंबद्ध बरळत होते.
म्हणजे नक्की काय होते? आधी भोंदू केजरीवाल, नंतर चारचौघात रस्त्यावर लघुशंका करून देशविरोधी घोषणा देणारा कन्हैया कुमार आणि आता आचरटशिरोमणी सबनीस हेच तुमचे आदर्श दिसताहेत. धन्य आहे!
दाभोलकरांच्या नक्की कोणत्या बोलण्यामुळे त्यांना टनाटनवाल्यांनी संपविले? कोणत्या न्यायालयात हे सिद्ध झाले आहे? गेली जवळपास ३ वर्षे हे खोटे आरोप केले जात आहेत व ३ वर्षात सनातनला अडकविण्यासाठी काहीच पुरावे न मिळाल्याने शेवटी साडविलकरसारख्या खोट्या साक्षीदाराला तयार केले जात आहे.
तुमची हास्यास्पद वाक्ये, तुमची पूर्वग्रहदूषित मते आणि तुमचे विनोदी अंदाज म्हणजे काय ब्रह्मदेवाची वाणी आहे का?
11 Jul 2016 - 9:17 pm | बोका-ए-आझम
म्हणजे इकडे तुम्ही पोलिस, सरकारी वकील आणि न्यायाधीश हे सगळेच एकदम झालात की. आता शिक्षा पण सुनावून टाका.
सनातन ही संघपरिवारातली संस्था आहे का? सगळे डावे जसे सारखे नाहीत तसे सगळे उजवेही सारखे नाहीत. आणि श्रीपाल सबनीस काय करतील अशी टीका मोदींवर शिवसेनेचे संजय राऊत करताहेत. तेही माफी न मागता. सनातनच्या लोकांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही. का म्हणे?
लवकरच टनाटनी जेलच्या आत असतील.
जेलच्या आत म्हणजे आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली असं होत नाही. वाटते तेवढी ही गोष्ट साधीसरळ नाहीये. जर दाभोळकरांच्या हत्येमागे सनातन असेल तर त्या संघटनेवर बंदी घालून तिच्या सदस्यांना गुन्हेगार घोषित करायलाच हवं, पण तसं अजून झालेलं नाही. जे तुरूंगात आहेत ते निर्दोष आहेत असं मी म्हणत नाहीये पण त्यांच्यावरचे आरोप सिद्ध न करता त्यांना सरसकट गुन्हेगार म्हणून जाहीर करणं हे चूक आहे.
11 Jul 2016 - 9:22 pm | श्रीगुरुजी
बोकोबा,
असं वेड्यासारखं नाही हं करायचं. केजरीवाल एखाद्याला भ्रष्टाचारी म्हणाले की तो बाय डिफॉल्ट भ्रष्टाचारी असतोच. त्यासाटी भ्रष्टाचाराचे पुरावे वगैरे फालतू गोष्टींची गरज नसते. तसेच खामुंपाधुं या महात्म्याने सनातननेच खून केले असे म्हटले की ते सनातननेच केलेले असतात. त्यासाठी पुरावे, खुनामागचा हेतू इ. गोष्टींची गरजच नसते.
10 Jul 2016 - 10:28 pm | श्रीगुरुजी
>>> मग तुम्हाला थेट NIA मधून माहिती मिळते का?
अभ्यास वाढवा.
>>> खिक्क,
सबनीसांना आचरट शिरोमणी म्हणताय?
तुमच्या बुद्धीची कीव येत आहे,अहो त्यांनी पत्र लिहून मोदींची माफी मागितली होती.
आधी बरेच काही आचरटासारखे बरळले. नंतर राणा भीमदेवी थाटात गर्जना केली की मला फासावर चढविले तरी माफी मागणार नाही. आणि शेवटी शेपूट घालून निमूटपणे माफी मागितली. तुमच्या दोघांच्याही सुमार बुद्धीची कीव वाटते.
>>> आणि " सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" या व्यक्तव्यात तुम्हाला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही?
नाही.
10 Jul 2016 - 9:09 pm | हुप्प्या
https://www.youtube.com/watch?v=mUOxaNNUZHM
पुन्हा तेच ते संतापजनक उदाहरण! गणिताच्या शिक्षकाकरता मुलाखती होत आहेत. एक सांगतो २+२=३, एक सांगतो २+२=४ आणि अजून एक सांगतो २+२=५ तर कुठला शिक्षक निवडाल?
गणिताच्या शिक्षकाला असले प्रश्न विचारतात का? आणि धर्माच्या बाबतीत ह्या अतिसामान्य समीकरणासारखे अचूक उत्तर काय हे माहित असते का? उदा. मूर्तीपूजा चूक का बरोबर, ईश्वर एक का अनेक, पुनर्जन्म असतो का नसतो, पापपुण्याचा हिशेब मृत्युनंतर होतो का नाही, व्याज लावणे पाप की योग्य? ह्याचे उत्तर इतके सरळ सोपे कसे असेल? आपणच असे जाहिर करायचे की आपलेच उत्तर चोख बाकीच्यांचे चूक हा काय प्रकार आहे?
इथे झकीर नाईकाने स्वतःच्या धर्माचा दुराभिमान दाखवला आहे. एका इमानी कुत्र्याप्रमाणे जो भाकरी खिलवतो त्या धन्याचे पाय चाटणे इथे दिसते. सौदी सरकार जो अफाट पैसा पुरवतो त्याच्या समर्थनार्थ काय वाट्टेल ते बोलणे आणि त्याला विद्वत्तेचा बेगडी मुलामा चढवणे इथे दिसते आहे.
जिथे मुस्लिम अल्पसंख्य आहेत निदान त्या देशात अन्य धर्मांना उघड उघड चूक म्हणणे हे धार्मिक तेढ निर्माण करणारच. तेव्हा ह्या माणसाला उत्तर देणे आवश्यक आहे.
10 Jul 2016 - 11:28 pm | माहितगार
झानाच्या गणिताला भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या ब्लॉगमधून चपखल उत्तर दिले आहे. वर शाम भागवतांनी दुवा दिला आहे.
11 Jul 2016 - 12:52 am | खटपट्या
11 Jul 2016 - 12:52 am | खटपट्या
ही पहा डॉ. झाकीर यांची मुक्ताफळे...
11 Jul 2016 - 2:49 pm | श्रीगुरुजी
झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या वाहिनीवर बांगलादेश बंदी घालणार आहे म्हणे. भारतात सुद्धा त्याच्या वक्तव्यांची चौकशी केली जाणार आहे म्हणे. बांगलात अतिरेकी हल्ला झाल्यावर व अतिरेक्यांनी आपण झाक्याच्या प्रवचनांपासून प्रेरणा घेतली असे सांगितल्यावर माध्यमे जागी झाल्यासारखी दिसताहेत. झाक्या अनेक वर्षे जात्यंध विष ओकतोय. गिरिराज सिंह, आदित्यनाथ यांचे प्रत्येक वाक्य ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवून गहजब करणार्या व त्यांच्या प्रत्येक वाक्यावर वाहिन्यांवर चर्चासत्र करणार्या प्रेस्टिट्यूट्सना आजतगायत झाक्याच्या विषाची दखल घ्यावीशी वाटली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.
असो. प्रेस्टिट्यूट्स व तथाकथित पुरोगामी व निधर्मी विचारवंत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे वेगळे वर्तन अपेक्षित नव्हते. आता निदान माध्यमातून तरी निषेधाचे क्षीण सूर येत आहेत. हे तथाकथित पुरोगामी व निधर्मी विचारवंत झाक्याच्या वर्तनाबद्दल अजूनही मूग गिळून गप्प आहेत.
झाक्याच्या वाहिनीवर, प्रवचनांवर बंदी घालून काहीही साध्य होणार नाही. आंतरजालीय जगात अशा बंदीला अर्थ नसतो. आपले विखारी विचार मुस्लिमांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याच्याकडे इतर शेकडो मार्ग उपलब्ध असतील. त्याची व्याख्याने तपासून त्या व्याख्यानांचा कायदेशीरपणा तपासून नंतरच त्याच्यावर कायद्याच्या मार्गाने कायदेशीर कारवाई करणे उचित ठरेल. बंदी हा उपाय निष्फळ ठरण्याचीच जास्त शक्यता आहे.
11 Jul 2016 - 5:09 pm | माहितगार
श्रीगुरुजी, हेटस्पीच बद्दल कारवाई करता येतात तरीही बंदी काय किंवा इतर कायदेशी कारवाई काय अशक्य नसली तरी झानांची वक्तव्ये सहसा काठावरची पण भारतीय कायद्याचे कमित कमी उल्लंघन होईल अशा पद्धतीने आहेत, त्यामूळे सध्याच्या कायद्यातून खूप प्रभावी कार्यवाही संभव असण्याची शक्यता कमी हे वास्तव केव्हातरी चिमुटभर मिठा सोबत स्विकारावे लागेल आणि मुख्यभर त्यांच्या (अ)विचारांना मुद्देसूदपणे तार्कीक उणीवा नमुद करुन खोडण्यावर ठेवावा लागेल आणि हे काम अभ्यासकांच्या कार्यक्षेत्रात मोडत, असे काम सरकार कडून होण्याची शक्यता कमी असेल असा माझा व्यक्तिगत कयास आहे. (चुभूदेघे)
11 Jul 2016 - 9:14 pm | श्रीगुरुजी
तेच सांगतोय मी. झाक्याविरूद्ध बंदीच्या कारवाईने फार काही साध्य होणार नाही. त्याचे विचार खोडण्याचा जितका प्रयत्न होईल, त्याच्या दामदुपटीने निधर्मांध (स्वतःला पुरोगामी व निधर्मी विचारवंत समजणारे) त्याच्या बाजूने उभे राहतील. सरकारने फक्त त्याच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत आहे का याकडे लक्ष ठेवावे व तसे होत असल्यास कायदेशीर कारवाई करावी.
12 Jul 2016 - 8:24 am | माहितगार
(बहुधा) कायद्याच्या परिघात बसतील एवढ्याच मुलतत्ववादी वैचारीक पायर्या चढण्यात झाना तत्वज्ञान प्रसृत करतो, त्याचे शिष्यगण इतर नकारात्मक पायर्या इतरत्र चढतात (ज्याला तो जबाबदार असू शकत नाही असे त्याचे म्हणणे असावे जे खरेही असू शकते) त्यामुळे (त्याची काही गंभीर आणि प्रत्यक्ष चूक असल्याशिवाय) कायदेशीर कारवाईलाही मर्यादा पडणार हे ओघाने येते.
तो भारतात वापस येईल नाही येईल पाकीस्तान सारखा अजून एखादा देश त्याला भारता बाहेर राहण्यास साहाय्य करेल काहीच माहीत नाही. शिवाय त्याला अजून नवे काही बोलण्याची गरज आहे असेही नाही. त्याला जे बोलायचे ते बोलून इंटरनेटवर टाकून तो मोकळा झाला आहे. आपण म्हणताय पण अभ्यासकांनी तर्कशुद्धपणे खंडण करण्या शिवाय इतर मार्ग कितपत उपलब्ध आहेत या बद्दल बरीच साशंकता आहे.
11 Jul 2016 - 2:52 pm | श्रीगुरुजी
(भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधून)
11 Jul 2016 - 3:32 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
11 Jul 2016 - 3:55 pm | श्रीगुरुजी
11 Jul 2016 - 3:55 pm | श्रीगुरुजी
11 Jul 2016 - 3:56 pm | श्रीगुरुजी
पुरोगामी आणि निधर्मी हास्य!
11 Jul 2016 - 7:01 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
तुमच्या माहितीसाठी सांगतो दुसर-या एका संस्थळावर मी फुरोगाम्यांशी वाद घालत असतो.आयडीनाम वेगळं आहे!!!
दांभिक उजवे विचार आणि स्युडो सेक्युलरांचा मला फार राग येतो,
तुम्ही दांभिक उजवे आहात,
इकडे बहुतांशी उजवे आहेत अन् तिकडे डावे!!!
परिस्थिती बघून प्रतिसाद देत असतो.
.
|
|
|
(खरा सेक्युलर)
11 Jul 2016 - 9:01 pm | श्रीगुरुजी
म्हणजे त्या संस्थळावरसुद्धा हाच विनोदी प्रयोग सुरू आहे असं दिसतंय. चालू द्या! त्या संकेतस्थळावरील सदस्यांना सुद्धा करमणुकीचा हक्क आहेच ना!!
11 Jul 2016 - 8:01 pm | चंपाबाई
http://www.loksatta.com/desh-videsh-news/former-bjp-mla-oza-claims-amit-...
शहा ओवेसी युती
12 Jul 2016 - 3:08 am | गामा पैलवान
अवांतर :
श्रीगुरुजी,
>> सनातन ही अत्यंत मूर्ख व दुराग्रही लोकांची संघटना आहे.
कशावरून? मूर्खपणाचं आणि दुराग्रहाचं एखादं उदाहरण मिळेल काय?
आ.न.,
-गा.पै.
12 Jul 2016 - 2:27 pm | श्रीगुरुजी
१) अंदाजे २ वर्षांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर निमंत्रितांना एका विषयावर वादविवादासाठी बोलविले होते. महाराष्ट्रातील एका गावात एक अघोरी प्रथा सुरू होती. एका पाळण्यात तान्ह्या मुलांना ठेवून तो पाळणा एका खोल विहिरीत सोडला जात असे. काही क्षण पाळणा पाण्यावर तरंगल्यानंतर तो बाहेर काढला जात असे. अंधार्या विहिरीमुळे व भीतिमुळे तान्ही मुले रडून आकांत करीत असत. परंतु अनेक वर्षे सुरू असलेल्या प्रथेचे भूत डोक्यात असल्याने गावकरी ही अघोरी प्रथा थांबविण्यास तयार नव्हते. या विषयावर बोलण्यासाठी ३-४ मान्यवर वक्ते सहभागी झाले होते. त्यात अंनिसचे कोणतरी होते व सनातनचे अभय वर्तक होते.
त्या परिसंवादात अभय वर्तक त्या अघोरी प्रथेचे समर्थन करीत होते व तुम्ही फक्त हिंदूंच्याच प्रथांविरूद्ध का आहात, इतर धर्मांच्या प्रथांविरूद्ध का बोलत नाही असे विचारत होते. त्यांचा दुसरा प्रश्न बरोबर होता. परंतु हिंदूंमध्ये जर अशा अघोरी प्रथा असतील तर त्या बंद व्हायलाच हव्यात. लोक ऐकत नसतील तर कायद्याने व पोलिसदल वापरून बळजबरीने हे प्रकार बंद व्हायलाच हवे. इतर धर्मांमध्ये सुद्धा अशा अघोरी प्रथा आहेत, त्यामुळे आपल्या धर्मातील अशा प्रथांना बंदी घालायला विरोध करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.
२) काही महिन्यांपूर्वी तृप्ती देसाई नामक महिलेने शनी शिंगणापूरच्या चौथर्यावर पुरूषांप्रमाणे महिलांना देखील प्रवेश मिळावा यासाठी जोरदार आंदोलन केले होते. माझे असे वैयक्तिक मत आहे की चौथर्यावर पुजार्यांशिवाय कोणालाच प्रवेश देऊ नये. परंतु जर पुरूषांना चौथर्यावर जायची परवानगी असेल तर महिलांना सुद्धा तसे जाता यावे.
या विषयावर एका वाहिनीवर चर्चा सुरू असताना अभय वर्तकांनी अशी परवानगी द्यायला विरोध केला. त्यांच्या म्हणण्यानुसार शंकराचार्य किंवा हिंदू धर्माचार्य यांना विचारून त्यांना मान्य असेल तर त्यांच्या संमतीनेच अशी परवानगी द्यावी. हे शंकराचार्य किंवा धर्माचार्य कोण? त्यांना का विचारायचे? त्यांना याबाबत कायदेशीर किंवा धार्मिक अधिकार कोणी दिले? त्यांनी महिलांना परवानगी द्यायला विरोध केला तर ते मान्य करायचे का?
३) दाभोळकरांचा खून झाल्याझाल्या काही क्षणातच त्यासाठी सनातनला दोषी ठरविणे सुरू झाले. सर्व वाहिन्यांवरून तावातावाने सनातनविरूद्ध बोलले जात होते. एकप्रकारे पोलिस तपास एका विशिष्ट दिशेला वळावा, त्यात सनातनला अडकवावे व त्यामुळे खर्या खुन्यांना पुरावे नष्ट करून सुखरूप पळून जाता यावे यासाठीच हा प्रयत्न असावा. सनातनचे जुने अंक काढून त्यातील प्रक्षोभक लेखांचे दाखले दिले जात होते. सनातन महामूर्खांची संस्था असली तरी ते सुपारी किलर्सना पाठवून खून करणे शक्य दिसत नाही. मागील ३ वर्षात जंगजंग पछाडून सुद्धा सनातनविरूद्ध पुरावे मिळालेले नाहीत. आता पोलिस खोटे साक्षीपुरावे उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत.
असे असले तरी आपण रिसिव्हिंग एंडला आलेलो आहेत हे लक्षात घेऊन सनातनने पोलिटिकल करेक्ट भूमिका घेऊन गप्प रहायला हवे होते. परंतु दुसर्या दिवशी सनातनच्या अंकात दाभोळकरांवर एक लेख छापून आला ज्यात त्यांची निंदानालस्ती करण्यात आली होती. दाभोळकरांच्या पापांची शिक्षा त्यांना मिळाली अशा अर्थाची अत्यंत मूर्खपणाची वाक्ये त्या लेखात होती. एवढेच नव्हे तर सनातनच्या संकेतस्थळावर दाभोळ्करांचे चित्र छापून त्यावर लाल फुली मारलेली दाखविली होती.
आपल्या मूर्खपणामुळे आपण आपल्यावरील संशयाला पुष्टी देत आहोत व आपल्याच अनेक साधकांना संकटात टाकत आहोत हे ज्यांच्या लक्षात येत नव्हते ते महामूर्खच आहेत.
12 Jul 2016 - 2:35 pm | कैलासवासी सोन्याबापु
आमच्या लेखी तर धर्माचा ध सुद्धा उच्चारू न शकणाऱ्या बारक्या पोरांची सुंता करणे किंवा त्यांच्या कानाला भोके पाडणे (आयुष्यभर कधी डूल घालणार नसले तरी) हे ही अघोरीच आहे पूर्णतः फक्त, व्हॉटअबाऊटरी अन भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे वाल्या दिवट्यांना ते कळत नाही, असो.
13 Jul 2016 - 10:27 am | बोका-ए-आझम
उद्देश माहित नाही. माझेही कान टोचलेले आहेत पण का ते माहित नाही. जेव्हा टोचले तेव्हा अर्थातच choice नव्हता. सुंतेबद्दल म्हणाल तर त्याचे काही वैद्यकीय फायदे आहेत असं वाचलेलं आहे. सुंता ज्यूंमध्येही होते आणि त्यांच्यात शिक्षणाचं प्रमाण आणि स्त्रियांना मिळणारं स्वातंत्र्य हे मुस्लिमांपेक्षा जास्त आहे. पण अगदी आधुनिक ज्यूंमध्येही सुंता केली जाते. वैद्यकीय फायदे (असतील तर) मिपावरील डाॅक्टर्स जास्त व्यवस्थित सांगू शकतील.
14 Jul 2016 - 3:37 pm | कैलासवासी सोन्याबापु
बोक्याभाऊ, मला नेमका रेफेरेन्स आठवत नाहीये (कॉलिंग बॅटू, वल्ली अँड अदर लरनेड सोल्स) पण बहुदा एक वैदिक साहित्यात हा उल्लेख आहे की 'ज्याच्या कानातील पाळ्यांना केलेल्या छिद्रातून सूर्यकिरण आरपार होत नाहीत तो विप्र/ब्राह्मण नाही तर दानव/राक्षस असून त्याला दिलेले दान हे कुपात्री दान म्हणवेल' का काय से , शिवाय त्याचे काही वैद्यकीय फायदे असल्याचे सुद्धा (अजूनतरी) मला माहिती नाहीत, असल्यास जाणून घेणे आवडेल
12 Jul 2016 - 10:05 pm | आरोह
सुंता करण्याचा उद्देश काय असतो??? आणि कानाला का भोक पडतात??
12 Jul 2016 - 10:31 pm | माहितगार
इथे उद्देश लक्षात घेणे प्रतिसादकाचा हेतू नसावा, प्रश्न वयाचे १८ वर्ष पूर्ण सोडून द्या आगदी न कळत्या वयात पालकांनी/समाजाने मुलांच्या शरीरावर कायम स्वरुपी बदल करण्याचे निर्णय परस्पर घेण्या बद्दल त्यांना साशंकता व्यक्त करावयाची असावी. मी व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहे आणि माझ्या पालकांनी माझ्या कानाला लहानपणी भोक पाडले असते तर ते मला नक्कीच रुचले नसते मग त्यांचा उद्देश कितीही स्तुत्य असू द्यात.
12 Jul 2016 - 11:53 pm | आरोह
पालक मुलांची सुंता का करतात, किंवा त्यांचे कां का टोचतात...
किती साधा प्रश्न...तत्वज्ञान उगाळून तुम्ही एकदम गोल गोल फिरवला
13 Jul 2016 - 7:55 am | माहितगार
या धाग्याच्या परिघाशी संबंधीत उत्तर दिले. आपल्याला धागा लेखाच्या उद्दीष्टापलिकडे माहिती हवी असेल तर इतर लोक मदत करु शकतील. शुभेच्छा.
13 Jul 2016 - 2:31 am | गामा पैलवान
श्रीगुरुजी,
केवळ एका कार्यक्रमावरून सनातन संस्था मूर्ख असल्याचा निष्कर्ष काढण्यात थोडी घाई होते असं वाटंत नाही का?
१.
>> त्या परिसंवादात अभय वर्तक त्या अघोरी प्रथेचे समर्थन करीत होते
त्यामागे कारण काय दिलं होतं? आणि अध्यात्मिक कारण नसेल तर ती प्रथा बंद करायला काहीच हरकत नाही.
२.
>> त्यांच्या म्हणण्यानुसार शंकराचार्य किंवा हिंदू धर्माचार्य यांना विचारून त्यांना मान्य असेल तर त्यांच्या संमतीनेच
>> अशी परवानगी द्यावी. हे शंकराचार्य किंवा धर्माचार्य कोण? त्यांना का विचारायचे? त्यांना याबाबत कायदेशीर
>> किंवा धार्मिक अधिकार कोणी दिले?
जर शंकराचार्य वा इतर हिंदू धर्मपंडितांचे ऐकायचे नसेल तर देवळात जायचंच कशाला? घरच्या घरी करावी की हवी तेव्हढी भक्ती.
३.
>> असे असले तरी आपण रिसिव्हिंग एंडला आलेलो आहेत हे लक्षात घेऊन सनातनने पोलिटिकल करेक्ट भूमिका
>> घेऊन गप्प रहायला हवे होते.
डरपोकांनी पोक काढून पो.क. भूमिका घ्यावी. खरं ते छापायची हिम्मत आजच्या घडीला फक्त सनातन प्रभात मध्येच आहे. दाभोलकरांच्या चित्रावर फुल्ली मारली म्हणजे त्यांचा खून व्हावा हा निर्देश ओढूनताणून आणलेला आहे. तसेच सनातननी दाभोलकरांची निंदानालस्ती कुठल्याही लेखात केलेली नाही.
आ.न.,
-गा.पै.
जाताजाता : दाभोलकर फ्रॉड माणूस होता/आहे हे सनातन संस्था सोडल्यास कोणीही उघड बोलायला धजत नाही.
13 Jul 2016 - 4:24 am | संदीप डांगे
हाऊ डू यू से दॅट, मोनिशा..... ;)
13 Jul 2016 - 2:58 pm | श्रीगुरुजी
सनातनच्या मूर्खपणाची मी ३ वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत.
म्हणजे अध्यात्मिक कारण असेल तर ही अघोरी प्रथा सुरूच ठेवावी का? या अघोरी प्रथेमागचे कारण अध्यात्मिक असो, नैतिक असो, पारमार्थिक असो, धार्मिक असो किंवा अजून कोणतेही असो, प्रथा अघोरी असल्यामुळे ती बंद व्हायलाच पाहिजे.
मी व बहुसंख्य हिंदू कोणत्याही शंकराचार्य किंवा हिंदू धर्मपंडितांच्या उपदेशावर आचरण करीत नाहीत. स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरून आम्ही आचरण करतो. कोणाच्या तरी सांगण्यावर अंधविश्वास ठेवून आचरण करायला हिंदू धर्म म्हणजे इस्लाम नव्हे. शंकराचार्य सांगतात की साईबाबा देव नसल्यामुळे त्यांच्या मूर्तीचे पूजन करू नका. हा मूर्खपणाचा उपदेश किती हिंदूंनी आचरणात आणला आहे? शंकराचार्य मनाला येईल ते सांगतील. ते सांगतील त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून विचार न करता आचरणात आणायचं का? मी देवळात जातो व घरीही पूजाअर्चा करतो. पण मी हे माझ्या मनाला आवडते व त्यापासून मला शांती व समाधान मिळते म्हणून करतो. शंकराचार्य सांगतात म्हणून नव्हे. उद्या शंकराचार्यांनी देवळात जायला बंदी घातली किंवा पू़जा करू नका सांगितले तरी ते माझ्या मनाला पटत नसल्यामुळे मी त्यांच्या सांगण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करेन.
केवळ सनातनमध्ये छापून आले म्हणजे ते खरेच आहे असे नाही. दाभोलकरांच्या चित्रावर फुल्ली मारली म्हणजे त्यांचा खून सनातननेच केला आहे हा निष्कर्ष अवास्तव असला तरी जेव्हा संशयाची सुई सनातनवर वळलेली होती तेव्हा अशा संशयाच्या वातावरणात दाभोळकरांच्या खुनानंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या चित्रावर लाल फुली मारणे हे सनातनविषयी संशय वाढविणारे होते. त्यामुळे सनातनवर संशय अजून वाढला व त्यामुळे सनातनचे अनेक साधक हे पोलिसांच्या रेडारवर आले. सनातनने हा मूर्खपणा टाळायला हवा होता. परंतु तारतम्य व सनातन यांचे एकमेकांशी हाडवैर असल्याने तसे झाले नाही.
दाभोळकर हे फ्रॉड होते हा आरोप फक्त सनातनच्या वृत्तपत्रात करून फायदा नाही. असे आरोप करणे म्हणजे केजरीवालांच्या आरोपांसारखे असतात. त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. निव्वळ आरोप करण्यापेक्षा त्याचा कायदेशीर पाठपुरावा करून न्यायालयात खटला दाखल करणे हाच एकमेव उपाय आहे.
13 Jul 2016 - 4:10 pm | माहितगार
मी सुद्धा श्रीगुरुजींचा प्रतिसाद येऊन जाण्याची वाट पहात होतो. हा धागा सनातन संस्थे बद्दल नसल्यामुळे त्या बद्दल या धाग्यात भाष्य टाळतो. शंकराचार्य विषयक मुद्यातील निसटत्या बाजूंकडे लक्ष वेधावेसे वाटते.
१) हिंदू धर्म-संस्कृतीची सुरवात शंकराचार्यांपासून किंवा कोणत्याही धर्मपंडितापासून होत नाही आणि शंकराचार्यांपाशी किंवा इतर कुणापाशी संपत नसावा.
२) देव कशात बघायचा ते कोणत्या देवळात नमस्कार करायचा आणि भक्ती कशा पद्धतीने करावयाची हे प्रत्येक हिंदू स्वतः ठरवतो, त्याचे देवाशी नाते डायरेक्ट असते भक्त तथाकथीत पंडीतांच्या सांगण्यावर अवलंबून असला पाहीजे असे काहीही नसावे, एवढेच नव्हे कुणाला गुरु मानायाचे हे प्रत्येक व्यक्ती स्वतः ठरवते. अमुक यांनाच पंडीतानांच किंवा शंकराचार्यांना गुरु माना असे हिंदू धर्मात काहीही नसावे.
३) अघोरी नवसा सायासांना विरोधाची सुधारणावादाची संत एकनाथ संत तुकारामांपासूनची परंपरा आहे, बदलत्या काळाला स्विकारणे आणि काळासोबत बदलणे हा हिंदूधर्म आणि समाजाचा गुणधर्म असावा.
४) हिंदू धर्माची मूळ विचारसरणी विचारांच्या उदात्ततेवर आधारलेली असावी संकुचितते वर नसावी.
13 Jul 2016 - 1:31 pm | माहितगार
तार्कीक उणिवांचे खंडन तर्कशुद्ध पद्धतीने कसे करावे याचा उत्कृष्ट नमुना हफिंग्टन पोस्टवरच्या फरहान मुसावीच्या It's Time We Muslims Chose Common Sense Over Zakir Naik लेखातून आला आहे. झाकीर नाईकांच्या मुद्द्यांचे अगदी व्यवस्थीत तर्कशास्त्रीय खंडन केले आहे. त्यांचा इमेल पत्ता मिळाला तर विनंती करून कॉपीराईट फ्री करुन घेऊन मराठी सहीत विवीध भाषात अनुवादीत करुन घ्यावा असा लेख.
याच विषयावर हफिंग्टन पोस्टवरच अजून एक वाचनीय लेख झुबीन मदन यांचा आला आहे.
दोन्ही दुवे लेख आवडल्यास सोशल मिडीया शेअर करण्या एवढे उत्तम वाटतात.
13 Jul 2016 - 7:58 pm | ईश्वरसर्वसाक्षी
महाराष्ट्रात एमआयएमसह 129 पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
13 Jul 2016 - 8:55 pm | माहितगार
हे तात्पुरते असेल, बॅलन्सशीट आणि इतर काही माहिती सबमीट करण्यात मागेपुढे झाले असेल. त्यांच्या राजकीय दृष्टीकोणाशी काही संबंध असणार नाही आणि मतदारांवर होल्ड असेल तर उमेदवार त्यांना पक्ष चिन्हा शिवाय अपक्ष सुद्धा निवडून आणता येतील. त्यांचे उमेदवार अपक्ष निवडून येण्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच अधिक पोहोचेल किंवा कसे.
13 Jul 2016 - 9:03 pm | ईश्वरसर्वसाक्षी
हो बरोबर आहे. पक्षानं जो काही कर भरला असेल त्याची कसलीच माहिती न दिल्यामुळे एमआयएमवर ही कारवाई करण्यात आली आहे.
"मतदारांवर होल्ड असेल तर उमेदवार त्यांना पक्ष चिन्हा शिवाय अपक्ष सुद्धा निवडून आणता येतील." हे हि खरय.
14 Jul 2016 - 12:23 pm | गामा पैलवान
श्रीगुरुजी,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. काही भाष्ये करेन म्हणतो.
१.
>> सनातनच्या मूर्खपणाची मी ३ वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत.
ज्याला तुम्ही मूर्खपणा म्हणताहात तो कित्येक लक्षावधी लोकांच्या मते मूर्खपणा नाहीये.
२.
>> म्हणजे अध्यात्मिक कारण असेल तर ही अघोरी प्रथा सुरूच ठेवावी का?
इथे असा तिरपागडा अर्थ काढायची काय गरज आहे? पर्यायी प्रथा सुरु करता येत नाहीत का? तशी सुरू करायची असेल तर मूळ प्रथा पद्धतशीरपणे बंद करायला हवी. एकदम दिसली प्रथा आणि केली बंद असं का म्हणून?
अभय वर्तकांनी पर्यायी प्रथेसाठी जर विचारविनिमयाचा आग्रह धरला तर त्यास आंधळं समर्थन म्हणंत नाहीत.
३.
>> मी व बहुसंख्य हिंदू कोणत्याही शंकराचार्य किंवा हिंदू धर्मपंडितांच्या उपदेशावर आचरण करीत नाहीत.
>> स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरून आम्ही आचरण करतो.
>> कोणाच्या तरी सांगण्यावर अंधविश्वास ठेवून आचरण करायला हिंदू धर्म म्हणजे इस्लाम नव्हे.
गाडी चुकली हो. शंकराचार्य वा हिंदू धर्मपंडित यांनी उपदेश केला तर तो अतार्किकच असतो हे गृहीतक साफ चुकीचं आहे.
४.
>> शंकराचार्य सांगतात की साईबाबा देव नसल्यामुळे त्यांच्या मूर्तीचे पूजन करू नका.
>> हा मूर्खपणाचा उपदेश किती हिंदूंनी आचरणात आणला आहे?
>> शंकराचार्य मनाला येईल ते सांगतील.
>> ते सांगतील त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून विचार न करता आचरणात आणायचं का?
आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांच्या अधिपतींनाच शंकराचार्य असं संबोधतात. बाकी सारे तोतये आहेत. सनातन संस्था धर्मशास्त्राप्रमाणे आचरण असावं असा आग्रह धरते. एव्हढंच नव्हे तर त्याप्रमाणे साधक आचरण करतातही. अनेक खऱ्याखुऱ्या शंकराचार्यांनी संस्थेस अनेक वेळा आशीर्वाद दिले आहेत. यात मूर्खपणा कसला?
५.
>> मी देवळात जातो व घरीही पूजाअर्चा करतो. पण मी हे माझ्या मनाला आवडते व त्यापासून मला
>> शांती व समाधान मिळते म्हणून करतो. शंकराचार्य सांगतात म्हणून नव्हे.
एक काम करा. एके दिवशी देवळात जा आणि तिथले नियम न पाळायचा हेका धरा. पाखंडी तृप्ती देसाई जसा हेका धरते अगदी तस्साच धरून पहा. मग बघा शांती मिळते का ते.
६.
>> उद्या शंकराचार्यांनी देवळात जायला बंदी घातली किंवा पू़जा करू नका सांगितले तरी ते माझ्या मनाला
>> पटत नसल्यामुळे मी त्यांच्या सांगण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करेन.
अचूक निर्णय. त्याबद्दल अभिनंदन. मात्र देवळात जाऊ नका म्हणून उपदेश करायला शंकराचार्यांची अक्कल गहाण पडलेली नाही अजूनतरी.
७.
>> जेव्हा संशयाची सुई सनातनवर वळलेली होती तेव्हा अशा संशयाच्या वातावरणात दाभोळकरांच्या खुनानंतर
>> लगेच दुसर्या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या चित्रावर लाल फुली मारणे हे
>> सनातनविषयी संशय वाढविणारे होते.
दाभोलकरांचं फुल्ली मारलेलं चित्रं जुनंच आहे. शिवाय दुसऱ्या दिवशी लगेच संशयाची सुई वगैरे वळलेली नव्हती. तसं बघायला गेलं तर संस्थेवर नेहमीच बिनबुडाचे आरोप होत आलेत. प्रत्येक आरोपाला घाबरत बसलं तर साधना करायची कशी?
८.
>> त्यामुळे सनातनचे अनेक साधक हे पोलिसांच्या रेडारवर आले. सनातनने हा मूर्खपणा टाळायला हवा होता.
>> परंतु तारतम्य व सनातन यांचे एकमेकांशी हाडवैर असल्याने तसे झाले नाही.
यांत तुम्हाला सनातन संस्थेचा मूर्खपणा दिसतो, पण पोलिसांचा अक्कलशून्यपणा दिसंत नाही. कमाल आहे. कर भरता ना तुम्ही? मग शासनाला जाब विचारा ना जरा.
९.
>> दाभोळकर हे फ्रॉड होते हा आरोप फक्त सनातनच्या वृत्तपत्रात करून फायदा नाही.
अगदी बरोबर. दाभोलकरांच्या न्यासाने गेले कित्येक वर्षे धर्मादाय आयुक्तांकडे हिशोब सादर केलेले नाहीत. यास आरोप म्हणावं की वस्तुस्थिती?
जी गोष्ट उघड फ्रॉड आहे तिला आजून कसले पुरावे द्यायचे?
असो.
एकंदरीत सनातन संस्थेचे विचार तुम्हाला पटत नसले तरी त्यांना मूर्खबिर्ख विशेषणे लावू नयेत. इतकंच मागणं आहे.
आ.न.,
-गा.पै.
14 Jul 2016 - 3:04 pm | श्रीगुरुजी
असेल बोवा. पुलंनी म्हटलेच आहे की "जगात कुंभार थोडे, गाढवे फार".
पर्यायी प्रथा? तान्ह्या मुलाला पाळण्यात ठेवून खोल, अंधार्या विहिरीत सोडून पाळणा पाण्यावर तरंगत ठेवण्याच्या अघोरी प्रथेला पर्याय शोधायचा? धन्य आहे. अघोरी प्रथा पद्धतशीरपणे बंद करायची म्हणजे काय करायचं? आधी पाण्यावर पाळणा तरंगत ठेवणे थांबवून पाळणा फक्त विहिरीत लटकत ठेवायचा, नंतर पुढच्या वर्षी पाळणा अगदी पाण्याच्या पातळीपर्यंत न नेता पाण्यापासून १० फूट वर लटकत ठेवायचा, नंतर प्रत्येक वर्षी १०-१० फूट कमी करायचे आणि शेवटी पाळणा विहिरीच्या काठावर नुसताच बांधून ठेवायचा. ती प्रथा अशी पद्धतशीरपणे बंद करायची का? असल्या अघोरी प्रथा या तातडीने संपूर्ण बंद करायच्या असतात. पूर्वी कर्नाटकातील चंद्रेगुत्ती इथे नग्नपूना चालायची. महिला नग्नावस्थेत रस्त्याने जाऊन देवीची पूजा करायच्या. पोलिसांनी बळाचा वापर करून हा मूर्खपणा संपूर्ण बंद केला. जर असली प्रथा पद्धतशीरपणे बंद करायचा प्रयत्न केला असता तर पहिल्यांदा पूर्ण नग्न न होता फक्त कंबरेवर वस्त्र चढवून पूजा करा, मग काही वर्षांनी फक्त वर आणि खाली वस्त्र परिधान करा, नंतर काही वर्षांनी अजून एखादे वस्त्र चढवा असले काही तरी झाले असते.
प्रथा अघोरी आहे व त्यामुळे ती तातडीने संपूर्ण बंद व्हायला पाहिजे. अघोरी प्रथेला पर्यात नसतो व त्याचे समर्थनही करता येत नाही. वर्तक तर पर्याय सोडाच पण प्रथा बंद करायलाच विरोध करीत होते. मूर्खपणा तो हाच.
मी असलं गृहितक धरलेलंच नाही. तो जे उपदेश करतात तो मी आंधळेपणाने न पाळता स्वतःची बुद्धी वापरतो व त्यानुसार आचरण करतो. शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश हवा का नको याविषयी शंकराचार्यांची मते काहीही असोत, तिथे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने प्रवेश हवाच असे माझे मत आहे. परंतु वर्तक मात्र याबाबतीत शंकराचार्यांचा सल्ला घ्यावा असा आग्रह धरीत होते. मूर्खपणा तो हाच.
अनेकजण स्वयंभू शंकराचार्य आहेत. कांची कामकोटी पीठाचे प्रमुख स्वतःला शंकराचार्य मानत असले तरी इतर चार पीठांचे प्रमुख कांची कामकोटीला मानत नाहीत. त्यांच्या दृष्टीने दक्षिणेत कांची कामकोटी हे शंकराचार्यांचे पीठ नसून कर्नाटकातील शॄंगेरी हेच खरे पीठ आहे. याव्यतिरिक्त रत्नागिरीचा भोंदू नरेंद्र महाराज स्वतःला शंकराचार्य म्हणवून घेतो. कोल्हापूरलाही शाहू महाराजांनी पर्यायी पीठ स्थापन केले आहे. द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचा मूर्खपणा हा की त्यांनी शिर्डीचे साईबाबा देव नसल्यामुळे त्यांच्या मूर्तीची पूजा करणे हे धर्मविरोधी आहे असा फतवा काढून साईबाबांची पूजा करण्यास विरोध केला. श्री श्री आद्य शंकराचार्य हे सुद्धा मानव होते व त्यांची मूर्ती सर्व पीठात असते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास इ. सर्व संत मानव होते. त्यांच्या मूर्तीची सर्वत्र पूजा होते. अशा परिस्थितीत साईबाबांची मूर्ती पूजु नये असे सांगणे हा मूर्खपणा होता. त्यांच्या दुर्दैवाने सर्वसामान्य हिंदू त्यांच्या ओंजळीने पाणी न पिता स्वतःच्या बुद्धीने वागणारा असल्याने शंकराचार्यांच्या सल्ल्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले.
जिथे सर्वांसाठी समान नियम नाहीत व काही जणांसाठी अन्यायकारक नियम आहेत, तिथे विरोध होणारच. तृप्ती देसाई पाखंडी असो वा अजून काही असो, तिने पुढे आणलेला मुद्दा योग्यच होता
असे असेल तर मग साईबाबांची पूजा करू नका असा अत्यंत मूर्खपणाचा आदेश त्यांनी का काढला? आणि सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष का केले?
खून झाला त्याच दिवशी लगेचच सनातनवर संशयाची सुई वळलेली होती. दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या फोटोवर लाल फुली मारणे यात कसली आली आहे डोंबलाची साधना? ही तर निव्वळ मनातील मळमळ.
पोलिस अक्कलशून्य आहेत हे माहित असताना कशाला त्यांच्या हातात कोलीत द्यायचं? त्यातून त्रास होणार तो तुम्हालाच होणार ना? माकडाच्या हातात कोलीत दिलं व त्याने घराला आग लावली तर नुकसान माकडाचं का तुमचं?
दाभोळकर हे फ्रॉड आहेत हे केवळ सनातन प्रभात मध्ये आरोप करून सिद्ध होत नाही. हे आरोप न्यायालयात सिद्ध व्हावे लागतात. नुसते शाब्दिक आरोप करत बसला तर तुमचा केजरीवाल होतो.
जे उघड दिसतंय तेच मी सांगितलंय. सनातन ही मूर्खांची संस्था आहे याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपल्या वर्तनाने सनातनच्या लोकांनी ते अनेकवेळा सिद्ध केलेलं आहे.
14 Jul 2016 - 3:27 pm | माहितगार
सनातन संस्थेच्या काही विचारातील तार्कीक उणीवा इतर धाग्यातून दाखवता येतील म्हणून इथे माझ्या तर्फे चर्चा वाढवण्याचा मोह शक्यतो टाळतो आहे. गुरुजींची टिका कठोर वाटेल पण बर्यापैकी सहमत आहे. राम, कृष्ण, विठ्ठल ते मेसाई भारतात पुजल्या जाणार्या असंख्य दैवतांचा वेदात उल्लेख नाही ज्याला जे प्रिय आहे अगदी विघ्नकर्त्या शनीचे ते दर्ग्यांचे पुजन सुद्धा भारतीय मनोभावे करतात. सतीबंदी सारखे काही अघोरी देवदासींचे शोषण असे अपवाद सोडले तर अमुक तमुकचे पुजन करु नये हा अनावश्यक हस्तक्षेप स्पृहणिय नाही, लोक तर स्विकारणारच नाहीत.
यात स्त्रीयांवर सक्ती आणि शोषण नसेल तर स्त्री पुरुषांनी कशा पद्धतीने पुजन करावे हा त्यांच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा आदर व्हावयास हवा होता, सधू संत देवता नग्न असू शकतात तसे भक्तांनी नग्नतेचे ते अंगभरुन कपडे घालण्याचे स्वातंत्र्य घेतले तर उर्वरीत जगाचा त्यात हस्तक्षेप कितपत रास्त राहतो या बद्दल साशंक आहे.
14 Jul 2016 - 2:33 pm | बोका-ए-आझम
काही मतं पटली नाहीत. श्रीगुरुजी उत्तरं देतीलच पण मी राहावलं नाही म्हणून हे मुद्दे मांडतोय.
१.
लक्षावधी लोकांचा गणपती दूध पितोय यावरही विश्वास बसला होता. तो मूर्खपणाच होता. लक्षावधी लोक करताहेत म्हणून चुकीची गोष्ट बरोबर कशी होईल?
२. श्रीगुरुजींच्या प्रतिक्रियेवरुन हे सांगतोय - तान्ह्या मुलांना पाळण्यात बसवून अंधाऱ्या विहिरीत सोडणं हा नुसता अघोरीपणा नाही, हा क्रूरपणा आहे. जगातील कुठल्याही धर्माने असं सांगितलं तरी त्याचा विरोध व्हायला पाहिजे. हे बंदच व्हायला पाहिजे. अभय वर्तकांचा दुसरा आक्षेप - तुम्हाला फक्त हिंदूंच्याच प्रथा दिसतात का - त्यावर माझं उत्तर असं आहे की आमचं आमच्या धर्मावर प्रेम आहे म्हणूनच त्यातले दोष निघून जावेत अशी आमची इच्छा आहे. दोष दाखवणे म्हणजे धर्माचा अधिक्षेप करणे नव्हे.
३.
असं अजिबात नाही. पण कुणाचाही उपदेश तर्कबुद्धीला पटत नसेल तर तो का ऐकावा? मला माझ्या आईवडिलांचे न पडलेले सल्ले मी ऐकत नाही. आणि शंकराचार्य किंवा कोणीही माझ्या जन्मदात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मला वाटत नाही.
४.आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांच्या अधिपतींनाच शंकराचार्य असं संबोधतात. बाकी सारे तोतये आहेत. सनातन संस्था धर्मशास्त्राप्रमाणे आचरण असावं असा आग्रह धरते. एव्हढंच नव्हे तर त्याप्रमाणे साधक आचरण करतातही. अनेक खऱ्याखुऱ्या शंकराचार्यांनी संस्थेस अनेक वेळा आशीर्वाद दिले आहेत. यात मूर्खपणा कसला?>>>
हा मुद्दा वेगळाच आहे. शंकराचार्यांनी साईबाबांची पूजा करु नका
असं म्हणण्याचा आणि सनातन संस्थेला आशीर्वाद देण्याचा संबंध काय? ते एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. आणि शंकराचार्यांनी सनातनला आशीर्वाद दिले असतीलही. तेही माणूस आहेत. त्यांच्या हातून चुका होऊ शकतात.
५. हा मुद्दा समजला नाही. हेही उदाहरण म्हणूनच दिलेलं आहे. आणि तृप्ती देसाई पाखंडी कशा झाल्या बुवा? त्यांचं आंदोलन निरर्थक होतं आणि त्यात राजकीय स्टंटबाजीही भरपूर होती. पण त्यात पाखंडीपणा कुठून आला?
६. ठीक आहे.
७. सनातन पोलिसांच्या रडारवर पूर्वीपासून होती. आणि दाभोळकरांचे फुली मारलेले फोटो आणि त्यांच्या मृत्यूनंतर सनातनने छापलेले लेख यांचा विपरित अर्थ काढला जाईल हे सनातनमधल्या साधकांना समजलं नाही का?
८. पोलिसांनी संशयितांना अटक केलेली आहे. ते सनातनचे सदस्य आहेत. त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करणं हे सरकारचं काम आहे. आणि सरकारला जाब विचारायला सनातनचे वकील आहेत. सनातनकडून जाब विचारण्याबद्दल पैसे मिळणार असतील तर जाब विचारु. फुकटात काहीही काम करु नये. तुम्हीही सनातनची ही भलावण पैसे मिळाल्याशिवाय करत नका जाऊ.
९. दाभोलकरांच्या न्यासाने गेले कित्येक वर्षे धर्मादाय आयुक्तांकडे हिशोब सादर केलेले नाहीत. यास आरोप म्हणावं की वस्तुस्थिती?
>>>
हिशेब सादर न करणे हे चूक आहे, पण तो फ्राॅड कशावरून? पुराव्याशिवाय आरोप करणं हे चूक आहे.
जी गोष्ट उघड फ्रॉड आहे तिला आजून कसले पुरावे द्यायचे?>>> उघड फ्राॅड? कसं काय? आणि पुरावे न देता असा गंभीर आरोप करणं हे कायद्यानुसार बदनामी (defamation) होऊ शकतं. पुरावे नसल्यामुळे तुमच्या या विधानाला विश्वासार्ह म्हणता येत नाही.
- आपला विनम्र
बोका-ए-आझम
14 Jul 2016 - 2:44 pm | माहितगार
=))
....कडून जाब विचारण्याबद्दल पैसे मिळणार असतील तर जाब विचारु. फुकटात काहीही काम करु नये. तुम्हीही ....ची ही भलावण पैसे मिळाल्याशिवाय करत नका जाऊ.
=)) @ गापै पोटभरून हसल्या बद्दल माफ करा, बोकानी सर्व चर्चांमध्ये भलावण करणार्यांसाठी सॉलीड्ड फॉर्मॅट दिलाय.
@ रिकाम्या जागा भरण्यासाठी किती नाव आठवताहेत :) बोका तुमच्या वाक्याचा फॉर्मॅट कॉपीराईट मुक्त करा लै वेळा पुन्हा पुन्हा वापरण्यासार्खा आहे.
14 Jul 2016 - 3:03 pm | बोका-ए-आझम
तुमच्यासाठी कायपण माहितगारसाहेब!
14 Jul 2016 - 3:00 pm | कैलासवासी सोन्याबापु
'उघड उघड फ्रॉड' ही एक गंमतच म्हणायला हवी,
शिवाय,
सनातन लक्षावधी लोकांना मूर्ख वाटत नाही म्हणून तिला काही म्हणू नका असे म्हणले तर , लक्षावधी लोकांना दार-उल-उलूमची कन्सेप्ट सुद्धा मूर्ख वाटत नाही, मग काय करायचे? कोणालाच काहीच बोलायचे नाही काय? होऊ दे हब्बेदुलास तिच्यायला नाहीका??
14 Jul 2016 - 3:08 pm | दिग्विजय भोसले
बस्स करा ना आता_/\_
14 Jul 2016 - 3:10 pm | कैलासवासी सोन्याबापु
जाऊ द्या हो ! नका मनावर घेऊ इतके! वाचायचे तितके वाचा बाकी गंगार्पणमस्तु!
14 Jul 2016 - 3:38 pm | सतिश गावडे
माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल अतीव आदर दाटून आला आहे.
मात्र ही खरंच श्रीगुरुजींची विचारसरणी आहे की त्यांचं सनातन प्रभातवाल्यांसोबत जोरात वाजलं असावं अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. ;)
14 Jul 2016 - 3:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
=)) =)) =)) =)) =)) =))
14 Jul 2016 - 3:57 pm | माहितगार
प्रवक्त्यांना खेचू नये ;) कैका असेना त्यांच्या बाजूने भूमिका शक्य तेवढी रचनात्मक आणि पॉलीटीकल पण राईट ठेवत असतात, त्यासाठी मराठीआंजावर त्यांची (श्रीगुरुजींची) मुख्यप्रवक्तेपदी नेमणूक करण्यास आमचे अनुमोदन आहे. :)
14 Jul 2016 - 4:14 pm | कैलासवासी सोन्याबापु
आज माहितगार ह्यांच्या आयडीवरून कोणी दुसरेच कॉमेंटते आहे असे भासते! चक्क त्रिविया अन चर्चेचे बादशाह सलामत हलक्याफुलक्या कॉमेंट्स अन तंगडी ओढत आहेत =))
14 Jul 2016 - 4:27 pm | नाखु
थोडं थांबुन तरी प्रतिक्रिया द्यायची होती असा माझा मत आहे आणि ते प्रत्येकाला पटलेच पाहिजे असे नाही.
कसोटी प्रेक्षक नाखु
14 Jul 2016 - 6:23 pm | माहितगार
मला वाटले होते मी फक्त निसटत्या बाजू ओढत असतो..
14 Jul 2016 - 4:15 pm | संदीप डांगे
+१११११
14 Jul 2016 - 4:27 pm | बाळ सप्रे
करेक्ट
हेच मुद्दे वर्तकांऐवजी भाजप प्रवक्त्याकडून आले असते तर त्याच मुद्द्यांचे जोरदार समर्थन झाले असते.
इतकं विचित्र वाटत होतं वाचताना.. गुरुजींचा प्रतिसाद आहे की अंनिसच्या कोणाचा हेच कळत नव्हतं.. :-)
14 Jul 2016 - 4:37 pm | माहितगार
का ब्रे, किमान थेअरॉटीकली सनातनची अधिकृत भूमिका शास्त्र आणि तर्काधारीत असणे अभिप्रेत असताना, त्यांचा विरोधाभास होत असेल आणि गुरुजी प्वाईंट आऊट करत असतील तर काय चुकले यात अंनिस कुठून टपकली म्हणतो आम्ही. सर्वात चांगली गोष्ट भाजपा सनातन संस्थेला आंदण गेलेली नाही आणि त्यांचे सर्व वर्तन शास्त्र आणि तर्काला धरून नाही हा संदेश प्रवक्त्यांनी दिलेला दिसतो :)
14 Jul 2016 - 5:19 pm | बाळ सप्रे
ROFL
14 Jul 2016 - 8:06 pm | बोका-ए-आझम
किती निर्व्याज हास्य ते! एखादी गोष्ट समजली नाही की लहान मुलं अशीच हसतात!
14 Jul 2016 - 8:09 pm | ईश्वरसर्वसाक्षी
अहो असे का करता बोका भौ ! त्यांचे नावच तर 'बाळ' आहे ;)
14 Jul 2016 - 5:25 pm | जगप्रवासी
झाकीर नाईक याची स्मरणशक्ती चांगली आहे, त्याला आपली गीता पाठांतर आहे पण या पाठांतराला तो ज्ञान समजतोय. विचित्र माणूस आहे, काहीही बरळतोय.
जाताजाता : नाईक म्हणजे मूळ मराठी का? म्हणजे मुस्लिमांनी जबरदस्तीने धर्मांतर केले असावे आणि खापरपणजोबा / पणजोबां पासून चालत आलेल्या धर्माला स्वतःचा धर्म मानतोय का?
14 Jul 2016 - 6:20 pm | माहितगार
पाठांतर चांगले असणार्यांना सोईस्कर तेवढे उधृतकरणे कठीण नसते, लोक पाठांतराला दाद देत असतात त्यातील विश्लेषण तर्कपूर्ण असेलच असे नाही किंबहूना बर्यापैकी तर्कदोष असू शकतात.
ह्या लेख दुव्यात त्यांच्या काही तार्कीक उणीवा मुद्देसूद खोडलेल्या दिसतात लेख पटतोय का बघा.
ते मुंबईतले आणि व्यवसायाने डॉक्टर होते, कोणातरी साऊथ आफ्रीकेतील मूलतत्ववादी विचारवंताच्या प्रभावा खाली आले असावेत. व्यक्तिगत माहिती पेक्षा त्यांचे मुद्दे तर्कशुद्धपणे खोडले जाणे महत्वाचे, असो.
14 Jul 2016 - 6:46 pm | हुप्प्या
https://www.youtube.com/watch?v=rIJ_3BccAIU
ह्यात तो म्हणतो की तो मराठी समजू शकतो पण बोलू शकत नाही.
अवांतरः अनेकदा असे आढळते की मूळचे महाराष्ट्रातले मुस्लिम अट्टाहासाने उर्दू बोलतात जे अत्यंत भ्रष्ट, मराठीची सरमिसळ असणारे असते. मुस्लिमाने घरात मराठी बोलले तर तो बाटेल असा गैरसमज त्यांनी करुन घेतला आहे का देव जाणे! वास्तविक, बाहेरच्यांशी बोलताना ह्यातले कित्येक लोक अस्खलित मराठी बोलतात पण घरी नाही.
दक्षिणेतील तमिळ, मल्याळी मुस्लिम सर्रास तमिळ वा मल्ल्याळी बोलतात. मोडकी तोडकी उर्दू बोलत नाहीत. मुस्लिमांची धार्मिक भाषा अशी कुठली असेल तर ती नि:संशय अरबी हीच आहे. उर्दू वा अन्य कुठली नाही तरी स्थानिक भाषेपेक्षा उर्दूला भारतातील अनेक भागातील मुस्लिम जास्त जवळची मानतात.
14 Jul 2016 - 7:58 pm | बोका-ए-आझम
मुस्लिमांशी संबंध आलेला आहे. कोकणी मुस्लिम आपल्या भाषेला दालदी भाषा असं म्हणतात असं त्यांच्याकडूनच कळलं. मराठवाड्यातील मुस्लिम (परभणी, नांदेड इथले) आपल्या भाषेला दख्खनी उर्दू म्हणतात. त्यांच्यातल्या कुणीही मराठी आपली भाषा असल्याचं म्हटलं नाही, मराठी येत असलं तरी. महाराष्ट्रातल्या बाकीच्या भागातील मुस्लिमांबद्दल माहित नाही.
14 Jul 2016 - 7:13 pm | भंकस बाबा
हेच म्हणतो आहे मी, त्याने केलेले वादविवाद बघितले (ऐकले)तर याची प्रचिती येईल.
विचारलेल्या अपेक्षित प्रश्नाना उत्तर देण्यापेक्षा त्या विषयाला दळने जास्त पसंद करतो तो.
हिंदू वा किरिस्ताव पैकी असाच कोणी भांड जर त्याच्या विरोधात वादविवादाला उभा राहीला तर कपिल कॉमेडी नाइटपेक्षा विनोदी कार्यक्रम होऊन जाईल
15 Jul 2016 - 2:51 am | गामा पैलवान
श्रीगुरुजी,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला.
१.
>> अघोरी प्रथा पद्धतशीरपणे बंद करायची म्हणजे काय करायचं?
म्हणजे पाळण्याऐवजी सुपात बाळ ठेवायचं. आणि विहिरीऐवजी घरच्या उथळ रांजणात सोडायचं. एव्हढा साधा तोडगाही असू शकतो ना?
२.
>> पूर्वी कर्नाटकातील चंद्रेगुत्ती इथे नग्नपूना चालायची.
नग्नपूजा हिंदूंच्या कुठल्याही भक्तीग्रंथांत नाही. हां, तांत्रिक विधी असू शकतो. पण भक्तीमार्गाने जाणाऱ्याने तांत्रिक साधना करायची नसते. नग्नपूजेस शास्त्राधार नाही.
३.
>> शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश हवा का नको याविषयी शंकराचार्यांची मते काहीही असोत,
>> तिथे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने प्रवेश हवाच असे माझे मत आहे. परंतु वर्तक मात्र याबाबतीत
>> शंकराचार्यांचा सल्ला घ्यावा असा आग्रह धरीत होते. मूर्खपणा तो हाच.
कशाला हवाय महिलांना पुरुषांबरोबर प्रवेश तिथे? काय थोर समता साधली जाणार आहे? नियम पाळायचे नसतील तर सार्वजनिक जागी जाऊ नये.
४.
>> तृप्ती देसाई पाखंडी असो वा अजून काही असो, तिने पुढे आणलेला मुद्दा योग्यच होता
मुद्दा आजिबात योग्य नाही. महिलांवर अन्याय करायच्या उद्देशाने प्रथा सुरू झाली नाही.
महिलांना जिथे प्रवेश वर्ज्य आहे तिथे त्यांनी जाऊ नये. तरीही ज्या बायकांना स्पर्श करून दर्शन घ्यायचंच आहे त्यांनी खुशाल घरी शनीचा पाषाण बसवून त्याची दैनंदिन पूजा करावी.
५.
>> असे असेल तर मग साईबाबांची पूजा करू नका असा अत्यंत मूर्खपणाचा आदेश त्यांनी का काढला?
>> आणि सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष का केले?
ते तोतया शंकराचार्य आहेत.
६.
>> खून झाला त्याच दिवशी लगेचच सनातनवर संशयाची सुई वळलेली होती.
पृथ्वीराज चव्हाण काहीबाही बरळले म्हणून सनातन संस्थेने गप्प बसायचं का? वाघ म्हंटलं तरी खातो, वाघोबा म्हंटलं तरी खातो. मग वाघुरड्या का म्हणू नये?
७.
>> दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या फोटोवर
>> लाल फुली मारणे यात कसली आली आहे डोंबलाची साधना? ही तर निव्वळ मनातील मळमळ.
फुल्लीचं चित्रं अगोदरपासून होतं. आणि ज्याला तुम्ही निंदानालस्ती म्हणताय ती केवळ एक ओळ होती. 'दाभोलकरांना विकलांग मृत्यू न येत सत्वर मृत्यू आला हे वाईटातले चांगले आहे' अशा काहीशा अर्थाची ती ओळ होती. असेच उद्गार सरोजिनी नायडूंनी गांधीहत्येनंतर काढले होते. 'He died a king's death' असं काहीसं वाक्य होतं. त्याबद्दल सरोजिनींना कोणी दोष देत नाहीत.
८.
>> पोलिस अक्कलशून्य आहेत हे माहित असताना कशाला त्यांच्या हातात कोलीत द्यायचं? त्यातून त्रास होणार तो
>> तुम्हालाच होणार ना? माकडाच्या हातात कोलीत दिलं व त्याने घराला आग लावली तर नुकसान माकडाचं का तुमचं?
पोलिसांच्या डोक्यावर जो कोणी बसलाय त्याला सरळ करायला पाहिजे. उलट गप्प बसलं तर अनिष्ट वृत्ती फोफावणार नाही का?
९.
>> दाभोळकर हे फ्रॉड आहेत हे केवळ सनातन प्रभात मध्ये आरोप करून सिद्ध होत नाही. हे आरोप न्यायालयात
>> सिद्ध व्हावे लागतात. नुसते शाब्दिक आरोप करत बसला तर तुमचा केजरीवाल होतो.
दाभोलकरांच्या न्यासाने हिशेब सादर केलेले नाहीत. याला आरोप नाही, तर वस्तुस्थिती म्हणतात. दाभोलकरांच्या न्यासांच्या मालमत्तेवर टाच आणली पाहिजे. दाभोलकरांच्या फ्रॉडचे काही पुरावे इथे आहेत : http://shankhnaad.net/india/corruption/item/18-article-126
तसेच इथेही अधिक पुरावे मिळतील : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial...
१०.
>> सनातन ही मूर्खांची संस्था आहे याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपल्या वर्तनाने सनातनच्या
>> लोकांनी ते अनेकवेळा सिद्ध केलेलं आहे.
गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था मूर्खांची असल्यास शहाणे कोण हा प्रश्नंच आहे.
आ.न.,
-गा.पै.
15 Jul 2016 - 10:29 am | माहितगार
१) (अगदी भक्तीपंथीयांची) एखादी पूजापद्धती अमूक किंवा तमूक ग्रंथात असलीच पाहीजे हा नियम हिंदू धर्मात कधी पासून लागू झाला. अप्रत्यक्षपणे ग्रंथबद्द्ध न झालेल्या सर्व पूजा बंद केल्या जाव्यात असे तुम्हाला म्हणायचे नसावे. हिंदू कुलाचारातील असंख्य पूजा पद्धती एखाद्या कोणतीही व्यक्ति ते ज्यात्या काळातील ज्यांच्या त्यांच्या गुरुंनी सांगीतलेल्या असू शकतात ते घरातील /समुदायातील एखाद्या व्यक्तीला अमुक तमुक स्वप्नपडले आणि पूजा चालू झाली अश्याही असंख्य पूजा आहेत.
२) आपले "असू शकतो" हे कयासात्मक विधान वास्तवास धरून असण्याबद्दल सॉल्लीड साशंकता आहे. चंद्रेगुत्तीची पूजा बहूधा केवळ अमुक तमूकला स्वप्नपडले किंवा काय सर्वसामान्य अंधश्रद्धेतून हनुमानाची झालेली भक्तीमय उपासना -तेही हनुमानाचे वैराग्य शुकासारखे आहे या विश्वासाने- होती त्याचा बहुतेक तांत्रिक विधीशी संबंध लावणे बहुतेक वाजवी नसावे (चुभूदेघे कदाचित श्रीगुरुजींना माहित असेल तर सांगू शकतील)
३) आजच्या काळात पुर्वीप्रमाणे तांत्रिक साधना तेवढ्या प्रमाणावर होत नसाव्यात, तथाकथीत तांत्रिकसाधनाही भारतातच विकसीत झाल्या आहेत त्यातील काही तांत्रिकसाधना भक्तीमार्गीही असू शकतात. अर्थात यात बर्याचदा अघोरी अंधश्रद्धा तांत्रिकतेत असत आणि तशा अघोरी अंधश्रद्धांच्या निराकरण करु इच्छिणार्या सुधारणावाद्यांना हिंदू द्वेष्टे ठरवले जाते आहे? काही भक्तीसांप्रदायिकांना नको असलेतरीही तांत्रिकसाधनाही एका अर्थाने हिंदूधर्माच्या भाग ठरतात तांत्रिकसाधना करणार्यांनी विरोधकांना हिंदूद्वेष्टे म्हणावे का ? मी तांत्रिकसाधनांचा समर्थक नाही केवळ उपरोक्त प्रतिसादातील विरोधाभास दर्शवण्याचा प्रयत्न करतो आहे.
४) नग्नच काय कोणत्याही झाना म्हणतात तसे कोणत्याही सगूणसाकार पूजेचे हिंदूधर्मात आधार बर्यापैकी ढिसाळ असावेत. वेदा आणि अमुकतमूक ग्रंथशास्त्रात नसलेल्या अनेक पूजा विधींचा शोध भारतीयांनी आपापल्या मर्जीने लावले सर्वपूजा पद्धती एकाच परमेश्वरापाशी पोहोचतात या विश्वासाने हिंदू धर्मात सर्वपूजा पद्धती सामावून घेतल्या गेल्या त्यात नग्नपूजेचा समावेश न होण्याचेही कारण नसावे. तुमची आमची मने भ्रष्ट झाली म्हणून नग्नपूजक दिगंबरांना भ्रष्ट का म्हणावे ? अनेक साधू संत दिगंबरावस्थेत इश्वरभक्ती करत. कुणी दिगंबरावस्थेत भक्तीकरत म्हणजे ते तांत्रिक साधना करत हे खरे मानायचे तर गजानन महाराज ते स्वामीसमर्थ अशा असंख्यांची वर्णी जबरदस्तीने तांत्रिकात लावायची किंवा कसे ? शूकासारखा आदर्श कितीही कठीण असला तरी शूकमुनी हाच भारतीय तत्वज्ञानानुसार आदर्श नव्हे काय ? आणि जर तो तसा असेल तर स्त्री असो वा पुरुष दिगंबरावस्थेत दिसले तरी आपापल्या मनावर काबू ठेवणे ज्याची त्याची जबाबदारी होत नाही का ?
५) चंद्रगुत्तेला स्त्रीयांनी अगदी नग्नपूजा करुनही देव त्यांना कोपत नसे देव प्रसन्न होतो अशी भावना असेल तर इतरत्र देवळांमध्ये स्त्रीयांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे कपडे घालून प्रवेश देण्यात अडथळे निर्माण करणे समजणे कठीण नाही का.
15 Jul 2016 - 10:44 am | प्रचेतस
स. रा. गाडगीळ ह्यांच्या 'लोकायत' पुस्तकात तंत्रसाधनेचा सविस्तर परामर्श घेतलेला आहे.
15 Jul 2016 - 10:47 am | कैलासवासी सोन्याबापु
गामाजींस पुस्तक रेफेरेन्स इत्यादी चे धार्जिणे नसावे वल्ली जी, त्यांस फक्त आपल्या कट्टरपणाची जाहिरात करायची असते असा वहीम आहे आम्हांस, असो, ज्याचे त्याच्यापाशी म्हणा!
15 Jul 2016 - 10:50 am | प्रचेतस
अर्थातच.
15 Jul 2016 - 12:24 pm | गामा पैलवान
सोन्याबापू,
जी काही आक्षेपार्ह रूढी आहे तिच्यामागे अध्यात्मिक लाभ आहे का याचा धांडोळा घ्यायची इच्छा आहे. जेणेकरून ती बंद पडल्यास पर्यायी मार्गाने तसाच लाभ मिळवता येईल.
जर अध्यात्मिक लाभ मिळंत नसेल तर आक्षेपार्ह रूढी ताबडतोब बंद करण्यात काही अडचण असू नये.
आ.न.,
-गा.पै.
15 Jul 2016 - 1:04 pm | बोका-ए-आझम
असं काहीही नसतं हो. हे सगळे मनाचे खेळ आहेत. तसं म्हटलं तर स्वतःला उडवून लोकांना ठार मारणाऱ्या आत्मघातकी बाँबरलाही तुला स्वर्गात जायला मिळेल आणि ७२ सुंद-यांचा सहवास मिळेल असं सांगितलं जातंच की. मग त्याची कृतीही आध्यात्मिक लाभ या लेबलाखाली justify करता येईल. मुळात अध्यात्ममध्ये जो आत्म शब्द आहे त्याचा अर्थ मला तरी असा वाटतो की अध्यात्म हे स्वतःपुरतं असावं. इतरांना त्याचा त्रास का? आणि तान्ह्या मुलांना त्रास देऊन आध्यात्मिक लाभ मिळवण्याची अपेक्षा ठेवणं ही आत्यंतिक विकृत गोष्ट आहे. एकीकडे लहान मुलं हे देवाचं स्वरूप असं म्हणणं आणि दुसरीकडे त्यांना आध्यात्मिक लाभासाठी छळणं - हा अव्वल दर्जाचा दुटप्पीपणा अाणि ढोंगीपणा आहे.
15 Jul 2016 - 3:43 pm | कैलासवासी सोन्याबापु
अध्यात्मिक लाभ! क्लासच!! चालू देत, गापै, एक प्रश्न तुम्ही शाकाहारी की मांसाहारी म्हणे?
15 Jul 2016 - 3:44 pm | माहितगार
परंपरेतील अघोरी, सक्ती, शोषण भाग काढून प्रथा परंपरा केवळ प्रतिकात्मक स्वरूपात जपण्यास काहीच हरकत नाही. विहीरीतले पाणि पवित्र समजून त्याला वैज्ञानिक पद्धतीने शुद्धकरुन बाळाची त्याने नजर काढली किंवा तांब्याभर पाण्याने प्रतिकत्मकतेसाठी ओवाळून घेतले तर त्या अंधश्रद्धा सुधारीत स्वरुपात चालवल्यास काहीच हरकत नाही. बगाडच्या दक्षिणभारतीय परंपरेत सुधारणाकरून बगाडला व्यवस्थीत खूर्ची जोडली आहे, खुर्चीत आरामात बसून मंदिराला प्रदक्षीणा करून घ्या काहीच हरकत नाही, पण उगीच पाठी अणकुचीदार वस्तू खुपसून व्यक्तिस्वातंत्र्य असले तरी स्पृहणीय ठरत नाही.
बाकी गुरुजी आणि बोका यांनी उत्तर दिलेच आहे
नवसासायासाच्या रुढी परंपरांमध्ये अध्यात्माचा वस्तुतः काही संबंध नाही. -अध्यात्म हे अपेक्षे शिवाय केलेली भक्ती आहे. भौतीक अपेक्षांनी केलेले विधी हे अंधविश्वास असलेले नवसच असतात. - भौतिक अपेक्षांनी केलेले नवसासायास संत एकनाथ आणि भक्ती मार्गातील इतर काही संतांनीही नाकारलेले दिसून येतात- अंध-विश्वासांमध्ये जोपर्यंत अनिष्ट काही नाही -किंवा सुधारणाकरून त्यातील अनिष्ट भाग काढून टाकला तर आपापले अंध-विश्वास एंजॉय करत रहाण्याचे स्वातंत्र्य हवेच. मुलाचे आयुष्य वाढावे म्हणून नवस केला ओवाळले नजर काढली पण आजारी पडू नये म्हणूनची लस दिली नाही अंधश्रद्देह्तून आंगावर बाळाला पाजले नाही असे होऊ नये ह्याची अंध-विश्वास बाळगताना दक्षता घेतली जावयास हवी.
15 Jul 2016 - 5:41 pm | माहितगार
चंद्रगुत्ते बाबत मी स्त्रीवादी दृष्टीकोणातून बाजू घेण्याचा प्रयत्न केला. चंद्रगुत्तेच्या नाण्याला कदाचित अधिक बाजू असाव्यात हे स्विकारत शर्मीला रेगे संपादीत पूस्तकाचा दूवा देत आहे. अर्थात कर्नाटकातल्याच अक्कामहादेवी यांचे स्त्रीवादी दिगंबर शैवभक्तीचे ठळक उदाहरण उपलब्ध आहे.
15 Jul 2016 - 3:22 pm | श्रीगुरुजी
अरे पण कशासाठी करायचा हा गाढवपणा? कशासाठी इतका आटापिटा? कशासाठी त्या कोवळ्या जीवाचा इतका क्रूर छळ? कशाला सुपात ठेवून रांजणात सोडायचं? कसला डोंबलाचा तोडगा? मूर्खपणाला काही सीमा असते का नाही? खेड्यातले अडाणी मूर्खपणा करतात ते समजू शकते, पण शहरातले/परदेशातले सुशिक्षित जो मूर्खपणा करतात त्याला काय म्हणायचं?
उपहास मोड ऑन -
तान्ह्या बाळाला पाळण्यात घालून खोल, अंधार्या विहिरीत सोडण्याऐवजी सुपात ठेवून घरच्या उथळ रांजणात सोडणे आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यासाठी आधी सूप आणावं लागेल, नंतर घरी सूप तरंगत राहील एवढा मोठा व खोल रांजण आणावा लागेल. एवढे करूनसुद्धा अंधार्या खोल विहिरीतल्या पाण्यात तरंगत ठेवल्यावर बाळाला जी मजा येईल ती मजा सूप उथळ रांजणात तरंगत ठेवून कशी येणार?
उपहास मोड ऑफ -
का? महिलांना प्रवेश न देण्यासाठी महिलांनी काय घोडं मारलंय? कसले डोंबलाचे नियम? कोणी ठरविले हे पक्षपाती नियम?
कोणी ठरविला महिलांना प्रवेश वर्ज्य? त्यांना हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? महिलांनी कशी व कोठे पूजा करायची हे तुम्ही कोण ठरविणार? पाहिजे तर तुम्ही घरी शनीचा पाषाण बसवून पूजा करा.
गप्प बसा असं कोण म्हणतंय? जेव्हा संस्थेवर संशय येऊन संस्थेची व साधकांची चौकशी सुरू झालेली असते तेव्हा अजून मूर्खपणा करून संशय वाढेल असे करू नये हा साधा कॉमनसेन्स आहे. कारण शेवटी जो त्रास होणार तो वर्तक किंवा आठवल्यांना होणार नसून तो सर्वसामान्य साधकांनाच होणार होता.
ती केवळ एक ओळ नसून अनेक वाक्यांतून मनातील मळमळ ओकलेली होती. दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांचा लाल फुली मारलेला फोटो वेबसाईटवर प्रसिद्ध करणे ही विकृती होती.
मूर्खपणा केल्यामुळे पोलिसांच्या डोक्यावर बसलेला झाला का सरळ?
इथे पुरावे देऊन काहीही उपयोग नाही. हे न्यायालय नाही व इथे कोणीही न्यायाधीश नाही. त्यासाठी न्यायालय ही एकमेव योग्य जागा आहे.
पूर्वी 'श्री' नावाचे एक साप्ताहिक निघायचे. ते प्रचंड लोकप्रिय होते. ते मराठीतले टॅब्लॉईड होते. संध्यानंद नावाचे वृत्तपत्रही भरपूर खपते. खपच बघायचा झाला तर 'श्री' वाले प्रचंड शहाणे समजावे लागतील. अमेरिकेतही अत्यंत टुकार मासिके/साप्ताहिके निघतात व त्यांचा खप प्रचंड असतो. ते सुद्धा शहाणेच म्हणायचे.
कितीही ग्रंथ छापले व कितीही प्रती विकल्या गेल्या तरी वर्तन मूर्खपणाचे असल्यास त्यांना मूर्खच म्हणावे लागेल.
15 Jul 2016 - 2:52 am | गामा पैलवान
माहितगार आणि बोका-ए-आझम,
बोकोबांचं हे विधान वाचलं :
>> सनातनकडून जाब विचारण्याबद्दल पैसे मिळणार असतील तर जाब विचारु. फुकटात काहीही काम करु नये.
>> तुम्हीही सनातनची ही भलावण पैसे मिळाल्याशिवाय करत नका जाऊ.
ही अत्यंत घातक विचारसरणी आहे. का ते सांगतो.
ऑगस्ट २००८ मध्ये सुशीलकुमार शिंदे नामे एक थुंकीझेल्या हिंदू दहशतवाद म्हणून काहीबाही बरळत होता. सनातन संस्थेवर बंदी घालायला उतावीळ झाला होता. सोबत दिग्विजय सिंग नामे हुजऱ्याही भगवा दहशतवाद म्हणून छाती बडवत होता. या दोघांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी अस्तित्वात नसलेल्या हिंदू दहशतवादावर लक्ष केंद्रित केलं. यातून पुढे कसाबच्या टोळीला घुसखोरी करता आली. पुढे काय घडलं ते सांगायला नको.
जर चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यात येत असेल तर शासनाला जाब विचारलाच पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
15 Jul 2016 - 7:11 am | चंपाबाई
अरे पैलवाना, तुमच्यासारखे शूर वीर हुशार धर्माभिमानी लोक देशात राहून काँग्रेसशी व सीमेवर जाउन पाकिस्तानशी लढायचे सोडुन परागंदा होउन लंडनमध्ये किरिस्ताव लोकांची सेवा करत पाउंड मिळवत बसले. म्हणुन कसाबचे फावले. असं आमच्या ह्यांचं मत आहे.
15 Jul 2016 - 11:16 am | बोका-ए-आझम
तुम्हाला नक्की कोण देतं? मला तर असं वाटतं की तुम्ही conspiracy theorist आहात. सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंग हे बरळसम्राट आहेत यात शंका नाही पण त्यांची गादी मिपावर तुम्ही का चालवताय? मुंबई हल्ला हे गुप्तचर यंत्रणा, तटरक्षक दल आणि पोलिस यांचं एकत्रित अपयश होतं. सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंग यांनी भगवा दहशतवाद म्हणून जो आरडाओरडा चालू केला तो मालेगाव स्फोटानंतर. त्यानंतर नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई हल्ला झाला. या दोन गोष्टींचा काय संबंध?
माझ्या विधानामागचा हेतू हाच होता की सनातनकडे सनातनचे वकील आहेत, जे सनातनची बाजू यथाशक्ति मांडत आहेत. ते तसं फुकट करत नाहीयेत. त्यांना त्याचा मोबदला मिळत असलाच पाहिजे. तसंच जर आम्हाला सनातनची बाजू मांडण्याबद्दल काही मिळत असेल तरच सनातनची बाजू मांडू. फुकटात काही काम का करायचं? आणि या विचारसरणीमागे धोकादायक काय आहे? जो कुणी पैसे देईल त्याची बाजू वकील नेहमीच मांडतात. आणि कुठल्याही खटल्यात किंवा प्रकरणात किमान दोन बाजू असतातच. त्या मांडल्या गेल्याच पाहिजेत असं कायदा सांगतो.
चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यात येत असेल >>> बरोबर. पण संन्यासी निर्दोष आहे हे संन्याशाला सिद्ध करावं लागेल, किंवा चोर कोण आहे हे शोधून काढावं लागेल. पुरावा ही एकमेव गोष्ट कायदा ओळखतो. त्यामुळे सनातनवाले निर्दोष असतील तर ते सुटतील - त्यांच्यावर कितीही आरोप असले तरी. जर दोषी असतील तर शिक्षा होईल. आता तुमचा जर कायद्यावरच विश्वास नसेल (तुम्ही मागे दिलेल्या एका प्रतिसादावरुन) तर मग गोष्टच संपली.
15 Jul 2016 - 11:24 am | कैलासवासी सोन्याबापु
तुमचे प्रतिवाद इथे व्यर्थ आहे बोक्याभाऊ इतके नोंदवतो
15 Jul 2016 - 11:42 am | बोका-ए-आझम
:)
15 Jul 2016 - 12:31 pm | गामा पैलवान
बोका-ए-आझम,
>> त्यामुळे सनातनवाले निर्दोष असतील तर ते सुटतील
प्रश्न खटल्याचा नाहीये. कारण की सनातन संस्था कुठल्याही खटल्यात आरोप नाहीच्चे मुळी. न्यायालयाने संस्थेस आरोपी मानण्यास स्वच्छ नकार दिलेला असतांना प्रसारमाध्यमांतून संस्थेविरुद्ध जनमत कलुषित करायचे धंदे चाललेत. ही खरी समस्या आहे. या कृष्णकृत्यांमध्ये हमीद आणि मुक्ता हे दाभोलकरांचे नातेवाईक आघाडीवर आहेत. त्यांना सनातन संस्थेवर बंदी आणायची आहे.
आ.न.,
-गा.पै.
15 Jul 2016 - 12:45 pm | गामा पैलवान
बोका-ए-आझम,
>> भगवा दहशतवाद म्हणून जो आरडाओरडा चालू केला तो मालेगाव स्फोटानंतर. त्यानंतर नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई
>> हल्ला झाला. या दोन गोष्टींचा काय संबंध?
माझं जुनं विधान दुरुस्त करायला हवंय. तिथे दिग्विजय सिंग आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी हेमंत करकरे यांचं नाव हवं होतं. इथे एक लेख आहे. कृपया त्यातला दुसरा परिच्छेद पाहावा : http://www.misalpav.com/comment/857736#comment-857736 चोर सोडून संन्याशाच्या मागे पोलीस लागले की गुन्हेगार बळजोर होतात.
उपरोक्त लेखात सनातन संस्थेचं नाव नाही. पण माझ्या आठवणीनुसार त्याच सुमारास सनातन संस्थेवर बंदीची मागणी जोरात होती. २६/११ मुळे ती मागे पडली.
आ.न.,
-गा.पै.
15 Jul 2016 - 3:37 pm | अनुप ढेरे
गा.पैं चे प्रतिसाद वाचून हिंदू मूलतत्ववादी, थोड्या का संख्येने, अस्तिवात आहेत हे मान्य असायला हरकत नसावी राईट?
15 Jul 2016 - 3:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
म्हणजे काय आहेतच!!
किंबहुना,
"पृथ्वी सपाट आहे" अथवा
"अल्लाच्या कृपेने जेव्हा 2 हैड्रोजन अन एक ऑक्सिजनचा अणु एकत्र येतो तेव्हा पाणी नावाचे दैवी गिफ्ट तयार होते"
ह्या धाटणीची वाक्य (भगव्या परस्पेक्टिव्ह मध्ये) खूप सापडतील गापै ह्यांच्या लेखनात (लेखन म्हणजे फक्त लंब्या लंब्या कॉमेंट्स बरंका)
15 Jul 2016 - 4:26 pm | बोका-ए-आझम
गा.पै. यांचे प्रतिसाद हा शुद्ध आचरटपणा आहे. त्याला हिंदू मूलतत्ववाद म्हणणं म्हणजे लय मोठा गैरसमज असेल. मला तर वाटतं त्यांना उचकवायला मजा येते. ते सध्या मोगा/चंपाबै यांना एकटं वाटू नये म्हणून असली मारडाला विधानं करत असावेत. जर त्यांचा त्यांनी केलेल्या विधानांवर १% जरी विश्वास असेल तर मात्र केस गंभीर आहे. मग तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी सहमत व्हावं लागेल.
15 Jul 2016 - 4:42 pm | कैलासवासी सोन्याबापु
भाऊ जर आपण सकल मोगा गटार सकल मुसलमान धर्माशी संलग्न करून पाहत असू (नाही म्हणू नका तुमच्या माझ्यासहित ९९% ऍक्टिव्ह मिपाकर ते मानतात) तर सकल गामावाणी कश्यात मोजावी हे अध्याहृत असावे, त्यात सेलेक्टिव्ह असू नये,असे मनःपूर्वक वाटते
15 Jul 2016 - 4:55 pm | संदीप डांगे
गापै = झाना... ??
15 Jul 2016 - 6:11 pm | माहितगार
ज्ञानाच्या क्षेत्रात लोकप्रीयता हा माहितीचीच्या अचूकतेचा अथवा ज्ञानवंत असल्याचा परिमाण असू शकतो का ? बाकी युरोप आणि ख्रिश्चन जग पृथी सपाट आहे अस बहूमताने आणि लोकप्रीय विश्वासाने सांगत असताना पृथ्वी सपाट आहे असे सांगणारा त्याक्षणी अल्प मतात होता त्याने बायबल एवढ्या कॉपी विकल्या नसतील, बायबलच्या कॉपी अधिक विकल्या जातात म्हणून पृथ्वी सपाट आहे हे सिद्ध होऊ शकते का ? (अनुषंगिक अवांतर : याचसाठी विकिपीडिया ज्ञानकोश असल्यामुळे विकिपीडिया हि लोकशाही नाही आणि असूही नये)
झाना आणि गापैच्या एका तार्कीक उणीवेत साम्य नक्कीच आहे. वरील प्रतिसादांमधून कुणीतरी झाना संबंधीत विवादा संदर्भाने दुवा दिला आहे त्यात झाना / त्यांची संस्था अथवा त्यांची भलावण करणारे एका आंतरजालीय ब्लॉगरला आंतरजालीय विवादाला नकार देताना कारण काय देतात तर झाना स्वतः अमूक इतके लोकप्रीय आहेत म्हणून त्यांचे ज्ञान अद्वितीय का कायसे आहे आणि म्हणून त्याम्च्या पेक्षा कमी लोकप्रीयता असलेल्या व्यक्तिशी ते विवादात/चर्चेत सहभागी होणार नाहीत.
मी श्रीगुरुजींनी वापरलेली विशेषणे वापरताना हात आखडता घेईन तरीही "गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था...." किंवा याच्या हजारपट विकणारी अजून वेगळी असणारी संस्था असू द्यात केवळ लोकप्रीयता हे ज्ञानवंत असल्याचे लक्षण होऊ शकत नाही, सचिन तेंडूलकर पेक्षा कमी लोकप्रीय असलेल्या एखाद्या क्रिकेटरचा क्रिकेटबद्दलचा एखादा तर्क सचिन तेंडूलकरपेक्षा उजवा नसेलच असे सांगता येत नाही, मग सचिन तेंडूलकर कितीही लोकप्रीय असला तरीही.
लोकप्रीय म्हणजे बरोबर या गृहीतकातील तार्कीक उणीवेला तर्कशास्त्रात Argumentum ad populum असे नाव आहे.
The bandwagon effect is a phenomenon whereby the rate of uptake of beliefs, ideas, fads and trends increases the more that they have already been adopted by others. In other words, the bandwagon effect is characterized by the probability of individual adoption increasing with respect to the proportion who have already done so.[1] As more people come to believe in something, others also "hop on the bandwagon" regardless of the underlying evidence.
Argumentum ad populum ची उदाहरणे
* Nine out of ten people in the United States claim this bill is a bad idea, therefore this bill is bad for the people.
* Fifty million Elvis fans can't be wrong.
* Everyone's doing it, therefore it must be good.
* In a court of law, the jury vote by majority; therefore they will always make the correct decision.
* Many people buy extended warranties, therefore it is wise to buy them.
* Millions of people agree with my viewpoint, therefore it must be right.
* The majority of this country voted for this president, therefore this president must, objectively, be a good President.
15 Jul 2016 - 7:07 pm | गामा पैलवान
श्रीगुरुजी,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला.
१.
>> अरे पण कशासाठी करायचा हा गाढवपणा?
एकदम मान्य. पण लोकांना जे सांगायचंय ते त्यांच्या कलाने सांगायला हवं. भारतीय लोकांना धर्माच्या भाषेत सांगितलेलं चटकन कळतं.
२.
>> महिलांना प्रवेश न देण्यासाठी महिलांनी काय घोडं मारलंय? कसले डोंबलाचे नियम? कोणी ठरविले हे पक्षपाती नियम?
ज्याने दृष्टांत देऊन मंदिर उभारायला सांगितलं त्याने हे नियम ठरवले आहेत.
३.
>> कोणी ठरविला महिलांना प्रवेश वर्ज्य? त्यांना हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? महिलांनी कशी व कोठे
>> पूजा करायची हे तुम्ही कोण ठरविणार? पाहिजे तर तुम्ही घरी शनीचा पाषाण बसवून पूजा करा.
ज्याने दृष्टांत देऊन मंदिर उभारायला सांगितलं त्याने हे नियम ठरवले आहेत. ज्यांना ते पाळायचे नसतील त्यांनी तिथे न जाणंच इष्ट. तसंही पाहता शनी शिंगणापूर हे खाजगी मंदिर आहे.
४.
>> जेव्हा संस्थेवर संशय येऊन संस्थेची व साधकांची चौकशी सुरू झालेली असते तेव्हा अजून मूर्खपणा करून
>> संशय वाढेल असे करू नये हा साधा कॉमनसेन्स आहे.
समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करावंच लागतं. त्यात कोणी जर अपमान शोधू पहात असेल तर सनातन संस्था काहीही करू शकत नाही.
५.
>> ती केवळ एक ओळ नसून अनेक वाक्यांतून मनातील मळमळ ओकलेली होती. दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच
>> दुसर्या दिवशी त्यांचा लाल फुली मारलेला फोटो वेबसाईटवर प्रसिद्ध करणे ही विकृती होती.
माझ्या आठवणीप्रमाणे त्या लेखात मळमळ वगैरे काहीही नव्हती. माझ्याकडे मूळ लेख नसल्यामुळे याबाबत चूकभूल देणेघेणे. तुमच्याकडे तो असल्यास कृपया दुवा द्यावा.
फुल्ली मारलेला फोटो पार जुनाच होता. कोणी फ्रॉडस्टर मेला तर त्याच्या फोटोवरही फुल्ली दाखवायची नाही का?
६.
>> मूर्खपणा केल्यामुळे पोलिसांच्या डोक्यावर बसलेला झाला का सरळ?
पण शिरजोर तर होऊ द्यायचा नाही ना त्याला?
७.
>> इथे पुरावे देऊन काहीही उपयोग नाही. हे न्यायालय नाही व इथे कोणीही न्यायाधीश नाही. त्यासाठी न्यायालय
>> ही एकमेव योग्य जागा आहे.
तुम्ही म्हणालात की सनातन संस्थेने कायदेशीर पाठपुरावा करायला हवा. मी तो होतोय हे दाखवून दिलं.
८.
>> कितीही ग्रंथ छापले व कितीही प्रती विकल्या गेल्या तरी वर्तन मूर्खपणाचे असल्यास त्यांना मूर्खच म्हणावे लागेल.
म्हणूनच तर शहाणे कोणास म्हणावे हा प्रश्न पडलाय. कोणी शहाणा दाखवून देता का?
९.
>> पूर्वी 'श्री' नावाचे एक साप्ताहिक निघायचे. ते प्रचंड लोकप्रिय होते. ते मराठीतले टॅब्लॉईड होते. संध्यानंद
>> नावाचे वृत्तपत्रही भरपूर खपते. खपच बघायचा झाला तर 'श्री' वाले प्रचंड शहाणे समजावे लागतील.
>> अमेरिकेतही अत्यंत टुकार मासिके/साप्ताहिके निघतात व त्यांचा खप प्रचंड असतो. ते सुद्धा शहाणेच म्हणायचे.
साप्ताहिक श्री, संध्यानंद आणि अमेरिकेतली टुकार नियतकालिके यांच्यातला मजकूर आणि सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथातला मजकूर यांत गुणात्मक फरक आहे.
याउपर तुम्ही आता स्वत:ला आवरा म्हणून सुचवणार होतो. पण उपरोक्त गुणात्मक भेद तुमच्याकडून दुर्लक्षिल्याने मी स्वत:स आवरायचं ठरवलं आहे.
या विषयाबाबत पुढे चर्चा करता येईलसं वाटंत नाही. म्हणून तुमच्याशी चालू असलेल्या चर्चेस माझ्याकडून पूर्णविराम.
आ.न.,
-गा.पै.
तळटीप : सनातन प्रभातमधला दाभोलकरांच्या हत्येनंतरचा लेख मिळाला तर तेव्हढ्यापुरती मर्यादित चर्चा करता येईल.
16 Jul 2016 - 1:41 am | कैलासवासी सोन्याबापु
१. तद्दन मूर्खपणा आहे हा, भारतात लोकांना फक्त धर्माच्या कलाने सांगितलेले पटकन कळते हा अतिशय भंपक डायलॉग आहे, असे खरेच असल्यास ते पूजा कर्मकांड, सनातन, पानसरे-दाभोळकर, प्रागतिक-कर्मठ, सगळे घाला गाढव/गाढवीच्या नेमक्या अवयवात, पहिला आसाराम ते झाना सगळी कोकरे पकडून आणा अन त्यांस, जनतेला पार लोकसंख्या नियंत्रण ते गावात संडास बांधणे सगळे समजवायला सांगा, बघू धर्माच्या कलाने किती लोक ऐकतात ते, अन बघू किती धर्म हे सगळे सांगतात ते करायला
२. & ३. दृष्टांत तुम्हाला दिलाय का त्या देवाने?? नाही इतके ठामेठोक सांगताय म्हणून विचारले हो, बरं, दृष्टांत देणारा इतका कनवाळू होता/आहे अन त्याचेच नियम आहेत तर त्याने त्याच्या चौथऱ्यावर जायला लाठ्या खायला तयार असलेल्या पोरीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत द्यावा की बाळे नको येऊ वरती शिळेपाशी तुझ्या ह्या आकाशातल्या बापाला त्रास होतोय,दिलाय का असा काही? दिला असेल तर बोला, किंवा मूळ दृष्टांत तुम्हाला तरी दिलाय का बोला?
४. सनातनला ही अवघडजागची दुखणी निस्तरायचा ठेका कोणी दिलाय म्हणे? मी हिंदू आहे अन मी असा कुठलाही हक्क सनातनला दिलेला नाहीये, त्यामुळे उगाच तोंड उघडावे लागते वगैरे मखलाशी सोडा
५.लेख वाचलाय तरी का? की आपलं उगा शनिदेवाच्या दृष्टांतासारखेच मजा मजा ??
६.कोण कधी शिरजोर झालाय? जगभरातल्या गाढवांचा हा छंद झालाय नुसता कोणी एक राज्यकर्ता शिरजोर झाल्याचे धर्माच्या मागे लपून बोंबलत सुटायचे! अन त्याला शिरजोर न होऊ देण्याच्या नावाखाली कायदे हातात घेऊन स्वैर वागायचे! हाड तिच्येयला त्या धर्मांच्या
७.नो कॉमेंट्स
८.असोच
९.आहे तर गुणात्मक फरक आहे की! संध्यानंद मध्ये किमान काहीतरी कामाचे असते हो! नाही काही तर कोडीच! अमेरिकन टुकार प्रकाशनांबद्दल इथे बोलत नाही , अगदीच अनभिज्ञ असाल तर तुम्ही आयुष्यातल्या एका आनंदाला मुकला आहात असे म्हणेल
सनातनवर मी मेसचा डबाही ठेवत नसे/ ठेवणार नाही! आधीच भातात कचकून सोडा त्यात ह्यांचा आचरटपणा, काय तर म्हणे नमस्कार करताना अमुक अँगल असावा अन तमुक मुहूर्ताला कुठली ती सुब्रह्मण्यम किरणे शोषली जातात, साधकाच्या घरात इतक्या किरण शलाका असतात का लेकाचं 450 स्क्वे फु चा हॉल किचन आहे का अँड्रॉमेडा अभ्रिकेतला एखादा सुपरनोव्हा तेच कळत नाही
आयुष्यात कधी हे तोंडून निघेल असे वाटले नव्हते तारीही
मी गुरुजींशी सहमत आहे ह्या बाबतीत
15 Jul 2016 - 7:48 pm | गामा पैलवान
माहितगार,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. सनातनचे ग्रंथ किती लोकप्रिय आहेत हे सांगायचा हेतू नाहीच्चे मुळी. वर श्रीगुरुजी सनातनवाल्यांना मूर्ख म्हणंत होते, त्यासंदर्भात ही ग्रंथविक्री बघायला हवी.
सुमारे पावणेदोनशे ग्रंथांच्या पन्नासेक लाख प्रति विकल्या गेल्या. म्हणजे प्रत्येक ग्रंथाच्या पंचवीसहजार ते तीसहजार प्रती झाल्या. धार्मिक विषय पाहता हा आकडा जरा जास्तच वाटंत नाही का? शिवाय हे सगळे ग्रंथ गेल्या वीसेक वर्षांत कोणीतरी लिहिलेले आहेत. बायबल वा वैदिक संहितांसारखे अगोदरपासून अस्तित्वात नाहीत.
सांगण्याचा मुद्दा काये की एव्हढे ग्रंथ आणि एव्हढ्या प्रती निर्माण करून छापून विकण्यासाठी आणि वाचकांना विकत घ्यावेसे वाटण्यामागे केवळ मूर्खपणाच आहे का? की इतर काही पद्धती कार्यरत आहे?
आ.न.,
-गा.पै.
15 Jul 2016 - 7:54 pm | संदीप डांगे
म्हणजे मूर्खपणाही आहे हे तुम्ही कबुल करताय तर... ;) असो.
'मूर्खपणा हा संसर्गजन्य आजार आहे'
15 Jul 2016 - 8:23 pm | माहितगार
गापै वर ब्यांडवॅगन इफेक्टची मिहिती जोडली आहेच. आता कम्यूनल रि-इन्फोर्समेंट वाचा.
Communal reinforcement is a social phenomenon in which a concept or idea is repeatedly asserted in a community, regardless of whether sufficient empirical evidence has been presented to support it.[1] Over time, the concept or idea is reinforced to become a strong belief in many people's minds, and may be regarded by the members of the community as fact. Often, the concept or idea may be further reinforced by publications in the mass media, books, or other means of communication. The phrase "millions of people can't all be wrong" is indicative of the common tendency to accept a communally reinforced idea without question, which often aids in the widespread acceptance of factoids.
factoids = The term factoid can in common usage mean either a false or spurious statement presented as a fact
16 Jul 2016 - 1:57 am | गामा पैलवान
माहितगार, सनातन संस्थेच्या संदर्भात (तुमच्या मते) फ्याक्टॉईड काय आहे?
आ.न.,
-गा.पै.
16 Jul 2016 - 9:02 am | चंपाबाई
ग्रंथाच्या किती कॉपी विकया गेल्या यावर शहाणपण ठरते. .... बायबल व कुराणांच्याच कॉपी जास्त विकलया गेल्या आहेत ना?
16 Jul 2016 - 9:22 am | बोका-ए-आझम
१. तसं म्हटलं तर जगात कोकेन आणि हेराॅईनचा खप हा भरपूर जास्त आहे. या अंमली पदार्थांचं सेवन करणारे सगळेच तुमच्या मताप्रमाणे हुशार म्हणायला हवेत. नाही का?
२. सनातनविषयी म्हणायचं तर एवढी पुस्तकं विकली गेली हे सिद्ध करणारा एखादा third party, neutral पुरावा आहे का? सनातनवाले काहीही म्हणतील. आपल्या न विकलेल्या वर्तमानपत्राच्या प्रती रद्दीवाल्यांकडे देऊन आपल्या circulation चे आकडे फुगवून सांगण्याबद्दल अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रे बदनाम आहेत. सनातन असं काही करणारच नाही असं कशावरून?
३. ही पुस्तकं कोण घेतंय? त्यांच्यावर ही पुस्तकं विकत घेण्याची सक्ती केली जात नाहीये कशावरून?
४. एवढे ग्रंथ विकून कमावलेल्या उत्पन्नाचा सनातनने हिशोब दिला आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी जे पैसे लागतील ते सनातनकडे कुठून आले?
16 Jul 2016 - 10:58 am | गामा पैलवान
बोका-ए-आझम,
खप जास्त आहे म्हणजे मजकूर चांगला आहे हा युक्तिवादाचा मुद्दा नाहीये. ज्याअर्थी खप आहे त्याअर्थी त्याच्या मागे भलीथोरली यंत्रणा कार्यरत आहे. श्रीगुरुजी सांगतात तसा मूर्खपणा असता तर एव्हढा खप वाढला नसता. हा मूळ मुद्दा आहे.
हेरॉईन सेवणारे महान असोत वा नसोत, त्याचं उत्पादन आणि वितरण यांमागे बुद्धिमान यंत्रणा असतेच ना?
खपाचे हिशोब संस्थेच्या कार्यालयात मिळतील.
आ.न.,
-गा.पै.
16 Jul 2016 - 11:39 am | माहितगार
झाना बहुतेक आपल्याशी सहमत होऊ शकतील, पण तुम्हीही याच मुद्यावर त्यांच्याशी सहमत व्हावे अशी त्यांची अपेक्षा असेल (असा कयास)
17 Jul 2016 - 12:30 pm | गामा पैलवान
माहितगार,
चर्चेचा विषय सनातन संस्थेचा मूर्खपणा हा आहे. ही पार्श्वभूमी विसरता कामा नये. अवांतर टिपणीवरून अन्यथा बाबा रामदेव आणि असदुद्दिन औवेशी हे देखील कशावर तरी सहमत असलेले दाखवता येऊ शकतात.
आ.न.,
-गा.पै.
17 Jul 2016 - 12:57 pm | माहितगार
गोलपोस्ट मी बदललेली नाही माझ्या दृष्टीने धाग्याची मूळ गोलपोस्ट झानाहीच आहे.
17 Jul 2016 - 8:10 pm | गामा पैलवान
माहितगार, बरोबर आहे तुमचं. 'सनातन संस्थेचा मूर्खपणा' हा विषय अवांतर या छापाखाली चर्चिला जायला हवा होता.
आ.न.,
-गा.पै.
16 Jul 2016 - 12:22 pm | शाम भागवत
दुनिया झुकती हैं | झुकानेवाला चाहिए |
चंपाबाईंनी हे सिध्द करून दाखवलेय.
धागा झानावर पण ७८% मजकूर सनातन, हिंदूधर्म वगैरेवर. मी मजकूराबद्दल बोलतोय. पोस्टींची संख्या विचारात घेतलेली नाही. माणसाला उचकवायचे, म्हणजे तो चिडतो आणि असा राग आलेल्या माणसांना मग मेंढरासारखे कसेही हाकलता येते हे अगदी खरे आहे. (अगदी मिपा सोडायलाही प्रवृत्त करता येते.)
या आभासी दुनियेत राग आवरता येण्याची कला जर आपण शिकलो तर प्रत्यक्ष जीवन जगताना आपल्याला त्याचा खूप उपयोग होईल. यास्तव राग आवरण्याची नेट प्रॅक्टीस करण्यासाठी म्हणून मिपावर वावरण्याची सुबुध्दी जेव्हा आपल्याला होईल तो खरा सुदिन असेल.
16 Jul 2016 - 12:49 pm | माहितगार
+१
16 Jul 2016 - 12:59 pm | चंपाबाई
नेमके कुणाला , काय लिहुन उचकवले , हे समजेल का ?
16 Jul 2016 - 2:47 pm | श्रीगुरुजी
झाकिर नाईकचे दिग्विजय सिंह यांच्याकडून उघड समर्थन!
http://www.loksatta.com/pune-news/digvijay-singh-supporting-zakir-naik-1...
20 Jul 2016 - 7:20 pm | हुप्प्या
झकीर नाईक हा दहशतवादाचा वा आत्मघातकी हल्ले करणार्यांना चूक ठरवताना निरपराधांना मारणे हे पाप, युद्ध नसताना आत्मघातकी हल्ला हे पाप म्हणतो. पण निरपराध कोण हे कसे ठरवणार? परमपवित्र इस्लामला कबूल न करता अन्य धर्माचे पालन करणे हेही कुणी अपराध समजू शकतो, कुराणातील आयते माहित नसणे हा अपराध समजू शकतो. महंमदाला शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित न मानणे हाही अपराध होऊ शकतो. लोकशाहीत प्रत्येक नागरिक हा सरकारच्या चुकीकरता अपराधी समजला जाऊ शकतो. त्यामुळे निरपराध ही ग्यानबाची मेख मारुन अतिरेक्यांचे काम सोपे केले आहे.
इस्लाममधे दारुल इस्लाम आणि दारुल हरब (की खरब) असे जगाचे विभाग केले आहेत. जिथे इस्लाम प्रभावशाली नाही त्या जागेला दारुल हरब म्हणजे युध्दाची वा संघर्षाचे स्थान असे म्हटले जाते. आता युद्धाची सबब आणणे किती सोपे आहे नाही? भारत, अमेरिका, फ्रान्स ह्या जागांना दारुल हरब ठरवले की मग तिथे आत्मघातकी हल्ले धर्मसंमत आहेत असे म्हणायला नाईकसाब मोकळे! कसे?
29 Jul 2016 - 8:38 pm | हुप्प्या
किंवा आक्रमण हा स्वरक्षणाचा हा सगळ्यात चांगला प्रकार आहे (ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स) अशी म्हण आहे त्याला अनुसरुन झनाजनाबांनी अर्णब गोस्वामीला अब्रुनुकसानीबद्दल माफी मागायला सांगणारी नोटिस बजावली आहे.
बातमी
भारतात यायची हिंमत होत नाही पण असले धंदे चालूच! बहुधा मोदींची पाच वर्षे उलटल्यावर झनासाहेब इतमामाने विमानतळावर उतरतील आणि तमाम भगतगण त्यांचे जंगी स्वागत करतील असे वाटते.
29 Jul 2016 - 9:02 pm | संदीप डांगे
आता इथे मोदींचा काय संबंध?
29 Jul 2016 - 9:13 pm | शाम भागवत
हा हा हा
30 Jul 2016 - 5:01 am | हुप्प्या
काही गृहितके
१. मोदी सरकार पाच वर्षेच टिकेल. लक्षणे तशीच दिसत आहेत.
२. झकीर नाईकावर मोदी सरकार कुठलीही दयामाया न दाखवता (त्यांच्या मते) काटेकोर कारवाई करेल आणि कुठे ना कुठे तो अडकेलच. भाषण नाही तर ज्या प्रकारे, जिथून पैसे मिळवलेत त्यात अडकेल. झकीर नाईकाचे पाठिराखे कधीच भाजपसमर्थक नव्हते त्यामुळे त्यांना दुखवण्याची भाजप पर्वा करणार नाही.
३. मोदी सरकार नंतर येणारे सरकार हे भारतात ज्याला निधर्मी म्हणतात त्या प्रकारचे असणार मग ते काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, जद वा अशांचे कडबोळे असेल. त्यांना झकीर नाईकाचे लाखोंनी असणारे पाठिराखे ही एक हक्काची व्होटबँक म्हणून खुणावत असणार. त्यामुळे तिला दुखवणारे, झनाच्या अटकेसारखे कृत्य ते करण्याची शक्यता फार धूसर.
त्यामुळे झनाला परत यायचे असेल आणि उजळमाथ्याने फिरायचे असेल तर मोदींचा कालावधी उलटल्यावर यावे लागेल असे मला वाटते आहे. सुटकेची आशा असलीच तर ती बिगर भाजप सरकारच्या आधिपत्याखालीच.
30 Jul 2016 - 4:31 pm | आशु जोग
पेपरमधे पण याच बातम्या होत्या
30 Jul 2016 - 4:40 pm | आशु जोग
हुप्प्यारावांचे पेपरमधल्या बातम्यांकडे बारीक लक्ष असते
30 Jul 2016 - 6:07 pm | कानडाऊ योगेशु
झा.ना ने "बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म का स्वीकारला नाही" ह्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराचा युट्युब विडोओ पाहीला. नाईकसाहेबांच्या मते धर्मांतरासाठी बाबासाहेबांची पहीली पसंती इस्लामच होती पण त्यावेळेला मुस्लीमसमाजाने तांचे योग्य तसे स्वागत केले नाही म्हणुन नाईलाजाने बाबासाहेबांनी त्यांच्या दुसर्या पसंतीचा धर्म जो की बौध्द हा स्वीकारला असे तारे तोडले आहेत. एखाद्याची दिशाभूल कशी करावी व धादांत खोटेच खरे आहे हे कसे गळी उतरवावे ह्याचे उदाहरण पाहायचे असेल तर हा विडोओ आवश्य पाहावा.
31 Jul 2016 - 2:45 pm | युरेका
Covert हिप्नोसिस वापरतात जाकिर हुसेन आणि जयंत आठवले दोघेही.इस्लाम चा आक्रमक प्रसार करणाऱ्या मौलांची लेक्चर्स पण याच प्रकाराची असतात. जास्त suggestibility असणारी व्यक्ति त्वरित प्रभावित होते यामुळे,त्या लोकांचे त्वरित मत परिवर्तन होते.ब्रम्ह कुमारी वाले पण हेच technique वापरतात. निशुल्क मेडिटेशन च्या नावाखाली हे लोक सर्व सामान्य लोकांना गोळा करतात .त्यानंतर त्या लोकांमधले जास्त suggestibilty असणारे लोक ओळखून त्याना maount अबु ला मोठ्या 10 दिवसाच्या शिबिरासाठी प्रेरित केले जाते,ज्याला बाबाची भट्टी असेही म्हटले जाते, 10 दिवसात त्या लोकांचे पूर्ण ब्रेन वाशिंग केले जाते,पुढे त्या बाबा लोकांनी सांगितलेल्या प्रत्येक बाबींवर हे लोक डोळे zakun विश्वास ठेवतात ,कारण त्याना तसे प्रोग्राम केलेले असते.ओशो ना पण याच कारनासाठी अमेरिकेमधे अटक करण्यात आलि होती,सनातन चे जयंत आठवले हे मास्टर हैप्नोटिस्ट आहेत .दुर्दैवाने ते त्याचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी करत आहेत,
31 Jul 2016 - 2:45 pm | युरेका
Covert हिप्नोसिस वापरतात जाकिर हुसेन आणि जयंत आठवले दोघेही.इस्लाम चा आक्रमक प्रसार करणाऱ्या मौलांची लेक्चर्स पण याच प्रकाराची असतात. जास्त suggestibility असणारी व्यक्ति त्वरित प्रभावित होते यामुळे,त्या लोकांचे त्वरित मत परिवर्तन होते.ब्रम्ह कुमारी वाले पण हेच technique वापरतात. निशुल्क मेडिटेशन च्या नावाखाली हे लोक सर्व सामान्य लोकांना गोळा करतात .त्यानंतर त्या लोकांमधले जास्त suggestibilty असणारे लोक ओळखून त्याना maount अबु ला मोठ्या 10 दिवसाच्या शिबिरासाठी प्रेरित केले जाते,ज्याला बाबाची भट्टी असेही म्हटले जाते, 10 दिवसात त्या लोकांचे पूर्ण ब्रेन वाशिंग केले जाते,पुढे त्या बाबा लोकांनी सांगितलेल्या प्रत्येक बाबींवर हे लोक डोळे zakun विश्वास ठेवतात ,कारण त्याना तसे प्रोग्राम केलेले असते.ओशो ना पण याच कारनासाठी अमेरिकेमधे अटक करण्यात आलि होती,सनातन चे जयंत आठवले हे मास्टर हैप्नोटिस्ट आहेत .दुर्दैवाने ते त्याचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी करत आहेत,
31 Jul 2016 - 2:56 pm | युरेका
सकाळी सकाळी tv वर येणारे ख्रिस्ती पाद्री पण कोवर्ट हिप्नोसिस वापरतात आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रभावित करतात
22 Aug 2016 - 4:02 pm | पक चिक पक राजा बाबू
अगदी बरोबर यूरेका भाऊ