Skip to main content

पुन्हा झकीर नाईक

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 08/07/2016 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8 झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्‍या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो. बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत. खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India) माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात. सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्‍यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल? एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे. असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो? https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU

वाचने 59010
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

नका हो विवेकानंदांचा अपमान करु...
म्हणुनच जवळपास जाणारे असे म्हटले आहे. अर्थात ह्यामागेही एक कहाणी आहे. झा.काचे गुरु शेख अहमद दिदात ह्याने हा -कुराण च्या कुराण व सोबत बायबल ही मुखोद्गत करुन मिशनर्यांना त्यंच्याच धर्मातली वैगुण्ये वगैरे दाखवण्याचा प्रकार- सुरु केला. ह्यामागे ही तो कधीकाळी कुणा मिशनर्यांकडुन अपमानित झाला होता म्हणुन चाळीस वर्षे कम्पॅरिटीव स्टडी करुन मग खुलेआम आव्हान द्यायला सुरवात केली. झा.काने बाकीच्या धर्मांचाही पुस्तकी का होईना अभ्यास केला व जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्या त्या धर्मातील आदरणीय व्यक्तिमत्वांबद्दल काहीही हीन बोलायला कमी केले नाही. ह्या गुरु शिष्य जोडीसंबंधी वाचताना मला रामकृष्ण परमहंस व विवेकानंद ह्या गुरुशिष्य जोडी आठवली. परंतु हजारोंच्या संख्येने जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्य तोंडावर चुकीचे/बरोबर संदर्भ आत्मविश्वासाने फेकुन त्यांना संमोहीत करणे हा प्रकार ही चकित करणारा आहे.

In reply to by संदीप डांगे

त्याच्या पाठांतराबद्दल दोन शब्दः हे पाठांतर अचूक आहे ह्याची मला खात्री नाही. असले तरी तो जे इन्टरप्रीटेशन करतो त्यामुळे त्याच्या पाठांतराला शुन्य कींमत आहे.
मान्य.पण अडचण ही आहे कि त्याला समोरासमोर वादविवाद अजुन कोणी असे सिध्द अथवा म्हणुही शकले नाही. युटुय्ब वरचे जे दुवे आहेत झा.का च्या लेक्चर्सचे पोस्टमार्टेम करणारे ते सगळे त्याचे लेक्चर व्यवस्थित स्टडी करुन मग संदर्भ पडताळून केले गेलेले आहेत. कुराण मधील एक चूक दाखवा मी त्वरीत इस्लामचा त्याग करतो हे त्याचे आव्हान अजुनही कोणी घेऊ शकलेले नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

पुष्कळाणी देण्याचा प्रयत्न केला, अगदी त्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन पण आपल्याला कोंडीत पकडल्यावर झाक्या असा काही आक्रस्ताळीपणा दाखवतो की समोरचि आव्हान देणारी व्यक्ति गांगरुन जाते. रच्याकने झाक्याला इस्लाममधेच पुष्कळसे विरोधक आहेत.त्याच्या मते मझार, दरगे हे गैर इस्लामिक आहेत. तो मुसलमानाना तिथे जाण्यास मना करतो, आता हा मुद्दा घेऊन कोणी इस्लामिक स्कॉलर त्याच्याबरोबर वाद घालताना दिसला नाही. मला वाटते हाच मुद्दा घेऊन जर त्याला चेकाळवले तर त्याचा कलबुर्गी बनण्यास वेळ लागणार नाही, कारण इस्लाममधे ' आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास' अशी स्थिति आहे.

In reply to by भंकस बाबा

त्याच्या यु ट्यूब वरील क्लिप पहा , नुरा कुस्ती प्रमाणे असतात त्या, इथे फक्त हाच फर्क असतो की कुस्ती शेवटी नाइकच जिंकतो,
नुरा कुस्ती ही उपमा मला आठवत नव्ह्ती म्हणून प्रतिसाद देत नव्हतो, योग्य उपमा दिली. हा माणूस मला अजिबात हुशार वाटत नाही.

In reply to by अत्रन्गि पाउस

https://www.youtube.com/watch?v=bk5q9TeGo14 ही क्लिप पहा. त्याच्या अथांग ज्ञानाची खोली फार नाही. थोडेसे खोलात शिरले तर ते लक्षात येते. उदा. हिंदूंमधे मूर्तीपूजा वर्ज्य आहे हे सांगताना तो वेदांचा संदर्भ देतो. पण वेद हेच हिंदूंचे धर्मग्रंथ मानावेत असे कुठे म्हटले आहे? वेद हे कुराणाच्या पातळीवर न्यायचा प्रयत्न हास्यास्पद आहे. शिवाय वेदात इंद्र, वरूण, अग्नी असले आणखी कितीतरी देव आहेत त्यांच्या प्रार्थना आहेत त्यांचे काय? किती हिंदू लोक वेदांचे पारायण करतात? वेद हा माझ्या लेखी एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, चोखामेळा, नामदेव ह्या संतांनी सांगितलेला धर्म लोकांना जास्त समजतो आणि भावतो. ह्या प्रत्येक संताने सगुण उपासना म्हणजे मूर्तीपूजेला शिरोधार्य मानले आहे. विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन अनेक अभंगातून आढळते. हे खरे हिंदू नाहीत का? झकीर नाईकच्या उथळ अभ्यासातून तसा निष्कर्ष निघत असेल पण तो सत्याला धरून नाही. झकीर नाईकाला वादविवाद करण्याचे अनेक लोकांनी निमंत्रण दिले आहे पण तो त्यातून पळ काढतो. http://www.faithfreedom.org/debates/ZakirNaikp2.htm तेव्हा हा माणूस वाटतो तितका विद्वान नाही. जर खुले व्यासपीठ असेल तर त्याचा विचारांनी पराभव करणे शक्य आहे. पण त्याच्या चॅनेलवर तसे स्वातंत्र्य नसते. त्याला वाटले तर तो त्याच्या गुंडांकरवी तुम्हाला हाकलून देऊ शकतो.

दिग्विजय सिंगाने झाकीर शांतीचा प्रसार करतो असे २०१२ साली म्हंटल्याचे स्मरते.

डिसक्लेमर : मी व्हिडीओ माध्यमे पाहणे आणि त्यावर भाष्य करणे खास करून लिखीत मजकूर नसताना सहसा (होताहोईतो) टाळतो त्यामुळे लेखात नमूद युट्युब्स अभ्यासल्या नाहीत. * निसटत्या बाजू १
...पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही.
हा वाक्यांश केवळ अंशीक माहीतीच देत नाही का ? की लिहिण्याच्या घाईत शब्दांच्या निवडीत आणि वाक्य रचनेत तडजोड झाली आहे - आज पर्यंततरी माणसाने मनातल्या मनात काय विचार केला याचे स्वांतत्र्य सगळकडेच बर्‍यापैकी असावे- आपण कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्याबद्दल बोलता आहात- भारतीय राज्यघटने नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुलभूत अधिकार असला तरी ते अमर्याद नाही पण सर्वसाधारण पणे काही अपवादात्मक स्थिती सोडल्या तर ते अधिकतम असणे अभिप्रेत आहे किंवा कसे ? अर्थात हा संपूर्ण चित्राचा अंशिक भाग झाला. ते अधिकतम आहे का हा या समस्येतील वेगळ्या सविस्तर चर्चेचा पैलू आहे. या चित्राचा दूसरा भाग अभिव्यक्ती स्वातंत्र्याला राज्यघटना आणि कायदेविषयक संरक्षण मिळाले तरीही ते अधिकतम वापरण्यातले, समाजाकडून / समुदायाकडून / धर्मसंस्था इत्यादीकडून उपस्थित केले जाणारे व्यावहारीक अडथळे, जसे की हितसंघर्ष असलेल्यांचे उत्पातमुल्य उच्चार आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्य निर्भेळपणे वापरण्यावर प्रत्यक्षात मर्यादा आणते. अर्थात असा उत्पातमुल्याचा दबाव असणे भारतीय राज्यघटनेस अभिप्रेत नसावे हे लक्षात घेणे गरजेचे आहे किंवा कसे. इथे अमुकने तमुक केले, तिथे तडजोड केली तर इथे का नको असा पवित्रा घेतला जाताना दिसतो हि एक तार्कीक उणीव आहे एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नसते. * माझे मत
माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही.
जवळपास सहमत आहे. इथे अडचण अशी असते की अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी करुन खंडन करु शकणार्‍यांची संख्या त्यांना उपलब्ध वेळ (आणि असे व्यक्त होण्यासाठी किमान स्वरुपाची सुरक्षा आणि वातावरण) कमी पडत असतात, साशंकीत तर्कांच्या मांडणीचे तर पर्वत उभे असतात मग त्यातील कोणते विचारांचे खंडन करावे याला प्राधान्य देण्याचाही प्रश्न येतो. पण सर्वसाधारण्पणे व्यक्तीगत टिकेकडे लक्ष केंद्रीत न करता मुद्यांच्या खंडनाकडे लक्ष दिले तर वेळ अधिक वाचतो खंडन अधिक व्यवस्थीत होते. (पण प्रत्यक्षात नेमके उलट घडत असते, व्यक्तीगत टिकेस प्राधान्य देण्यात विचारातील तर्कदोषांकडे लक्ष्य वेधायचे राहून जाते - मग तर्कदुषित विचारांच्या मांडणीचा प्रभाव मागील पानावरुन पुढे चालू रहातो ) टोकाच्या विचांरांचे खंडन होऊन मिळत नाही आणि चुकीच्या विचारांनी कुणी प्रभावीत होऊन सामाजिक उपद्रव करत असेल तर तात्कालीक मर्यादीत बंधन घालण्यात काही चुकीचे नाही पण अभिव्यक्तीवरील बंधने कायमस्वरुपी न राहता खंडनावर भर दिला जावयास हवा. अभिव्यक्तीवर बंधन टाकताना अशी निर्मिती खंडनकरण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींना खंडनासाठी उपलब्ध असावयास हवी आणि अशा कृतींचे समिक्षण झाल्या नंतर त्या नंतरच्या काळात -खरेतर बहुसंख्य साहित्य-कला-कृतींच्या प्रकाशनावर विरुद्ध बाजूच्या विचारांच्या मर्यादा आणि तर्कदोष दाखवणार्‍या मंतासहीत चे समिक्षण सोबत जोडणे बंधनकारक करुन साहित्य-कला-वैचारीक अभिव्यक्ती समाजापूढे उपलब्ध रहावयास हवी.

In reply to by माहितगार

१. सॅटॅनिक व्हर्सेस : ह्यावर बंदी का घातली? केवळ मुस्लिम व्होटबँकेकरता. महंमदाला सैतानाने काही ओळी सांगितल्या आणि नंतर त्या ओळी कुराणातून वगळल्या अशी काही तरी गोष्ट आहे ज्यावर हे पुस्तक आधारलेले आहे. पण इराणमधे रश्दीविरुद्ध फतवा जाहीर होताच भारताने ह्यावर बंदी घातली. २. निकाह हा सिनेमा तलाक तलाक तलाक ह्या नावाने प्रदर्शित होणार होता. पण मुस्लिम लोकांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. मग निर्माते बी आर चोप्रा ह्यांना त्याचे नाव बदलून निकाह ठेवावे लागले. त्रिवार तलाक म्हणून घटस्फोट देण्याला कायद्याची मान्यता आहे (अर्थात केवळ मुस्लिम पुरुषांना!) तरी सिनेमाला ते नाव द्यायला बंदी का? ३. लोकमतमधे पिगी बँकेवर आयसिसचा झेंडा छापला म्हणून दंगे झाले. कारण त्या आयसिसच्या "पवित्र इस्लामी" ध्वजावर अल्ला आणि मोहम्मदाचे नाव होते आणि ते डुकरावर (अगदी व्यंगचित्राद्वारेही) दाखवणे हे महापाप! ह्या आणि अशा प्रसंगातून भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अत्यंत मर्यादित आहे हे लक्षात येते. विशेषतः मुस्लिमांबाबत. हिंदूंच्या देवीदेवतांबाबत भारतीय सरकार जास्त सहनशील आहे. तसे असायला नको. सर्वांना सारखेच स्वातंत्र्य मिळायला हवे. ते एखाद्या गटाच्या उपद्रवमूल्याकडे बघून दिले जाता कामा नये.

In reply to by हुप्प्या

याच उत्तर सरकार पेक्षा नरहर कुरुंदकरांकडे अधिक व्यवस्थीत असावे, 'स्वातंत्र्य हे संस्कृती सिद्ध असते' संस्कृती विशीष्ट स्वातंत्र्य देणारी असेल तर तीच स्वाभाविक वाटते. पण त्यापुर्वी स्वातंत्र्याच्या कक्षा सातत्याने वृद्धींगत करून ती सिद्ध करावी लागते.

In reply to by माहितगार

एखादा गट (म्हणजे मुस्लिम धर्मीय लोक) हे कायमच खुट्ट झाले की आमच्या भावना दुखावतात अशी बोंब ठोकतात. प्रत्येक वेळीस अशा वृत्तीला खतपाणी घालून हे लोक कधी व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान करायला शिकतील ही आशा भाबडी आहे. उलट बाकी कुणाला काय बोलायचे ते बोला पण आमच्या धर्माला काही उलटसुलट बोलाल तर खबरदार! अशा प्रकारची वृत्ती जास्त बोकाळत आहे. आगीत तेल ओतून ती विझण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. अशाने स्वातंत्र्याचा कक्षाबिक्षा वद्धिंगत न होता जास्त आक्रसून जात आहेत हे उघड दिसते आहे. चार्ली हेब्दो प्रकरण असो वा डॅनिश कार्टून, चेष्टा वा टिंगल केल्यावर त्याचे प्रत्युत्तर म्हणून जगभर होणारी हिंसा हे हल्लीच्या काळात मुस्लिमांबाबतच का होत आहे? हे स्वातंत्र्याच्या कक्षा सातत्याने वृध्दिंगत होत असल्याचे लक्षण आहे का?

In reply to by हुप्प्या

अर्ध उत्तर संदीप डांगेच्या खालच्या प्रतिसादातून आहे -यातील व्यक्तीपूजा प्रकारांच्या मर्यादांबद्दल समाजास सजग करणे महत्वाची पायरी असावी- आणि अर्धे उत्तर एम जे अकबरांच्या ब्रेक्झिट बद्दलच्या अलिकडील एका लेखात चपखल आले असावे - एम जे अकबर मंत्रिपदावर पोहोचल्यामुळे त्यांचे लेख गुगलणे अवघड झाले आहे. पण अतिरेक्यांचा सामना पोलीस दलांनी करणे जरूरी आहे तेथिल अपयशाचे खापर इतरत्र फोडून उपयोग नाही असा त्याचा मतितार्थ आहे.

In reply to by हुप्प्या

स्त्रीशिक्षण, विधवा विब्वाह , केशवपन, सतीबंदी , महिला पोटगी प्रॉपर्टी कायदे, जातीभेद निराकरण, गणपती आर्टिफिशियल ट्यांकमध्ये सोडणे... ... 'तुम्ही'देखील हे सहजपणाने स्वीकारलेले नाही. आधी प्रचंड विरोध करुन गोंगाट करुन नंतर हे स्वीकारले ना? आठवतय का , की सिलेक्टिव्ह अम्नेजिया झालाय?

In reply to by चंपाबाई

स्वीकारले आहेत ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण मुस्लिमांनी अजूनही धर्मसुधारणा स्वीकारलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हमीद दलवाईंसारख्या सुधारकाला खुद्द त्यांच्या समाजात जी वागणूक मिळाली त्यावरून कळतंच. आजही केरळसारख्या राज्यांत अल्पवयीन किंवा नुकत्याच १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुलीशी लग्न करणे आणि मग तिचा यथेच्छ उपभोग घेऊन तिला फोनवरून तलाक देऊन सोडून देणे असले प्रकार होतात. त्याला अरब निकाह म्हणतात. हे अजूनही -२१ व्या शतकात चालू आहे आणि अजूनही AIMPLB ला तलाकच्या नियमांना हात लावायची इच्छा नाही. हे कशाचं निदर्शक आहे? हिंदू निदान काळानुसार बदलले, मुस्लिम दुर्दैवाने काही अपवाद वगळता बदलायला तयार नाहीत याचंच ना?

In reply to by बोका-ए-आझम

दहा हजार वर्षांच्या हिंदू प्रथा अकबर औरंगजेब वगैरेनी केलेले कायदे , राजा राममोहन रॉय , फुले इ इ चे प्रयत्न , इंग्रजी कायदे व नंतर काँग्रेसची कारकिर्द इ प्रदीर्घ काळातील प्रयत्नानंतर हळूहळू संपल्या.

In reply to by चंपाबाई

तुमचं इतिहासाचं अज्ञान अफाट आहे यात शंकाच नाही. औरंगजेबाच्या कायद्यांनी हिंदू प्रथा संपल्या? असो. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्या संपल्या. मुस्लिमांच्या अजून शिल्लक आहेत. दहा हजार वर्षांपूर्वी हिंदू धर्मात सतीसारखी घाणेरडी प्रथा होती हे आज महत्त्वाचं नाही पण मुस्लिम धर्मात आजही कोणत्याही स्त्रीला तिचा पती तीन वेळा तलाक देऊन घराबाहेर काढू शकतो हा खरा प्रश्न आहे. आणि त्यातून बाहेर पडण्याची त्यांची इच्छा नाही हा त्याहून मोठा प्रश्न आहे.

In reply to by बोका-ए-आझम

सतीची प्रथा दहा हजार वर्षापुर्वी होती ? रमाबै माधवराउ बल्लाळ उर्फ पेशवे अश्मयुगात सती झाल्या की काय ! सतीविरुद्ध कायदे अकबर व औरंगजेबाने केले होते... पण त्याच्या पदरी हिंदू सरदार ढीगभर असल्याने त्याची अम्मल बजावणी करणं त्याना जमणार नव्हते. नंतर सुरु होतो इंग्रजी काळ ... राजा राममोहन रॉय इ इ ... स्त्री शिक्षण इ इ दहा हजार वर्षे सुरु असणार्‍या प्रथा संपायला तीनशे वर्षे लागली !

In reply to by चंपाबाई

सतीविरुद्ध कायदे अकबर व औरंगजेबाने केले होते... पण त्याच्या पदरी हिंदू सरदार ढीगभर असल्याने त्याची अम्मल बजावणी करणं त्याना जमणार नव्हते.
काय सांगता? त्यांचा व्यनि आलेला की काय? तुमच्या नक्की कुठल्या आयडीवर पाठवलेला होता त्यांनी? आणि औरंगजेबाने सतीविरुद्ध कायदा केला होता हे कशावरून? त्याला आणि अकबराला आणि त्याला कधीपासून त्याच्या पदरी असलेल्या हिंदू सरदारांची भीती वाटायला लागली? बरं, अकबराने कायदा केला होता मग औरंगजेबाने तो परत का केला म्हणे? मुघल दरबारातही फायली गहाळ व्हायच्या की काय? काहीही मनात येईल तो इतिहास सांगताय राव. अभ्यास वाढवा जरा.

In reply to by बोका-ए-आझम

Akbar, states Sheikh Muhammad Ikram, was the first Mughal emperor to issue general orders to stop sati.[46] Aurangzeb issued another order in 1663, after returning from Kashmir, "in all lands under Mughal control, never again should the officials allow a woman to be burnt".[46 https://en.m.wikipedia.org/wiki/Sati_(practice)

In reply to by चंपाबाई

त्यावर कोणीही जाऊन काहीही लिहू शकतो हे माहित आहे ना? विश्वासार्हता हा मुद्दा आहे. अकबराचं अस्सल फर्मान वगैरे आहे का? नाही ना? मग संपलं. मी उद्या विकीपिडियावर जाऊन सती ही प्रथाच नव्हती असं लिहू शकतो. त्याला काहीही अर्थ नाही. रच्याकने हा विकीवरचा लेख तुम्हीच लिहिला आहे का?

In reply to by बोका-ए-आझम

सतीप्रथेविरुद्ध अकबराने कायदे केले होते ह्याचा अकबरनाम्यात उल्लेख आहे. रच्याकने सतीप्रथा किमान दिड हजार वर्ष जुनी आहे. मौर्योत्तर काळानंतर जी कर्मकाण्डे हळूहळू सुरु झाली त्यातूनच कधीतरी ही प्रथा उगम पावली असावी. दक्ष राजा, सती, शंकर-वीरभद्र ही कथा किमान गुप्तकाळात जन्म पावलेली असावी. चालुक्यांनंतर ही प्रथा खूपच वेगाने पसरली. ह. अ. भावे ह्याचं 'सतीप्रथेचा इतिहास' नामक एक पुस्तक आहे ( मी अजून वाचलं नाही ते) त्यात नक्कीच अधिक माहिती मिळेल.

In reply to by प्रचेतस

सतीप्रथेविरुद्ध अकबराने कायदे केले होते ह्याचा अकबरनाम्यात उल्लेख आहे.
असे कायदे कुणीही करेल. अंमलबजावणी केली होती का? हे महत्त्वाचं आहे. आणि मुळात अकबरनामा हा अकबराच्या भाटांनी त्याचं गुणगान करण्यासाठी लिहिलेला ग्रंथ असेल तर त्यात ते काहीही लिहितील. ते खरं आहे कशावरून? हजार बखरींपेक्षा एक अस्सल कागदपत्र भारी असतं ना? मग कुठे आहे ते अस्सल कागदपत्र? राजा राममोहन राॅय यांच्या संवाद कौमुदी मध्ये जसे १८२९ मध्ये सतीप्रथा बेकायदेशीर ठरवल्याबद्दल तत्कालीन गव्हर्नर जनरल लाॅर्ड विल्यम बेंटिकचं अभिनंदन करणारी बातमी आहे आणि त्याचबरोबर सनातन्यांनी काढलेल्या चंद्रिका नावाच्या वृत्तपत्रात राॅय यांची निर्भर्त्सना करणारी आणि हा धर्मावर हल्ला असल्याची बातमी आहे आणि ही दोन्हीही वृत्तपत्रं ब्रिटिश म्युझियममध्ये उपलब्ध आहेत (मायक्रोफिल्म) - तसं काहीही इथे नाहीये.

In reply to by बोका-ए-आझम

त्यात बहुधा सतीची एक केस दिलेली आहे. अकबरनामा मजकडे संक्षिप्त स्वरूपात आहे. घरी गेल्यावर बघून सांगतो नक्की काय उल्लेख आहे ते. त्यात नाही मिळाले तर अर्काइव्हवर उपलब्ध असलेली सम्पूर्ण प्रत अभ्यासावी लागेल. हा अर्थात फ़क्त एक ग्रंथ. मुग़ल दफ़्तरात यासंबंधी अजून कागदपत्रे नक्कीच असतील पण ती मला माहीत नाहित.

विचारांचा मुकाबला विचारांनी हा प्रकार झाना सोबत शक्यच नाही. किंबहुना जे जे कोणी कोणाही धार्मिक व्यक्तीला गुरु, आदर्श इ इ मानतात त्यांच्या विचारांना बदलणे शक्य नसते. उदाहरणे अनंत आहेत.

In reply to by संदीप डांगे

..पण ते 'विचार' असतील तर....
हम्म ते जे काही -काठावरचे- बोलतात ते आपल्याला पटणारे नसले तरी काही लोकांना अनीष्ट कृती करण्या इतपत प्रभाव पाडत असेल तर त्याची दखल घेऊन खंडण करण्या जोग्या मुद्द्यांचे खंडण करणे जरुरी राहते किंवा कसे.

In reply to by माहितगार

मिसळपाववर आपण(सर्व) आपल्या आयुष्यावर कपर्दिकही प्रभाव न पाडणार्‍या विषयांबद्दल्ची आपली घट्ट मते मेगाबायटी चर्चांनंतरही बदलत नाही ह्यातून काय ते समजावे.

In reply to by संदीप डांगे

...किंबहुना जे जे कोणी कोणाही धार्मिक व्यक्तीला गुरु, आदर्श इ इ मानतात त्यांच्या विचारांना बदलणे शक्य नसते.
आपल्याला हि व्यक्ती पुजेतून येणारी मर्यादा असेल असे म्हणावयाचे आहे ?

In reply to by माहितगार

हो. व्यक्तिपूजा हा एक भाग झाला. धर्म, समाज, चालिरीती, अस्मिता इत्यादींच्या पारंब्यांना लटकून राहण्याची गरज सामान्य माणसांना असते, ती सुटू नये म्हणून विचारांपेक्षा अविचारांना किंवा फक्त मूढ आदेशपालनाला महत्त्व दिलं जातं. अविचार म्हणजे वाईट विचार नव्हे. अविचार म्हणजे अशी अवस्था जिथे माणूस स्वतःच्या डोक्याने विचार-विनिमय न करता आदर्श-गुरु व्यक्तिने सांगितले ते तसेचे तसे स्विकारतो. मोठा विषय आहे. तुर्तास, विस्तार करावयास मजकडे पुरेसा वेळ नाही ह्याबद्दल क्षमस्व.

In reply to by संदीप डांगे

मुद्दा छान मांडलात, बाकी गोष्टींच्या मर्यादांची वेळ प्रसंगी चर्चा होताना दिसते तेवढी व्यक्ती पुजेच्या मर्यादांची होताना दिसत नाही. व्यक्तीपुजेच्या संदर्भाने पुढे मागे याच विषयावर वेगळा धागा लेख टाकावयास हवा.

वर बर्‍याच प्रतिसादात दाभोळ्कर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा उल्लेख असून या हत्या धार्मिक हत्या असून सनातनच्या सदस्यांनी त्या केलेल्या आहेत असा प्रतिसादकर्त्यांचा ठाम विश्वास आहे. जरा वस्तुस्थिती पाहूया. १) दाभो़ळकर हत्या - ऑगस्ट २०१३ मध्ये दाभोळकरांचा खून झाल्याझाल्या लगेच काही मिनिटातच या खुनामागे सनातन आहे असे आरोप सुरू झाले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी हे आरोप केले. एकप्रकारे पोलिसांचा तपास फक्त एका विशिष्ट दिशेला वळावा हाच त्यामागे उद्देश असावा. हत्येनंतर पुढील २-३ आठवडे पोलिसांना सनातनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. सनातनच्या ६०-७० कार्यकर्त्यांची चौकशी झाली. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. हत्येच्यावेळी झालेले वेगवेगळे २ लाख कॉल्स तपासण्यात आले. सीसीटीव्हीवरील चित्रण अनेक प्रयोगशाळेतून तपासण्यात आले. त्यातून काहीच मिळाले नाही. तपास भरकटलेला होता हे दिसून आले. ४-५ महिन्यांनी अचानक नागोरी व खंडेलवाल या बेकायदा पिस्तुले विकणार्‍यांना हत्येच्या आरोपाखाली अटक झाली. ते ज्या प्रकारची पिस्तुले विकायचे त्याच प्रकारच्या पिस्तुलातून हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. या फुसक्या संशयावरून दोघांना अटक करून तुरूंगात ठेवले. तब्बल ९० दिवस तुरूंगात ठेवून कोणताच पुरावा न मिळाल्याने आरोपपत्र दाखल करता आले नाही व त्यामुळे त्यांना जामिनावर सोडावे लागले. तपास भरकटलेला होता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या खुनानंतर जवळपास दीड वर्षाने फेब्रुवारी २०१५ मध्ये पानसरेंची याच प्रकारे हत्या झाली. नंतर पुन्हा एकदा सनातनवर आरोप सुरू झाले. परंतु काहीच सापडले नाही. नंतर ऑगस्ट २०१५ मध्ये कर्नाटकमध्ये कलबुर्गींचा असाच खून झाला. सप्टेंबर २०१५ मध्ये समीर गायकवाड नावाच्या एका सनातनच्या कार्यकर्त्याला संशयावरून अटक झाली. लगेच त्याचा संबंध दाभोळकरांच्या व कलबुर्गींच्या खुनाशी लावला गेला. आजतगायत समीरचा या ३ खुनांशी संबंध असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. खुनानंतर जवळपास पावणेतीन वर्षानंतर जून २०१६ मध्ये वीरेंद्र तावडे नावाच्या सनातनच्या कार्यकर्त्याला दाभोळकरांच्या खुनाचा आरोपावरून अटक केलेली आहे. तावडेला अटक झाल्याझाल्या वेगवेगळ्या माध्यमातून लगेच सनातनवर दोषारोप सुरू झाले. तावडेकडे काय सापडले याचे रोज अपडेट्स देणे सुरू झाले. आश्चर्य म्हणजे पोलिसांपेक्षा दाभोळकरांचे चिरंजीव व कन्या हेच रोज माध्यमांना अपडेट्स देण्यात पुढे होते. तावडेकडे म्हणे २००९ साली लिहिलेली काही ईमेल्स सापडली. त्यात त्याने हिंदूराष्ट्र निर्माण करण्याबद्दल व त्यासाठी १५ हजारांची सशस्त्र फौज निर्माण करण्याबद्दल लिहिले होते. काय चावटपणा आहे! १५ हजारांच्या फौजेसाठी दरमहा किमान ६०-७० कोटी रूपये लागतील. इतके पैसे तावडे कोठून आणणार होता? ही फौज कोठे राहणार होती? इतकी शस्त्रे कोठून आणणार? या सर्व गोष्टी गुपचूप करणे शक्य होते का? नंतर पोलिसांनी असा दावा केला की तावडे या कटाचा सूत्रधार होता व त्यानेच खुन्यांना शस्त्रे पुरविली होती. खुनात वापरली गेलेली काळी मोटरसायकल म्हणे तावडेच्या काळ्या मोटरसायकलशी मिळतीजुळती आहे (रस्त्यावर दिसणार्‍या प्रत्येक १०० मोटरसायकलींपैकी किमान ९० काळ्या रंगाच्या असतात). पोलिसांनी नंतर एका साक्षीदाराची साक्ष काढली. हा साक्षीदार एका वाहिनीवर तोंड झाकून माहिती सांगत होता. त्याचे नाव पोलिसांनी जाहीर केले नव्हते. नंतर सनातननेच त्याचे नाव जाहीर केले. सनातनने त्याच्यावर एका प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कदाचित त्याचा सूड म्हणून तो साक्ष देत असावा. नंतर म्हणे तावडेच्या बायकोने अशी माहिती दिली की तोच या खुनामागचा सूत्रधार आहे. पोलिस व दाभोळकर कुटुंबीय रोज माध्यमांमध्ये बातम्या पेरत होते. माध्यमांना रोजच्या तपासाची बातमी पुरवू नका अशी शेवटी न्यायालयानेच पोलिसांना तंबी दिल्यावर सर्व बातम्या बंद झाल्या. मुळात दाभोळकरांच्या खुनामागे सनातन आहे याच गृहितकावर जवळपास ३ वर्षे सुरू आहे. त्यामागे दुसरे कोणी असावे ही शक्यताच पोलिसांनी गृहित धरली नसावी. आजतगायत ज्या दोघांनी खून केला ते सापडलेले नाहीत, खुनात वापरलेले पिस्तुल व मोटरसायकल मिळालेली नाही, खुनामागचा हेतू समजलेला नाही, आजवर जे जे पकडले त्यांच्याकडून निर्णायक पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. परंतु सनातनच या खुनामागे आहे याच गृहितकावर तपास सुरू आहे. २) पानसरे हत्या - पानसरेंच्या हत्येनंतर जवळपास ७ महिन्यांनी सनातनच्या समीर गायकवाडला १५ सप्टेंबर २०१५ ला पकडण्यात आले. अजूनही तो अटकेत आहे. त्याला अटक केल्याकेल्या माध्यम ट्रायल सुरू झाली. तो सराईत गुन्हेगार आहे असे अनेक वृत्तवाहिन्यांवरून दाखविले गेले. प्रत्यक्षात त्याच्यावर यापूर्वी एकाही गुन्ह्याची नोंद नव्हती. त्याच्याकडे म्हणे २५-३० मोबाईल सापडले. नंतर जाहीर झाले की तो मोबाईल दुरूस्तीचे काम करीत होता व त्यामुळे त्याच्याकडे २५-३० मोबाईल असणे अगदी स्वाभाविक आहे. पानसरेंच्या खुनातील दोघे आरोपी अजून सापडलेले नाहीत. खुनात वापरलेले पिस्तुल व मोटरसायकल मिळालेली नाही, खुनामागचा हेतू समजलेला नाही. खून होताना पानसरेंच्या पत्नी उमा पानसरे त्याच स्थळी उपस्थित होत्या. त्यांनी खुन्यांना प्रत्यक्ष पाहिलेले आहे. समीर गायकवाडला ओळखपरेडमध्ये त्यांना ओळखता आलेले नाही. खरं तर इथेच तो खटला संपलेला आहे. त्या गल्लीतील इतर ३-४ प्रत्यक्षदर्शींना समीरला ओळखता आलेले नाही. नंतर म्हणे एका १४ वर्षांच्या मुलाने त्याला ओळखले. न्यायालयात हे टिकणार नाही. खुनाच्या वेळी तो ठाण्यात होता असे त्याचे कॉल रेकॉर्ड सांगते. एकंदरीत त्याच्याविरूद्ध काहीच पुरावा दिसत नाही. "मी दोन पापे केली आहेत" असे तो मैत्रिणीला म्हणाला असे पोलिस सांगतात. दोन पापे म्हणजे दोन खून असे कोणतेच न्यायालय मान्य करणार नाही. तरीसुद्धा गेले १० महिने तो अटकेत आहे. पोलिसांनी मे २०१६ मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केल्यावर पानसरे कुटंबियांनी न्यायालयात अर्ज दाखल करून इतक्यात आरोपपत्र दाखल करू नका असा आदेश देण्याची न्यायाधिशांना विनंती केली. म्हणजे समीरला जामिनावर सोडायचे नाही व आरोपपत्र दाखल करून खटलाही सुरू करायचा नाही कारण खटला सुरू झाला तर पुराव्याअभावी तो निर्दोष सुटेल आणि मग सनातनवर कसे आरोप करता येतील? दरम्यानच्या काळात सनातनला झोडपत रहायचे व त्यांनीच खून केलेत असे आरोप सुरू ठेवायचे. पानसरे हत्येचा तपासही एकाच दिशेने सुरू आहे. पानसरे कोल्हापूरमधील टोलला विरोध करीत होते. कदाचित त्याचाही खुनाशी संबंध असू शकतो. परंतु हा मुद्दाच विचारात घेतलेला दिसत नाही. परंतु त्याचा खून सनातननेच केला अशी काही जणांची ठाम श्रद्धा आहे. ३) कलबुर्गी हत्या - कलबुर्गींची हत्या ऑगस्ट २०१५ मध्ये झाली. आजतगायत एकाही संशयिताला पकडलेले नाही. परंतु हत्येसाठी सनातनलाच जबाबदार धरले जात आहे. एकंदरीत या तीनही खुनांमागे सनातनच आहे, याच गृहितकावर तपास सुरू आहे. सनातनविरूद्ध अजूनपर्यंत फारसे भक्कम पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. पकडलेल्यांविषयी माध्यमातून खोट्या बातम्या पुरविण्याचे उद्योग सुरू दिसताहेत. ज्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या त्यातील एकही जण अजून सापडलेला नाही, खुनात वापरलेली पिस्तुले मिळालेली नाहीत, खुनात वापरलेली मोटरसायकल मिळालेली नाही, खुनांमागचा हेतू अजूनही समजलेला नाही. ज्यांना आ़जवर पकडलेले आहे, त्यांच्याविरूद्ध फारसे पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. परंतु तरीही धार्मिक कारणांवरूनच हे खून झाले व या खुनांमागे फक्त सनातनच आहे अशी काही जणांची ठाम श्रद्धा आहे. वास्तविक हे खून अत्यंत सराईत सुपारी किलर्सने केले असावे असे वाटते. साधारणपणे पुढारी, बिल्डर्स, माफिया गँग्ज असे सुपारी किलर्स प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी वापरतात. सनातन ही अत्यंत मूर्ख व दुराग्रही लोकांची संघटना आहे. परंतु सनातनकडे अस सुपारी किलर्स व त्यासाठी लागणारा पैसा व हेतू असेल असे वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आपण वेगळा धागा लेख होईल इतपत मोठे उत्तर दिलेत हे ठिक पण हा सर्वच वस्तुतः वेगळ्या धागा लेखाचा विषय आहे, धागा लेखाचा मुख्य विषय भरकटण्यात फरक पडेल असे दिसत नाही मग झानांच्या (अ)विचारांची चिकित्सा बाजूला पडते. इतरांनी विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला तरी आपण मुख्य विषय हाताळून मग अवांतर प्रकाशित करणे हा ही एक उपाय असू शकतो किंवा कसे.

In reply to by श्रीगुरुजी

अत्यंत अभ्यासपूर्ण अशा संपूर्ण प्रतिसादाला टाळ्या !!
सनातन ही अत्यंत मूर्ख व दुराग्रही लोकांची संघटना आहे.
आणि विशेष करून ह्या वाक्याला standing ovation आणि जोरदार टाळ्या ! सनातन प्रभाताला सनातन धर्माची काडीमात्र अक्कल / जाण नाहीये पण ज्याप्रकारे स्वमतांध दाम्भीक लोक त्यांच्या विरुद्ध कंपूबाजी करत आहेत ते पाहून उगाचच softcorner वाटायला लागलाय ह्या मूर्ख आणि अनाभ्यासू लोकांविषयी !

In reply to by प्रसाद गोडबोले

सनातन प्रभाताला सनातन धर्माची काडीमात्र अक्कल / जाण नाहीये
"दहशतवाद्यांना खरा इस्लाम कळलाच नाहीये" या पठडीतले वाक्य!!

In reply to by भोळा भाबडा

सनातन वाल्यांचा धिक्कार्/अव्हेर करायला माणसं पुढाकार तरी घेतात मिपावर्/जालावर आणि प्रत्यक्षात पण दहशतवादी/कट्टर इस्लामींचा धिक्कार तर लांबची गोश्ट त्यांच्या क्रूरपंणा आणि अमानवी वर्तणुकीबाबत चकार शब्दही बोलला जात नाही तथाकथीत धर्मनिरपेक्षवाद्यांकडून. धाग्यातील विंबल्डनचा साक्षीदार नाखु

In reply to by नाखु

म्हणूनच "पुरोगामी" शब्द ही एक शिवी होऊन बसली आहे.आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे.

In reply to by भोळा भाबडा

"दहशतवाद्यांना खरा इस्लाम कळलाच नाहीये" या पठडीतले वाक्य!!
हा हा हा . गावडे सर हे पहा , आणि तुम्ही म्हणत होता की हा माझा डु आयडी आहे =)))) बाकी भोळाभाबडा ह्यांच्या काय नादाला लागायचे , त्याना ना आर्य सनातन वैदिक धर्म माहीत आहे ना सनातन प्रभात प्रणीत धर्म . जर त्यांनी सनातन ची वेबसाईत पाहिली असती आणि मिपावरील उपनिषदांची सीरीज वाचली असती तर त्यांचे त्यांनाच कळाले असते की सनातन प्रभाताला सनातन धर्माची काडीमात्र अक्कल / जाण नाहीये !! असो. भोळाभाबडा ह्यांना आमचा सनातनी नमस्कार =)))) a

In reply to by श्रीगुरुजी

गुरूजी, अगदी संजीव पुनाळेकर जसं वरवरचं स्पष्टीकरण देतात तसच बोललात. आता "सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" हे त्या वकील पुनाळेकरचं व्यक्तव्य बरच काही सांगून जातं.

In reply to by श्रीगुरुजी

मग अकोलकर का फरार आहे?? आणि खामुंपाधुं ने म्हटल्याप्रमाणे एबीपी माझावरची त्या साक्षीदाराची मुलाखत तुम्ही ऐकली नाही वाटतं. डाॅ तावडे बंदूका बनवण्यासाठी गेला होता तिथे. एबीपीवरची मुलाखत सापडत नाहीये , ही सामवरची ऐका

In reply to by भोळा भाबडा

सनातनची शेकडो ब्यान्क खाती असुन त्यात तो फरारी मनुष्य उलाढाली करतो, असे पेप्रात आले होते.

In reply to by चंपाबाई

http://indianexpress.com/article/india/india-news-india/narendra-dabhol… THE CENTRAL Bureau of Investigation (CBI) team probing the murder of rationalist Narendra Dabholkar told the court on Monday that it had come across 119 bank accounts that are suspected to be used by the Sanatan Sanstha members including Rudra Patil, Vinay Pawar, Sarang Akolkar, who are currently on the run. गुर्जी मोड ऑन. तो फरारी असला तरी तो एक साधक असल्याने तो सनातनचे व्यवहारकरु शकतो. गुर्जी मोड ऑफ

In reply to by भोळा भाबडा

तो कितपत विश्वासार्ह आहे? असा तर कुणीही साक्षीदार येईल आणि कुणाहीबद्दल काहीही बोलेल. कोर्टात शपथेवर बोललाय का? नाही ना? मग असल्या गोष्टींना काहीही अर्थ नाही.असल्या पुराव्यांच्या एखादा नवशिका वकील पण चिंध्या करेल. साम हे सकाळचं, म्हणजे बोलून चालून राष्ट्रवादीचं चॅनेल. ते काहीही म्हणतील. कोर्टात त्यातले किती दावे टिकतील ते बघू. मग या वाद घालायला.

दोन्ही बाजू एवढं सगळ व्यक्तील़क्ष्य तर्कदोष असलेले 'आमचे-तुमचे' वादात वेळ घालवतात विरुद्ध बाजूचे दहा वैचारीक मुद्दे घ्यायचे आणि त्याचे खंडण मंडण करावयाचे यास कुणीच वेळ देत नाही त्यामुळे अविचारी कृत्य करणार्‍यांना त्यांचा विचार विचार नसण्याची शक्यता नसून अविचार असण्याची शक्यता आहे हे लक्षात येण्याची संधीच प्राप्त होताना दिसत नाही.

¤एबीपी माझावरची मुलाखत¤ साक्षीदार-संजय साडविलकर तावडेने बंदुक तयार करण्यासाठी साडविलकरकडे एक माणूस पाठवला होता,तोच तो अकोलकर!! दोन-तीन माणसेही मागितली होती, सकाळच्यावेळी वाॅच ठेवायला इ. सर्व आणि बरीच माहिती साडिलकरने सांगितली आहे. https://www.youtube.com/watch?v=VMa-Fs_Di1s&feature=youtube_gdata_player

मिपावर बरेच जाणकार आहेत व धर्माच्या/अध्यात्माच्या धाग्यावर मेगाबायटी/मेगाफायटी चर्चा देखील करतात. एखादा कोणी ह्या झानाला आव्हान नाही देऊ शकत का? हुप्प्यासाहेब तुम्हीच का नाही ट्राय करत?

करण्यात आलेला आहे. झा ना वर चर्चा होण्या ऐवजी मोगा आणी सोनेरी टोळी ने नेहमी प्रमाणे हिंदू धर्मात किती वाईट गोष्टी आहेत आणिहिरवा धर्म कसा तारणहार आहे इथवर चर्चा आणुन सोडली आहे

In reply to by मनिमौ

आणि हिरवा धर्म कसा तारणहार आहे इथवर चर्चा आणुन सोडली आहे
चंपाबाईव्यतिरिक्त अन्य कोणीही असे म्हटले नाही.
धागा हायजॅक केलेला आहे.
मुद्दामच केला आहे.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

Akbar, states Sheikh Muhammad Ikram, was the first Mughal emperor to issue general orders to stop sati.[46] Aurangzeb issued another order in 1663, after returning from Kashmir, "in all lands under Mughal control, never again should the officials allow a woman to be burnt".[46 https://en.m.wikipedia.org/wiki/Sati_(practice) इतिहासात लिहिलेल्य गोष्टी सा ंगणे म्हणजे हिरवी जाहिरात करणे ?

In reply to by चंपाबाई

विकीपेडियातील संदर्भ छातीठोकपणे देता येत नाहीत, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आता हाच जो संदर्भ तुम्ही वारंवार देत आहात, तो जनाब शेख मुहम्मद इक्रम ह्या पाकिस्तानी इतिहासकाराचा आहे. तेव्हा तो कितपत ग्राह्य धरायचा? कमीतकमी तो व्यवस्थित तपासून पहावयास पाहिजे. सर्वसाधारणपणे, मोघलांच्या सैन्यापासून बचाव करण्यासाठी तत्कालिन हिंदू राजांच्या, हिंदू सैनिकांच्या स्त्रीया, त्याच्या युद्धात झालेल्या मृत्यूनंतर त्याच्याच चितेत आत्मदहन करीत, असे सतिच्या प्रथेचे मूळ आहे असे सांगितले जाते. ते चुकिचे आहे का?

In reply to by प्रदीप

महाभारतात माद्री सती गेली रामायणात मेघनादची बायको सती गेली. तेंव्हाही मोघल होते का ? की , चुकुन वीस हजार वर्षे आयुष्य मिळाले तर पुढे भविष्यात मोघल त्रास देतील या भीतीने त्या बिचार्‍या आधीच सती गेल्या म्हणायच्या ?

In reply to by चंपाबाई

तुम्हीच रामायण आणि महाभारत या काल्पनिक कथा असल्याचं सांगितलं होतं. मग काल्पनिक कथेत काहीही होऊ शकतं. कोणी पाहिलंय?

In reply to by चंपाबाई

तुमच्या गावात आजून सती प्रथा चालू आहे? त्या प्रथा वाईटच पण आता आहेत का नाहीत ना? आणि तरी सुद्धा आता २०० वर्षापूर्वीच्या गोष्टीमुळे आता दोष देत असाल तर तुम्ही धन्य आहात.

न्या. काट्जूंनी झकीर नाईकला खुल्या डिबेटचं आव्हान दिलंय. फेसबुकवर नाईकच्या भक्तांच्या कॉनेंट्स वाचून हहपुवा झाली आणि त्रासही झाला. जगात स्टुपिडिटी ठासून भरली आहे आणि ह्या एकमेव कारणासाठी आत्महत्या करणार्‍याला मी तरी मनोरुग्ण म्हणणार नाही.

ज्याहिरारीने इतर धर्माची चिकित्सा पक्षी द्वेष करता त्याच हिरारीने स्वतःच्या धर्माची चिकित्सा करण्याचं धाडस नाय तुमच्यात. काल्पनिक देवांबद्दल अपशब्द काढल्यावर लगेच भावना दुखावतात.प्रसंगी खून पडतात,त्याचं सोयरसुतक नाही पण आपली सोडून दुसर-याची खाजवण्याची हौस लै!!!

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

'आपली सोडून दुसर-याची खाजवण्याची हौस लै' हे अकबर आणि औरंगजेब यांच्यासाठी लागू होतं का ?

स्वतःभोवती असलेल्या वलयाचा (चांगले किंवा वाईट) अतिशय गैरफायदा घेण्याचा अतिशय अशक्य आणी निर्लज्ज प्रकार सुरु आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.

नाइकानी अतिरेक्यांचा कुत्रे असे संबोधुन निशेध केलाय म्हणे. नथुराम , गायकवाड इ इ चा त्याम्च्या गुरुनी / सनातनने निशेध केला होता काय ?

In reply to by चंपाबाई

नथुराम गोडसेने १९४८ साली गांधींना मारले. त्याला आता ६८ वर्षे झाली. त्या घटनेशी संबंधित असणारे कुणी आज जिवंत असण्याची शक्यता नाही. त्यामुळे वर्तमानात या. हवे तर वेगळा धागा काढून त्यात झकीर नाईक व गोडसे ह्यांची तुलना करण्याकरता काथ्या कुटा. उगाच विषय का भरकटवताय? एका चुकीचे समर्थन करण्याकरता दुसरी चूक दाखवणे ही तिसरी चूक आहे!

In reply to by मुक्त विहारि

तो त्यांचा अजेंडाच आहे मुवी ! कारण नीट रीतसर चर्चा झाली तर नाईक साहेब जे सांगतात त्याचे पितळ उघडे पडेल ना ! ते तसे पडु नये म्हणुन मध्येच अकबर , औरंगजेब , नथुराम , अकोल्कर, सती प्रथा , भगवा दहशतवाद वगैरेंना घुसडायचे की झालेच धाग्याचे काश्मीर ... मुळ मुद्दा राहिला बाजुला !!