पुन्हा झकीर नाईक
In reply to आदरणीय गुरूजी, by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to माॅर्निंग वाॅकला आल्यावरच by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to असं सबनीस म्हणालेत का? by बोका-ए-आझम
सनातनचे वकील पुनाळेकर यांनी सबनीसांबद्दल केलेलं ट्वीट हे धमकीवजा खोडसाळपणाचचं होतं
In reply to सनातनचे वकील पुनाळेकर यांनी by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to कशावरून? by श्रीगुरुजी
In reply to सबनीस सतत मोदीविरोधी बोलत by खालीमुंडी पाताळधुंडी
सबनीस सतत मोदीविरोधी बोलत होते ना!!चूक क्रमांक १) आचरटशिरोमणी सबनीस मोदींविरोधी बोलत नसून असंबद्ध बरळत होते. चूक क्रमांक २) पात्रता नसताना ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर अनेकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. ते त्यापूर्वी बहुसंख्य महाराष्ट्रीयांना माहितीच नव्हते. कोण सबनीस, काय सबनीस, त्यांची साहित्यसंपदा काय हे कोणालाच माहिती नव्हते. आपल्याला कोणी ओळखतच नाही हे लक्षात आल्यावर सबनीसांनी झटपट प्रसिद्धीसाठी इतर सर्वजण जो शॉर्टकट निवडतात तोच निवडला. तो म्हणजे मोदींना शिव्या देणे. मोदींना शिव्या दिल्या की एका रात्रीत प्रसिद्धी मिळते हे यापूर्वी अनेकांनी अनुभवले आहे (उदा. नेहा धुपिया नावाची विस्मरणात गेलेली नटी). तुमच्या आकलनातील चूक अशी की आचरटशिरोमणी हे मोदींविरोधी सतत बोलत नसून प्रसिद्ध होण्यासाठी फक्त काही दिवस ते मोदींविरूद्ध असंबद्ध बरळत होते.
आणि ते डाव्या विचारांचे विद्रोही होते म्हणून,म्हणजे नक्की काय होते? आधी भोंदू केजरीवाल, नंतर चारचौघात रस्त्यावर लघुशंका करून देशविरोधी घोषणा देणारा कन्हैया कुमार आणि आता आचरटशिरोमणी सबनीस हेच तुमचे आदर्श दिसताहेत. धन्य आहे!
दाभोलकर जे बोलत होते त्याचे उत्तर टनाटनवाल्यांकडे नव्हते म्हणून त्यांना संपवले,same hereदाभोलकरांच्या नक्की कोणत्या बोलण्यामुळे त्यांना टनाटनवाल्यांनी संपविले? कोणत्या न्यायालयात हे सिद्ध झाले आहे? गेली जवळपास ३ वर्षे हे खोटे आरोप केले जात आहेत व ३ वर्षात सनातनला अडकविण्यासाठी काहीच पुरावे न मिळाल्याने शेवटी साडविलकरसारख्या खोट्या साक्षीदाराला तयार केले जात आहे.
आता तुम्ही काहीतरी फालतू प्रतिवाद करणार आणि माझं म्हणणं अमान्य करणार,तुम्ही अमान्य केलं तरी सत्य परिस्थिती लपत नाही,लवकरच टनाटनी जेलच्या आत असतील.तुमची हास्यास्पद वाक्ये, तुमची पूर्वग्रहदूषित मते आणि तुमचे विनोदी अंदाज म्हणजे काय ब्रह्मदेवाची वाणी आहे का?
In reply to सबनीस सतत मोदीविरोधी बोलत by खालीमुंडी पाताळधुंडी
सबनीस सतत मोदीविरोधी बोलत होते ना!!आणि ते डाव्या विचारांचे विद्रोही होते म्हणून,सनातन ही संघपरिवारातली संस्था आहे का? सगळे डावे जसे सारखे नाहीत तसे सगळे उजवेही सारखे नाहीत. आणि श्रीपाल सबनीस काय करतील अशी टीका मोदींवर शिवसेनेचे संजय राऊत करताहेत. तेही माफी न मागता. सनातनच्या लोकांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही. का म्हणे?
दाभोलकर जे बोलत होते त्याचे उत्तर टनाटनवाल्यांकडे नव्हते म्हणून त्यांना संपवले,same hereलवकरच टनाटनी जेलच्या आत असतील. जेलच्या आत म्हणजे आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली असं होत नाही. वाटते तेवढी ही गोष्ट साधीसरळ नाहीये. जर दाभोळकरांच्या हत्येमागे सनातन असेल तर त्या संघटनेवर बंदी घालून तिच्या सदस्यांना गुन्हेगार घोषित करायलाच हवं, पण तसं अजून झालेलं नाही. जे तुरूंगात आहेत ते निर्दोष आहेत असं मी म्हणत नाहीये पण त्यांच्यावरचे आरोप सिद्ध न करता त्यांना सरसकट गुन्हेगार म्हणून जाहीर करणं हे चूक आहे.
In reply to अफलातून! by बोका-ए-आझम
In reply to तुम्ही वर्तमानपत्रात किंवा by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to २+२=४ by हुप्प्या
In reply to (No subject) by खटपट्या
In reply to झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी, हेटस्पीच बद्दल by माहितगार
In reply to तेच सांगतोय मी. झाक्याविरूद्ध by श्रीगुरुजी
सरकारने फक्त त्याच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत आहे का याकडे लक्ष ठेवावे व तसे होत असल्यास कायदेशीर कारवाई करावी.(बहुधा) कायद्याच्या परिघात बसतील एवढ्याच मुलतत्ववादी वैचारीक पायर्या चढण्यात झाना तत्वज्ञान प्रसृत करतो, त्याचे शिष्यगण इतर नकारात्मक पायर्या इतरत्र चढतात (ज्याला तो जबाबदार असू शकत नाही असे त्याचे म्हणणे असावे जे खरेही असू शकते) त्यामुळे (त्याची काही गंभीर आणि प्रत्यक्ष चूक असल्याशिवाय) कायदेशीर कारवाईलाही मर्यादा पडणार हे ओघाने येते. तो भारतात वापस येईल नाही येईल पाकीस्तान सारखा अजून एखादा देश त्याला भारता बाहेर राहण्यास साहाय्य करेल काहीच माहीत नाही. शिवाय त्याला अजून नवे काही बोलण्याची गरज आहे असेही नाही. त्याला जे बोलायचे ते बोलून इंटरनेटवर टाकून तो मोकळा झाला आहे. आपण म्हणताय पण अभ्यासकांनी तर्कशुद्धपणे खंडण करण्या शिवाय इतर मार्ग कितपत उपलब्ध आहेत या बद्दल बरीच साशंकता आहे.
अशाच चिथावणीखोर प्रचाराने २०१२ साली मुंबईत रझा अकादमीच्या गुंडांनी हैदोस घातला होता. त्यात पोलिसांच्या व वाहिन्यांच्य गाड्या जाळल्या. महिला पोलिसांची विटंबना केली. पण कुणा पुरोगाम्याची दातखिळी उघडली होती काय? कारण आता डॉ. झाकीर नाईक यांचे जे तर्कशास्त्र आहे, तेच पुरोगामी तत्वज्ञान झालेले आहे. दहशतवादी इस्लाम आणि पुरोगामीत्व यात किंचीतही भेदभाव उरलेला नाही. जी भूमिका नाईक इस्लामच्या नावाने मांडतात, तीच पुरोगामी शहाणे वैचारिक युक्तीवाद म्हणून मांडत असतात. इस्लाम परिपुर्ण असल्याचा त्यांचा दावा तमाम भारतीय पुरोगाम्यांनी मानला नसता, तर सनातन वा अन्य कुठल्या हिंदू संघटनेच्या बरोबरीने झाकीर नाईक यांच्यावरही बंदीचा आग्रह पुरोगाम्यांनी धरला नसता का?(भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधून)
In reply to अशाच चिथावणीखोर प्रचाराने by श्रीगुरुजी
(भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधूनख्यॅ ख्यॅ ख्यॅ
In reply to (भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधून by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to (भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधून by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to (भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधून by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to पुरोगामी आणि निधर्मी हास्य! by श्रीगुरुजी
In reply to तुमच्या माहितीसाठी सांगतो by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to मूर्खपणा आणि दुराग्रह by गामा पैलवान
In reply to आमच्या लेखी तर धर्माचा ध by कैलासवासी सोन्याबापु
In reply to कानाला भोक पाडण्यामागचा by बोका-ए-आझम
In reply to सुंता करण्याचा आणि कानाला भोक by आरोह
In reply to पालक मुलांची सुंता का करतात by आरोह
In reply to श्रीगुरूजींना प्रतिसाद by गामा पैलवान
जर शंकराचार्य वा इतर हिंदू धर्मपंडितांचे ऐकायचे नसेल तर देवळात जायचंच कशाला? घरच्या घरी करावी की हवी तेव्हढी भक्ती.हाऊ डू यू से दॅट, मोनिशा..... ;)
In reply to श्रीगुरूजींना प्रतिसाद by गामा पैलवान
केवळ एका कार्यक्रमावरून सनातन संस्था मूर्ख असल्याचा निष्कर्ष काढण्यात थोडी घाई होते असं वाटंत नाही का?सनातनच्या मूर्खपणाची मी ३ वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत.
१. >> त्या परिसंवादात अभय वर्तक त्या अघोरी प्रथेचे समर्थन करीत होते त्यामागे कारण काय दिलं होतं? आणि अध्यात्मिक कारण नसेल तर ती प्रथा बंद करायला काहीच हरकत नाही.म्हणजे अध्यात्मिक कारण असेल तर ही अघोरी प्रथा सुरूच ठेवावी का? या अघोरी प्रथेमागचे कारण अध्यात्मिक असो, नैतिक असो, पारमार्थिक असो, धार्मिक असो किंवा अजून कोणतेही असो, प्रथा अघोरी असल्यामुळे ती बंद व्हायलाच पाहिजे.
२. >> त्यांच्या म्हणण्यानुसार शंकराचार्य किंवा हिंदू धर्माचार्य यांना विचारून त्यांना मान्य असेल तर त्यांच्या संमतीनेच >> अशी परवानगी द्यावी. हे शंकराचार्य किंवा धर्माचार्य कोण? त्यांना का विचारायचे? त्यांना याबाबत कायदेशीर >> किंवा धार्मिक अधिकार कोणी दिले? जर शंकराचार्य वा इतर हिंदू धर्मपंडितांचे ऐकायचे नसेल तर देवळात जायचंच कशाला? घरच्या घरी करावी की हवी तेव्हढी भक्ती.मी व बहुसंख्य हिंदू कोणत्याही शंकराचार्य किंवा हिंदू धर्मपंडितांच्या उपदेशावर आचरण करीत नाहीत. स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरून आम्ही आचरण करतो. कोणाच्या तरी सांगण्यावर अंधविश्वास ठेवून आचरण करायला हिंदू धर्म म्हणजे इस्लाम नव्हे. शंकराचार्य सांगतात की साईबाबा देव नसल्यामुळे त्यांच्या मूर्तीचे पूजन करू नका. हा मूर्खपणाचा उपदेश किती हिंदूंनी आचरणात आणला आहे? शंकराचार्य मनाला येईल ते सांगतील. ते सांगतील त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून विचार न करता आचरणात आणायचं का? मी देवळात जातो व घरीही पूजाअर्चा करतो. पण मी हे माझ्या मनाला आवडते व त्यापासून मला शांती व समाधान मिळते म्हणून करतो. शंकराचार्य सांगतात म्हणून नव्हे. उद्या शंकराचार्यांनी देवळात जायला बंदी घातली किंवा पू़जा करू नका सांगितले तरी ते माझ्या मनाला पटत नसल्यामुळे मी त्यांच्या सांगण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करेन.
३. >> असे असले तरी आपण रिसिव्हिंग एंडला आलेलो आहेत हे लक्षात घेऊन सनातनने पोलिटिकल करेक्ट भूमिका >> घेऊन गप्प रहायला हवे होते. डरपोकांनी पोक काढून पो.क. भूमिका घ्यावी. खरं ते छापायची हिम्मत आजच्या घडीला फक्त सनातन प्रभात मध्येच आहे. दाभोलकरांच्या चित्रावर फुल्ली मारली म्हणजे त्यांचा खून व्हावा हा निर्देश ओढूनताणून आणलेला आहे. तसेच सनातननी दाभोलकरांची निंदानालस्ती कुठल्याही लेखात केलेली नाही.केवळ सनातनमध्ये छापून आले म्हणजे ते खरेच आहे असे नाही. दाभोलकरांच्या चित्रावर फुल्ली मारली म्हणजे त्यांचा खून सनातननेच केला आहे हा निष्कर्ष अवास्तव असला तरी जेव्हा संशयाची सुई सनातनवर वळलेली होती तेव्हा अशा संशयाच्या वातावरणात दाभोळकरांच्या खुनानंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या चित्रावर लाल फुली मारणे हे सनातनविषयी संशय वाढविणारे होते. त्यामुळे सनातनवर संशय अजून वाढला व त्यामुळे सनातनचे अनेक साधक हे पोलिसांच्या रेडारवर आले. सनातनने हा मूर्खपणा टाळायला हवा होता. परंतु तारतम्य व सनातन यांचे एकमेकांशी हाडवैर असल्याने तसे झाले नाही.
जाताजाता : दाभोलकर फ्रॉड माणूस होता/आहे हे सनातन संस्था सोडल्यास कोणीही उघड बोलायला धजत नाही.दाभोळकर हे फ्रॉड होते हा आरोप फक्त सनातनच्या वृत्तपत्रात करून फायदा नाही. असे आरोप करणे म्हणजे केजरीवालांच्या आरोपांसारखे असतात. त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. निव्वळ आरोप करण्यापेक्षा त्याचा कायदेशीर पाठपुरावा करून न्यायालयात खटला दाखल करणे हाच एकमेव उपाय आहे.
In reply to श्रीगुरूजींना प्रतिसाद by गामा पैलवान
जर शंकराचार्य वा इतर हिंदू धर्मपंडितांचे ऐकायचे नसेल तर देवळात जायचंच कशाला? घरच्या घरी करावी की हवी तेव्हढी भक्ती.१) हिंदू धर्म-संस्कृतीची सुरवात शंकराचार्यांपासून किंवा कोणत्याही धर्मपंडितापासून होत नाही आणि शंकराचार्यांपाशी किंवा इतर कुणापाशी संपत नसावा. २) देव कशात बघायचा ते कोणत्या देवळात नमस्कार करायचा आणि भक्ती कशा पद्धतीने करावयाची हे प्रत्येक हिंदू स्वतः ठरवतो, त्याचे देवाशी नाते डायरेक्ट असते भक्त तथाकथीत पंडीतांच्या सांगण्यावर अवलंबून असला पाहीजे असे काहीही नसावे, एवढेच नव्हे कुणाला गुरु मानायाचे हे प्रत्येक व्यक्ती स्वतः ठरवते. अमुक यांनाच पंडीतानांच किंवा शंकराचार्यांना गुरु माना असे हिंदू धर्मात काहीही नसावे. ३) अघोरी नवसा सायासांना विरोधाची सुधारणावादाची संत एकनाथ संत तुकारामांपासूनची परंपरा आहे, बदलत्या काळाला स्विकारणे आणि काळासोबत बदलणे हा हिंदूधर्म आणि समाजाचा गुणधर्म असावा. ४) हिंदू धर्माची मूळ विचारसरणी विचारांच्या उदात्ततेवर आधारलेली असावी संकुचितते वर नसावी.
In reply to महाराष्ट्रात एमआयएमसह 129 पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. by ईश्वरसर्वसाक्षी
In reply to श्रीगुरुजींना प्रतिसाद by गामा पैलवान
ज्याला तुम्ही मूर्खपणा म्हणताहात तो कित्येक लक्षावधी लोकांच्या मते मूर्खपणा नाहीये.असेल बोवा. पुलंनी म्हटलेच आहे की "जगात कुंभार थोडे, गाढवे फार".
२. >> म्हणजे अध्यात्मिक कारण असेल तर ही अघोरी प्रथा सुरूच ठेवावी का? इथे असा तिरपागडा अर्थ काढायची काय गरज आहे? पर्यायी प्रथा सुरु करता येत नाहीत का? तशी सुरू करायची असेल तर मूळ प्रथा पद्धतशीरपणे बंद करायला हवी. एकदम दिसली प्रथा आणि केली बंद असं का म्हणून? अभय वर्तकांनी पर्यायी प्रथेसाठी जर विचारविनिमयाचा आग्रह धरला तर त्यास आंधळं समर्थन म्हणंत नाहीत.पर्यायी प्रथा? तान्ह्या मुलाला पाळण्यात ठेवून खोल, अंधार्या विहिरीत सोडून पाळणा पाण्यावर तरंगत ठेवण्याच्या अघोरी प्रथेला पर्याय शोधायचा? धन्य आहे. अघोरी प्रथा पद्धतशीरपणे बंद करायची म्हणजे काय करायचं? आधी पाण्यावर पाळणा तरंगत ठेवणे थांबवून पाळणा फक्त विहिरीत लटकत ठेवायचा, नंतर पुढच्या वर्षी पाळणा अगदी पाण्याच्या पातळीपर्यंत न नेता पाण्यापासून १० फूट वर लटकत ठेवायचा, नंतर प्रत्येक वर्षी १०-१० फूट कमी करायचे आणि शेवटी पाळणा विहिरीच्या काठावर नुसताच बांधून ठेवायचा. ती प्रथा अशी पद्धतशीरपणे बंद करायची का? असल्या अघोरी प्रथा या तातडीने संपूर्ण बंद करायच्या असतात. पूर्वी कर्नाटकातील चंद्रेगुत्ती इथे नग्नपूना चालायची. महिला नग्नावस्थेत रस्त्याने जाऊन देवीची पूजा करायच्या. पोलिसांनी बळाचा वापर करून हा मूर्खपणा संपूर्ण बंद केला. जर असली प्रथा पद्धतशीरपणे बंद करायचा प्रयत्न केला असता तर पहिल्यांदा पूर्ण नग्न न होता फक्त कंबरेवर वस्त्र चढवून पूजा करा, मग काही वर्षांनी फक्त वर आणि खाली वस्त्र परिधान करा, नंतर काही वर्षांनी अजून एखादे वस्त्र चढवा असले काही तरी झाले असते. प्रथा अघोरी आहे व त्यामुळे ती तातडीने संपूर्ण बंद व्हायला पाहिजे. अघोरी प्रथेला पर्यात नसतो व त्याचे समर्थनही करता येत नाही. वर्तक तर पर्याय सोडाच पण प्रथा बंद करायलाच विरोध करीत होते. मूर्खपणा तो हाच.
गाडी चुकली हो. शंकराचार्य वा हिंदू धर्मपंडित यांनी उपदेश केला तर तो अतार्किकच असतो हे गृहीतक साफ चुकीचं आहे.मी असलं गृहितक धरलेलंच नाही. तो जे उपदेश करतात तो मी आंधळेपणाने न पाळता स्वतःची बुद्धी वापरतो व त्यानुसार आचरण करतो. शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश हवा का नको याविषयी शंकराचार्यांची मते काहीही असोत, तिथे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने प्रवेश हवाच असे माझे मत आहे. परंतु वर्तक मात्र याबाबतीत शंकराचार्यांचा सल्ला घ्यावा असा आग्रह धरीत होते. मूर्खपणा तो हाच.
आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांच्या अधिपतींनाच शंकराचार्य असं संबोधतात. बाकी सारे तोतये आहेत. सनातन संस्था धर्मशास्त्राप्रमाणे आचरण असावं असा आग्रह धरते. एव्हढंच नव्हे तर त्याप्रमाणे साधक आचरण करतातही. अनेक खऱ्याखुऱ्या शंकराचार्यांनी संस्थेस अनेक वेळा आशीर्वाद दिले आहेत. यात मूर्खपणा कसला?अनेकजण स्वयंभू शंकराचार्य आहेत. कांची कामकोटी पीठाचे प्रमुख स्वतःला शंकराचार्य मानत असले तरी इतर चार पीठांचे प्रमुख कांची कामकोटीला मानत नाहीत. त्यांच्या दृष्टीने दक्षिणेत कांची कामकोटी हे शंकराचार्यांचे पीठ नसून कर्नाटकातील शॄंगेरी हेच खरे पीठ आहे. याव्यतिरिक्त रत्नागिरीचा भोंदू नरेंद्र महाराज स्वतःला शंकराचार्य म्हणवून घेतो. कोल्हापूरलाही शाहू महाराजांनी पर्यायी पीठ स्थापन केले आहे. द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचा मूर्खपणा हा की त्यांनी शिर्डीचे साईबाबा देव नसल्यामुळे त्यांच्या मूर्तीची पूजा करणे हे धर्मविरोधी आहे असा फतवा काढून साईबाबांची पूजा करण्यास विरोध केला. श्री श्री आद्य शंकराचार्य हे सुद्धा मानव होते व त्यांची मूर्ती सर्व पीठात असते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास इ. सर्व संत मानव होते. त्यांच्या मूर्तीची सर्वत्र पूजा होते. अशा परिस्थितीत साईबाबांची मूर्ती पूजु नये असे सांगणे हा मूर्खपणा होता. त्यांच्या दुर्दैवाने सर्वसामान्य हिंदू त्यांच्या ओंजळीने पाणी न पिता स्वतःच्या बुद्धीने वागणारा असल्याने शंकराचार्यांच्या सल्ल्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले.
एक काम करा. एके दिवशी देवळात जा आणि तिथले नियम न पाळायचा हेका धरा. पाखंडी तृप्ती देसाई जसा हेका धरते अगदी तस्साच धरून पहा. मग बघा शांती मिळते का ते.जिथे सर्वांसाठी समान नियम नाहीत व काही जणांसाठी अन्यायकारक नियम आहेत, तिथे विरोध होणारच. तृप्ती देसाई पाखंडी असो वा अजून काही असो, तिने पुढे आणलेला मुद्दा योग्यच होता
अचूक निर्णय. त्याबद्दल अभिनंदन. मात्र देवळात जाऊ नका म्हणून उपदेश करायला शंकराचार्यांची अक्कल गहाण पडलेली नाही अजूनतरी.असे असेल तर मग साईबाबांची पूजा करू नका असा अत्यंत मूर्खपणाचा आदेश त्यांनी का काढला? आणि सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष का केले?
दाभोलकरांचं फुल्ली मारलेलं चित्रं जुनंच आहे. शिवाय दुसऱ्या दिवशी लगेच संशयाची सुई वगैरे वळलेली नव्हती. तसं बघायला गेलं तर संस्थेवर नेहमीच बिनबुडाचे आरोप होत आलेत. प्रत्येक आरोपाला घाबरत बसलं तर साधना करायची कशी?खून झाला त्याच दिवशी लगेचच सनातनवर संशयाची सुई वळलेली होती. दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या फोटोवर लाल फुली मारणे यात कसली आली आहे डोंबलाची साधना? ही तर निव्वळ मनातील मळमळ.
यांत तुम्हाला सनातन संस्थेचा मूर्खपणा दिसतो, पण पोलिसांचा अक्कलशून्यपणा दिसंत नाही. कमाल आहे. कर भरता ना तुम्ही? मग शासनाला जाब विचारा ना जरा.पोलिस अक्कलशून्य आहेत हे माहित असताना कशाला त्यांच्या हातात कोलीत द्यायचं? त्यातून त्रास होणार तो तुम्हालाच होणार ना? माकडाच्या हातात कोलीत दिलं व त्याने घराला आग लावली तर नुकसान माकडाचं का तुमचं?
अगदी बरोबर. दाभोलकरांच्या न्यासाने गेले कित्येक वर्षे धर्मादाय आयुक्तांकडे हिशोब सादर केलेले नाहीत. यास आरोप म्हणावं की वस्तुस्थिती? जी गोष्ट उघड फ्रॉड आहे तिला आजून कसले पुरावे द्यायचे?दाभोळकर हे फ्रॉड आहेत हे केवळ सनातन प्रभात मध्ये आरोप करून सिद्ध होत नाही. हे आरोप न्यायालयात सिद्ध व्हावे लागतात. नुसते शाब्दिक आरोप करत बसला तर तुमचा केजरीवाल होतो.
एकंदरीत सनातन संस्थेचे विचार तुम्हाला पटत नसले तरी त्यांना मूर्खबिर्ख विशेषणे लावू नयेत. इतकंच मागणं आहे.जे उघड दिसतंय तेच मी सांगितलंय. सनातन ही मूर्खांची संस्था आहे याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपल्या वर्तनाने सनातनच्या लोकांनी ते अनेकवेळा सिद्ध केलेलं आहे.
In reply to ज्याला तुम्ही मूर्खपणा by श्रीगुरुजी
पूर्वी कर्नाटकातील चंद्रेगुत्ती इथे नग्नपूना चालायची. महिला नग्नावस्थेत रस्त्याने जाऊन देवीची पूजा करायच्या.यात स्त्रीयांवर सक्ती आणि शोषण नसेल तर स्त्री पुरुषांनी कशा पद्धतीने पुजन करावे हा त्यांच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा आदर व्हावयास हवा होता, सधू संत देवता नग्न असू शकतात तसे भक्तांनी नग्नतेचे ते अंगभरुन कपडे घालण्याचे स्वातंत्र्य घेतले तर उर्वरीत जगाचा त्यात हस्तक्षेप कितपत रास्त राहतो या बद्दल साशंक आहे.
ज्याला तुम्ही मूर्खपणा म्हणताहात तो कित्येक लक्षावधी लोकांच्या मते मूर्खपणा नाहीये.लक्षावधी लोकांचा गणपती दूध पितोय यावरही विश्वास बसला होता. तो मूर्खपणाच होता. लक्षावधी लोक करताहेत म्हणून चुकीची गोष्ट बरोबर कशी होईल? २. श्रीगुरुजींच्या प्रतिक्रियेवरुन हे सांगतोय - तान्ह्या मुलांना पाळण्यात बसवून अंधाऱ्या विहिरीत सोडणं हा नुसता अघोरीपणा नाही, हा क्रूरपणा आहे. जगातील कुठल्याही धर्माने असं सांगितलं तरी त्याचा विरोध व्हायला पाहिजे. हे बंदच व्हायला पाहिजे. अभय वर्तकांचा दुसरा आक्षेप - तुम्हाला फक्त हिंदूंच्याच प्रथा दिसतात का - त्यावर माझं उत्तर असं आहे की आमचं आमच्या धर्मावर प्रेम आहे म्हणूनच त्यातले दोष निघून जावेत अशी आमची इच्छा आहे. दोष दाखवणे म्हणजे धर्माचा अधिक्षेप करणे नव्हे. ३.
शंकराचार्य वा हिंदू धर्मपंडित यांनी उपदेश केला तर तो अतार्किकच असतोअसं अजिबात नाही. पण कुणाचाही उपदेश तर्कबुद्धीला पटत नसेल तर तो का ऐकावा? मला माझ्या आईवडिलांचे न पडलेले सल्ले मी ऐकत नाही. आणि शंकराचार्य किंवा कोणीही माझ्या जन्मदात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मला वाटत नाही. ४.आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांच्या अधिपतींनाच शंकराचार्य असं संबोधतात. बाकी सारे तोतये आहेत. सनातन संस्था धर्मशास्त्राप्रमाणे आचरण असावं असा आग्रह धरते. एव्हढंच नव्हे तर त्याप्रमाणे साधक आचरण करतातही. अनेक खऱ्याखुऱ्या शंकराचार्यांनी संस्थेस अनेक वेळा आशीर्वाद दिले आहेत. यात मूर्खपणा कसला?>>> हा मुद्दा वेगळाच आहे. शंकराचार्यांनी साईबाबांची पूजा करु नका असं म्हणण्याचा आणि सनातन संस्थेला आशीर्वाद देण्याचा संबंध काय? ते एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. आणि शंकराचार्यांनी सनातनला आशीर्वाद दिले असतीलही. तेही माणूस आहेत. त्यांच्या हातून चुका होऊ शकतात. ५. हा मुद्दा समजला नाही. हेही उदाहरण म्हणूनच दिलेलं आहे. आणि तृप्ती देसाई पाखंडी कशा झाल्या बुवा? त्यांचं आंदोलन निरर्थक होतं आणि त्यात राजकीय स्टंटबाजीही भरपूर होती. पण त्यात पाखंडीपणा कुठून आला? ६. ठीक आहे. ७. सनातन पोलिसांच्या रडारवर पूर्वीपासून होती. आणि दाभोळकरांचे फुली मारलेले फोटो आणि त्यांच्या मृत्यूनंतर सनातनने छापलेले लेख यांचा विपरित अर्थ काढला जाईल हे सनातनमधल्या साधकांना समजलं नाही का? ८. पोलिसांनी संशयितांना अटक केलेली आहे. ते सनातनचे सदस्य आहेत. त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करणं हे सरकारचं काम आहे. आणि सरकारला जाब विचारायला सनातनचे वकील आहेत. सनातनकडून जाब विचारण्याबद्दल पैसे मिळणार असतील तर जाब विचारु. फुकटात काहीही काम करु नये. तुम्हीही सनातनची ही भलावण पैसे मिळाल्याशिवाय करत नका जाऊ. ९. दाभोलकरांच्या न्यासाने गेले कित्येक वर्षे धर्मादाय आयुक्तांकडे हिशोब सादर केलेले नाहीत. यास आरोप म्हणावं की वस्तुस्थिती? >>> हिशेब सादर न करणे हे चूक आहे, पण तो फ्राॅड कशावरून? पुराव्याशिवाय आरोप करणं हे चूक आहे. जी गोष्ट उघड फ्रॉड आहे तिला आजून कसले पुरावे द्यायचे?>>> उघड फ्राॅड? कसं काय? आणि पुरावे न देता असा गंभीर आरोप करणं हे कायद्यानुसार बदनामी (defamation) होऊ शकतं. पुरावे नसल्यामुळे तुमच्या या विधानाला विश्वासार्ह म्हणता येत नाही. - आपला विनम्र बोका-ए-आझम
In reply to गा.पै. by बोका-ए-आझम
In reply to बोकारावांचे खालील वाक्यासाठी अभिनंदन :) by माहितगार
In reply to गा.पै. by बोका-ए-आझम
'उघड उघड फ्रॉड' ही एक गंमतच म्हणायला हवी,
शिवाय,
सनातन लक्षावधी लोकांना मूर्ख वाटत नाही म्हणून तिला काही म्हणू नका असे म्हणले तर , लक्षावधी लोकांना दार-उल-उलूमची कन्सेप्ट सुद्धा मूर्ख वाटत नाही, मग काय करायचे? कोणालाच काहीच बोलायचे नाही काय? होऊ दे हब्बेदुलास तिच्यायला नाहीका??In reply to बस्स करा ना आता_/\_ by दिग्विजय भोसले
In reply to माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल by सतिश गावडे
In reply to माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल by सतिश गावडे
In reply to प्रवक्त्यांना खेचू नये ;) by माहितगार
In reply to आज माहितगार ह्यांच्या by कैलासवासी सोन्याबापु
In reply to आज माहितगार ह्यांच्या by कैलासवासी सोन्याबापु
..अन तंगडी ओढत आहेतमला वाटले होते मी फक्त निसटत्या बाजू ओढत असतो..
In reply to माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल by सतिश गावडे
In reply to माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल by सतिश गावडे
In reply to करेक्ट by बाळ सप्रे
इतकं विचित्र वाटत होतं वाचताना.. गुरुजींचा प्रतिसाद आहे की अंनिसच्या कोणाचा हेच कळत नव्हतं.. :-)का ब्रे, किमान थेअरॉटीकली सनातनची अधिकृत भूमिका शास्त्र आणि तर्काधारीत असणे अभिप्रेत असताना, त्यांचा विरोधाभास होत असेल आणि गुरुजी प्वाईंट आऊट करत असतील तर काय चुकले यात अंनिस कुठून टपकली म्हणतो आम्ही. सर्वात चांगली गोष्ट भाजपा सनातन संस्थेला आंदण गेलेली नाही आणि त्यांचे सर्व वर्तन शास्त्र आणि तर्काला धरून नाही हा संदेश प्रवक्त्यांनी दिलेला दिसतो :)
In reply to का ब्रे ? by माहितगार
थेअरॉटीकली सनातनची अधिकृत भूमिका शास्त्र आणि तर्काधारीत असणे अभिप्रेत असताना, त्यांचा विरोधाभास होत असेल आणि गुरुजी प्वाईंट आऊट करत असतीलROFL
In reply to थेअरॉटीकली सनातनची अधिकृत by बाळ सप्रे
In reply to वा वा! by बोका-ए-आझम
In reply to धाग्याचा महत्वाचा मुद्दा राहिला बाजूला by जगप्रवासी
In reply to धाग्याचा महत्वाचा मुद्दा राहिला बाजूला by जगप्रवासी
In reply to हो झा नाईक मूळ मराठी आहे by हुप्प्या
In reply to धाग्याचा महत्वाचा मुद्दा राहिला बाजूला by जगप्रवासी
In reply to श्रीगुरुजींस उद्देशून प्रतिसाद by गामा पैलवान
नग्नपूजा हिंदूंच्या कुठल्याही भक्तीग्रंथांत नाही. हां, तांत्रिक विधी असू शकतो. पण भक्तीमार्गाने जाणाऱ्याने तांत्रिक साधना करायची नसते. नग्नपूजेस शास्त्राधार नाही१) (अगदी भक्तीपंथीयांची) एखादी पूजापद्धती अमूक किंवा तमूक ग्रंथात असलीच पाहीजे हा नियम हिंदू धर्मात कधी पासून लागू झाला. अप्रत्यक्षपणे ग्रंथबद्द्ध न झालेल्या सर्व पूजा बंद केल्या जाव्यात असे तुम्हाला म्हणायचे नसावे. हिंदू कुलाचारातील असंख्य पूजा पद्धती एखाद्या कोणतीही व्यक्ति ते ज्यात्या काळातील ज्यांच्या त्यांच्या गुरुंनी सांगीतलेल्या असू शकतात ते घरातील /समुदायातील एखाद्या व्यक्तीला अमुक तमुक स्वप्नपडले आणि पूजा चालू झाली अश्याही असंख्य पूजा आहेत. २) आपले "असू शकतो" हे कयासात्मक विधान वास्तवास धरून असण्याबद्दल सॉल्लीड साशंकता आहे. चंद्रेगुत्तीची पूजा बहूधा केवळ अमुक तमूकला स्वप्नपडले किंवा काय सर्वसामान्य अंधश्रद्धेतून हनुमानाची झालेली भक्तीमय उपासना -तेही हनुमानाचे वैराग्य शुकासारखे आहे या विश्वासाने- होती त्याचा बहुतेक तांत्रिक विधीशी संबंध लावणे बहुतेक वाजवी नसावे (चुभूदेघे कदाचित श्रीगुरुजींना माहित असेल तर सांगू शकतील) ३) आजच्या काळात पुर्वीप्रमाणे तांत्रिक साधना तेवढ्या प्रमाणावर होत नसाव्यात, तथाकथीत तांत्रिकसाधनाही भारतातच विकसीत झाल्या आहेत त्यातील काही तांत्रिकसाधना भक्तीमार्गीही असू शकतात. अर्थात यात बर्याचदा अघोरी अंधश्रद्धा तांत्रिकतेत असत आणि तशा अघोरी अंधश्रद्धांच्या निराकरण करु इच्छिणार्या सुधारणावाद्यांना हिंदू द्वेष्टे ठरवले जाते आहे? काही भक्तीसांप्रदायिकांना नको असलेतरीही तांत्रिकसाधनाही एका अर्थाने हिंदूधर्माच्या भाग ठरतात तांत्रिकसाधना करणार्यांनी विरोधकांना हिंदूद्वेष्टे म्हणावे का ? मी तांत्रिकसाधनांचा समर्थक नाही केवळ उपरोक्त प्रतिसादातील विरोधाभास दर्शवण्याचा प्रयत्न करतो आहे. ४) नग्नच काय कोणत्याही झाना म्हणतात तसे कोणत्याही सगूणसाकार पूजेचे हिंदूधर्मात आधार बर्यापैकी ढिसाळ असावेत. वेदा आणि अमुकतमूक ग्रंथशास्त्रात नसलेल्या अनेक पूजा विधींचा शोध भारतीयांनी आपापल्या मर्जीने लावले सर्वपूजा पद्धती एकाच परमेश्वरापाशी पोहोचतात या विश्वासाने हिंदू धर्मात सर्वपूजा पद्धती सामावून घेतल्या गेल्या त्यात नग्नपूजेचा समावेश न होण्याचेही कारण नसावे. तुमची आमची मने भ्रष्ट झाली म्हणून नग्नपूजक दिगंबरांना भ्रष्ट का म्हणावे ? अनेक साधू संत दिगंबरावस्थेत इश्वरभक्ती करत. कुणी दिगंबरावस्थेत भक्तीकरत म्हणजे ते तांत्रिक साधना करत हे खरे मानायचे तर गजानन महाराज ते स्वामीसमर्थ अशा असंख्यांची वर्णी जबरदस्तीने तांत्रिकात लावायची किंवा कसे ? शूकासारखा आदर्श कितीही कठीण असला तरी शूकमुनी हाच भारतीय तत्वज्ञानानुसार आदर्श नव्हे काय ? आणि जर तो तसा असेल तर स्त्री असो वा पुरुष दिगंबरावस्थेत दिसले तरी आपापल्या मनावर काबू ठेवणे ज्याची त्याची जबाबदारी होत नाही का ? ५) चंद्रगुत्तेला स्त्रीयांनी अगदी नग्नपूजा करुनही देव त्यांना कोपत नसे देव प्रसन्न होतो अशी भावना असेल तर इतरत्र देवळांमध्ये स्त्रीयांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे कपडे घालून प्रवेश देण्यात अडथळे निर्माण करणे समजणे कठीण नाही का.
In reply to साशंकता by माहितगार
In reply to स. रा. गाडगीळ ह्यांच्या by प्रचेतस
In reply to गामाजींस पुस्तक रेफेरेन्स by कैलासवासी सोन्याबापु
In reply to गामाजींस पुस्तक रेफेरेन्स by कैलासवासी सोन्याबापु
In reply to आक्षेपार्ह रूढी by गामा पैलवान
In reply to आक्षेपार्ह रूढी by गामा पैलवान
In reply to आक्षेपार्ह रूढी by गामा पैलवान
म्हणजे पाळण्याऐवजी सुपात बाळ ठेवायचं. आणि विहिरीऐवजी घरच्या उथळ रांजणात सोडायचं. एव्हढा साधा तोडगाही असू शकतो ना?परंपरेतील अघोरी, सक्ती, शोषण भाग काढून प्रथा परंपरा केवळ प्रतिकात्मक स्वरूपात जपण्यास काहीच हरकत नाही. विहीरीतले पाणि पवित्र समजून त्याला वैज्ञानिक पद्धतीने शुद्धकरुन बाळाची त्याने नजर काढली किंवा तांब्याभर पाण्याने प्रतिकत्मकतेसाठी ओवाळून घेतले तर त्या अंधश्रद्धा सुधारीत स्वरुपात चालवल्यास काहीच हरकत नाही. बगाडच्या दक्षिणभारतीय परंपरेत सुधारणाकरून बगाडला व्यवस्थीत खूर्ची जोडली आहे, खुर्चीत आरामात बसून मंदिराला प्रदक्षीणा करून घ्या काहीच हरकत नाही, पण उगीच पाठी अणकुचीदार वस्तू खुपसून व्यक्तिस्वातंत्र्य असले तरी स्पृहणीय ठरत नाही. बाकी गुरुजी आणि बोका यांनी उत्तर दिलेच आहे
अध्यात्मिक लाभ मिळंत नसेल तर...नवसासायासाच्या रुढी परंपरांमध्ये अध्यात्माचा वस्तुतः काही संबंध नाही. -अध्यात्म हे अपेक्षे शिवाय केलेली भक्ती आहे. भौतीक अपेक्षांनी केलेले विधी हे अंधविश्वास असलेले नवसच असतात. - भौतिक अपेक्षांनी केलेले नवसासायास संत एकनाथ आणि भक्ती मार्गातील इतर काही संतांनीही नाकारलेले दिसून येतात- अंध-विश्वासांमध्ये जोपर्यंत अनिष्ट काही नाही -किंवा सुधारणाकरून त्यातील अनिष्ट भाग काढून टाकला तर आपापले अंध-विश्वास एंजॉय करत रहाण्याचे स्वातंत्र्य हवेच. मुलाचे आयुष्य वाढावे म्हणून नवस केला ओवाळले नजर काढली पण आजारी पडू नये म्हणूनची लस दिली नाही अंधश्रद्देह्तून आंगावर बाळाला पाजले नाही असे होऊ नये ह्याची अंध-विश्वास बाळगताना दक्षता घेतली जावयास हवी.
In reply to साशंकता by माहितगार
In reply to श्रीगुरुजींस उद्देशून प्रतिसाद by गामा पैलवान
१. >> अघोरी प्रथा पद्धतशीरपणे बंद करायची म्हणजे काय करायचं? म्हणजे पाळण्याऐवजी सुपात बाळ ठेवायचं. आणि विहिरीऐवजी घरच्या उथळ रांजणात सोडायचं. एव्हढा साधा तोडगाही असू शकतो ना?अरे पण कशासाठी करायचा हा गाढवपणा? कशासाठी इतका आटापिटा? कशासाठी त्या कोवळ्या जीवाचा इतका क्रूर छळ? कशाला सुपात ठेवून रांजणात सोडायचं? कसला डोंबलाचा तोडगा? मूर्खपणाला काही सीमा असते का नाही? खेड्यातले अडाणी मूर्खपणा करतात ते समजू शकते, पण शहरातले/परदेशातले सुशिक्षित जो मूर्खपणा करतात त्याला काय म्हणायचं? उपहास मोड ऑन - तान्ह्या बाळाला पाळण्यात घालून खोल, अंधार्या विहिरीत सोडण्याऐवजी सुपात ठेवून घरच्या उथळ रांजणात सोडणे आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यासाठी आधी सूप आणावं लागेल, नंतर घरी सूप तरंगत राहील एवढा मोठा व खोल रांजण आणावा लागेल. एवढे करूनसुद्धा अंधार्या खोल विहिरीतल्या पाण्यात तरंगत ठेवल्यावर बाळाला जी मजा येईल ती मजा सूप उथळ रांजणात तरंगत ठेवून कशी येणार? उपहास मोड ऑफ -
३. >> शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश हवा का नको याविषयी शंकराचार्यांची मते काहीही असोत, >> तिथे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने प्रवेश हवाच असे माझे मत आहे. परंतु वर्तक मात्र याबाबतीत >> शंकराचार्यांचा सल्ला घ्यावा असा आग्रह धरीत होते. मूर्खपणा तो हाच. कशाला हवाय महिलांना पुरुषांबरोबर प्रवेश तिथे? काय थोर समता साधली जाणार आहे? नियम पाळायचे नसतील तर सार्वजनिक जागी जाऊ नये.का? महिलांना प्रवेश न देण्यासाठी महिलांनी काय घोडं मारलंय? कसले डोंबलाचे नियम? कोणी ठरविले हे पक्षपाती नियम?
४. >> तृप्ती देसाई पाखंडी असो वा अजून काही असो, तिने पुढे आणलेला मुद्दा योग्यच होता मुद्दा आजिबात योग्य नाही. महिलांवर अन्याय करायच्या उद्देशाने प्रथा सुरू झाली नाही. महिलांना जिथे प्रवेश वर्ज्य आहे तिथे त्यांनी जाऊ नये. तरीही ज्या बायकांना स्पर्श करून दर्शन घ्यायचंच आहे त्यांनी खुशाल घरी शनीचा पाषाण बसवून त्याची दैनंदिन पूजा करावी.कोणी ठरविला महिलांना प्रवेश वर्ज्य? त्यांना हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? महिलांनी कशी व कोठे पूजा करायची हे तुम्ही कोण ठरविणार? पाहिजे तर तुम्ही घरी शनीचा पाषाण बसवून पूजा करा.
६. >> खून झाला त्याच दिवशी लगेचच सनातनवर संशयाची सुई वळलेली होती. पृथ्वीराज चव्हाण काहीबाही बरळले म्हणून सनातन संस्थेने गप्प बसायचं का? वाघ म्हंटलं तरी खातो, वाघोबा म्हंटलं तरी खातो. मग वाघुरड्या का म्हणू नये?गप्प बसा असं कोण म्हणतंय? जेव्हा संस्थेवर संशय येऊन संस्थेची व साधकांची चौकशी सुरू झालेली असते तेव्हा अजून मूर्खपणा करून संशय वाढेल असे करू नये हा साधा कॉमनसेन्स आहे. कारण शेवटी जो त्रास होणार तो वर्तक किंवा आठवल्यांना होणार नसून तो सर्वसामान्य साधकांनाच होणार होता.
७. >> दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या फोटोवर >> लाल फुली मारणे यात कसली आली आहे डोंबलाची साधना? ही तर निव्वळ मनातील मळमळ. फुल्लीचं चित्रं अगोदरपासून होतं. आणि ज्याला तुम्ही निंदानालस्ती म्हणताय ती केवळ एक ओळ होती. 'दाभोलकरांना विकलांग मृत्यू न येत सत्वर मृत्यू आला हे वाईटातले चांगले आहे' अशा काहीशा अर्थाची ती ओळ होती. असेच उद्गार सरोजिनी नायडूंनी गांधीहत्येनंतर काढले होते. 'He died a king's death' असं काहीसं वाक्य होतं. त्याबद्दल सरोजिनींना कोणी दोष देत नाहीत.ती केवळ एक ओळ नसून अनेक वाक्यांतून मनातील मळमळ ओकलेली होती. दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांचा लाल फुली मारलेला फोटो वेबसाईटवर प्रसिद्ध करणे ही विकृती होती.
८. >> पोलिस अक्कलशून्य आहेत हे माहित असताना कशाला त्यांच्या हातात कोलीत द्यायचं? त्यातून त्रास होणार तो >> तुम्हालाच होणार ना? माकडाच्या हातात कोलीत दिलं व त्याने घराला आग लावली तर नुकसान माकडाचं का तुमचं? पोलिसांच्या डोक्यावर जो कोणी बसलाय त्याला सरळ करायला पाहिजे. उलट गप्प बसलं तर अनिष्ट वृत्ती फोफावणार नाही का?मूर्खपणा केल्यामुळे पोलिसांच्या डोक्यावर बसलेला झाला का सरळ?
९. >> दाभोळकर हे फ्रॉड आहेत हे केवळ सनातन प्रभात मध्ये आरोप करून सिद्ध होत नाही. हे आरोप न्यायालयात >> सिद्ध व्हावे लागतात. नुसते शाब्दिक आरोप करत बसला तर तुमचा केजरीवाल होतो. दाभोलकरांच्या न्यासाने हिशेब सादर केलेले नाहीत. याला आरोप नाही, तर वस्तुस्थिती म्हणतात. दाभोलकरांच्या न्यासांच्या मालमत्तेवर टाच आणली पाहिजे. दाभोलकरांच्या फ्रॉडचे काही पुरावे इथे आहेत : http://shankhnaad.net/india/corruption/item/18-article-126 तसेच इथेही अधिक पुरावे मिळतील : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial...इथे पुरावे देऊन काहीही उपयोग नाही. हे न्यायालय नाही व इथे कोणीही न्यायाधीश नाही. त्यासाठी न्यायालय ही एकमेव योग्य जागा आहे.
१०. >> सनातन ही मूर्खांची संस्था आहे याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपल्या वर्तनाने सनातनच्या >> लोकांनी ते अनेकवेळा सिद्ध केलेलं आहे. गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था मूर्खांची असल्यास शहाणे कोण हा प्रश्नंच आहे. आ.न., -गा.पै.पूर्वी 'श्री' नावाचे एक साप्ताहिक निघायचे. ते प्रचंड लोकप्रिय होते. ते मराठीतले टॅब्लॉईड होते. संध्यानंद नावाचे वृत्तपत्रही भरपूर खपते. खपच बघायचा झाला तर 'श्री' वाले प्रचंड शहाणे समजावे लागतील. अमेरिकेतही अत्यंत टुकार मासिके/साप्ताहिके निघतात व त्यांचा खप प्रचंड असतो. ते सुद्धा शहाणेच म्हणायचे. कितीही ग्रंथ छापले व कितीही प्रती विकल्या गेल्या तरी वर्तन मूर्खपणाचे असल्यास त्यांना मूर्खच म्हणावे लागेल.
In reply to माहितगार आणि बोका-ए-आझम, by गामा पैलवान
In reply to माहितगार आणि बोका-ए-आझम, by गामा पैलवान
In reply to हे सगळे पुरावे by बोका-ए-आझम
In reply to तुमचे प्रतिवाद इथे व्यर्थ आहे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नॉर्मल लोकांसाठी... by अनुप ढेरे
In reply to नॉर्मल लोकांसाठी... by अनुप ढेरे
In reply to काहीही अनुपराव! by बोका-ए-आझम
गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था.....ज्ञानाच्या क्षेत्रात लोकप्रीयता हा माहितीचीच्या अचूकतेचा अथवा ज्ञानवंत असल्याचा परिमाण असू शकतो का ? बाकी युरोप आणि ख्रिश्चन जग पृथी सपाट आहे अस बहूमताने आणि लोकप्रीय विश्वासाने सांगत असताना पृथ्वी सपाट आहे असे सांगणारा त्याक्षणी अल्प मतात होता त्याने बायबल एवढ्या कॉपी विकल्या नसतील, बायबलच्या कॉपी अधिक विकल्या जातात म्हणून पृथ्वी सपाट आहे हे सिद्ध होऊ शकते का ? (अनुषंगिक अवांतर : याचसाठी विकिपीडिया ज्ञानकोश असल्यामुळे विकिपीडिया हि लोकशाही नाही आणि असूही नये) झाना आणि गापैच्या एका तार्कीक उणीवेत साम्य नक्कीच आहे. वरील प्रतिसादांमधून कुणीतरी झाना संबंधीत विवादा संदर्भाने दुवा दिला आहे त्यात झाना / त्यांची संस्था अथवा त्यांची भलावण करणारे एका आंतरजालीय ब्लॉगरला आंतरजालीय विवादाला नकार देताना कारण काय देतात तर झाना स्वतः अमूक इतके लोकप्रीय आहेत म्हणून त्यांचे ज्ञान अद्वितीय का कायसे आहे आणि म्हणून त्याम्च्या पेक्षा कमी लोकप्रीयता असलेल्या व्यक्तिशी ते विवादात/चर्चेत सहभागी होणार नाहीत. मी श्रीगुरुजींनी वापरलेली विशेषणे वापरताना हात आखडता घेईन तरीही "गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था...." किंवा याच्या हजारपट विकणारी अजून वेगळी असणारी संस्था असू द्यात केवळ लोकप्रीयता हे ज्ञानवंत असल्याचे लक्षण होऊ शकत नाही, सचिन तेंडूलकर पेक्षा कमी लोकप्रीय असलेल्या एखाद्या क्रिकेटरचा क्रिकेटबद्दलचा एखादा तर्क सचिन तेंडूलकरपेक्षा उजवा नसेलच असे सांगता येत नाही, मग सचिन तेंडूलकर कितीही लोकप्रीय असला तरीही. लोकप्रीय म्हणजे बरोबर या गृहीतकातील तार्कीक उणीवेला तर्कशास्त्रात Argumentum ad populum असे नाव आहे.
In argumentation theory, an argumentum ad populum (Latin for "appeal to the people") is a fallacious argument that concludes that a proposition is true because many or most people believe it: "If many believe so, it is so."The bandwagon effect is a phenomenon whereby the rate of uptake of beliefs, ideas, fads and trends increases the more that they have already been adopted by others. In other words, the bandwagon effect is characterized by the probability of individual adoption increasing with respect to the proportion who have already done so.[1] As more people come to believe in something, others also "hop on the bandwagon" regardless of the underlying evidence. Argumentum ad populum ची उदाहरणे * Nine out of ten people in the United States claim this bill is a bad idea, therefore this bill is bad for the people. * Fifty million Elvis fans can't be wrong. * Everyone's doing it, therefore it must be good. * In a court of law, the jury vote by majority; therefore they will always make the correct decision. * Many people buy extended warranties, therefore it is wise to buy them. * Millions of people agree with my viewpoint, therefore it must be right. * The majority of this country voted for this president, therefore this president must, objectively, be a good President.
In reply to श्रीगुरुजींस उद्देशून प्रतिसाद. by गामा पैलवान
मी गुरुजींशी सहमत आहे ह्या बाबतीत
In reply to सनातनची प्रकाशने (माहितगार यांना प्रतिसाद) by गामा पैलवान
एव्हढे ग्रंथ आणि एव्हढ्या प्रती निर्माण करून छापून विकण्यासाठी आणि वाचकांना विकत घ्यावेसे वाटण्यामागे केवळ मूर्खपणाच आहे का?म्हणजे मूर्खपणाही आहे हे तुम्ही कबुल करताय तर... ;) असो. 'मूर्खपणा हा संसर्गजन्य आजार आहे'
In reply to सनातनची प्रकाशने (माहितगार यांना प्रतिसाद) by गामा पैलवान
In reply to कम्यूनल रि-इन्फोर्समेंट by माहितगार
In reply to फ्याक्टॉईड काय आहे? by गामा पैलवान
In reply to सनातनची प्रकाशने (माहितगार यांना प्रतिसाद) by गामा पैलवान
In reply to गा.पै. - काही प्रश्न. by बोका-ए-आझम
In reply to खप हा मुद्दा नाहीये हो! by गामा पैलवान
In reply to झाना बहुतेक आपल्याशी सहमत होऊ by माहितगार
In reply to विषय आणि विवाद by गामा पैलवान
..चर्चेचा विषय सनातन संस्थेचा मूर्खपणा हा आहे. ही पार्श्वभूमी विसरता कामा नये.गोलपोस्ट मी बदललेली नाही माझ्या दृष्टीने धाग्याची मूळ गोलपोस्ट झानाहीच आहे.
In reply to ..चर्चेचा विषय सनातन संस्थेचा by माहितगार
In reply to दुनिया झुकती हैं | झुकानेवाला by शाम भागवत
In reply to दुनिया झुकती हैं | झुकानेवाला by शाम भागवत
In reply to चोराच्या उलट्या बोंबा by हुप्प्या
In reply to आता इथे मोदींचा काय संबंध? by संदीप डांगे
In reply to आता इथे मोदींचा काय संबंध? by संदीप डांगे
फक्त तुम्ही आणि २-४ निधर्मांध