डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..

संजय पाटिल's picture
संजय पाटिल in काथ्याकूट
30 Aug 2015 - 3:07 pm
गाभा: 

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
डॉ. नरेन्द्र दाभोळ्कर, कॉ. गोविन्द पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांना गोळ्या झाडुन ठार मारण्यात आले. नेमके काय चाललय?

प्रतिक्रिया

फुलथ्रॉटल जिनियस's picture

30 Aug 2015 - 3:21 pm | फुलथ्रॉटल जिनियस

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत,त्यातुनच पुरोगामी लोकांचे खून पडत आहेत.केंद्रात व अनेक राज्यात हिंदुत्ववादी सरकारं असल्यामुळे अश्या खूनातील आरोपींना मोकळे सोडन्याकडे कल वाढला आहे.
याला प्रत्युत्तर म्हणुन विद्रोही ,परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी हातात बंदुका घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.

लालगरूड's picture

30 Aug 2015 - 5:28 pm | लालगरूड

हिंदुत्ववादी म्हणजे काय?

सुबोध खरे's picture

31 Aug 2015 - 9:06 am | सुबोध खरे

विद्रोही ,परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी हातात बंदुका घेतल्यास
मग नक्षलवादी, जिहादी,उल्फा, नागा बंडखोर कोण आहेत? आणि आत्ता काय ते लाटणे मोर्चा काढतात काय?
जाता जाता फुल थ्रोटल -- थ्रोटल म्हणजे ("गळा") आवळणे.

प्यारे१'s picture

30 Aug 2015 - 3:58 pm | प्यारे१

अशा भेकड हत्या करणार्‍या लोकांचा आणि त्यामागे जे कुणी असतील त्या सर्वांचा ती व्र नि षे ध.

एस's picture

30 Aug 2015 - 4:22 pm | एस

भेकड कुठले!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Aug 2015 - 5:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

हत्येचा निषेध.

अश्या हत्यांनी काय साधले जाते कोणास ठावूक ?!

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2015 - 6:18 pm | श्रीगुरुजी

कलबुर्गी यांच्या खुनाचा निषेध! कर्नाटक सरकारने त्यांच्या खुन्यांना लवकरात लवकर पकडून न्यायालयात खेचून जास्तीत जास्त शिक्षा मिळण्याकरिता प्रयत्न करावे.

कलबुर्गी हे नाव आज आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलं. हे नक्की कोण, कुठले, त्यांनी नक्की काय केलं इ. बद्दल आजतगायत कणभरही माहिती नव्हती. गुगलल्यावर खालील माहिती मिळाली आणि धक्काच बसला.

http://www.niticentral.com/2014/06/22/ur-ananthamurthy-should-leave-peop...

Jnanpith Awardee and distinguished Kannada scholar Professor UR Ananthamurthy (URA) has once again hit the headlines, for the wrong reasons, and as some would say predictable reasons, given his penchant for anti-Hindu writing.

URA, as he is commonly known, said that he had once pissed on an idol which was worshiped by the villagers. A crazy act though it may be but apparently he did so because he wanted to prove that the idol had no powers. After his shock-and-shame act, nothing shocking and shaming happened to him and so the learned professor concluded that it was after all, only a stone.

The controversy sparked off due to a news report over a speech by MM Kalburgi, former Vice-Chancellor, Hampi University at a public program in Karnataka. Kalburgi in his address reportedly referred to an essay written by URA where the latter recounts a childhood experience when he urinated on a temple deity in a village. Apparently this act was to challenge the belief systems handed down to him in his family which said that everything was sacred.

हे स्वतःला विचारवंत, बुद्धीप्रामाण्यावादी आणि प्रागतिक विचारांचे समजले जाणारे अशी किळसवाणी आणि एका विशिष्ट समाजाच्या भावना व श्रद्धास्थाने दुखावणारी कृत्ये का करतात? अशी कृत्ये करून समाजातील मूर्तिपूजा थांबणार आहे का? इतरांच्या धार्मिक भावना दुखावून त्यांना नक्की कसले विकृत समाधान मिळाले?

जरी हे कृत्य बालवयात केले असले तरी त्याबद्दल खेद, खंत न वाटता वयाच्या उत्तरार्धात त्याबद्दल पुस्तक लिहून प्रसिद्ध करून त्यांना नक्की कसले समाधान मिळते?

अनंतमुर्तींच्या या किळसवाण्या कृत्याचा निषेध न करता जाहीर सभेत त्याचा संदर्भ देऊन कलबुर्गींनी नक्की काय मिळविले?

मूर्तीपूजा ही अंधश्रद्धा आहे हे या कृत्यातून अनंतमूर्तींना सिद्ध करायचे होते तर इतर धर्मात सुरू असणार्‍या मूर्तीपूजेला त्यांनी कधी अशा प्रकारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे विरोध केला होता का? तसा केला नसल्यास फक्त हिंदू धर्मातील मूर्तिपूजा ही अंधश्रद्धा आणि इतर धर्मातील मूर्तिपूजा ही डोळस श्रद्धा आहे असा त्यांचा समज होता का? असेच कृत्य करण्याचे धाडस त्यांनी इतर धर्मांच्या श्रद्धास्थानांबद्दल दाखविले असते का?

मला कधी कधी वाटते की हिंदू अतिसहिष्णु असल्याने बिनदिक्कत कोणीही कसलीही कृत्ये करून सश्रद्ध समूहाच्या भावना दुखावतो आणि भावना दुखावणारा विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी इ. विशेषणांनी गौरविला जातो.

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2015 - 6:25 pm | श्रीगुरुजी

याच संदर्भात कलबुर्गींसंदर्भात अजून माहिती मिळाली.

https://www.youtube.com/watch?v=mS5y9Asrzug

BANGALORE: Former vice-chancellor of Kannada University Dr M M Kalburgi's remarks 'there is nothing wrong in urinating on idols,' has sparked criticism in the literary, political and academic circles.

The BJP workers staged a protest at Ananda Rao Circle condemning Kalburgi's remarks that were interpreted by many as anti-God.

Researcher Dr M Chidananda Murthy termed Kalburgi's statements 'uncivilised and nonsensical'.

"His criticism of blind beliefs is not correct. Kalburgi said idols should not be worshiped and it is not wrong to urinate on them. This is pure nonsense," Murthy said.

"It is Kalburgi's nature. When he was the V-C, he did not have a problem with temple located within the campus and now he is asking people to abandon temples," he said.

At a seminar on the controversial Anti-superstition Bill held here on Monday, Kalburgi had made a mention of Kannada writer U R Ananthamurthy urinating on a stone idol.

Ananthamurthy told Express that while superstitions do not exist, people faced constant struggles with God. Recalling his childhood experience, Ananthamurthy said he had once urinated on an idol to check if something happens."I was surrounded by orthodox people and was disturbed about God's existence. So I urinated on a statue. I was filled with love and terror for God," he said.

Kalburgi's statement was creating an impact because of Modi's victory in the recent elections, he said.

Writer K Marulasiddappa said scientific temperament has to be developed among people and a law cannot do away with superstitions. "Political parties cannot be blamed for the popularity of a faith or superstitions," he said.

Bangalore University's former V-C M S Thimmappa said Kalburgi termed urination as an unholy act and that in itself is a blind belief.People get solace from having faith in Gods and their idols and images and unless a person has an alternative suggestion, it is reckless on the part of a mature professor to pass such comments, he said.

"He has done this to get a kick out of what Ananthamurthy did as a child and had no intellectual and academic points to bolster his argument," he said.

कलबुर्गींचा खून निषेधार्ह आहे. परंतु त्यांचे वरील उद्गार हे जास्त निषेधार्ह आहेत.

प्यारे१'s picture

30 Aug 2015 - 6:37 pm | प्यारे१

+११११.

तरीही हत्या समर्थनीय नाही वाटत.

मांत्रिक's picture

30 Aug 2015 - 10:24 pm | मांत्रिक

श्रीगुरुजी, योग्य प्रतिवाद.

अंतरा आनंद's picture

31 Aug 2015 - 12:44 pm | अंतरा आनंद

कलबुर्गींचा खून निषेधार्ह आहे. परंतु त्यांचे वरील उद्गार हे जास्त निषेधार्ह आहेत.

वा तुमच्या भावना या एखाद्याच्या रक्तापेक्षा जास्त बहुमोल आहेत असं मानता यातच सर्व आलं उगाच तोंडदेखला निषेध तरी का करता?

प्यारे१'s picture

31 Aug 2015 - 12:57 pm | प्यारे१

किंचित असहमत.

बर्‍याचदा आपण १० रुपयासाठी खून, जेवणात मीठ कमी पडलं किंवा जास्त पडलं म्हणून खून, अमुक एक गोष्ट ऐकली नाही म्हणून खून वगैरे ऐकतो, वाचतो. यात या सगळ्या क्षुल्लक गोष्टी रक्तापेक्षा जास्त मोलाच्या असतात असं मानायचं असतं का? भावना तीव्र च असतात. त्या शब्दांद्वारे व्यक्त झाल्यावर प्रतिक्रिया (कौटुंबिक वादात बहुतेक वेळा ती 'पति'क्रिया असते) म्हणून खून होतात.

ध्वजासाठी जीवाची आहुति वगैरे देणारे, आई वडलांना अपशब्द बोलले म्हणून हाणामार्‍या करणारे, घराण्याबद्दल काही बोललं म्हणून डोकं फोडणारे यांच्याबद्दल काय बोलता येईल? एखाद्याला माणसावर मूत्रविसर्जन करण्याची भाषा करणार्‍या व्यक्तीचं किंवा तिला समर्थन देणार्‍या व्यक्तीचं समर्थन होऊ शकतं का? बहुतेक ९९.९% नाही. त्या व्यक्तीबद्दल घृणा च वाटेल. मग जी बहुसंख्यांची श्रद्धास्थानं आहेत त्याबाबत अशी भाषा का?

याशिवाय ज्या गोष्टीमुळं दुसर्‍या व्यक्तीला नंतरची कृती करायला उद्युक्त केलं जातं त्या गोष्टीचा निषेध अधिक प्रमाणावर आणि अधिक तीव्रतेनं केला जायलाच हवा.

श्रीगुरुजी's picture

31 Aug 2015 - 1:45 pm | श्रीगुरुजी

याशिवाय ज्या गोष्टीमुळं दुसर्‍या व्यक्तीला नंतरची कृती करायला उद्युक्त केलं जातं त्या गोष्टीचा निषेध अधिक प्रमाणावर आणि अधिक तीव्रतेनं केला जायलाच हवा.

+१

भृशुंडी's picture

30 Aug 2015 - 11:20 pm | भृशुंडी

एक तांत्रिक कुतूहल आहे- कुठल्या सर्च टर्मसाठी गुगलल्यावर पहिल्या १० लिंक्स/ सर्च रिझल्ट niticentral कडे घेऊन जातात?
हे कळेल का?
आता आणखी एका लिंकनुसार -

U.R. Ananthamurthy’s Bethale Puje Yake Kudadu, in which the Jnanpith award winner narrated his childhood experience of urinating on a stone idol as an experiment to see whether there would be divine retribution of some kind.

.
विधान केलं अनंतमूर्तींनी, त्यातही आपल्या बालपणीच्या प्रयोगांबद्दल, त्याचा उल्लेख केला कलबुर्गींनी- आणि त्याचा विपरीत रेफरन्स घेऊन, हा बादरायण संबंध जोडून डायरेक्ट "विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी मंडळी असं का करतात" असं generalization करून टाकता आहात. ही सरासर दिशाभूल आहे.
.
@भावना दुखावणे, इतर धर्मीय वगैरे - त्यांना आपल्या धर्माबद्दल काही बोलायचं असेल, तो त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येकाने तुम्हाला हव्या त्या धर्मातल्या त्रुटींबद्दल बोलायला हवं का? उठसूठ कुठल्याही विषयावर बोलल्याने धार्मिक भावना भडकणार असं म्हटलं, की मग काही करायलाच नको. बरं, दुखावल्या धार्मिक भावना, तर लगेच दारावर टकटक करून गोळ्याच घालून टाकायच्या! अधे मधे काहीच नाही? सुंदर. आवडली ही मेथडॉलॉजी आपल्याला, आणि ह्याचं अप्रत्यक्षरित्या समर्थन करणारे तुम्ही ( "खुनापे़क्षा विधान करणं हे जास्त निषिद्ध आहे") आणि तुमचा सहिष्णु धर्म, राईट?
.
मेळ बसत नाही ह्या सगळ्याचा.

श्रीगुरुजी's picture

31 Aug 2015 - 1:55 pm | श्रीगुरुजी

विधान केलं अनंतमूर्तींनी, त्यातही आपल्या बालपणीच्या प्रयोगांबद्दल, त्याचा उल्लेख केला कलबुर्गींनी- आणि त्याचा विपरीत रेफरन्स घेऊन, हा बादरायण संबंध जोडून डायरेक्ट "विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी मंडळी असं का करतात" असं generalization करून टाकता आहात. ही सरासर दिशाभूल आहे.

अनंतमूर्तींनी बालवयात घृणास्पद कृती केली. ती कृती न कळत्या बालवयातील केलेली कृती म्हणून कदाचित हलकेपणाने घेता येईल. परंतु नंतर मोठेपणी, कळत्या वयात आपल्या घॄणास्पद कृतीबद्दल त्यांना आयुष्यात कधीही खंत, खेद वाटला नाही. उलट वयाची साठी उलटल्यानंतर एक लेख लिहून त्यात कृतीचे वर्णन करून समर्थन केले. कलबुर्गींनी सुद्धा २०१४ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी त्या कृतीचे समर्थन केले.

विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी समजल्या जाणार्‍यांपैकी किती जणांनी या कृतीवर टीका केली आहे? काल असे अनेक तथाकथित विचारवंत कुलबर्गींचे कौतुक करताना त्यांच्या हत्येचा निषेध करीत होते. त्यांच्या हत्येचा निषेध करताना हिंदू देवतांच्या मूर्तीवर लघवी करण्याचे समर्थन करणार्‍या त्यांच्या वक्तव्याचा का निषेध केला नाही? असले बहुसंख्य तथाकथित विचारवंत असे वागत असल्यावर आपोआप generalization होणारच.

श्रीगुरुजी's picture

31 Aug 2015 - 2:17 pm | श्रीगुरुजी

@भावना दुखावणे, इतर धर्मीय वगैरे - त्यांना आपल्या धर्माबद्दल काही बोलायचं असेल, तो त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येकाने तुम्हाला हव्या त्या धर्मातल्या त्रुटींबद्दल बोलायला हवं का? उठसूठ कुठल्याही विषयावर बोलल्याने धार्मिक भावना भडकणार असं म्हटलं, की मग काही करायलाच नको. बरं, दुखावल्या धार्मिक भावना, तर लगेच दारावर टकटक करून गोळ्याच घालून टाकायच्या! अधे मधे काहीच नाही? सुंदर. आवडली ही मेथडॉलॉजी आपल्याला, आणि ह्याचं अप्रत्यक्षरित्या समर्थन करणारे तुम्ही ( "खुनापे़क्षा विधान करणं हे जास्त निषिद्ध आहे") आणि तुमचा सहिष्णु धर्म, राईट?

अभ्यासाचा विषय असेल तर कोण विरोध करेल? परंतु देवतेच्या मूर्तीवर असले घृणास्पद कृत्य करून त्याचे नंतर समर्थन करणे योग्य आहे का? असे कृत्य म्हणजे उठसूठ कुठल्याही विषयावर बोलणे नाही. हे अत्यंत घृणास्पद आणि एका विशिष्ट धर्मियांच्या श्रद्धास्थानावर आघात करणारे कृत्य आहे.

मी गोळ्या घालण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन केलेले नाही. निषेधच केलेला आहे. परंतु माझ्या दृष्टीने आधी केलेले घॄणास्पद कृत्य हे नक्कीच जास्त निषेधार्ह आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2015 - 6:30 pm | श्रीगुरुजी

अनंतमूर्तींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. कलबुर्गींना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. सध्या जगातील प्रत्येक विषयावर वाटेल ते बरळणारे नेमाडे यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे.

या मानाच्या पुरस्काराकरिता अशा व्यक्ती निवडणार्‍यांची कीव आली.

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2015 - 6:56 pm | श्रीगुरुजी

https://en.wikipedia.org/wiki/M._M._Kalburgi

विकीवरून अजून माहिती मिळाली. लिंगायत समाजाचे संस्थापक बसवेश्वर यांच्या संदर्भातही कलबुर्गींनी वादग्रस्त विधाने केलेली दिसतात.

He came under criticism in the 1980s from the lingayats community of Karnataka, after he was accused of making "derogatory references" to Basava, a 12th-century philosopher who is revered by the community, Basava's wife and sister, in his Marga 1, a work on Kannada folklore, religion and culture.

In 1989 Kalburgi was forced by the Lingayat temple-chiefs to recant the allegedly derogatory references to the founder of Veerashaivaism, Basava, his wife and sister. The controversy was about two articles in his book Marga 1. In the first, Kalburgi examined several vachanas (poems) written by Basaveshwara's second wife Neelambike and concluded that her relationship with her husband may have been only platonic. In the other article, he pointed out the obfuscation by historians of the birth of Channabasava, another Virashaiva poet. Kalburgi, relying on historical records, argued that Channabasava could be the product of Basava's sister Nagalambike's marriage to Dohara Kakkaya, the cobbler-poet. After recanting his views Kalburgi had said, "I did it to save the lives of my family. But I also committed intellectual suicide on that day."

याचा काही सबळ पुरावा आहे का ??? हाती असल्यास तो हातोहात समोर ठेवावा, म्हणजे अभ्यासणे सोपे होईल.

श्रीगुरुजी's picture

31 Aug 2015 - 2:28 pm | श्रीगुरुजी

लिंगायत हा हिंदुधर्माचाच एक भाग आहे. तो वेगळा धर्म नाही. ही ५ जानेवारी २०१५ ची लिंक बघा.

http://www.newindianexpress.com/states/karnataka/%E2%80%98Lingayats-Are-...

त्यातील काही वाक्ये -

Lingayat is an independent religion with its own culture, tradition and a sacred book, said Vishwa Lingayat Mahasabha national president Sanjay Makal.

Makal said if Lingayat becomes an independent religion, it would get Central government aid up to `300 crore, which can be used to uplift the community and the religion would get global recognition.

Expressing anguish over the status of Lingayats in Hinduism, he said: “Hindus consider us as shudras even though we follow Brahminic tradition.

लिंगायत हा वेगळा धर्म असल्याची कायदेशीर घोषणा केंद्र सरकारने करावी अशी गेल्या १०-१२ वर्षांपासून काही लिंगायत नागरिकांनी मागणी केली आहे. परंतु लिंगायत समाजात या मागणीला संपूर्ण पाठिंबा नाही. ऑक्टोबर २०१३ या दिवसी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये याबद्दल एक बातमी आली आहे.

http://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/Lingayats-renew-demand...

The All India Veerashaiva Mahasabha president and senior Karnataka minister Shamnur Shivashankarappa is lobbying at the Centre to seek 'religious minority' status for Lingayats by seeking a separate identity from Hinduism. But there don't seem to be many takers for this within the community.

The demand has been kept alive for the past decade by some Lingayat leaders, most of whom happen to be the Mahasabha's office-bearers. During the last census in 2011, the proponents for delinking Veerashaiva from Hinduism exhorted their community members to opt for the 'Other' in the column for religion during enumeration.

अर्धवटराव's picture

30 Aug 2015 - 8:20 pm | अर्धवटराव

निवडणुक जींकता येत नसेल तर असे बळी घेऊन विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा? हद्द झाली नालायकपणाची.

कवितानागेश's picture

31 Aug 2015 - 12:05 pm | कवितानागेश

.

बोका-ए-आझम's picture

30 Aug 2015 - 8:27 pm | बोका-ए-आझम

चार्ली हेब्दोवर मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी हल्ला केला आणि तिथल्या लोकांना मारलं तेव्हा धर्माची कुचेष्टा करणं वाईटच. त्याचाच हा परिणाम आहे अशी एक प्रतिक्रिया वाचली होती. इथे फक्त धर्म बदलले आहेत. शिवाय स्वघोषित आरामखुर्चीतले न्यायाधीश काहीही पुरावा सापडलेला नसताना हिंदुत्ववादी संघटनांवर खापर फोडून मोकळे झालेले आहेत. एकूण काय तर इस्लामी धर्मांधांनी घेतलेला सूड समर्थनीय आहे आणि इथे कोणताही पुरावा नसताना हिंदू ब‌ॅशिंग चालू झालेले आहे. शिवाय वैयक्तिक टीकासुद्धा. टाका टाका, अजून आपापल्या मतांच्या पिंका टाका. असं करण्याचे किती पैसे मिळतात ते विचारलं तर लगेच व्यक्तिगत टीका वगैरे म्हटलं जाईल आणि स्वतःची तथाकथित धर्मनिरपेक्ष बडबड सोयीस्कररीत्या विसरली जाईल. दुस-याकडे आरोपाचं एक बोट रोखलेलं असताना बाकीची तीन बोटं स्वतःकडे रोखलेली असतात हे जेव्हा लक्षात येईल तो सुदिन. बाकी चालू द्या.

मांत्रिक's picture

30 Aug 2015 - 8:33 pm | मांत्रिक

सहमत बोकोबा.

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2015 - 10:26 pm | श्रीगुरुजी

अनंतमूर्ती किंवा कलबुर्गी यांना विचारवंत म्हणणार्‍यांची कीव येते. एखाद्या विचाराला किंवा कृतीला आपला विरोध असेल तर फक्त सेलेक्टिव्ह विरोध करायचा (म्हणजे हिंदू सोडून इतर धर्मातील मूर्तिपूजेविरूद्ध यांची तोंडातून ब्र काढायची हिम्मत नव्हती आणि ज्या ठराविक ग्रुपला विरोध करायचा त्यांच्या श्रद्धास्थानावर लघवी करण्याचे समर्थन करायचे.

हे म्हणे विचारवंत! हे तर खरे अविचारीच आहेत.

मांत्रिक's picture

30 Aug 2015 - 10:39 pm | मांत्रिक

अविचारी फक्त? इथे तिथे पाय वर करणारे श्वानवर्गीय म्हणा!

भृशुंडी's picture

30 Aug 2015 - 10:56 pm | भृशुंडी

श्रीगुरूजी,
प्रतिसादांतून मताच्या पिंका टाकून आपला विरोध दाखवून देण्यात काहीच हशील नाही.
बरं, विरोध असला तरी तो एका किमान सभ्यतेच्या पातळीवर केला, तर हरकत नाही. पण आपल्या प्रतिक्रियांतून जी काही असभ्य आणि हेतूपुरस्सर टीका दिसून येते, ती किमान पातळी सोडून होते आहे, हे लक्षात घ्या.
तेव्हा विषयाशी संबंध नसलेल्या अनंतमूर्तींना वगळू. आता कलबुर्गींना नक्की काय विरोध आहे, त्यांच्या कुठल्या मुद्द्यांवर आक्षेप आहेत आणि त्यावर काय प्रतिवाद आहेत ते मांडा.
पण अमुक ह्यांना विचारवंत म्हणू नये, तमक्याची कीव येते, इतर धर्मांवर का टीका नाही केली- ह्या नेहेमीच्याच दिशाभूल करणार्‍या वाक्यांना टाळलंत तर बरं होईल, कारण वडाची साल पिंपळाला लावण्यार्‍या ह्या प्रतिक्रिया कुठल्याही मुद्द्यावर दिसतातच. (पहा-पीके!)
---
आणि मी डू आयडी आहे का वगैरे फालतू मुद्द्यांवर न आलेलंच बरं. नेहेमी वाचक मोडमधे असलो तरी असल्या प्रतिसादाला उत्तर दिल्यावाचून रहावलं नाही.
थँक्यू.

श्रीगुरुजी's picture

31 Aug 2015 - 2:35 pm | श्रीगुरुजी

तेव्हा विषयाशी संबंध नसलेल्या अनंतमूर्तींना वगळू. आता कलबुर्गींना नक्की काय विरोध आहे, त्यांच्या कुठल्या मुद्द्यांवर आक्षेप आहेत आणि त्यावर काय प्रतिवाद आहेत ते मांडा.

"देवतांच्या मूर्तीवर लघवी करणे चुकीचे नाही" असे कलबुर्गींनी २०१४ मध्ये जाहीररित्या सांगितले होते. त्यांच्या या विचारसरणीला विरोध व आक्षेप आहे.

पण अमुक ह्यांना विचारवंत म्हणू नये, तमक्याची कीव येते, इतर धर्मांवर का टीका नाही केली- ह्या नेहेमीच्याच दिशाभूल करणार्‍या वाक्यांना टाळलंत तर बरं होईल, कारण वडाची साल पिंपळाला लावण्यार्‍या ह्या प्रतिक्रिया कुठल्याही मुद्द्यावर दिसतातच. (पहा-पीके!)

जर तुम्ही एका विशिष्ट धर्मातल्या एका विशिष्ट कृतीला अत्यंत खालच्या पातळीची कृती करून विरोध करता आणि अशा घॄणास्पद कृतीचे समर्थन करता आणि त्याचवेळी इतर धर्मातील अगदी तशाच कृतीबद्दल तोंडातून विरोधाचा चकार शब्दही काढत नाही तेव्हा त्यांच्यावर टीका होणारच.

देवीच्या जत्रेत कोंबड्या-बकर्‍यांचे बळी द्यायच्या कृतीला विरोध आणि इदच्या दिवशी कापल्या जाणार्‍या बकर्‍यांच्या बाबतीत मात्र मौन, असे सेलेक्टिव्ह बॅशिंग केल्यावर टीका होणारच.

अंतरा आनंद's picture

31 Aug 2015 - 12:49 pm | अंतरा आनंद

नका म्हणू त्यांना विचारवंत पण स्वतःच्या घरातली घाण दाखवल्यावर समोरच्याच्या घराकडे बोट दाखवता का? का त्याहीपलीकडे जाउन दुसर्^याच्या घरातली घाण हा आदर्श मानून आपलं घरही तितकं घाण करण्याच्या पाठी लागता का ?

श्रीगुरुजी's picture

31 Aug 2015 - 2:38 pm | श्रीगुरुजी

नका म्हणू त्यांना विचारवंत पण स्वतःच्या घरातली घाण दाखवल्यावर समोरच्याच्या घराकडे बोट दाखवता का? का त्याहीपलीकडे जाउन दुसर्^याच्या घरातली घाण हा आदर्श मानून आपलं घरही तितकं घाण करण्याच्या पाठी लागता का ?

आपल्या आवडत्या दैवतांच्या मूर्तीची पूजा ही स्वतःच्या घरातली घाण कधीपासून झाली? आणि ज्यांना मूर्तीपूजा घाण वाटते त्यांनी विरोधाच्या नावाखाली थेट मूर्तीवरच घाण करायची आणि त्याचे समर्थन करायचे? हे योग्य वाटते का?

अंतरा आनंद's picture

1 Sep 2015 - 11:04 am | अंतरा आनंद

देवीच्या जत्रेत कोंबड्या-बकर्‍यांचे बळी द्यायच्या कृतीला विरोध आणि इदच्या दिवशी कापल्या जाणार्‍या बकर्‍यांच्या बाबतीत मात्र मौन, असे सेलेक्टिव्ह बॅशिंग केल्यावर टीका होणारच.

याबद्द्ल बोलतेय मी .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Sep 2015 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंतरा आनन्द यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

-दिलीप बिरुटे

dadadarekar's picture

30 Aug 2015 - 11:12 pm | dadadarekar

मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा आहे ?

आर्यसमाज हेच म्हणत होता ना ? आर्यसमाज्म्हणजे ते पिंडीवर उंदीर चढलेला पाहून पुजा वगैरे सोडुन दिलि ते.

न तस्य प्रतिमा अस्ति यस्यनाममहद् यशः

काळा पहाड's picture

31 Aug 2015 - 12:41 am | काळा पहाड

अजिबात गुन्हा नाही. तो एका धर्माचा प्रेषित नव्हता का मूर्तीपूजेला विरोध करत, ६ वर्षाच्या बालिकेशी लग्न लावताना? आणि कुमारी नसणार्‍या कुमारी मातेचे पुतळे लावतातच ना त्यांच्या धर्मस्थानात. कसा असेल गुन्हा? हां आता एखाद्या अतिरेकी विचाराच्या माणसाचं डोकं फिरलं आणि घातल्या त्यानं गोळ्या तर तो धर्माशी संबंधित विषय थोडाच असेल?

कुंती , सत्यवती यांना एकेक पुत्र होऊनही त्यांचं कौमार्य शाबूत होतं ना ? तुमच्या पुस्तकात असा चमत्कार होऊ शकतो , तर इतर धर्मांतील स्त्रीयानाही असे अनुभव येऊ शकतात ना ?

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 8:36 am | बोका-ए-आझम

४०००-५००० वर्षांपूर्वी स्त्रियांच्या कौमार्याची. एवढं महाभारत वाचूनसुद्धा त्यातलं लक्षात काय राहिलं तर हे. यावरून मेंदू कुठे आहे आणि काय विचार करतोय हे समजतंय. बाकी चालू द्या.

dadadarekar's picture

31 Aug 2015 - 9:49 am | dadadarekar

दोन हजार वर्षे मागे त्यांची बुद्ध्ही गेली.

मg मी माझीही बुद्ध्ही अजुन दोन हजार वर्षे मागे नेली.

त्यांची बुद्धी युरोपच्या टूरवर चालली होती.

मी त्या बुद्धीला कुरुक्षेत्रावर नेऊन सोडली.

काळा पहाड's picture

31 Aug 2015 - 10:43 am | काळा पहाड

चित भी मेरी पट भी मेरा असं होत नस्तं ना भौ. तुम्ही हिंदू धर्मातल्या गोष्टींवर आडून आडून हल्ले करणार, तुमची बुद्धी मागल्या शतकात किंवा त्यापूर्वी तुमच्या सोयीप्रमाणं नेणार आणि आम्ही बुद्धी याच शतकात ठेवायची? अजून पुरेसा मैदानातसुद्धा आलेलो नाही तर चार हजार वर्षापूर्वीचे साहित्य गोळा करायची तुमची धडपड. अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त.

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 1:24 am | बोका-ए-आझम

हा अजिबात गुन्हा नाही. पण तो व्यवस्थित आणि रीतसर पद्धतीनेही करता येतो. जसा आर्यसमाजाने केलेला आहे. प्रक्षोभक भाषा वापरल्याशिवाय विरोध करताच येत नाही अशी ज्यांची समजूत आहे आणि मूर्तिपूजेमागचं कारण जाणून न घेता जे विरोध करतात त्यांच्याबद्दल काय बोलावे? आणि मूर्तिपूजेला विरोध हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की जर तो तसा असेल तर इतर धर्मांमध्ये जी मूर्तिपूजा होते तिचाही हे विचारवंत विरोध करतात का? जर विरोध आहे तर सगळ्याच धर्मांमधल्या मूर्तिपूजेला हवा. Selective विरोध हा दांभिकपणा आहे.

dadadarekar's picture

31 Aug 2015 - 6:12 am | dadadarekar

सिलेक्टिव्ह हे गोड लेबल लावून स्वतःचा तांत्रिकदृष्ट्या बचाव करणे हा जास्ती मोठा दांभिकपणा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2015 - 7:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकाच व्यक्तीने सर्वच धर्माच्या अनिष्ट गोष्टींना विरोध केला पाहिजे असं काही असतं का ? लिंगायत धर्म तसा पुरोगामी धर्म त्याच्यातही न पटणा-या गोष्टी असतील असा समाज धर्मांधतेच्या विळख्यात जात असतील आणि आजच्या काळात तो विचार कालबाह्य असेल तर त्याबद्दल मत मांड्णं, अनिष्ट गोष्टी चालत असतील तर त्याला विरोध केला म्हणुन कोणाची हत्या करणार का ?

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 8:58 am | बोका-ए-आझम

अधिकृतरीत्या म्हणजे सरकारी नियमांनुसार लिंगायत हा वेगळा धर्म मानला जातो का यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. त्याचा उल्लेख पंथ असा ऐकलेला आहे. धार्मिक अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लिम,शीख,ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारशी यांचाच समावेश होतो. लिंगायत हा शब्द त्यात नाहीये. तस्मात् जाणकारांनी सांगावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2015 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिंगायत पंथच आहे धर्म नाही..

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

31 Aug 2015 - 9:25 am | सुबोध खरे

प्राध्यापक साहेब
कलबुर्गीनि समर्थन केलेली किंवा अनंत मूर्तींनी केलेली गोष्ट सर्वथैव त्याज्य आहे. मूर्ती हे एक प्रतिक असते आपल्या श्रद्धेचे. आपल्या श्रद्धेला तडा जाणार्री गोष्ट कुणी केली तर ती पटणार नाही. मी बलदंड असेन तर मी कुणाच्या आईवर मुत्र विसर्जन किंवा बापावर थुंकलेले चालेल का( येथे धर्माचा संबंध नाही) केवळ ते प्रतिवाद करू शकत नाहीत म्हणून असे करणे समर्थनीय होऊ शकेल का ?
मग लोकांच्या श्रद्धास्थानाला हीन धक्का लावण्यात काय हशील आहे.प्रत्येक धर्मात हीन गोष्टी आहेतच. म्हणून त्याचा प्रतिवाद हा विचारानेच करणे आवश्यक आहे. ख्रिस्ताच्या किंवा बुद्धाच्या मूर्तीवर किंवा कुराणावर किंवा एखाद्याने अगदी शेंदूर फासून उभा केलेला देव असेल तरी त्यावर मुत्र विसर्जन हे कृत्य समर्थनीय कसे ठरेल. मग अनंत्मुर्तींचे किंवा कल्बुर्गींचे कृत्य आपण समर्थनीय कसे ठरवणार?
अर्थात म्हणून त्यांची हत्या करणे हे कुठल्याहि अर्थाने समर्थनीय नाही आणि तो गुन्हाच आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यांच्या( अनंत मूर्ती किंवा कलबुर्गी) या आचरट कृत्याचा प्रतिवाद हत्येने करणे सर्वथैव चूक आहे. (त्यांच्या तोंडाला काळे फासणे इ. कृत्य कदाचित समर्थनीय असू शकेल). पण त्याचबरोबर त्यांचे कृत्य समर्थनीय हि नाही.
आपल्याला एखाद्या १५ वर्षाच्या मुलाने आईवरून अत्यंत घाण शिवी दिली तर आपण त्याच्याशी प्रतिवाद करता का ताबडतोब त्याच्या श्रीमुखात भडकावता? मी आपणास हा प्रश्न आपण सुशिक्षित आणि विचारवंत( प्राध्यापक) म्हणून विचारतो आहे.

गॅरी ट्रुमन's picture

31 Aug 2015 - 10:32 am | गॅरी ट्रुमन

कलबुर्गीनि समर्थन केलेली किंवा अनंत मूर्तींनी केलेली गोष्ट सर्वथैव त्याज्य आहे. मूर्ती हे एक प्रतिक असते आपल्या श्रद्धेचे. आपल्या श्रद्धेला तडा जाणार्री गोष्ट कुणी केली तर ती पटणार नाही.

+१०००००. याविषयी विवेकानंदांची वाचलेली एक गोष्ट आठवते.कुठल्याशा संस्थानाच्या प्रधानाने विवेकानंदांना मूर्तीपुजेविषयी प्रश्न विचारला.प्रधान म्हणत होता की मूर्ती तर दगड असते.त्यात थोडी देव असतो?विवेकानंदांना त्याच खोलीत लावलेली त्या संस्थानच्या राजाची तसबीर दिसली.त्यांनी त्या प्रधानाला त्या तसबीरीवर थुंकायला सांगितले.त्यावर प्रधान म्हणाला--अहो स्वामीजी मी असे कसे करू? राजे तर माझे अन्नदाता आहेत. त्यावर विवेकानंद हसून म्हणाले की ती तर तुमच्या अन्नदात्याची तसबीर आहे.तुमचे अन्नदाते तर वेगळेच आहेत!! यातून विवेकानंदांना नक्की काय म्हणायचे आहे हे प्रधानाला समजलेच.

आजही राष्ट्रध्वजाला वंदनीय का मानले जाते?ते तर एक कापडच असते.राष्ट्रध्वज जाळणे हा कायद्याने गुन्हा आहे. तो का? स्वातंत्र्यलढ्यातही गोळ्या खाऊनही जीवाचा आटापिटा करून ध्वज सांभाळायचा प्रयत्न स्वातंत्र्यसैनिकांनी कसा केला याच्या गोष्टी आपण सगळ्यांनीच ऐकलेल्या आहेत.

मूर्तीपुजेत आणि या गोष्टींमध्ये नक्की काय फरक आहे?

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 11:02 am | बोका-ए-आझम

सहमत. आणि पुरोगामी डावे मार्क्सचे, लेनिनचे झालंच तर मानवेंद्रनाथ राॅय यांचे विचार मानतात. समाजवादी लोहियांना मानतात. त्यांच्या विचारांमध्ये जरा बदल करण्याचा प्रयत्न केला तरी त्या माणसाची revisionist म्हणून निर्भर्त्सना करतात. ही पोथिनिष्ठा मूर्तिपूजेसारखीच आहे. तात्विक दृष्ट्या काहीच फरक वाटत नाही. स्कवतःला पुरोगामी म्हणवणारे कम्युनिस्ट त्यांच्या विळ्याकोयत्याच्या प्रतिकाबाबत, चे ग्वेव्हाराच्या त्या प्रसिद्ध फोटोबाबत टोकाचे आग्रही असतात. बरं, त्यांचा सलाम लालच का असतो? हिरवा, पिवळा, काळा वगैरे का नसतो? हीसुद्धा मूर्तिपूजाच आहे. कलबर्गींनीही तसं म्हटलं तर मूर्तिपूजाच केली - फक्त देवाऐवजी अनंतमूर्ती होते, एवढाच फरक आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Aug 2015 - 11:12 am | कैलासवासी सोन्याबापु

१०००+,

भारतीय कम्युनिज्म यझ आहे

गॅरी ट्रुमन's picture

31 Aug 2015 - 11:27 am | गॅरी ट्रुमन

भारतीय कम्युनिज्म यझ आहे

यातील भारतीय हा शब्द काढला तरी या वाक्याचा अर्थ बदलणार नाही :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Aug 2015 - 11:54 am | कैलासवासी सोन्याबापु

दादा बाहेरील कम्युनिज्म चा बेसिक अन काही क्रोनोलॉजी सोडता काही अभ्यास नाही तस्मात् ज्याचा अभ्यास तितकेच बोललो!! :)

मदनबाण's picture

31 Aug 2015 - 3:40 pm | मदनबाण

हत्येचा निशेध...
बाकी, डॉक तुमचा प्रतिसाद वाचल्यावर क्षणभर मला माझाच एक जुना प्रतिसाद आठवला !

मदनबाण.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2015 - 11:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर साहेब, वर उल्लेख आला आहे तसा की बालवयात त्यांनी काय कृत्य केलं त्याचं आता समर्थन होऊ शकत नाही, मुर्ती पूजेत कुठलंही शास्त्र नाही किंवा त्यात विज्ञानही नाही म्हणुन त्यावर मुत्र विसर्जन करा असा अर्थ त्यात असेल तर ते चुकच आहे. माणसाच्या रक्तात श्रद्धा इतक्या प्रचंड खोलवर रुजुन बसलेल्या असतात की त्या एका क्षणात बाहेर काढुन फेकता येत नाही. आणि असं काही टोकाचं विधान करुन, किंवा श्रद्धा तोडून कोणत्याही परंपरा विचार बदलत नसतो आधुनिक विचार जनमानसात रुजवावा लागतो. आणि हळुहळु तो विचार समाजात रुजत असतो.

>>>> अर्थात म्हणून त्यांची हत्या करणे हे कुठल्याहि अर्थाने समर्थनीय नाही आणि तो गुन्हाच आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

सहमत. विषय संपला.

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 11:07 am | बोका-ए-आझम

बिरुटे सर. पण काहीही पुरावा नसताना त्यांची हत्या हिंदुत्ववाद्यांनी केली असा अपप्रचार करणा-यांचं काय? त्यांच्या हत्येला हत्या हा गुन्हा म्हणून न पाहाता जे हिंदुत्ववादी कारस्थान म्हणून पाहात आहेत आणि तेही पुरावा नसताना - त्यांनी आपल्या मताच्या शिंका टाकताना विचार करायला हवा की नको? याबद्दल तुमचं काय मत आहे? की तिथेही विषय संपला असं म्हणून तुम्ही स्टाफरुमच्या दिशेने निघून जाणार आहात?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2015 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिंदुत्ववाद्यानीच हे कृत्य केलं असा कोणत्याही पुराव्या शिवाय मी तरी विधान करणार नाही. हिंदुत्ववाद्याचं कारस्थान असंही म्हनणार नाही, पण या पूर्वी असा काही कोणी प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर शंका तर येणारच ना ?

मी चर्चेत जे पटतं आणि जो विचार आधुनिक जगाशी सुसंगत आहे त्याच्याशी बांधिलकी ठेवून मी स्टाफरुम मधे बसलेलो असलो तरी वाचत लिहित राहीन.

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 11:44 am | बोका-ए-आझम

हा किती घातक असू शकतो याबद्दल मी सांगायला नकोच. त्यामुळे एखादा निरपराध माणूस आयुष्यातून उठू शकतो. यापूर्वी असा प्रयत्न केला असेल तर त्याचाही पुरावा नाहीये. हे म्हणजे पूर्वी ब्रिटिशांनी काही जमातींना सरसकट गुन्हेगार ठरवून त्यांचं आयुष्य बरबाद केलं, तशातलाच आधुनिक धर्तीवरचा प्रकार आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2015 - 1:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंधरा दिवसापूर्वीच त्यांनी त्यांची सुरक्षा काढून घ्यायची विनंती केली होती. सुरक्षा द्यावी लागली याचा अर्थ कोणी तरी धमकी दिली असावी ! अशी धमकी देणारे जे कोणी असतील त्यांच्यावर संशय येणारच यात पूर्वग्रहाचा काय सबंध ?

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 1:49 pm | बोका-ए-आझम

सुरक्षा काढून घेताच त्यांची हत्या झाली. हा योगायोग जरा अविश्वसनीय नाही वाटत? ज्या माणसाने हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधाने केलेली आहेत त्याची हत्या होताक्षणी संशय हिंदुत्ववादी संघटनांवर येणार हे उघड आहे आणि पोलिस त्यामागे लागणार आणि भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष बदनाम होणार - असं कारस्थान असू शकतं. ती शक्यता विचारात न घेता धमकी देणा-यांवर, जे हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य होते याचाही पुरावा नाही, संशय येणारच हे जे आपण म्हणताय तोच पूर्वग्रह. माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद!

काळा पहाड's picture

31 Aug 2015 - 2:09 pm | काळा पहाड

हाच विचार माझ्या मनात आला होता. पांढरी पाल सुद्धा त्यामागे असू शकेल.

श्रीगुरुजी's picture

31 Aug 2015 - 2:09 pm | श्रीगुरुजी

सुरक्षा काढून घेताच त्यांची हत्या झाली. हा योगायोग जरा अविश्वसनीय नाही वाटत? ज्या माणसाने हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधाने केलेली आहेत त्याची हत्या होताक्षणी संशय हिंदुत्ववादी संघटनांवर येणार हे उघड आहे आणि पोलिस त्यामागे लागणार आणि भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष बदनाम होणार - असं कारस्थान असू शकतं.

+१

अगदी बरोबर. दाभोळकर आणि पानसरे यांच्या खुनाच्या मागे हाच हेतू असावा असा माझा अंदाज आहे.

२००९ मध्ये देशात व महाराष्ट्रात निवडणुक होणार होती. त्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांना व भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी मालेगाव प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहीत इ. ना पुरेसे पुरावे नसताना अडकविण्यात आले आणि २००९ मधील निवडणुकीतील प्रचारात याचा भरपूर वापर केला गेला.

२०१४ मध्ये देशात व महाराष्ट्रात निवडणुक होणार होती. दरम्यानच्या काळात २०१३ पर्यंत महाराष्ट्रातील आघाडी सरकारने सनातन प्रभात संस्थेवर बंदी आणण्याचे प्रयत्न २ वेळा केला. कोणताही सबळ पुरावा नसल्याने दोन्ही वेळा ही बंदी आणण्याचे प्रयत्न फसले. त्यामुळे या संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न तिसर्‍यांदा सुरू झाला होता. दाभोळकरांचा खून २० ऑगस्ट २०१३ या दिवशी झाला. खून झाल्यावर काही मिनिटातच पृथ्वीराज चव्हाणांनी असे जाहीर वक्तव्य केले की या खुनामागे हिंतुत्ववादी संघटना आहेत. असे जाहीर विधान करून तातडीने तपासाची दिशा फक्त सनातनवर केंद्रीत करण्यात आली. खुनानंतर पुढील २ आठवडे सनातनच्या अनेक कार्यकर्त्यांची कसून तपासणी झाली. त्यातून काहीही सापडले नाही. दरम्यान खुन्यांना पुरावे नष्ट करण्यास आणि निसटून जाण्यास भरपूर वेळ मिळाला. सनातन विरूद्धच्या तपासात एखादा किरकोळ धागादोरा मिळाला असता तरी त्याचे निमित्त करून सनातनवर पुन्हा बंदी आणण्याचा प्रयत्न झाला असता आणि त्याचा उपयोग २०१४ च्या निवडणुकीत करून घेता आला असता. या खुनामागे तत्कालीन सत्ताधारी पक्षातील कोणतरी कट्टर सनातनविरोधी प्रबळ नेता असावा असा माझा अंदाज आहे.

आधी दाभोळकर, नंतर पानसरे आणि आता कलबुर्गी. भाजप व मोदी यांच्याशी विकासाच्या मुद्द्द्यावर झुंज देणे अशक्य असल्याचे लक्षात आल्याने आता अशा हत्या करून हिंदुत्ववादी संघटनांची म्हणजेच पर्यायाने भाजप व मोदींची प्रतिमा कलंकित करण्याचा हा प्रयत्न असावा असा माझा अंदाज आहे.

भुमन्यु's picture

1 Sep 2015 - 12:20 am | भुमन्यु

हीच भावना दाभोळकर, पानसरे ह्यांच्या हत्येवेळीही आली होती. बंगळूर महानगर पालिकेचे निकाल नुकतेच लागलेत, त्यातही स्युडो सेक्युलर पक्ष पडले आहेत. ह्या सर्व घटना अगदीच योगा-योगाच्या असु शकत नाहीप.

अवांतरः जर काँग्रेसचा इतिहास विचारात घेतला तर, बरेच गैर गांधी घराण्यातले पंतप्रधान पदाचे दावेदार अकस्मिक मृत्युनेच वारलेत.

dadadarekar's picture

31 Aug 2015 - 11:16 am | dadadarekar

कर्नाटकातील ज्येष्ठ विचारवंत व कन्नड विद्यापीठाचे माजी कुलगुरू एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसंदर्भात बजरंग दलाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. हे ट्विट व्हाॅट्सअॅपवर व्हायरल झाले आहे.

बजरंग दलाचा सहसमन्वयक भूविध शेट्टी याच्या नावे हे ट्विट आहे. यात कलबुर्गी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली. 'आधी यू. आर. अनंतमूर्ती लक्ष्य होते, आता एम.एम. कलबुर्गी. हिंदुत्वाची टर उडवा आणि मरण पत्करा, यापुढे के. एस. भगवान तुमचा नंबर आहे,' असे हे ट्विट नंतर रात्री काढून टाकण्यात आलेे. या ट्विटरवरून कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शेट्टीच्या नावे गरुड पुराण ट्विटर अकाउंट असल्याचे समजते. यावर आधी बरेच वादग्रस्त ट्विट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, असे कुणी आहे अथवा नाही याबाबत विश्व हिंदू परिषद वा बजरंग दलाच्या नेत्यांनी अनुमोदन दिले नाही.

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 11:35 am | बोका-ए-आझम

असं ट्वीट हा पुरावा होऊ शकत नाही. कोर्टात सिद्ध झालंय का? Indian Evidence Act नुसार (जो भाजप सरकारने बनवलेला नाही) हा बजरंग दल किंवा विश्व हिंदू परिषद त्यात सहभागी होते याचा पुरावा म्हणता येणार नाही. शिवाय कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे. ते खरं काय ते शोधून काढतील अशी अपेक्षा आहे.

dadadarekar's picture

31 Aug 2015 - 12:52 pm | dadadarekar

त्यांचा खून बजरंगदलाने केलाय असे मी म्हटलेले नाही.

पेप्रात आलेलं तुम्हाला व इतराना दाखवणं. इतकेच मीकेले

भृशुंडी's picture

31 Aug 2015 - 9:42 am | भृशुंडी

बोका-ए-आझमजी, तसं नसतं हो.
दांभिकतेचा तुमचा युक्तीवाद तर्कविसंगत आहे. त्याच न्यायाने मी असंही म्हणू शकतो, की तुम्ही फक्त कलबर्गी/अनंतमूर्तींनाच विरोध करताय, बाकीच्यांचं काय? त्यांनाही (शोधा) आणि विरोध करा नाहितर तुम्ही दांभिक आहात.
तेव्हा असं काही नसतं.
ज्या विषयाबद्दल आत्मीयता आहे त्यातल्या त्रुटी समोर आणणं हे सर्वथैव अभ्यासकाच्या विषयक्षेत्रावर अवलंबून आहे. मग तो हिंदू धर्म असेल किंवा आणखी काही.

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 10:34 am | बोका-ए-आझम

बाहेर आणल्या जातात त्याच्यावरही ब-याच गोष्टी अवलंबून आहेत. स्वामी विवेकानंद किंवा बाबासाहेब अांबेडकरांनीही हिंदू धर्मातल्या त्रुटी दाखवल्या आहेत पण त्यामागचा त्यांचा हेतू हा कुचेष्टेचा नव्हता तर सुधारणेचा होता. कलबर्गींची हत्या होणं हे वाईटच आहे - ती त्यांनी हिंदू धर्मावर टीका केल्यामुळे झाली आणि हिंदुत्ववाद्यांनी केली याचा काहीही पुरावा अजून समोर आलेला नसताना - आणि Nothing is selective over here असं तुम्ही म्हणताय आणि ज्या विषयाबद्दल आत्मीयता असते त्या विषयातल्या त्रुटी दाखवणं हे सर्वथैव अभ्यासकाच्या अभ्यासक्षेत्रावर अवलंबून आहे असंही म्हणताय
त्यालाच selective म्हणतात ना? तुम्हाला तुमच्याच प्रतिसादातली ही तर्कविसंगती दिसत नाही का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2015 - 1:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>>>>कलबर्गींची हत्या होणं हे वाईटच आहे - ती त्यांनी हिंदू धर्मावर टीका केल्यामुळे झाली हिंदुत्ववाद्यांनी केली याचा काहीही पुरावा.........

डॉक्टर कलबर्गी यांनी हिन्दुधार्मावर टिका केली म्हणून त्या गोष्टीचा प्रचंड राग येऊन मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या धर्मातील किंवा अन्य पन्थातील कोणी परंपरावादी माथेफिरू असे कृत्य करू शकतो हा संशय घेता येऊ शकतो ! :)

-दिलीप बिरुटे

हिंदुत्ववादी आणि हिंदूधर्मीय मध्ये गल्लत होतेय सर.

बा द वे हिंदूंमध्ये संधीसाधू राजकारणी, नेते, बिल्डर लोक इ.इ. कमी नाहीत.

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 2:43 pm | बोका-ए-आझम

प्रतिसाद नीट वाचा. कलबर्गींची हत्या हिंदू धर्मावर टीका केल्यामुळे झाली आणि हिंदुत्ववाद्यांनी केली याचा पुरावा - असं म्हटलंय. म्हणजे हत्या हिंदू धर्मावर टीका केल्यामुळे झाली याचाही पुरावा नाहीये आणि हिंदुत्ववाद्यांनी केली याचाही पुरावा नाहीये.तुमचा विद्यार्थी नसलो तरी बरं आहे हो मराठी माझं ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2015 - 7:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवी, नाटककार, समीक्षक आणि साक्षेपी इतिहासकार ज्यांनी आयुष्यभर विवेकाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि मानवतेचा आग्रह धरला अशा डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येचा मी निषेध करतो.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

31 Aug 2015 - 9:11 am | चौकटराजा

मी स्वतः मूर्तिपूजा करतो. पण एक सांस्कृतिक करमणूक म्हणून. मूर्तित देव पहाणार्यांची मला कीव येते पण मी ती त्याना
बोलून दाखवून दुखविण्याचे पातक कशाला करू ? हं असा आपला फंडा आहे. गणपतीची मूर्त ही मूर्तच आहे तो प्रत्यक्ष
गणपति नवे हे खरेच तरीही त्या मूर्तीला पाण्यात विसर्जन करताना दगड फेकल्याची वागणूक मिळता कामा नये इतके तारतम्य गरजेचे आहे.

चलत मुसाफिर's picture

31 Aug 2015 - 9:57 am | चलत मुसाफिर

माझा एक प्रतिसाद संपूर्ण उडवण्यात आला असून दुसरा संपादित केला गेला (केवळ शीर्षक बाकी) आहे.

मी या दोन्ही प्रतिसादांमध्ये, एक प्रयोग म्हणून, जाणूनबुजूनच प्रक्षोभक आणि आव्हानात्मक (पण असभ्य वा अश्लील नव्हे) भाषेचा उपयोग केला होता. प्रतिसाद संपादित केला जाईल याची मला पूर्ण कल्पना होती.

यावरून मला हे दिसून आले, की अन्य कुठेही, कुणीही, काहीही बोलो अथवा लिहो, मिपा व्यासपीठाची सोज्वळता आणि निरागसपणा शाबूत राहणे महत्वाचे!

यातून उपस्थित होणारा पुढचा प्रश्न: अशा विषयांची मिपावर चर्चाच का होऊ द्यावी?

हा प्रतिसाद उडवला जाणार नाही अशी अपेक्षा :-)

अर्धवटराव's picture

31 Aug 2015 - 10:03 am | अर्धवटराव

सगळी करमणुक.
पुरोगामी, प्रतिगामी, अजुन कुठले कुठले गामी, मग गांधीहत्या वगैरे. फक्त आम्हाला का आरसा दाखवताय, 'त्यांना' का नाहि असे प्रश्न. विचारांची लढाई, पत्रकारांच्या बाता, मोर्चे, सर्व कसं एकदम हातात मशाल घेऊन अंधार जाळायची फॅशन आल्यागत चार दिवसांचा दशावतार. कुणा अडगळीत पडलेल्या विचारवंताची लेखणी पारजणार. कुणी तर एकदम बंदुकींनी प्रतिवाद करायल सरसावणार. तरी बरं... अजुन 'पटेल' असं कारण पुढे आणलं नाहि कुणी.

सर्वात मजेदार म्हणजे निषेध व्यक्त करणे. हवेत तीर मारायचं समाधान तरी का घालवायचं.

सत्य फक्त दोनच. एक निश्प्राण कलेवर. दुसरा तो पाताळयंत्री मेंदु.

या प्रतिसादामधून नेमकं काय म्हणायचंय मालक???

भाकडचर्चा नकोच असं म्हणणं मान्य. पण मग ती कुठेच् नाही व्हायची. मिपा चालायचं कसं अशानं? आमच्यासारख्या मिपानिष्ठ लोकांचं फावायचं आपलं चालायचं कसं?

अर्धवटराव's picture

1 Sep 2015 - 2:08 am | अर्धवटराव

विनोदी प्रतिसाद द्यायची तीव्र हुक्की आली होती... पण विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन टंकन आवरतं घेतो.

यशोधरा's picture

31 Aug 2015 - 10:35 am | यशोधरा

हा ब्लॉग वाचनात आला. दाभोळकरांबद्दल काही थोड्या फार प्रमाणात समतोल लिहिले आहे असे वाटले. नुसताच उदो उदो न करता लिहिलेले आहे, असे वाटले.

http://harinarke.blogspot.in/2013/08/blog-post_20.html

मृत्युन्जय's picture

31 Aug 2015 - 11:11 am | मृत्युन्जय

कुलबुर्गींच्या हत्येचा निषेध. या हत्येने नक्की काय साधले हे खूनीच सांगु शकेल पण कुठल्याही व्यक्तीचा जीवनाचा हक्क हिरावुन घेणे हा सर्वोच्च पातळीवरचा गुन्हा आहे हे देखील मारेकर्‍यांना समजु नये काय? अश्या निर्घृण कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच.

हे डॉ कुलबुर्गी कोण ते काही माहिती नाही. या आधी त्यांचे नावही कधी ऐकले नव्हते. गोविंद पानसर्‍यांबाबतही तेच. नरेंद्र दाभोळकर नक्कीच माहिती होते त्यांच्या अंनिसच्या कार्यावोषयी मात्र इतर दोन नावे ऐकण्यात नव्हती. त्यांचे कार्यही काही खूप व्यापक प्रमाणावर नव्हते. या हत्यांमागे त्यांच्या सार्वजनिक कार्याचीचा पार्श्वभूमी आहे काय? कारण लोक नुसतेच आरडाओरडा करताहेत की या मागे सनातनी संस्था आणि व्यक्ती आहेत. पण म्हणजे नक्की कोण कुणीच बोलत नाही. नक्की काय प्रकार आहे?

कलबुर्गी प्रसिद्ध विचारवंत, संशोधक आणि शिलालेखांत रुची असणारे होते. त्यांचे 'महाराष्ट्रातील कन्नड कोरीव लेख' हे पुस्तक मजकडे आहे. रा. चिं. ढेरे ह्यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. उपरोक्त पुस्तकातील ऋणनिर्देशांत ढेऱ्यांचे नाव त्यांनी आदराने घेतले आहे.

त्यांच्या इतर कार्याविषयी किंवा वादग्रस्त उल्लेखांविषयी मला कसलीही माहिती नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2015 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तकाची ओळख करून द्या. डॉक्टर कलबुर्गी यांचं लेखन कसं होतं वाचुन कळेल तरी.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

31 Aug 2015 - 11:52 am | प्रचेतस

पुस्तक अजून वाचायचे आहे. सध्या नुसतेच संग्रही आहे.
पण अधिक माहिती (अनुक्रमणिका, ऋणनिर्देश, प्रस्तावना ) इकडे वाचायला मिळू शकेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Aug 2015 - 11:46 am | माईसाहेब कुरसूंदीकर

हत्येचा निषेध.आता काही विशिष्ट विचारसरणीचे लोक कलबुर्गी ह्यांचा सगळा पूर्वेतिहास खणून काढतील. ३०-४० वर्षापूर्वी त्यांचे एखादे वादग्रस्त विधान तुमच्या त्या फेसबूक वा अशा साईटींवर सारखे अधोरेखीत करतील व मग 'बघा आम्ही म्हणतच होतो.. उगीच हत्या होत नाही...." हे बिंबवायचा प्रयत्न करतील.

श्रीगुरुजी's picture

31 Aug 2015 - 2:12 pm | श्रीगुरुजी

'बघा आम्ही म्हणतच होतो.. उगीच हत्या होत नाही...." हे बिंबवायचा प्रयत्न करतील.

माईसाहेब,

या वाक्यातले "हे" म्हणजे तुमचे "हे" का? तुमचे "हे" असे का बिंबवायचा प्रयत्न करतील?

मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा आहे ?

मूर्तीपूजा करणं आहे ? तुम्हाला मूर्तीपूजा करायची नसेल तर नका करू . पण इतरांनी करू नये म्हणून सक्ती का ? मग इस्लामी मुलतत्ववाद्यांत आणि तुमच्यात फरक काय ? हिंदू धर्मामध्ये सगुण आणि निर्गुण अश्या दोन्ही उपासना आहेत . सगुण उपासना करता करता निर्गुण उपासना करायची ताकद येते .
हल्ली हिंदू धर्मातल्या प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याची , हिंदू धर्माच्या नावाने बोटे मोडण्याची फ्याशनच आलीये . आणि हिंदूच जर विनाकारण आपल्याच धर्माला बदनाम करत असतील , नको त्या गोष्टी हिंदू धर्मात घुसडत असतील तर माझा त्याला विरोध आहे . दाभोलकरांनी सुधा अंधश्रद्धे करताना भान सोडलं.
मी तरी ह्या हत्येचा निषेध करणार नाही .पुरोगामी म्हणजे धर्मावर वाटेल ते आरोप करणे, निंदा नालस्ती करणे किवा पूजा , उपासना करण्याला विरोध करणे असा अर्थ होतो का ? इतर धर्मांमध्ये खंडीभर अंधश्रधा भरल्यात . त्यांवर कोणी भाष्य करत नाही ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2015 - 2:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> मी तरी ह्या हत्येचा निषेध करणार नाही.
ठीक आहे.

>>>>पुरोगामी म्हणजे धर्मावर वाटेल ते आरोप करणे, निंदा नालस्ती करणे किवा पूजा , उपासना करण्याला विरोध करणे असा अर्थ होतो का ?

पुरोगामी म्हणजे सुधारणावादी, परिवर्तन वादी, आधुनिक विचार करणारे असे

>>>>इतर धर्मांमध्ये खंडीभर अंधश्रधा भरल्यात . त्यांवर कोणी भाष्य करत नाही ?

त्यावर कोणी भाष्य करत नसेल तर आपण बोला की ?

-दिलीप बिरुटे

आबा's picture

31 Aug 2015 - 6:49 pm | आबा

"सक्ती"?!
कलबुर्गींना गोळ्या घातल्या आहेत, कलबुर्गींनी देव मूर्तीपूजकांना गोळ्या घातलेल्या नाहीत

द-बाहुबली's picture

31 Aug 2015 - 12:58 pm | द-बाहुबली

कलबुर्गी ह्यांचा आत्म्याला शांतता लाभो. चुकिची घटना. हत्येचे समर्थन नकोच. परमेश्वरा सर्वाना सद्बुध्दी दे. :(

नाव आडनाव's picture

31 Aug 2015 - 1:06 pm | नाव आडनाव

+१

तुडतुडी's picture

31 Aug 2015 - 1:01 pm | तुडतुडी

वरच्या प्रतिसादातील 'मूर्तीपूजा करणं आहे ?' हे वाक्य 'मूर्तीपूजा करणं गुन्हा आहे ?' असं वाचावं . टाईप करताना गडबड झाली

काळा पहाड's picture

31 Aug 2015 - 2:05 pm | काळा पहाड

हत्येचं समर्थन नाहीच. ते कुणी करूही नये. त्याचा जितका निषेध करावा तितका कमीच. पण "जर" या हत्या तथाकथितरित्या हिंदुत्व वाद्यांनी केल्या असतील तर ही दुर्दैवी आणि त्यापेक्षा जास्त करूण घटना आहे. जर ती मूर्तीवर लघुशंका करण्याबद्दल गोष्ट खरी असेल तर या लोकांनी (म्हणजे तथाकथितरित्या हिंदुत्व विरोधी लेखक/कार्यकर्त्यांनी) अशा भडकावू गोष्टी का केल्या/बोलल्या असाव्यात याबद्दल माझं पृथक्करण असं: त्यांचा अंदाज चुकला. जगातलया सगळ्यात सहिष्णू धर्मावर टीका करून मोठं होता आलं पण जसे माथेफिरू इतर धर्मात असतात तसेच ते हिंदू धर्मात सुद्धा असतील/पुढे असू शकतील असं त्यांना वाटलंच नाही. मुस्लीम धर्मातल्या प्रथांवर टीका करून हुतात्मा होण्याची शक्यता बरीच जास्त. मग अशा धर्मावर टीका करा ज्याच्यामध्ये अशा प्रवृत्ती नसतील किंवा फारच कमी प्रमाणात असतील, फार फार तर हे लोक निषेध करतील आणि गप्प बसतील; तेव्हा करा टीका आणि नाव कमवा असा सरळ हिशेब असावा. तो गेली बरीच वर्षं खराही असावा. ही बहुधा एक कॅलक्युलेटेड रिस्क असावी जी जिवावर बेतली असावी.

कलबुर्गी यांच्या हत्त्येचा निषेध.केवळ विचारसरणी विरोधातून खून होणे हे समाजाच्या अवनितीचं लक्षण नाही का? कोणीही आपल्या धारणा ठेवु शकत नाही का?

माहितगार's picture

31 Aug 2015 - 2:32 pm | माहितगार

मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा आहे ? ~ इति दा. द. चा प्रतिसाद

मूर्तीपूजा करणं गुन्हा आहे ? ~ इति तुडतुडी यांचे प्रतिसाद

एकमेकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे हे किमान नैतीक दृष्ट्या निंदनीय आहेच आहे. एकमेकांकडे, इकडे तिकडे बोटे दाखवून कुणाच्याही कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीचे कोणत्याही बाजूच्या निगेटीव्ह अ‍ॅटीट्यूडचे समर्थन होत नाही.

दुसर्‍याने ताळतंत्र सोडले म्हणुन राग येऊ शकतो हे खरे तरीपण एकाने ताळतंत्र सोडले म्हणून मी ताळतंत्र सोडतो हे फलदायी उत्तर नव्हे. रामकृष्ण परमहंसांनी मुर्तीपुजेच्या विरोधक विवेकानंदांवर गोळी घातली असती तर मुर्तीपुजेचे हिंदू धर्माचे समर्थक विवेकानंदांचा हिंदू धर्मीयांना लाभ झाला असता का ? विचारांचा लढा विचारांनीच लढला जाऊ शकतो लघुशंका करून अथवा लघुशंका करणार्‍यास गोळी घालून नव्हे.

मुर्तीपुजा करणार्‍या अथवा मुर्तीवर लघुशंका करणे आणि मुलतत्ववाद्यांनी मुर्तीभंजन करणे यात खरेच फरक नाही, तसेच आपल्या अबकड प्रतिमांचा अपमान झाला म्हणून हिंसक कृत्ये करणार्‍या मुलतत्ववाद्यात मग ते या समुहाचे असोत का त्या समुहाचे असोत त्यात फरक नाही. त्याने केले म्हणून माझे बरोबर हे सुयोग्य उत्तर नव्हे.

हिंदूधर्मातील वैचारीक परंपरांचे वैविध्य विचारांचा विचारांनी सामना करणार्‍यामुंळे तग धरून असावे आदि शंकराचार्य विवेकानंद हि त्याची उदाहरणे आहेत, इतरांच्या संकुचीतततेमुळे अपरिपक्वपणामुळे मी मला संकुचीत करून घेणे मी मला स्वतःला अपरिपक्व ठेवणे यामुळे शत्रुपक्षाचे काय होईल माहित नाही तुमच्या स्वतःच्या वैविध्यास तडे जाणार नाहीत, तुमच्या स्वतःच्या वैचारीक स्वातंत्र्याला, तुमच्या स्वतंच्या आदर्शाला तडे जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणेही तेवढेच महत्वाचे असावे. दुसर्‍याने कोळसा हातात घेऊन उगाळला म्हणून तोच आपणही आपल्या हातात घेऊन उगाळला तर दुसर्‍याचा चेहरा काळा करायच्या नादात आपले हातही काळे होण्याचा धोका असतो.

असो.

द-बाहुबली's picture

31 Aug 2015 - 3:51 pm | द-बाहुबली

टिका/स्तुती करायचा मुलभुत अधिकार घटनेने दिला आहेच परंतु श्रध्देवर टिका करणे व त्याची विटंबना करणे यातिल फरक समजु नये ही नक्किच कोणत्याही विचारवंतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. तरीही ते घडले असेल वा समर्थन दिले जात असेल तर... :(

माहितगार's picture

31 Aug 2015 - 4:08 pm | माहितगार

परंतु श्रध्देवर टिका करणे व त्याची विटंबना करणे यातिल फरक समजु नये ही नक्किच कोणत्याही विचारवंतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. तरीही ते घडले असेल वा समर्थन दिले जात असेल तर... :(

तथाकथीत विचारवंताने विवेक सोडावा हे त्याच्या स्वतःसाठी लाजीरवाणे आहेच यात संशय नाही. पण विचारवंताच्या विचाराचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दुसर्‍या विचारवंतातच असते. विचारांचा मुकाबला शस्त्राने होऊ शकत नाही. नि:शस्त्र विचारवंत मारलातर विचार शिल्लक राहतोच त्या शिवाय त्याचा हुतात्मा होऊन त्याच्या विचारांना शब्द प्रामाण्य मिळण्याची शक्यता नंतरच्या असंख्य पिढ्यांना भोगावी लागू शकते हा धोका अजून मोठा असतो.

विचारांचा विचारांनीच प्रतिवाद केला जातोय म्हणता भिड चेपुन चुकुन एखादा चुकीच्या कृतीच्या रिंगणात उतरला जात असेल तर त्याचा क्लेश होतोच ना...

आपल्या मताशी सहमत आहेच पण कृतीचा विचार करता उदाहरण म्हणून शिवपिंडावर दुध, मध, उसाचा रस, पाणि वगैरे वगैरेनी अभिषेक केला तर अनुभव चांगलेच येतात ही श्रध्दा आहे. याची एखाद्याने खिल्ली उडवणे वेगळे अन विटंबना करणे हे वेगळे नाही का ? मग याचा प्रतिवाद आपण वैचारीक पातळीवर प्रत्यक्ष जिवनात कसा करणार ?

माहितगार's picture

31 Aug 2015 - 5:27 pm | माहितगार

भिड चेपुन चुकुन एखादा चुकीच्या कृतीच्या रिंगणात उतरला जात असेल तर त्याचा क्लेश होतोच ना...

इथे खरे काम चुकीची कृती होताना थांबवणे शक्य असेल तर थांबवावे. घडून गेलेल्या कोणत्याही प्रसंगाबद्दल केवळ क्लेश करून घेत राहणे एक अनुत्पादक आणि फार काही झालेच तर स्वनुकसान घडवणारी कृती ठरू शकते. होऊन गेलल्या गोष्टीवरून द्वेष आणि शत्रुबुद्धी टाळाव्यात हे सांगणे सोपे प्रत्यक्षात कठीण आहे पण तो सर्वात उत्तम मार्ग असतो. (खर म्हणजे हे सांगतोय पण प्रामाणिकपणे मलाही जमत अस नाही पण कालच महाभारतात वसिष्ठांबद्दलच अत्यंत क्लेशदायी परिस्थितीतील उदाहरण वाचत होतो त्यावरून आठवलं आणि लिहिलं)

याची एखाद्याने खिल्ली उडवणे वेगळे अन विटंबना करणे हे वेगळे नाही का ? मग याचा प्रतिवाद आपण वैचारीक पातळीवर प्रत्यक्ष जिवनात कसा करणार ?

१) इतरांशी प्रतिवाद करण्यापुर्वी पहिल युद्ध स्वत:च्या मनाशी जिंकाव लागत ते हे की जी गोष्ट माझ्यासाठी पवित्र आहे ती पवित्र आहे त्याची विटंबना केल्यासारखे कुणास वाटत असेल तरी माझ्या मनातली पावित्र्याची भावना अक्षुण्ण आहे माझ्या मनातल्या प्रतिक पावित्र्याची विटंबना होऊच शकत नाही.

२) तुमच्या विटंबना प्रयत्नांनी आमच्या मनातील भावनेस ठेच पोहोचवण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. न ही माझे विचार बदलले आहे. काही झालेच असेल तर त्यामुळे इतर सश्रद्ध लोकांची मने दुखावली आहेत. आणि मने दुखावून विचार परिवर्तन होत नाही ह्या कडे निर्देश करणे. आणि निषेध व्यक्त करणे या सर्वसामान्य व्यक्तीसाठी साध्या सोप्या गोष्टी आहेत.

३) विचारांचा प्रतिवाद करणार्‍या दुसर्‍या बाजुच्या खर्‍या विचारवंतांना वैचारीक जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागतच असतो. दुसरे तर त्यांच्या प्रतिक्रीया संयत असण्याचिच शक्यता अधिक असते. संयत प्रतिक्रीया वस्तुतः अधीक प्रभावी असू शकतात हे भावनीक उद्रेकाच्या प्रभावा खालील लोकांना बर्‍याचदा लक्षात येत नाही, त्यामुळे भावनांच्या उद्रेकात समतोल संयत पण प्रभावी प्रतिक्रीया मागे पडण्याचा संभव असतो. ज्यांचा भावनिक उद्रेक झाला आहे त्यांचा भावनांचा उद्रेक प्रतिपक्षास फारतर जबरदस्तीने शांत राहण्यास लावू शकतो प्रतिपक्षाचे विचार मूळातून बदलू शकत नाही. प्रतिपक्षाच्या विचारांना मुळातून आव्हान देण्याचे सामर्थ्य संयत प्रतिवादातच असते.

४) खरेतर कर्मठ लोक आपल्यापेक्षा वेगळ्या विचाराच्या व्यक्तीला आपल्या बाजूचे समर्थन करण्यास मन वळवू शकत नाहीत असे नाही. दोन मोठी उदाहरणे म्हणजे जीना आणि सावरकर दोघेही मूलतः कर्मठ नव्हते पण कर्मठ पक्षांची बाजू दोघांनीही त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून मूळ कर्मठ लोकांपेक्षा अधिक सशक्तपणे उचलून दाखवली. (ते बरोबर होते का चूक हा येथे मुद्दा नाही) मुद्दा हा आहे की जी डिप्लोमसी एकटे विवेकानंद करू शकतात तेवढा प्रभाव तुम्ही हजार अण्वस्त्रांनीही तयार करू शकाल का नाही हे माहित नसते. तुम्ही तुमच्या पक्षा बद्दल कितीही कर्मठ असा तेवढे सर्व करावे ज्यामुळे तुमचे जेवढे विरोधक तुमच्याकडे वळवता येतील तेवढे वळवावेत व किमान पक्षी असे काहीही करू नये की ज्याने निष्पक्ष लोकांनी बाजू घेतली नाही तरी आपल्यापासून दूर जातील असेही वर्तन होऊ नये.

कुठल्यातरी बालमित्राच्या वडलांनी एक एपीजे अब्दुल कलाम घडवला. अशी माणसे घडवण्या आणि जोडण्यासाठी आपला एक किमान स्तर जपावा लागतो. तो कोणत्याही परिस्थितीत जपला गेला पाहीजे.

५) भावनेच्या उद्रेकातून प्रत्येकाला जबरदस्तीने चूप करण्यातला अजून एक मोठा धोका, संयत संभाषण करणारा कदाचित तुमची बाजू घेणारा असला तरी विरोधक वाटेल आणि तुम्ही एका समर्थ समर्थकाला पाहता पाहता गमवून बसाल.

६) ब्राह्मण हत्याकरू नये याचा अर्थ जातीयवादी घेतला नाही विचारवंताची हत्या करू नये असा घेतला तर त्यात तथ्य आहे. विटंबना केलीतर हत्येच समर्थन करणार्‍यातले काही खिल्ली उडवणार्‍याच्या हत्येच समर्थन करतात त्यातीलच काही साध्या सुध्या टिकेलाही दडपण्याच समर्थन करतात. विटंबना, खिल्ली, साधी टिका, उपरोध या गोष्टी खूपशा प्रासंगिक आणि सब्जेक्टीव्ह असू शकतात. आपण गंगेच्या पाण्याने अभिषेकाचे म्हणालात तेव्हा तुमची भावना गंगेच्या पाण्याबाबत वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत असू शकते. लघूशंकेचेच उदाहरण घ्यायचे झालेतर गाईची लघूशंका पवित्र मानतात बर्‍याच गोष्टी आपल्या मानण्यावर असतात त्याबद्दल लोक काहीही म्हणाले आणि तुमची भावना गंगोदकाबद्दल आणि पंचगव्यांबद्दल पावित्र्याची असेल तर लोकांच्या टिका, खिल्ली, विटंबना कशानेही डगमगण्यासारखे काय आहे. उलट तुम्ही डगमगला की समोरच्याचा उद्देश साध्य झाल्यासारखे होते. सेंसॉरींग स्लीपरी स्लोप आहे. आणि म्हणून कुणी कितीही कर्णकटू बोलले तरीही सेंसॉरींगचा मोह होता होईतो टाळला पाहीजे. असे वाटते

असो.

बहिरुपी's picture

31 Aug 2015 - 7:16 pm | बहिरुपी

असेच म्हणतो. शब्दा-शब्दाशी सहमत.

पैसा's picture

31 Aug 2015 - 2:44 pm | पैसा

हत्येचा तीव्र निषेध. एखाद्याच्या चितेवर पोळी भाजणे म्हणजे काय हे बघायला मिळते आहे. मात्र निव्वळ विचाराला विरोध म्हणून हत्या आताच्या काळात भारतात होईल हे खरे वाटत नाही. सुदैवाने आपल्याकडे इसीस किंवा तसले कोणी नाही. या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत. ईश्वर मृतात्म्यास शांति देवो.

माहितगार's picture

31 Aug 2015 - 2:58 pm | माहितगार

सुदैवाने आपल्याकडे इसीस किंवा तसले कोणी नाही. या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत.

गेल्या तीनचार वर्षातील विचारवंतांच्या हत्यांचा अभ्यास केला तर वयाने साधारणतः सत्तरी किंवा अगदी ऐंशीच्या पलिकडची मंडळी आहेत. मिडीयाने किती आवाज केला तरीही चार सहा लोकांच्या पलिकडे त्यांना समर्थन प्राप्त नसावे. अगदी महात्मा गांधीसारखी आहेत की त्यांच्या शब्दावर भारत हलावा, असेही नाही. गाडगे बाबा आहेत म्हणून शेगावला जाणारे नाहीत असे नाही, वस्तुतः बहुसंख्य समाज दोन्हीकडे डोके टेकतो :) सॉफ्ट टार्गॅट्स हेरून उडवायची आणि भारतीयात आपापसातील कलह माजवायचा शत्रुदेशांचा उद्देश असेल तर तो आपण आपली डोकी गरम करुन घेतल्याने शत्रुदेशांचा उद्देश सफल व्हावा असे देव करो होऊ नये.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Aug 2015 - 4:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत.

कशावरून काढलेला निष्कर्ष ? की प्रकरण अंगावर शेकणार असे दिसले की मुद्दा भलतीकडेच वळवायचा? कलबुर्गी कुणी गुप्तहेर नव्हते की आंतराष्ट्रीय गुन्हेगारही नव्हते.

पै तैंच्या वाक्याचा मतितार्थ त्याच नेमक्या सांगू शकतील. या ८० वर्षाच्या म्हातार्‍यांना मारून कोणत्याही सुज्ञास काही मिळावयाचे नाही. (आपल्याकडे काय कुठेही) राजकारण कोणत्याही स्तरास जाऊ शकते त्यामुळे शंकांना नेहमी वाव असतोच, जो पर्यंत पुरावे नाही तो पर्यंत एकमेकांच्या वैचारीक विरोधकांकडे खवचट अंगूली निर्देशांचे अधिकतम मुल्य केवळ खवचट अंगूली निर्देश एवढेच शिल्लक राहते, व्यक्तीशः मी तरी तसे करणे टाळतो.

पैसा's picture

31 Aug 2015 - 6:10 pm | पैसा

माई, तोंड सांभाळा. मी खून केलाय असा तुमच्या प्रतिक्रियेचा अर्थ होतोय. तुम्हाला खुन्याची नीट ओळख आहे वाटते. कृपया पोलिसांशी सहकार्य करा.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Aug 2015 - 7:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बाई ग पैसे, 'विशिष्ट विचारसरंणीच्या लोकांबद्दल तसे म्हंटले आहे'. वेड पांघरायचा स्वभाव कमी करावास.

या ८० वर्षाच्या म्हातार्‍यांना मारून कोणत्याही सुज्ञास काही मिळावयाचे नाही.

बरोब्बर बोललास रे माहितगारा.एम.एफ.हुसेन ह्यांना धमक्या देणारे बजरंगी दलवाले सुज्ञ नव्हतेच.

पैसा's picture

31 Aug 2015 - 8:27 pm | पैसा

ज्याना सांगायचय त्यांना थेट सांगा. डॉ नरेंद्र दाभोलकर, सुनंदा पुष्कर, सरबजीत सिंग, कॅ सौरभ कालिया अशा अनेकांच्या खुन्याना फाशीवर लटकलेले बघायची तीव्र इच्छा आहे. ते कधीच होणार नाही कारण त्या हत्यांचा तपास पुरा होणार नाही.

तुमच्यासारखे चष्मे घातलेले सगळेच लोक, मग तो चष्मा कोणत्याही रंगाचा असो, एकसारखेच. तुम्हाला कोणालाच हत्यारे समोर यायला नको आहेत. मग तुमची दुकाने बंद होतील ना सगळी!

बोका-ए-आझम's picture

1 Sep 2015 - 8:51 am | बोका-ए-आझम

नसावेत असं म्हणालात तर बरोबर आहे. डायरेक्ट 'नव्हते?' काल अजितभाऊ डोवल अाले होते वाटतं ' ह्यांना ' भेटायला ?

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 3:37 pm | प्रसाद गोडबोले

|| क्षात्रधर्म ||

जयास जीवाचे वाटे भये | तेणे क्षात्रधर्म करूं नये |
कांहितरी करोनि उपाये | पोट भरावे ||
मारितां मारितां मरावें | तेणे गतीस पावावें |
फिरोनि येता भोगावें | महद्भाग्य ||
जैसा भांड्याचा गलोला | निर्भय भारामध्ये पडिला |
तैसा क्षत्री रिचवीला | परसैन्यामध्ये ||
नि:शंकपणें भारफुटती | परवीरांचे तकवे तुटती |
जैसा बळिया घालून घेती | भैरी उठता ||
ऐसे अवघेच उठतां | परदळाची कोणी चिंता |
हरणे लोळवी चित्ता | देखत जैसा ||
मर्दे तकवा सोंडूं नये | म्हणजे प्राप्त होतो जये |
कार्य प्रसंग समये | वोळखावा ||
देवद्रोही तितुके कुत्ते | मारूनी घालावे परते |
देवदास पावती फत्ते | यदर्थी संशयो नाही ||

देव मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा |
मुलुख बडवावा का बुडवावा | धर्मसंस्थापनेसाठी ||

- समर्थ रामदास

माहितगार's picture

31 Aug 2015 - 7:18 pm | माहितगार

समर्थ साहित्य अभ्यासकांपैकी कुणी याचा अर्थ सांगून, समर्थ साहित्याच्या दृष्टीकोणातून प्रासंगिकता स्पष्ट करू शकेल का ?

माहितगार's picture

31 Aug 2015 - 7:26 pm | माहितगार

ट्रंसलीटरल डॉट ऑर्गवर तपासल्यावर वर उधृत केलेले काव्य पूर्ण आहे का याची सांशकता वाटते.

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 7:37 pm | प्रसाद गोडबोले

बरे झाले आपण पुर्ण संदर्भ दिलात , त्या साईट वरुन काही उधृतच करता येत नाही राव ...

असो , आता तुम्ही च सांगा की अर्धवट उधृत केल्याने काव्यातील अर्थ बदलत आहे का ?

समर्थ साहित्य अभ्यासकांपैकी कुणी याचा अर्थ सांगून, समर्थ साहित्याच्या दृष्टीकोणातून प्रासंगिकता स्पष्ट करू शकेल का ?

विकास's picture

31 Aug 2015 - 10:07 pm | विकास

कुठल्याही खुनाचे समर्थन होऊ शकत नाही. आणि म्हणूनच डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचे, त्यांच्या विचारधारेमुळे समर्थन करणे योग्य ठरणार नाही. हत्येकर्‍यास पकडून फासावर चढवले पाहीजे. (अगदी तथाकथीत लिबरलांना फाशी ही मानवतेमुळे मान्य नसली तरी)

समर्थ साहित्याच्या दृष्टीकोणातून प्रासंगिकता स्पष्ट करू शकेल का ?
मी काही समर्थक अभ्यासक नाही. पण समर्थांनी ज्या काळात आणि ज्या परीस्थितीला अनुसरून लिहीले आहे त्याचा विचार करता ते त्या काळासाठी योग्यच होते. त्या वेळेस देखील प्रत्येकाने त्याचा शब्दार्थ घेतला असावा असे वाटत नाही. नाहीतर शिवाजीला तीन तपे लढावे लागले नसते, असे मला वाटते. असो.

नाहीतर समर्थांनी, "स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे, पिटावे रिपूला, रणी वा मरावे..." असे देखील म्हणले आहे. मग आपल्यातले कितीजण मिपावरचे टंकणे सोडून सीमेवर सैनिकांना (साधी) मदत करायला जाणार आहेत?

तेंव्हा याचा संदर्भच घेयचा असेल तर आत्ताच्या काळाला अनुसरून बुद्धीवादाने घ्यावा. समोरच्याचे पटत नसेल तर त्याला बुद्धीवादाने सामोरे जावे.

नाहीतर आत्ताचा कायदा न मानता (परदेशातील गतकाळातील) माओचा कायदा प्रमाण मानत हिंसाचार करणार्‍या कम्युनिस्टांमधे, त्यांना पाठींबा देणार्‍या डाव्या (अ)विचारवंतांमधे आणि इतरांमधे काय फरक राहीला?

सहमत विकास, समर्थ आणि तुकाराम यांनी एकमेकांना देवद्रोही जाहीर करून फतवे काढले असते तर काय झाले असते ? किंवा सावरकरांची विज्ञाननिष्ठा आणि त्यांनी अस्पृश्यांचा करवलेला मंदिर प्रवेश (त्या काळातल्या सनातन्यांच्या दृष्टीकोणातून विटंबना होती- अर्थात त्या विवाद्य कन्नड व्यक्तींच्या विटंबनेशी तुलना करण्याचा हेतु नाही- विटंबना हा शब्द सब्जेक्टीव्ह ठरू शकतो हे लक्षात आणून द्यावयाचे आहे) न स्विकारता विटंबना म्हणून त्यांना देवद्रोही जाहीर केले असते तर काय झाले असते ? शत्रुची नव्हे तर स्वतःचेच विचारवंत शत्रु ठरून एकमेकांच्या जीवावर उठले नसते का ?

विकास यांचा प्रतिसाद आवडला. सहमत आहे.
एका जिवंत व्यक्तीला तिचा विचार तुम्हाला आवडत नाही म्हणून मारण्याचे समर्थन कोणत्याही प्रकारे करणे हीच एक विकृती वाटते.
कलबुर्गी कोणी अतिरेकी दहशतवादी नव्हते.विचारांशी लढाई विचारानी व्हावी.कोणाची हत्या करुन विचार मरणार आहे का?

काळ कोणता संदर्भ कोणता.एखाद्याच्या विचारसरणीमुळे झालेल्या हत्येचं समर्थन कसे होऊ शकते? ही विचारांची दडपशाही नाही का?

देव कशाचा भूकेला असतो भावांचा कि आततायी भावनीक उद्रेकाचा ते केवळ भक्तांना ठाऊक आणि देवाला ठाऊक :)

देव कशाला कशाचा भुकेला असतोय साहेब? तो नित्यतृप्त असतो. आपणच आपलं ध्येय साध्य करून घेण्यासाठी त्याला भावाचा भुकेला ठरवून टाकतो. यात मुख्य मुद्दे नेहमीच स्किप केले जातात. आपल्या सोयीच्या गोष्टी करून केल्याचं समाधान हे कर्मफल तिथल्या तिथं मिळाल्यावर नंतर पुन्हा देवाला वाहन्यासाठी आपल्याकडं काही शिल्लक नसतं. मग देव म्हणतो बाबा रे तुला जसं हवं तसं तू केलंस मला हवं ते नाही. माझा तुझा संबंध काय?
कुठला भक्त प्रिय आहे हे माहीत करून घेण्यासाठी भगवद् गीता हे अत्यंत उत्तम मार्गदर्शक पुस्तक आहे. यादी आहे.
विशेषत: १२ वा अध्याय मुळापासून वाचावा.

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 7:07 pm | प्रसाद गोडबोले

ही विचारांची दडपशाही नाही का?

हा हा हा ... हे पहा असे आहे की "त्यांन्नी" जगाची विभागणी दोनच गटात केलेली आहे .... बुतशिकन आणि बुतपरस्त ! मुर्तीपुजक आणि मुर्तीभंजक !

आता तुम्हीच सांगा : हे कुलबर्गी का कोण ते कोणत्या गृप मधले होते ? ह्या दोन गटातील खरे दडपशहा कोण ? खरे स्वमतांध कोण ?

मग पुढील काथ्या कुटु .

_____

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 7:29 pm | प्रसाद गोडबोले

आणि हो , महत्वाचा डिस्क्लेमर राहिलाच -

आमच्या धर्मातही मुर्तीपुजा मानत नाहीत , रादर , देव बिव असली काही सुपर नॅचरल पावर शक्ती बिक्तीही मानत नाही ...

मी फक्त तर्काच्या मुद्द्यावर विचारत आहे की:

एखाद्याला सतत हिडीस फिडीस करत रहायची , सतत तु कसा वाईट , तु कसा हीन , तु कसा फडतुस असे दाखवत रहायचं , सतत त्याची टिंगल करत रहायची , अन एके दिवशी त्यानी उद्वेगाने एखादा सणसणीत दगड भिरकावला तर त्याचाच निषेध करायचा ह्या मागचे अजब लॉजिक काय ते जाणुन घ्यायचा प्रयत्न करत आहे ...

ही घटना म्हणजे सतत हिणावले गेलेल्या कोण्यातरी 'फ्यॅन्ड्री' ने " त्या सिस्टीमवर " भिरकावलेला एक दगड आहे असा विचार का बरे करुन पहात नाही कोणी ???????

मुळात तो जो कै दगड भिरकावलाय तो त्या तथाकथित चिडलेल्यांपैकीच मारलाय कशावरून? पुरेसा विदा नसतानाही कानफाट्या म्हणून बदनाम झालेल्यांना झोडले की झाले.

बाकी आर्य सनातन वैदिक धर्मात वेदप्रामाण्य असेल तर देवाचे अस्तित्व न मानणे ही तर्कविसंगती नाही काय? की तेवढ्यापुरती अ‍ॅक्झिअम्स ट्वीक केलेली आहेत? ;)

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 8:20 pm | प्रसाद गोडबोले

मुळात तो जो कै दगड भिरकावलाय तो त्या तथाकथित चिडलेल्यांपैकीच मारलाय कशावरून? पुरेसा विदा नसतानाही कानफाट्या म्हणून बदनाम झालेल्यांना झोडले की झाले.

ओ ब्यॅटु अण्णा तुम्हाला निवडणुकीत उभे रहायचे नसेल तर नका राहु पण इतरांच्या हातातुन मुद्दे तरी हिरावुन घेवु नका =))

बाकी आर्य सनातन वैदिक धर्मात वेदप्रामाण्य असेल तर देवाचे अस्तित्व न मानणे ही तर्कविसंगती नाही काय? की तेवढ्यापुरती अ‍ॅक्झिअम्स ट्वीक केलेली आहेत? ;)

अ‍ॅक्झिअम्स असं काही नसतं , अ‍ॅक्झिअम्स हा भास आहे !

बॅटमॅन's picture

31 Aug 2015 - 8:21 pm | बॅटमॅन

खी खी खी ;)

नाखु's picture

1 Sep 2015 - 8:46 am | नाखु

खटला उभा राहच्या आधीच तपासातल्या विसंगती दाखवायची फार जुनी आणी वाईट खोड आहे. त्यामुळे खटल्याचा इस्कोट होऊन (मुद्याच भुस्काट झाल्याने) तो कुणीच चाल्वायला घेत नाही!

पब्लीकचा हिरमोड होतो तो वेगळा आणि चिनार्याचे पॉप्कॉर्न खपेनात आताशा !!!

व्हरांड्यातला बघ्या नाखुस.

प्यारे१'s picture

31 Aug 2015 - 8:01 pm | प्यारे१

>>>>> एखाद्याला सतत हिडीस फिडीस करत रहायची , सतत तु कसा वाईट , तु कसा हीन , तु कसा फडतुस असे दाखवत रहायचं , सतत त्याची टिंगल करत रहायची , अन एके दिवशी त्यानी उद्वेगाने एखादा सणसणीत दगड भिरकावला तर त्याचाच निषेध करायचा ह्या मागचे अजब लॉजिक काय ते जाणुन घ्यायचा प्रयत्न करत आहे ...

पेन त्याचं, कागद त्याचा, विचार त्याचे असं सगळं 'त्या' चं असल्यावर त्याला जे काही म्हणायचं ते म्हणू दे की. आपण वाईट, हीन, फडतूस नाही तर आपल्याला शष्प फरक पडू नये. स्वतःचा काही विचार नसला की दुसर्‍याची टिंगल केली जाते.

बाकी सणसणीत दगड वगैरे शक्यता फार फार कमी वाटतात. जरी तसं होण्याची अथवा करण्याची इच्छा आपल्याला असली तरी कट्टरपणं नि आंधळेपणानं एखाद्या व्यक्तीला मारण्याचा आततायीपणा केला जाणं अवघड आहे.

पैसानं म्हटल्याप्रमाणं खुनामागचे हेतू उघड होणं अवघड वाटत आहे.
विचारांमधली विविधता आणि विचारधारांमधले मतभेद सामावून घेत भारतीय/वैदिक/हिन्दू जीवनपद्धती आजतागायत वर्धिष्णू (सकसतेनं, संख्येनं नव्हे) आलेली आहे. त्यामध्ये मूर्तीपूजा असली नसली तरी फरक पडत नाही.

हिंदुत्ववादी लोकांनी हा खून केला असण्याची शक्यता कमी वाटते आहे. केला असल्यास हिन्दू धर्माला बट्टा नाही लागत अथवा नसल्यास सुद्धा छाती फुलण्याची गरज नाही.

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 8:18 pm | प्रसाद गोडबोले

बाकी संपुर्ण प्रतिसादाला संपुर्ण अनुमोदन फक्त एक शंका :

विचारांमधली विविधता आणि विचारधारांमधले मतभेद सामावून घेत भारतीय/वैदिक/हिन्दू जीवनपद्धती आजतागायत वर्धिष्णू (सकसतेनं, संख्येनं नव्हे) आलेली आहे.

मुर्तीभंजक आयसिसला( आणि तसेच विचार बाळगणार्‍या ह्या कुलबुर्गींन्ना ) आणि त्यांच्यातील मतभेदांना आपण कसे समजावुन घेणार आहोत ह्याची मला फारच क्युरोसिटी लागुन राहिलिये भाऊ !

बॅटमॅन's picture

31 Aug 2015 - 8:21 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!!!!! आयसिस हे हिमनगाचे टोक आहे बायदवे.

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 8:59 pm | प्रसाद गोडबोले

आयसिस हे हिमनगाचे टोक आहे

आयसिस डेंजरस आहे की दुसर्‍याचे उपासना स्वातंत्र्यच नाकारण्याची आणि स्वतःचेच घोडे दामटण्याची (पक्षी: स्वमतांध दांभिकता) मनोवृत्ती जास्त डेंजरस आहे ?

मतभेद माणसांमाणसांमध्ये होतात रे!
एका बाजूला माणूस आणि दुसर्‍या बाजूला पशू / हैवान यांच्यामध्ये कसले मतभेद?
येनकेनप्रकारेण ठोकणे हेच उत्तर. ते समजावण्याच्या पलिकडे असतात. आततायी असतात.

साम दाम दंड भेद सुद्धा याच जीवनपद्धतीचा भाग आहे.
फक्त आपण कायदा हातात घेऊ नये. भारतीय दंडविधानावर विश्वास ठेवणं हे प्राथमिक कर्तव्य आहे.
आपण केजरी/पटेल/दाऊद वगैरे नाही. बनू नये असं वैयक्तिकरित्या वाटतं.

अन्यथा आधी व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न करायला हवेत.

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 8:50 pm | प्रसाद गोडबोले

अगदी अनुमोदन प्यारे ...

तुका म्हणे विंचु सर्प नारायण, वंदावे दुरोन शिवो नये - संत तुकाराम. !!

पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की विंचु सतत डंख मारत असेल तर त्याला वारंवार जीवनदान द्यायला आपण काही नाथ नाही , आपल्याला विंचु डंख मारत असेल तर त्याला वहाणेचा प्रसाद दिलाच पाहिजे !!

मी फक्त विंचवाला मारले तर दंगा करणार्‍या पीटा ( प्रीव्हेन्शन ऑफ इथिकल टीटमेन्ट ऑफ अ‍ॅनिम्ल्स) वाल्या लोकांच्या थयथयाटा मागील विचार जाणुन घेवु इच्छित आहे !

साम दाम दंड भेद सुद्धा याच जीवनपद्धतीचा भाग आहे.

ह्म्म .... भेद म्हणजे काय ?

फक्त आपण कायदा हातात घेऊ नये. भारतीय दंडविधानावर विश्वास ठेवणं हे प्राथमिक कर्तव्य आहे.

ह्म्म , मी इतरत्र म्हणल्या प्रमाणे एक सर्व सामान्य पापभीरु अर्थात क्युतिया माणुस ह्या पेक्षा दुसरे काय करु शकतो ?!

अन्यथा आधी व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न करायला हवेत.

अन्य देशाचा पी . आर . मिळवण्याचे आमचे जोरदार प्रयत्न चालु आहेत हे ह्या निमित्ताने नम्य्द करु इच्छितो =))

संजय पाटिल's picture

31 Aug 2015 - 8:35 pm | संजय पाटिल

ईसीस ने कुठलि मुर्ती भंग केली? तालिबान्यानी केलेली आठवते ...

सुबोध खरे's picture

31 Aug 2015 - 9:37 pm | सुबोध खरे

isis destroying artifacts
हे गुगलून पहा. शेकडो विदा मिळतील.

संजय पाटिल's picture

1 Sep 2015 - 10:27 am | संजय पाटिल

बघितलं. समजलं, धन्यवाद!!

बोका-ए-आझम's picture

1 Sep 2015 - 9:06 am | बोका-ए-आझम

नाझी प्रचारयंत्रणा प्रमुख जोसेफ गोबेल्सची Big Lie या नावाने प्रसिद्ध असलेली एक थिअरी आहे. कुठलीही १००% खोटी गोष्ट सतत लोकांच्या कानांवर पडेल अशी व्यवस्था केली, सतत ती हॅमर केली की लोकांचा त्यावर विश्वास बसतो.आपण धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी आहोत हे जे लोक छाती पिटून सांगतात, मग ते दिल्लीत असो,महाराष्ट्रात असो किंवा मिपासारख्या संस्थळावर असो - लोकांचा त्यावर विश्वास बसतो. त्याचा अर्थ ते ख-या अर्थाने पुरोगामी असतात असं मुळीच नाही पण ते ज्या कृती करतात त्यांना लोक पुरोगामीपणा समजतात.उदाहरणार्थ अल्पसंख्यांकांचा अनुनय. याचा व्यत्यासही खरा आहे. एकदा कानफाट्या नाव पडलं की ते सगळीकडे पसरतं.हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांचं तेच झालेलं आहे.

बोका-ए-आझम's picture

1 Sep 2015 - 9:06 am | बोका-ए-आझम

नाझी प्रचारयंत्रणा प्रमुख जोसेफ गोबेल्सची Big Lie या नावाने प्रसिद्ध असलेली एक थिअरी आहे. कुठलीही १००% खोटी गोष्ट सतत लोकांच्या कानांवर पडेल अशी व्यवस्था केली, सतत ती हॅमर केली की लोकांचा त्यावर विश्वास बसतो.आपण धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी आहोत हे जे लोक छाती पिटून सांगतात, मग ते दिल्लीत असो,महाराष्ट्रात असो किंवा मिपासारख्या संस्थळावर असो - लोकांचा त्यावर विश्वास बसतो. त्याचा अर्थ ते ख-या अर्थाने पुरोगामी असतात असं मुळीच नाही पण ते ज्या कृती करतात त्यांना लोक पुरोगामीपणा समजतात.उदाहरणार्थ अल्पसंख्यांकांचा अनुनय. याचा व्यत्यासही खरा आहे. एकदा कानफाट्या नाव पडलं की ते सगळीकडे पसरतं.हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांचं तेच झालेलं आहे.

अंपायरनं डेड बॉल दिला वाटतं. दोन तीन रन कमी झाल्यात.

संजय पाटिल's picture

31 Aug 2015 - 6:28 pm | संजय पाटिल

हा हा हा ....एक दोन बाय लेग बाय काढा..

सुबोध खरे's picture

31 Aug 2015 - 6:30 pm | सुबोध खरे

१०० +

मदनबाण's picture

31 Aug 2015 - 6:30 pm | मदनबाण

+१०१

देव अस्तित्वात असता, तर "या निर्बुद्धांना बुद्धी दे" अशी प्रार्थना करता आली असती

एक लिखित ओळीच्या, दोन वाक्यं आणि एका लिंकच्या पिल्लू आकाराच्या पालीच्या शतकी डायनोसॉरी रुपांतराबद्दल संजयकाका पाटलांचा एक चायनिज प्लास्टीकचा डायनोसॉर, श्रीगुरुजी आणि तुडतुडी यांना एक नटराजाची मूर्ती, माईसाहेब यांना तोंडावर बांधण्याचा मास्क आणि डॉ. खरे, मदनबाण आणि समस्त जनतेला एक एक इक्लेअर्स देऊन सत्कार करण्यात येत आहे.

धागा वाईट घटनेबद्दल असल्या ची पूर्ण कल्पना आणि जाणीव आहे. सत्कार फक्त धाग्याबाबत आहे. वसकरुन अंगावर येऊ नये.
- मानाजेपीअध्यक्षतेखालीमिपासत्कारसमितीउपसचिव

माहितगार's picture

31 Aug 2015 - 6:54 pm | माहितगार

इक्लेअर्स साठी आभार. :)

dadadarekar's picture

31 Aug 2015 - 7:24 pm | dadadarekar

चार्ली हाब्डो.प्रकरणावर तोंडसुख घेणारे मिसळपावीय लोक आज या हत्येचे मात्र अप्रत्यक्षरीत्या समर्थन करत आहेत हे वाचोन माझा माजी हिंदु व आजी अ-हिंदु आत्मा गलबलला.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Aug 2015 - 7:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हॅ हॅ हॅ. "कल्बुर्गी,दाभोळ्कर ह्यांच्या हत्येचा मी निषेधच करतो पण..." छाप प्रतिसाद सगळीकडे वाचायला मिळत आहेत असे ह्यांचे मत.

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 7:58 pm | प्रसाद गोडबोले

प्रिय माई ,

काय कशा आहात ? नाना काय म्हणताहेत , सध्या बरेच दिवस दिसले नाहीत !

सचिनला अनेकानेक आशीर्वाद ...हितेशला गोडगोड पापा :)

कळावे

--तुमचाच फ्यॅन

dadadarekar's picture

31 Aug 2015 - 8:18 pm | dadadarekar

हितेशला पापा दिल्याबद्दल आभार.

काळा पहाड's picture

31 Aug 2015 - 9:51 pm | काळा पहाड

नानांना 'तसले' आजार झालेत.

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2015 - 7:58 pm | बोका-ए-आझम

तुमचा आताचा आत्मा हा अ-हिंदू आहे म्हणजे नक्की काय आहे? आत्मा आणि डुप्लिकेट आयडी यांच्यात बहुतेक गोंधळ झालेला दिसतोय. का तुमच्यात डुप्लिकेट आयडीला आत्मा म्हणतात?

नीलमोहर's picture

31 Aug 2015 - 8:09 pm | नीलमोहर

आज ज्ञानात पडलेली भर:
१.आत्मा आजी-माजी अशा विविध स्वरूपात असतो.
२.आत्म्यालाही धर्म असतो. ( हिंदू, अ-हिंदू, न-हिंदू ??)
अखिलमिपाआजीमाजीआत्ममुक्तिशोधसंवर्धकसंघ

तरीच म्हटले ह्या 'चांदमियॉने' अजुन ह्या धाग्यावर 'मातम' कसा मनवला नाही. लगे रहो 'मो. नानेखान कुरसुंदीकर'.

चित्रगुप्त's picture

31 Aug 2015 - 7:56 pm | चित्रगुप्त

'ज्ञानपीठ' आणि 'साहित्य अकादमी' या दिल्लीतून दिल्या जाणार्‍या सन्मानांचा इथे उल्लेख आलेला आहे, त्यावरून सांगू इच्छितो, की हे आणि असले अनेक पुरस्कार मिळवून देण्याचा 'जुगाड' करणारे एजंट लोक दिल्लीत सक्रीय आहेत. काही लाख (किंवा आता कोटीही असेल) रुपयात ते हा जुगाड करवून देतात. दिल्ली मे सब बिकता है भाई.

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 8:00 pm | प्रसाद गोडबोले

चिगु काका ,

मेन्युकार्ड मिळाले तर देता का जरा ?

किमान पद्मश्री तरी घ्यायचीच आहे मला ...

=))

dadadarekar's picture

31 Aug 2015 - 8:11 pm | dadadarekar

बाजपेयींच्या कविता गायल्यावर पद्मजा फेणाणीना पद्मश्री मिळाली होती.

मोदींच्या कविता वाचायची प्रॅक्टिस सुरु करा.

प्यारे१'s picture

31 Aug 2015 - 8:33 pm | प्यारे१

ऑपरेशन केलं की पद्मविभुषण मिळतं.