एक्सेल एक्सेल - भाग ५ - ऑर्गनाईज्ड इन्फॉर्मेशन

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
3 Jun 2016 - 12:31 pm

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५

पाचवा भाग - ऑर्गनाईज्ड इन्फॉर्मेशन
5

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jun 2016 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चालली आहे ही उपयुक्त लेखमाला.

Sum हे माझे अत्यंत आवडते आणि अतिउपयोगी फंक्शन आहे. हे फंक्शन पटकन वापरण्यासाठी एक्सेलमध्ये Autosum हे एक खास बटण आहे. ते रिबनच्या (स्क्रिनच्या वरच्या बाजूला असलेली बटणपट्टी) उजव्या बाजूला  असे दिसेल

हे बटण असे वापरता येते...

१. जेथे फंक्शनचा परिणाम / निकाल हवा असेल (बेरीज दिसायला हवी असेल) त्या सेलमध्ये लेफ्ट क्लिक करून ती सिलेक्ट करा --> मग Autosum बटणाबर क्लिक करा --> सिलेक्ट केलेल्या सेलमध्ये =SUM() असा फॉर्म्युला दिसू लागेल व कर्सर फॉर्म्युलामध्ये (।) असा दिसेल.

२. आता, ज्या सेल्समधल्या संख्यांची बेरीज करायची आहे त्या खालीलप्रमाणे सिलेक्ट करा...

(२.अ) सेल्स सलग असल्यास : ड्रॅग करून सिलेक्ट करा किंवा
पहिली सेल सिलेक्ट करा व नंतर शेवटची सेल shift+click करून सिलेक्ट करा

(२.आ) सेल्स सलग नसल्यास : पहिली सेल सिलेक्ट करा व नंतर ज्या इतर सेल्स बेरजेत सामील करावयाच्या असतील त्यांच्यावर एकामागोमाग एक ctrl+click करा.

३. सर्व आवश्यक सेल्स सिलेक्ट झाल्यावर enter दाबा. काम झाले !

आकड्यांच्या सेल्समधल्या संख्या बदलल्या की फॉर्म्युला असलेल्या सेलमधील बेरीज आपोआप बदलते. न बदलल्यास स्प्रेड्शीट रिफ्रेश करावे व File --> Options --> Formuls --> Workbook calculation --> Automatic हा पर्याय स्विकारावा.

फॉर्म्युला असलेली व आकडे असलेल्या सेल्स जर ड्रॅग करून स्प्रेड्शीटवर इकडेतिकडे हलवल्या तर एक्सेल फॉर्म्युल्यात त्याप्रमाणे बदल करत राहते व बेरीज योग्यच राहते.

हे बटण केवळ बेरीजच नाही तर इतर अनेक कामे (फंक्शन्स) करू शकते...

त्यासाठी Autosum बटणावरील बाणावर लेफ्ट क्लिक करा व खाली येणार्‍या ड्रॉपडाऊन बॉक्समधिल तुम्हाला हवे ते फंक्शन (Average, Count numbers, Max, min) निवडा.

बाकी सगळ्या पायर्‍या वरीलप्रमाणेच आहेत.

शाम भागवत's picture

5 Jun 2016 - 10:07 am | शाम भागवत

वर दिलेल्या होमग्रूपमधील ऑटोसम पर्यायाचा आणखी एक फायदा म्हणजे कॉलमची रूंदी ही आपोआप पर्याप्त रुंदीत (ऑप्टिमम विड्थ) रूपांतरीत होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2016 - 1:23 am | डॉ सुहास म्हात्रे

कोणत्याही कॉलमची ऑप्टिमम रुंदी ठेवण्यासाठी त्या कॉलमच्या हेडरच्या उजव्या बाजूच्या लिमीटच्या रेषेवर डबल्क्लिक करा.

अनेक कॉलम्सची रुंदी एकाच वेळेस ऑप्टिमम करण्यासाठी त्या सर्व कॉलम्सचे हेडर सिलेक्ट करा व कोणाही एका कॉलमच्या उजव्या लिमीटच्या रेषेवर डबल्क्लिक करा... सिलेक्ट केलेल्या सर्व कॉलम्सची रूंदी त्यांच्यातील टेक्स्ट्/संख्येच्या आकारमानाप्रमाणे ऑप्टिमाईझ होईल.

वेल्लाभट's picture

6 Jun 2016 - 8:05 am | वेल्लाभट

सम चा सर्वात सोपा शॉर्टकट

ऑल्ट + =

शाम भागवत's picture

6 Jun 2016 - 10:23 am | शाम भागवत

झकास.

वेल्लाभट's picture

6 Jun 2016 - 10:33 am | वेल्लाभट

धन्यवाद डॉ सुहास!
उत्तम माहिती. वाह.

चांगली चालू आहे मालीका पुढील भाग लवकर येउद्या...