अनुवादः तू भेटतेस अशी. मूळ कविता: जरूरी है

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
14 May 2016 - 7:50 am

"एस" यांची अनुवादित कविता:

तू भेटतेस अशी
जसा चंद्र तरंगतो-बुडतो
शांत-स्तब्ध डोहात

तसा तो पाण्याला स्पर्श तर करत नसतो
चंद्र फक्त तरंगतो, असा पाण्यात बुडलेला

जशी तू
हृदयाच्या किती नकळत
त्याच्या सर्वात खोल कप्प्यात
उतरतेस अलवार

तुला कसं जमतं गं?
असं मला तुझ्या सोबत रहायला
भाग पाडायला?

तू सोबत हवीयेस
जवळ हवीयेस.
अशी.

.....................................

मिसळलेला काव्यप्रेमी यांची मूळ हिंदी रचना:

-जरुरी है..!!

ठहरे हुए पानीमे
तैरते डूबते चांद की तरह
होता है तेरा मिलना

कहनेको चांद पानीको
कभी छूता तो नही
बस पानीमे डुबा हुआ
तैरता रहता है

जैसे तू
दिलकी सतह को
छूये बिनाही
रुह की तह तक
पहुंच जाती हो

तेरा यही हुनर
मुझे तेरे साथ रहनेपे
मजबूर कर देता है

साथ रहना...
जरूरी है
पास रहना...
जरूरी है

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४-०५-२०१६)

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

एस's picture

14 May 2016 - 8:22 am | एस

तू भेटतेस अशी
जसा चंद्र तरंगतो-बुडतो
शांत-स्तब्ध डोहात

तसा तो पाण्याला स्पर्श तर करत नसतो
चंद्र फक्त तरंगतो, असा पाण्यात बुडलेला

जशी तू
हृदयाच्या किती नकळत
त्याच्या सर्वात खोल कप्प्यात
उतरतेस अलवार

तुला कसं जमतं गं?
असं मला तुझ्या सोबत रहायला
भाग पाडायला?

तू सोबत हवीयेस
जवळ हवीयेस.
अशी.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 May 2016 - 9:14 am | मिसळलेला काव्यप्रेमी

व्वाह सुंदर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2016 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त जमलंय. आवडलं. "तेरा यही हुनर" चं "तुला कसं जमतं गं"
हे भारी जमलंय, आवडलं.

अनुवादाला दहा पैकी साडेआठ गुण दिले आहेत. अभ्यास चालू ठेवा.
-दिलीप बिरुटे
(शिक्षक)

पथिक's picture

16 May 2016 - 11:15 am | पथिक

फारच सुंदर अनुवाद !!

प्राची अश्विनी's picture

14 May 2016 - 8:53 am | प्राची अश्विनी

क्याया बात मिका!
एस यांचा अनुवाद पण सुरेख!

असेच म्हणते! मिकादादाची कविता बघून पावसाची सर आल्यासारख वाटलं!

चाणक्य's picture

14 May 2016 - 9:23 am | चाणक्य

ईज बॅक. खूप वाट पहायला लावलीस यार. छान आहे कविता.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 May 2016 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता अतिशय आवडली हेवेसांनलगे
पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2016 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

"तेरा यही हुनर
मुझे तेरे साथ रहनेपे
मजबूर कर देता है

साथ रहना...
जरूरी है
पास रहना...
जरूरी है"

कसं जमतं तिला काय माहिती.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

14 May 2016 - 10:08 am | किसन शिंदे

क्या बत है मिका.
स्वॅप्स काकांचा अनुवादही सुंदर.

कहनेको चांद पानीको
कभी छूता तो नही
बस पानीमे डुबा हुआ
तैरता रहता है

खरं तर चंद्र ही आमच्या गुलजार साहेबांची मक्तेदारी, पण तू ही त्याला छान पद्धतीने हाताळलंयस. जियो!

वा खूप दिवसांनी मिका दिसला!
सुरेख गझल ! एस यांच्या तरल भावानुवादामुळे समजली.नायतर आम्ही काव्यमठ्ठच.

स्पा's picture

14 May 2016 - 11:47 am | स्पा

मिका बॅक विथ बँग

अप्रतिमच रे
चायला आपल्याला फक्त मिका आणि चाणक्य च्याच कविता भिडतात

चाणक्य's picture

14 May 2016 - 12:22 pm | चाणक्य

मंडळ आपले आभारी आहे.

रमेश भिडे's picture

17 May 2016 - 12:12 am | रमेश भिडे

असंच म्हणतो!

एक एकटा एकटाच's picture

14 May 2016 - 12:04 pm | एक एकटा एकटाच

क्लास!!!!!!!

शिव कन्या's picture

14 May 2016 - 12:15 pm | शिव कन्या

वा! अतिशय तरल कल्पना. सुंदर मांडणी.
अनुवादही सुंदर जमलाय.

कवितानागेश's picture

14 May 2016 - 3:22 pm | कवितानागेश

गार गार वाटले मिकाची कविता वाचून.
अनुवाद तर सुन्दरच जमलाय एस.

अभ्या..'s picture

14 May 2016 - 6:38 pm | अभ्या..

मिका डॉन है.

शलभ's picture

15 May 2016 - 12:39 am | शलभ

दोन्हीही सुरेख..

प्रीत-मोहर's picture

16 May 2016 - 11:09 am | प्रीत-मोहर

:)

वाह ! काय सुंदर ! खूप आवडली !! फार सुंदर कल्पना !

हिंदी-उर्दू कविता पण चालतात का इथे ? माहिती नव्हतं. करतो पोस्ट आता! :)

मिसळपाव.कॉम वर अन्य भाषांतील लिखाण प्रकाशित करण्यास संस्थळावर प्रकाशित अधिकृत धोरणानुसार निश्चितच मनाई असावी. परंतु हे माझे वैयक्तिक विधान असून मिसळपाव.कॉमचे प्राधिकृत सदस्य वा मालकच नक्की काय ते सांगू शकतील.

एका जुन्या धाग्यावर तत्कालीन मिपाचालकांनी आक्षेप घेतल्याचे स्मरते.

रमेश भिडे's picture

16 May 2016 - 11:21 am | रमेश भिडे

मिसळलेला काव्यप्रेमी नाव वाचून कविता वाचायला आलो. तितकीशी आवडली नाही पण समजली. आपल्या मराठी कविता जास्त आवडतात.

नगरीनिरंजन's picture

17 May 2016 - 9:49 am | नगरीनिरंजन

मला वाटलं मिपावर हिंदी कविता चालत नाहीत. माझी एक उडवली गेली होती.
चालायचंच. मिपावरचे संपादक इतक्या उच्चप्रतीचा समभाव बाळगतील अशी अपेक्षा नव्हतीच म्हणा.
समभावाबद्दल एक विक्रम-वेताळ कथा मी लिहीली होती तेव्हा मात्र मिपावरची बरीच मंडळी खूश झाली होती. असो.

पैसा's picture

17 May 2016 - 11:53 am | पैसा

तुम्ही मिपावर कधी कोणाला त्रास दिलेला नाही. तुमच्यासारख्या चांगल्या लिहिणार्‍याबद्दल कोणी आकस का ठेवतील? तुमची कविता अप्रकाशित झाली तेव्हा जे संपादक होते त्यातले आता अर्धेही संपादक मंडळात नाहीत. शक्य आहे की आता जे लोक संपादक मंडळात आहेत ते नेमके तिघेही कविता प्रकाशित झाली तेव्हा उपस्थित नसतील. किंवा त्यांनी हा धागा पाहिला नसेल.

तुम्ही संपादक मंडळाला/त्यातल्या सदस्यांना असे का झाले असावे याबद्दल व्यनि, खरड करूनही विचारू शकता.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 May 2016 - 11:07 am | मिसळलेला काव्यप्रेमी

हिंदी कवितेवर बरीच नाराजी दिसली. खरतर मी शक्यतो हिंदी कविता प्रकाशित करण्यापुर्वी, तिचा अनुवाद करतो अथवा करुन घेण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस ते शक्य झाल नाही. पुढील वेळेस ती काळजी घेईन. कारण मिपासदस्य कवितेवर अभिप्राय न देता, हिंदी का मराठी यावर भाष्य करतात. आणि कविता प्रकाशित करण्याचा उद्देश असफल होतो. चुक माझीच. क्षमस्व.
संपादकांना हा धागा उडवायचा असल्यास माझी कुठलीही हरकत नाही.

नगरीनिरंजन's picture

17 May 2016 - 11:19 am | नगरीनिरंजन

नाराजी हिंदी कवितेवर नसून असमान वागणुकीवर आहे. सगळ्यांना सारखा नियम असावा इतकीच माफक अपेक्षा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 May 2016 - 11:34 am | मिसळलेला काव्यप्रेमी

माझं म्हणण इतकच आहे कि या साठी वेगळा धागा अथवा सरळ संपादकांना व्यनी करण जास्त योग्य झाल असत. असो. मला माहितीये तुमचा आक्षेप कशावर आहे. आणि तो योग्य ही आहे.

नगरीनिरंजन's picture

17 May 2016 - 1:05 pm | नगरीनिरंजन

तुमची कविता उडवण्यात मला रस नाहीप; फक्त सापत्नभावाचा उघड विरोध करायचा आहे. त्यामुळे व्यनि वगैरे करायचा प्रश्नच येत नाही.
शिवाय माझी कविता उडवली तेव्हा मला व्यनि करण्याचे कष्ट घेतले गेले नाहीच; अन्यथा मीही व्यनितूनच निषेध/चर्चा वगैरे काय ते केले असते.

एक काम करता येईल. खालचा अनुवाद धाग्यातच समाविष्ट करून धागा ठेवता येईल. तसेच जर कुणाला हिंदी वा अन्य भाषांमधले काही शेअर करायचे असेल तर त्यासाठी खफचा उपयोग करता येईल. काय म्हणता?

गणेशा's picture

17 May 2016 - 12:47 pm | गणेशा

वाह ... निशब्द ..

अप्रतिम .. पुन्हा पुन्हा वाचली .. अआणि तितकीच आवडली..

खरेच अप्रतिम

गणेशा's picture

17 May 2016 - 12:54 pm | गणेशा

पुन्हा वाचलीच

ठहरे हुए पानीमे
तैरते डूबते चांद की तरह
होता है तेरा मिलना

कहनेको चांद पानीको
कभी छूता तो नही
बस पानीमे डुबा हुआ
तैरता रहता है

काय मस्त कडवी आहेत ..
एकदम चित्र निर्माण करणार्‍या ओळी

एस's picture

17 May 2016 - 1:01 pm | एस

हा धागा माझ्या नावे करण्यास माझा नम्र आक्षेप आहे. कृपया मिकांच्याच नावे राहू द्यावा व मूळ कवितेच्या खाली अनुवाद यावा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 May 2016 - 1:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

धन्यवाद एस भाउ...

रमेश भिडे's picture

17 May 2016 - 2:45 pm | रमेश भिडे

हे काय चाललंय नक्की???

अनुवाद आधी? मूळ कविता जी मिसळपाव वरच आधी आली आहे ती नंतर????

बकवास!

सूड's picture

17 May 2016 - 2:52 pm | सूड

कविता जमलीये, ननिंचा प्रतिसादही वाचला.

धनंजय माने's picture

17 May 2016 - 8:02 pm | धनंजय माने

अरे वा! अनुवाद मस्त जमलाय आणि त्यावरुन बेतलेली मूळ कविता पण छान आहे ....

आमची (अनुवादित) सुधा सुद्धा छान दिसायची. सुधीर नंतर आला! ;)