स्यूडो सेक्यूलर्स अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
25 Feb 2016 - 9:30 pm
गाभा: 

प्रेरणास्त्रोत : फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं

मिपावरील एक पुरोगामी आणि निधर्मी विचारवंत श्री. घासकडवी यांनी नुकताच हा विचारप्रवर्तक लेख लिहिला (ते एका विचारवंताने लिहिलेल्या मूळ लेखाचे भाषांतर आहे). त्याच धर्तीवर स्यूडो सेक्यूलर अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे सांगण्याचा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. घासकडवींच्या लेखात ६ फॅसिस्टांच्या नावांचा उल्लेख आहे. मूळ लेखात ७ व्या फॅसिस्टाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी स्पष्ट उल्लेख न केलेल्या त्या ७ व्या व्यक्तीला त्या लेखातील फॅसिस्टांची लक्षणे कशी चपखल बसतात हेच लेख लिहिण्यामागचा मूळ उद्देश होता. जरी ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा सुरवातीला प्रयत्न झाला तरी नंतर ताकाची उबळ अनावर झाल्याने शेवटी लेखकाच्या प्रतिसादात ७ व्या फॅसिस्टाचा उल्लेख आलाच.

सूचना - जो पुरोगामी असतो तो विचारवंत व निधर्मी असतोच. जो विचारवंत असतो तो पुरोगामी व निधर्मी असतोच आणि जो निधर्मी असतो तो पुरोगामी व विचारवंत असतोच. ज्याच्याकडे या ३ पैकी कोणताही १ गुणविशेष नसतो, त्याच्याकडे उरलेले २ गुणविशेषही नसतातच. मी पुरोगामी अथवा विचारवंत अथवा निधर्मी नसल्याने खालील लेख गांभिर्याने घ्यायची अजिबात गरज नाही.

१. दांभिक निधर्मतेचा/छद्म धर्मनिरपेक्षतेचा जोरदार आणि सतत पुरस्कार - हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्‍यांचा तिरस्कार. हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल संशय. हिंदू या शब्दाबद्दल घृणा.

२. हिंदू धर्मातील संस्कृती, उत्सव, श्रद्धास्थाने, चालीरिती इ. बद्द्ल तुच्छता आणि संकोच - निधर्मांधांना आपल्याला जे हवं आहे त्यात हिंदूंचे अधिकार, त्यांच्या श्रद्धांबद्दल आदर, त्यांची धार्मिकता, त्यांची सहिष्णुता ही अडचण मानली. प्रचाराची सर्व साधने वापरून हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म कसा स्थानिकांवर लादला, इ. इ. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा धार्मिक दंगली व्हायच्या तेव्हा तेव्हा हिंदूंबद्दल अफवा/गैरसमज पसरवण्यात निधर्मांध वाकबगार असतात.

३. हिंदूंकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि इतर धर्मियांना त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व निधर्मांधांचे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे दाखविण्यात या निधर्मांधांना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्‍यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास केला जायचा.

४. माध्यमांचे वर्चस्व - निधर्मांधांनी कायमच माध्यमांचा आपल्या प्रोपागंडासाठी अतिशय चपखल वापर करून घेतला. वेगवेगळ्या नियतकालिकातून लिहिलेल्या लेखातून, भाषणातून, वाहिन्यांवरील चर्चासत्रात, परदेशातील माध्यमातून हिंदू धर्मावर, त्यांच्या चालीरितींवर, त्यांच्या संस्कृतीवर सातत्याने हल्ले करून हिंदूंच्या मनात हिंदू असण्याबद्दल अपराधीगंड निर्माण केला गेला. हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍यांकडे प्रखर जातीयवादाचं व सरंजामशाहीचे प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. माध्यमे, विद्यापीठे, साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम इ. ठिकाणी आपल्याच विचारांची माणसे घुसडून सातत्याने निधर्मांधतेचा प्रचार करणे व हिंदूंविरूद्ध बोलणे यावर यांचा सातत्याने भर राहिला.

५. मानवतेचा गंड - इतर धर्मियातील कुख्यात गुन्हेगारांना मानवतेच्या नावाखाली समर्थन देणे, मुळात त्यांना शिक्षा देणार्‍या न्यावव्यवस्थेविरूद्ध ज्युडिशिअल किलिंग असा प्रचार करणे अशा प्रकारे दहशतीला पाठबळ देण्याचे काम हे करतात. गुन्हेगारांना विरोध करणार्‍यांना मानवताविरोधी, धार्मिक उन्मादी आणि एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी ठरवण्याचा निधर्मांधांचा प्रयत्न राहिला.

६. धर्म आणि निधर्मांधांचं साटंलोटं - हिंदूंवर कडाडून टीका व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष अशी भूमिका सातत्याने घेऊन हिंदू इतर धर्मियांचा नाश करायला आतुर आहेत अशी भीति इतर धर्मियांच्या मनात पसरवून आपण त्या धर्माचे रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. इतर धर्मियांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. इतर धर्मियांच्या वाईट प्रथा व चालीरितींना विरोध म्हणजे त्या धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं.

७. कट्टर धार्मिक कर्मठांचे हात बळकट करणं - हिंदूंचं आयुष्य कायदे व नियम करून नियंत्रित केलं जात असतानाच इतरांना हवं ते करण्याच्या अमर्याद स्वातंत्र्याला पाठबळ दिलं गेलं. त्यासाठी वेळप्रसंगी धर्मावर आधारीत वेगळे कायदे करून इतर धर्मियातील धार्मिक कर्मठांसमोर मान तुकवून सामान्यांवर अन्याय करण्यात हेच निधर्मांध पुढे होते. मतांसाठी इतर धर्मियातील वाईट चालिरितींना कायदेशीर संरक्षण देण्यात आले.

८. दुटप्पी भूमिका - हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. ला प्रतिभाशाली कलाकाराच्या प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा दिला गेला. तर जेव्हा इतर धर्मियांच्या असे घडले तेव्हा त्यांच्या भावना दुखावतील असे निमित्त करून अशा गोष्टींवर तातडीने कायदेशीर बंदी घातली गेली.

९. हिंदुत्ववादी लेखक, कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - कोणत्याही लेखकाने किंवा इतरांनी हिंदू धर्माबद्दल चांगले बोलले, हिंदूंच्या बाजूने बोलले की त्याला वाळीत टाकणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून खच्ची करणे, त्याच्याबद्दल खोट्यानाट्या अफवा पसरविणे असे करून समाज त्यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ राहील असे निधर्मांध प्रयत्न करतात.

१०. आपण आणि ते - हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी.

प्रतिक्रिया

जर आपण मानस शास्त्राचा अभ्यास केला असेल तर या आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठी मध्ये त्याची मनः स्थिती कशी होती ते समजेल.
शिवाय मृत्यू पूर्वी लिहिलेली गोष्ट हि सत्य असण्याची शक्यता खूप जास्त असते असे कायदा म्हणतो. त्यामुळे त्याला एक पावित्र्य असते.
DYING DECLARATION HAS A "SANCTITY" BECAUSE A PERSON WHO IS GOING TO DIE WILL "RARELY TELL LIES". THIS IS AN ESTABLISHED PRINCIPLE IN LAW
तुमच्या हिशेबाप्रमाणे सीताराम येचुरी किंवा राहुल गांधी यांनी दलितांसाठी काय केले आहे ते एकदा सांगता येईल का. मायावती यांनी दलितांसाठी सवंग घोषणा सोडून काही भरीव कार्य केले असेल तर माहित नाही. पण कांशीराम, हत्ती आणी स्वतःचे भव्य पुतळे मात्र उभारले.
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2879713/Mayawati-...
बाकी यावरही आपले "काही तरी" "म्हणणे" असेलच. तेंव्हा ते चालू द्या.

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 9:31 pm | तर्राट जोकर

तुमच्या हिशेबाप्रमाणे सीताराम येचुरी किंवा राहुल गांधी यांनी दलितांसाठी काय केले आहे ते एकदा सांगता येईल का. मायावती यांनी दलितांसाठी सवंग घोषणा सोडून काही भरीव कार्य केले असेल तर माहित नाही. पण कांशीराम, हत्ती आणी स्वतःचे भव्य पुतळे मात्र उभारले.
>> अंगावर आले की दुसर्‍याकडे बोट दाखवायचे. सवय झाली आता.

अर्धवटराव's picture

1 Mar 2016 - 11:52 pm | अर्धवटराव

काय मनःस्थिती असेल या मुलाची :( इतकं रितं वाटावं आयुष्य?

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Mar 2016 - 8:56 pm | श्री गावसेना प्रमुख

परवा ला चेन्नई ला एका मेडिकल च्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलिये, तोहि दलित होता म्हणे,तिथे हे खान्ग्रेसी का गेले नाहीत,मिस्टर तर्हाट जी खरे आहे ना हे की अजुन तार आली नाही।

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 9:03 pm | तर्राट जोकर

जाऊ द्या. बंडारू दत्तात्रय आणि एचआरडी यांच्यामधला हैद्राबाद विद्यापिठासंबंधी पत्रव्यवहार इथे प्रकाशित करु शकता काय?

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Mar 2016 - 9:13 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्हाला अभाविप च्या मदतीला ईरानी आल्या त्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे,तर jnu मध्ये करात का येचुरी देशद्रोही विद्यार्थांच्या मदतीला आले त्याबद्दल तुमच मत काय, एक विद्यार्थी जो की दलित असल्या मुळे त्याला बीजेपी, hrd मिनिस्टर ईरानी,बंडारु दत्तात्रेय ,मोदी ह्यांनी त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले, व त्यामुळे भारतातील जनता शासन द्रोह करेल असे तुम्हाला वाटत असल्यास खान्ग्रेस मार्क्सवादी नितीश लालू ममता हे व् त्यांचे भाट हे मुर्खांच्या नंदनवनात राहत असावे हे मानन्यास जागा असावी।

बोका-ए-आझम's picture

1 Mar 2016 - 9:01 pm | बोका-ए-आझम

वो भी तर्राट - की ही घटना २८ फेब्रुवारीच्या पेपरात आलीय. पण त्याच्यावर इथे मिपा सोडून कोणीही बोलत का नाहीये? याच्यात जी भाषा पत्रकारांनी भाजपच्या नेत्यांच्या तोंडी घातलेली आहे त्यापेक्षा पुष्कळ सौम्य भाषा वरुण गांधी यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पीलीभीत किंवा सुलतानपूर या दोन्हीपैकी कुठल्यातरी एका मतदारसंघातल्या सभेत वापरली होती. तेव्हा आचारसंहितेचा भंग केला आणि धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला या आरोपांखाली त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांच्या सरकारने अटक केली होती. आता मायावतींचं सरकार नाहीये पण सत्तेवर असलेला समाजवादी पक्ष हाही भाजपचा मित्रपक्ष नव्हे. तरीही ना या बातमीचा कुठे उल्लेख,ना त्याच्यावर घमासान चर्चा. अचानक सगळे कसे काय बदलले? यावरून या बातमीच्या विश्वासार्हतेवर संशय निर्माण होतो.

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 9:14 pm | तर्राट जोकर

कैसा है ना बोकाभाऊ, आपल्याला जे पटेल, आवडेल तेच सत्य हा नवा फंडा भाजपसरकार आल्यापासून भक्त आळवायला लागलेत. तीच लागण तुम्हालाही झाली काय? बातमी इंडीयन एक्स्प्रेसने छापली आहे. कमल संदेश किंवा पांचजन्य मधे छापून आलं तेच सत्य असतं तुमच्यासाठी?

बोका-ए-आझम's picture

1 Mar 2016 - 9:57 pm | बोका-ए-आझम

पण मला पत्रकारितेत काम करण्याचा जो थोडा अनुभव आहे त्यावरून सांगतो. इंडियन एक्सप्रेस असो किंवा अजून कोणी. स्वतःचा खप वाढवण्यासाठी सनसनाटी सगळेच पसरवतात. सामना, मिड डे आणि मुंबई मिरर बदनाम होतात, एक्सप्रेस होत नाही. १९८३ च्या मुंबई दंगलीत माहीमला असलेल्या एका बेकरीला आग लागली. या बेकरीचं नाव माहीमच्या एका प्रसिध्द धार्मिक स्थळावरुन होतं. एक्सप्रेसने पडताळून न पाहाता त्या धार्मिक स्थळाला आग लागल्याची बातमी दिली.दंगल अजून भडकली. काही लोक मरण पावले.अनेक जखमी झाले, काही आयुष्यातून उठले. एक्सप्रेसला काही फरक पडला का? मी हे प्रसिद्ध पत्रकार अभय मोकाशींकडून ऐकलेलं आहे.
प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकरांवर त्यांनी दिलेल्या एका बलात्काराच्या बातमीवरुन खटला भरण्यात आला होता. त्यांनी माहितीचा स्त्रोत पक्का नसताना माहिती दिली होती. वर्तमानपत्र होतं -इंडियन एक्सप्रेस. कणेकरांच्या खटलं आणि खटला या पुस्तकात याची सविस्तर माहिती आहे.
So, एक्सप्रेस काही सद्गुणांचा पुतळा नव्हे, की तिथे आलेली बातमी लगेचच सत्य मानली जावी. वर्तमानपत्रांचा खप मजबूत असताना असले प्रकार झालेले आहेत. आता तर त्यांना टीव्ही आणि इंटरनेट यांची मजबूत स्पर्धा आहे.

नाना स्कॉच's picture

1 Mar 2016 - 10:23 pm | नाना स्कॉच

इतर कुठल्याही दैनिक साप्ताहिक पक्षिकाने जर उद्या सरकारची बाजू घेणारा लेख छापला अन नंतर ते सगळे फोल निघाले तरी तुमचे मत हेच असेल का बोका-ए-आझम साहेब?? म्हणजे तात्कालिक फायद्यासाठी वर्तमानपत्रे प्रो एस्टेब्लिशमेंट गोष्टी छापतात असेही तुम्ही म्हणाल की ते जे कही सोईचे आहे ते एक्सेप्ट कराल?

Pro-establishment छापतात हे मी म्हणायची गरज नाहीये, ती वस्तुस्थिती आहे. टाईम्स आॅफ इंडिया त्याच्यात आघाडीवर आहे. इथे तजो इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख आलाय असं म्हणाले. त्यांच्या मते एक्सप्रेस हा credibility असलेला पेपर आहे. मी फक्त एक्सप्रेसने केलेल्या चुका किंवा हलगर्जीपणा दाखवलेला आहे. शेवटी तिथेही माणसंच काम करतात त्यामुळे त्यांना १००% वस्तुनिष्ठपणे विचार करणं अशक्य आहे.

तर्राट जोकर's picture

1 Mar 2016 - 11:04 pm | तर्राट जोकर

जो स्टँड घेऊन तुम्ही हे सगळे बोलताय बोकाशेठ, तो तद्दन भाजपेई स्टँड आहे. ह्याच लॉजिकने मग त्या कार्यकर्त्याची हत्याही खोटी म्हणु शकतो, ती राजकिय फायदा मिळवण्यासाठी भाजपच्याच लोकांनी आपल्याच नेत्याला मारले अशीही कंडी पिकवू शकतो. दक्षिणेत आइबापासमोर संघाच्या कुणाचीच हत्या झाली नाही, पेट्रोलपंपावर कुणालाच पेटवून दिले नाही, कोनीही मुस्लिमाने पोलिसांना भोसकले नाही, ह्या आणि इतर सर्व बातम्या ह्या वर्तमानपत्रातून खप वाढवण्यासाठी झालेले प्रकार आहेत असे समजण्यात काही समस्या नसावी.

आपल्याला सोयिस्कर ते सत्य, अडचणीचे त्यावर प्रश्नचिन्ह. 'एक वर्षानंतर' ह्या चाटू भाटगीरी लेखावरच्या प्रतिसाद बघून घ्या. वर नानास्कॉच काय विचारतायत त्याचेही उत्तर द्या.

बोका-ए-आझम's picture

3 Mar 2016 - 4:40 am | बोका-ए-आझम

एखाद्या पक्षाची बाजू घेणं ही चाटूगिरी किंवा भाटगिरी या नावाने का ओळखली जाते? आणि तुम्ही मला जो लेख बघायला सांगितलेला आहे, तो मी पाहिलेला आहे. त्यात लिहिलेल्या गोष्टी तुम्हाला सत्य वाटत नसतील तर लिहा तसं. लिहिणाऱ्यावर घसरायची काय गरज? तुम्हाला भाजपविषयी तुच्छता वाटते - नो प्राॅब्लेम. पण तशीच इतरांना भाजपच्या विरोधी पक्षांबद्दल वाटू शकते. तुम्ही उद्या एक वर्षानंतर असा भाजपविरोधी धागा काढा. त्यालाही प्रतिसाद मिळेल.

ह्याच लॉजिकने मग त्या कार्यकर्त्याची हत्याही खोटी म्हणु शकतो, ती राजकिय फायदा मिळवण्यासाठी भाजपच्याच लोकांनी आपल्याच नेत्याला मारले अशीही कंडी पिकवू शकतो. दक्षिणेत आइबापासमोर संघाच्या कुणाचीच हत्या झाली नाही, पेट्रोलपंपावर कुणालाच पेटवून दिले नाही, कोनीही मुस्लिमाने पोलिसांना भोसकले नाही, ह्या आणि इतर सर्व बातम्या ह्या वर्तमानपत्रातून खप वाढवण्यासाठी झालेले प्रकार आहेत असे समजण्यात काही समस्या नसावी.

असं असू शकतं. पण जेव्हा फक्त भाजपवर आरोप होतात आणि बाकीच्या पक्षांवर असलेच प्रकार करुन होत नाहीत तेव्हा प्रश्न निर्माण होतात. भाजप काय पूर्णपणे शुद्ध लोकांचा पक्ष आहे का? अजिबात नाही. पण बाकीच्या पक्षातल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख न करणे आणि फक्त भाजपचा उल्लेख करणे याला काय अर्थ आहे?

तर्राट जोकर's picture

3 Mar 2016 - 8:39 am | तर्राट जोकर

तुम्ही कोणत्याही पक्षाची बाजू घ्या. स्वातंत्र्य आहे आणि त्याचा आदरही आहे. पण कोणी विरोधक पुरावा म्हणून काही देतोय तर तो पुरावाच विश्वासार्ह नाही हे कुठलीही शहानिशा न करता बेधडक इथे ठोकुन देणे चुकीचे आहे. ह्याच विषयाबद्दल संसदेतही गदारोळ झालाय. हे वक्तव्य करणारी व्यक्ती भाजपाचा राज्यमंत्री आहे. घटना खरी आहे. पण इथे तुम्ही माझ्या म्हणण्याला खोटं म्हटलं तर वाचकांचा समज तोच होईल. तुमच्यासारखे एरवी संतुलित सदस्य इतक्या टोकाला जाऊन काही सदस्यांसारखे बेताल वर्तन करायला लागले तर आश्चर्य वाटेलच. इथे कुठल्याही उपमा माझ्याकडुन वापरल्या गेल्यात तर त्या वर्तनासाठी अस्तात. वैयक्तिक सदस्यांसाठी नाही. तेव्हा गैरसमज नसावा.

बाकीच्या पक्षातल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख न करणे आणि फक्त भाजपचा उल्लेख करणे याला काय अर्थ आहे?
>> हेच मलाही पटत नाही. सगळ्या राजकारणाला भाजप सत्तेत आल्यापासून 'तेव्हा कुठे होता तुझा धर्म' चा रोग लागलाय. व्हाटअबाउटरी. सत्ताधारी आपल्यावर येणार्‍या जबाबदार्‍या, प्र्श्नांना अशी उलट उत्तरे देऊन पलायन करतात. हा स्टँड घेणे अजिबात मान्य नाही. ही एक विचित्र घातक मानसिकता आहे. आम्ही कोणालाही कसलेही उत्तर देने लागत नाही, आम्हाला प्रचंड बहुमत मिळालंय, आम्हाला हा देश आहेरातच मिळालाय, आम्हीच ह्या देशाचे मालक झालोय असा भाजप भक्तांचा आविर्भाव आहे. विरोध फक्त ह्यासाठी आहे. तुच्छता नाही. बाकी जगात कोणीच धुतल्या तांदळाचा नस्तो.

बोका-ए-आझम's picture

3 Mar 2016 - 9:35 am | बोका-ए-आझम

सहमत

सुनील's picture

3 Mar 2016 - 9:52 am | सुनील

सगळ्या राजकारणाला भाजप सत्तेत आल्यापासून 'तेव्हा कुठे होता तुझा धर्म' चा रोग लागलाय. व्हाटअबाउटरी

सहमत.

परंतु व्हाटअबाउटरीची लागण भाजप सत्तेत आल्यापासूनच झाली आहे असे नव्हे तर ती त्यापूर्वीदेखिल होती.

हिंदूंबद्दल काही बोलले की त्यावर अवाक्षर न काढता मुस्लिमांकडे बोट दाखवायचे, असे प्रकार पूर्वापार (सत्तेत नसतानाही) होत आले आहेत.

सुबोध खरे's picture

3 Mar 2016 - 11:46 am | सुबोध खरे

भारतीय राज्य घटने मध्ये कलम १४ प्रमाणे सर्वाना समान हक्क आणि अधिकार दिलेले आहेत आणि सर्वाना समान वागणूक दिली पाहिजे हे अतिशय मुलभूत कलम आहे. जर दुसर्या माणसाला विशिष्ट वागणूक दिली गेली तर ती त्याच परिस्थितीत असलेल्या दुसर्या माणसाला दिली गेली पाहिजे हे घटनेतील अतिशय "मुलभूत" कलम आहे आणि याला कितीही घटना दुरुस्ती झाली तरी बाधा आणता येणार नाही.
हेच तत्व महाभारतात भगवान श्रीकृष्ण यांनी करणाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले असताना उद्धृत केलेले आहे.
या कलमाला असे "लुन्ग्या सुन्ग्याला" बाद ठरवता येणार नाही. हे येथे देण्याचे एक उदाहरण मी स्वतः आहे. भारतीय संघराज्य विरुद्ध सुबोध खरे हा सर्वोच्च न्यायालयातील खटला निकाल २००६. लष्करातील दोन क्षकिरण तज्ञांना त्यांचा बॉन्ड असताना लष्कराने मुदतपूर्व निवृत्ती मंजूर केली होती( त्यांनी लावलेल्या वशिल्यामुळे) आणि मला ती नाकारण्यात आली होती. सरकारने तुम्ही दुसर्याचे उदाहरण देऊ शकत नाही असे कंठशोष करून सांगायचा प्रयत्न केला होता.यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दात सांगितले कि एकाच परिस्थितीत असलेल्या दोन माणसाना वेगळे वागवता येणार नाही.या एकमेव घटनेतील अबाधित कलमामुळे मला लष्करातून निवृत्ती मिळालेली आहे आणि येथे त्यावर लोकांचा काथ्याकुट चालू आहे. अर्थात तेंव्हा जसे सरकार म्हणत होते कि हि केस आणि ती केस वेगळी आहे हेच आणि तसेच येथे परत वाचायला मिळणार आहे हे माहित असूनही मी लिहित आहे.

तर्राट जोकर's picture

3 Mar 2016 - 12:33 pm | तर्राट जोकर

अहो, कलमं कुठं घुसडताय मध्येच. वडाची साल पिंपळाला होतंय.

ज्या प्रकारचा कारभार काँग्रेस गेल्या दहा वर्षात करत होती, त्यास कंटाळून जनतेने भाजपाला पूर्ण बहुमत देऊन सत्तेत आणले. त्याच प्रकारचा कारभार जर भाजप करायला लागली, त्यास विरोधकांनी आक्षेप घेतला तर भाजप आधीची काँग्रेसची उदाहरणं देऊन आपलं म्हणणं खरं करु शकत नाही. ते असं म्हणू शकत नाही की तुम्ही सत्तेत असतांना जे केलं तेच आम्ही केलं तर काय बिघडलं. तात्त्विक, मूलभूत फरक आहे. तुमची कोर्टकेस सर्वस्वी वेगळी आणि भेदभावरहित संधी व उपलब्धीचा घटनादत्त अधिकार सांगणारी आहे.

कलमं बिलमं प्रतिसादात असली की भारदस्तपणा येतो हे खरे पण इथे उपयोग नाही.

सुबोध खरे's picture

3 Mar 2016 - 9:22 pm | सुबोध खरे

तसेच येथे परत वाचायला मिळणार आहे हे माहित असूनही मी लिहित आहे.
there you are

तर्राट जोकर's picture

3 Mar 2016 - 10:05 pm | तर्राट जोकर

आ बैल मुझे मार करायचंच कशाला. निरर्थक प्रतिसाद दिले नाहीत तर चालतं. लोक मला म्हणतात मी अवांतर, विषयांतर करतो. तुम्ही वेगळं काय केलंत इथे डॉक्टरसाहेब?

बोका-ए-आझम's picture

3 Mar 2016 - 11:00 pm | बोका-ए-आझम

All things being same, एकाला एक वागणूक आणि दुस-याला दुसरी अशी वागणूक देता येणार नाही एवढंच त्यांचं म्हणणं अाहे.

तर्राट जोकर's picture

3 Mar 2016 - 11:13 pm | तर्राट जोकर

कलम इग्नोर मारलं. कन्टेन्ट काय आहे?

१. एका अधिकार्‍याला मिळालेली वागणूक दुसर्‍या अधिकार्‍याला भेदभावाशिवाय मिळाली पाहिजे. कबूल आहे.
२. एका सरकारने केलेल्या चुका दुसर्‍या सरकारलाही करायला मिळायला पाहिजे, त्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ नये. कबूल आहे?

आय रेस्ट माय केस. (खरंच एवढं अवघड काय आहे त्यात?)

दुस-या सरकारने त्याच चुका कराव्यात हे म्हणणं चुकीचं आहे. त्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ नयेत हे म्हणणं तर त्याहून चुकीचं आहे. प्रश्न दोन्हीही सरकारना विचारले पाहिजेत. त्यात अवघड नि:पक्षपाती राहणं आहे जे भल्याभल्यांना जमत नाही.

तर्राट जोकर's picture

4 Mar 2016 - 12:22 am | तर्राट जोकर

बोकाशेठ, आपलं ह्यावर आधीच एकमत झालं आहे. खरेसरांनी त्यांची केस इथं ह्या चर्चेत मांडायचं कारण दिसत नाही.

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 12:27 am | बोका-ए-आझम

.

सुबोध खरे's picture

28 Feb 2016 - 10:14 pm | सुबोध खरे

एक चुकीचा प्रश्न...सेक्युलर की कम्युनल
शब्द बंबाळ आणि गोल लेख आहे.नक्की काय म्हणायचे ते कळत नाही. ( आमच्या अल्पमतीचा दोष असेल)

श्रीगुरुजी's picture

29 Feb 2016 - 12:52 pm | श्रीगुरुजी

शब्द बंबाळ आणि गोल लेख आहे.नक्की काय म्हणायचे ते कळत नाही. ( आमच्या अल्पमतीचा दोष असेल)

आता तुमच्यावर पण जोरदार टीका होणार.

गामा पैलवान's picture

29 Feb 2016 - 2:36 am | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

राजीव सान्यांचा लेख वाचला. दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या मते ‘सेक्युलर’च्या विरुद्ध अर्थाचा योग्य शब्द ‘थिओक्रॅटिक’, तर ‘कम्युनल’च्या विरुद्ध अर्थाचा योग्य शब्द ‘कॉस्मोपॉलिटन’ आहे. या विरोधी संज्ञांपैकी कोणती तरी एक भारताला निवडायची आहे.

यात रोचक निरीक्षण असं की या चारही संज्ञा अभारतीय आहेत. या संज्ञा जन्मालाही आल्या नव्हत्या तेव्हापासून संस्कृती भारतात सुखेनैव नांदत आली आहे. इतकी सुखेनैव की धर्माला हिंदू हे नाव आणि संस्कृतीला भारतीय हे विशेषण सुद्धा ठेवायची गरज पडली नाही.

आज मात्र अशी निकड भासते आहे. या निकडीचा मागमूस लेखात सापडत नाही. हिंदुत्व ज्याला म्हणतात ते अशा निकडीतून उत्पन्न झालेलं आहे. ही गरज भासते याचं कारण हिंदूंवरील इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमणे हेच आहे. जे भाग हिंदुबहुल राहिले नाहीत ते भारतापासून तुटले. मग हिंदुत्वास इस्लामफोब म्हणून हेटाळण्यात सान्यांना कसला अर्थपूर्ण पवित्रा लाभतो? सामान्य जनतेला जे दिसतं ते सान्यांना का बरं दिसंत नाही?

आ.न.,
-गा.पै.

नाना स्कॉच's picture

29 Feb 2016 - 6:54 am | नाना स्कॉच

हिंदुत्व ज्याला म्हणतात ते अशा निकडीतून उत्पन्न झालेलं आहे

चला म्हणजे राजकीय हिंदुत्व हे मध्ययुगीन आहे हे आपण मानताय तर??

गामा पैलवान's picture

29 Feb 2016 - 9:30 pm | गामा पैलवान

स्कॉचनाना,

राजकीय हिंदुत्व मध्ययुगीन आहे हे तुम्हाला माहीत नाही की काय? शिवाजीमहाराज कोणत्या युगात होऊन गेले? विजयनगरचे साम्राज्य कोणत्या युगात उत्पन्न झाले?

आ.न.,
-गा.पै.

दिवाकर देशमुख's picture

29 Feb 2016 - 8:25 pm | दिवाकर देशमुख

http://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/other-news/delhi-hc-res...

भगव्यांची थोबाड जोरदार फुटली
गुरुजी काय बोलतोस यावर.?

मम्बाजी सर्वज्ञ's picture

29 Feb 2016 - 10:40 pm | मम्बाजी सर्वज्ञ

ब्रिगेडी बंधू धावून आलेले दिसतायत 'जोकर्स' च्या मदतीला!

तर्राट जोकर's picture

29 Feb 2016 - 10:46 pm | तर्राट जोकर

आप अपना पिछवाडा संभालो, शायद कोईभी दौडके ना आये. आपके लिये!

बोका-ए-आझम's picture

1 Mar 2016 - 4:47 pm | बोका-ए-आझम

पोलिसांचं. नीट वाचावं माणसाने. अाणि कन्हैयाला कदाचित जामीन मिळेल. पण म्हणजे तो सुटला असं समजू नये. जामीन तर संजय दत्तलाही मिळाला होता. पण शेवटी गेलाच ना तो आत. आता पोलिस पण भगव्यांचं ऐकतात असं वाटत असेल तर त्याला काही करु शकत नाही. बोल, काय बोलतो आता? आणि बरं - पुढे मागे फुटलंच भगव्यांचं थोबाड, तर तू काय केलंस त्याच्यासाठी? उगाचच शेजारच्या घरी मूल झाल्यावर पेढे वाटणं सोडा.

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Feb 2016 - 9:11 pm | श्री गावसेना प्रमुख

आमचे कड़े देशमुख म्हणजे जो आयुष्यभर आयतखाउ असतो तो,बाकीच्या प्रांताच् माहित नाही।

तर्राट जोकर's picture

29 Feb 2016 - 9:22 pm | तर्राट जोकर

मुद्दे नसले की भगत लोक पर्सनल उतरतात.

बोका-ए-आझम's picture

1 Mar 2016 - 5:02 pm | बोका-ए-आझम

हे दोन्हीही बाजूंच्या भगतांना लागू पडतं. फक्त एकाच पक्षावर टीका केलीत तर मग तुमच्यात आणि भक्तांत फरक तो काय?

viraj thale's picture

29 Feb 2016 - 9:28 pm | viraj thale

दिल्ली सरकार ने कोर्ट से कन्हैया को जमानत दिए जाने की बात कही।
देशमुख ,म्हणजे केजरीवाल सरकारने ,केंद्र सरकार ने नव्हे .आणी याचा भगव्याशी आणी तोंड फूटण्यशी काय सम्बन्ध .

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Feb 2016 - 9:39 pm | श्री गावसेना प्रमुख

जे लोक मुस्लिम धर्माच्या पाई हिन्दू धर्माला नावे ठेवतात त्यांनी खरेच बीबीसी चा खाली दिलेल्या लिंक वरचा लेख वाचवा,आणि मग कन्वर्ट व्हायचा निर्णय घ्यावा। इस्लाम

अरे काय चालवलंय! एकमेकांवर वैयक्तिक टीका केलीच पाहिजे का? कृपया केवळ आयडी पाहून प्रतिसाद देण्यापेक्षा त्या मताचा विचाराने व विवेकाने प्रतिवाद करा अशी विनंती.

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Mar 2016 - 5:54 am | श्री गावसेना प्रमुख

भगव्यांची थोबाड़ फुटली म्हणनारा काय बाटलितल जल अंगावर शिंपडून की इस्लाम कबूल है म्हणून पळाला,भगव्यांची म्हणजे समस्त हिन्दुजन आले भगवी ब्रिगेड किंवा भक्त बोलला असता तर एक वेळ ठीक होत, तसे म्हणायला ह्या प्स्युडो लोकांचे घर प्रत्येक टिके मागे अमुक एक डॉलर अशा पद्धतीने चालित असावे काय, जाणकार लोकांनी ह्यावर प्रकाश टाकावा

दिवाकर देशमुख's picture

1 Mar 2016 - 12:43 pm | दिवाकर देशमुख

गावाचा शिपाईपण होण्याची लायकी नसणार्‍याने थोबाड बंद ठेवावे.

http://zeenews.india.com/marathi/news/india/good-news-ppf-contributions-...

कालच अर्थसंकल्प जाहीर केलेला आज पासून "यु टर्न" करायला सुरुवात केली. बिचारे बहुमताच्या सरकारवर अशी लाचारीची वेळ यावी अत्यंत दुर्दैवी घटना आहे.
अब की बार लाचार युटर्न वाली सरकार

बहुमत असूनसुद्धा निर्णय मागे घेतला. त्याला यू टर्न म्हणत नाहीत. जनमताचा आदर करणं म्हणतात. आणि ते या सरकारने अगदी सुरूवातीपासून केलेलं आहे. पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पातली भाडेवाढपण अशीच रद्द केली होती. तेव्हा तर दिल्ली आणि बिहार पण झाले नव्हते. नीट अभ्यास कर आणि इकडे ये बरं.

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Mar 2016 - 6:31 pm | श्री गावसेना प्रमुख

बोका ए आझम साहेब गावाचा शिपाई झालेल चांगल की नाही, तसेही आता देशमुखी पद्धत बंद पड़ण्याच्या मार्गावर असेल।

ती बातमी बहुधा अर्धवट आहे
http://www.thehindu.com/business/Economy/ppf-remains-tax-exempt-revenue-...
http://www.thehindu.com/business/budget/union-budget-2016-60-of-epf-depo...

PF ची ४०% रक्कम + व्याज कररहित असेल. त्याहून अधिक रक्कम काढायची असेल तर त्याच्या व्याजावर मात्र कर आहे. हि (४०% च्या वरची) रक्कम न काढता पेन्शन योजनांमध्ये गुंतवल्यास कररहित असेल. कर फक्त १ एप्रिल (२०१६) नंतर मिळणाऱ्या व्याजावारच लागू होईल. त्यामुळे आधीच निवृत्तीकडे झुकलेल्या व्यक्तीस याचा फारसा त्रास नाही.
याशिवाय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास हि रक्कम त्याच्या वारसाकडे जाईल तेव्हा ती कररहित असेल.
याहीपुढे हा कर अशाच व्यक्तींसाठीच लागू होईल ज्यांचा पगार एका ठराविक रकमेहून अधिक आहे (हा पगाराची रक्कम अजून ठरलेली नाही, पण ३.७ कोटी EPF लाभार्थीपैकी साधारणतः ७० लाख व्यक्तींनाच हा कर भरावा लागेल अशी हि रक्कम असेल)

जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा

टीप : बजेट चे विषय त्या धाग्यावर चर्चिलेले बरे, या धाग्याचापण 'एक वर्षानंतर' करू नका

viraj thale's picture

1 Mar 2016 - 1:12 pm | viraj thale

श्री गावसेना प्रमुख vs दिवाकर देशमुख

इरसाल's picture

1 Mar 2016 - 3:41 pm | इरसाल

जे कोणी जात किंवा धर्म बदलतात....
त्यांना बदलुन मिळालेल्या जात/धर्मात त्यांना हवी असलेली जात्/पोटजात (उच्च नीच वगैरे) निवडता येते का?
त्यांना बदलल्यावर कोणती जात्/धर्म (पंथ) मिळतो ?

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Mar 2016 - 6:28 pm | श्री गावसेना प्रमुख

तेच तर म्हणी राह्यनु इरसाल भो,ज्या ज्या लोके हिंदुस्वर टिका करतस तेसले जर इस्लाम मा जान आशी तर त्यास्ले कोणती जात भेटी, तेसले जर अहमदिया बनाड़ तर त्या घितीन का? मना वरल्या कमेंट मा बीबीसी ना एक लेख नी लिंक से तेना मा बठ येल से

शान्तिप्रिय's picture

1 Mar 2016 - 7:00 pm | शान्तिप्रिय

बरोब्बर गुरुजी.
आणि असे निधर्मांध आपल्या हिंदू धर्मातच जास्त आहेत हे आपले दुर्दैव.
पाहा . एम एफ हुसेन यांनी केलेली देवदेवतांची नालस्ती यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली.
मूळ विषयाला फाटे फोडुन त्यांना भारत कसा सोडावा लागला यावरच चर्चेचे गुर्हाळ झाले.
एकाही निधर्मांधाने या महान चित्रकाराने माफी मागावि अशि मागणी केली नाही
एक साधी माफी मागितलि असली तर आपल्या हिन्दुबहुल भारताने श्री हुसेन यांना क्षणार्धात माफ करुन
पायघड्या घालुन मायदेशी बोलावले असते.

शलभ's picture

4 Mar 2016 - 12:41 am | शलभ

200