राष्ट्रभक्ती, देशद्रोह आणि घोषणा

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
24 Feb 2016 - 10:04 am
गाभा: 

खरेतर मोरेकाकांच्या धाग्यावर मी हा प्रश्न उपस्थित केला आहे, पण या प्रश्नाचे धागामूल्य ध्यानात घेऊन वेगळा धागा काढत आहे..

१. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
२. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
३. नुसत्या घोषणा म्हणजे देशद्रोह नाहीच.

या दोन्ही वाक्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यावयास आवडेल. दोन वाक्यांमध्ये निसटता फरक आहे, पण अर्थ बर्‍यापैकी बदलतो माझ्या मते.

माझे मत येईलच चर्चेमध्ये, पण मी संभ्रमित आहे. तुमचे मत काय?

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

24 Feb 2016 - 11:05 am | उगा काहितरीच

एखादा मुलगा घरात राहून बापाच्या विरोधात बोंबलत असेल तर बापाने काय करावे ?

प्रदीप साळुंखे's picture

24 Feb 2016 - 11:11 am | प्रदीप साळुंखे

व्यक्तिस्वातंत्र्य आहे समजून बापाने दुर्लक्ष करावे.

किमान एक श्रीमुखात तरी दिलीच पाहिजे. नाही का?

प्रदीप साळुंखे's picture

25 Feb 2016 - 8:00 am | प्रदीप साळुंखे

पोराला घराच्या बाहेर काढलं पाहिजे,प्राॅपर्टीचा एक छदामहि न देता!!!

चव्हाट्यावर जाऊन मी बापाचे तुकडे करून टाकतो असे म्हणाला तर?

गॅरी ट्रुमन's picture

24 Feb 2016 - 11:19 am | गॅरी ट्रुमन

१. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.

सहमत. सरकारविरोधी मते ठेवणे आणि ती शांततेच्या मार्गाने मांडणे हा सर्व नागरिकांना लोकशाहीने आणि राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे.

२. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.

असहमत.जो काही विरोध करायचा तो सरकारला करा. पण देशाविरूध्द बोलायचे काही काम नाही. देशाच्या विनाशाची इच्छा धरणे आणि तशा घोषणा धरणे हा देशद्रोहच आहे.

३. नुसत्या घोषणा म्हणजे देशद्रोह नाहीच.

असहमत. कुठल्याही प्रकारच्या घोषणांमध्ये (विशेषतः सार्वजनिक ठिकाणी दिलेल्या) इतरांना ती घोषणा अंमलात आणण्यासाठी उद्युक्त करायची क्षमता असते. त्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली असले भलतेसलते प्रकार अजिबात सहन करता कामा नयेत.

रच्याकने, जे डावे लोक घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नाही आणि असे केल्याबद्दल काही कारवाई करू नये वगैरे म्हणत असतात त्यांच्याच अंमलाखालच्या प्रदेशात कम्युनिस्ट पक्षाविरूध्द मते ठेवणार्‍या (देश वगैरे डावे मानत नाहीत आणि पक्षच त्यांना सगळे काही असतो) लोकांची रवानगी मात्र गुलागमध्ये होत होती याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. म्हणजे यांची सत्ता असेल तर इतरांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गेले तेल लावत!!

(कम्युनिस्टांचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाणारा) ट्रुमन

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Feb 2016 - 11:21 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत. इतक्यातच एका संघ स्वयंसेवकाची केरळात हत्या झाली आणि ती कम्युनिस्टांनीच केली.

गॅरी ट्रुमन's picture

24 Feb 2016 - 11:38 am | गॅरी ट्रुमन

यावरून एक विनोद आठवला.

एकदा एक अमेरिकन, एक ब्रिटिश आणि एक रशियन गप्पा मारत असतात.

अमेरिकन म्हणतो की आमच्या देशात किती स्वातंत्र्य आहे बघा. मी प्रेसिडेंट आयसेनहॉवरविरूध्द व्हाईट हाऊसच्या समोर उभा राहून काहीही बोललो तरी मला कोणी काही करणार नाही.
ब्रिटिश म्हणतो की आमच्या देशातही किती स्वातंत्र्य आहे बघा. मी प्राईम मिनिस्टर हॅरॉल्ड मॅकमिलनविरूध्द १० डाऊनिंग स्ट्रीटसमोर उभा राहून काहीही बोललो तरी मला कोणी काही करणार नाही.

त्यावर रशियन म्हणतो---
"आमच्या देशातही किती स्वातंत्र्य आहे बघा.मी प्रेसिडेंट आयसेनहॉवरविरूध्द किंवा प्राईम मिनिस्टर हॅरॉल्ड मॅकमिलनविरूध्द क्रेमलीनच्यासमोर उभा राहून काहीही बोललो तरी मला कोणी काही करणार नाही" !!

बोका-ए-आझम's picture

24 Feb 2016 - 1:17 pm | बोका-ए-आझम

काँग्रेसने महाराष्ट्रात बाळासाहेब ठाक-यांविरुद्ध जनक्षोभ वाढवणारी भाषणं केली (डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ या दोन दंगलींच्या दरम्यानच्या काळात) असा आरोप ठेवला होता (जो नंतर मागे घेऊन त्यांनी खटला बंद केला). तेव्हा असाच नियम लावला गेला होता की लोकांना हिंसाचार करण्यासाठी उद्युक्त करण्याची क्षमता बाळासाहेबांच्या शब्दांत आहे. तेव्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याला गुंडाळून ठेवलं गेलं. निखिल वागळे तेव्हा महानगरचे संपादक आणि तारा मराठी या वाहिनीचे
राजकीय संपादकीय सल्लागार (Political Editorial Consultant आणि दुर्दैवाने माझे बाॅस) होते तेव्हा तेही तावातावानं शिवसेनेच्या नावाने बोटं मोडत होते.बाळासाहेबांवरचे आरोप कितपत राजकीय आणि कितपत सत्य ते सोडून द्या पण आता याच इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे. पण सत्ताधारी आणि विरोधक यांची अदलाबदल झालेली आहे. आता यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुळका आलेला आहे. ही double standards डोक्यात जातात!

भंकस बाबा's picture

24 Feb 2016 - 3:59 pm | भंकस बाबा

देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा अजुन जास्त खटकते जेव्हा हे विद्यार्थी असतात आणि त्याच देशाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत असतात.
मला यांना कुत्रे बोलण्याचा हक्क् आहे कारण मी टॅक्स नियमित भरतो.माझ्याच पैशानी ही कुत्री माजली आहेत.

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 4:31 pm | तर्राट जोकर

बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज आपल्याच करातून उद्योगपतींच्या घशात गुपचुप घातलेत. तेव्हा आपण आपल्या बोलण्याचा हक्क बजावला की नाही?

आनन्दा's picture

24 Feb 2016 - 6:20 pm | आनन्दा

तिथेही कायदा काय करतो असे आम्ही बोलतोच की..
पण दोन गोष्टींचा संदर्भ वेगळा आहे असे वाटत नाही का?

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 6:27 pm | तर्राट जोकर

नाही. देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.

आपल्या दृष्टीने वगैरे ठीक आहे. पण कायद्याने या दोन गुन्ह्यांना वेगवेगळ्या शिक्षा ठरवून दिल्या आहेत. त्यामागे काय विचारमंथन झाले असे ते देखील शोधायला हवे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2016 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.

१०० % सहमत !

मात्र "अमुक गोष्ट राष्टद्रोह आहे, तर मग तमुक राष्ट्रद्रोह का नाही ?" असे एका चुकीचे समर्थन दुसरी चूक पुढे करून केले जाते, ते चूक आहे.

त्याऐवजी "अमूक गोष्ट राष्ट्रद्रोह आहे आणि तिच्याबाबतीत कायदेशीर कारवाई होत आहे ती योग्यच आहे. पण, त्याबरोबर तमुक राष्ट्रद्रोही गोष्टीसंबंधीही योग्य ती कारावाई व्हायला हवी" असा विचार/लेखन समतोल होईल...

राष्ट्रहिताच्या संबंधात एखादे कृत्य कोणी (पसंतीच्या/नापसंतीच्या, पक्षाने/नेत्याने/माणसाने) केले हे पाहण्यापेक्षा ते राष्ट्रद्रोही आहे की नाही हे पाहणे महत्वाचे, आणि ते कृत्य राष्ट्रद्रोही असल्यास ते कोणीही केले असले तरी त्यावर निष्ठूरपणे कारवाई होणे जरूरीचे आहे... तरच देशाला आणि पर्यायाने त्यातल्या नागरिकांना उज्ज्वल भवितव्याची आशा ठेवायला जागा राहील.

क्ष ने माती खाल्ली तेव्हा त्याला काही केले नाही, म्हणुन आता य ने माती खाल्ली तर त्यालाही माफ करायला हवे हे राजकारण झाले... हे टाळायला हवे... निदान राष्ट्रद्रोहासारख्या कळीच्या मुद्द्यासंबंधात तरी.

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 7:05 pm | तर्राट जोकर

असहमतीचा प्रश्नच नाही. शब्दाशब्दाशी सहमतच. पक्षसमर्थकांच्या सोयिस्कर प्राधान्यक्रमाबाबत आक्षेप आहे.

क्ष ने माती खाल्ली तेव्हा त्याला काही केले नाही, म्हणुन आता य ने माती खाल्ली तर त्यालाही माफ करायला हवे हे
>> राष्ट्रद्रोहच कशाला, हे तर प्रत्येक बाबतीत टाळायला हवे.

आर्थिक अफरातफर आणि देशद्रोह या गोष्टींमध्ये बर्‍यापैकी फरक आहे.
खाली कोणीतरी लिहिल्याप्रमाणे आर्थिक अफरातफर करणारा पैसा खाऊ शकत नाही.
देशद्रोहाची व्याख्या थोडी वेगळी आहे.

जर समान न्याय लावायचा झाला तर या न्यायाने चोरी आणि सदोष मनुष्यवध या दोघांनाही सारखीच शिक्षा झाली पाहिजे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2016 - 8:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

जर समान न्याय लावायचा झाला तर या न्यायाने चोरी आणि सदोष मनुष्यवध या दोघांनाही सारखीच शिक्षा झाली पाहिजे.

हा तुमचा शब्दप्रयोग आहे... माझा (दूरान्वयानेही) नाही.

मी जरूर त्या ठिकाणी "योग्य ती शिक्षा" असेच लिहिले आहे... आणि ते अनवधानाने नाही तर विचारपूर्वक लिहिले आहे.

******

अजून कोणी/कोणता शब्दच्छल (बाल की खाल) करू/होऊ नये यासाठी अ़जून एक...
"योग्य शिक्षा" या शब्दांचा या संदर्भातला अर्थ = प्रचलित कायद्याने गुन्ह्याच्या स्वरूपाप्रमाणे योग्य असलेली शिक्षा :) ;)

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 8:39 pm | तर्राट जोकर

सहमत.

माझा प्रतिसाद तर्राट जोकर यांना होता. अनवधानाने तो तुमच्या प्रतिसादाखाली आला बहुधा.
गैरसमज नसावा.

उगा काहितरीच's picture

24 Feb 2016 - 7:23 pm | उगा काहितरीच

क्ष ने माती खाल्ली तेव्हा त्याला काही केले नाही, म्हणुन आता य ने माती खाल्ली तर त्यालाही माफ करायला हवे हे राजकारण झाले... हे टाळायला हवे... निदान राष्ट्रद्रोहासारख्या कळीच्या मुद्द्यासंबंधात तरी.

100% सहमत! Whatsapp वर काहीच्या काही मेसेजेस फिरत आहेत . म्हणे "कश्मिर मधे भारतविरोधी घोषणा देतात तर त्या चालतात अन् जेएनयु मधे दिल्या तर लगेच देशद्रोह वगैरे" अगदी डोक्यावर हात मारून घ्यावा असे फडतुस लॉजीक! पक्षावर , अगदी सरकार वरही टिका करायला हरकत नाही . आहे तेवढं व्यक्तीस्वातंत्र्य . पण म्हणून काय देशावर टिका ? का म्हणून ऐकून घ्यायचं ? याच देशात जन्मलो, वाढलो, कदाचित मरायचही इथेच तरी देशाचेच तुकडे व्हावेत वगैरे जरा जास्तच होतंय नाही का ? देश नसेल तर काय होते ? ते ना फक्त निर्वासीतच जाणु शकतात. कधी कधी विचार येतो "लोकशाही" एवढे आपण प्रघल्प आहोत का खरंच ?

सुबोध खरे's picture

24 Feb 2016 - 8:17 pm | सुबोध खरे

त जो साहेब
देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.
मग भुजबळ साहेब किंवा लालू प्रसाद यादव हे पण आपल्या व्याख्येप्रमाणे देश द्रोहीच म्हणायला पाहिजेत.
या न्यायाने मग पठाणकोटच्या दहशतवाद्याना आसरा देणारे "आतले"* आणी सहाराचे सुब्रतो रॉय दोघेही एकाच माळेचे मणी आहेत असे म्हणावे लागेल.
* आतले कोण आहेत ते अजून उघड झालेले नाही पण ते आहेत याची बरीचशी खात्री आहे.

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 8:46 pm | तर्राट जोकर

अगदी अगदी. देशाचं कुठलंही नुकसान करणारा आपला असो वा परका (दुसर्‍या देशाचा) कुणालाच सोडू नये. कायद्याने ठरवलेली शिक्षा झालीच पाहिजे. फक्त कोणीही मिडियाट्रायलचा बळी असू नये.

रच्याकने प्रत्यक्ष देशद्रोही कृत्ये करणार्‍या आणि त्याबद्दल शिक्षा भोगणार्‍या संजय दत्तला आपण (जनता) कशी वागवते हे बघतोच आहोत. देशद्रोहाचे गुन्हे सिद्ध झालेल्या दत्तबद्दल एक भूमिका आणि एकही गुन्हा सिद्ध न झालेला कन्हय्याबद्दल दुसरी भूमिका ठेवणार्‍या भारतीय जनतेबद्दल आपले काय मत आहे?

अगदि अगदि...मोदिंचि किति वर्ष मिडिया ट्रायल चाललि / अजुनहि चालते नाहि का ! माझ्या मते त्यांच्यावर तर कुठला गुन्हा हि दाखल नव्हता.

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 9:04 pm | तर्राट जोकर

अच्छा, त्यांच्यावर चालली/चालते म्हणून आता प्रत्येक विरोधकावर चालवली गेली पाहिजे असे वाटते का? म्हात्रेसाहेबांनी वरच्याच प्रतिसादात म्हटलंय एकाने केलंय म्हणून दुसर्‍याला तेच करण्याची मुभा नाही असे.

होबासराव's picture

24 Feb 2016 - 9:25 pm | होबासराव

अच्छा, त्यांच्यावर चालली/चालते म्हणून आता प्रत्येक विरोधकावर चालवली गेली पाहिजे असे वाटते का? म्हात्रेसाहेबांनी वरच्याच प्रतिसादात म्हटलंय एकाने केलंय म्हणून दुसर्‍याला तेच करण्याची मुभा नाही असे.

अरे भौ मि सुद्द्धा तर तेच म्हणतोय्..तुमचाच तर मुद्दा उचलुन घेतला कि 'मिडिया ट्रायल' कोणाचिच व्हायला नकोय.

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 9:30 pm | तर्राट जोकर

:-)

आनन्दा's picture

24 Feb 2016 - 9:05 pm | आनन्दा

व्यक्तिशः मी संजयदत्तचा चित्रपटदेखील बघत नाही..
दुसरी गोष्ट म्हणजे संजय दत्तला बहुधा बेकायदा शस्त्रे बाळगण्याबद्दल शिक्षा झाली होती.. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध झालेला नव्हता.

आणि तुम्ही शिवसेनबद्दल बोलत असाल तर मग बाबा आपले मौनच. शिवसेनेचे हिंदुत्व हेच मुळात बेगडी आहे असे माझे मत आहे.

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 9:18 pm | तर्राट जोकर

संजयदत्तला Terrorist and Disruptive Activities Act (TADA) आतंकवादी और विघटनकारी गतिविधियां अधिनियम अंतर्गत शिक्षा झाली. पण जनतेच्या दृष्टीने तो मुळीच आतंकवादी किंवा विघटनकारी नाही पण गुन्हे सिद्ध न झालेला कन्हय्या आहे व त्याला कोर्टाच्या आवारात तीन तास मारहाण करणारे वकिल देशभक्त. जनता कशी वापरली जाते याचे यापेक्षा मोठे उदाहरण आत्तातरी काय द्यावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2016 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्याला कोर्टाच्या आवारात तीन तास मारहाण करणारे वकिल

तीन तास ?... रबर जरा जास्तच ताणले आहे असे वाटत नाही का ? ;) =))

=======

तो वकील चूक होता, त्याला योग्य ती शिक्षा व्हायला हवी हे अगोदरच लिहिले आहेच.

त्या वकिलाने अतिरेकी वर्तनाने जी चूक केली तिच इथे शाब्दिक अतिरेकाने होत आहे ;) :)

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 9:47 pm | तर्राट जोकर

त्याचे स्वतःचे रबर आहे हो. मी नै ताणत. तो तीन सेकंद म्हणाला असता तर तसे लिहिले असते. स्टिंग मधे स्वतःच बोललाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2016 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

दर बातमी / अहवाल / विवरण / वचन यावर डोळे झाकून विश्वास न ठेवता त्याला सारासारविवेक आणि पार्श्वभूमीच्या चाळणीतून चाळून घ्यावे असे आम्ही नेहमी म्हणत असतो ते यामुळेच ! ;) :)

लोकांच्या नजरेत, झेंड्याच्या मालकाइतकीच (किंवा किंचित जास्तच) तो फडकवणार्‍याची विश्वासार्हता/समज पणाला लागलेली असते ;) :)

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 10:45 pm | तर्राट जोकर

असहमतीचा प्रश्नच नाही. ;-)

बोका-ए-आझम's picture

3 Mar 2016 - 10:10 am | बोका-ए-आझम

संजय दत्तला Arms Act खाली शिक्षा झाली. TADA लावला गेला असता पण सरकारी वकिलांकडे तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा पुरावा नव्हता म्हणून TADA लावला गेला नाही. TADA लावला गेला असता तर कमीतकमी १० वर्षांची शिक्षा झाली असती.

तर्राट जोकर's picture

3 Mar 2016 - 11:15 am | तर्राट जोकर

पुरावे नव्हते की दडवले हा भाग जाऊ द्या. कन्हया प्रकरण संजयदत्तप्रकरणाशी तुलना केली तर भारतीय जनमानस माध्यमांचा उपयोग करुन कसं भडकवलं जातं, शांत केलं जातं ह्याबद्दल मुद्दा होता.

अरे वा.. मग हे कशाबद्दल होते?

देशद्रोहाचे गुन्हे सिद्ध झालेल्या दत्तबद्दल

या वाक्याबद्दल संजय दत्तने तुमच्यावर अब्रूनुकसानीचा खटला का दाखल करू नये?
ह.घ्या हे वे सा न ल.

विकास's picture

25 Feb 2016 - 12:28 am | विकास

देशद्रोह आणि गुन्हा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे.

त्यामुळे ज्या कृतींमुळे देशाच्या सुरक्षेला, सीमांना, एकात्मतेस (म्हणजे सार्वभौमत्वास) धक्का पोहचू शकतो तो मला वाटते देशद्रोह आहे. जर "देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे." असे सरसकट म्हणले तर लफडे होईल. रस्त्यावर कचरा फेकणे जर बेकायदेशीर केले आणि कोणी कचरा फेकला तर तो देखील राष्ट्रद्रोह होईल... तसे नाही. हे म्हणजे कम्युनिझमकडे पडणारे पाऊल ठरेल. तो निव्वळ गुन्हाच ठरेल.

भ्रष्टाचार पण बर्‍यापैकी वेळेस गुन्हाच असतो. पण एक उदा. म्हणून त्याचा संबंध जेंव्हा परकीय पैशाशी अथवा परकीय चलनाच्या दळणवळणाशी होऊ शकतो आणि त्यामुळे जर कुठले प्रत्यक्ष नुकसान होऊ शकले तर हेरगिरी अथवा इंडस्ट्रीयल हेरगिरी म्हणून देशद्रोह ठरू शकेल कदाचीत.

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 12:36 am | तर्राट जोकर

ज्या कृतींमुळे देशाच्या सुरक्षेला, सीमांना, एकात्मतेस (म्हणजे सार्वभौमत्वास) धक्का पोहचू शकतो तो मला वाटते देशद्रोह आहे

>> आत्ता आला मुद्द्याचा प्रश्न. :-) ज्या कृतींमुळे असे होते त्या कृतींचा स्पष्ट उल्लेख संविधानात, भारतीय दंडविधानात असेलच. त्याबद्दल भारतीय दंडविधान, संविधान काय म्हणतं?

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 12:49 am | तर्राट जोकर

Section 124-A- Sedition नुसार

Whoever, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards. 2[* * *] the Government established by law in 3[India], 4[* * *] shall be punished with 5[imprisonment for life], to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine.

Explanation 1-The expression "disaffection" includes disloyalty and all feelings of enmity.

Explanation 2-Comments expressing disapprobation of the measures of the attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section.

Explanation 3-Comments expressing disapprobation of the administrative or other action of the Government without exciting or attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section.

जेएनयु मधे दिल्या गेलेल्या घोषणा उपरोक्त दंडविधानानुसार शिक्षेस पात्र ठरतात. फक्त त्या कोणी दिल्या हे शोधले की झाले.

विकास's picture

25 Feb 2016 - 1:28 am | विकास

Sedition साठी हा आहे मी खाली दिलेला १२३ नाही...

जेएनयु मधे दिल्या गेलेल्या घोषणा उपरोक्त दंडविधानानुसार शिक्षेस पात्र ठरतात. फक्त त्या कोणी दिल्या हे शोधले की झाले.

हे तितके सोपे नाही...पण केवळ एका त्रयस्थ नजरेने कायदा कसा interpret केला जातो हे बघणे रोचक ठरणार आहे:

अशा केसेस मधे केदारनाथ सिंग खटला या साठी ग्राह्य धरला जातो. आता गंमत अशी आहे. की या मधे जे आरोपी होते ते केदारनाथ सिंग हे मला वाटते कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. त्यांनी बिहारमधे भाषणे करताना त्यांच्या मागावर असलेल्या सिआयडींची तुलना कुत्र्यांशी केली, काँग्रेस गुंडा वगैरे शब्द वापरले. त्यासाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता. अर्थातच तो कोर्टाने मानला नाही आणि कशाला मानावे हे सांगितले.

नंतरच्या काळात तोगाडीयांवर असाच आरोप झाला पण ते सुटले. तोगाडीया तुम्हाला-मला झेपणार नाहीत पण ते देश के तुकडे करण्याची भाषा करतील असे वाटत नाही. अर्थात ते देखील सुटले. रॉय काकू कशा सुटल्या माहीत नाही. पण त्यांनी देखील अशी भाषा केली असेल असे वाटत नाही. असिम त्रिवेदीचे शब्द जरी भडक असले तरी त्यानी काढलेले कार्टून्स हे देशद्रोही कॅटॅगरीत बसणारे नव्हते. फारतर त्याला सत्ताधारी - तत्कालीन काँग्रेसविरोधी होते असे म्हणता येऊ शकेल.

आत्ता मात्र जी भाषा वापरली गेली आहे आणि ते नंतर जादवपूरला पण पसरले त्यामुळे रंग किंचीत वेगळा आहे. पोलीस यात षड्यंत्र होते आणि जर अटक केली नसती तर सर्वत्र वाढू शकले असते असे म्हणू शकतात. त्यासाठी जाट आंदोलन प्रसंग पण पुढे करू शकतात. खरे-खोटे काय होते माहीत नाही. पण सिद्ध काय होते आणि न्यायालयास काय चालते ते पहाणे रोचक ठरणार आहे.

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 2:00 am | तर्राट जोकर

बरोबर. उपरोक्त खटले आणि जेएनयु प्रकरण एकाच मापात नाही बसणार. तत्कालिन सरकार, सत्ताधारी पक्ष ह्याविरूद्ध थेट घोषणा आणि देशाविरुद्ध थेट घोषणा ह्यात फरक आहेच. पण अटक केली नसती तर सर्वत्र वाढू शकले अस्ते असा दावा टिकु शकणार नाही असे वाटते. पुढे काय होइल हे रोचक आहेच.आपल्या जनमतांच्या पलिकडे भावनारहित स्थितीत न्यायालय चालते. त्यात जनमताला पाहिजे तेच निर्णय लागू शकत नाहीत. लागले तरी शिक्षा कायद्यानुसार होते.

पाणी फार गढूळलंय. लवकर गाळ खाली बसावा. न्यायालयाने तुरटी फिरवावी.

विकास's picture

25 Feb 2016 - 12:51 am | विकास

त्याबद्दल भारतीय दंडविधान, संविधान काय म्हणतं?

अहो जरा स्वतः पण घरकाम (आयमीन होमवर्क) करत जा की!

Section 123 in The Indian Penal Code

123. Concealing with intent to facilitate design to wage war.—Whoever by any act, or by any illegal omission, conceals the existence of a design to wage war against the [Government of India], intending by such concealment to facilitate, or knowing it to be likely that such concealment will facilitate, the waging of such war, shall be punished with imprisonment of either de­scription for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine.

आता पुढचा प्रश्न येण्याआधीच उत्तर देतो: भादंवि / आयपीसी च्या सुरवातीसच हे चाचानेहरूंच्या कृपेने स्पष्ट करण्यात आले आहे: except the State of Jammu and Kashmir त्यामुळे तेथे अमुक असा वागला तरी कसे काय चालले वगैरे प्रश्न नकोत.

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 1:04 am | तर्राट जोकर

गरज नसतांना तुम्ही हा होमवर्कचा सल्ला द्याल हे लक्षात येऊन आधीच वरचा प्रतिसाद दिला. स्पून फिडींग फार लागतं आजकाल, काय करणार?

बाकी, जेएनयुतल्या घोषणांना १२३ लागेल की १२४-अ हे आता न्यायालय ठरवेल. खरे आरोपी सापडले तर.

अफझल गुरुच्या फाशीच्या निषेधार्थ, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमासाठी काही गुन्हा दाखल होणे शक्य आहे की नाही हे नाही सांगता येणार.

बोका-ए-आझम's picture

5 Mar 2016 - 10:23 am | बोका-ए-आझम

चार्जशीट पोलिस (त्यांच्या वतीने सरकारी वकील) फाईल करतात. कोर्ट गुन्हा अमक्यातमक्या कलमानुसार फाईल केल्यास पुरावा दाखवा असं म्हणतं. कलम ठरवत नाही. संजय दत्तला टाडा न लावायचा निर्णय सरकारी वकिलांचा होता. कोर्टाचा नव्हे.

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 10:36 am | तर्राट जोकर

मी जे म्हणतोय तेच तुम्ही वेगळ्या शब्दात मांडलंय. स्पून फीडींगची गरज अधोरेखीत झाली.

रच्याकने, मिसळपाववर काहीही लिहायचे असेल तर भाषा सरकारी, कायद्याची, काटेकोर, विज्ञानसंज्ञांच्या व्याख्येसारखी असली पाहिजेच काय? की अभिव्यक्ति स्वातंत्र्य फक्त जर्मनीकरांस मिळाले आहे?

बोका-ए-आझम's picture

5 Mar 2016 - 12:04 pm | बोका-ए-आझम

असं तुमच्या प्रतिसादात म्हटलंय. मी त्यावर हा प्रतिसाद दिला होता. असो.

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 12:15 pm | तर्राट जोकर

न्यायालय ठरवेल म्हणजे न्यायालयीन कार्यवाहीत ठरेल असा अर्थ. कलमं लावायचं काम पोलिसांचं असलं तरी दंड देण्याचं न्यायालयाचं आहे. गुन्ह्याप्रमाणे पोलिस कलम लावतील, त्याला पुरावे सादर करतील पण शेवटी ह्या तिघांतही (गुन्हा, कलमं, पुरावा) सुसूत्रता आहे का ह्यावर निर्णय द्यायचं काम न्यायालयाचं आहे. माझ्यामते पोलिस यंत्रणा न्याय व्यवस्थेचाच एक भाग आहे. त्याअर्थाने न्यायालय ठरवेल असे म्हटले. कुणाला ज्यादा माय्क्रोस्कोपिक बघायचे असल्यास माझी हरकत नाही. असो.

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 12:44 am | तर्राट जोकर

माझा वरचा प्रतिसाद मूळ धाग्याच्या अनुषंगाने असला तरी भंकसबाबा ह्यांनी उपस्थित केलेल्या टॅक्सच्या मुद्द्याच्या अनुषंगाने नाही, तो सोडून द्यावा.

टॅक्सपेयर ह्या नात्याने सिलेक्टीव संताप योग्य आहे का हा माझा मूळ प्रश्न होता. (एक भारतीय म्हणून संताप असलाच पाहिजे ह्या अर्थाचा प्रतिसाद खालीच दिलाय)

भंकस बाबा's picture

24 Feb 2016 - 6:59 pm | भंकस बाबा

सर्वच काही उद्योगपति घेऊन गेले नाही, काही लाखोना रोजगार मिळाला असेल की नाही?

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 7:07 pm | तर्राट जोकर

तर्क चुकतोय बरं का...? उद्योगपत्यांना कर्जमाफी म्हणजे रोजगार योजना नव्हे.

मृत्युन्जय's picture

5 Mar 2016 - 11:22 am | मृत्युन्जय

वरील दोन गोष्टीतला एक मुलभूत फरक आपण समजुन घेतलेला दिसत नाही. देशविरोधी घोषणा देणॅ. देशद्रोही कामे करणे आणि उद्योगधंदा करत असताना त्यात नुकसान होणे यात मूलभूत फरक आहे.

उद्योगधंद्यात नुकसान होणारा प्रत्येक उद्योगपती हा पैसे घशात घालतो असा एकांगी समज करुन घेणे म्हणजे प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी असतो असे म्हणण्यासारखे आहे. धंदा म्हटल्यावर चढ उतार येणारच. कधी कधी काही गणीते चुकु शकतात. हे करताना नुकसान देखील होणारच. नुकसान सहन करणारा माणूस अजुन जास्त हातपाय मारुन गाळातुन वरती यायचा प्रयत्न करतो आणी या प्रयत्नात जास्त गाळात जातो. त्याने कितीही सचोटीने धंदा केला तरी काही समीकरणे बिघडुन कर्जे बुडीत जाऊ शकतात. शेतीमध्ये वेगळे काय होते? तिथेही शेती गाळात जाते, बॅ़कांची कर्जे बुडवली जातातच की. त्यामुळे केवळ नुकसान झाल्याने धंदा बुडाला आणि कर्जे परत करु शकले नाहित तर उद्योगपती चोर ठरत नाहित. देशद्रोही तर नाहिच नाही.

ज्या उद्योगपतींनी पैसा घशात घातला ते चोर ठरु शकतात. मल्याचे उदाहरण घ्यायचे तर त्याने किंगफिशर एयरलाइन मध्ये पैसा गुंतवला आणि तो डुबला. त्याने बँकांनाही डुबवले. ही धंद्यातली खोट झाली. जोपर्यंत असे सिद्ध होत नाही की मल्याने एयरलाइनच्या नावाने पैसा घेउन स्वतःचे बंगले बांधले तोवर तो चोर ठरत नाही. आपल्याला मल्याची लॅविश लाइफस्टाइअल दिसते आणि त्याने बँकांची बुडवलेली कर्जे दिसतात पण त्याने कर्जे एयरलाइनची बुडबली. त्याने बुडवली म्हणजे त्याच्या कंपनीने बुडवली कारण ती कंपनी गाळात गेली आणि पार्ट्या तो त्याच्या इतर उत्पन्न स्त्रोतातुन करतो. त्यामुळे तो चोर ठरत नाही. अर्थात यातुन माणसाची नियत दिसते. त्याने कर्मचार्‍यांचे पैसे देखील थकवले. आपल्या इतर उद्योगांतुन स्वतःचे पैसे अय्रलाइन मध्ये लावुन तो काही देणी चुकवु शकला असता. त्याने जे केले ते मनाला रुचत नसले तरी त्यात बेकायदेशीर काही नसल्याने तो अजुन बाहेर आहे ( त्याने कंपनीच्या पैशावर स्वतःचे इमले बांधले असतील तर गोष्ट वेगळी)

थोडक्यात धंद्यातली खोट हा देशद्रोह काय साधी चोरी पण ठरत नाही पण खोटेपणाचा धंदा ही चोरीच झाली.

आनन्दा's picture

24 Feb 2016 - 12:06 pm | आनन्दा

भारतीय कायदा याबद्दल काय सांगतो?

पुष्करिणी's picture

24 Feb 2016 - 4:13 pm | पुष्करिणी

जिथंतिथं 'विचावंत' लोकांकडून सध्या आळवलं जाणारं धृपद 'Dissent is not anti-national' हे जितकं खरं आहे तितकाच सोयीस्कर रित्त्या विसरलेला त्याचा व्यत्यासही खरा आहे .

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 6:46 pm | तर्राट जोकर

काश्मिरी आतंकवादी मकबूल भट याची विकीपिडियावरची माहिती संतुलित नाही. त्याचे उदात्तीकरण करुन त्याला हिरो बनवणारी वाटते. संबंधित लक्ष देतील काय?

https://en.wikipedia.org/wiki/Maqbool_Bhat

चौकटराजा's picture

24 Feb 2016 - 6:47 pm | चौकटराजा

आपल्या नेहमीच्या आयुष्यातही आपण चटकन बोलून जातो " ते... अमुक ना कोणालाही दुखवीत नाहीत अर्थात ते फार सद्ग्रूहस्थ आहेत. " माझ्या मते त्यांच्या या गोडव्या पेक्षा ते किती सरळ वा वाकडे वर्तणुकीत आहेत हे मला महत्वाचे वाटते. मी राष्ट्रध्वजाला वंदन करतो पण आयकर बुडवितो. भारत्माताकी जय म्हणतो पण रांगेत घुसतो तर मी एक देशद्रोहीच
आहे. जला दो जला दो जला दो ये दुनिया...... असे वैतागाने म्हणणारा॑ कवि मग मानवाचा एक नंबरचा शत्रू म्हणावयास हवा. आपण आपली घटना आपल्यासाठी बनविली आहे ती आपल्यासाठी आहे आपण तिच्यासाठी नाही. सबब ती बदलू असे सुचविणे हा देखील देशद्रोह मानू लागलो तर वरती अस्मानातच वस्ती करून रहावे लागेल. थोडक्यात देश, धर्म राष्ट्र,संस्कृति भाषा राज्यघटना या समूहासाठी आहेत. मानवाने त्याचा अतिरेकी अभिमान बाळगू नये. पण कृति करताना आपण काही इतरांच्या जगण्यातच उपद्रव ठरणार असू तर खुद्ध एखादा शास्ता देखील देश्द्रोही म्हणावा लागेल. नव्हे आज देखील जर्मनीतील लोक॑ हिटलरला देशद्रोहीच मानतात.

प्रदीप साळुंखे's picture

24 Feb 2016 - 7:41 pm | प्रदीप साळुंखे

तर्राटजी जोकर,
माझं एक सुक्ष्म निरीक्षण सांगतो,
असल्या विषयांच्या धाग्यावर तुम्ही असंबंधित मुद्दे काढून धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करता.

देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.

उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का?

बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज आपल्याच करातून उद्योगपतींच्या घशात गुपचुप घातलेत. तेव्हा आपण आपल्या बोलण्याचा हक्क बजावला की नाही?

माझ्या अल्पज्ञानानुसार भ्रष्टाचार हा गुन्हा जरूर आहे,यामुळे देशाचे नुकसान होते.पण ते देशद्रोह या क्याटॅगिरीत मोडत नाही.
भंकसबाबांनी देशविरोधी घोषणा देण्यार्यांना कुत्रे संबोधले आहे,पण तुम्ही परत उद्योगपतींना कर्ज देणे वगैरे असंबंधित मुद्दा उपस्थित केलात.आणि त्यांनासुद्धा कुत्रे म्हणण्याचा हक्क बजावलात का? म्हणून विचारलं.
देशद्रोही घटनांची इतर घटनांबरोबर तुलना करू नये
सरकारचे धोरण,दुटप्पीपणा,भ्रष्टाचार वगैरे मुद्दे मांडण्यासाठी दुसरे धागे आहेत,किंवा तुम्ही दुसरा धागा काढा.
पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून.

आनन्दा's picture

24 Feb 2016 - 7:56 pm | आनन्दा

करू द्या हो. नाहीतर माझी शेंच्युरी कशी होणार?

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 9:05 pm | तर्राट जोकर

म्हटले तर ट्रूमनसाहेबांच्या प्रतिसादात धागा संपला. अजून वेगळं कोण काय बोलणार?

भंकस बाबा's picture

24 Feb 2016 - 10:23 pm | भंकस बाबा

मानधन वैगेरे मिळते का हो शेंचुरीला?
माझा हेतु उद्योगपतिची पाठराखण करण्याचा नव्हता. हे देशद्रोही गोबेल्स तंत्रानुसार प्रचार करत आहे. काही काळाने हे टीनपाट बोलतील तेच सत्य असा समज पसरायला वेळ लागणार नाही. कदाचित माझा पोरगा (वय वर्षे 5) दहा वर्षानी मला विचारेल की शिवाजी महाराजांनी अफझलखानाला का मारले? जर तो दुष्ट होता तर मग त्याच्या नावाने दर्गा का आहे? तिथे मन्नत का मागितली जाते?

उगा काहितरीच's picture

24 Feb 2016 - 10:29 pm | उगा काहितरीच

करू द्या हो. नाहीतर माझी शेंच्युरी कशी होणार?

हे नाही आवडलं ! आपण केवळ टीआरपी मिळावी म्हणून का असले धागे काढता ? एकदा आपण विचार करा हा मुद्दा किती गंभीर आहे याबाबतीत .

थोडीशी थट्टा चालते, नाही का? मी वरच लिहिले की हा विषय मी मोरेकाकांच्या धाग्यात काढला होता, पण त्याचे धागामूल्य लक्षात घेऊन मी वेगळा धागा काढला.
नाहीतर त्यांचा धागा हाय्जॅक व्हायचा.

मी टीआरपी साठी धागे काढतो का हे आपण माझ्या इथल्या इतिहासावरून ठरवावे. मी काय बोलणार?

उगा काहितरीच's picture

25 Feb 2016 - 11:13 am | उगा काहितरीच

थोडीशी थट्टा चालते, नाही का?

सहमत , चालावीच थोडीफार थट्टा . पण त्यासाठी भरपूर इतर धागे आहेत ना . हे असे सिरीयस धागे मिपाच्या सदस्व्ययांतीरीक्तही इतर लोकही वाचतात. कदाचित त्यामुळे मिपाची प्रतिमा "कोणत्याही धाग्यावर थट्टामस्करी करणारे संस्थळ" असे होउ शकते.

मी वरच लिहिले की हा विषय मी मोरेकाकांच्या धाग्यात काढला होता, पण त्याचे धागामूल्य लक्षात घेऊन मी वेगळा धागा काढला.
नाहीतर त्यांचा धागा हाय्जॅक व्हायचा.

होय, ते आलं लक्षात आणी हे योग्यच केलेत. धन्यवाद !

मी टीआरपी साठी धागे काढतो का हे आपण माझ्या इथल्या इतिहासावरून ठरवावे. मी काय बोलणार?

बिलकुल नाही! तुमचे धागे चांगलेच असतात उगाच गैरसमज नको. पण त्याचं काय आहे ना, मी सहसा लेखावर प्रतिक्रिया देताना लेखकाचा पुर्वेतिहास बघत नाही. लेखकावर नाही तर लेखावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो.
.
बहुत काय लिहीणे , आपण सुज्ञ आहात. काही चुकलं असेल तर क्षमा असावी .
-आपला नम्र उका .

साठीच धागा काढत असतो. तो लोकांनी वाचावा आणि प्रतिक्रिया द्याव्यात हा प्रत्येकाचाच उद्देश असतो. त्यात चुकीचं काहीच नाही. टीआरपीचा हाच अर्थ लावतात ना? का काही वेगळा मिपीय अर्थ आहे? (कवितेत जसे कोडाईक‌नाल आणि भुछत्री हे खास मिपावरचे काव्यरस आहेत तसं).

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 12:55 pm | तर्राट जोकर

सवंग लोकप्रियता म्हणजे टी आर पी असा मिपीय अर्थ आहे. ह्यामध्ये धाग्याचा विषय काय निवडला आहे ह्यावरुन धागालेखकाचा उद्देश बरेच्दा कळून येतो. प्रतिसादांतूनही दिसुन येतं. काही लेख कितीही सुंदर, चर्चेस पोषक बीज देणारे असले तरी पब्लिक इग्नोर मारते असेही दिसून येते. काही विशिष्ट विषय जसे शाकाहारी-मांसाहारी, आध्यात्म-विज्ञान, स्त्री-पुरुष, आरक्षण इत्यादी विषय ट्यार्पी विषय म्हणून ओळखले जातात. धागालेखकांचे पुर्वकर्म बघूनही धाग्याचा उद्देश हा ट्यार्पीचाच आहे असेही सुज्ञ मिपाकर ओळखून घेतात. दुर्दैवाने लांडगा आला रे आला सारखे कधी कधी चांगले धागे ट्यार्पीच्या नादात बट्ट्याबोळ होऊन जातात.

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2016 - 2:15 pm | श्रीगुरुजी

काही लेख कितीही सुंदर, चर्चेस पोषक बीज देणारे असले तरी पब्लिक इग्नोर मारते असेही दिसून येते.

दुर्दैवाने लांडगा आला रे आला सारखे कधी कधी चांगले धागे ट्यार्पीच्या नादात बट्ट्याबोळ होऊन जातात.

तुमच्या "राष्ट्रपाव" या धाग्याच्या अनुभवावरून सांगताय का?

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 2:37 pm | तर्राट जोकर

साहेब, मी माहितगार यांच्या धाग्यांबद्दल बोलतोय, असे अनेक आहेत.

राष्ट्रपाव हा धागा तद्दन टाइमपाससाठी होता, ट्यार्पीसाठी नाही. जितके प्रतिसाद आले त्याबद्दल ना दुख ना आनंद. स्वतःच पाचशे प्रतिसाद टाकून धागे हजारी करण्याइतकं निर्ढावलेलं मन नाहीये माझ्याकडे.

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2016 - 2:42 pm | श्रीगुरुजी

मग ठीक आहे. तुम्ही सर्वत्र इतक्या पोटतिडीकीने आणि गांभिर्याने प्रतिसाद देता, त्यामुळे मला वाटलं की तो धागा सुद्द्धा तसाच असेल.

स्वतःच पाचशे प्रतिसाद टाकून धागे हजारी करण्याइतकं निर्ढावलेलं मन नाहीये माझ्याकडे.

पेला अर्धा रिकामा आहे का अर्धा भरलेला आहे हे ज्याच्यात्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे.

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 2:57 pm | तर्राट जोकर

धागा कुणी लिहलाय यावरुन मत बनवता काय? ओके ओके.

आनन्दा's picture

5 Mar 2016 - 7:59 pm | आनन्दा

झाली माझी शेंच्युरी!!

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 8:12 pm | तर्राट जोकर

असल्या विषयांच्या धाग्यावर तुम्ही असंबंधित मुद्दे काढून धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करता.>> अचाट तर्क लावनार्‍यांचा फोलपणा दाखवला की ते मुद्दे असंबधितच वाटणार. देशविरोधी घोषणा आणि टॅक्सपेयरचा मुद्दा सुसंगत नाही.

उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का?
>> नाही. अजिबात वाटत नाही. कायद्याच्या पळवाटा वापरुन देशविरोधी कार्यवाया करणे पटण्यासारखे नाही.

असो. शेवटी मी माझ्यातर्फे एक सांगतो. मिसळपाववर कुठलीही चर्चा एकतर्फी होऊ नये असे वाटते. समविचारींचा कळप बनवून भावनाशील उमाळेच काढायचे असतील तर तसे धाग्यावर स्पष्ट नमूद करावे. तिकडे फिरकणार नाही. देशभक्ती, देशद्रोह हा ब्लँकेट मुद्दा आहे, ज्यात कोणीच देशवासी असहमत असूच शकत नाही. पण त्याचा आधार घेऊन काहीही विधानं करणे योग्य नाही. मी असे म्हनत नाहीच की माझे बरोबर. माझ्या तर्कातल्याही चुका दाखवा, मलाही नवीन विचार मिळेल. पण इथे बोलू नका अशी अप्रत्यक्ष सुचवणी मिपाधोरणाशी सुंसंगत नाही. धाग्याचा विषय व प्रतिसाद धरुनच माझे प्रतिसाद आहेत. तसे नसतील तर अवांतर आणि अनावश्यक ते सर्व उडवण्याचे संपादकांना सर्व अधिकार आहेत.

बाकी, डाव्यांच्या अतिघातक मतांशी मी सहमत नाही. म्हणून उजव्यांची तर्कहिन मतेही मान्य असतील असे नाही.

प्रदीप साळुंखे's picture

24 Feb 2016 - 9:15 pm | प्रदीप साळुंखे

उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का?
>> नाही. अजिबात वाटत नाही. कायद्याच्या पळवाटा वापरुन देशविरोधी कार्यवाया करणे पटण्यासारखे नाही.

Ok.you continue
उर्वरित प्रतिसाद छान आहे.

अचाट तर्क लावनार्‍यांचा फोलपणा दाखवला की ते मुद्दे असंबधितच वाटणार.

या धाग्यात अचाट तर्क कोणी केलाय ते सांगा.

प्रदीप साळुंखे's picture

24 Feb 2016 - 9:57 pm | प्रदीप साळुंखे

या धाग्यात अचाट तर्क कोणी केलाय ते सांगा.
21:15 या वेळेपर्यत,पुढे कोणी केला तर माहित नाही
उत्तर द्या

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 10:10 pm | तर्राट जोकर

देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा अजुन जास्त खटकते जेव्हा हे विद्यार्थी असतात आणि त्याच देशाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत असतात. मला यांना कुत्रे बोलण्याचा हक्क् आहे कारण मी टॅक्स नियमित भरतो.माझ्याच पैशानी ही कुत्री माजली आहेत.

जऊ द्या हो ते भंकस करत होते.

भंकस बाबा's picture

24 Feb 2016 - 10:30 pm | भंकस बाबा

मी माझ्या संतापाला वाट करून देत आहे. तुम्ही पण तेच करत आहात. का तुम्ही शाहेनशहा सारखे रात्रि बाहेर पडून गाणी म्हणत दुर्जनांचा नाश करता?

तर्राट जोकर's picture

24 Feb 2016 - 10:53 pm | तर्राट जोकर

संतापाला वाट मोकळी कराच, पण चुकीची गृहितकं पसरवण्याला आवर घालणे महत्त्वाचे. आपल्या टॅक्सपेक्षा जास्त काही इथे महत्त्वाचे आहे. तुम्ही टॅक्स भरता म्हनून तुम्हाला अधिकार आहे हा समज चुकीचा. तुम्ही भारतीय आहात त्या न्यायाने संताप होणे योग्य. नको तिथे पैसा आणला तर इतर प्रश्न उभे राहतात. म्हणजे कसं की जे तुमच्या टॅक्सच्या पैशावर जगत नाहीत, उघड घोषणा देत नाहीत त्यांच्या देशविरोधी कारवायांना विरोध नाही असे काही होते का? नाही. पैसा कोणाचाही असो, भारताविरूद्ध कारस्थाने करणार्‍यांचा तेवढाच राग मला येतो.

असो. ह्याबद्दल वेगळा धागा पाहिजे का? टॅक्सपेयरचा पैसा आणी देशद्रोह, विषय खरंच मोठा आहे.

भंकस बाबा's picture

25 Feb 2016 - 9:30 am | भंकस बाबा

अगदी मोठ्यातला मोठा माणूस देखिल सरकारकडून असलेल्या सवलती ओरपतो.

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 9:35 am | तर्राट जोकर

कोणीही सरकारच्या दयेवर जगत नाही.

असो. हा विषय आत थांबवतो. तुमच्या भावनांना पूर्ण पाठिंबा आहेच. टॅक्सवाला मुद्दा वगळून. त्याबद्दल नंतर कधीतरी.

प्रदीप साळुंखे's picture

25 Feb 2016 - 7:55 am | प्रदीप साळुंखे

देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा अजुन जास्त खटकते जेव्हा हे विद्यार्थी असतात आणि त्याच देशाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत असतात. मला यांना कुत्रे बोलण्याचा हक्क् आहे कारण मी टॅक्स नियमित भरतो.माझ्याच पैशानी ही कुत्री माजली आहेत

हा अचाट तर्क मला तरी वाटत नाही,इतरांनाही वाटत नसावा.
देशविरोधी घोषणा देण्यार्यांना ते कुत्रे म्हणत असतील तर म्हणू द्या ना!

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 8:07 am | तर्राट जोकर

मला यांना कुत्रे बोलण्याचा हक्क् आहे कारण मी टॅक्स नियमित भरतो.माझ्याच पैशानी ही कुत्री माजली आहेत

>> मोठा विषय आहे प्रदिपसाहेब, इथे भावनाच बघायच्या असतील तर तर्क राहूदेत बाजुला. भावनांच्या प्रदर्शनाबद्दल कोणताही आक्षेप नाही.

प्रदीप साळुंखे's picture

25 Feb 2016 - 8:09 am | प्रदीप साळुंखे

. तुम्ही टॅक्स भरता म्हनून तुम्हाला अधिकार आहे हा समज चुकीचा.

देशद्रोह्यांना कुत्रे म्हणण्याचा अधिकार सगळ्यांना आहे.
त्यांना कुत्रे म्हणता तर मग भ्रष्टाच्यार्यांनाही कुत्रे म्हणा!
हा तर्क असंबंधित आहे.

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 8:29 am | तर्राट जोकर

कसा?

प्रदीप साळुंखे's picture

25 Feb 2016 - 9:12 am | प्रदीप साळुंखे

देशद्रोही आणि भ्रष्टाचारी यांना तुम्ही एकाच तराजूत तोलत आहात.
त्यामुळे तुम्हाला तुमचा तर्क संबंधित वाटत असेल.
मी देशद्रोही आणि भ्रष्टाचारी यांना एक तराजुत तोलत नाही,त्यामुळे मला तो तर्क असंबंधित वाटतो.
.
.
.
बाकि अपना अपना स्टाईल होता है|
.
.
थांबतो आता
धन्यवाद.

कुत्रे हा शब्दच असंसदीय आहे..

प्रदीप साळुंखे's picture

25 Feb 2016 - 9:14 am | प्रदीप साळुंखे

होय.

नाखु's picture

25 Feb 2016 - 9:34 am | नाखु

कुत्र्यांचा अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही..

ट्रेड मार्क's picture

25 Feb 2016 - 12:19 am | ट्रेड मार्क

उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का?
>> नाही. अजिबात वाटत नाही.

हे तुमचं मत फायनल असेल तर मग या न्यायाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून झोपडपट्टी बांधून फुकट वीज व पाणी वापरणारे, सरकारकडून झोपडीच्या बदल्यात पक्कं घर फुकटात पदरात पडून घेणारे आणि त्यावर कडी म्हणजे ते पक्कं घर भाड्याने देऊन स्वतः परत झोपडीत राहणारे पण देशद्रोहीच असावेत. तुम्ही तर तुमच्या या धाग्यात तर या सर्व गोष्टीचं समर्थन केलं आहे.

असो. उगाच विषयांतर नको.

बाकी १. १४ कोटींच्या कर्जमाफी (?) विषयी वेगळा प्रतिसाद दिला आहे.

तर्राट जोकर's picture

25 Feb 2016 - 12:24 am | तर्राट जोकर

तुम्ही तो धागा प्रतिसादांसकट पूर्ण वाचला असता तर इथे तो विषय मांडलाच नसता. परत विषयांतर नको असेही म्हटलंय. मग उत्तर देऊ की नको?

सुबोध खरे's picture

24 Feb 2016 - 7:47 pm | सुबोध खरे

असल्या विषयांच्या धाग्यावर तुम्ही असंबंधित मुद्दे काढून धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करता.
सहमत

कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर सरकारविरुद्ध बेकायदेशीर मार्गाने केलेले कुठलेही कृत्य मग त्यात घोषणा देखील आली, म्हणजे देशद्रोह असे मानले जाऊ शकते. पण पुढे न्यायालय असते आणि त्यात आपले कृत्य देशद्रोह नाही किंवा ते बेकायदेशीर मार्गाने केलेले नाही असा बचाव त्या व्यक्तीला करता येऊ शकतो.

सरकारविरुद्ध की देशाविरूद्ध? माझ्यनव्हेसरकार म्हणजे संसद नव्हे.. संसद म्हणजे देश आहे का हे माहित नाही.

मी कायद्याच्या दृष्टीने असा शब्दप्रयोग केला आहे. तेंव्हा याला भावनिक दृष्टीने बघू नका. आणि सरकार या शब्दाचा लोकशाहीतील अर्थ, सत्ताधारी पक्ष असा केला जातो.
आता जास्त बोललो तर माझ्या लेखमालेचा एखादा भाग वेळेआधी इथेच जन्म घेईल. तस्मात थांबतो… :-)

मी भावनेच्या भरात हा प्रश्न विचारला नाही. माझ्या दॄष्टीने भारताचा पंतप्रधान, भारतीय संसद आणि भारत हा देश या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
उद्या मी जर माझा पंतप्रधान मूर्ख आहे असे म्हटले तर तो देशद्रोह ठरत नाही. संसदेत बसलेले सगळे मूर्ख आहेत असे म्हटले तरीही मी देशद्रोही नाही.
खरे तर संसद हे प्रतिनिधिमंडल आहे, त्यामुळे प्रत्यक्ष संसदेचा अपमान कदाचित देशद्रोह ठरू शकतो, जसे संसदेवरचा हल्ल. पण मला माहित नाही.

पण भारत या एंटिटीबद्दल अनुचित शब्द वापरणे कदाचित देशद्रोह होईल माझ्या मते, ते देखील विशिष्ट परिस्थितीत.

असो - तुम्ही एक लेख लिहिणार आहात म्हटल्यावर प्रश्नच मिटला. इथे काही लिहू नका.

बोका-ए-आझम's picture

3 Mar 2016 - 10:19 am | बोका-ए-आझम

Breach of Privilege ठरू शकतो. आपल्या देशात संसद सर्वश्रेष्ठ नाही, घटना सर्वश्रेष्ठ आहे. त्या घटनेने लोकप्रतिनिधींना काही विशेषाधिकार दिलेले आहेत. त्यांचा भंग होतोय असं वाटलं तर त्या माणसाला संसदसदस्य बोलावून घेऊ शकतात आणि जाब विचारू शकतात. मला वाटतं यूपीएच्या पहिल्या कार्यकाळात भारताचे अमेरिकेतील राजदूत रोनन सेन यांना संसदसदस्यांबद्दल Why are they running around like headless chicken असा शेरा मारला म्हणून संसदेत स्पष्टीकरणासाठी बोलावण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानसभेत माजी राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांना बोलावण्यात आलं होतं आणि सभागृहाचा अवमान म्हणून एक आठवड्याची कैदही देण्यात आली होती.

होबासराव's picture

25 Feb 2016 - 2:19 pm | होबासराव

कालचि बातमि पाहिलि का कोणि लातुरची, एका पोलिस असिस्टंट सब इन्स्पेक्टर ला ज्या तर्‍हेने पोलिस चौकितुन काढुन जमावाने मारहाण केलि, हि बातमि महाराष्ट्रातिल आहे ह्यावर विश्वासच बसत नव्हता. सगळ्या दोषिंना कडक शासन व्हायला हवे. झुंडशाहि मग ति कुठल्याहि पक्षाचि, धर्माचि असो निषेधार्हच असायला हवि.

वास्तवीक कन्हैय्या कुमार ने घोषणाच दिल्या नाहीत. त्या शिवाय कपिल सिब्बल सारखे दिग्गज वकील आणि सारी भारतीय जनता त्याच्या पाठीशी उभी असल्याने, सुप्रिम कोर्टात प्रयत्न करून झाला. सुप्रिम कोर्टाने सांगितले की उच्च न्यायालयात जा. आणि आज दिल्ली हायकोर्टाने बाइज्जत सोडण्याऐवजी जामिनावर सोडले.... ;) सारांश असा:

  1. आमच्या अशिलाने देशविरोधी घोषणा केल्या नव्हत्या असे कपिल सिब्बल यांचे मत होते तर पोलीसांचे मत आहे की आमच्याकडे पुरावा आहे.
  2. कोर्टाने वरकरणी तरी पुर्ण निर्दोष असल्याचे मान्य न करता खटला चालवायचे ठरवलेले दिसत आहे.
  3. त्याकाळात सहा महीन्यांसाठी रु. १०,००० जामिनावर सुटका.
  4. जे एन यु च्या किमान एका प्राध्यापकाला त्याच्या जामिनासंदर्भात जबाबदार रहावे लागणार आहे.
  5. कन्हैय्या पोलीसांच्या चौकशीला सहकार्य करेल.
  6. टाईम्स आणि एनडीटिव्ही च्या संस्थळावरील एक वाक्य खूपच रोचक आहे: "Mr Kumar had also distanced himself from Umar Khalid and Anirban Bhattacharya, the two other accused arrested in the case."
होबासराव's picture

2 Mar 2016 - 8:24 pm | होबासराव

"Mr Kumar had also distanced himself from Umar Khalid and Anirban Bhattacharya, the two other accused arrested in the case."

विकास,
मला चांगले बुद्धिबळ नाहि खेळता येत, पण त्यात एक चाल असते जिथे घोडा चालुन येतो आणि तुमच्या समोर आव्हान असत एक तर वजिराचा बळि द्या नाहि तर हत्ति चा.

म्हणण्या पेक्षा एक तर हत्ति वाचव नाहि तर वजिर...

विकास's picture

2 Mar 2016 - 10:03 pm | विकास

सहमत होबासराव!

कायद्याने त्यांना कायद्याच्या चौकटीत चाल खेळायचा हक्क दिला आहे. तो ते खेळत आहेत. पण त्यांची अथवा त्यांचा राजकीय प्याद्यासारखा उपयोग करवून घेणार्‍यांची राजकीय चाल चुकली होती असे स्पष्ट होत आहे. म्हणूनच, "मी नाही त्यातली.." म्हणायची वेळ आली आहे.

हायकोर्टाने अंतरीम जामिन देत असताना केलेले वक्तव्य फारच रोचक आहे... थोडक्यात सांगायचे तर न्यायमुर्ती म्हणाल्या की जर हाताला अथवा पायाला इन्फेक्शन झाले तर प्रथम अँटीबायोटीक्सच्या गोळ्या देऊन आजार बरा करायचा प्रयत्न केला जातो. पण रोग चिघळू लागून जर पसरायची भिती असेल तर हाताचा अथवा पायाचा तो भाग कापावा लागतो. आजचा अंतरीम जामिन म्हणजे अँटीबायोटीक्सच्या गोळ्या देण्यासारखे आहे...

"Sometimes students who misinterpret freedom of speech need to be cured. Whenever some infection is spread in a limb, effort is made to cure it by giving antibiotics orally... if the infection results in infecting the limb to the extent that it becomes gangrene, amputation is the only treatment... To enable him to remain in the mainstream, at present I am inclined to opt for the conservative method of treatment," said Justice Pratibha Rani.

म्हणजे सकृतदर्शनी कोर्टाला गुन्हा झाला आहे हे मान्य आहे तर.

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Mar 2016 - 12:24 pm | श्री गावसेना प्रमुख

Bbc ला आलेल्या बातमीत कन्हैय्या ला जामीन देतांना सांगितलेले 11 पॉईंट जसेच्या तसे इथे पेस्ट करीत आहे।
1 . आदेश की शुरुआत में ही जज ने पूछा है कि जेएनयू छात्रों, शिक्षकों और प्रशासन को इस सवाल का जवाब ढूंढना चाहिए कि इस वसंत जेएनयू में शांति का रंग क्यों नहीं बिखरा.. जज ने आदेश में कहा है कि नौ फ़रवरी को हुए कार्यक्रम के दौरान 30 नारे लगे. उन्होंने फ़ैसले में सात नारों का ज़िक्र किया है.
3. आदेश में कहा गया है कि सरकार ने अब तक इस बात पर ऐतराज़ नहीं जताया है कि कन्हैया वीडियो फ़ुटेज में नारे लगाते नहीं दिखते. हालांकि सरकारी वकील ने उनके ख़िलाफ़ गवाहों का ज़िक्र किया है.
4. आदेश में हार्दिक पटेल के ख़िलाफ़ राजद्रोह के केस का ज़िक्र किया गया है और गुजरात हाईकोर्ट की टिप्पणी को भी शामिल किया गया है.
5. जज ने आदेश में कहा है कि छात्र संघ अध्यक्ष होने के नाते कैंपस में होने वाले किसी भी राष्ट्रविरोधी कार्यक्रम की ज़िम्मेदारी कन्हैया की समझी जाती है. वह जिस अभिव्यक्ति की आज़ादी की बात कर रहे हैं, वह भारत की सीमा की रक्षा करने वाले सैनिकों की वजह से है.
6. आदेश में कहा गया है कि ये मामला देशविरोधी नारों का है, जिससे राष्ट्रीय एकता को ख़तरा होता है. नारे लगाने वाले ये भूल जाते हैं कि वो यूनिवर्सिटी के सुरक्षित वातावरण में इसलिए सांस ले पा रहे हैं क्योंकि भारतीय सेना दुनिया के सबसे ऊंचे युद्ध क्षेत्र में है, जहां ऑक्सीजन भी इतनी मुश्किल से मिलती है कि अफ़ज़ल गुरु और मक़बूल बट के पोस्टर सीने से लगाकर नारे लगाने वाले एक घंटे भी न रह पाएं.
7. जज ने कहा है कि इन नारों से 'उन शहीदों के परिवारों के हौसले टूट सकते हैं, जिनके शव तिरंगों में लिपटे हुए घर पहुँचे.'
8. अदालत ने यह भी कहा कि अभिव्यक्ति की आज़ादी पर भी अनुच्छेद 19 (2) के तहत बंदिशें लगाई गई हैं. नारों में जिन भावनाओं का ज़िक्र है उन पर उन छात्रों को विचार करने की ज़रूरत है, जिनके फ़ोटो अफ़ज़ल और मकबूल के पोस्टर के साथ रिकॉर्ड में हैं. जेएनयू शिक्षकों को भी चाहिए कि वो छात्रों को सही रास्ते पर लाए
9. जज ने कहा है कि कुछ छात्रों ने जैसे नारे लगाए, वो अभिव्यक्ति की आज़ादी के अधिकार के तहत नहीं आते. ''मुझे यह एक तरह का संक्रमण लगता है, जिससे ऐसे छात्र पीड़ित हैं और महामारी बनने से पहले इसके नियंत्रण और उपचार की ज़रूरत है. जब भी किसी अंग में इन्फ़ेक्शन होता है तो पहले एंटीबायोटिक दवा दी जाती है और अगर इससे काम नहीं चलता तो फिर दूसरा उपचार होता है. कभी-कभी इसके लिए सर्जरी की जाती है. अगर इन्फ़ेक्शन की वजह से अंग इस हद तक संक्रमित हो कि गैंग्रीन हो जाए तो अंग को काटना ही अकेला उपाय बचता है.''
10. जज के मुताबिक़ न्यायिक हिरासत में रहते हुए कन्हैया ने इन घटनाओं पर विचार किया होगा और मुख्यधारा में बनाए रखने के लिए अभी उन्हें शुरुआती पारंपरिक तरीक़े से ही उपचार दिया जा रहा है और इसीलिए उन्हें छह माह की अंतरिम ज़मानत पर छोड़ा जा रहा है.

11. जज ने कहा है कि कन्हैया के परिवार की आर्थिक हालत देखते हुए ज़मानत की रकम इतनी ज़्यादा नहीं हो सकती कि वह अंतरिम ज़मानत ही न ले पाए. हालांकि अदालत ने कहा कि कन्हैया को यह लिखकर देना होगा कि वह ऐसी किसी गतिविधि में भाग नहीं लेंगे, जिसे राष्ट्रविरोधी कहा जाए. साथ ही उन्हें कैंपस में किसी भी राष्ट्रविरोधी गतिविधि पर नियंत्रण की कोशिश करनी होगी. उनकी ज़मानत देने वाला कोई ऐसा व्यक्ति या शिक्षक होगा जो न सिर्फ़ उनकी पेशी तय कर सके बल्कि यह भी ध्यान रखे कि उनके विचारों और ऊर्जा का रचनात्मक इस्तेमाल हो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Mar 2016 - 4:04 pm | निनाद मुक्काम प...

मराठी भाषांतर मुद्दाहून करत नाही आहे ,कारण अनुवाद करतांना ध चा मा होऊ शकतो , तेव्हा जस्टीस प्रतिभा राणी
ह्याच्या मूळ वक्तव्य जसे च्या तसे देत आहे.
बोलबच्चन स्वातंत्र्याच्या बाजारगप्पा आणि जे एन यु च्या मोठ्या बाता त्याच्या परंपरा प्रतिष्ठा ह्या बाजारगप्पा मारणाऱ्या लोकांना सणसणीत चपराक मारली आहे.
अरुंधती ते विनायक सेन ह्यांच्यावर राजद्रोहाचे आरोप ठेवू जे साध्य झाले नाही ते ह्या केस मुळे झाले आहे.
जे एन यु मध्ये देशविरोधी इतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारला जातो , त्या पार्श्वभूमीवर हे भाष्य अधिक परिणामकारक ठरते.
While Kanhaiya Kumar and his apologists in the media may be chest thumping because he got bail, it is very instructive to read the bail order by Justice Pratibha Rani.

She minces no words in stating that the slogans raised in JNU were antinational and reminds us all that our rights are to be exercised only with our duties. She even calls this mentality an 'infection' and warns that 'if the infection turns into a gangrene, it has to be amputated'.

Excerpts from the judgement..

41. Suffice it to note that such persons enjoy the freedom to raise such slogans in the comfort of University Campus but without realising that they are in this safe environment because our forces are there at the battle field situated at the highest altitude of the world where even the oxygen is so scarce that those who are shouting anti-national slogans holding posters of Afzal Guru and Maqbool Bhatt close to their chest honoring their martyrdom, may not be even able to withstand those conditions for an hour even.
m

42. The kind of slogans raised may have demoralizing effect on the family of those martyrs who returned home in coffin draped in tricolor.

43. The petitioner claims his right regarding freedom of speech and expression guaranteed in Part-III under Article 19(1)(a) of Constitution of W.P.(Crl.) No.558/2016 Page 20 of 23
India. He has also to be reminded that under Part-IV under Article 51A of Constitution of India fundamental duties of every citizen have been specified alongwith the fact that rights and duties are two sides of the same coin.

44. The petitioner belongs to an intellectual class pursuing Ph.d. from International School of Studies, Jawaharlal Nehru University, which is considered as hub of intellectuals. He may have any political affiliation or ideology. He has every right to pursue that but it can be only within the framework of our Constitution. The feelings or the protest reflected in the slogans needs introspection by the student community whose photographs are available on record holding posters carrying photographs of Afzal Guru and Maqbool Bhatt.

45. The faculty of JNU also has to play its role in guiding them to the right path so that they can contribute to the growth of the nation and to achieve the object and vision for which Jawaharlal Nehru University was established.

46. The reason behind anti-national views in the mind of students who raised slogans on the death anniversary of Afzal Guru, who was convicted for attack on our Parliament, which led to this situation have not only to be found by them but remedial steps are also required to be taken in this regard by those managing the affairs of the JNU so that there is no recurrence of such incident.

47. The investigation in this case is at nascent stage. The thoughts reflected in the slogans raised by some of the students of JNU who organized and participated in that programme cannot be claimed to be protected as W.P.(Crl.) No.558/2016 Page 21 of 23
fundamental right to freedom of speech and expression.

I consider this as a kind of infection from which such students are suffering which needs to be controlled/cured before it becomes an epidemic.

48. Whenever some infection is spread in a limb, effort is made to cure the same by giving antibiotics orally and if that does not work, by following second line of treatment. Sometimes it may require surgical intervention also. However, if the infection results in infecting the limb to the extent that it becomes gangrene, amputation is the only treatment.

आनन्दा's picture

4 Mar 2016 - 11:23 am | आनन्दा

बाकी उमर आणि भट्टाचार्यविरूद्ध सबळ पुरावे नाहीत म्हणे.

पण त्याच वेळेस हे मात्र मान्य केले गेले आहे की घोषणा दिल्या गेल्या आहेत. कोर्टाच्या टिप्पण्णी मध्ये हा मुद्दा बहुधा होताच की विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कँपसमध्ये होणार्‍या घटना>ची जबाबदारी सदर प्रतिनिधींची असते.

पुढे काय होते हे बघणे रोचक ठरावे. आता केजरीवाल कन्हैयाच्या भाजूने उतरणार असे दिसते. त्यांनी वातावरणनिर्मिती केलेली आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Mar 2016 - 7:53 pm | निनाद मुक्काम प...

मुळात कनैह्या च्या विरोधात विडीयो नाही आहे हे दिल्ली पोलिसांनी कोर्टाला सांगितले आहे
तरी कोर्टाने त्यास पूर्ण जमीन का नाही दिला ,
कारण स्पष्ट आहे
प्रसार माध्यमांनी असे वातावरण निर्माण केले कि दिल्ली पोलिसांनी कनैह्या विरुद्ध केस फक्त आणि फक्त विडीयो वर आधारित उभी केली आहे हा त्यांचा भ्रम होता.
अजूनही दिल्ली पोलिसांनी चार्ट शिट कोर्टात सदर करतांना पुरावे काय असणार आहेत ते गुलदस्त्यात ठेवले आहे.
ते पाहणे मनोरंजनचे ठरेल ,
माझ्या पाहण्यात अनेक दीड शहाणे भारतविरोधी घोषणा देणे हा भाषण स्वातंत्र्याचा हक्क आहे असे बडबडत होते
कोर्टाने जी निरीक्षण ह्या जमीन देतांना नोंदवली त्यात असा हक्क असू शकत नाही ते सांगितले आहे मुळात ह्या निरीक्षणाची सुरवात उपकार ह्या सिनेमातील एका गाण्याच्या दोन ओळीनी झाली त्यात जज ने लष्कराच्या जवानांची उदाहरणे दिली
ते तात्त्विक व तर्तिकदृष्ट्या बरखा दत्त किंवा कनैह्या चा वकिलांना पटले नाही पण जज ची निरीक्षणे व निकाल ह्यांचा आदर करणे लोकशाहीत अपेक्षित असते व जशी ही केस पुढे जाईल तेव्हा अजून बरेच काही बाहेर येईल , अनेकांची पितळे उघडकीस येतील

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2016 - 9:13 pm | श्रीगुरुजी

पुढे काय होते हे बघणे रोचक ठरावे. आता केजरीवाल कन्हैयाच्या भाजूने उतरणार असे दिसते. त्यांनी वातावरणनिर्मिती केलेली आहे.

"कन्हैया म्हणजे बाल केजरीवाल" असे आजच काही वाहिन्यांवर दाखवित होते.

बास क्या गुर्जि... आम्हि खफ वर लिहिलय कि भारताला आणखि एक युगपुरुष मिळालाय म्हणुन.

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2016 - 11:02 pm | श्रीगुरुजी

ककुने जश्या आझादीच्या घोषणा दिल्या, त्या ऐकून केजरीवालांनीही त्याच धर्तीवर घोषणा तयार केल्यात.

“Hum kya maangte – azaadi, LG ke hastakshep se azaadi, kendra ke hastakshep se azaadi, janta ko nirnay lene ki azaadi, rajnaitik ahankaar se azaadi. (What do we want — freedom, freedom from LG’s interference, freedom from Centre’s interference, people’s freedom to take decisions, freedom from political high-handedness),” Kejriwal tweeted.

http://indianexpress.com/article/cities/delhi/kejriwal-hums-kanhaiyas-az...

केजरीवालांचे आझादीचे स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात येईल. त्यासाठी त्यांना लोकसभेत व राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळवून घटनादुरूस्ती करावी लागेल. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना असेच गुलामीत सरकार चालवावे लागणार आहे.

अनुप ढेरे's picture

4 Mar 2016 - 9:54 pm | अनुप ढेरे

कन्हैय्या बंगालमध्ये 'सीपीआयएम'साठी प्रचार करणार अशी बातमी वाचली मगाशी.

सुबोध खरे's picture

3 Mar 2016 - 7:46 pm | सुबोध खरे

हि विचार स्वातंत्र्याची गळचेपी आहे.
आम्ही यावर सर्वोच्च न्यायालयात आणी त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू. आंतर राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाचा दरवाजा खटखटवू. चार सैनिक मेल्याचा काय मोठा तोरा मिरवता. त्यांचा पगार आमच्याच करातून जातो आणी हुतात्मा होण्यासाठीच तर ते सैन्यात भरती झालेले आहेत.
वैचारिक क्रांती आलीच पाहिजे.