ताजे ताजे गाजर हि आवाज ऐकली आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. लाल सुर्ख कोवळे गाजरे पाहून तोंडाला पाणी आले. तेवढ्यात सौ. हि बाहेर आली. मी म्हणालो गाजरचा हलवा खाण्याची इच्छा होते आहे. गाजर घेते का? (आ बैल मुझे मार, यालाच म्हणतात). आमची सौ. तशी सौदेबाजीत खरोखरच पटाईत आहे. ३० रुपये किलो वाले गाजरे, १०० रुपयात ५ किलो घेतले. गाजरे धुऊन माझ्या पुढ्यात ठेवली. हलवा खायचा असेल तर गाजरे किसावी लागतील. जिभेचा स्वाद माणसा करून काय काय करवून घेतो, निमूटपणे गाजर किसायला घेतली......
कीस बाप्या कीस
गाजर कीस.
किसता किसता
कविता हि कीस.
जिभेच्या स्वदापायी
गाजर कीस.
किसता किसता
बोट हि कीस.
लाल लाल गाजर
लाल लाल रक्त
हलव्याचा स्वाद
लागणार मस्त.
गाजर किसताना
शेजार्याने पहिले.
गल्लीत आमचे
नाकच कापले.
कीस बाप्या कीस
गाजर कीस
जोरु का गुलाम
गाजर कीस.
प्रतिक्रिया
9 Jan 2016 - 8:07 pm | यशोधरा
हीहीही! :D आज आमच्याकडेही सकाळी गाजर हलवा बनला आहे!
9 Jan 2016 - 8:22 pm | पैसा
बरीच मेहनत करावी लागली हलव्यासाठी! शेजार्याने पाहिले हे तर फारच त्रासदायक!!
9 Jan 2016 - 8:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आणि गाजर चांगले किसले आहे.
आता काही निरीक्षण.
गाजर किसताना
शेजार्याने पहिले.
गल्लीत आमचे
नाकच कापले.
आपण आपल्या हॉलमधे गाजर किसायला घेतलेले दिसत आहे. त्यामुळे शेजार्याने पाहिले ही गोष्ट पटली नाही. मागे वहिनींच्या हातात लाटणं दिसत आहे. बहुतेक पोळ्या लाटता लाटता आपण सांगितलेलं काम इमाने इतबारे करत आहात की नाही त्या पाहात असावे असे वाटते. (हलकेच घेणे )
कीस बाप्या कीस
गाजर कीस
जोरु का गुलाम
गाजर कीस.
गुलामाप्रमाणे आपण दिसत असलात तरी ते तसं नाही, स्त्रीच्या बरोबरीने पुरुषही घरातील सर्व कामे जवाबदारीने करतो असे आपण सिद्ध करत आहात असे वाटते. आज जग समतेचं आहे तसं ते प्रेमाचंही आहे. प्रेमाने माणुस कोणतंही काम करु शकतो, त्यासाठी हॉलमधे बसून सार्वजनिक ठिकाणी गाजराचा किस पाडत आहात आपल्याला कोणत्याही कोनाड्याची गरज वाटली नाही, आपण आपलं मोठेपण सिद्ध करत आहात त्यामुळे जोरु का गुलाम हा शब्दप्रयोग आवडला नाही. बाकी, एवढे किसून गाजर का हलवा वाट्याला आला की नाही ? त्याचा फोटो टाकायला हवा होता असे वाटले.
-दिलीप बिरुटे
(मेथीची भाजी निवडत असलेला)
11 Jan 2016 - 8:56 am | नाखु
आपकी (गाजर) पारखी नजर और पटाईत साबकी हुशारी.
काही मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असावी असा टीएम्सी* कडून कृतीशील संदेश तो हाच का???
(आणलेला) मटार सोलल्यावरच भाजी स्थापनेची पूजा संपवणारा पुजारी नाखु
टीएम्सी* श्ब्द उधारी रा रा कंजुष यांजकडून
10 Jan 2016 - 9:38 am | विवेकपटाईत
डॉक्टर साहेब, गमंत म्हणून कविता लिहिली आहे. गाजर किसताना आमच्या मेहुणीच्या मुलाने फोटू काढला. तो म्हणाला काका, हा फोटो whatsup शेयर करू का? (असा फोटू पाहून, पाहणारे काय म्हणतील) तो फोटू पाहून कविता सुचली.
10 Jan 2016 - 9:49 am | सौन्दर्य
जर गाजरं आणि कविता इतकी मस्त तर हलवा किती छान लागत असेल नाही ?
10 Jan 2016 - 10:19 am | याॅर्कर
>दादा कोंडके मोड ऑन<
'कीस','गाजर',आणि 'हलवा' काय!! च्यामारी सगळच लई भारी हाय
>दादा कोंडके मोड ऑफ<
10 Jan 2016 - 10:50 am | अजया
प्रत्येक यशस्वी गाजरकिस्यामागे एक पत्नीच असते हे फोटोवरुन सिध्द होत आहे !
10 Jan 2016 - 12:04 pm | अनन्न्या
आज रविवारी बघू नवरा काही मदत करतोय का
10 Jan 2016 - 12:53 pm | पद्मावति
:)मस्तं कविता.
आणि गाजरही छान लाल चुटूक आहेत, हलव्यासाठी आदर्श.
10 Jan 2016 - 6:05 pm | कंजूस
भाग्यवान तुम्ही.किती विश्वासाने तुमच्यावर कामं सोपवली जातात आणि पार पाडताना वाटसपवर फारवर्ड करण्यासाठी एक फोटो आइटम होता.बरेचसे वाइरल विडिओंचा उगम दिल्लीतच होतो असे ऐकून होतो.ते पटलं.बायकोकडून ( स्तुती करून का होईना ) कामं करूवून घेणाय्रांना जळवलंत.